काॅपी पेस्ट...... || श्री संत साईबाबा || ============= श्रीसाईबाबांकडे नाना प्रकारचे लोक येत असत. बहुतेक भरणा दु:खितांचा पीडितांचा असे. काही कुचेष्टेने येत. काही ते मुसलमान होते असे समजून ते नमन करण्यास अपात्र आहेत असे मानणारे होते. काही अनिच्छेने पण येत. काही दुसऱ्या संतांचे अनुग्रहीत असत. कुठल्याही निमित्ताने का होईना जे जे त्यांच्या दर्शनास गेले ते ते शेवटी त्यांच्या पायी विनम्न होऊन परतले. कारण बाबांनी कुणाचाही अनादर केला नाही. एवढेच नव्हे तर जे अन्य संतानुग्रहीत होते त्यांना 'अरे तुम्ही तुमच्या गुरूची भक्ती करा. तुमचा गुरू, तुमचे आराध्य दैवत आणि मी काही निराळे नाही.' ही गोष्ट साईबाबांनी त्यांना तिथल्या तिथे पटवून दिली. काहीजण आपल्या गुरूची, वडिलार्जित भक्तीची आठवण व उपासना विसरले होते. श्रीसाईबाबांनी त्यांच्या भावना जागृत करून, त्याना आठवण करुन देऊन त्याना पुन्हा भक्तीचा हरवलेला ठेवा त्यांच्या स्वाधीन केला. 'अरे, तुमचा गुरू कसाही असो, तुम्ही त्याचीच सेवा करा. भक्ती करा. तो आणि मी काही निराळे नाही. असाच उपदेश केला. 'मीच मोठा आहे. माझे सामर्थ्य केवढे अफाट आहे. तुम्ही माझीच भक्ती करा. असला हीन प्रकार त्यांनी कधीही केला नाही. श्रीसाईबाबांच्या चरित्रात याबाबत काही ठळक उदाहरणे श्रीसाईबाबांच्या उदात्त चरित्राची साक्ष पटवतात. भगवंतराव क्षीरसागर नावाचे एक गृहस्थ होते. त्यांचे वडील विठ्ठलभक्त होते.पंढरपूरची वारी करीत असत. पण त्यांच्या पश्चात् भगवंतरावानी सर्वच टाकून दिले.श्रीसाईबाबांनी त्याला बोलावून आणला व वडिलांच्या विठ्ठलभक्तीची आठवण करून दिली व विठ्ठलभक्तीचा ठेवा त्याचे हवाली केला. एक मामलेदार साईभक्त होते. पण त्यांचे मित्र एक डॉक्टर रामोपासक होते.मामलेदार म्हणाले, 'डॉक्टर, शिर्डीला येता का माझ्याबरोबर ?' डॉक्टर म्हणाले,'नको रे बाबा, तुझ्या त्या मुसलमान फकीराला कोण नमस्कार करील? मामलेदार म्हणाले, 'अहो तुम्ही नमस्कार मुळीच करू नका. नुसतेच चला माझ्याबरोबर.' डॉक्टर कबूल झाले व ते दोघे शिर्डीस आले व मशिदीत बाबांच्या दर्शनाला गेले.आणि काय चमत्कार त्या डॉक्टरने चक्क बाबांना साष्टांग नमस्कार घातला. श्रीसाईबाबांनी त्याला प्रत्यक्ष रामरुपात दर्शन दिले. भावार्थ 'अरे डॉक्टर, तू खुशाल रामाची भक्ती, कर. पण मी आणि तुझा राम काही निराळे नाही. कुणाला तुच्छ लेखू नकोस." हरिश्चंद्र पितळे नावाचे एक गृहस्थ होते. त्यांच्या मुलाला आकडी येत होती.कुठल्याही औषधोपचाराने गुण येईना. म्हणून ते मुलाला घेऊन शिर्डीस आले.त्यांच्या मुलाला गुण आला. बरे वाटले. घरी परतताना बाबांनी त्याना तीन रुपये देऊन सांगितले की, पूर्वी तुला मी दोन रुपये दिलेच आहेत. पितळे प्रथमच शिर्डीस आले होते म्हणून त्यांना पूर्वी दोन रुपये बाबांनी केव्हा दिले ही काही भानगड समजली नाही. पण घरी गेल्यावर त्यांच्या मातोश्रीने खुलासा केला. ती म्हणाली,'अरे बाळ, तुझ्या वडिलाना अक्कलकोटच्या स्वामीनी दोन रुपये दिले होते. ते रुपये आपल्या देवात पुजेसाठी ठेवले होते. पण त्यांच्या पश्चात् सर्वच मामला बदलला.ते रुपये पण कुठे नाहीसे झाले. श्रीसाईबाबांनी तुला तुझ्या वडिलांच्या भक्तीची आठवण करून दिली. आता तरी नीट पूजा-अर्चा कर.' नासिकचे मुळे नावाचे एक अग्निहोत्री ब्राझण होते. ते ज्योतिर्विद्येत व हस्त सामुद्रिकात फार निष्णात होते. ते घोलप स्वामींचे अनुग्रहीत होते. ते एकदा श्रीमंत गोपाळराव बुटीना भेटण्यास शिर्डीला आले. शिर्डीला मुळ्यानी काही लोकांचे भविष्य कथन केले व बाबांचा हात पहाण्याची इच्छा प्रदर्शित केली. पण बाबांनी तिकडे लक्षच दिले नाही. पुढे बाबा नेहमीप्रमाणे लेंडीवर जाण्यास निघाले आणि म्हणाले, 'अरे बरोबर गेरु घ्या.' लोकाना काही या गेरुचा कार्यभाग समजला नाही. पुढे बाबा लेंडीवरून परतले. नंतर नित्याप्रमाणे आरतीची तयारी झाली.तेव्हा बाबा म्हणाले, 'अरे त्या नव्या बामणाकडून दक्षिणा आणा.' श्रीमंत बुटी स्वतः वाड्यात मुळ्यांकडे गेले व त्यांनी बाबांचा निरोप सांगितला. मुळे त्यावेळी सोवळे नेसून त्यांच्या नित्यकर्मात मग्न होते. मुळे मनात म्हणाले, 'मी काय म्हणून दक्षिणा द्यावी? मी काही बाबांचा अंकीत नाही. शिवाय हे नित्यकर्म अर्धवट सोडून कसे जावे ? शिवाय मशिद म्हणजे सब गोलंकार.' शेवटी नाईलाजाने व नाखुषीनेच ते दक्षिणा घेऊन निघाले व कुणी शिवणार नाही अशा बाजूला कोपऱ्यात उभे राहिले. पुढे बाबांची आरती सुरू झाली आणि चमत्कार झाला. बाबांच्या जागी मुळ्याना त्यांचे पूर्वीचे ब्राह्मीभूत झालेले व भगवी छाटी घातलेले घोलप स्वामींचे दर्शन झाले. ते आपल्या गुरूच्या पायावर डोके ठेवण्यासाठी इतराना ढकलून जे एकदम पुढे घुसले त्याचा इतराना काहीच बोध होईना. मुळ्यांनी पायावर डोके ठेवून अश्रूचा अभिषेक केला व दक्षिणा हातावर ठेवण्यासाठी वर पाहिले तो त्या ठिकाणी साईबाबा हसतमुखाने पहात होते. तात्पर्य : 'अरे बामणा, मी आणि तुझा गुरू काही निराळे नाहीत. तू खुशाल तुझ्याच गुरूची भक्ती कर.' एकदा एक पंत त्यांच्या मनात नसताना त्यांच्या व्याही व विहिणींच्या आग्रहावरून शिर्डीस जाण्यास तयार झाले. त्यानी शिडींस जाण्यापूर्वी आपल्या गुरुची अनुमती मिळविली व ते सर्वांच्या बरोबर शिडीस गेले.शिर्डीस गेल्यावर मशिदीत बाबांचे दर्शनास गेले. पण तिथे गेल्यावर पंताना एकदम चक्कर आली व ते खाली कोसळले. बरोबर आलेली मंडळी घाबरून गेली. हे काय नसतेच विघ्न आले! पण मग श्रीसाईबाबांनी पंताच्या अंगावर पाणी शिंपडले आणि थोड्याच वेळात पंत जणु काही झोपेतून जागे होऊन उठून बसले. त्यावर श्रीसाईबाबा हसून म्हणाले, 'अपना तकिया छोडना नहीं। अरे तुझा गुरु कसाही असला तरी तू त्याचीच भक्ती कर.सेवा कर.' वरील सर्व उदाहरणावरून आपणास असे दिसून येईल की श्रीसाईबाबांनी दुसऱ्याच्या गुरुची किंवा दुसऱ्या संतांची वा सत्पुरुषाची कधीही अवहेलना केली नाही. स्वतःचा बडेजाव दाखविण्यासाठी, स्वतःचे स्तोम माजवण्यासाठी, 'तुम्ही माझीच भक्ती करा, तुमच्या गुरुपेक्षा मी किती श्रेष्ठ आहे. माझे केवढे सामर्थ्य आहे.' अशा त-हेचा हीन प्रचार श्रीसाईबाबांनी केव्हाही केला नाही. खऱ्या संताच्या थोर मनाची व थोरपणाची ही साक्ष आहे, आणि म्हणून अशा या थोर संताची श्रीसाईबाबांची भक्ती व उपासना आमच्या वंशात पिढ्यान पिढ्या चालू राहो अशी त्यांच्या चरणी मी भावपूर्ण प्रार्थना करतो. आपण पण अशीच प्रार्थना कराल अशी माझी खात्री आहे. हे सद्गुरु श्रीसाईबाबा एक तुझी कृपा, तुझा आशीर्वाद म्हणजे माझे विश्वसर्वस्व आहे. या भणंग भिकाऱ्या जवळ फक्त भक्तीभावाने केलेल्या नमस्काराशिवाय तुला देण्यासारखे दुसरे काही काही नाही. क्षमस्व. *!! सदगुरु श्री साईनाथार्पणमस्तु !!* *०१,१२,२१,बुध.s.n.b.7:49 am.plg.*

0 कॉमेंट्स • 0 शेयर

बेडी हनुमान मंदिर..... जगन्नाथ पुरी..... पुरीच्या जगन्नाथ मंदिराचे नाव ऐकले की रहस्यांनी भरलेल्या मंदिराचे चित्र डोळ्यासमोर येते. या मंदिरातील अपूर्ण लाकडी मूर्तींचा विषय असो किंवा मंदिराच्या वरून कोणतेही विमान किंवा पक्षी नसणे असो. या सर्व गोष्टी आश्चर्यकारक आहेत. केवळ हे मंदिरच नाही तर त्याच्या आजूबाजूला अशी काही रहस्ये आहेत ज्याबद्दल जाणून घेऊन लोक आश्चर्यचकित होतात. यापैकी एक म्हणजे हनुमानजींचे रहस्य. स्वतः परमेश्वराने आपल्या परम भक्ताला समुद्रकिनारी साखळीने बांधले आहे. देव जेव्हा पृथ्वीवर अवतरतो तेव्हा सर्व देवता-पुरुष-गंधर्वांना देवाचे दर्शन घ्यायचे असते. भगवान जगन्नाथजींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतानाही असेच झाले, तेव्हा जवळून वाहणारा सागरची पण देवाला पाहण्याची इच्छा झाली. पौराणिक कथेनुसार, महासागराने देवाच्या दर्शनासाठी अनेक वेळा मंदिरात प्रवेश केला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले. सागरने हे दृष्टता सलग तीन वेळा केली. जेव्हा समुद्राने मंदिरात अनेक वेळा प्रवेश केला आणि नुकसान केले तेव्हा भक्तांनी भगवान जगन्नाथ यांना मदतीसाठी आवाहन केले. कारण समुद्र असल्याने भाविकांना देवाचे दर्शन होणे शक्य नव्हते. भगवान जगन्नाथांनी मग हनुमानजींना समुद्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियुक्त केले. पवनसुतांनी सागरही बांधला. यामुळेच पुरीचा समुद्र नेहमीच शांत असतो. पण नंतर त्यांनीही हुशारी दाखवली. समुद्राला बांधल्यानंतर हनुमानजींनी रात्रंदिवस तेथे पहारा ठेवला. मग एके दिवशी सागरने हुशारी दाखवून हनुमानजींच्या भक्तीला आव्हान दिले. ते म्हणाले की, तू कसा देवाचा भक्त आहेस जो कधीच दर्शनाला जात नाही. भगवान जगन्नाथाच्या अनोख्या सौंदर्याचे कौतुक करावेसे वाटत नाही. तेव्हा हनुमानजींनाही वाटले की,खूप दिवस झाले आजच देवाला भेटूया....? सागराचे हे म्हणणे ऐकून परमेश्वराच्या दर्शनसाठी ऐकून हनुमानजी जगन्नाथांच्या दर्शन जाऊ लागले. मग हे बघून सागरही त्यांच्या मागे जाऊ लागला. अशाप्रकारे पवनसुत जेव्हा कधी मंदिरात जायचे तेव्हा सागरही त्याच्या मागे येत असे. अशा प्रकारे मंदिराचे पुन्हा नुकसान होऊ लागले. तेव्हा हनुमानाच्या या सवयीमुळे व्यथित होऊन जगन्नाथजींनी त्याला सोन्याच्या बेड्या घातल्या. जगन्नाथपुरीमध्ये समुद्र किनारी बेडी हनुमानाचे प्राचीन मंदिर आहे जिथे त्यांना देवाने बांधले होते. बेडी हनुमान मंदिर ही भक्त आणि परमेश्वर यांच्यातील अनोख्या नात्याची कथा आहे. जगन्नाथ स्वामींचे दर्शन घेणारा प्रत्येक भक्त बेडी हनुमानाच्या दर्शनाला नक्कीच जातो. याचे कारण असेही सांगितले जाते की, जे भक्त जगन्नाथ स्वामींचे दर्शन घेतल्यानंतर त्यांच्या मंदिरात येतात तेव्हा हनुमानजी भक्तांच्या डोळ्यांत पवनसुत परमेश्वराला पाहतात. मंदिरात हनुमानजींचा चेहरा काहीसा वाकडा आणि डोळे मोठे आहेत. असे म्हणतात की जेव्हा देव त्यांना बांधून येथून निघून गेले तेव्हा ते देव जिथून गेला त्याच दिशेने पाहत राहिले. शांत ठिकाणी बांधलेले हे मंदिर मनालाही अपार शांती देते. जय जगन्नाथ...... #सनातन. *०१,१२,२१,बुध.s.n.b.7:44 am.plg.*

0 कॉमेंट्स • 0 शेयर

🛕🪔🌟👣👣🌟🪔🛕 *कनकमयी कार्तिकमास* *[२३] सप्ताह* *आळंदी निवासी* *श्री ज्ञानेशांचा* *(४)ज्ञानेश्वरमाऊली* हे गुरुमाऊली *श्रीज्ञानेश* तु बैसला अलंकावतीस झाले आज *७२५* वर्ष तुझ्या संजीवन समाधीस.. सारे जमलेया दर्शनास तुज पहाया भारी हौस सर्वामनी आहे रे आस तुझे दर्शन मिळो खास.. वारा विहरतो आसपास त्यासही दर्शनाचा सोस भुमाता घेते सुखे श्वास तुझा आहे इथे रहिवास.. सुखे कोंदले निलाकाश आदित्या उजळे प्रकाश इंद्रायणीत श्रीस्पर्शवास जलात चरणधुलपायस.. अग्नी आहे दिपप्रकाश साक्षी तो तव दर्शनास कौतुक पंचमहाभुतांस पंचारती प्रिय ज्ञानेशांस.. तुच विष्णु ब्रह्मा महेश तुच जगदंब त्रिधा ईश तुझमुळे मनात संतोष मिळता अनुपमआशिष.. पुरव देवराया मन आस ज्ञानेश्वरीवाचनाची हौस येवोच रे आराधनेस यश मधु जन्मोजन्मीची दास.. संपो सोसलेला वनवास निरसुन जावो सारे तरास तुटुन जावो दृढ यमपाश करु नको श्रीगुरु निराश.. दिसो साजीरे तव श्रीमुख भागव अमुची दर्शन भुक अमृतानुभवअनुभवसुख दाटो सदैव हृदया कौतुक.. आज तुझा दिन विशेष निरसो वाईट व तामस देव दुर करी दुर्दैव,रोष दंडवत सतत गुरु ईश.. क्षमायाचना अश्रु अक्ष राहो सेवारत सदा दक्ष प्रार्थना,आराधना संरक्ष परमेशा देवराया रक्षरक्ष.. *माधुरी ब्रह्मे-देशपांडे* *-७९७२१३६३९०-* *उत्पत्ती एकादशी* *३०-११-२१-मंगळवार* 🛕🪔🌟👣👣🌟🪔🛕 *३०,११,२१,मंगळ.s.n.b.5:07 pm.plg.*

0 कॉमेंट्स • 11 शेयर

शुभ दिन👏👏🌷🌷👏👏 आजचा दिनविशेष.३० नोव्हेंबर १८५८. महान वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ (सर)जगदीशचंद्र बोस यांचा जन्मदिन. पूर्व बंगालमधील डाक्का जिल्ह्यातील राणीखल या खेडेगावात  जगदीशचंद्र बोस यांचा जन्म झाला. जगदीशचंद्रांचे घराणे हे बंगाल प्रांतातील एक खानदानी घराणे होते. त्यांची आई साध्वी व सुशील होती. त्यांचे वडील भगवानचंद्र बसू हे सरकारी नोकरीत सब डिव्हिजनला ऑफिसर होते. त्या काळी इंग्रजीत जसे ठाकूरचे टागोर झाले, राय आडनावाचे रे झाले तसेच बसू आडनावाचे इंग्रजीत  बोस झाले. डॉ. जगदीशचंद्र बोस कोलकाता येथील सेंट झेवियर शाळा आणि त्याच नावाच्या महाविद्यालयात शिकले.त्यांनी तत्कालीन कलकत्ता विद्यापीठातून भौतिकशास्त्र विषयात शिक्षण घेतले. वैद्यकीय शिक्षणासाठी पुढे ते इंग्लंडला गेले. इंग्लंडच्या ख्राईस्ट चर्च महाविद्यालयातून भौतिकी, रसायन वनस्पतिशास्त्र आणि निसर्गविज्ञानाचा अभ्यास पूर्ण करून ते भारतात परत आले. मायदेशी प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये त्यांनी प्राध्यापकाची नोकरी सुरू केली. ते अत्यंत बुद्धिमान आणि विद्यार्थीप्रिय शिक्षक होते. लहानपणापासूनच जगदीशचंद्र आजूबाजूचा निसर्ग पहायचे, त्याचे निरीक्षण करायचे. निसर्गातील अनेक गोष्टी पाहून त्या अशाच का, असा प्रश्न त्यांना पडे. सर्व झाडे एकाच वेळी का फुले देत नाहीत? एखाद्या झाडाची पालवी पोपटी हिरवी पण दुसर्‍याची तांबूस असा फरक का पडतो? असे त्यांना वाटे. झाडे, फुले, फुलपाखरे, भोवतीचा निसर्ग यांचे निरीक्षण करणे हा त्यांचा आवडता छंद होता. इंग्लंड व कोलकाता येथील प्रेसिडेन्सी महाविद्यालयात १८८५ ते १९१५ अशी ३० वर्षे भौतिकशास्त्र शिकवत असतानाच जगदीशचंद्रांनी विद्युतशक्तीवर संशोधन केले. मार्कोनीच्या कामगिरीच्या आधी बोस यांनी १८८५ मध्ये रेडिओ लाटाद्वारे वायरलेस संप्रेषणाचे प्रदर्शन केले. या प्रात्यक्षिकात जगदीशचंद्र बसू यांनी दूरवरुन बेल वाजवली आणि तोफांचा स्फोट झाला, जो लाटांच्या सामर्थ्याचा नमुना होता. विद्युत चुंबकीय तरंगांचा शोध घेऊन त्यांनी बॅटरी बनवली. या शोधाची कीर्ती सर्वदूर पसरली. त्यांनी स्वत: प्रयोगशाळा सुरू करून संशोधन सुरू केले. टाऊन हॉलमध्ये १८९५ मध्ये प्रचंड गर्दीसमोर बिनतारी संदेश पाठविण्याचा प्रयोग त्यांनी सादर केला. त्यांच्या एका शोधनिबंधामुळे त्यांना 'डॉक्टर ऑफ सायन्स' ही पदवी मिळाली. जगदीश चंद्र यानी प्रथम बिनतारी (wireless) संदेश पाठवणारा यंत्र विकसित केले होते. पण या यंत्राचे श्रेय त्याना मिळाले नाही. आजची मॉडर्न वायरलेस टेकनॉलॉजी त्या अविष्कारावर आधारलेली आहेत, त्यांनी नेमेलाइट रेझोनंट रेकॉर्डर, ऑसिलेटिंग रेकॉर्डर, कंपाऊंड लेव्हलर, क्रेसकोग्राफ, बॅलिन्सिंग अ‍ॅपरेट्स आदी उपकरणे तयार केली. बोस यांनी सर्वप्रथम जगाला हे दर्शविले की इलेक्ट्रोमॅग्नेटिक लाटा हवाईद्वारे दुर्गम ठिकाणी पोहोचू शकतात. या लाटा दुसर्‍या स्थानावरील क्रियेवर नियंत्रण ठेवू शकतात. त्यांची ही संकल्पना नंतर रिमोट कंट्रोल सिस्टमचा सैद्धांतिक आधार बनली. त्यांच्या या उल्लेखनीय कार्यासाठी 'इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल  इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियर्स' ने जगदीश चंद्र बोस यांना त्याच्या 'वायरलेस हॉल ऑफ फेम' मध्ये स्थान दिले आहे. विद्युतशक्तीवरील संशोधनानंतर बोस हे वनस्पतिशास्त्राकडे वळले. सचेतन आणि अचेतन वस्तूतील साम्य आणि भेद याचा त्यांनी अभ्यास केला. त्यांनी  थंडी, प्रकाश, विद्युत, उष्णता या घटकांचा वनस्पती व प्राणी यांच्यावरील परिणामांचा अभ्यास केला. वनस्पतींचे श्वसन, रुधिराभिसरण पद्धतीने होणारे त्यांच्यातील कार्य, अन्नाची ने-आण, निरुपयोगी वस्तूंचा निचरा हे त्यांच्या संशोधनाचे विषय होते. वनस्पतीमध्ये होणार्‍या सूक्ष्म बदलांची माहिती ठेवून त्याच्या नियमित नोंदी त्यांनी ठेवल्या. त्यावर संशोधन केले. त्यांच्या याच संशोधनातून ‘वनस्पतींना संवेदना असतात’ हे त्यांनी सिद्ध केले. वनस्पतिशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी रेझोनंट रेकॉर्डर, ऑसिलेटिंग रेकॉर्डर, कंपाऊंड लेव्हलर, क्रेसकोग्राफ, बॅलिन्सिंग अ‍ॅपरेट्स आदी उपकरणे तयार केली. त्यांनी वनस्पतींना क्लोरोफॉर्म हुंगवला, मर्क्युरिक क्लोराइड हे विष पाजले, अतिउष्ण तापमानात ठेवले. वनस्पतींनी जो विद्युत प्रतिसाद दिला तो प्राण्यांनी त्या-त्या वेळी दिलेल्या प्रतिसादाशी जुळणारा होता. वनस्पतीच्या शरीरशास्त्राचे आद्य संशोधक म्हणून ते ओळखले जाऊ लागले. वनस्पतींचा प्रतिसाद नोंदविण्यासाठी त्यांनी विविध उपकरणे तयार केली. वनस्पतींमध्येही मज्जासंस्था असते. त्यामुळे त्या प्रतिसाद देतात. त्यांनी डेथ रेकॉर्डर हे उपकरण बनवले. साठ अंश सेल्सिअस तापमानाला वनस्पती मरतात, मृत्युसमयी वनस्पती विजेचा मोठा दाब तयार करतात. इतकेच काय, तर वनस्पतींना दारू पाजली, तर त्या माणसाप्रमाणे झिंगतात. या संशोधनावर त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यातील काही... इरिटेबिलिटी ऑफ प्लॅंट्स इलेक्ट्रो-फिजिओलॉजी ऑफ प्लॅंट्स ट्रॉपिक मुव्हमेंट ॲन्ड ग्रोथ ऑफ प्लॅंट्स दि नव्‍‌र्हस मेकॅनिझम ऑफ प्लॅंट्स प्लॅंट रिस्पॉन्स दि फिजिऑलॉजी ऑफ फोटोसिंथेसिस दि मोटार मेकॅनिझम ऑफ प्लॅंट्स रिस्पॉन्सेस इन द लिव्हिंग ॲन्ड नॉन लिव्हिंग लाइफ मुव्हमेंट्स ऑफ प्लॅंट्स (भाग १ ते ४) जगदीशचंद्र बोस हे जगातील पहिले वैज्ञानिक होते ज्यांनी रेडिओ आणि मायक्रो वेव्हच्या ऑप्टिक्सवर काम केले. या व्यतिरिक्त त्यांनी वनस्पतीशास्त्रातही अनेक महत्त्वपूर्ण शोध लावले. अमेरिकेचा पेटंट मिळवणारा ते पहिले भारतीय वैज्ञानिक होते. त्यांना जगभरातील रेडिओ सायन्सचे जनक म्हटले जाते. जगदीशचंद्र बोस यांनी सन १९१७मध्ये कोलकाता येथे बोस रिसर्च इन्स्टिट्यूट नावाची संस्था स्थापन करून एक मुखपत्रही सुरू केले. जगदीशचंद्र बोस हे एक भारतीय जीवशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, तसेच पुरातत्त्वज्ञ होते. त्यांच्या वनस्पतीशास्त्रावरील अचंबित करणाऱ्या महान संशोधन कार्याला त्रिवार वंदन!!!! माहिती संकलन सौ.संध्या यादवाडकर माहिती स्त्रोत -- इंटरनेट. 9819993137.

+1 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 12 शेयर

*।। श्री राम जय राम जय जय राम ।‌।* *🚩श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर🚩* *🌸 प्रवचने :: ३० नोव्हेंबर 🌸* *लोभाच्या चित्तीं धन । तैसें राखावें अनुसंधान ॥* मंगलांत मंगल, शुद्धांत शुद्ध जाण । एक परमात्म्याचें अनुसंधान ॥ हें बीज लावले ज्यांनी । धन्य धन्य झाले जनीं ॥ अचूक प्रयत्‍न तोच जाण । ज्या प्रयत्नांत न चुकतें अनुसंधान ॥ सत्य करावें भगवंताचे अनुसंधान । जेणें दूर होईल मीपण ॥ 'मी माझे' म्हणून सर्व काही करीत जावें । परि भगवंतापासून चित्त दूर न करावें ॥ मारुतिरायाचे घ्यावे दर्शन । त्याच्याच कृपेने राखावे अनुसंधान ॥ लोभ्याच्या चित्तीं धन । तैसे राखावे अनुसंधान ॥ दूर गेला प्राणी । परत येण्याची वेळ ठेवी मनीं । तैसे राहणे आहे जगांत । मी परमात्म्याचा होण्याचा ठेवावा हेत ॥ म्हणून न सोडावे अनुसंधान । कशापेक्षांही जास्ती करावें जतन ॥ कोणाचेंच न दुखवावें अंतःकरण । व्यवहार करीत असावा जतन । व्यवहारांतील मानअपमान । हे टाकावे गिळून ॥ अखंड राखावें रामाचें अनुसंधान । जेणें सदाचरणाकडे लागेल वळण ॥ माझें नातेगोतें राम । हा भाव ठेवून जावें रामास शरण ॥ हें ऐका माझें वचन । मनानें व्हावे रामार्पण ॥ अनन्य व्हावें भगवंती । जो कृपेची साक्षात् मूर्ती ॥ आपले कर्तेपण टाकावें । म्हणजे शरण जातां येते ॥ ज्याने धरलें भगवंताचे पाय । तोच त्याला झाला उपाय ॥ मी आता झालों रामाचा । त्याला अर्पावी सर्व चिंता ॥ मी ज्याचा झालो त्याला माझी काळजी । हा ठेवावा भाव चित्तीं ॥ माझे हित तो जाणे । हें जाणून स्वस्थचि राहणें ॥ विषयवासना सुटण्यास उपाय जाण । आपण जावें रामास शरण ॥ जें जें करणें आपलें हाती । तें करून न झाली शांति । आतां शरण जावें रघुपति ॥ जावें रघुनाथास शरण । तोच दुःख करील निवारण ॥ एक राम माझा धनी । त्याहून दुजें आपले न आणी मनीं ॥ अभिमानरहित जावें रामाला शरण । त्यानेंच राम होईल आपला जाण ॥ आतां जगांत माझे नाही कोणी । एका प्रभु रामावांचुनी ॥ निर्धार ठेवा मनीं । शरण जावें राघवचरणीं ॥ जें जें केले आजवर आपण । तें तें करावें रामास अर्पण ॥ जें जें होते तें राम करी । ते स्वभावें होय हितकारी । म्हणून जी स्थिति रामाने दिली । ती मानावी आपण भली ॥ गंगेच्या प्रवाहांत पडले । गंगा नेईल तिकडे गेले ॥ गंगा जाते योग्य ठिकाणी । याचे जाणे सहजासहजी ॥ तैसे असावे भगवंताचे स्मरणात । राम ठेवील त्यांत मानावें हित ॥ सर्व जगत् ज्यानें जाणले मिथ्या । हे जाणून शरण जावे रघुनाथा ॥ कारण परमात्म्याला जाणे शरण । याहून दुजा मार्ग न उरला जाण ॥ धन्य तो व्यावहारिक जाण । जेणे केलें रामास स्वतःला अर्पण ॥ *३३५ . रामापरतें सत्य नाही । श्रुतिस्मृति सांगतात हेंच पाही ॥ रामसत्तेविण न हाले पान । हें सर्व जाणती थोर लहान ॥* *।। श्री राम जय राम जय जय राम ।।*

0 कॉमेंट्स • 12 शेयर

*🌷🌷राम कृष्ण हरी🌷🌷* *ऋण फेडता आले पाहिजे.* *वनवासाच्या काळात माता सीतेला तहान लागली,* *तेव्हा श्रीरामाने सर्वत्र बघितले,* *पण पाणी कोठेच मिळेना.* *सर्वत्र जंगलच दिसत होते.* *तेव्हा श्रीरामाने पृथ्वीमातेला प्रार्थना केली की,* *जेथे कोठे पाणी असेल,* *तेथे जाण्याचा मार्ग आम्हांला दाखव.* *तेव्हा एक मयुर 🦚तेथे आला,* *व श्रीरामास म्हणाला,* *येथून थोड्याशा अंतरावर एक जलाशय आहे.* *चला मी आपणास दाखवतो.* *पण तिथे मी उडत उडत जाईन,* *आणि आपण चालत येणार,* *त्यामुळे चुकामूक होऊ शकते.* *म्हणून मी मार्गात एक एक पंख टाकत जाईन.* *त्यामुळे आपणास मार्ग सापडेल,* *व आपण जलाशया जवळ पोहचाल.* *आपणास माहिती आहे की,* *मयूर पंख, हॆ एक विशेष काळी,* *व एक विशेष ऋतुमध्ये* *पंख तुटून पडतात.* *पण मोराच्या इच्छेविरूद्ध पंख निघत असतील,* *तर त्याचा मृत्यु होतो.* *आणि तेच झाले.* *त्याचे पंख निघत होते,* *त्यामुळे त्याचा मृत्यूचा काळ जवळ आला होता.* *तेव्हा मोर म्हणाला की,* *मी किती भाग्यशाली आहे की,* *जो जगाची तहान भागवतो,* *त्या प्रभूची तहान भागवण्याचे मला सौभाग्य प्राप्त झाले.* *माझे जीवन धन्य* *झाले. आता मरताना माझी काही इच्छा शेष राहीली नाही.* *तेव्हा मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाने मयुरास म्हटले की,* *माझ्या साठी जे मयूरपंख इच्छेविरूद्ध काढून,* *मार्गात टाकलेस, त्यामुळे तुझे माझ्यावर ऋण झाले आहे,* *व जो ऋणानुबंध झाला आहे,* *हे ऋण मी पुढच्या अवतारात, नक्की फेडीन.* *माझ्या कृष्ण अवतारात तुला,* *माझ्या माथ्यावर धारण करीन.* *त्यानुसार पुढच्या अवतारात,* *श्रीकृष्ण अवतारात त्यांनी आपल्या माथ्यावर मयूरपंख धारण करुन,* *वचना नुसार मयुराचे ऋण उतरवले.* *तात्पर्य हे आहे की,* *जर प्रत्यक्ष भगवंतास मागील जन्मातले,* *ऋण पुढील जन्मात फेडावे लागले,* *मग आपण तर मनुष्य आहोत.* *न जाणो आपणास कितीतरी ऋण फेडायचे आहे.* *आपण तर अनेक ऋणानुबंधनात अडकलेलो आहोत.* *ते ऋण फेडण्यासाठी,* *कित्येक जन्म कमी पडतील.* *अर्थात,आपणास जे काही भले करायचे आहे,* *ते या जन्मात करायचे आहे.* *कारण पुढचा जन्म कुठला असेल,* *आपणास माहिती नाही,* *आणि मनुष्य जन्मातच ऋण फेडता येते.* *एक महत्त्वाचे-* *पूर्वीचा ऋणानुबंध असल्याशिवाय,* *माशी सुध्दा अंगावर बसत नाही.* *त्यामुळे मागच्या जन्मातील देणेकरी, वैरी, ज्यांना त्रास दिला गेला,* *हे आपल्या या जन्मी भाऊ, बहीण,नातेवाईक, शेजारी,* *या रुपात आपापले ऋण वसूल करतात,* *व ज्यांना आपण मदत केली,* *तेही या जन्मी कोणत्या ना,* *कोणत्या रुपात येवून,* *परतफेड करतात.* *त्यामुळे मी सरळमार्गी आहे,* *मी कोणालाही त्रास दिला नाही,* *मग माझ्याबाबतीत असे का होते,* *याची कधीच खंत करु नका,* *समर्थ रामदास स्वामी म्हणतात,* *मना त्वाची रे पूर्वसंचित केले.!* *तयासारिखे भोगणे प्राप्त झाले.!!* *देह प्रारब्धावर सोडून,* *मन सद्गुरुचरणी,* *व वाणी नामस्मरणात गुंतविल्यास,* *जीवनातील गंमत,* *व आनंद अनुभवता येतो...!!* *🌷🙏🏻राम कृष्ण हरी🙏🏼🌷* *३०,११,२१,मंगळ.s.n.b.12:32 pm.plg.*

+1 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 12 शेयर