+10 प्रतिक्रिया 2 कॉमेंट्स • 3 शेयर

[NK.32/2] "पुजारीन म्हणाली, "मच्छिंद्राचा हा देह भुयारात बारा वर्षे टिकेल ? " गोरक्ष म्हणाला, "हो. तो चिरंजीव मच्छिंद्राचा देह आहे. मर्त्य माणसाचा नव्हे ! पण तूं ही गोष्ट कोणालाही सांगू नको. नाहीतर अनर्थ होईल ! एवढे सांगूनही पुजारणीने राणीला सांगितले आणि कोणत्या घटना घडल्या ! त्या वाचा ह्या भागात .... _/\_ नवनाथांच्या अद़्भूत नवलकथा _/\_ **************************************** * [३२] मच्छिंद्रनाथांचा परकाया प्रवेश [भा.२रा] * ********** ।।श्री नवनाथ कथासार ।।******** त्रिविक्रम राजा जसा शिवदर्शनासाठी यायचा तसाच राजाच्या देहात वावरणारा मच्छिंद्रही शिवालयात आला. गोरक्षानी देह भुयारात सुरक्षित असल्याचे सांगितले. तरीही मच्छिंद्राने स्वतःच्या चक्षूंनी सुरक्षित असल्याचे पाहून निर्धास्त होऊन राजवाड्यात निघून गेले. तसेच अधूनमधून ते भुयारातील देह बघून जात असे. नंतर तीन महिण्यांनी मच्छिंद्राची अनुज्ञा घेऊन गोरख तीर्थयात्रेला निघून गेला. पुढे आणखी काही महिने गेले.मच्छिंद्रापासून रेवतीला दिवस गेले. तो राजाच आहे अशी तिची भावना होती. नऊ महिने पूर्ण होताच तिला मुलगा झाला. बारसे करुन त्याचे नाव धर्मनाथ असे ठेवले. मुलगा पाच वर्षाचा झाला. राजाराणी त्याला शिवालयात घेऊन गेली. शंकराच्या समोर राणी उभी राहिली. राजा बाहेर दूर उभा होता. पुजारीन राणीजवळ होती. राणी शंकराची प्रार्थना करु लागली, "हे शंकरा ! माझी आता एकच इच्छा उरली आहे. माझे पती जिवंत असतानाच मला मरण येवो. सुवासिनी म्हणून मी मरावे." तिची प्रार्थना ऐकून पुजारीन एकदम हसली. तेव्हा राणीला आश्चर्य वाटले. तिने पुजारणीला त्या हसण्याचे कारण विचारले. तेवढ्यात राजा राणीला सांगून शिवालयातून मुलाला घेऊन निघून गेला. मी मागून येते असे राणीने साःगितले. मग पुजारणीने तिला अभय मागून खरा प्रकार सांगितला. मच्छिंद्राचा देह पण दाखविला. ती म्हणाली, "तुम्ही आधीच विधवा आहात, असे पाहून मी हसले." राणीला आत्यंत वाईट वाटले. एकीकडे तिला मच्छिंद्राचा भयंकर राग आला. एकीकडे पातिव्रताभंगाचे अत्यंत दुःख झाले. अकीकडे सर्व गोष्टीचे नवल वाटले. एकीकडे पुत्रवात्सल्याने मन कासावीस झाले. तिला त्या धक्क्यातून मूर्च्छाच आली. पण लवकर मनावर ताबा ठेवून व पुजारणीला न रागवता विश्वासात घेऊन ती उदासपणे परत गेली. "आणखी सात वर्षानी राजाचा देह सोडून मच्छिंद्र परत त्या शरीरात शिरेल. त्यावेळी मी पुन्हा विधवा ती विधवाच होईन. त्यावर उपाय काय ? गुप्तपणे भुयारातला देह नष्ट करुन टाकला तर ? तर मच्छिंद्राला राजाचा देह सोडून जायला आधारच मिळणार नाही. असेच करावे." असा साहसी विचार करुने राणीने आपल्या विश्वासातल्या सेवकांना घेऊन रात्रीबेरात्री शिवालयात जाऊन मच्छिंद्राचा देह भुयारातून काढला. आपल्या सेवकांना तिने आज्ञा दिली, या दुष्ट गोसावड्याच्या शरीराचे तिळाएवढे बारीक तुकडे करुन अरण्यात फेकून द्या. कोणालाही कळता कामा नये." तिने स्वतः ते काम होईपर्यंत हजर राहून पुजारिणीला कोठेही काहीही न बोलण्याची शपथ घातली, आणि नंतर ती राजवाड्यात निघून गेली. पण हे सर्व पार्वती बघत होती. तिने शंकराची समाधी भंग करुन राणीचे कृत्य सांगितले. "तुमचा प्रिय शिष्य मच्छिंद्र. पहा त्याच्या शरीराचे तिळाएवढे तुकडे केले. तुम्ही समाधी लावून बसलात आणि तुमच्या भक्ताचा नायनाट होतोय," ती म्हणाली. शंकराला हे जेव्हा कळले तेव्हा फार वाईट वाटले. ते म्हणाले, "पार्वती यक्षिणींना बोलाव आणि ते सर्व तुकडे एकत्र करायला आणि कैलासावर इथे ते आणून ठेवायला सांग !" पार्वतीने बोलावताच यक्षिणी आल्या. त्यांनी मच्छिंद्राच्या देहाचे सर्व तुकडे एकत्र केले. "ते तुकडे वीरभद्राच्या स्वाधीन करा." पार्वतीने आज्ञा केली. चामुंडेच्या अधिकाराखालील सर्व यक्षिणी ते तुकडे घेऊन कैलासावर गेल्या. "वीरभद्र, हे मच्छिंद्राच्या देहाचे कणकण आहेत. त्रिविक्रम राजाची पत्नी रेवती हिने हे कृत्य केले आहे." वीरभद्र म्हणाला, "काशीनरेश त्रिविक्रम ? होय ! मला शंकरांनी सांगितले आहे." चामुंडा म्हणाली, "याच मच्छिंद्राने आम्हाला नग्न करुन आमची फजिती केली होती. अष्टभैरव व मारुती यांचा पराभव केला होता. हा आमचा शत्रूच आणि तुमचाही, आज बरा आपल्या तावडीत त्याचा देह सापडला आहे. गोरक्षनाथ हा त्याचा शिष्य. गुरुला सोडवून नेण्यासाठी तो इथे येण्याचा संभव आहे. हा देह आपल्या ताब्यात ठेवा. सावधान रहा !" हे ऐकून वीरभद्राने ८४,७२,००,००० शिवगण पहाऱ्यावर ठेवले. कोटी यक्षिणी पण पहारा करु लागल्या. इकडे त्रिविक्रम राजाच्या शरीरातील मच्छिंद्र नित्य शिवालयात येत असे. पण भुयाराचे तोंडावरील दार व्यवस्थित पाहून त्याला खरा प्रकार काहीच कळला नाही. दिव्यदृष्टीने पहावे असाही विचार त्याच्या मनात आला नाही. पुजारीन नित्याप्रमाणे त्याचे स्वागत करीत राहिली. रेवती राणी राजाबरोबर प्रेमाचे नाटक करीत राहिली. आपण आणखी सात वर्षांनी या देहाचा त्याग करायचा आहे, असा विचार मात्र मच्छिंद्राने सतत मनात बागला होता. पुढे तीही सात वर्षे भरत आली, एकूण बारा वर्षे होत आली. गोरक्ष तीर्थयात्रेला गेला होता. तिकडे त्याने त्या अवधीत केले ते पुढील अध्यायात येईल. [ हा भाग पुनः प्रसारीत केला आहे.] ---- बोला ! अलख निरंजन ---- -- "माणिक"ची गोष्ट व मच्छिंद्राच्या शोधात--

+16 प्रतिक्रिया 2 कॉमेंट्स • 5 शेयर

+12 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 13 शेयर

*नक्की वाचा*📝 *"ससा आणि कासव यांची वेगळी कथा"* --------------------------------------- *एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ* ---------------------------------------------- *ससा आणि कासवाच्या शर्यतीत ससा झोपून राहिल्याने हरला. कासव जिंकले पण सशाला शांत बसवेना .आपल्यात वेगाने पळण्याची क्षमता अधिक असूनही निव्वळ झोपल्यामुळे आपण हरलो हे त्याच्या लक्षात आले. पराभवाचा हा सल संपविण्यासाठी त्याने कासवापुढे पुन्हा शर्यतीचा प्रस्ताव ठेवला. विजयाच्या आनंदात आपण जिंकू शकतो, यावर विश्वास बसलेल्या कासवाने होकार भरला. शर्यत पुन्हा सुरू झाली. यावेळी सशाने चूक केली नाही. तो थांबला नाही. झोपला नाही. परिणामी, वेगवान ससा शर्यत जिंकला. हळू चालणारे कासव हरले.* *पण एकदा विजयाची चव चाखलेलं कासव हार पत्करायला तयार नव्हतं. कासव पुन्हा सशाकडे गेलं. म्हणालं,'मी तुझं ऐकलं. आता तू माझे ऐक. आपण पुन्हा शर्यत लावू !'ससा हसला आणि म्हणाला, "एकदा माझ्या चुकीमुळे हरलो. पुनःपुन्हा मी ती चूक कशी करेन ? पण तुझी हरण्याचीच इच्छा असेल तर लावू पुन्हा शर्यत !' सशाचा होकार मिळाला तसं कासव म्हणालं, 'पण यावेळी शर्यतीचा मार्ग मी ठरवणार !' स्वतःच्या वेगाची आणि कासवाच्या धिम्या गतीची खात्री असलेल्या सशाने त्यालाही होकार भरला .* *शर्यतीचा मार्ग कासवाने ठरवला. शर्यत पुन्हा सुरू झाली ससा चूक करणार नव्हता. तो वेगात पळत राहिला. कासव मागे राहिलं पण पळता पळता अचानक ससा थबकला. जागेवर थांबला. पुढे आडवी नदी वाहत होती. कासवाने बरोबर मार्ग काढला होता. सशाला पोहता येत नव्हतं. ससा तिथेच थांबुन राहिला. हळूहळू येणारं कासव तिथे पोहोचलं. त्याने सशाकडे सस्मित पाहिलं आणि नदीत उडी मारून पलीकडच्या काठावर पोहत पोहोचलही.शर्यत कासवाने जिंकली. सशाच्या वेगक्षमतेवर कासवाने स्वतःच्या बुद्धिक्षमतेने मात दिली .हरलेला ससा विचार करत राहिला. आपल्याला पोहता येत नाही, म्हणून आपण हरलो, हे त्याच्या लक्षात आलं.तो विचार करून पुन्हा कासवाकडे गेला. म्हणाला,'मित्रा, आपण आजपासून शर्यत नाही लावायची.आजपासून एक करायचं. जिथे जमीन असेल तिथे मी तुला पाठीवर घेईन. जिथे नदी आडवी येईल तिथे तू मला पाठीवर घे. दोघे मिळून आपण असे पुढे जात राहिलो, तर सर्वात पुढे आपण दोघेच असू !'* *प्रत्येकात साऱ्या गोष्टी अथवा गुण कधीच नसतात. मात्र प्रत्येकात काहींना काही गुण असतोच.जे आपल्यात नाही ते इतरांकडे असू शकते. जे इतरांकडे नाही ते आपल्याकडे असू शकतं. अशा एकमेकांच्या गुणांचा वापर करीत आपल्यातला उणेपणा भरून काढता येतो.सर्वोत्तम यश गाठता येतं.* _*एकमेकांना पराभूत करण्यात शक्ती खर्ची घालण्यापेक्षा एकमेकांच्या शक्तीच्या बळावर बलाढ्य काही करता येतं. वैयक्तिक मोठेपणाच्या अभिलाषेपायी निव्वळ दुसऱ्याच्या चुका काढण्यापेक्षा, त्यांच्यातील चुकांकडे दुर्लक्ष करून त्यांच्यातील उत्तम गुण हेरून त्यांचा वापर करून घेणं, ही खरी यशस्वी क्रियाशीलता !*_ *उपयोगी पडणारी माणसं मिळवणं आणि आपण कोणाच्या उपयोगी पडू शकतो ते पाहून त्याला मदत करणं या सहकार्यभावनेच्या जोरावरच मोठमोठी कार्य सिद्धीस नेली जातात. काही लोकांकडे कल्पनाक्षमता असते;पण कल्पना सत्यात उत्तरावणारी कृतीक्षमता नसते.काहींकडे शक्ती असते; पण योग्य नियोजनक्षमता नसते. काहींकडे संघटनक्षमताअसते; पण निर्णयक्षमता नसते. निर्णयक्षमता असते; तर नेतृत्वक्षमता नसते. अशावेळी ज्याच्याकडे जे आहे त्याचा त्याच्या गुणांचा योग्य वापर करीत सांघिकपणे पुढे जाणे म्हणजेच बिकट रणांगणही जिंकणे!* _*यश मिळवायचं असेल तर असे गुण आणि गुणी माणसं वेचणं हे फार महत्त्वाचं !संकटाच्या क्षणी गोगलगायीसारखे पोटात पाय घेऊन स्वतःच्याच कोषात लपून राहणं टाळलं पाहिजे!याउलट जास्तीत जास्त माणसं जोडा. जुन्या सौहार्दाचा शोध घ्या ! नव्याने मैत्री करा. साऱ्यांच्या संपर्कात राहा. मिळूनमिसळून वागा. तुमच्यासाठी जे जे उत्तम ते ते शोषून घेण्यासाठी तत्पर असलेले टिपकागद व्हा !*_ 🐇🐢🐇🐢🐇🐢🐇🐢

+17 प्रतिक्रिया 2 कॉमेंट्स • 26 शेयर

+16 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 10 शेयर

facebook varun.Girish Atre एकदा गोंदवलेकर महाराजांकडे एक ज्योतिषी आले, त्याचा प्रचंड अभ्यास व व्यासंग होता. हे ज्योतिषी आल्याबरोबर आजूबाजूच्या लोकांचा त्यांच्या भोवती लोकांचा गराडा पडला. ४-५ दिवस असेच चालू होते. नामस्मरणावर विश्वास ठेवण्याऐवजी लोक भविष्यावरच विश्वास ठेवायला लागलेत हे महाराजांच्या लक्षात आले. त्यानंतरच्या दिवशी सकाळी हे ज्योतिषी महाराजांच्या दर्शनाला आले असता महाराज त्यांना म्हणाले. महाराज : बरे झाले तुम्ही आलात एक पत्रिका तुम्हाला दाखवावयाची होती. पण तुम्हाला मोकळा वेळच मिळत नाही म्हणून थांबलो होतो. महाराजांनी गादीखालून एक पत्रिका काढून दिली. ज्योतिषाने ती पाहायला सुरवात केली. जसजशी ती पत्रिका तो पाहात होता तसतसा त्याचा चेहरा गंभीर होऊ लागला. ज्योतिषी म्हणाला "महाराज ,फारच खराब पत्रिका आहे ही हो !. या व्यक्तीला अगदी लहानपणापासून त्रास आहे, अन्नान्न दशा याच्या अगदी पाचवीलाच पूजली आहे. कोणी वाढले तरच याला जेवायला मिळेल, आई वडिलांचे सुखही नाही. फारच खडतर आयुष्य, लग्न होईल पण संसार सुख नाही. मुले होतील पण अल्पायुषी निपजतील. अरेरे द्विभार्या योग आहे, पण दुसऱ्या बायकोकडूनही संसार सुख नाहीच. ज्योतिषी पुढे म्हणाला 'असलेली इस्टेट पण जाईल याची. चोर दरवडेखोर यापासून नक्की त्रास आहे. एखादी इस्टेट अगदी आकाशातून जरी पडली तरी त्याला ती लाभायची नाही. छे छे फारच खराब पत्रिका. शेवटपर्यंत अन्नानदशा म्हणजे फारच झाले. इतकी खराब पत्रिका मी यापूर्वी कधिच पाहिली नव्हती. कोणाची आहे हो? महाराज म्हणाले " माझी आहे ती. अगदी बरोबर भविष्य वर्तवले बघा पंत, चांगलाच अभ्यास आहे तुमचा. माझ्या काही शंका आहेत त्या फेडायला तुमच्यासारखाच ज्योतिषी पाहिजे होता " खरे म्हणजे महाराजांची पत्रिका आहे हे कळल्यावर ज्योतिषी जरा ओशाळलाच पण तरीही महाराजांच्या शंका निरसन करायची तयारी दर्शवली. त्याला वाटले महाराज यातून बाहेर पडायचा काही मार्ग आहे का ते बघायला सांगतील. ज्योतिषी म्हणाला " मी माझ्याकडून जे काय करता येईल ते नक्की करेन. महाराज म्हणाले " राजे रजवाडे लोक या माणसाकडे आले तर ते या माणसाच्या पाया पडतील असे काही पत्रिकेवरून दिसते आहे का बघा".ज्योतिषि म्हणाला " नाही महाराज तसे काही पत्रिकेवरून सागता येणार नाही". महाराज म्हणाले " बर. असू दे. मला हे सांगा की, या माणसाची अन्नान दशा असली तरी त्या माणसाच्या इच्छेवरून हजारो माणसे जेवून जातील असे काही सापडते आहे का?" ज्योतिषी म्हणाला " नाही तसेहि काही मला सांगता येत नाही". महाराज म्हणाले " हो का. बर बर. इस्टेट नाही या माणसाच्या नशिबात, पण याच्या सांगण्यावरून लाखो रुपयांची बांधकामे होतील येवढे तरी दिसतेय का बघा ना पत्रिकेत".ज्योतिषी म्हणाला " नाही हो असे सांगता येणार. महाराज म्हणाले "आता कळले का पत्रिकेवरून काय सांगता येत नाही ते. हे सर्व नामस्मरणाचे फळ आहे. तुम्ही जे सर्वकाही सांगितले. अगदी बरोबर सांगितले. काहीही चूक नाही त्यात. पण या सर्वांचा अपेक्षीत परिणाम काय होइल हे मात्र तुम्हाला सांगता आले नाही. याचे कारण माझा रामराया माझ्या बरोबर आहे हे तुम्हाला पत्रिकेवरून पाहाता आले नाही. हा सर्व नामस्मरणाचा महिमा आहे" .इतके सांगून ते पुढे म्हणाले,'ग्रहांची गति देहापर्यंत असते.ज्याची देहबुध्दि नाहीशी झाली त्याला ग्रहांची बाधा होत नाही.तसेच जो सदगुरुंचा अंकित झाला त्याचे देहभोग ग्रहांच्या गतीवर अवलंबून नसून ते त्याच्या म्हणजे सदगुरुंच्या इच्छेवर अवलंबुन असतात.....

+30 प्रतिक्रिया 4 कॉमेंट्स • 23 शेयर

श्रीराम समर्थ श्री रविंद्र पाठक यांचे गोस्वामी तुलसीदासरचित रामचरितमानस ग्रंथातील प्रथम सोपान बालकाण्ड कथाचिंतन क्रमांक *३१३* मधील सार. *(दोहा क्रमांक ३०८ श्रीसीताराम विवाह कथाप्रसंग )* *रामहि देखि बरात जुड़ानी। प्रीति कि रीति न जाति बखानी॥* *नृप समीप सोहहिं सुत चारी। जनु धन धरमादिक तनुधारी॥* *सुतन्ह समेत दसरथहि देखी। मुदित नगर नर नारि बिसेषी॥* *सुमन बरिसि सुर हनहिं निसाना। नाकनटीं नाचहिं करि गाना॥* *सतानंद अरु बिप्र सचिव गन। मागध सूत बिदुष बंदीजन॥* *सहित बरात राउ सनमाना। आयसु मागि फिरे अगवाना॥* *प्रथम बरात लगन तें आई। तातें पुर प्रमोदु अधिकाई॥* *ब्रह्मानंदु लोग सब लहहीं। बढ़हुँ दिवस निसि बिधि सन कहहीं॥* *दोहा- रामु सीय सोभा अवधि सुकृत अवधि दोउ राज।* *जहँ जहँ पुरजन कहहिं अस मिलि नर नारि समाज॥।३०९॥* प्रभू रामचंद्र समस्त अयोध्यावासीयांना भेटत आहेत त्यामध्ये प्रभू रामचंद्रांचे काही कुटुंबातील आहेत काही याचक आहेत काही मंत्री आहेत त्यांचे मित्र सखेदेखील आहेत या प्रत्येकाच्या ह्रदयाला होणाऱ्या संतोषाचे वर्णन करतांना गोस्वामीजी म्हणतात की त्यांच्या या प्रेमाचे वर्णन काही केल्या करता येवू शकत नाही.कारण रामाला पाहिल्यानंतर ही संपूर्ण वरात अत्यंत शांत,शीतल,समाधानरूप झालेली आहे.रामाच्या वियोगात सर्वांच्या मनामध्ये जो अग्नी जळत होता तो अग्नी शांत झालेला आहे. सर्व प्रकारच्या सुविधा या वरातीतील मंडळीना होत्या.सर्व प्रकारच्या संपदेत जणूकाही लोळण घेत,घेत ही वरात जनकपूरपर्यन्त आली होती.एवढया सर्व प्रकारच्या सुखसोयी असतांनाही या सर्व वरातीतील मंडळीच्या अंतःकरणामध्ये एक दुःसह अग्नी होता.राजा दशरथ देखील सर्व संपदेत असतानाही कुठंतरी अंतरंगात एका कोपऱ्यात कुढत आपले अश्रू झाकत होता याचे कारण म्हणजे प्रभू रामचंद्रांचा वियोग.ज्या संपत्तीत प्रभू रामचंद्र नाही,ज्या संपदेत प्रभू रामचंद्रांचे विस्मरण आहे,ज्या ऐश्वर्यामुळे मी या भगवंतापासून दुरावत आहे या सगळ्या ऐश्वर्यात राहूनही आज मी असमाधानी का आहे याचे खरे उत्तर गोस्वामीजी आम्हांला या चौपायांच्या आधाराने देत आहेत. श्रीमहाराज म्हणायचे की मी आयुष्यभर समाधानाचा शोध घेतला आणि ते समाधान मला भगवंताच्या नामस्मरणामध्ये सापडले. भगवंताचे स्मरण,भगवंताची प्राप्ती हाच एकमेव समाधानाला मिळालेला पूर्णविराम आहे.अन्यथा त्याच्या व्यतिरिक्त ज्या काही गोष्टी आम्ही आमच्या जिवनात करूत त्या सर्व गोष्टी आम्हांला सुख देवू शकतील परंतु आम्हांला असमाधानाने होरपळत ठेवतील आणि हेच आमच्या आजच्या जिवनातील खरे दुःख आहे. राजा दशरथाजवळ त्यांचे चारही पुत्र उभे राहिलेले आहेत.गोस्वामीजी उपमा देतात राजा दशरथाजवळ त्यांचे हे चारही पुत्र जणूकाही मनुष्याच्या जिवनाचे पुरुषार्थ रूपाने उभे आहेत.धर्म,अर्थ,काम,मोक्ष या चारही गोष्टी मिळाल्यानंतर जीवन जसे साकार व्हावे त्यापद्धतीने हे चारही पुत्र राजा दशरथासमोर हे चार शरीर धारण करून उभे आहेत.या सर्वांना पाहून सर्व अयोध्यावासी आणि त्याचबरोबर मिथिलावासी देखील अत्यंतिक प्रसन्न होत आहेत. राजा दशरथ जेव्हा आपल्या चार पुत्रांच्या समवेत या समस्त अयोध्यावासी आणि जनकवासीयांसामोर उभे होते तेव्हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होते, प्रत्येकजण परस्परांना अत्यंत प्रेमाने भेटत होता,त्या प्रेमाला पाहून स्वर्गातील अप्सरा नृत्य करू लागलेल्या आहेत,स्वर्गातील देवाधिदेव देखील त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करू लागलेले आहेत.जानुसावाड्यात वरातीच्या स्वागतासाठी आलेले शतानंद,अन्य ब्राह्मण,मंत्रीगण,मागध,सुत,विद्वान आणि सर्व भाट वरातींसह राजा दशरथांचा आदरसत्कार करून त्यांची आज्ञा घेऊन परतू लागलेले आहेत. सर्व वरात लग्नापूर्वी आलेली आहे आणि त्यामुळे जनकपूरीत सर्वत्र आनंद पसरलेला आहे,सर्व जनकपूरवासी आणि अयोध्यावासी लोकं ब्रह्मानंदात मग्न झालेले आहेत. प्रत्येकाच्या ह्रदयामध्ये एकच प्रार्थना आहे की दिवस आणि रात्र या दोघांनीही खूप मोठे व्हा केवळ चोवीस तासांपुरतेच मर्यादित राहू नका अशीच प्रत्येकाची विधात्याला प्रार्थना चाललेली आहे.अशारीतीने या जनकपूरमध्ये ही सर्व मंडळी येऊन स्थिरावलेली आहे. जानुसावाड्यात सर्वांचा आदर-सत्कार झालेला आहे सर्व अयोध्यावासी आणि जनकपूरवासी एकमेकांच्या भेटीने अत्यंतिक आनंदीत झालेले आहेत.आणि प्रत्येकजण या आनंदाचा शोध घेवू लागलेले आहेत. या आनंदाचे एकच उत्तर प्रत्येकाच्या ह्रदयामध्ये येत आहे आणि ते म्हणजे श्रीराम आणि सीता लावण्याची परिसीमा आहेत, दोन्हीही राजे पुण्याची सीमा आहेत असे सर्वत्र जिकडे-तिकडे जनकपूरमध्ये स्त्री-पुरुष समूहाने एकत्र जमून चर्चा करत होते.आणि अशा या प्रभू रामचंद्र आणि सीताजींच्या विवाहात उपस्थित असलेल्या या दोन पुण्यश्लोक राजा आणि त्यांची समस्त प्रजा यामुळे या ब्रह्मानंदाचा अविष्कार झालेला आहे हेच रहस्य प्रत्येकाच्या ह्रदयामध्ये तो अनुभवत होता. जानकी जीवन स्मरण जय जय राम लक्ष्मीकांत खडके 🙏

+7 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 0 शेयर

[12/03, 09:47] Rashinkar: सुप्रभात. शब्द अंतरीचे असतात दोष माञ जीभेला लागतो. ठेच पायाला लागते. वेदना माञ मनाला होतात. हीच ती खरी नाती असतात की जी एकमेकाच्या वेदना जाणतात. शुभ सकाळ. [12/03, 09:47] Rashinkar: सुप्रभात. @ भविष्याची जराही कल्पना नसताना आपण मोठ्या गोष्टींचे नियोजन करतो तोच खरा मनाचा आत्मविश्वास. @ विश्वास असेल तर न बोलता ही सारे काही समजून घेता येते आणि विश्वासचं नसेल तर बोललेल्या प्रत्येक शब्दाचा विपरीत अर्थ घेतला जातो. @ जो ज्ञानी असतो त्याला समजावता येते, जो अज्ञानी असतो त्यालाही समजावता येते, पण जो अभिमानी असतो त्याला कुणीही समजावू शकत नाही कारण त्याला फक्त वेळच समजावून सांगू शकते. शुभ सकाळ. [12/03, 09:47] Rashinkar: सुप्रभात. मानवी नाते हे कधीच नैसर्गिक रित्या तुटत नाही. मनुष्यच त्याला संपवतो कारण ते मरते एकतर तिरास्कराने, दुसरे दुर्लक्ष केल्यामुळे, तिसरे गैरसमजामुळे आणि चौथे लोकांनी कान भरल्यामुळे. नात्यांमधे विश्वास ठेवा व नाती प्रेमाने जपा. शुभ सकाळ. [12/03, 09:47] Rashinkar: सुप्रभात. स्वभाव म्हणजे रंगांची पेटी कधी कुठला रंग सांडेल, कधी कुठला रंग मिसळेल याचा अंदाज बांधता येत नाही, फक्त स्व:तचे रंग रंगवताना इतरांची चित्रं बिघडणार नाहीत याची जमेल तितकी काळजी घेतली की आपले रंग देखील छान खुलतात. शुभ सकाळ.

+6 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 3 शेयर