*जन्म* चौऱ्याऐंशी लक्ष योनीनंतर जन्म दिलास माणसाचा हाच एक जन्म जिथून मार्ग खुला मोक्षाचा दिलंस एक मन त्यात अनेक विचारांचा वावर आणि म्हणतोस आता या विचारांना आवर दिलेस दोन डोळे सौंदर्य सृष्टीचे बघायला आता म्हणतोस मिटून घे आणि बघ तुझ्यातल्या स्वतःला नानाविध चवी घेण्यास दिलीस एक रसना आणि आता म्हणतोस अन्नावर ठेवू नकोस वासना जन्मापासून नात्यांच्या बंधनात अडकवतोस बंध सगळे खोटे असतात असं आता म्हणतोस भाव आणि भावनांचा इतका वाढवतोस गुंता आणि मग सांगतोस व्यर्थ आहे ही चिंता संसाराच्या रगाड्यात पुरता अडकवून टाकतोस म्हणे शांतपणे ध्यान कर आता अशी कशी रे मजा करतोस?? मेजवानीने भरलेले ताट समोर बघून उपास करायचा हाच अर्थ का रे सांग बरं मोक्षाचा? वर बसून छान पैकी आमची बघ हो तू मजा पाप आणि पुण्याची मांड बेरीज आणि वजा माहीत नाही बाबा मला मिळेल की नाही मोक्ष तू जवळ असल्याची फक्त पटवून देत जा साक्ष ......

+8 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 44 शेयर

खूप मस्त लिहिलं आहे . *जगण्याचं सूत्र चुकतंय का?*           भाऊ काय बहीण काय           नुसता फापट पसारा,            कोण कोणाला विचारतंय           कुणालाही विचारा ... कुणी कोणाकडे जाईना कुणी कुणाकडे येईना,  जगलात काय मेलात काय  माया कुणाला येईना ...          संवेदनशीलता आता           फारशी कुठं दिसत नाही,            बैठकीत किंवा ओसरीवर           गप्पाची मैफिल बसत नाही ... पॅकेज, इनक्रिमेंट, सॅलरी  इन्व्हेस्टमेंट, विकएन्ड,   यातच हल्ली माणसाचा  होत आहे The End ...          Luxury मधे लोळतांना           फाटकं गाव नको वाटतं,            जवळचं नातं असलं तरी           सांगायलाही नको वाटतं ... उच्च शिक्षित असूनही  माणूस आज Mad वाटतं,   इंटेरियर केलेल्या घरामधे  लुगडं, धोतर Odd वाटतं..            सगळेच पाहुणे सगळेच मेव्हणे          कसे काय Posh असतील?            पार्लर मधून आणल्या सारखे           चिकणे चोपडे कसे दिसतील?  उन्हा तान्हात तळणारी  माणसं काळी पडणारच,   गरिबीनं गांजल्यावर  चेहऱ्याचा रंग उडणारच ...          कुरूप ते नाहीत           कुरूप तू झालास,            प्रेम नात्यावर करायचं सोडून          दिसण्याला भुलून गेलास ..   ..          पात्र कितीही मोठं झालं           तरी गंगेचं मूळ विसरू नये,            सुख असो का दुःख असो           आपल्या माणसाला विसरू नये.   दिसण्यावर प्रेम करू नकोस  आपलं समजून जवळ घे,   एरव्ही नाही आलास तरी  दिवाळीला तरी घरी ये..         कॉम्प्युटरच्या भाषा खूप शिकलास        माणसावर प्रेम करायचं शिक,         नाहीतर मानसिक आरोग्यासाठी        दारोदार मागत फिरशील भीक ... दुसऱ्याचा  छळ करून  तुम्ही सुखी होणार नाही,   पॅकेज कितीही मोठं असू द्या  जगण्यात मजा येणार नाही. .          जग जवळ करतांना         आपली माणसं तोडू नका,          अमृताच्या घड्याला         अविचाराने लाथाडू नका..! *मी का बोलू?* *मी का फोन करू?* *मी का कमीपणा घेऊ?* *मी का नमते घेऊ?* *मी का नेहमी समजून घ्यायचं?* *मी काय कमी आहे का?"* असे बरेच सारे *"मी"* आहेत , जे आयुष्यात विष कालवतात ... म्हणून , अरे अतिशिकलेल्या माणसा *मी पणा* सोड नि नाती जोड़ . 🙏🏻🙏🏻🙏🏻 कोण लिहिलेय माहीत नाही पण 👌🏼👍🏼🙏🏼

+4 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 44 शेयर

|| अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त || *पुजेमध्ये आरतीचे महत्व व आरती कशी करावी याचे सखोल मार्गदर्शन.* प्रत्येक पुजेच्या शेवटी देवाची आरती केली जाते. पुजेमध्ये जर काही त्रुटी राहिली असेल तर आरतीने ती भरून निघते. त्यामुळे आरतीशिवाय पूजा अपूर्णच असे म्हणावे लागेल. आरतीचा प्रथम उल्लेख स्कंद पुराणात मिळतो. आरत्या ह्या संत महात्म्यांनी लिहलेल्या असतात म्हणून त्यातील प्रत्येक शब्दात ईश्वराला प्रसन्न करण्याचे सामर्थ्य असते. आरतीमध्ये दिव्याला विशेष महत्व आहे. दिवा हा प्रकाशाचा तर प्रकाश हा ज्ञानाचा द्यौतक आहे. दिव्याची व त वरच्या दिशेला असते याचा अर्थ आपल्या ज्ञानात सतत वाढ होवो असा होतो. जिवाला शिवाशी व आत्म्याला परमात्म्याशी जोडण्याचे काम आरती करते. आरतीच्या दिव्यामध्ये ज्योतींची संख्या नेहमी विषम असावी. पण पंचारतीला विशेष महत्व असल्याने पाच ज्योती प्रज्वल्लित कराव्यात. दिव्यातील वाती नेहमी दुहेरी असाव्यात. आरतीसाठी जे ताट वापरणार आहात त्या ताटाचा उपयोग इतर कामासाठी करू नये. कोणत्याही धातुचे ताट आरती करण्यासाठी वापरले तरी चालते. ताटाच्या मध्यभागी कुकंवाने स्वस्तिक काढावे त्या स्वास्तिकावर दिवा ठेवून त्याला हळदी-कुकूं व अक्षता वहाव्यात. आणि हा मंत्र म्हणावा. शुभंकरोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा | शत्रुबुद्धी विनाशाय दिपकाय नमोस्तुते || दिपो ज्योती परं ब्रम्ह दीपो ज्योती जर्नादन | दिपो हरतु मे पापं संध्यादीप नमोस्तुते || या नंतर कापूरदाणी असेल तर नाहीतर मग एका वाटीत अक्षता घेऊन कापूर ठेवावा. आरतीमध्ये पाण्याचा छोटा चंबू (ताम्हण असेल तर उत्तम) ठेवावा. हळदी कुंकु, फुले व अक्षता ठेवाव्यात. तिनवेळा शंख वाजवून आरतीला सुरवात करावी. पाच देवांच्या पाच आरत्या करणे कधीही चांगले. पुजा कोणत्याही देवाची असो नेहमी पाच आरत्या कराव्यात परंतु एकाच देवाची आरती करायची असेल तर गणपतीची आरती करून त्या देवाची आरती करावी. गणपतीच्या आरतीशिवाय आरतीला सुरवात करू नये. गणपती, देवी, महादेव, विठ्ठल व शेवटी दत्तमहाराज असा आरतीचा क्रम असावा. आरत्या झाल्यानंतर घालीन लोटांगण ही प्रार्थना करावी. आरतीच्या शेवटी हा मंत्र म्हणावा. कर्पूरगौरम् करुणावतारम | संसारसारम् भुजगेंद्रहारम || सदावसंतम् हृदयारविंदे । भवभवानी सहितम् नमामी ।। यानंतर सर्वांना अक्षता व फुले वाटावीत व मंत्रपुष्पांजली म्हणावी. मंत्रपुष्पांजली नंतर सर्वांनी अक्षता व फुले देवासमोर वहावित. नैवेद्य दाखवून सर्वांना प्रसाद वाटावा. नैवेद्य दाखवताना खालील मंत्र म्हणावा ॐ प्राणाय स्वाहा । ॐ अपानाय स्वाहा । ॐ समानाय स्वाहा । ॐ उदानाय स्वाहा | ॐ व्यानाय स्वाहा । नैवेद्य समर्पयामि । नैवेद्य दाखवण्याची योग्य पद्धत 'दैनंदिन देवपुजेचे महत्व व नियम' हया लेखात दिली आहे.

+9 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 17 शेयर

+5 प्रतिक्रिया 2 कॉमेंट्स • 9 शेयर

*पंधरा दिवसां एक एकादशी ।* *कां रे न करिसी व्रतसार ।।१।।* *काय तुझा जीव जातो एका दिसे ।* *फराळाच्या मिसें धणी घेसी ।।२।।* *स्वहित कारण मानवेल जन ।* *हरीकथा पूजन वैष्णवांचे ।।३।।* *थोडे तुज घरीं होती उजगरे ।* *देऊळासी कां रे मरसी जाता ।।४।।* *तुका म्हणे का रे सकुमार जालासी ।* *काय जाब देसी यमदूतां ।।५।।* *अर्थ -* पंधरा दिवसांतून एकदाच एकदशी येते. मग ते व्रत तू का करत नाहीस ? ।।१।। एक दिवस उपाशी राहिल्याने तुझा जीव जातो का ? आणि जरी तू उपवास केलाच तरी त्या दिवशी फराळाचे पदार्थ खायला मिळतील, हेच तुझ्या मनात असते. ।।२।। जर तू एकादशीचे व्रत केले, हरीकथा वाचली - ऐकलीस आणि वैष्णवांचे पूजन केलेस तर तुझे हितही होईल आणि लोकही तुला मानू लागतील. ।।३।। तुझ्या घरी एखादे कार्य असले तर तू रात्र रात्र जागतोस; मग जर देवळात थोडा वेळ गेला तर मरशील का ? ।।४।। तुकोबा म्हणतात, एकादशी करण्याच्या बाबतीतच तू एवढा नाजूक का बरं झालास ? अरे मेल्यानंतर यमदूतांना काय जाब देणार, याचा तरी विचार कर. ।।५।। *।राम कृष्ण हरी।*

+10 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 31 शेयर

🙏 *वाचू,अभ्यासू रोज एक. . .* 🌹 *श्री संत नामदेव महाराजांचा अभंग* 🚩🌿🚩🌿🚩🌿🚩🌿🚩🌿🚩🌿 *संत नामदेव अभंग चिंतनिका* @ प्र. द. निकते. पंढरपूर ll ॐ श्री ll. ०७ मे. *कल्पना निमाली संतापायी* कल्पना या शब्दाचे अनेक अर्थ असले तरी इथे या अभंगा करिता अभिप्रेत असणारा अर्थ- कल्पना म्हणजे संशय, शंका, साशंक वृत्ती, भ्रांती असा आहे. मनुष्याचे मन कधी स्वस्थ बसू देत नाही. मनामाजी अनेक कल्पना अर्थात संशय, शंका निर्माण होतात. वृत्ती साशंक होते. आभास निर्माण होतो. भ्रम होतो. त्यामुळे मन गोंधळून जाते. अकारण गैरसमज निर्माण होतात. खोटी कल्पना, खोटे ज्ञान मनात घर करते. अज्ञानाने काय करावे कळत नाही. अशा भ्रांत, गोंधळलेल्या मनाला शांत करू शकतात ते संत. संतांच्या सहवासात अज्ञान नाहीसे होते. गैरसमज दूर होतात. संशय फिटतो म्हणून संतांची संगत धरावी. सत्संग करावा. संतांचे वैशिष्ट्य असे ; भाग्याशिवाय संत-साधू भेटत नाहीत. तप, व्रत, दानाने एक वेळ देव भेटेल पण साधूसंत भेटत नाहीत. *“तपें व्रतें दाने गोविंद पैं भेटे । परि साधु तव न भेटे भाग्येविण ॥”* असे नामदेवराय म्हणतात. असा हा संतांचा महिमा आहे. याचे सुंदर दर्शन नामदेवराय या अभंगात घडवितात. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 *"संतांचा महिमा कोण जाणे सीमा l सीणला हा ब्रह्मा बोलवेना ॥१।l संतांची हे कळा पाहतां न कळे l खेळोनियां खेळ वेगळाची ॥२ll संतांचिया पारा नेणे अवतारा । म्हणती याच्या पारा कोण जाणे ।। ३॥ नामा म्हणे धन्य धन्य भेट जाली । कल्पना निमाली संतापायीं ॥ ४ ॥”* (ना. गा. - ८३६)* 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 संत तथा भक्तशिरोमणी नामदेव महाराज म्हणतात; संतांच्या महिम्याची मर्यादा कोण बरे जाणू शकेल? संतांचा महिमा वर्णन करता करता ब्रह्मदेव थकला. तरी त्याला वर्णन करता आले नाही. त्याला बोलवेना. संतांची कला, क्रीडा अर्थात त्यांचे अंतरंग पाहण्याचा प्रयत्न केला पण ते कळू शकत नाही. संत संसार करतात. संसाराचा खेळ खेळतात पण त्यापासून वेगळे असतात. संतांच्या अवताराचा अंत कळत नाही. संतांच्या कार्याचा, त्यांच्या ठायी असणाऱ्या शक्तीचा अंत कोणाला बरे कळणार? संत नामदेवराय म्हणतात; मी धन्य धन्य आहे कारण संतांची भेट झाली. माझ्या सर्व कल्पना, शंका संतचरणी दूर झाल्या, अज्ञान नाहीसे झाले. संत चरणाचा संत भेटीचा काय प्रभाव असतो याचे हे सुंदर दर्शन आहे. समर्थ म्हणतात, जन्म-मरणाची यातायात चुकविण्यासाठी सद्गुरुंच्या चरणी अनन्यभाव ठेवावा. यालाच पादसेवन म्हणतात ; *“या नाव पादसेवन । सद्गुरु पदी अनन्यपण । निरसावया जन्ममरणे । यातायाती। काया वाचा मनाने मोक्ष प्राप्तीसाठी सद्गुरुंची चरण सेवा करावी ।" "पादसेवन तेंचि जाणावें । काया वाचा मने भावें । सद्गुरुचे पाय सेवावे । सद्गतीकारणें ।"* नाथ महाराज म्हणतात, जो सद्गुरुला शरण जातो त्याला ब्रह्मप्राप्ती होते. याकरिता अन्य उपायांची गरज नसते. आपण फक्त सद्गुरुंचे पाय धरावे. *“सद्गुरुसी शरण जाय । त्यासी ब्रह्मप्राप्ती होय ।। न लगे आणिक उपाव । धरी सद्गुरुचे पाय ।।"* भावे धरिता संत चरण । तेणे भ्रांत मन शांत होय ॥ 🙏 *पुरूषोत्तम गं.निकते.* 🚩🌿🚩🌿🚩🌿🚩🌿🚩🌿🚩🌿 आपल्या आवडत्या . . . समुहावर पाठवा ही पोस्ट ईशसेवा घडेल सुपरफास्ट

1 कॉमेंट्स • 2 शेयर