🌹🙏llश्रीराम समर्थ ll🙏🌹: मनाचा खेळ पाठशिवणीसारखा विचित्र असतो. मनात गर्दी झालेल्या विचारांची सावली मागे पडत असते, तोवर ठीक असतं. ती पुढे पडायला लागली की, एक असह्य छ्ळवाद सुरु होतो. ती छाया सतत विचाराच्या आंदोलनांची जाणीव करुन देते. कितीही टाळायचे म्हटले, तरी शक्य नाही होत... 🚩🚩🙏🏻🙏🏻🌹🌹 *शुध्दता तर विचारांमध्ये असते.* *माणूस कुठे पवित्र असतो ,* *फुलातसुध्दा किडे असतात .* *दगडातसुध्दा हिरे असतात .* *वाईट सोडून चांगले बघा . माणसातसुध्दा देव दिसतो .* *🌹🙏🏻सुप्रभात🙏🏻🌹* 🚩🚩🙏🏻🙏🏻🌹🌹 *शुध्दता तर विचारांमध्ये असते.* *माणूस कुठे पवित्र असतो ,* *फुलातसुध्दा किडे असतात .* *दगडातसुध्दा हिरे असतात .* *वाईट सोडून चांगले बघा . माणसातसुध्दा देव दिसतो .* *🌹🙏🏻सुप्रभात🙏🏻🌹*: *सुख ही एक मानसिक सवय आहे, ती लावून घेणं आपल्याच हातात आहे.* *तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल, तितकंच तुम्ही सुखी रहाल.* *तुमच्या सुखी रहाण्यावर केवळ तुमचाच अधिकार असतो. इतर लोक तुम्हाला दुःख देऊच शकत नाहीत.* *ही गोष्ट एकदा लक्षात आली की जगणं फार सोपं होऊन जाईल.* *🙏शुभ सकाळ🙏*

+1 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 8 शेयर

_*अहंकारावर विजय....*_ _अहंकारावर विजय मिळवण्यासाठी एकाने तपश्चर्या सुरू केली.तो हिमालयात एका शिखरावर जाऊन एका पायावर उभा राहिला.तीस वर्षं गेली आसपासच्या गावातले भाविक अधून मधून येत आणि काही खायला-प्यायला देत असत.महाराज महाराज म्हणत असत.खूप झाली तपश्चर्या,आता गावात या,आम्हाला मार्गदर्शन करा,असा आग्रह धरत तो मात्र ते ऐकत नसे.तीस वर्षांनी त्याला वाटू लागलं की आपण आता अहंकारमुक्त झालो.गावकरी नेहमीप्रमाणे कुंभमेळ्याला या म्हणाले.यावेळी मात्र तो खाली उतरला.कुंभमेळ्याच्या गर्दीत शिरला.त्या गर्दीत त्याच्यासारखे हजारो साधू होते,चेंगराचेंगरी होती.त्यात एका माणसाचा पाय त्याच्या पायावर पडला.प्रचंड वेदनेची सणक डोक्यात गेली.तिरीमिरीत त्याने त्या माणसाचं बखोट पकडलं आणि क्रुद्ध चेहऱ्याने विचारलं;'मी कोण आहे माहितीये का?तुझी हिंमत कशी झाली माझ्या पायावर पाय देण्याची. 'दुसऱ्याच क्षणाला त्याच्या लक्षात आलं की तीस वर्षांत काहीच घडलं नाही.फक्त पायावर पाय द्यायला आणि बखोट पकडायला कोणी आसपासच नव्हतं,म्हणून आपल्याला भ्रम झाला.तो त्या पाय देणाऱ्या माणसाच्या पायांवर कोसळला आणि म्हणाला;'महाराज, तुम्हीच माझे पहिले गुरू तीस वर्षं एका पायावर उभं राहून जे समजलं नाही,ते तुम्ही पायावर पाय देताच समजलं...._ _*मिञानो;काळजी घ्या.....*_

+1 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 2 शेयर

Generation gap & how things changed gradually... Just for fun..😊 No regrets, No complains. १. आजी, आई पहाटे चारला उठायच्या. मी आत्ता 6ला आणि सुना मुली आठ ला. 2. आजी, आई जात्यावर दळ्या च्या, मी गिरणीत जाते आणि सुना, मुली विकतच पीठ आणतात. 3. आजी कधीच हॉटेल मध्ये गेली नाही. मी जाऊ लागले आणि सुना, मुली झोमॅटो. 4. आजी, आई फक्त्त देवदेव करायच्या. मी थोडासा देवधर्म पाळते, पण अधश्रद्धा नाही. नविन पिढी काम हीच पूजा मानतात. 5. आजी, आई मॅट्रिक झाल्या. मी graduate. सुना, मुली इंजिनिर, डबल graduate, dr, mba... 6. आजी ,आई st ने प्रवास. मी गाडी आणि सुना, मुले गाडी आणि विमान. 7. आजी, आई पाळी झाली की लांब आसयच्या. मी फक्त्त देवाकडे फिरकत न्हवते. सुना, मुली पाळी natural phenomena मानतात. 7. आजी आई रांधा वाढा उष्टी काढा. मी भिशी जॉईन केली, मैत्रिणी केल्या. सुना, मुले मस्त जगतात. कधी घरी, कधी मैत्रिणीकडे कधी हॉटेल, रिसॉर्ट... दोघेच जातात मित्रांसोबत मजा करतात. 8. आजी आई वैद्यकडे जायच्या. मी mbbs dr आणि नविन पिढी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल. 9. आजी, आई सहावरी, नऊ वारी. मी कधीतरी साडी आणि सुना, मुली all types of clothes. 10. आजी,आई चे घर होते. माझे जरा सोयीचे झाले. आत्ता इंटिरियर मस्त, customized branded kitchens. 11. आजी, आई श्रुगार कुंकू. आम्ही टिकल्या : कधी असतात, कधी पडतात. 😊 सुना, मुली कधीतरी साडीवर कुंकू लावतात. 12. मंगळसूत्र त्यानी कधी काढले नाही. आपण कधीतरी काढतो. पण सध्या मुली कधीतरी घालतात.😄😄❤️❤️🙏🏻🙏🏻👍🏻

+6 प्रतिक्रिया 2 कॉमेंट्स • 7 शेयर