+1 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 0 शेयर

+4 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 3 शेयर

+1 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 0 शेयर

🌹🌹 II श्री स्वामी समर्थ II 🌹🌹 *✳️विश्वकल्याणासाठी एक तास✳️* प. पू . गुरुमाऊली यांचे सर्व सेवेकरी आणि भाविकांना आव्हान सर्व सेवेकरी आणि भाविक बंधु भगिनी यांना नम्र आव्हान करण्यात येत आहे की, सध्या जगात, देशात आणि राज्यात कोरोनारुपी वैश्विक महामारीने थैमान घातले आहे. या कोरोनारुपी महामारीचे जगभरातून उच्चाटन होण्यासाठी अखिल मानवजातीच्या व विश्व कल्याणासाठी श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित) ञ्यंबकेश्वर नाशिकच्या माध्यमातून एकाच दिवशी एकाच वेळी दिनांक ९ मे २०२१ रोजी रविवार ठिक सायंकाळी ७ वा. ऑनलाईन "श्री स्वामी चरित्र सारामृत " ह्या ग्रंथाचे पठन करण्यात येणार आहे. संपूर्ण जगभरातून आणि आपल्या भारतामधून सरकारी नियम पाळून घरच्या घरीच ऑनलाईन सामुहिक "श्री स्वामी चरित्र सारामृत " पाठात सहभागी व्हावे असे आवाहन आपल्या प. पू . गुरुमाऊलींनी केले आहे. भलेही सेवेकरी असोत किंवा नसोत, कोणत्याही संप्रदायाचे असो, ९ मे ची सामुदायिक सेवा सर्वांकडून होणे खूप महत्वाचे आहे. सर्वांना वैयक्तीक संपर्क करून सदर सेवेत सहभागी करवून घ्यावयाचे आहे . याबाबत लक्षात ठेवायचे आहे की , घरीच राहून आणि सर्वाना सोबत घेऊन आपल्याला सेवा रुजू करायची आहे . यामध्ये आपल्याला कुठेही दिखावा करायचा नाही. फक्त जास्तीत जास्त सेवा II श्री स्वामी समर्थ II महाराजांच्या चरणी रुजू होणे महत्त्वाचे आहे. ज्यांना सुतक/सोयर असेल ते सुद्धा या सेवेत YouTube वरून श्रवणाच्या माध्यमातून सहभागी होऊ शकता. पाठ वाचनापूर्वी ही महामारी शांत होण्यासाठी संकल्प किंवा विनंती आपण करणार आहोत. याबाबत दिंडोरी दरबारचा अधिकृत संदेश आपल्याला मिळेलच. हा संदेश जसाच्या तसा कुठेही एडिट न करता आपण सर्व सेवेकरी यांच्यापर्यंत पोहचवावा. ज्यांना हा संदेश पोहचणार नाही किंवा समजणार नाही त्यांनी ही महामारी शांत होऊन समूळ नष्ट व्हावी अशी विनंती II श्री स्वामी समर्थ II महाराजांना करायची आहे. (टीप - आपल्याकडे "श्री स्वामी चरित्र सारामृत " हा ग्रंथ नसेल तर प्ले स्टोर वर जाऊन श्री गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर हे Application डाउनलोड करावे. ज्यांना वाचता येत नसेल किंवा वाचायला त्रास होत असेल त्यांना मनन करुन सहभाग नोंदविता येणार आहे). खालील लिंकवर जाऊन Application डाउनलोड करावे. https://play.google.com/store/apps/details?id=com.dp.sgp

0 कॉमेंट्स • 0 शेयर

+6 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 5 शेयर

+3 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 2 शेयर

0 कॉमेंट्स • 0 शेयर

0 कॉमेंट्स • 0 शेयर