श्री राम नवमी पौराणिक पुजाविधी शुभ मुहूर्त यंदा श्रीराम नवमी 21 एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे. चैत्र नवरात्री नवमी रामनवमी रुपात साजरी केली जाते. श्रीरामाच्या पूजा-अर्चना साठी जाणून घ्या या दिवशी काय करावे- * सर्वात आधी अंघोळ केल्यानंतर पवित्र होऊन पूजास्थळी पूजन सामुग्रीसह बसावे. * पूजेत तुळशीचे पान आणि कमळाचं फुलं असावं. * सर्व सामुग्रीसह श्रीराम नवमीची षोडशोपचार पूजा करावी. * श्रीरामाल प्रिय खीर आणि फळं-मूळ प्रसाद म्हणून तयार ठेवावे. * पूजा झाल्यावर घरातील सर्वात लहान मुलीच्या किंवा स्त्रीच्या कपाळावर तिलक करावं. पूजा विधी सकाळी लवकर उठून नित्य कर्म झाल्यावर अंघोळ करावी. स्वच्छ वस्त्र धारण करुन पूजा गृह शुद्ध करावं. सर्व सामुग्री एकत्र करुन आसानावर बसून जावं. चौरंगावर लाल कपडा घालावा. त्यावर श्रीरामची मूर्ती स्थापित करावी. सोबतच दरबार सजवावा. श्रीरामाचा पूर्ण दरबार ज्यात चारी भावंड आणि हनुमान यांचे देखील दर्शन होत असतील. पवित्रीकरण:- हातात पाणी घेऊन निम्न मंत्र जप करत पाणी स्वत:वर शिंपडावं आणि स्वत:ला पवित्र करावं. ॐ पवित्रः अपवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपिवा। यः स्मरेत्‌ पुण्डरीकाक्षं स वाह्यभ्यन्तर शुचिः॥ पृथ्वी पूजा:- पृथ्वी देवीला नमस्कार करत हा मंत्र उच्चार करावा:- ॐ पृथ्वी त्वया धृता लोका देवि त्वं विष्णुना धृता। त्वं च धारय मां देवि पवित्रं कुरु चासनम्‌॥ पृथिव्यै नमः आधारशक्तये नमः आचमन :- चमच्याने तीन वेळा पाण्याचे थेंब स्वत:वर शिंपडत मंत्र उच्चारण करावं- ॐ केशवाय नमः ॐ नारायणाय नमः ॐ वासुदेवाय नमः नंतर ॐ हृषिकेशाय नमः म्हणत आपला हात उघडून अंगठ्याने ओठ पुसावे. नंतर शुद्ध पाण्याने हात धुवावे. संकल्प :- आता संकल्प करावा. संकल्प करण्यासाठी उजव्या हातात गंगाजल (गंगाजल नसल्यास शुद्ध पाण्यात तुळशीचं पान टाकावं), फुलं, अक्षता, विडा, सुपारी, शिक्के हातात घेऊन मंत्राद्वारे रामनवमी पूजेचं संकल्प करावं :- ॐ विष्णुर्विष्णुर्विष्णुः। श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्याद्य श्रीब्रह्मणो द्वितीयपरार्द्धे श्रीश्वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरेऽष्टाविंशतितमे कलियुगे प्रथमचरणे जम्बूद्वीपे भारतवर्षे भरतखण्डे आर्यावर्तान्तर्गतब्रह्मावर्तैकदेशे पुण्यप्रदेशे बौद्धावतारे वर्तमाने यथानामसंवत्सरे अमुकामने महामांगल्यप्रदे मासानाम्‌ उत्तमे चैत्रमासे शुक्लपक्षे नवमीतिथौ अमुकवासरान्वितायाम्‌ अमुकनक्षत्रे अमुकराशिस्थिते सूर्ये अमुकामुकराशिस्थितेषु चन्द्रभौमबुधगुरुशुक्रशनिषु सत्सु शुभे योगे शुभकरणे एवं गुणविशेषणविशिष्टायां शुभ पुण्यतिथौ सकलशास्त्र श्रुति स्मृति पुराणोक्त फलप्राप्तिकामः अमुकगोत्रोत्पन्नः अमुक नाम अहं रामनवमी पूजा करिष्ये। या संंकल्पानंंतर पाणी जमिनीवर सोडून द्या. गणपती पूजा:- यानंतर चौरंगावर तांदळाची रास करुन त्यावर गणपतीची मूरती ठेवून (मूर्ती नसेल तर सुपारीवर मौली गुंडाळून गणेशच्या रुपात ठेवावी) स्थापित करावी. आता पंचोपचार विधीने गणपतीची पूजा करावी. धूप, दीप, अक्षत, चंदन/शेंदूर आणि नैवेद्य समर्पित करत गणपतीची पूजा करावी. गुरु वंदना:- दोन्ही हात जोडून आपल्या गुरुला नमन करावं. कलश पूजन:- मातीच्या कलशमध्ये पाणी भरुन ठेवावं. त्यात दूर्वा, शिक्के, अक्षता टाकून गंगाजल मिसळावं. आंब्याची पाने लावून त्यावर लाल कपड्यात गुंडाळलेलं नारळ ठेवावं. तांदळाने चौरंगाजवळ अष्टदल कमळ काढावे. त्यावर कलश स्थापित करावे. कलशावर कुंकाने स्वास्तिक काढावे. धूप, दीप, अक्षत, चंदन, नैवेद्य समर्पित करत कलशाची पूजा करावी. दोन्ही हात जोडून कलशाला नमस्कार करावा. ध्यान:- दोन्ही हात जोडून श्री रामचंद्राचे ध्यान करत श्रीराम श्लोक वाचावे:- राम रामेति रमेति रमे रामे मनोरमे सहस्त्र नाम ततुल्यं राम नामं वारानने आवाहन:- प्रभू श्रीरामचंद्राचे आवाहन करावे:- हातात पुष्प आणि अक्षता घेऊन प्रभू रामाला आसान समर्पित करावे. फुलाने पाणी घेऊन श्रीरामाचे पाय धुण्यासाठी पाणी अपिर्त करावे. फुलाने पाणी घेऊन आचमनासाठी रामाला जल अपिर्त करावे. चमच्याने दुध आणि मध श्रीरामाला अर्पित करावे. फुलांनी स्नान हेतू श्रीरामाला जल अर्पित करावे. पंचामृत स्नान:- दुग्ध स्नान- पुष्पाने दुग्ध स्नानासाठी श्रीरामाला दुध समर्पित करावे, नंतर शुद्ध जल समर्पित करावे. दधि स्नान- फुलाने दही स्नान हेतू श्रीरामाला दही समर्पित करावे नंतर शुद्ध जल समर्पित करावे. घृतं स्नान- पुष्पाने घृत स्नान हेतू निम्न मंत्र उच्चारण करत श्रीरामाला तूप समर्पित करावे नंतर शुद्ध जल समर्पित करावे. मधु स्नान- पुष्पाने मधु स्नान हेतू श्रीरामाला मध समर्पित करुन नंतर शुद्ध जल समर्पित करावे. शर्करा स्नान- पुष्पाने शर्करा स्नान हेतू श्रीरामाला साखर ‍समर्पित करावी. शुद्धोदक स्नान- पुष्पाने शुद्ध जल घेऊन शुद्धोदक स्नान हेतू श्रीरामाल जल समर्पित करावे. वस्त्र:- हातात पिवळ वस्त्र घेऊन श्रीरामाला वस्त्र समर्पित करावे. यज्ञोपवित:- हातात यज्ञोपवित घेऊन श्रीरामाला यज्ञोपवित समर्पित करावे. गंध:- हातात अत्तर (गंध) घेऊन मंत्र उच्चारणासह श्रीरामाला गंध समर्पित करावे. गंधं समर्पयामि अक्षत:- हातात अक्षता घेऊन मंत्र उच्चारणासह श्रीरामाला अक्षता समर्पित कराव्या. अक्षतं समर्पयामि पुष्प:- हातात फुल आणि तुळस घेऊन श्रीरामला समर्पित करावं. अंग पूजा:- डाव्या हातात फुल आणि अक्षता घेऊन मंत्र उच्चारणासह श्रीरामाच्या विविध अंगावर निमित्त जरा-जरा अक्षता, फुलं अर्पित करत राहा:- ॐश्री रामचन्द्राय नम: ।पादौ पूजयामि॥ ॐ श्री राजीवलोचनाय नम: ।गुल्फौ पूजयामि॥ ॐ श्री रावणान्तकाय नम: ।जानुनी पूजयामि॥ ॐ श्री वाचस्पतये नम: ।ऊरु पूजयामि॥ ॐ श्री विश्वरूपाय नम: ।जंघे पूजयामि॥ ॐ श्री लक्ष्मणाग्रजाय नम: ।कटि पूजयामि॥ ॐ विश्वमूर्तये नम: ।मेढ़्र पूजयामि॥ ॐ विश्वामित्र प्रियाय नम: ।नाभिं पूजयामि॥ ॐ परमात्मने नम: ।हृदयं पूजयामि॥ ॐ श्री कण्ठाय नम: ।कंठ पूजयामि॥ ॐ सर्वास्त्रधारिणे नम: ।बाहू पूजयामि॥ ॐ रघुद्वहाय नम: ।मुखं पूजयामि॥ ॐ पद्मनाभाय नम: ।जिह्वां पूजयामि॥ ॐ दामोदराय नम: ।दन्तान् पूजयामि॥ ॐ सीतापतये नम: ।ललाटं पूजयामि॥ ॐ ज्ञानगम्याय नम: ।शिर पूजयामि॥ ॐ सर्वात्मने नम: ।सर्वांग पूजयामि॥ ॐ श्री जानकीवल्लभं। ॐ श्री रामचन्द्राय नमः । सर्वाङ्गाणि पूजयामि।। श्रीरामाला धूप अर्पित करावं. श्रीरामाला दीप अर्पित करावं. श्रीरामाला नैवेद्य अर्पित करावं आणि नंतर आचमनासाठी जल अर्पित करावं. श्रीरामाला फळं अर्पित करावे. ताम्बूल:- विड्याचं पान उलटून त्यावर लवंग, वेलची, सुपारी, काही गोड ठेवून तांबूल तयार करुन अर्पित करावं. श्रीरामाल दक्षिणा अर्पित करावी. आरती:- ताटात तुपाचा दिवा आणि कापुराने रामाची आरती करावी. आरतीच्या पाण्याला तीनदा पवित्र करावं. नंतर देवी-देवतांना आरती द्यावी. उपस्थित जणांना आरती देऊन स्वत: घ्यावी. मंत्र पुष्पांजली:- हातात फुल घेऊन उभे राहावे आणि या मंत्राने पुष्पांजली अर्पित करावी. ॐ श्री जानकीवल्लभं। ॐ श्री रामचन्द्राय नमः । मंत्र पुष्पांजलि समर्पयामि। प्रदक्षिणा:- आपल्या जागेवर डावीकडून उजवीकडे फिरत या मंत्रासह प्रदक्षिणा घालावी- ॐ श्री जानकीवल्लभं। ॐ श्री रामचन्द्राय नमः । प्रदक्षिणां समर्पयामि। क्षमा प्रार्थना:- दोन्ही हात जोडून श्रीरामाच्या पूजेत झालेल्या त्रुटीबद्दल क्षमा प्रार्थना करावी. राम नवमी बुधवार, 21 एप्रिल 2021 राम नवमी मध्याह्न मुहूर्त: 11 वाजून 02 मिनिटापासून ते 13 वाजून 38 मिनिटापर्यंत अवधी 02 तास 36 मिनिट राम नवमी मध्याह्न क्षण: 12 वाजून 20 मिनिट नवमी तिथी प्रारम्भ: 21 एप्रिल 2021 रोजी 00 वाजून 43 मिनिटापासून नवमी तिथी समाप्त: 22 एप्रिल 2021 रोजी 00 वाजून 35 मिनिटापर्यंत

+2 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 0 शेयर

रामनवमी या दिवशी नक्की वाचावी श्री रामाची पवित्र जन्म कथा रामायण आणि रामचरित मानस पवित्र ग्रंथ आहेत. तुलसीदास यांनी श्री रामाला ईश्वर मानत रामचरितमानसची रचना केली आहे परंतू आदिकवि वाल्मीकि यांनी आपल्या रामायणात श्री राम यांना मनुष्य मानले आहे. तुलसीदास यांची रामचरितमानस रामाच्या राज्यभिषेकानंतर समाप्त होते तर श्री वाल्मीकि यांनी आपल्या रामायणात श्री राम यांचे महाप्रयाण पर्यंत वर्णन केले आहे. महाराज दशरथांनी पुत्र प्राप्तीसाठी यज्ञ सुरू करण्याचा निर्णय घेतला. महाराजांच्या आज्ञानुसार श्यामकर्ण अश्व चतुरंगिनी सेनेसह सोडवण्यात आला. महाराज दशरथ यांनी सर्व मनस्वी, तपस्वी, विद्वान ऋषी-मुनींना व वेदविज्ञ प्रकाण्ड पण्डितांना यज्ञ सम्पन्न करण्यासाठी आमंत्रित केले. योग्य वेळ आल्यावर अभ्यागतांसह महाराज दशरथ आपले गुरु वशिष्ठ आणि आपले परम मित्र अंग देशाचे अधिपती लोभपाद यांचे जामाता ऋंग ऋषींसह यज्ञ मण्डप आले. या प्रकारे महान यज्ञाचे विधीपूर्वक शुभारंभ केले गेले. संपूर्ण वातावरण वेदांच्या ऋचांच्या उच्च स्वरात पाठ उत्स्फूर्त होत असल्याने आणि समिधाच्या सुगंधाने दरवळू लागला. सर्व पंडित, ब्राह्मण, ऋषींना योग्यतेनुसार धन-धान्य, गौ इतर भेट देऊन विदा करत यज्ञ समाप्ति झाली. राजा दशरथ यांनी यज्ञाचा प्रसाद आपल्या महालात जाऊन आपल्या तिन्ही पत्नींना वितरित केला. प्रसाद ग्रहण केल्यानंतर परिणामस्वरुप तिन्ही राण्या गर्भवती झाल्या. जेव्हा चैत्र मासाच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला पुनर्वसु नक्षत्रात सूर्य, मंगळ, शनी, बृहस्पति आणि शुक्र आपआपल्या उच्च स्थानात विराजित होते, तेव्हा कर्क लग्न उदय होताच महाराज दशरथ यांच्या मोठ्या राणी कौशल्या यांच्या गर्भातून एक शिशु जन्माला आला. शिशु नील वर्ण, चुंबकीय आकर्षण, खूप तेजस्वी, परम कान्तिवान आणि अत्यंत सुंदर होता. त्या शिशुकडे बघणारे एकटक लावून त्याकडे बघतच राहयचे. यानंतर शुभ नक्षत्र आणि शुभ घडीत महाराणी कैकेयी यांच्यासह तिसरी राणी रानी सुमित्रा यांनी दोन तेजस्वी पुत्रांना जन्म दिला. संपूर्ण राज्यात आनंद पसरला. महाराज यांच्या घरी चार पुत्रांच्या जन्माच्या उत्साहात गन्धर्व गान करु लागले. अप्सरा नृत्य करु लागल्या. देवता आपल्या विमानातून फुलांचा वर्षाव करु लागले. महाराजांनी उन्मुक्त हस्ताने राजद्वारावर आलेल्या भाट, चारण आणि आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या ब्राह्मण आणि याचकांना दान-दक्षिणा दिली. पुरस्कार स्वरुप प्रजेला धन-धान्य आणि दरबारात असणार्‍यांना दागिने, रत्न प्रदान केले गेले. चारी पुत्रांचं नामकरण महर्षी वशिष्ठ यांच्याद्वारे केले गेले. त्यांचे नाव रामचन्द्र, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न असे ठेवले गेले. जसं जसं वय वाढत गेलं रामचन्द्र गुणांमध्ये आपल्या भावांपेक्षा प्रगती करत राहिले आणि प्रजेत लोकप्रिय होऊ लागले. ते अत्यंत विलक्षण प्रतिभेचे धनी होते परिणामस्वरूप अल्प काळातच सर्व विषयांत पारंगत झाले. ते सर्व प्रकाराच्या अस्त्र-शस्त्र हाताळणे आणि हत्ती-अश्व यांसह सर्व प्रकाराच्या वाहनांवर स्वारी करण्यात निपुण झाले. ते सततमाता-पिता आणि गुरुजनांच्या सेवेत असायचे. त्यांचे तिघं भाऊ देखील त्यांच अनुसरण करायचे. चारी भावांमध्ये गुरुंबद्दल आदर व श्रद्धा होती. चारी भावडांमध्ये प्रेम आणि सन्मानाची भावान देखील होती. चारही मुलांना पाहून महाराज दशरथ मनापासून अभिमानाने व आनंदाने भरुन जात असे.

+1 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 0 शेयर

म्हणून आज हि कथा किर्तनात हनुमंतरायासाठी पाठ ठेवला जातो आजही गावाकडे किंवा शहरातही कथाकीर्तन, भजन सोहळा सुरू असेल, तर तिथे एक रिकामा पाट ठेवलेला असतो. तो पाट कोणासाठी असतो माहित आहे का मित्रांनो? तो पाट असतो, चिरंजीवी हनुमंतासाठी! तसे का? तर यामागे एक पौराणिक कथा सांगितली जाते... चौदा वर्षांचा खडतर वनवास संपवून, रावणाशी युद्ध करून, सर्व वानरसेनेला घेऊन प्रभू श्रीरामचंद्र सीतामाईसह अयोध्येला परतले, तेव्हा अयोध्यावासियांनी त्यांचे वाजत गाजत उस्फूर्त स्वागत केले. आपल्यासाठी रावणासारख्या बलाढ्य शत्रूशी लढा दिला, म्हणून सीतामाईला समस्त वानरसेनेला भेटवस्तू द्यावीशी वाटली. रामचंद्रांनीही सहमती दिली. सीतामाईने यथाशक्ती प्रत्येकाला आवडेल अशी भेटवस्तू देण्यास सुरुवात केली. सीतामाईचा आशीर्वाद समजून सगळी वानरसेना श्रद्धेने रांगेत उभी होती. परंतु त्यात हनुमंत दिसले नाहीत. सीता माईने त्याची चौकशी केली असता, तो कुठल्याशा बागेत फळे खात बसल्याचे कळले. सीता माईला वाटले, त्याचा मान पहिला असताना आपण त्याला भेटवस्तू आधी दिली नाही, याचा राग आला असेल. म्हणून सीतामाई स्वत: हनुमंताचा शोध घेत बागेत पोहोचल्या. सोबत प्रभु श्रीरामचंद्र होतेच. हनुमंताचा अधिकार मोठा, म्हणून भेटवस्तूही मोठी द्यावी, अशा विचाराने सीतामाईने आपल्या माहेरहून मिळालेला नवरत्नांचा हार हनुमंताला भेट दिला. हनुमंताने त्याचा स्वीकारही केला. हाराकडे कुतुहलाने पाहिले. सीतामाईला वाटले हनुमंताला हार आवडला. पण काही क्षणांतच हनुमंताने हारातली रत्न दाताखाली तोडून पहायला सुरुवात केली. आपल्या डोळ्यादेखत आपल्या भेटवस्तूचा केलेला अपमान सीतामाईला सहन झाला नाही. तिने हनुमंताला जाब विचारला. हनुमंत म्हणाला, 'माई, ज्या वस्तूत राम नाही, त्याचा मला उपयोग नाही.' एवढेच नाही, तर हनुमंताने आपली छाती फाडून आपल्या हृदयातही राम आहे, हे सीतामाईला दाखवून दिले. हनुमंताची भक्ती पाहून प्रभु श्रीरामचंद्रही सद्गदित झाले. हनुमंताला म्हणाले, 'तुझ्या ऋणातून उतराई होणे मला शक्य नाही, मी तुला काय भेट देणार?' यावर हनुमंत म्हणाला, 'रामराया, द्यायचाच असेल तर एकच आशीर्वाद द्या, जिथे जिथे तुमचे भजन कीर्तन सुरू असेल, त्याचे श्रवण करण्याची मला संधी द्या.' चिरंजीवी हनुमंताला श्रीरामचंद्र तथास्तु म्हणाले! तेव्हापासून अशी श्रद्धा आहे, की जिथे जिथे रामनाम सुरू असते,रामनामाचा गजर होतो तिथे हनुमंतराय आपोआप येतात. त्यांना बसण्यासाठी आसन म्हणून एक पाट मांडून ठेवला जातो. केवढी ही स्वामी निष्ठा. केवढी ही थोर भक्ती..!! -सोशल मीडिया

+17 प्रतिक्रिया 5 कॉमेंट्स • 30 शेयर

२०२१हनुमान जयंती कधी आहे ? शुभ वेळ आणि पौराणिक कथा Hanuman Jayanti 2021: हनुमान जयंती हा हिंदू धर्माच्या प्रमुख सणांपैकी एक आहे. हनुमान जयंती हा भगवान हनुमानाचा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो. हिंदू कॅलेंडरनुसार, हनुमान जयंती प्रत्येक वर्षी चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. या दिवशी हनुमान भक्त आपल्या प्रभूच्या नियम आणि उपासनेसह उपवास ठेवतात. असे मानले जाते की भगवान हनुमान आपल्या भक्तांच्या आयुष्यात येणार्‍या सर्व समस्या दूर करतात. म्हणूनच भगवान हनुमानास संकटमोचन असेही म्हणतात. असे म्हणतात की या दिवशी रामायण, रामचरित मानस, सुंदरकांड, हनुमान चालीसा, हनुमान बाहुक इत्यादींचे पठण केल्यास हनुमान जी प्रसन्न होतात. 2021 मध्ये हनुमान जयंती कधी साजरी केली जाईल? यंदा 27 एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी केली जाईल. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमा व्यतिरिक्त कार्तिक महिन्यात कृष्णपक्ष चतुर्दशीला हनुमान जयंती अनेक ठिकाणी साजरी केली जाते. हनुमान जयंती 2021 पूजा मुहूर्त- पौर्णिमेची तारीख प्रारंभ - 26 एप्रिल 2021 दुपारी 12:44 वाजता पौर्णिमेच्या तारखेचा शेवट - 27 एप्रिल 2021 सकाळी 9:00 वाजता हनुमान जयंतीचे महत्त्व हनुमान जयंतीच्या दिवशी ठिकठिकाणी भव्य मिरवणुका काढल्या जातात. भक्त हनुमानाच्या मंदिरात जाऊन प्रार्थना करतात. असे मानले जाते की जो भक्त हनुमान जीचे दर्शन घेतो आहे, त्याचे सर्व कष्ट दूर होतात. म्हणून हनुमान हे नाव पडले - वायुपुराणात वर्णन केलेले एक श्लोक आहे - अश्विनास्या सीतेपक्षे स्वाती भूमि चा मारुतिहा. मेष लग्न जनार्भाता जतो हरः शिव। म्हणजेच भगवान हनुमानांचा जन्म कृष्ण पक्ष चतुर्दशीला मंगळवारी स्वाती नक्षत्रातील मेष लग्न आणि तुला राशीत झाला होता. हनुमान जी लहानपणापासूनच वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळत असत. एक दिवस, जेव्हा त्यांना भूक लागली, तेव्हा त्यांनी सूर्याला गोड मानले आणि तोंडात भरले. ज्यामुळे संपूर्ण जगात अंधार झाला होता. हे आपत्ती म्हणून बघून इंद्र भगवानांनी व्रजने हनुमान जीवर हल्ला केला. यामुळे त्याची हनुवटी वाकलेली झाली. यामुळेच त्याचे नाव हनुमान ठेवले गेले.

+26 प्रतिक्रिया 12 कॉमेंट्स • 15 शेयर

*🙏हरीओम नमःशिवाय शिव सुप्रभात *ॐ नमःशिवाय *-> (अ,ऊ,म) या तिन अक्षरापासून निर्माण झालेला शब्द = "ओम" हा साधारण शब्द नसुन ब्रम्हांडातील प्रथम ध्वनी स्वर होय.जो सदैव निरंतर गुजंन करीत आहे. ज्याप्रमाणे ब्रम्हांडात ॐ ध्वनी गुजंन होत आहे, त्याचप्रमाणे आपल्या हृदयात म्हणजे अनाहद चक्रामध्ये सुद्धा श्वासोश्वास घेतांना ॐ हा ध्वनी गुजंन करीत असतो. तेव्हा ॐ या स्वराला ऐकण्याकरीता आपले कान आपल्याच हाताच्या बोटांनी बंद करून ॐ निरंतर गुजंन करीत असतो असे लक्षात येतात. विशेष म्हणजे ॐ ध्वनी म्हणतांना जिभेची हालचाल न होता ॐ ध्वनी कुणीही म्हणु शकतो. म्हणूनच प्रत्येक मंत्रांचा आरंभ ॐ स्वरांनी होत असतो. म्हणूनच प्रत्येक मंत्रापूर्वी ॐ उच्चारला जातो. तसेच प्रत्येक मंत्रांमध्ये ॐ आस्था, ॐ शक्ती, ओम या ध्वनीनेच निर्माण होत असतात. जन्माच्या वेळी "अ" या अक्षराने आरंभ होतो अंतिम क्षणाला "म" या अक्षराने सर्वांचे मुख बंद होवुन जातात. "ऊ" म्हणजे "ऊर्जा" जोपर्यंत देह ऊर्जा असेपर्यंत कार्य करीतो, तोपर्यंत "ऊर्वरित " जिवन ॐ मंत्राने व नमःशिवाय या पंचाक्षर मंत्राने, पंचतत्वाचे पंचामृत म्हणजे " ॐनमःशिवाय " जिवन मंगल मांगल्य झाल्याशिवाय राहणार नाही. कारण "जेथे जिव तेथे शिव", जेथे विश्वास तेथे आस्था तेथेच आत्मविश्वास आत्मशक्ती सोबत अधिक कार्य करीत असतात. तेव्हा आपन आत्मनिर्भय होत असतो. जेथे विश्वास नसतो,तेथे शंका, कूशंका निर्माण होत असतात. तेव्हा भिती,चिंता, भ्रम,संभ्रम निर्माण होत असतो. या सर्व मानसिक रोगावर मात करण्याची क्षमता " ॐ नमःशिवाय " मंत्रांत आहे. कारण हे संपूर्ण प्रपंच्याचे तसेच पंचतत्वाचे पंचाक्षर नसुन पंचामृत होय. 🙏 सर्वे भवन्तु सुखीनम् 🙏श्रीगुरू मारोतीदेवार्पण शिवार्पण 🙏*

+23 प्रतिक्रिया 14 कॉमेंट्स • 35 शेयर

ओळखा बघु काय? १. काळा खडक, पिवळं पाणी, आत पोहते चंदाराणी = कढई, तेल, पुरी २. काळी काठी, तेल लाटी, वाकते पण मोडत नाही = डोक्यावरचे केस ३. तळ्यात तळं, तळ्यात खांब, शेपटीने पाणी पितो गंगाराम = समई, तेल, वात ४. दोन भाऊ शेजारी, भेट नाही संसारी = डोळे ५. काळ्या कोठारात म्हातारी मेली, पाचजण असून दोघांनी नेली = शेंबुड ६. बत्तीस चिरे, त्यात नागीण फिरे = दात आणि जीभ ७. सुपभर लाह्या, मधे रुपय्या = चांदण्या व चंद्र ८. घाटावरून आला भट, त्याचा काष्टा घट = कांदा ९. आकाशातून पडली घार, रक्त प्याले घटाघटा, मांस खाल्ले पटापटा = शहाळे/नारळ १०. एवढसं पोर, घर राखण्यात थोर = कुलूप ११. एवढीशी बेबी, चुलीपुढे उभी = फुंकणी १२. तार तार तारले, विजापूर मारले, बारा वर्षे तप केले, हाती नाही लागले = उंबराचे फुल १३. पाऊस नाही, पाणी नाही, रान कसं हिरवं, कात नाही, चुना नाही, तोंड कसं रंगलं = पोपट १४. लहानसे झाड, त्याला इवलासा दाणा, गरज पडली की धावत जाऊन आणा = ओवा १५. जांभळा झगा अंगावर, मुकुट घालते डोक्यावर = वांगे १६. अटांगण पटांगण, लाल रान, बत्तीस पिंपळांना एकच पान = जीभ १७. हरण पळतं, दूध गळतं = दळणाचे जाते १८. आठ तोंडे, जीभ नाही, गाणे मात्र सुरेल गाई = बासरी १९. काळी गाय, काटे खाय, पाण्याला बघून उभी ऱ्हाय = चामड्याची वहाण/चप्पल २०. वीस लुगडी, आतून उघडी = मक्याचे कणीस २१. सरसर गेला साप नव्हे, गडगड गेला गाडा नव्हे, गळ्यात जानवे ब्राह्मण नव्हे = पाण्याचा रहाट

+11 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 46 शेयर

🙏आई आणि मम्मी🙏 आईची मम्मी झाली, आम्ही स्वीकारलं मम्मीला त्यांनी मम्मा केलं, थोडंसं अवघडल्यावाणी झाल. मम्माच ही बारस आता मॉम मध्ये झाल, संस्कृतीच आता कोणालाच भान नाही राहिले. कारण आई आता बोलण्यात नाहीच राहिली फक्त दुर्दैवाने आता आई काहींच्या शिवितच उरली. मायेचा पदर तरी आता राहिलाय कुठ, कधीचाच तो गळून गेलाय. आईच्या हातची चव आता सापडतेय कुठ, मॅगी पुढं मऊ मऊ भात मात्र हरून गेलाय. पदराच मोल जरा समजून घे ठाई, संस्काराच बाळकडू त्यातूनच तर मिळते ना आई. आईच्या हातचा उन उन मऊ भात , मायेने भरव ना ग आई. अंगाई गीते, बडबड गीते आणि गोष्टीसाठी, आईला आता फुरसतच नाही, ज्याच्यासाठी करता धावाधाव, त्यासाठी मात्र तुम्हाला वेळच नाही. ढीगभर कपडे आणि घरभर खेळणी, एवढच त्याच आहे का जग. शांत बसून कधीतरी, तुझ लहानपण आठवून तर बघ. मूल पुढं बिघडलं की जगावर खापर फोडता, आपली जबाबदारी मात्र हळूच झटकून टाकता. मूल होईल मोठे, पण संस्काराच कसं होईल, पदराच मोल तुला, तेंव्हाच समजून येईल. कळली जर का वेळीच किंमत तुला आईपणाची, नाहीच येणार वेळ मग दुसऱ्याआड लपण्याची. आईच्या मम्मा ला ती किंमत कळणारच नाही, किती झाल तरी आईची सर त्या शब्दाला येणार नाही. 🙏😊

+14 प्रतिक्रिया 5 कॉमेंट्स • 53 शेयर

जेवणावर कधी राग काढू नये. ताटावरून उठविणे, उठणे, ताट फेकून देणे हे अत्यंत वाईट. माणसाच्या हातून कळत नकळत काही चुका होत असतात, पण त्यांचे परिणाम मात्र त्रासदायक असतात. घरोघरी आढळणारी एक मोठी चूक म्हणजे अन्नाचा अपमान. एखादा माणूस जेवायला बसलेला असतो तेवढ्यात घरात किरकिर सुरू होते. पती-पत्नी, मुले किंवा कुणीतरी पाहुण्यापैकी अचानक नको ते विषय काढतात. शब्दाला शब्द वाढत जातात. भांडणे सुरू होतात व कुणीतरी रागाने जेवणावरून उठून जातो. अन्न तसेच राहते. "अन्नाचा म्हणजे अन्नपूर्णेचा अपमान होतो. नंतर घराण्याला उतरती कळा लागते". * घरचा कर्ता पुरुष अथवा स्त्री जेवायला बसले असताना त्यांना घरातील कोणत्याही अडचणी सांगू नका. त्यांना शांतपणाने चार घास खाऊ द्या. * शत्रू जरी काही खात-पीत असेल, जेवत असेल तर त्याला सुखाने खाऊ द्या. काहीही बोलू नका. * अन्नावरून रागाने उठणारी व्यक्ती अथवा त्याला तसे करण्यास भाग पाडणारा कुणीही असो, दोघांनाही अन्नाचा शाप लागतो. * एखाद्याचा तोंडचा घास काढून घेणे हे शापाला आमंत्रण देते. * मतभेद वगैरे असतील तर नंतरही त्यावर बोलता येते, पण समोर अन्न असताना चुकूनही तोंडातून अपशब्द काढू नयेत. तसेच कुणाला कोणता सल्लाही देऊ नये. * घर असो वा हॉटेल, लग्न, मुंजीचा कार्यक्रम अथवा कोणताही समारंभ असो, लोकांनी शांत मनाने जेवण केले तरच तो आशीर्वाद ठरतो व रागारागात कसे तरी चार घास पोटात ढकलल्यास तो अन्नपूर्णेचा अपमान होतो व वेळ येताच त्याचे अनिष्ट परिणाम जाणवू लागतात. * यासाठी जेवण्यापूर्वी ताटाभोवती पाणी फिरवून चित्रावळी काढली जाते व काही शिते ज्ञात अज्ञात जीवासाठी काढून ठेवण्यासाठी प्रथा आहे. * मंगलकार्याच्यावेळी ताटाभोवती रांगोळी काढली जाते. * अन्नपूर्णा देवी प्रसन्न राहावी. संपूर्ण कुटुंबाचे रक्षण व्हावे, घर धनधान्याने भरलेले असावे, सर्वांची भरभराट व्हावी हा त्या मागील हेतू असतो. * अन्न शिजविणारी अथवा वाढणारी किंवा हॉटेलात अन्न पुरवणारे हातात अन्न असताना असणारी कोणतीही व्यक्ती असो त्यांचे चांगले, वाईट विचार हातात धरलेल्या अन्नात उतरतात. त्यासाठी मन शांत नसताना अथवा राग, रुसवे तसेच मन प्रक्षुब्ध असेल तर शक्यतो खाणे-पिणे करू नये. * मनुष्यप्राणी राबतो पोटासाठी पण ते अन्न जर तुम्ही शांतपणे खात नसाल तर त्या राबण्याचा उपयोग काय अन्नाच्या नासाडीने अन्नपूर्णेचा अपमान होत असेल तर त्याचे अनेक दोष निर्माण होतात व ते पुढे त्रासदायक ठरतात. हे दोष दूर व्हावेत यासाठी पंचमहायज्ञ रोज करावा. * ज्योतिषशास्त्रात सांगितलेले आहे. 'अतिथी देवो भव' ही म्हणही त्यासाठीचा वापरतात. पशुपक्ष्यांना खाऊ घातल्यास आपल्या कमाईला ऊर्जितावस्था येते. ज्यावेळी संकटे येतात त्यावेळी कुणाच्या तरी रूपाने देव आपले रक्षण करीत असतो. * अन्नदान केल्याने अनेक दोष नष्ट होतात, राहती वास्तूही शांत राहते. स्वतःची अध्यात्मिक शक्तीही वाढते.

+19 प्रतिक्रिया 2 कॉमेंट्स • 29 शेयर