A.G. JOSHI Aug 21, 2019

संत एकनाथ महाराज यांनी दिलेला गवताचा घास पाषाणरूपी नंदीने ग्रहण केला ! एकनाथ महाराजांकडून ब्रह्महत्येचे भयंकर पाप घडले आहे. त्यासाठी त्यांनी प्रायश्चित घेतले, तरच शुद्ध होईल, असा तोडगा पैठणकरांनी सुचवला. त्यांनी एकनाथ महाराजांना सभेत बोलावले. एकनाथ महाराज प्रसन्न मुखाने सभेसमोर येऊन उभे राहिले. सभेने त्यांना ब्रह्महत्येविषयी प्रायश्चित घ्यावे लागेल, असे सुचवले. एकनाथ महाराज शांतपणे म्हणाले, ''आपण दिलेल्या प्रायश्चित्ताचा मी आनंदाने स्वीकार करीन.'' ब्रह्महत्येला शास्त्रात देहांताची शिक्षा सांगितलेली आहे; पण याच पैठण नगरात ज्ञानदेवांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवले आणि आपले पावित्र्य सिद्ध केले. तेव्हा एकनाथांनीही देवालयासमोरील पाषाण नंदीला गवताचा घास खायला लावून आपले पावित्र्य सिद्ध करावे, नाहीतर पुढील प्रायश्चित्तास सिद्ध व्हावे, असे सुचवले. एकनाथ महाराजांनी गवताची एक मूठ घेतली आणि ते त्या पाषाणाच्या नंदीजवळ गेले. '''हे देवा, तू आता हा गवताचा घास घे'', असे म्हणून एकनाथ महाराजांनी आपल्या हातातील गवत नंदीच्या मुखाजवळ धरले. नंदीने जीभ लांब करून नाथांच्या हातातील गवत तोंडात घेतले. तो गवत चावून खावू लागला. पैठणचे विरोधक त्यांना शरण गेले. त्याच वेळी एकनाथ महाराज नंदीला म्हणाले, ''देवा, आता आपणही येथे राहू नका. आपणालाही साक्षात्कारी नंदी म्हणून इतरांचा त्रास सहन करावा लागेल. आपण नदीत जाऊन जलसमाधी घ्यावी.'' तो पाषाणाचा नंदी ताडकन् उठला आणि नदीत जाऊन त्याने जलसमाधी घेतली. या दृश्याने एकनाथ महाराजांचे सामर्थ्य न समजलेल्या लोकांचे चांगलेच डोळे उघडले. 🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

+11 प्रतिक्रिया 2 कॉमेंट्स • 5 शेयर
A.G. JOSHI Aug 21, 2019

💐 || सुमंगल सुप्रभात || 💐 🌞 दिन विशेष इसवी सन २०१९- २१ अॉगष्ट शालिवाहन शक १९४१ विक्रम संवत २०७५ भा. रा. ३० श्रावण (५) १९४१ युगाब्द ५१२१ संवत्सर नाम: विकारी अयन : दक्षिणायण ऋतु : वर्षा मास: श्रावण पक्ष : कृष्ण तिथी : षष्ठी वार : बुधवार नक्षत्र : अश्विनी राशी : मेष १८८८: विल्यम बरोज यांनी बेरजा करणाऱ्या यंत्राचे पेटंट घेतले. १९११ : पॅरिसच्या लुव्र या संग्रहालयातुन लिओनार्डो-द-व्हिन्सी याचे मोनालिसा हे जगप्रसिद्ध चित्र चोरीला गेले. जन्मदिवस १९०९ नागोराव घनःशाम तथा ना.घ. देशपांडे, कवी. १९३४ सुधाकरराव नाईक, मुख्यमंत्री १९८६ उसेन बोल्ट, जमैकन धावपटू मृत्यूदिन १९३१ पं विष्णू दिगंबर पलुस्कर, गायक, संगीतकार, संगीत प्रसारक १९८१ काकासाहेब कालेलकर, शिक्षतज्ञ १९९५ सुब्रमण्यन चंंद्रशेखर, नोबेल विजेते वैज्ञानिक २००१ शरद तळवळकर, हास्य अभिनेता २००६ बिस्मिल्लाखान, भारत रत्न सनई वादक *।। दास-वाणी ।।* याकारणे पदार्थज्ञान । नाना जिनसीचा अनुमान । सर्व सांडून निरंजन । धुंडीत जावे ।। अष्टांग योग पिंडज्ञान । त्याहून थोर तत्वज्ञान । त्याहून थोर आत्मज्ञान । तें पाहिलें पाहिजे ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १७/०३/२३-२४ सर्व दृष्य पदार्थ आणि वस्तुंचे ज्ञान हे नेहमीच सीमित असते. तो निव्वळ अंदाज असतो. शास्त्रशुद्ध अंदाज म्हणा हवं तर. दृष्य गोष्टींचे नाम रंग रूप ज्ञानेद्रियांना भुलवून टाकते , हे खरेच आहे.सामान्य माणसाला आकर्षित करते. जे आवडते ते पुन्हा हवेसे वाटते. पंरतु हया दिखाऊ आणि नाशवंत गोष्टी असल्याने त्यामधे कधीच अडकून पडू नये. आसक्ती सोडून निरंजन म्हणजे परब्रह्माचा शोध घेत रहाणे हेच हितकर आहे. पिंड म्हणजे देह. अष्टांग योग हा देहप्रधान आहे. पिंडज्ञान हे त्यात महत्वाचे मानले आहे. आत्म अनात्म, सार असार, नित्य अनित्य हया तत्वज्ञानाचा विचार पिंडज्ञानापेक्षा श्रेष्ठ अाहे. तत्वज्ञानामधे द्वंद्व आहे.साधकाने निवड करायची आहे. परंतु आत्मज्ञान हे एकमेव आहे. सर्वश्रेष्ठ आहे. ते ज्याला होईल तो सिद्धच ! श्रवणनिरूपण समास. 🙏 💐💐💐💐💐 🙏

+5 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 11 शेयर
A.G. JOSHI Aug 21, 2019

*✍🏼श्री रेणुका देवी महात्म्य २/.* 🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚 अध्याय २ नारदमुनी माहिष्वती नगरीस आले नारदमुनि संचार करीत करीत माहिष्वती नगरीत आले व कार्तवीर्यार्जुनास भेटले. कार्तवीर्याजुनाने त्यांचा यथोचित सत्कार केला व तो त्यांना म्हणाला, "मुनिश्रेष्ठ, आपण त्रैलोक्यात संचार करीत असता आमच्या राजधानीस आपण आल्यास बरेच दिवस झाले. आज आपल्या दर्शनाने मी धन्य झालो. ऋषिवर्य माझ्या राज्यकारभाराची आपणास माहिती झालीच आहे. तेव्हा मी जास्त काय सांगू ? यावेळी माझ्यापुढे देव-दानव अगर राजाधिराज कोणीही समर्थ नाही. यदाकदाचित कोणी राहिलाच तर त्यास तात्काल यमलोकास पाठवीन. एवढेच नव्हे तर माझा पराक्रम देवलोकासही पटवून देऊन, त्यांचा मानभंग करून त्यांचे ऐश्वर्यही माझ्या स्वाधीन करून घेण्याकरिता शूर सेनेची मी जुळवाजुळव चालविली आहे." हे ऐकून नारदमुनि म्हणाले, "हे राजा तू गुरु दत्तात्रेयाचे अनुग्रहास पात्र होऊन जगप्रसिद्ध झाला आहेस. तुझ्या समोर राहण्यास कोणीहि समर्थ नाही बरे, आता आम्ही येथून जातो." असे सांगून नारदमुनि तेथून निघाले. नारदमुनिंनी इंद्रलोकास येऊन देवतांना अर्जुनीचा दुष्ट विचार सांगितला. नारदांनी अत्य्म्त गडबडीने देवलोकी येऊन इंद्राचे सभास्थानी प्रवेश केला. त्यांच्या आगमनाने इंद्रादि देव आनंदित झाले व त्यांना नमस्कार केला व म्हणाले, "नारद महर्षि, आपण आजवर प्रत्येक वेळा वीनानादावर गायन करीत अत्यानंदाने नाचत येऊन आम्हास दर्शन देत होता. पण आज ते काहीच दिसत नसून आपण अत्यंत गडबडीने येऊन दर्शन आम्हास दिले आणि आपला चेहराहि म्लान व चिंतातूर दिसतो. यामुळे आम्हास एक प्रकारचा संदेह उत्पन्न झाला आहे. त्याचे आपण निवारण करावे." असे इंद्र नारदास म्हणाला. त्यावर नारद म्हणाले, 'हे सुरपति, तुमची शंका बरोबर आहे. हे मी आधीच जाणून आहे मी आता काय सांगू ? भूलोकी संचार करीत करीत मी माहिष्वती नगरीत गेलो व कार्तवीर्याजुनाची भेट घेऊन त्याचे मनोगत समजावून घेतले. तो अर्जुनी, आपला पराक्रम व्यक्त करुन आपल्या समोर येण्यास कोणीच समर्थ नाही, वैरी समोर आल्यास त्याचा एका क्षणात नाश करून आपले शौर्य तुम्हा सर्वास दाखवून तुमचे सर्वस्व हरण करून घेण्यास अत्यंत आतुर झाला आहे. त्याचा त्रास दूर करण्याचा उपाय तुम्ही योजावा हे सांगण्यासाठिच मी येथे आलो आहे. हे सुरपति, त्या दुष्टासमोर राहणेस तुम्ही देवही समर्थ नाही तेव्हा तुम्ही तातडीने ब्रह्मदेवाकडे जाऊन मी सांगितलेली सर्व हकीकत त्यास कळवावी. व त्यास बरोबर घेऊन क्षीरसमुद्रावर श्री लक्ष्मीसह विश्रांती घेत असलेल्या श्रीनारायणाचे सहाय्याने तुमचे कार्य साधून घ्यावे असे सांगून नारद पुढे संचाराकरिता निघून गेले. इकडे इंद्रादि देव आपापल्या वाहनावर आरूढ होऊन तातडीने ब्रह्मदेवाजवळ आले व नारदाकडून कार्तवीर्यार्जुनाच्या दुष्ट योजनांचा कळलेला बेते त्यांनी ब्रह्मदेवास सांगितला, व ब्रह्मदेवास बरोबर घेऊन ते सर्व क्षीरसमुद्रावर आले आणि श्री नारायणास त्यांनी नमस्कार केला, व कार्तवीर्याजुनाकडून आपणावर येणारे संकट दूर करण्यास आपणाशिवाय इतर कोणीही समर्थ नाही असे नारदांनी सांगितले. म्हणून, आम्ही सर्व आपणाकडे आलो आहोत असे ब्रह्मदेव श्री नारायणास म्हणाले. हे ऐकून श्री नारायण म्हणाले, "हे ब्रम्हदेवादि देवहो ! मी मत्य्स्य, कूर्म, वराह, नरसिंहादि अवतार घेऊन दुष्ट राक्षसांचा संहार केला आणि कंटाळून विश्रांति घेण्याकरिता या क्षीरसमुद्रावर आलो. आता या समयी माझ्याकडून तुमच्या संकटांचे निवारण होणार नाही. तेव्हा तुम्ही सत्वर हिमाचलावर असलेल्या तुमच्या मातुश्री अदितिदेवी यांच्याकडे जाऊन त्यांना ही सर्व हकीकत कळवा, म्हणजे त्यांच्या कृपेने तुमचे इष्ट साध्य होईल. हे माझे वचन सत्य आहे असे समजा." असे नारायणांनी त्यांना सांगितले. श्री नारायणाचे हे बोलणे ऐकून इंद्रादि देव अदितिदेवीकडे आले व त्यांनी सांगितले श्री नारायणाचे हे माझे वचन सत्य आहे असे समजा." असे इंद्राने तिला नमस्कार करून प्रार्थना केली की, "हे माते, तो दुष्ट कार्तवीर्य आम्हा सर्वांना त्रास देऊन आमचे सकल ऐश्वर्यही आपल्या स्वाधीन करून घेणार असे त्याने नारदांना सांगितले आहे. नारदांचेकडून आम्हास ही हकीकत कळली आणि त्यांनीच या संकटाचे निवारण करण्यासाठी क्षीरसमुद्रावर श्रीनारायणाकडे आम्हास पाठविले होते. त्याप्रमाणे आम्ही श्री नारायणाकडे गेलो पण त्यांनी आपणाकडून हे काम होणार नाही असे स्पष्ट सांगितले व तुमचेकए आम्हास पाठविले म्हणुन आम्ही सर्व येथे आलो आहोत." असे ते देवीस म्हणाले, यावर अदितिदेवी म्हणाली, "बाळांनो बरे झाले. तुम्ही काही घाबरू नका. मी माझ्या तपाच्या प्रभावाने पार्वती-परमेश्वरांना प्रसन्न करून घेऊन त्यांच्या सहाय्याने त्या दुष्टांचा नाश करण्याचा उपाय योजत असे. तुम्ही नारायणास कळवून स्वस्थ चित्ताने तुमच्या निवासस्थानी जा." या आज्ञेप्रमाणे सर्व देव नारायणाकडे आले व त्यांनी आपणास अभय मिळाल्याची हकीकत नारायणास कळवून ते आपापल्या स्थानाकडे गेले. अदितिदेवीच्या तपाने प्रसन्न होऊन श्री शंकरानी तिची अपेक्षा पूर्ण केली इकडे अत्यंत तेजस्वी, प्रचंड सामर्थ्यवान व क्रोधाने कलिकेसारखी भासणारी अदितिदेवी पार्वती-परमेश्वरांना प्रसन्न करून घेण्यासाठी पंचाग्नीमध्ये उग्र तपश्चर्येस बसली. हिच्या तपाची ज्वाला सर्वत्र पसरली, इतकेच नव्हे तर कैलास पर्वतावर वास करीत असलेल्या पार्वती परमेश्वरांनाही तिची झळ लागली. जगन्माता पार्वती भय पावून म्हणाली की, "हे परमात्म्या ही उग्र बाधा लवकरच शांत कर" त्यावर श्रीशंकर म्हणाले, "पार्वती, ही उग्र बाधा कोणापासून उत्पन्न झाली आहे हे तुला माहीत नाही वाटते ? ऐक तर मी थोडक्यात सांगतो. तुझ्याच वंशातली अदितिदेवी आपल्या डाव्या पायाच्या अंगुष्ठाखाली गजगा व त्याखाली पोलादी सुया ठेवून एका पायावर उभी राहून तुझ्या व माझ्या दर्शनासाठी पंचाग्नीमध्ये करीत असलेल्या तपाची ज्वालाच इतकी प्रखर आहे समजले ना ! असेच पूर्वी एकदा या देवीने उग्र तपाने आम्हास प्रसन्न करून घेऊन, देण्यास असाध्य असे वर मागितले होते; ते आम्ही न देता तिचे कसे तरी त्यावेळी समाधान केले होते हेहि तुला ठाऊक आहे. मी आता यास काय उपाय योजावा हे तूच मला सांग." असे परमेश्वराने कृपादृष्टीने पाहून पार्वतीस विचारले. पार्वती म्हणाली, "हे भक्षरक्षका शंकरा, आता तिजवर आलेले संकट दूर करून तिची मनीषा पूर्ण करण्याची कृपा करावी." मग परमेश्वर म्हणाले, "चल तर आपण तिकडेच जाऊ." असे म्हणून ते नंदीवर आरूढ झाले. अदितिदेवी तप करीत असलेल्या ठिकाणी आले. तेथे कोणासही जवळ राहता न येण्यासारख्या उग्र तपाच्या ज्वाला श्री शंकरांनी भक्षण केल्या व तेथे शांतता स्थापन करून ते अदितिदेवीजवळ आले. तेव्हा अदितिदेवीने नेत्र उघडून पाहिले व तिला नंदीवर आरूढ झालेले पार्वती-परमेश्वराचे दर्शन झाले. अदितिदेवीने हात जोडून त्यांना नमस्कार केला व ती त्यांचे सांत्वन करू लागली. हिच्या तपाच्या प्रभावाने प्रसन्न होऊन श्री शंकर म्हणाले, "हे अदितिदेवी अशा प्रकारचे तप आजवर कोणीच केले नव्हते. तेव्हा असले खडतर तपाचरण तू कशासाठी करू लागलीस ते आम्हास सत्वर सांग" हे शंकराचे वचन ऐकून अदितिदेवी म्हणाली, "हे जगदीशा माझे पुत्र जे इंद्रादि देव त्यांना राक्षसकुलाचे क्षत्रिय त्रास देण्याचे योजनेत आहेत असे नारदांच्या मुखाने ऐकलेल्या बातमीने भयग्रस्त होऊन त्यांनी राक्षसांच्या नाशासाठी श्री नारायणाकडे धाव घेतली. श्री नारायणांनी हे काम आपणाकडून होणार नाही असे सांगून त्यांना माझ्याकडे पाठविले, म्हणून त्यांच्या निवारणार्थ मी हे तप आचरुन आपल्या दर्शनास पात्र झाले. आता त्या दुष्टांचा नाश करून देवतांचे रक्षण करावे अशी माझी इच्छा आहे. ती आपण पूर्ण करावी अशी माझी आपणास विनंती आहे, तेव्हा श्री शंकर नंदीवरून उतरून आले आणि म्हणाले, "देवी मी तुझी इच्छा पूर्ण करतो. तू काही चिंता करू नकोस." अदितिदेवी शंकरास म्हणाली, "हे देवाधिदेवा माझी सतत दिति इजपासून उत्पन्न झालेले राक्षस वरचेवर माझ्या देव पुत्रांना त्रास देत असतात म्हणून त्यांच्या निवारणार्थ मी उग्र तप करून तुमचे दर्शन घेतले. याप्रमाणेच यापुढेही असा प्रसंग मजवर येऊ नये यासाठी हे शंकरा माझे पति सत्वांशाने चिरंजीव व्हावेत अस वर तुम्ही मला द्यावा." श्री शंकर म्हणाले, "आदिति मी तुझे वचन ऐकून प्रसन्न झालो आहे. मागे एकदा या पार्वतीसमक्ष तू ८ प्रकारचि लक्ष्मी आणि १४ प्रकारची योगिनी होशील असे तुला वचन दिले आहे आता यापुढे दुष्ट राक्षसांचा संहार करण्याकरिता पार्वती देवीच्या वंशातली तू रेणुकराजा पृथ्वीवर करीत असलेल्या पुत्रकामेष्टी यज्ञात अयोनिज होऊन जन्म घे कश्यपांपासून मी जन्म घेऊन तुझा पति होईन, व मी दिलेल्या प्रसादापासून तुला प्रथम ४ मुले होतील. नंतर शेवटचा पुत्र श्रीनारायणच तुझ्या उदरी येऊन पार्वती देवीपासून अंबिकास्त्र व श्री गजाननाच्या सेवेने परशु अस्त्र मिळवून देवतांना पिडणार्‍या या क्रूर राक्षसांचा संहार करील आणि देवतांना संतोष देईल. हे सर्व तुझ्या तपाच्या प्रभावानेच घडून येऊन त्याची जगभर प्रसिद्धी होईल. पण तुला तीन निमिषाचेच वैधव्य येईल व नंतर तू सकल ऐश्वर्य युक्त सुवासिनी होऊन जगदंबा, एकवीरा, रेणुकादेवी या नावाने चिरंजीव होशील. पुढे कलियुगात सद्‌भक्ति, सदाचार, सद्‍धर्म नष्ट व्हावयास लागतील त्यावेळी तू महिमाशाली म्हणून गाजून तुझ्या ठिकाणी श्रद्धा ठेवलेल्या लोकांचे इष्टार्थ पूर्ण करशील. त्यामुळे सर्व जातीचे लोक कोणताही भेदभाव न मानता तुझी भक्तियुक्त पूजा करू लागत्ल आणि तू त्यांच्यामध्ये प्रसिद्ध पावशील' असा श्री शंकरांनी अदितिदेवीस वर दिला. व ते पार्वतीसह नंदीवर आरूढ होऊन कैलासास परत गेले. अशी ही अदितिदेवीच्या तपःप्रभावाची कथा सूतमुनींनी शौनकादि ऋषींना निवेदन केली आणि पुढे जमदग्नी ऋषींच्या जननाची कथा सांगण्यास प्रारंभ केला. च्यवन भार्गव रुचिक मुनि आणि सत्यवती यांच्यासह सिद्धाचलास आल्याची कथा- इकडे गोदावरीचे काठी अदिमोहरा नावाचे अत्यंत महिमाशाली क्षेत्र फार प्रसिद्ध होते. या ठिकाणी भृगुवंशातील योगविद्या प्रवीण च्यवनऋषी राहत होते. याना चार वेद, सहा शास्त्रे तसेच यजनयाजनादि कर्मात निपुण असा रुचिकमुनि नावाचा अत्यंत तपोबल व शापानुग्रह संपन्न असा एक पुत्र होता. त्यास गाधि राजाची कन्या सत्यवती दिली होती. ही सुद्धा पतीप्रमाणेच दानधर्म, परोपकारी इत्यादि कामात सहाय्यकारि, पतिभक्तिपरायण व अतिथीअभ्यागतांचे आदरातिथ्यदक्ष अशी होती. यामुळे ते आदिमोहरा स्थान गुरुकुल-वासाकरिता योग्य झाले होते. अशा या पुण्यस्थानास अनेक मुनि तसेच राजे लोकही येऊन आपल्या मनः कामना पूर्ण करून गुरुकुलास तन-मन धनाने सहाय्य करून जात असत. हे जाणून दक्षिणेकडे उरगादीस उत्तर वाहिनी अशा दुभागलेल्या पवित्र मलापहारी नदीचे काठी असलेल्या सिद्धाचलावरील मुनिजन येथे येऊन च्यवनभार्गव व रुचिक मुनीचे दर्शन घेवून काही दिवस त्यांच्या सेवेत काढीत आणि त्यांनी आपल्याला सिद्धाचलावरी आश्रमास येऊन एकवेळ भेट द्यावी अशी विनंती करीत. या विनंतीस मान देऊन काही मुनिपुत्रांना तेथे ठेवून च्यवन भार्गव ऋषि, पुत्र रुचिक मुनि व सत्यवतीसमवेत लिंगमुनि, तृप्तिमुनि, सिद्धमुनि, परशुमुनि, गुप्तमुनि इत्यादि आपल्या अंगरक्षकासह सिद्धाचलावर येऊन पोचले. यांच्या आगमनाची बातमी कळताच कित्येक राजे, मुनि वगैरे सिद्धाचलास आले व त्यांनी ऋषींचे दर्शन घेवून गुरुदक्षिणा ठेवून आशिर्वाद घेतला. या ऋषींच्याकडे यज्ञयागाच्या व वेद शास्त्रांच्या अभ्यासाकरिता कितीतरी ऋषिकुमार येऊन राहिले व आपापल्या इच्छेनुसार त्यांनी विद्याभ्यास केला. अशाप्रकारे या सिद्धाचलावर बरेचसे ऋषि जमले. रुचिकमुनींच्या अनुज्ञेप्रमाणे या सर्वांचे यथोचित आदरातित्य सत्यवती करू लागली. हे पाहून च्यवनभार्गवांनी आपले सर्व अधिकार रुचिक मुनींकडे सोपविले व आपण शिवयोगानंदात तल्लीन झाले. गाधिराजा सिद्धाचलास येऊन सत्यवतीस बोलावून घेऊन गेला ती कथा इकडे गाधिराजा व त्याची पत्‍नी कमलाक्षी ही उभयता साधुसत्पुरुषांचा भक्तिपूर्वक सत्कार करून सर्व प्रजाजनांच्या प्रीतीस प्रात्र झाली होती. आपली कन्या सत्यवती हिला राजधानीस बोलावून आणण्याबद्दल त्यांचा विचार चालला असता कमलाक्षी राणि राजस म्हणाली, "प्राणप्रिय ! आमची कन्या सत्यवती हिची पुष्कळ दिवस झाले भेट झाली नाही व तीहि आम्हांस पाहणेस उत्सुक झाली असेल म्हणून आपण सत्वर जाऊन तिचा क्षेमसमाचार समजून घेऊन च्यवन भार्गवऋषींच्या अनुज्ञेने तिला इकडे बोलावून आणावे." हे प्रियपत्‍नीचे बोलणे ऐकून गाधिराजा मंत्र्यासह रथारूढ होऊन सिद्धाचलास येऊन पोचला. च्यवन भार्गवांना हे आलेले समजताच त्यांनी आता आपणाकडे बोलावून घेतले, व त्यांचे क्षेमकुशल विचारून आपल्या आश्रमाचा सुखानंद व तेथे नित्य होत असलेला अतिथि-अभ्यागतांचा सत्कार, रुचिक मुनींच्या आज्ञेने सत्यवती भक्तिपूर्वक उत्तम तर्‍हेने चालवीत असल्याचे त्यास सांगितले, यास राजा व मंत्री यांनी "ऋषिवर्य या सर्व सौभाग्यास देवीची कृपा व आपला मंगल आशिर्वाद कारण ओय." असे म्हणाले व आपला येण्याचा उद्देशही ऋषींना त्यांनी निवेदन केला. नंतर ऋषींच्या सांगण्यावरून ४-५ दिवस तेथेच राहून उत्तरवाहिनी मलापहारी नदीमध्ये स्नानादी कर्मे करून व ऋषींच्या आश्रमात रोज होणारी शिवपूजा आणि होमादिशांतिकये राजपद्धतीप्रमाणे करून आपण आणलेली गुरुदक्षिणा त्यांच्यापुढे राजाने ठेवली. ऋषींनी राजाचा यथोचित सत्कारहि केला. नंतर राजने आपले प्रजाजन सत्यवतीच्या दर्शनास आतुर झाले आहेत व धर्मपत्‍नी कमलाक्षी हिनेहि आपल्या अनुज्ञेने सत्यवतीस सत्वर बोलवून आणण्यास अत्यंत आग्रहाची सूचना देऊन आपणास पाठविल्याचे सांगितले. तेव्हा आपण जसे सांगाल त्याप्रमाणे आम्ही करू. हे ऐकून ऋषि म्हणाले, "तुझी वत्सलता ठीक आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. उदईक शिवलिंगाप्रीत्यर्थ शांतिहोमादि कर्मे व्हावयाची आहेत आणि या कार्याचे नेतृत्व तुझी कन्या सत्यवती व रुचिकमुनी यांचेकडे आहे तेव्हा हे कार्य संपल्यानंतर तुम्ही मुलीस घेऊन जा. ऋषीच्या आज्ञेप्रमाणे कार्यसमाप्तीनंतर राजाने शिवलिंगाचा प्रसाद स्वीकारला व संतुष्ट होऊन त्या दिवशीची सत्कथाहि श्रवण केली. दुसरे दिवशी ऋषींच्या अनुज्ञेने सत्यवतीसह राजधानीस जाणेकरिता राजाची तयारी चालली असता सत्यवती च्यवनभार्गवाच्या पाया पडलि आणि आपल्या मातेस व आपणासही पुत्रलाभाचा आशिर्वाद मिळावा अशी विनंती केली. ऋषींनी यज्ञेश्वर अग्नि-नारायणाची आराधना करून आपल्या सिद्धमंत्राने तयार केलेले चरुद्रव्य दोन कलशांमध्ये घालुन त्यापैकी एकात ब्रह्मतेजाची व दुसर्‍यात क्षात्रतेजाची प्रतिष्ठापना केली व ते कलश सत्यवतीकडे देऊन म्हणाले, सत्यवती या लहान कलशातील प्रसाद तुझ्या मातेने ग्रहण केला म्हणजे तिला क्षात्रतेजयुक्त असा पुत्र होइल. तेव्हा हा प्रसाद तिला दे व या मोठ्या कलशातील प्रसाद तू ग्रहण केलास म्हणजे तुला ब्रह्मतेजसंपन्न असा पुत्र होईल" असे सांगितले आणि आशिर्वाद दिला. सत्यवती संतुष्ट झाली आणि तिने च्यवनभार्गवांना आणि रुचिक मुनींना नमस्कार केला व त्यांच्या आज्ञेप्रमाणे राजाने सिद्ध केलेल्या रथात ती बसली. मनोवेगाने व वायुवेगाने पळणारे घोडे जोडल्यामुळे तो रथ काही क्षणात सिंधुदेशात प्रवेश करिता झाला. यांच्या आगमनाची बातमी आधीच घोडेस्वारांनी राजधानीत कळविली होती, त्यामुळे सत्यवतीच्या येण्याची वाट पहात असलेल्या राजधानीतील सुवासिनी स्त्रिया वस्त्राभरणाम्नी नटून राजमंदिराच्या महाद्वारात जमल्या. इतक्यात सत्यवतीचा रथ तेथे आला त्याबरोबर राजाने आपल्या कन्येस रथातून खाली उतरविले. तेव्हा सुवासिनीनी भरून आणलेले पाण्याचे घडे सत्यवतीच्या पायावर ओतून कुंकुम-गंध, पुष्प वगैरे तिला अर्पण केले आणि त्या म्हणाल्या, "पहा ही पतिव्रता सत्यवती आपल्या पित्याने दिलेली अनेक उंची वस्त्राभरणे सोडून आणि पतिआज्ञेप्रमाणे वल्कले नेसून, त्रिपुंड भस्म व रुद्राक्षमाला धारण करून महादेवीसारखी कशी शोभत आहे ! हिच्या मंगल दर्शनाने आम्ही पावन झालो असे बोलत सर्व स्त्रिया आपापल्या घरी गेल्या. मग सत्यवती आपल्या वाड्यांतील पार्वतीदेवीच्या मंदिरात गेली व देवीस नमस्कार करून तिने च्यवनभार्गव ऋषींनी दिलेला कलश देवीपुढे ठेवले ती बाहेर आली तेव्हा राणी कमलाक्षीने सत्यवतीस प्रेमाने आलिंगन दिले व तिला आपल्या जवळ बसवून घेऊन तिचे कुशल विचारले. व दोघींच्या भेटीची आनंदाची बातमी तेथेच असलेल्या सत्यवतीच्या सख्यांना कळली. त्याहि संतोष पावल्या. इकडे सिद्धाचलावर असलेल्या च्यवनभार्गवांनी तेथील कार्याचा एकंदर व्याप रुचिकमुनींवर सोपवला व काही शिष्यांसमवेत ते आदिमोहरा स्थानास परत गेले अशी ही कथा सूतमुनींनी शौनकादि ऋषीस सांगितली. सत्यवती व कमलाक्षी देवी या चरुद्रव्यसेवनाने गर्भवती झाल्या ती कथा इकडे गाधिराजा, कमलाक्षी व सत्यवती यांनी देवीचे ध्यान करून ती रात्र आनंदाने झोप घेऊन घालविली व दुसरे दिवशी सत्यवतीने प्रातःकाळी स्नान करून दुर्गादेवीची अष्टविधानाने युक्त अशी पूजा केली आणि त्या ठिकाणी ठेवलेले कलश घेऊन जाऊन ती आपल्या आईस म्हणाली, "आई ! च्यवन भार्गवानी या कलशातील प्रसाद आम्ही दोघींनी सेवन केल्यास आम्हास सत्पुत्र होतील असा आशिर्वाद दिला आहे" असे सांगितले. त्यांचे आज्ञेप्रमाणे तु या कलशातील प्रसाद ग्रहण कर असे सांगून अत्यानंदाचे भरात देहभान विसरून आपण स्वतः सेवन करावयाचा प्रसादाचा मोठा कलश आपल्या मातेस दिला व तिच्या कलशातील प्रसाद आपण स्वीकारला. सत्यवतीचे अमृतवचन ऐकून व ऋषींनी अनुग्रह करून दिलेल्या प्रसादाचा महिमा जाणून कमलाक्षी म्हणाली, "बाळे सत्यवती आम्ही तुझ्यामुळे धन्य झालो." कमलाक्षीने त्या प्रसादाची बातमी गाधिराजास कळविली. ती ऐकून गाधिराजा आनंदित झाला व ऋषींचे स्तवन करू लागला. पुढे १-२ महिने लोटल्यावर सत्यवती व कमलाक्षी दोघीहि गरोदर असल्याची चिन्हे दिसू लागली व आणखी ४-५ महिन्यांनी तर ते स्पष्टच झाले. यावर ही शुभवार्ता रुचिकमुनींना कळविणेकरिता गाधिराजाने सुवर्ण पत्रिका देऊन आपल्या मंत्र्यास सिद्धाचलावर पाठविले. ही पत्रिका मंत्र्याने रुचिकमुनीस दिल्यावर या संतोषजनक बातमीने तेथील सारे ऋषिजन आनंदित झाले. नंतर रुचिकमुनींनी गाधिराजाचे मंत्र्याचा सत्कार केला आणि ते त्यास म्हणाले. हे मंत्रिवर्यू तुम्ही आता गाधिराजास सत्यवतीस येथे आणून पोचविणेबद्दल आमचा आदेश कळवा. मंत्र्याने बरे आहे असे म्हणून रुचिक मुनींचा निरोप घेतला व तो आपल्या राजधानीस आला आणि त्याने गाधिराजाची भेट घेऊन पत्रिका रुचिकमुनींना दिल्याचे व त्यांनी केलेल्या कळविणेस राजाने आपणास पाठविल्याचे सांगितले. ही सुवार्ता ऐकून तेथे मत्काराची सर्व हकीकत त्यास कळविली आणि रुचिकमुनींनी सत्यवतीस आश्रमात आणून पोचविणेची केलेली आज्ञाहि विदित केली; ते ऐकून राजा-राणी यांनी बरे आहे त्याप्रमाणे आपण करू असे आपल्या मंत्र्यास सांगितले. पुढे ४-६ दिवस गेल्यावर एका शुभ मुहुर्तावर गाधिराजा सत्यवतीसह सिद्धाचलावर आला. सत्यवती रथातून उतरली व तिने रुचिकमुनींना नमस्कार केला. आणि आपला आई-बापांचा क्षेमसमाचार, त्याचप्रमाणे कमलाक्षी राणीच्या गरोदरपणाची सुवार्ता त्यांना कळविली. ती संतोषदायक बातमी ऐकून रुचिकमुनींनी कृपादृष्टीने सत्यवतीच्या गर्भाकडे पाहिले व ते तिला म्हणाले, "सत्यवती, मी तुला सेवन करण्यास दिलेल्या ब्रह्मतेजयुक्त कलशातील प्रसाद तू सेवन न करता तुझ्या आईकरिता दिलेल्या क्षात्रतेजयुक्त कलशातील प्रसाद तू सेवन केलास म्हणून तुझा गर्भ ब्रह्मयुक्त नसून क्षात्रतेजसंपन्न असा झाला." हे श्रवण करून सत्यवती अत्यंत व्याकूळ होऊन हात जोडून रुचिकमुनींना म्हणाली, "मुनिश्रेष्ठ आनंदातिरेकामुळे ही चूक माझेकडून घडली याजबद्दल आपण मला क्षमा करावी." मुनि म्हणाले, ’सत्यवती यात तुझी काहीच चूक नाही. ही केवळ शंकरांची अनुग्रह लीलाच होय. आता या बाबतीत तू बिलकूल चिंता करू नकोस." असे अभय देऊन तिचे समाधान केले. "आता तू तुझ्या पित्याच्या उपचाराकडे लक्ष दे" असे तिला सांगितले आणि बाहेर येऊन गाधिराजाची भेट घेतली. त्यास आपल्याजवळ बसवून घेऊन सत्यवतीने त्यांच्या क्षेमसमाचाराची त्याचप्रमाणे कमलाक्षी राणीच्या गर्भाची सविस्तर हकिकत आपणास कळवून संतोष दिल्याचे कळविले. हे ऐकून राजा म्हणाला, "ऋषिवर्य या आपल्या संतोषप्रद समागमास आपले पिताजी यांचीच कृपा मुख्यतः कारण आहे. नंतर राजा त्यांच्या उपचाराने संतुष्ट होऊन एक दोन दिवस तेथेच राहून ऋषींचा निरोप घेऊन व सत्यवतीस बोध करून आपल्या राजधानीस परतला. जमदग्नि-विश्वामित्रांचे जनन. रुचिक मुनीनी सत्यवतीस आपल्याजवळ बोलावले व म्हणाले, "प्रिये, मी तुला आता गर्भवती स्त्रियांनी आचरावयाचे व्रत सांगतो ते ऐक. वारुळांच्या मातीचे शिवलिंग करून ते पूर्वाभिमुख असे पवित्र ठिकाणी स्थापन करावे व त्याची विधानोक्त पूजा करून लिंगास अर्पण केलला प्रसाद तू स्वीकारावा. हे व्रत २० सोमवार भक्तियुक्त अंतःकरणाने न चुकता करून शेवटच्या म्हणजे एकवीसाव्या सोमवारी या पूजाव्रताची सांगता करून अतिथी म्हणुन आलेल्या ब्रह्मचार्‍यांना त्यांच्या इच्छेनुसार तृप्त करावे. या ऋषींच्या सद्धोधाप्रमाणे सत्यवतीने २० सोमवार न चुकता पूजा केली आणि शेवटची पूजा तेथील ऋषिजनांची पत्‍न्यांच्या समवेत विधानोक्त व अत्यंत वैभवाने करून शिवलिंगास शेवटचे मंगल पुष्प समर्पण केले व आपल्या आश्रमातील सर्वजनास त्यांच्या इच्छेप्रमाणे भोजन देऊन संतुष्ट केले. या लिंगपूजेच्या आनंदाने प्रसन्न झालेल्या सत्यवतीने रुचिक मुनींच्या मुखाने सत्कथा श्रवण केली व त्या दिवसाची रात्र शिवानंदामध्ये घालविली. दुसरे दिवशी मंगल अशा मंगळवारी अरुणोदयाचे सुमारास श्रीशंकर स्वप्नात येऊन म्हणाले ’हे सत्यवती माझ्या वंशातील पुत्रास तुझ्या ओटीत घातले आहे त्याचा स्वीकार कर" व आपण त्या पुत्राच्या शरीरातच गुप्त झाले. सत्यवती जागी होऊन पहाते तो तिला आपल्या शुभ्र व स्वच्छ अशा आसनावर मूल दिसले. त्यावेळी ती "शिव शिवा ! काय हा तुझा अगाध महिमा’ असे म्हणून त्या दयाघन परमेश्वराचे स्तवन करू लागली तेव्हा देवतांनी आनंदजनक अशी पुष्पवृष्टी केली व देव दुंदुभिचा निनाद सिद्धाचलावर सर्वत्र व्यापून राहिला. हे पाहून तेथे असलेले सर्व लोक या सुयोगाने विस्मित झाले व देवतास्तोत्र करू लागले. इतक्यात सत्यवतीच्या पुत्रोदयाची वार्ता सर्वत्र पसरली तेव्हा रुचिकमुनी सत्यवतीजवळ आले व तेथेच झोपलेल्या बाळाकडे त्यांनी कृपादृष्टीने पाहिले तेव्हा सत्यवती म्हणाली, मुनिवर्य, "मलत्रयांना आपल्या पायाने लाथाडून खेळत असलेल्या या बाळाला तुम्ही पाहिले ना" त्यावर मुनी म्हणाले, "प्रिये सत्यवती तू म्हणतेस ते करे. हा शिवांशसंभूत पुत्र जन्मास आला याचे कारण च्यवनभार्गव ऋषींनी आशिर्वाद्पूर्वक दिलेला प्रसाद व तू माझ्या आज्ञेप्रमाणे पार्थिवलिंग पुजेचे फल होय. आता तू मलापहारी नदीच्या शुद्धोदकाने स्नान कर व या बाळासही स्नानास घालून मला कळीव असे ऋषी म्हणाले रुचिकमुनींच्या आज्ञेप्रमाणे सत्यवतीने आपण स्नान करून मुलासही स्नान घातले व रुचिक मुनींना कळवले. त्यावर रुचिक मुनींनी मुलास भस्म लावून आपल्या हातातील रुद्राक्षाच्या जपमालिकेने त्यास स्पर्श केला व सत्यवतीच्या अपेक्षेप्रमाणे त्यांना आपले पादोदक देऊन मुनी आपल्या आश्रमास आले. काही ऋषिकुमार या पुत्रोत्वाचा महिमा गात रुचिक मुनीजवळ थोडा वेळ राहिले. इतक्यात कान्यकुजाहून गाधिराजाचे मंत्री ऋषींच्या आश्रमास आले व त्यांनी ऋषींना राजपत्‍नी कमलाक्षी इजला सोमवारी सूर्योदयाचे सुमारास त्रिमलरहित असा पुत्र झाल्याची आनंददायक वार्ता असलेले सारेच जण आश्चर्यचकित व आनंदित झाले आणि ऋषींचा महिमा गाऊ लागले. रुचिकमुनींनी गाधिराजाच्या मंत्र्याचा वस्त्रावरणांनी यथोचित सत्कार केला व त्यांना परत जाण्यास परवानगी दिली. तेव्हा ते तेथून निघून आपल्या राजधानीस आले आणि त्यांनी राजास सांगितले की, "महाराज आपणास झालेल्या पुत्राची शुभवार्ता कळविणेस आम्ही गेलो तो अरुणोदयाचे सुमारास सत्यवतीनेही सत्पुत्रास जन्म दिला ही संतोषजनक बातमी आपणास सांगण्यास ऋषींनी आम्हास वस्त्रालंकार वगैरे देऊन पाठविलेचे कळविले ही शुभवार्ता ऐकून कमलाक्षी राणी अत्यंत संतुष्ट झाली. पुढे बारावे दिवशी गाधिराजाने आपल्या आज्ञेने सर्व शहर तोरणादिकांनी अलंकृत करविले व श्री दुर्गादेवीची कुंकुमादिनी पूजा केली आणि रत्‍नखचित अशा पाळण्यात मुलास निजवून सुवासिनींच्याकडून मंगलगीते गात मुलास ’विश्वामित्र’ असे नाव ठेवविले आणि त्यांचा यथोचित सत्कार करून त्यांना परत पाठविले. त्याचप्रमाणे सिद्धाचलावरही रुचिकमुनींनी बारावे दिवशी दर्भानी अलंकृत अशा पाळण्यात अदितिदेवीच्या तपाची ज्वाला स्वीकारलेल्या व शिवांशभूत अशा आपल्या मुलास निजवून, ऋषिपत्‍नीच्याकडून मंगलगीत गात गात मुलास ’जमदग्नि’ असे नाव ठेवविले. इकडे क्षत्रिय राजांच्या त्रासास व क्रूर कृत्यास कंटाळून काश्मीर देशाच्या भागावर राज्य करीत असलेल्या रेणुक राजास गाधिराजाने आपली कान्यकुंज राजधानी सर्व प्रजेला कळवून, संतोषाने देऊन टाकली व आपणास पाहिजे तेवढे द्रव्य घेऊन पत्‍नी, पुत्र व काही सेवकांसह तेथून निघून तो केदारेश्वरास आला. विश्वामित्र तेथे असलेल्या ऋषीवर्यांच्या सेवेत तत्पर राहून व योगानुष्ठानाचे उच्च शिक्षण संपादून च्यवनभार्गवांनी अनुग्रह केलेल्या चरुप्रासादाच्या अंशाने ब्राह्मण म्हणून प्रसिद्ध झाला अशी ही कथा सूत ऋषींनी शौनकादिकास सांगितली. दुसरा अध्याय समाप्त

+21 प्रतिक्रिया 2 कॉमेंट्स • 4 शेयर
A.G. JOSHI Aug 21, 2019

+35 प्रतिक्रिया 4 कॉमेंट्स • 47 शेयर
A.G. JOSHI Aug 20, 2019

💐 || सुमंगल सुप्रभात || 💐 🌞 दिन विशेष इसवी सन २०१९- २० अॉगष्ट शालिवाहन शक १९४१ विक्रम संवत २०७५ भा. रा. २९ श्रावण (५) १९४१ युगाब्द ५१२१ संवत्सर नाम: विकारी अयन : दक्षिणायण ऋतु : वर्षा मास: श्रावण पक्ष : कृष्ण तिथी : पंचमी वार : मंगळवार नक्षत्र : रेवती राशी : मीन *प.पू. टेंबेस्वामी (वासुदेवानंद सरस्वती महाराज) जयंती* *राष्ट्रीय सद् भावना दिवस* *अक्षय ऊर्जा दिन* जागतिक मच्छर दिन १६६६  शिवाजीराजांनी दख्खनेमधे येण्यासाठी नरवीर घाटी हे ठाणे खोटे दस्तऐवज दाखवून ओलांडले. १८२८: राजाराममोहन रॉय, द्वारकानाथ टागोर, कालिनाथ रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. १८९७: सर रोनाल्ड रॉस यांनी भारतात हिवतापाच्या जिवाणूचा शोध लावला. १९२०: डेट्रॉइट,मिशिगन येथे जगातील पहिले व्यावसायिक नभोवाणी केंद्र 8MK (सध्याचे WWJ) सुरू झाले. १९९५ : फिरोजाबाद रेल्वे अपघातात २५८ लोक ठार अनेक जखमी जन्मदिवस १९४४: राजीव गांधी १९४६: एन. आर. नारायण मूर्ती, इन्फोसिसचे सह संस्थापक मृत्यूदिन १९८४: रघुवीर भोपळे तथा सुप्रसिद्ध जादूगार रघुवीर १९८६ : हरचरणसिंह लोंगोवाल, अकाली दलाचे अध्यक्ष २०१३ : डॉ. नरेंद्र दाभोळकर, अंनिसचे संस्थापक २०१३ : जयंत साळगांवकर, ज्योतिर्भास्कर, काल निर्णयचे संस्थापक, लेखक, उद्योजक २०१४: बी. के. अय्यंगार, सुप्रसिद्ध योगाचार्य ।। दास-वाणी ।। बीज फोडुन आणलें मना । तेथें फळ तों दिसेना । वाढत वाढत पुढें नाना । फळें येती ।। फळ फोडितां बीज दिसे । बीज फोडितां फळ नसे । तैसा विचार असे । पिंडब्रह्मांडीं ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १७/०२/१३-१४ कोणतेही बी फोडून अगदी बारकाईने निरखून पहा. त्यामधे त्याचे फळ कधीच दिसत नाही. मात्र तेच बीज एकदा रूजले, वाढले की फांदी फांदीवर शेकडो फळे लागलेली दिसतात. ते फळ फोडले तर आत पुष्कळ बिया दिसतात. परंतु प्रत्येक बी जरी फोडले तरी त्यामधे एकही फळ दिसत नाही. पिंडब्रह्मांडातही अशीच स्थिती आढळते. ब्रह्मांडरूपी फळामधे असंख्य पिंड असतात. मात्र एकाही पिंडामधे ब्रह्मांड दिसत नाही. म्हणजेच बी मधे फळ दिसत नाही. इथे फल बीज दृष्टांतरूपाने पिंडब्रह्मांड न्याय सांगितलाय. शिवशक्तीनिरूपण समास. 🙏 💐💐💐💐💐 🙏

+7 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 2 शेयर
A.G. JOSHI Aug 20, 2019

🌹 *संस्कृत आरती* 🌹 *आरती मारुतीची* जयदेव जयदेव मारुतिवरधीरा । आरति तव पदकमले भवतु मम सुधीरा ॥धृ०॥ अंजनिपुत्रं वन्दे वन्दे हरिवीरं । वन्दे वायुसुतं तं वन्दे रणधीरं । श्रीरामचन्द्रसीताशोकहरं शूरं । वन्दे शिवावतारं स्वभक्तसुखकारं ॥१॥ समुद्रतरणं लंकादहनं येन कृतं । इंद्रजिताध्वरहरणं कृतिना येन कृतं । सौमित्रिजीवनार्थं द्रोणगिरिं नीतं । वन्दे तं भगवन्तं हरिकुलहरिभक्तम् ॥२॥ अहिरावर्णमहिरावणरावणकुलनाशं । कृत्वा श्रीरामपदं घ्यात्वा भवनाशं । मत्वा श्रीरामंहृदं पाटितभुवनाशं । वन्दे तं हनुमन्तं स्वजनार्तिविनाशत् ॥३॥ यन्नाम्ना भवतरणं दुर्जनभयहरणं । असुरविषार्तिसुहरणं संसृतिहृज्ज्ञानं । भजकमनोरथपूर्णं धृतनामसुनामन् । वन्दे सुखाब्धिमग्नं नृसिंहयतिधीनम् ॥४॥ *संकलन :- अशोककाका कुलकर्णी*

+26 प्रतिक्रिया 8 कॉमेंट्स • 25 शेयर
A.G. JOSHI Aug 20, 2019

*✍🏼श्री रेणुका देवी महात्म्य १/.* 🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚 अध्याय १ सद्‌गुरुं प्रथमं वंदे । शंकरं तदनंतरे ॥ इष्टार्थ सिद्धये देवी । निर्विघ्नाय विनायकम्‌ ॥ पंचवर्ण महासूत्र । सांप्रदाय प्रर्वतकम्‌ ॥ पूवल्लि सिद्धचैतन्य । प्रणमामि गुरुं परम्‌ ॥ श्री जगदंबा रेणुकादेवीस नमस्कार पुण्याश्रम अशा आपल्या भरतभूमीत सर्व ऋषिपुंगवाचे मूलस्थान असे नैमिष्यारण्य नामक एक पवित्र स्थान प्रसिद्ध होते. या अरण्यात सर्वत्र शांतता नांदावी म्हणून सर्व देवताप्रीत्यर्थ शांति होमादि पुण्यकर्मे करीत असलेले ऋषि जपतपादि कार्यात मग्न असता, त्यांचे मनोरथ पूर्ण करण्याकरिता वेदव्यासाचे श्रेष्ठ शिष्य सूतमुनि तेथे आके. शौनकादि मुनींनी त्यांना साष्टांग नमस्कार केला व ते त्यांना म्हणाले, "स्वामी, केवळ आमच्या पुण्याईनेच आज आम्हास आपले दर्शन झाले. १८ पुराणे रचून लोकोद्धारक झालेल्या वेदव्यासांचे आपण शिष्य आहात, तेव्हा आपले माहात्म्य आम्ही काय वर्णन करू शकणार?" आपण अनुग्रह करुन येथवर आम्हास उपदेशिलेल्या नित्यानंद परिपूर्ण परज्योति परमात्म्याकडून निर्मिलेल्या व चराचर प्रपंच स्थितीस कारणीभूत झालेल्या श्री नारायणाच्या दशावतारापैकी मत्स्य-कूर्म-नरसिंह-वामन आदि पाच अवतारांच्या कथा ऐकून आम्ही धन्य झालो. आता पुढील परशुरामाच्या अवतारांची सविस्तर कथा आम्हास सांगावी अशी विनंती आहे. "त्यावर सूतमुनी म्हणाले, "हे सद्‌भक्तिनिरत शौनकादि मुनिगणहो ! तुमची इच्छा तृप्त करुन तुमच्या मनास आनंद देणे हे माझे आद्य कर्तव्य आहे. अत्यंत प्रबल अशा परशुरामाच्या अवताराची कथा सांगतो. कश्यप ब्रह्माची पत्‍नी अदितिदेवी ही श्रीशंकराच्या वरप्रसादाने अयोनिज होऊन तिने भूमिवर यज्ञकुंडात जन्म घेतला व जगदंबा-एकवीरा-रेणुकादेवी अशी नावे घेतली आणि पतीच्या अनुगह प्रसादाने तिच्या ठिकाणी उत्पन्न झालेल्या श्री परशुरामाने दुष्ट क्षत्रियांच्या संहार करून भूभार हलका केला. या मातेचे माहात्म्य श्रवण केल्याने परशुरामाचे संपूर्ण चरित्र स्पष्ट समजणार आहे." हे ऐकून शौनकादि मुनि म्हणाले, "हे सूत मुनि हो ! आम्ही आपल्या आज्ञेप्रमाणे एकचित्तान त्या देवीचे चरित्र श्रवन करतो, तरी आपण ते आम्हास सांगावे "सूत म्हणाले, "शौनकादि ऋषिगणहो ! सर्व संपत्तीचे माहेरघर असलेल्या हस्तीनावती नगरात, भारतीय युद्धांतून मोकळा झालेला धर्मराजा आपणास कष्ट दिलेल्या धृतराष्ट्र गांधारीचेही अत्यंत भक्तिपूर्वक रक्षण करीत धर्माने राज्य करीत होता. या त्याच्या राज्यकारभारातील वैशिष्ठ्याने धर्मास ग्लानी न येता वेळोवेळी पाऊस पडून सर्व प्रकारची धान्याची समृद्धि होती व साधु-सत्पुरुष कोणत्याही प्रकारचा भेदभाव न मानता निष्ठेने आपल्या नित्यनैमित्तिक कर्माचे यथाविध आचरण करून सुखाने रहात होते. सर्व संपत्ति येथील प्रजाजनांना सोडून न जाता जणू काय त्यांच्या आश्रयालाच येऊन राहिली होती अशी स्थिती असता मैत्रेयी मुनींचा सदुपदेश घेतलेले धर्मराजाचे चुलते विदुर एकदा हस्तिनावतीस आले. विदुरांचे यथोचित स्वागत करून व त्यांना साष्टांग नमस्कार करून धर्मराजा म्हणाला, "काका तुम्ही सर्व क्षेम आहात ना? आम्ही आजपावेतो आपल्या अनुग्रहास पात होऊन सुखरुप आहोत." हे ऐकून विदुर मुनि धर्मराजास आशीर्वाद देऊन म्हणाले "धर्मराजा तू तुझ्या सद्‌वर्तनाने ख्याति पावला आहेस व तू धन्य आहेस." नंतर त्यांनी आपल्या ठिकाणी परिपूर्णत्वाने वास करीत असलेले नैतिक विचारही धर्मराजास सांगितले. त्यावेळी तेथेच असलेल्या भीम-अर्जुन-नकुल-सहदेव-द्रौपदी वगैरेनी विदुर मुनीचे सत्कारपूर्वक आदरातिथ्य करून त्यांना संतुष्ट केले. नंतर विदुर मुनि तेथेच रहात असलेल्या धृतराष्ट्राचे दर्शन घेण्याकरिता गेले व त्यास ते साष्टांग नमस्कार करून तत्वोपदेश करीत म्हणाले, "धृतराष्ट्रा तुझा वृद्धापकाळ झाला असताही तुझी प्राणाची आशा सुटेना; तसाच तुझा देहाभिमान व राज्यलोभही तुला अद्याप सोडवेना तुझे सारे पुत्र मरुन तू आपल्या आप्तेष्टांच्या हाती सापडलास, तरीही तुला अद्याप वैराग्य कसे आले नाही याचेच मला आश्चर्य वाटत आहे. हे पहा, तुम्ही नाना तर्‍हेचे कष्ट दिलेले धर्म-भीम-अर्जुन-द्रौपदी यांनी ते विसरून तुझे व गांधारीचे अत्यंत भक्तिने पालन केले आहे. हे पाहिले म्हणजे तेच धन्य व पुण्यवान होत. त्यांनाच पुढे सद्‌गति मिळणार आहे. त्यांची माता कुंतिदेवी हिचा महिमा वर्णन करणे आदिशेषासही शक्य नाही. मग मी तिचे अधिक काय वर्णन करणार ? हे विदुराचे हितवचन ऐकून गांधारी व धृतराष्ट्र विदुरासमवेत निघाले व विदुरांचे गुरु, मैत्रेयी मुनि यांचे दर्शन घेऊन. त्यांनी गंगा, भागिरथी इत्यादि नद्यांच्या त्रिवेणी संगमात स्नान केले आणि विषय पराङमुख होऊन परमेश्वर चरणी मन लावून मोक्षाची अपेक्षा करीत जपतपादी करू लागले. त्यांच्या वियोगाने व्यथित झालेले धर्मराज, विदुर काका, गांधारी, धृतराष्ट्रांसह आपणास न सांगता कोठे निघून गेले ? आपली काही चूक झाली नाहीना? अशा प्रकारे चिंता करू लागले. इतक्यात त्रिकालज्ञानी नारद तातडीने तेथे आले व त्यांनी गांधारी, धृतराष्ट्र विदुर वगैरेंची क्षेमकुशल धर्मराजास कळवून त्याची चिंता दूर केली. धर्मराजा संतुष्ट होऊन आनंदाने काही दिवस राज्यकारभार पाहू लागला. त्यावेळी द्वापार युगाचा शेवट व कलियुगाचा आरंभ काल आला हे जाणून श्रीकृष्णाने अर्जुनास बोलावणे पाठविले व त्यास आधीच उपदेशिलेल्या गीतारहस्याचे स्मरण करून दिले आणि म्हणाले की, "अर्जुना, जन्मलेल्याला मरण हे निश्चित आहेच, त्याप्रमाणे मी आता देह विसर्जन करणार आहे. तर तुम्ही सर्वांनी त्याचा नातू परीक्षित याजवर राज्यकारभार सोपवून शिवसायुज्य पद मिळवावे" असा उपदेश करून श्रीकृष्णाने देहत्याग केला. इकडे हस्तिनापुरीत धर्मराजा आपली आई कुंतिदेवी हिला बोलावून नमस्कार करून म्हणाला, "आई द्वारकेस गेलेला अर्जुन आला नाही याचे कारण काही कळत नाही माझ्या शरीराचा डावा भाग सारखा स्फुरण पावत आहे’ कोल्हे पूर्व दिशेकडे तोंड करून ओरडत आहेत; वरचेवर भूकंपाच्या बातम्या कानी येत आहेत’ गाई उलट बाजूने मला प्रदक्षिणा घालीत आहेत; या सर्व अनिष्ट गोष्टींच्या सूचनांवरून पाहता यापूर्वीच नारद मुनीनी मला श्रीकृष्ण देह विसर्जन करणार आहेत असे सांगितले होते ते खरे झाले असावे असे वाटते. काहीही असो, आतापर्यंत तरी द्वारकेकडील काहीच बातमी कळाली नाही. यास उपाय काय योजवा याचीच मला चिंता लागली आहे. यावर कुंतिदेवी धर्मराजास म्हणाली, बाळ, अर्जुन लवकरच परत येईल, त्याची चिंता तू सोड व निष्ठापूर्वक तुझ्या नित्यनैमित्तिक पूजोपचारादि कार्यास लाग’ यावर धर्मराजाने आपल्या आईच्या आज्ञेप्रमाणे पूजा वगैरे आटोपली व साधु-सत्पुरुषांची इच्छा नेहमीप्रमाणे तृप्त करून थोडा वेळ जातो न जातो इतक्यात द्वारकेहून आलेला अर्जुन धर्मराजास नमस्कार करून म्लान मुखाने त्याचे समोर उभा राहिला. अर्जुनाचे खिन्नवदन पाहून धर्मराजा त्यास म्हणाला, "अर्जुना तुझा चेहरा दुःख व्याप्त दिसतो, का बरे?" द्वारकेकडे सर्व क्षेम आहे ना?" इतके बोलण्याचाच अवकाश, अर्जुन जवळच असलेल्या आपल्या आईच्या पाया पडून. "आई श्रीकृष्ण आम्हाला सोडून गेले" असे म्हणून दुःखाने धरणीवर गडबडा लोळू लागला हे पाहून कुंतिदेवी, धर्म, भीम, नकुल, सहदेव, द्रौपदी सर्वजण अत्यंत दुःखीत होऊन शोकसागरात बुडून गेली. ही बातमी नगरात पसरताच सर्व लोक दुःखाने व्याकूळ होऊन धर्मराजाकडे सांत्वनासाठी येऊ लागले. धर्मराजा हे सर्व दुःख सहन करून शांत चित्ताने अर्जुनास म्हणाला, ’अर्जुना ऊठ ! आजपर्यंतचा आमचा भाग्योदय केवळ श्रीकृष्णामुळेच झाला. त्याचा वियोग झाल्यावर आम्ही जगावयाचे तरी कशासाठी ? आम्ही स्वर्गवासी व्हावे हेच बरे. आता कलिप्रवेशाचा काल आला आहे. या कलीचे सोबत काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर यांचा संहार जोरात सुरू आहे ? आता आम्ही विलंब कशासाठी करावयाचा ? परिक्षितास सिंहासनावर बसवून त्याचेवर राज्यकारभार सोपवून पुढील आमच्या सद्‌गतीच्या मार्गास आम्ही लागावे हे बरे" हे धर्मराजाचे बोलणे ऐकून तेथे जमलेले सर्व लोक जगदीशाचे ध्यान करण्यात तत्परतेने लागले असे सूत मुनींनी शौनकादि ऋषींनी सांगितले. वेदव्यासांचे हस्तिनावतीस आगमन सूत - शौनकादि ऋषिगणहो ! कृष्णाच्या वियोगाने धर्म-अर्जुनादि दुःखित झाले आहेत हे जाणून वेदव्यास हस्तिनावतीस आले व त्यांनी धर्मराजाची भेट घेतली. वेदव्यासांच्या आगमनाने सर्वजण आपले दुःख विसरले व त्यांनी वेदव्यांसाना नमस्कार केला, धर्मराज वेदव्यासांना यथोचित आसनावर बसवून व त्यांच्यापुढे हात जोडून नमस्कार करून म्हणाला, "ऋषिवर्य ! श्रीकृष्ण आम्हाला सोडून गेले" त्यावर व्यास म्हणाले, "हे धर्मनिष्ट राजा ऐक. परंज्योति परब्रह्माच्या इच्छामात्रेकरून उत्पन्न झालेल्या शक्तिपासून सत्त्व-रज-तम हे तीन गुण उदभवले. या तीन गुणांचे आधिदैवत ब्रह्म-विष्णु-महेश्वर हे जगाची उत्पत्ति, स्थिति आणि लय करीत आहेत. त्या परवस्तूस शैव शंकर, वैष्णव, विष्णु, शक्ति, आदिशक्ति, गाणपत्य, गणपति व सौर सूर्य म्हणुन आपापल्या आवडीप्रमाणे नावे ठेवून त्या त्या देवतांची उपासना करीत आहेत. तरीही "एको देव परब्रह्म" म्हणून सकल श्रुति-स्मृति वेदागम (तो परब्रह्म एकच आहे) म्हणतात, त्या परवस्तुच्या सारांशापासून श्रीनारायण जगाचे रक्षण करण्यास समर्थ होऊन दुष्टांचा संहार व शिष्टाचे परिपालन करण्याकरिता दहा अवतार घेण्यास झाला आहे. यानंतर तू तुझ्या परिवारासमवेत तेथून निघून तीर्थयात्रा करीत शिवसाक्षात्कार करून घेऊन कैवल्यपद प्राप्त करून घे सांगून त्याचे दुःख दूर करून आपण तपश्चर्येकरिता निघून गेले. मार्कंडेय मुनींनी धर्मराजास रेणुका (यल्लमा) देवीचे माहात्म्य सांगितले ती कथा- सूत - शौनकादि ऋषिगणहो ! मार्कंडेय ऋषि धर्मराजाकडे आले तेव्हा धर्मराजाने त्यांची अर्ध्यपाद्यांनी पूजा करून व्यास-महर्षींनी आपणास केलेला सदुपदेश त्यांना कळविला. मार्कंडेय मुनींनी त्यास संमती दिल्यावर धर्मराजाने परीक्षितास सिंहासनावर बसविले व त्याचेवर राज्यकारभार सोपवून व अतिथीस मनसोक्त दानधर्म करुन आपणा परिवारसहित धर्मराजा मार्कंडेय मुनींबरोबर तीर्थयात्रेस निघाला ! वाटेत लागलेल्या निरनिराळ्या तीर्थामध्ये स्नान करीत, त्या त्या तीर्थांचे महात्म्य श्रवण करीत, ऋषींच्या सांगण्याप्रमाणे ठिकठिकाणी धर्मराजाने दानधर्म केला. देवमंदिरांनी व गगनचुंबी वृक्षांनी युक्त अशा निबिड अरण्यांनी, त्याचप्रमाणे आकाशास भिडणार्‍या महामेरुपर्वताच्या नजीक असलेल्या तांबूस रंगाच्या पाण्याने शोभणार्‍या कुलिश नदीत स्नान करून. धर्मराजा किंचित हास्यमुखाने मुनीस म्हणाला, "मुनिराज या नदीचे पाणी असे तांबूस रंगाचे का हे कृपा करून मला सांगा !’ त्यावर मुनी म्हणाले, ’हे धर्मराजा, परशुरामाने आपल्या परशुने क्षत्रियांचा संहार केला व ते रक्तरंजित शस्त्र या नदीत धुतले त्यामुळे ही नदी रक्तवर्णाची झाली आहे व हिला कुलिशनदी हे नाव मिळाले आहे. "हे मार्कंडेय मुनींचे भाषण ऐकून धर्मराजा म्हणाला, "ऋषिवर्या, त्या परशुरामास क्षत्रियांचा संहार करण्याचा प्रसंग का प्राप्त झाला हे मला सांगावे." त्यावर ऋषि म्हणाले, धर्मराजा, परशुरामाचा बाप जमदग्नि यास क्षत्रिय कुलातील कार्तवीर्य याने ठार केले. त्यावेळी परशुरामाने आपला आजा रुचिकमुनि यांच्या अनुग्रहाने प्राप्त झालेल्या मंत्रोदकाने निरपराध अशा जमदग्नीस सजीव केले व रुचिकमुनींच्या आज्ञेप्रमाणे त्या कार्तवीर्यादि दुष्ट क्षत्रिय वंशाचा समूळ नाश केला. त्याच्या पराक्रमास त्याची आई जगदंबा रेणुकादेवी हिची कृपाच कारण असल्याने. या जगन्मातेवर श्रद्धा ठेवलेल्या सर्व भक्तांचे इष्ट मनोरथ परिपूर्ण होतात. या देवीच्या पुण्याश्रम अशा रामश्रृंग पर्वताचा महिमा तर प्रसिद्धच आहे." श्री मार्कंडेय मुनींनी पूर्वीच्या ऋषींकडून समजलेली रेणुकादेवीच्या माहात्म्याची कथा अत्यंत कळकळीने धर्मराजास निवेदन केली. तीच कथा मी आपणास सांगतो. तरी भक्तियुक्त अंतःकरणाने आपण श्रवण करावी असे सूत मुनींनी शौनकादि ऋषीस सांगितले. चक्रेशाची व नारायणाची ताटातूट सुत - हे शौनकादि ऋषिगणहो ! श्री नारायणानी मत्स्य-कूर्म-नरसिंह-वामनादि अवतार घेऊन दुष्ट राक्षसांचा संहार केला व ते सुष्ट अशा देवतांवर अनुग्रह करून शांततेने क्षीरसमुद्रावर श्रीलक्ष्मीसमवेत विश्रांती घेत होते. त्या आनंददायकसमयी, श्रीलक्ष्मी-नारायणांचा विनोद चालला होता. श्रीनारायण लक्ष्मीस म्हणाले, देवदानव व साधुसत्पुरुषांना कंटकप्राय होऊन भारी त्रास देत असलेल्या दुष्ट राक्षसांचा संहार करुन सर्वत्र शांतता प्रस्थापित केल्याचे श्रेय माझ्याशिवाय दुसर्‍या कोणालाही नाही हे तुला माहीत आहेच. म्हणून मी या बाबतीत जास्त काही सांगत नाही. असे हात वर करून श्री नारायण सांगत असता, नारायणांनी हातात धारण केलेला चक्रराज त्यांस म्हणाला की, "नारायण ! श्री शंकरास प्रसन्न करून घेऊन राक्षसांच्या नाशाकरिता तुम्ही मला मिळविले व माझ्या सहाय्याने तुम्ही राक्षसांचा संहार केला आणि जगद्‌विख्यात झालात हे सर्व विसरून तुम्ही देवीसमोर बढाई मारत आहात हे तुम्हास शोभते तरी कसे ? ही सर्व हकीकत त्रैलोक्यातही प्रसिद्ध आहे. हे तर राहू दे. एवढ्यावरच काही झाले नाही. श्री नारायणा ! यानंतर तुमच्यावर यापेक्षाहि खडतर प्रसंग येणार आहेत. त्यावेळी मात्र आम्ही दोघांचा पराक्रम विशेष प्रसिद्धीस येईल" असे चक्रराज मोठ्या धिटाईने म्हणाले. त्यावर नारायण म्हणाला, बरे तर, तसेच होऊ दे; पाहू आता तू मला सोडून ताबडतोब निघून जा. असे म्हणून त्यांनी आपल्याजवळील चक्र वेगळे केले. चक्रराज खाली उतरुन येउन म्हणाला, "नारायणा, मी येथे एक क्षणभरही न थांबता भूलोकी जाणार आहे तेव्या हा माझा आपण शेवटचाच नमस्कार घ्यावा.’ एवढे बोलून चक्रराज दुसरीकडे निघाले. अशी ही कथा सूत मुनींनी शौनकादि ऋषींना सांगितली आणि ते पुढे म्हणाले, शौनकादि ऋषिगणहो ! नर्मदानदी या काठी महिष्वती नामक एक वैभवसंपन्न नगर होते. त्या नगरीचा क्षत्रिय राजा क्रतुवीर आपल्या धर्मपत्‍नी राकादेवी समवेत गुरु शुक्राचार्याचे अनुज्ञेप्रमाणे राज्यकारभार चालवित प्रख्यात झाला होता. असे असता पौर्णिमेच्या चंद्रास थोडा काळसर डाग दिसून यावा त्याप्रमाणे या राजास पुत्र नसल्याची चिंता दिवसेंदिवस जाणवू लागली. ’पुत्रदुःखश्च नारीणां अशस्त्रवधमुच्येत" या वाक्याप्रमाणे राकावती राणी दिवसेंदिवस अत्यंत कृश होऊ लागली, तिचे पूर्वीचे लावण्य लुप्त झाले; हंसपक्षाप्रमाणे असणारी तिची चालण्याची ढबही नाहीशी झाली. ही गोष्ट क्रतुराजास कळून येताच तोही चिंतातूर होऊन राज्यकारभाराकडे दुर्लक्श करू लागला. दिवसेंदिवस या राजदंपतीच्या चिंताग्नीची झळ गुरु शुक्राचार्यांपर्यंत जाऊन पोचली. त्यामुळे शुक्राचार्य तातडीने महिष्वतीस आले व त्यांनी राजदंपतीस-दर्शन दिले. राजा-राणींनी गुरुंना आपली चिंता निवेदन केली व भक्तिभावाने आणि वैभवोपचाराने गुरुची पाद्यपूजा करून अतिथि अभ्यासगतांना अन्नवस्त्रादि दाने देऊन त्यांची स्तुति केली. राजाच्या सत्काराने प्राप्त झालेल्या शुक्राचार्यांनी राजाराणीची पुत्रविषयक चिंता जाणून राकावती राणीस आपल्या सान्निध्य बोलावले व म्हणाले, "मुली तू गुरुदत्तात्रेयांच्या कृपेने वीरपुत्र प्रसवशील. तरी चिंता न करिता माझ्या श्रद्धावर विश्वास ठेवून सुखाने रहा. ही शुक्राचार्यांची अमृतवाणी ऐकून राणी राकावती आनंदित झाली व शुक्राचार्यांना म्हणाली, गुरुवर्य, आपण सांगितलेल्या पुत्रोत्पतीकरिता मी काही व्रत वगैरे आचरण करावयास हवे का?" यास शुक्राचार्य म्हणाले, "मुली, या करिता काही महान्‌ व्रत करणेची आवश्यकता नाही." तू उझ्या शरीर धर्माप्रमाणे प्रत्येक महिन्यास बाहेर बसतेसच. त्यावेळी ऋतूसूतक शुद्धीनंतर पाचवे दिवशी तू तुमच्या राजनियमाप्रमाणे दिवसा तुझ्या पतीशी पुत्रप्राप्तीकरीता समागम कर म्हणजे तुझी मनःकामना पूर्ण होईल, अशाप्रकारे गुप्त रीतीने सूचना देऊन व राजाराणीस आशीर्वाद देऊन गुरु शुक्राचार्य आपल्या शिष्यपरिवारासह आश्रमास परत आले. पुढे काही दिवस गेल्यानंतर राकावती राणीचे पापच जणू बाहेर पडले आहे असे वाटण्यासारखी ती ऋतुमति झाली सूतकाचे दिवस झाल्यावर, ते लाभ्यगदि स्नान करून, नित्यकर्माचे आचरण करून व पंचामृताचे भोजन करून राजाराणी तृप्त झाली व ऋतुवीर राजा राज्यकारभाराकरिता दरबारात गेला इकडे राकावती राणी आपल्या विश्रांतीगृहात गुरुध्यानात आपल्या पतीची मार्गप्रतीक्षा करीत विवश होऊन बसली. यावेळी क्रतुवीर राजास राजकारभाराचे काम फार पडल्यामुळे त्यास ते सर्व उरकून घेऊन राकावतीचे मंदिरात येण्यास उशीर झाला हे जाणून गर्भधारणेसाठी आतुर झालेली राकावती राणी बाहेर येऊन पाहते तो सूर्यास्ताचा समय होत आला. तेव्हा राणी तेथे न थांबता आपल्या विलास मंदिरात आली व तेथील दोर्‍यास तिने स्पर्श केला. त्या स्पर्शाने उत्पत झालेला घंटानाद क्रतुवीर राजाला बसल्या ठिकाणी ऐकू आला. तो नाद ऐकताच पुढील सर्व कामे मंत्र्यावर सोपवून क्रतुवीर राजा तातडीने राणीचे विलास मंदिरात आला. त्यास पाहून राणीस परमानंद झाला. राजाने तिची रतिविलास मुखमुद्रा पाहिली. तेव्हा राकावती राणी राजास म्हणाली, ’प्रणेशा, गुरु शुक्राचार्यांनीआजच्या या वेळेस आपणाकडून गर्भदान करून घ्यावे अशी आज्ञा केली आहे. या करिता मी अत्यंत उत्सुकतेने आपल्या आगमनाची मार्गप्रतीक्षा करीत बसले आहे. पण आपणास येणेस विलंब होत आहे हे जाणून मी शीघ्र येणेबद्दल आपणास सूचना केली." राजाराणीस आलिंगन देऊन म्हणाला, ’प्रिये आज दरबारात राजकारणाची कामे फार होती म्हणून मला येणेस विलंब झाला. मी तरी काय करणार ? सायंकाळची वेळ झाली. पहा राकावती हा काल समागमास उचित नव्हे हे तू जाणतेसच.’ यावर राकावती म्हणाली, ’प्राणप्रिया, गुरुवाक्याचा भंग येईल ना? यावेळी आपण विशेष विचार करण्यात वेळ न घालविता लवकर गर्भदान करावे.’ हे ऐकून राजाने गुरुचे ध्यान करून राणीची इच्छा तृप्त केली. या योगे दोघेही संतुष्ट झाले व स्नान, पूजा-भोजनाने तृप्त होऊन गुरुचे ध्यान करीत निद्रावश झाले. चक्रच कार्तवीर्याजुन म्हणून जन्मले ती रात्र निद्रानंदात घालविल्यावर अरुणोदयाचे वेळी पांढरा घोडा, शंख व पूर्णचंद्राचे दर्शन होऊन जाई, मल्लिका (मोगरा), पुन्नाग, सोनचाफा वगैरे सुगंधि पत्रि-पुष्पांनी व धूप, दीप, कर्पूर इत्यादि मंगलद्रव्यांनी गुरुपादपूजा केल्याचे राकावती राणीस स्वप्न पडले आणि त्याचवेळी आकाशातून वीज गर्जल्याप्रमाणे आवाज होऊन एक चक्र राकावती राणीने नेसलेल्या पीतांबराचे ओटीत येऊन पडले, हे पाहून राणी जागी झाली व सभोवार आश्चर्याने पाहू लागली. या विलक्षण घटनेने मिश्र अशा स्वप्नाचे काय फल मिळणार आहे कोण जाणे ! असो, पण त्यावेळी मी गुरुपूजा करीत होते म्हणून हे शुभ चिन्हच समजले पाहिजे. आता मी कसलीच चिंता करणेचे कारण नाही अशी राकावती राणीने आपल्या मनाची समजूत करून घेतली व गुरुध्यानासक्त होऊन तिने ही स्वप्नाची हकीकत आपल्या पतीस कळविली. हे ऐकताच राजा म्हणाला, ’हे स्वप्न आम्हा उभयतास शुभप्रद आहे. गुरुशुक्राचार्यांचे आशीर्वादाने तुला शूर पुत्रच होणार हे निश्चित. पतीचे बोलणे ऐकून राणी संतुष्ट झाली व राजा आपल्या राज्यकारभाराचे कामाकरिता दरबारात गेला. पुढे १-२ महिने जाताच राणीचे मुखावर गर्भधारणेचे चिन्हे दिसू लागली व जसे दिवस जाऊ लागले तशी गर्भधारणा स्पष्टच झाली. क्रतुराज, त्याचे मांडलिक व प्रजाजन आनंदित झाली. पुढे राकावती राणीस पूर्ण नवमासभरताच कार्तिक कृष्ण ६ रविवारी, सायंकाळचे सुमारास हस्तरहित असा पुत्र राणीचे उदरी जन्मास आला. लागलीच ही बातमी सेवक लोकांनी राजास कळविली. त्यावर राजा खिन्न होऊन राणीचे मंदिरात आला व पुत्रांचे रूप नीटपणे पाहून राणीस म्हणाला प्रिय, असा अंगवैकल्याने-युक्त पुत्र आपणास झाला यात माझी काहीच चूक नसून, चूक तुझीच आहे. तू सायंकाळचे सुमारास अत्याग्रहाने माझेकडून गर्भधारणा करून घेतलीस. आता यास काय करावे? आमच्या पुत्र प्राप्तीच्या आकांक्षेचाच हा असा परिणाम झाला. असो; परमेश्वर कोपला तर गुरुच रक्षण करणार हे तर सर्वश्रुत आहेच. आमच्या पुत्राच्या अंगशुद्धीस मुख्य गुरुकृपाच पाहिजे. आता तू जास्त चिंता करू नकोस असे सांगून राजाने राणीचे समाधान केले. पुढे मुलास १२ वा दिवस लागण्याचे सुमारास ऋतुवीर राजाने गुरु शुक्राचार्यांना बोलावून घेतले व रत्‍नखचित पाळण्यात मुलास निजवून सुवासिनी स्त्रिया गीत गात असता गुरु शुक्राचार्यांना आपल्या मुलाचे नाव ठेवण्यास विनंती केली. शुक्राचार्यांनी राकावती राणीस आपल्या जवळ बोलावले व ते तिला म्हणाले, "महाराणी आपला पुत्र कार्तिक कृष्ण षष्ठी रविवार सूर्यास्ताचे सुमारास जन्मला आहे. म्हणून मी यास कार्तवीर्याजुन असे नाव ठेवणार आहे असे सांगून शुक्राचार्य पाळण्याजवळ आले व मनाने गुरु दत्तात्रेयांचे ध्यान करीत त्यांनी मुलास नाव ठेवून मुलाचे अंगावर आपला हात फिरवला आणि श्रीगुरु दत्तात्रयाचे अनुग्रहाने सर्वांग शुद्ध होऊन जगप्रसिद्ध हो असा त्यास आशीर्वद दिला. हे गुरु वाक्य ऐकून राजा-राणि व तेथे जमलेल्या सुवासिनींनी मंगल गीत गात जयजयकार केला. नंतर राजाने या मंगल कार्यास आलेल्या सर्व सुवासिनींना वस्त्राभरणे देवून पाठविले. दुसरे दिवशी गुरु शुक्राचार्यांनी राजा-राणीचे इच्छेप्रमाणे स्नान-पूजादि कामे आटपून त्यांचे आतिथ्य स्वीकारले व ते त्यांना म्हणाले. "हे राजा-तुम्हास हस्त हीन पुत्र झाल्याबद्दल चिंता करणेचे कारण नाही. गुरु दत्तात्रेयाचे कृपेने तुमचे सर्व मनोरथ सिद्धीस जातील. या मुलास ३-४ वर्ष संपताच तुम्ही त्याला घेऊन गुरु दत्तात्रेयाचे आश्रमास जावे व त्यांची पादसेवा घ्यावी. या योगे तुमची मनःकामना पूर्ण होईल असे राकावतीस सांगून आपण आपल्या आश्रमास जातो असे म्हणाले व "आता तुम्ही संतोषाने रहा" असा आशीर्वाद देऊन गुरु शुक्राचार्य आपल्या आश्रमास गेले. कार्तवोर्यार्जूनास घेऊन क्रतुवीर श्रीगुरु दत्तात्रेयाच्या आश्रमास गेले. सूत - शौनकादि मुनिगणहो ! कार्तवीर्याजून दिवसेंदिवस वाढू लागला व त्यास ४ थे वर्ष संपून ५ वे वर्ष लागताच राजाराणी गुरु शुक्राचार्यांचे आज्ञेप्रमाणे राजवैभवासमवेत श्री दत्तात्रेयाचे आश्रमास आले आपल्या शिष्यांकडून राजाराणीच्या आगमनाची बातमी ऐकून गुरु दत्तात्रेयांनी त्यांना आपल्याजवळ बोलावून घेतले. राजाराणींनी आपल्या पुत्रास गुरु दत्तात्रेयाचे पायावर घातले व नमस्कार करून आपला आशय त्यांना कळविला. ते ऐकून व त्यांचा क्षेम समाचार व कार्तवीर्यार्जूनाचे अंगशुद्धीची हकिकत समजुन घेऊन गुरु दत्तात्रेय म्हणाले, हे राजाराणि तुम्ही तुमच्या पुत्राच्या अंगशुद्धीबद्दल बिलकुल चिंता करू नये. हे गुरुवाक्य सत्य असे समजा. राकावती तू पुत्रासमवेत काही दिवस गुरुजवळ राहून गुरुसेवा कर. क्रतुराजा तू आजचा दिवस येथे रहा, व गुरुप्रसाद स्वीकारून उदईक प्रातःकाळी तुझे राज्यास जाण्याकरिता नीघ आणि तेथे जाऊन राज्यकारभार यथोचित कर. असा आशीर्वाद दिला. क्रतुवीर राजा त्याप्रमाणे आपल्या लोकांसह मदिष्वती नगरीस परत येऊन राज्यकारभार पाहू लागला. श्री गुरु दत्तात्रेयाचा महिमा जगप्रसिद्ध झाला ही कथा शौनकादि ऋषिगणहो ! भक्तश्रेष्ठ अशी राकावती राणी गुरु सेवेत काही वर्षे राहिल्यावर माघमासातील वाढत्या चंद्राचे वैभव पौर्णिमेस षोडश कलांनी युक्त होऊन अर्व जगास तेज देते त्याप्रमाणे कार्तवीर्यार्जूनास सहस्त्र बाहू उत्पन्न होऊन त्याच्या पराक्रमाचे तेज मुखावर झळकू लागले. हे पाहून राकावती राणी त्याचप्रमाणे तेथे असणारा शिष्यवर्ग या गुरु महिमेने आश्चर्यचकित झाला. अशा प्रकारे गुरुध्यानतत्पर असलेल्या राकावती राणीस कार्तवीर्य राजास बोलावणे पाठवून आपल्या राजधानीस परत जाण्याची इच्छा झाली. ही तिची इच्छा समजून घेऊन गुरु दत्तात्रेयांनी राकावतीस आपल्याजवळ येण्याची आज्ञा केली व ते तिला म्हणाले, "महाराणी, श्रीशंकराचे सुदर्शन चक्रच तुझा पुत्र अर्जुनी म्हणून तुझ्या उदरी आले आहे. त्याचे माहात्म्य मी काय वर्णन करू? हा अत्यंत बलाढ्य होऊन देवदानवांच्या शस्त्रास्त्रांना न भिता क्षत्रियकुल श्रेष्ठ होऊन आपल्या शौर्याने तिन्ही लोकात प्रख्यात ओईल. आता तु तुझ्या पुत्रासमवेत तुझ्या राजधानीस जा. तुझ्या पतीस या पूर्वीच येथे येण्याबद्दल आम्ही कळविले आहे, त्याप्रमाणे तोही आपल्या राजवैभवासहित थोड्याच कालात येथे येईल." हे गुरुचे वचन ऐकून राणी व कार्तवीर्याजुन काही वेळ तेथेच बसले. नंतर थोड्याच वेळात राजा अत्यंत वैभवाने गुरु दत्तात्रेयांचे सन्निध आला व त्यांना नमस्कार करून आणि आणलेली गुरुदक्षिणा पुढे ठेवून आपण तेथेच बसला. राकावती महाराणी पुत्रासह पुढे आली व गुरु दत्तात्रेयास व राजास नमस्कार करून बसली. सहस्त्र भुजांनीयुक्त व तेजस्वी अशा आपल्या अर्जुनी पुत्रास पाहून राजा आश्चर्यचकित झाला व मनामध्ये गुरुच्या माहात्म्याचे स्तवन करीत त्या दिवशी तेथेच राहिला. नंतर गुरुप्रसाद सेवन करून दुसरे दिवशी आपली राणी व पुत्र अर्जुनासह, परिवारासमवेत गुरुंना नमस्कार करून व गुरुचा निरोप घेऊन राजा नगरीस जाण्याकरिता निघाला. त्यावेळी गुरु दत्तात्रेयांनी अर्जुनीस आपणाजवळ बोलावले व त्याचे मस्तकावर आपला हात ठेवून ते त्यास म्हणाले, "हे अर्जुना, तू आईबापाची सेवा हीच गुरु-सेवा समाज-सेवा हीच ईश्वर सेवा असे समजून त्याप्रमाणे आचरण करीत जा. पुढे तुझ्यावर राज्याची जबाबदारी पडल्यावर तू लोककंटक अशा दुष्ट व दुर्जन लोकांच्या उपदेशास भुलू नकोस व देव-दानव आणि सत्पुरुष यांना कष्ट देऊ नकोस. तुझा पिता ऋतूवीर यांच्याप्रमाणे धर्माने राज्य चालीव म्हणजे तुला देव-दानव अगर इतर राजे लोकांच्या शस्त्रास्त्रांचे बिलकूल भय राहणार नाही. तूच पुढे क्षत्रिय कुलश्रेष्ठ होऊन पुष्कळ दिवस राज्य करशील. या आमच्या सदुपदेशाकडे किंचितही दुर्लक्ष करून तू वागलास तर तुझे समग्र क्षत्रिय कुलच तू अधोगतीत नेशील व दुष्कीर्तीस पात्र होशील." हे ऐकून अर्जुनाने गुरु दत्तात्रेयास साष्टांग नमस्कार केला व त्यांच्या सदुपदेशाप्रमाणे वागण्याचे वचन दिले. गुरुंनी केलेला उपदेश राजा-राणी व मंत्री वगैरेनी श्रवण केला व ते गुरूची स्तुती करीत म्हणाले, "गुरुवर्य अर्जुनास केलेला सद्‌बोध यासही योग्य आहे. यापुढेही यांजवर अशीच गुरुकृपा रहावी असे म्हणून सर्वांनी गुरुस नमस्कार केला, व तेथून निघून पल्लवतोरणांनी अलंऋत अशा महिष्वती नगरीस आले. यांच्या मार्गाकडे डोळे लावून बसलेले नागरिक स्त्री-पुरुष समारंभाने त्यांना सामोरे गेले. राजाराणी अर्जुनीसहित राजधानीत येऊन सिंहासनावर विराजमान झाले. जमलेल्या सर्व प्रजाजनांनी राजाराणीचे त्याचप्रमाणे सहस्त्रबाहूंनी शोभणार्‍या अर्जुनाचे दर्शन घेतले. अर्जुनास आशीर्वाद दिलेल्या गुरु दत्तात्रेयाचे ध्यान करीत सर्वजण आपापल्या स्नानास निघून गेले. पुढे काही दिवस लोटल्यावर अर्जुनाचा प्रभाव जिकडे तिकडे पसरू लागला हे पाहून क्रतुवीर राजाने सर्व लोकांना विदित होण्यासारखा आपला राज्यकारभार अर्जुनी पुत्रावर सोपविला आणि आपण गुरुसेवा-रत होऊन तीर्थाटनास निघाला. इकडे कार्तवीर्यार्जुन गुरु दत्तात्रेयांच्या अनुग्रहाने "अष्टदश महाद्वीप साम्राज्यमति" या नावाने प्रसिद्ध पावला, व कैदेत ठेवलेल्या दशकंठ रावणास पौलस्त्य ब्रह्मदेवाच्या आज्ञेने सोडून देवून माझ्यापेक्षा शूर वीर या त्रैलोक्यात कोणीच नाही. या दुरहंकाराने राज्यकारभार पाहू लागला; त्याच्यापुढे सर्व राजे सामर्थ्यहीन झाले." अशा प्रकारची कथा सूत मुनींनी शौनकादि ऋषीस सांगितली. पहिला अध्याय समाप्त

+21 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 15 शेयर