*एक सणसणीत चपराक* (सर्वांनी अवश्य वाचावे, ही विनंती 🙏🙏) *माणुसकी ,स्वच्छता , निस्वार्थीपणा , कुटुंब व्यवस्था , पैशांचा दुरुपयोग, व्यसनाधीन होणे, विलासीपणा , ऐषारामी जीवन , विनाकारण केले जाणारे प्रवास , देवस्थानांच वाढलेलं प्रस्थ , श्रीमंती , माजमस्ती , वडीलधाऱ्या सोबत उद्धटपणे बोलणे , सत्तालोलुपता , मग्रुरी , गुंडगिरी , जगण्याचा अर्थ , मरणाची भीती , केलेल्या वाईट कृत्यांची आठवण , समारंभात केलेला पैशांचा अपव्यय , निकृष्ट जीवन शैली , अशा अनेक गोष्टी शिकवायला आलेला हा एक संदेश आहे .* *पूर्वीच्या परंपरा विसरून आम्ही आधी तुळशीला घराबाहेर काढलं ! " त्याला काय होतंय ? " हा प्रश्न विचारणाऱ्या नवीन पिढीला हा चांगलाच झटका आहे !!! सकाळी शुचिर्भूत होणे ही संकल्पना हळू हळू लयास चालली होती . कधीतरी वाट्टेल तेव्हा अंथरुणातून उठून " शॉवर " खाली दोन मिनिटं उभे रहाणाऱ्या पिढीला , आता दोन दोन मिनिटाला हात धुवावे लागत आहेत . घरात, कापूर , उदबत्ती , देवापुढे दिवा ह्या सगळ्या गोष्टींना अंधश्रद्धेच्या सोईस्कर नावाने फाटा दिला गेला होता. आता त्याच कापरासाठी मॉल मध्ये लाईन लागलीय . संध्याकाळची उदबत्ती लावून म्हटलेली रामरक्षा ही वरदान ठरतेय . घरी आल्यावर आधी पायावर पाणी घेणारी आपली संस्कृती सोडून बुटासकट बेडवर झोपून , बूट मोजे काढून भिरकवणारे आता चांगलेच पोळले आहेत. धूप, दीप, नैवेद्य, आरतीमुळे प्रसन्न होणारं घरातलं वातावरण आता कमालीचं गढूळ झालं होतं. पुण्या-मुंबई सारख्या ठिकाणी तर " घरचं जेवण " लोक हळू हळू विसरत चालले होते. आता त्याची नितांत गरज भासतेय. उठलं की सुटलं,प्रत्येक सुट्टीला गाडी घेऊन पर्यटन हेच जीवन असं थोडं वाटायला लागलं होतं, त्यावर पण थोडा आळा बसेल. अंधश्रद्धेच्या नावाखाली आपणच आपल्या संस्कारांची दिलेली तिलांजली आता आपल्याच बोकांडी बसलीय . सणासुदीच्या रूपाने पूर्वजांनी केलेली रचना किती वेडगळ पणा आहे हे शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध करणारी पिढी आता त्या मार्गाचा अवलंब नक्की करेल असं वाटायला लागलय .* *शेवटी निसर्गापुढे सगळे सारखेच . रस्त्यावरच्या भिकाऱ्याला किंवा स्कॉर्पियोमधून फिरणाऱ्या श्रीमंताला " मास्क " बांधून फिरायची वेळ आलीय .* हे मानवा.......तू कितीही पुढारलास तरी शेवटी तुझ्या जगण्याची गुरू-किल्ली फक्त त्या नियंत्याकडेच आहे. त्यामुळे त्याचं स्मरण कर . *जैन मुनींनी तोंडाला फडकं बांधलेलं* *बघून हसणारे आज तेच करताहेत*. *फक्त त्यांचा उद्देश कीटक मरू नयेत हा होता* पण आज आपला उद्देश फक्त आपण जगावं हाच आहे. *पुराण ,ग्रंथ ,उपनिषदे यांच्यावरची धूळ झटका तरच हा झटका पचवण्याची ताकद तुमच्यात येईल. अन्यथा वडापाव, बर्गरच्या पिढीला असे कितीतरी कोरोना दर चार वर्षांनी झेलावे लागतील त्यासाठी.......*. *हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे ,* *आरोग्य दे , सर्वांना सुखात ,आनंदात , ऐश्वर्यात ठेव* जगावरील संकट टळून सर्वांना उदंड आयुष्य दे... *सर्वाचं भलं कर,कल्याण कर,रक्षण कर आणि तुझे गोड नाम सर्वांचे मुखात अखंड राहू दे* ही प्रार्थना 🙏 जयश्रीराम 🙏

+13 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 34 शेयर

+11 प्रतिक्रिया 2 कॉमेंट्स • 46 शेयर

+1 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 0 शेयर

#श्रीकृष्णउद्धवसंवाद प्रभू श्रीकृष्ण स्वर्गस्थ होण्याआधी काय हवे ते माग अशी विचारणा केल्यावर सखा उद्धवाने मनातली जे प्रश्न विचारले ते फार महत्वाचे वाटतात आणि त्यावर प्रभूंनी जी उत्तरं दिली ती त्याहून महत्वाची वाटतात. उद्धवाने प्रभु श्रीकृष्णाना प्रश्न विचारले "धर्मराज्य युधिष्ठीराना द्युत क्रीडा खेळू नका अस का नाही सांगितलंत? त्या उपर ही खेळायला बसल्यावर फासे जिंकून का दिले नाहीत? नारायणा, नशिबाचे फासे बदलणे हे तुमच्या दृष्टीने किती सहज साध्य किरकोळ गोष्ट ही ? तुम्ही तेव्हा ही अडवू शकत होतात जेव्हा पांडव धन, राज्य आणि स्वतःला ही हरवून बसलेले होते ? त्या राज्यसभेत तुमची सखी असलेल्या द्रौपदीचे हाल होत होते, अगदी वस्त्रहरण होण्यापर्यंतची वेळ आली.. अस का घडलं महाप्रभो! तुम्ही आधीच अडवलं का नाहित.. एवढं सगळं घडून ही तुम्ही सख्याचा धर्म पाळलात अस कस म्हणता? प्रभू उतरले प्रिय उद्धवा, हा सृष्टीचा नियम आहे की नेहमी विवेकवान च जिंकत असतो. त्या राज्यसभेत दुर्योधनाकडे विवेक होता आणि धर्मराजाकडे तो नव्हता आणि हेच त्या पराजयाच प्रमुख कारण झालं. राहिली गोष्ट दुर्योधनाची तर त्याच्याकडे द्युतक्रीडेकरता आवश्यक असलेल धन सामर्थ्य तर खूप होतं पण त्याला फासे टाकण्याचा खेळ खेळता येत नव्हता ही जाणिव ठेवून त्याने मामा शकुनीचा खेळासाठी वापर केला..जे सर्वथा उचित ही होतं. यालाच विवेक म्हणतात मित्रा.. जर धर्मराजानेही असाच विचार केला असता आणि मला त्यांच्या बाजूने खेळण्याच निमंत्रण दिलं असत तर मी त्याचा आनंदाने स्वीकार केला असता..मग विचार कर मित्रा मी आणि शकुनी अश्या लढतीत कोणाचा विजय झाला असता? फासे कोणाप्रमाणे वागले असते? कोणाच्या इच्छेबरहुकूम आकडे आले असते? असो, ते जाऊदे त्यांनी मला खेळात समाविष्ट नाही केलं ही काही मोठी चूक नव्हती पण त्यांची विवेकशून्यतेने अशी घोडचूक झाली की त्यांनीच मला विनंती केली की जोवर मला राज्यसभेत बोलवत नाहीत तो वर मी जाऊ नये कारण ते आपल्या दुर्भाग्याचा खेळ माझ्या नकळत खेळू इच्छित होते. द्युत वाईट आहे आणि पांडव द्युत खेळत आहोत हे मला कळू नये असं त्यांना वाटत होतं.. अश्या प्रकारे त्यांनीच मला त्यांच्या विनंतीत बांधून ठेवलं होतं. तरीही ही बाहेर वाट बघत होतो कोणी तरी मला बोलवेल, धर्मराजाच ठीक आहे,पण मी भीम अर्जुन,नकुल सहदेव सगळेच मला विसरले आणि केवळ स्वताच दुर्भाग्य आणि दुर्यीधनाला दोष देत होते. अगदी दुर्योधनाच्या आदेशाने दुशासनाने जेव्हा द्रौपदीचे केस ओढत राज्यसभेत आणलं तेव्हा तीसुद्धा तिच्या सामर्थ्यांनुसार स्वता प्रतिकार करत होती तेव्हा ही तिला माझी आठवण झाली नाही. तिची बुद्धी तेव्हा जागृत झाली जेव्हा दुशासनाने तीच वस्त्र हरण करायला सुरुवात केली होती. तेव्हा कुठं तिचा "मीपणा" संपला आणि हरी हरी अस धावा करायला सुरुवात केली.. तेव्हा कुठं त्यांनतर मला तीच संरक्षण करता आलं..माझी आठवण काढली त्याच क्षणी मी तिथं पोचून तिची सहाय्यता केली. आता तूच सांग उद्धवा यात माझी काय चूक होती.. मी काय करू शकत होतो.. तरीही समाधान न झाल्याने उद्धवाने प्रतिप्रश्न केला याचा अर्थ तर असा होतो की " बोलावल्याशिवाय तुम्ही येत नाही.. भक्त संकटात असताना तुम्हाला बोलावण्याची गरज पडावी का ? देवकीनंदन उत्तरले उद्धवा, या सृष्टीत प्रत्येकाचं आयुष्य हे त्याच्या कर्म फळाशीच बांधल गेलेलं आहे. ना मी ते चालवू शकतो किंवा ना मी त्यात काही हस्तक्षेप करू शकतो. मी तर नेहमीच साक्षीमात्र आहे आणि नेहमीच सोबत आहे. जे काही घडत असत त्याचा मी साक्षी असतोच हाच ईश्वराचा धर्म आहे. उद्धवाने पुन्हा प्रतिप्रश्न केला वाह प्रभू वाह ! याचा अर्थ असा झाला की तुम्ही नेहमीच आमच्या सन्निध असणार आणि आमची दुष्कर्म आणि पाप साक्षीभावाने बघत राहणार, आम्ही नेहमीच पापावर पाप करावीत, आमच्या हातून दुष्कर्म घडवीत हीच आपली इच्छा आहे काय? त्यावर प्रभू स्मित हास्याने उत्तरले हे उद्धवा, शब्दाचा योग्य अर्थ समजून घे. जेव्हा ही यथोचित जाणीव असेल की मी साक्षी भावाने प्रगट आहे तेव्हा कुणी पाप करू शकाल? दुष्कर्म करू शकेल का? चुका घडतील का? निश्चित नाही करणार कारण कोणतंही पाप , दुष्कर्म तुम्ही तेव्हाच करता जेव्हा तुम्हाला अस वाटू लागतं की तिथे भगवंताची उपस्थित नाही. त्यामुळे माझ्या नकळत तुम्ही काहीही करू शकता..आणि नेमक्या त्याच वेळी तुम्ही संकटात सापडता धर्मराजाची चूक ही झाली की त्यांना वाटलं की ते माझ्या आदेशाशिवाय द्युत खेळू शकतील आणि मला कळणार नाही. जर त्यांना ही जाणीव असती की प्रत्येक क्षणी, प्रत्येक घडी मी त्याच्या समक्ष साक्षी रूपातच आहे तर त्याचे परिणाम असे झाले असते का? काही वेगळे नसते झाले? उद्धव सदगदीत होऊन उत्तरले " हे जीवनदर्शन किती खोल आणि महान आहे" पूजापाठ आणि प्रार्थना करून देवाला प्रसन्न करून घेणं ही एक भावना आहे, हा एक विश्वास आहे पण ज्याक्षणी भगवंतसदैव साक्षीभावाने उपस्थित आहेत जाणीव होते की त्या वेळी खरोखरच अनुभवता येत की त्यांच्या इच्छेशिवाय पान ही हलू शकत नाही. आपण हे युद्ध श्रीकृष्ण मार्गदर्शनाशिवाय जिंकू शकत नाही हा विवेकविचार जागतिक कीर्तीचा बलाढ्य धनुर्धर असलेल्या अर्जुनाच्या मनात आला ज्याची परिणीती महाभारतच महाबलाढ्य युद्ध जिंकण्यात झाली तसाच विवेक तुम्हा आम्हा सर्वांच्या मनात येवो की सद्गुरूमार्गदर्शनाशिवाय हे आयुष्यच जिंकता येणार नाही आणि क्षणोक्षणी उपस्थित असलेल्या सद्गुरू उपस्थितीची जाणीव होवो, आयुष्यच फलित होवो हीच मालकांच्या चरणी प्रार्थना !! !!अवधुतचिंतन राजाधिराज योगीराज श्रीमंत सद्गुरु शंकरबाबा महाराज की जय !!

+20 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 26 शेयर

+14 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 33 शेयर

आजच्या काळातील सत्य !!!! *अति सुखाचा ओला दुष्काळ* *(लेखक प्रवीण दवणे)* .................................. *सुख पर्वताएवढं* सुख ! सुख ! सुख ! सर्व बाजूंनी सुखाचा नुसता पाऊस ! सुखाचा म्हणजे सुखी असल्याच्या आभासाचा ! कारण समाधानाचा तरंग अंतरंगापर्यंत पोचण्याआधीच— सुखाचं नवं रुप— नव्या ढंगात निमंत्रण देतच असतं. मग ते पूर्ण करण्यासाठी आटापिटा. *आपण जे सोसलं ते आपल्या पुढच्या पिढीला 'अगदी काहीही सोसावं ' लागू नये म्हणून बिचारी धावाधाव !* एखाद्या गोष्टीची अधीरतेनं वाट पाहणं, तिच्या अनिश्चिततेबद्दल झोके अनुभवणं...अनपेक्षिततेच्या काठावर जीवाचं काहूर उठणं आणि प्रतीक्षा मिसळलेल्या अश्रूंमध्ये सुखाचं अवचित येणं—यातली गंमत ही केवढी मजेशीर श्रीमंती असं हे सांगणं आवाक्याबाहेरचं आहे. आता दिवाळीआधीच करंजी, होळीआधीच कुठेही पुरणपोळी— मोहोर येण्याआधीच ताजा आमरस गल्लोगल्ली कुठेही हात जोडून तयार असतो.त्या—:त्या सणाची , रुचीची, गंधाची वाटच पाहावी लागत नाही. सगळं कसं *रेडी—मेड* ! वस्तूंबाबतचं जे तेच भावनांबाबत. पटकन कुणाशीही संवाद— कधीही, कुठेही दृष्टभेट— आवडतं गाणंही व्याकूळ न करता एका बटनात कानात गुंजतंय— यातून अंत:करणाचे तगमग संघर्ष हरपले न् त्याचा गंधही ! तीच मानसिकता नव्या पालकांची. मुलांच्या भविष्यातील सारा जीवनसंघर्ष आततायी प्रेमानं पालकांनीच संपवून टाकणं यासारखा दुसरा कुठला गुन्हा असेल असं वाटत नाही. *भविष्याची काळजी याचा अर्थ जगण्याचा गड चढण्याचे त्याचे मार्ग आपणच चढणं, हा नाही.* त्याला हेलिकाॅप्टरनं किल्ल्यावर सोडलं, तर रानवाटांचा अनवटपणा, खडकांचा रांगडेपणा आणि मधूनच वाहणार्‍या निर्झरणीची शीतलता त्याला कळणार कशी ? *अतिदारिद्र्याने काही पिढ्या संपल्या , आता अतिअति ऐश्वर्याचं नवंच दारिद्र्य दारात आलंय. ते दारिद्र्य प्रयत्नानं दुर्दम्य ध्यासानं संपवति तरी येत होतं, हे रत्नजडीत दारिद्र्य लाखो आयुष्याचा उष्ण कोवळा घास घेऊन संपणार ,असं दिसतंय.* केवळ लग्न झालं न् मूल झालं म्हणून ' पालक ' झालो, असं समजणार्‍या कोट्यवधी घरांत पुढे जिद्द हरवलेल्या तरुणाईचं मन ही मोठीच समस्या असणार आहे. अतिसुखाच्या ओल्या दुष्काळाचं सावट वेळीच कळलं तर..... अनेक घरांत ' मागितलं की द्या !' हा एककलमी कार्यक्रम असतो आणि मग ते नाही मिळालं की क्रौर्य कुठल्या थराला जाईल याचा नेम नसतो. केवळ ' बाईक ' एवढ्यात नको ;अठरा वर्षे पूर्ण होऊ दे,' असं सांगणार्‍या आजीला सतरा वर्षांचा नातू संपवतो,अशी बातमी येते तेव्हा दरदरुन घामच फुटतो. गायत्री मंत्र वहीत लिहीत बसलेली ती मी न पाहिलेली आजी माझ्या डोळ्यांसमोर येते.या आजीनं या नातवासाठी किती वेळा ऊन—ऊन जेवण केलं असेल, त्याची वाट पाहत ती जेवणासाठी थांबली असेल,आजारपणात रात्र रात्रभर जपमाळ घेऊन नातवाजवळ जागली असेल... त्या आजीला जीवे मारताना या सतरा वर्षांच्या मुलाला हे काहीच आठवलं नसेल? एवढी हिंस्त्रता एकाएकी येत नाही. आज नव्वद पंच्याण्णव टक्के घरांत या हिंस्त्रतेचा रियाज साग्रसंगीत करुन घेतला जात आहे. *ना घरात प्रार्थना ! ना घरात एखाद्या सामाजिक सेवेची साधना ! ना घरात ग्रंथवाचन ! ना पुस्तकाचं समृध्द कपाट ! ना व्याख्यानांना जाणं ! ना उत्तम संगीत ! फक्त संगणक, मोबाईल, व्हाँटसअप ते एसएमएस आणि रस्त्याच्या कडेला उभं राहून खाणं आणि हीसुध्दा नशा कमी म्हणून की काय, *मैत्रीची सरहद्द ओलांडणार्‍या मजेनं सर्वनाशाची पूर्वतयारी करणं !* *जीवनाची ओढ नाही म्हणून मरणाचं भय नाही !* जगलो काय न् मेलो काय, इतका बेफिकीरपणा वाढत चालला तर कुठली कर्माची महासत्ता येणार ? *आधी प्रतिष्ठापना हवी सुसंस्कृततेची, मानव्याची !* *संपूर्ण विकसित माणूसपणाची !* मुलांना त्यांचा झरा स्वत:हून शोधू द्या ! त्यांचे पंख त्यांना उघडू द्या ! तुमच्या पैशाची हेलिकाॅप्टर्स त्यांचे पंख दुबळे करतील ! उड्डाण तर ज्याचं त्यानंच करायचं असतं ! त्यांच्या जीवनात तहानेची चव मिसळू द्या ! त्यांच्या पंखात आकाशाची साद उसळू द्या ! त्यांच्या मुळातल्या कणखरतेनं — त्यांच्या फांदीवर त्यांचं फूल त्यांच्या गंधानं उमलू द्या . ...🙏🏻

+8 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 7 शेयर