Bala Thakare Apr 12, 2021

🙏 हरे कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव, रामकृष्णहरि 🙏 " " "आपन कर्ता नसुन कर्ता करविता हा प्रभू असतो."-> कर्म करण्याचे देह एक साधन आहे, तर आत्मा त्या देहाचा मालक असतो". आपन जे काही कर्म करीतो, ते सर्व शरीराद्वारेच करीत असतो. तेव्हा आपले शरीर कर्म करीत आहे, असे आपलेच ज्ञानेंद्रिये आपल्याला सांगत असतात. वास्तविक पाहता आपले शरीर कोणाच्या आधारावर कर्म करीत आहे, किवा या शरीराकङुन कोण कार्य करून घेत असतो. तेव्हा तो कुणालाही दिसत नसतो. तो म्हणजे आत्मा होय. ज्या आत्मशक्ती च्या भरवशावर संपूर्ण देह म्हणजे कर्मेंद्रिये व ज्ञानेंद्रिये कार्य करीत असतात. परंतु तो देहात असुनही अलिप्त व अदृष्य असतो. म्हणूनच जिवात्मा शरीर रूप धारण करीतो तेव्हापासुन 9 महीने 9 दिवसापर्यत गर्भाशयात देह कृती करीत असतो. व नंतर आत्मा जोपर्यंत या देहासोबत कार्यरत असतो. तोपर्यंत देह कर्म करीत असतो. अन्यथा देह काहीच कर्म करूच शकत नाही. म्हणून आपन कर्ता नसुन, एक निमित्त मात्र देह एक आत्म्याचे साधन आहेस. म्हणून जी काही कृती आपन करीत असतो, ती आपन करीत नसुन, या देहाने कर्माचे म्हणजे मी पणाचे क्रेडिट न घेता, प्रभू ला दिले पाहिजे. तेव्हा तो देह कर्म बंधनात नसतो म्हणजेच तो अलिप्त असतो. म्हणजे कर्मबंधन मुक्त असतो.🙏श्रीगुरू मारोती देवार्पण शिवार्पण 🙏

+13 प्रतिक्रिया 10 कॉमेंट्स • 37 शेयर
Bala Thakare Apr 12, 2021

🙏हरीओम नमःशिवाय शिव सुप्रभात "मौनव्रत " -> मौनव्रत म्हणजे मुख बंद करणे नव्हे तर आपल्या चंचल मनाला स्थिर व एकाग्र करून बुद्धी व इंद्रियांना ओलखणे आणि नंतर दैवी ईश्वरीय शक्ती पर्यंत पोहोचण्यासाठी मौनव्रत एक प्रभावशाली व शक्तीशाली व्रत आहे. जेव्हा आपण मौन असतो, तेव्हा सर्वप्रथम आपन आपल्याला ओळखतो तेव्हाच आपन इतराना ओळखु शकतो. कारण जागाला ओलखणे सोपे आहेत परंतु स्वताःला ओलखणे कठीण काम आहेत. तेव्हा अनेक प्रश्नांची उत्तरे या मौनव्रतामध्ये दङलेले असल्यामुळे मौनव्रत प्रभावशाली व शक्तीवाली व्रत आहे. आत्मा ही पुर्वीपासुन सर्व काही जाणत असतात परंतु ती आत्मा काहीच बोलु शकत नाही. म्हणूनच नैसर्गिकरीत्या जन्माला येतांना व जातांना कोणीही बोलु शकत नाहीत. म्हणून जिवन जगताना मौनव्रताला अधिक महत्त्व दिलेले आहेत. 🙏श्रीगुरू मारोतीदेवार्पण,शिवार्पण 🙏🙏🙏

+14 प्रतिक्रिया 10 कॉमेंट्स • 30 शेयर
Bala Thakare Apr 11, 2021

🙏Good morning GOD bless " आपल्या सुख व दु:खाचा incharge हा स्वताः आपनच असतो. ते म्हणजे आपले "मन"होय. जर या incharge ला सदैव सकारात्मक विचारासोबत ठेवाल, तर कोणत्याही समस्यांवर समाधान मिळत असतात. जर का या incharge ला नकारात्मक विचारांच्या संगतीत ठेवाल, तर हाच प्रत्येक समाधानामध्ये समस्याच निर्माण करीत असतो. तेव्हा बुद्धी ही Boss प्रमाणे कार्य करीत असतात आणि "मन" हे P.A प्रमाणे कार्य करीत असतात. परंतु जेव्हा Boss हा P.A प्रमाणे कार्य करीतो. तेव्हा अति तीक्ष्ण हुशार बुद्धी असतांना सुद्धा निष्क्रीय कार्य करीत असतात. नंतर आपल्याच इंद्रिया द्वारे म्हणजे शरीराकङुन आपनच वाईट कृती घङवुन आणत असतो. नंतर जेव्हा पश्चात्ताप होतो, तेव्हा आपनच आपल्या सर्व क्रियेला आपनच दोषी असतो. Therefore always be positive & be happy thanks 🙏श्रीगुरू मारोतीदेवार्पण सुप्रभात वंदन 🙏

+10 प्रतिक्रिया 8 कॉमेंट्स • 22 शेयर
Bala Thakare Apr 11, 2021

🙏 श्रीगुरू सुप्रभात वंदन जय हरी 🙏 "मन" हे जगातील सर्वात पवित्र तिर्थक्षेत्र आहे. आणि विचार पवित्र असेल तर हृदय सुद्धा एक पवित्र मंदिर आहे. कारण मन,बुद्धी शरीर या देहरूपी मंदिरात आत्मा हा अधिक श्रेष्ठ आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले आहे. -> "न लगती सायास जावे वनातंरा सुखे येतो घरा नारायण " म्हणजे मनाचा स्वभाव अति चंचल असल्यामुळे त्या मनाला वनात तसेच कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. कारण सुर्य जेव्हा उगवतो तेव्हा अंधार आपोआपच नाहीसा होवून तो सुर्यप्रकाश व ऊर्जा ही सदैव निर्विघ्ननम् तसेच सुख घेवून येत असतो. म्हणूनच तर प्रत्येक घरी त्या सूर्याचा प्रकाश असतोच, असे कोणतेही स्थल नाही जेथे सुर्यप्रकाश नाही. म्हणून त्याला सुखे येतो घरा नारायण असे म्हटले आहेत. तसेच प्रत्येक प्रभात ही सुप्रभातच असते,प्रत्येक दुपार, संध्या व रात्री ही शुभच असतात. फक्त गरज आहे ती पवित्र मनाला पवित्र विचारांची. जसे आपले विचार असते, जसे आपल्या स्वमनाचे भाव निर्माण होत असतात. तसा देव दिसतो,म्हणजे आपल्या विचाराप्रमाने व भावा प्रमाणे म्हणजे भावनेप्रमाणे आपले अंतर्गत व बहिर्गत मन शरीराद्वारे कृती करीत असतात, तेव्हा आपला "स्वभाव" आपनच निर्माण करीत असतो. स्वभावाप्रमाने आपन कृती करीत असतो. व कृतीप्रमाणे आपल्याला या जगात ओळखत असतात. 🙏श्रीगुरू मारोतीदेवार्पण मंगलम् वंदनम् 🙏

+13 प्रतिक्रिया 11 कॉमेंट्स • 63 शेयर
Bala Thakare Apr 10, 2021

🙏प्रभू जी जयश्री राम जयश्री हनुमान "दास्यभक्ती "-> या पृथ्वीग्रहावर दास्यभक्ती चे एकमेव उदाहरण द्यायचे असेल तर "श्रीहनुमानजी" याचे उदाहरण द्यावे. कारण "अतुलीत बल धामा अंजनीपुत्र पवनसुत नामा" म्हणजे ज्या शक्ती ची आपन सर्वसाधारण तुलना करू शकत नाही अशी ती शक्ती व भक्ती श्रीहनुमानजी कङे असुन सुद्धा श्रीराम याचे दास श्रीहनुमानजी दास आहेत. एवढी प्रचंड शक्ती श्रीहनुमानजी कङे असतांना सुद्धा प्रभू श्रीराम याच्या आज्ञेनुसार कार्य करीत आहे. तेव्हा अशा भक्तीचे उदाहरण द्यायचे झाल्यास श्रीहनुमानजी उदाहरण द्यावे. म्हणजे ती शक्ती अष्ठसिध्दी नव विधी के दाता आहेस, ज्याचे नाव पवनपुत्र श्रीहनुमानजी आहे. ते अंजनी चे सुत,तसेच श्रीराम भक्त,रामदूत श्रीहनुमानजी हेच दास्यभक्ती चे एकमेव उदाहरण होय. 🙏श्रीगुरू मारोतीदेवार्पण सुप्रभात वंदन 🙏

+9 प्रतिक्रिया 5 कॉमेंट्स • 10 शेयर