🌹 *संसारपावन नाम शंकरकवच* 🌹 ॐ नमो महादेवाय बाणासुर उवाच महेश्र्वर महाभाग कवचं यत् प्रकाशितम् । संसारपावन नाम कृपया कथय प्रभो ॥ १ ॥ महेश्र्वर उवाच श्रृणु वक्ष्यामि हे वत्स ! कवचं परमाद्भुतम् । अहं तुभ्यं प्रदास्यामि गोपनीयं सुदुर्लभम् ॥ २ ॥ पुरा दुर्वाससे दत्तं त्रैलोक्यविजयाय च । ममैवेदं च कवचं भक्त्या यो धारयेत् सुधीः ॥ ३ ॥ जेतुं शक्नोति त्रैलोक्यं भगवानिव लीलया ॥ ४ ॥ संसारपावनस्यास्य कवचस्य प्रजापतिः । ऋषिश्छन्दश्र्च गायत्री देवोऽहं च महेश्र्वरः ॥ ५ ॥ धर्मार्थकाममोक्षेषु विनियोगः प्रकीर्तितः । पञ्चलक्षजपेनैव सिद्धिदं कवचं भवेत् ॥ ६ ॥ यो भवेत् सिद्धकवचो मम तुल्यो भवेद् भुवि । तेजसा सिद्धियोगेन तपसा विक्रमेण च ॥ ७ ॥ शम्भुर्मे मस्तकं पातु मुखं पातु महेश्र्वरः । दन्तपंक्तिं च नीलकण्ठोऽप्यधरोष्ठं हरः स्वयम् ॥ ८ ॥ कण्ठं पातु चन्द्रचूडः स्कन्धौ वृषभवाहनः । वक्षःस्थलं नीलकण्ठः पातु पृष्ठं दिगम्बरः ॥ ९ ॥ सर्वाङ्गं पातु विश्र्वेशः सर्वदिक्षु च सर्वदा । स्वप्ने जागरणे चैव स्थाणुमें पातु संततम् ॥ १० ॥ इति ते कथितं बाण कवचं परमाद्भुतम् । यस्मै कस्मै न दातव्यं गोपनीयं प्रयत्नतः ॥ ११ ॥ यत् फलं सर्वतीर्थानां स्नानेन लभते नरः । तत् फलं लभते नूनं कवचस्यैव धारणात् ॥ १२ ॥ इदं कवचमज्ञात्वा भजेन्मां यः सुमन्दधीः । शतलक्षप्रजप्तोऽपि न मन्त्रः सिद्धिदायकः ॥ १३ ॥ *॥ इति श्रीब्रह्मवैवर्तपुराणे संसारपावनं नाम शंकरकवचं संपूर्णम् ॥* *॥ श्री शंकरार्पणमस्तु ॥*     *मराठी अर्थ* बाणासुर म्हणाला, सच्चिदानन्दस्वरुप श्रीमहादेवानां नमस्कार असो. १) प्रभो ! महेश्र्वरा आपण मला संसारपावन कवच मला सांगावे. महेश्र्वर म्हणाले, २-४) मुला, ऐक या अतिशय अद्भुत कवचाचे मी तुझ्यासाठी वर्णन करतो. ते जरी अत्यंत दुर्लभ आणि गोपनीय आहे तरी ते मी तुला सांगतो. पूर्वी त्रैलोक्य विजयासाठी मी हे दुर्वासांना दिले होते. जो बुद्धिमान पुरुष हे कवच भक्तिभावाने धारण करतो, तो भगवंताप्रमाणेच सहज तीन्ही लोकांवर विजय मिळवितो. ५-७) या संसारपावन कवचाचे ऋषि प्रजापति हे आहेत. छन्द गायत्री असून देवता मी म्हणजे महेश्र्वर आहे.  धर्म, अर्थ, काम व मोक्षसाठी याचा विनियोग आहे. या कवचाचा ५ लक्ष जप केल्यावर हे सिद्धदायक होते. जो या कवचाला सिद्ध करतो, तो सिद्धियोगाने तेजस्वी व तपस्येने, बल-पराक्रमाने माझ्यासारखा विजयी होतो.   ८) शम्भु माझ्या डोक्याचे आणि महेश्र्वर माझ्या मुखाचे रक्षण करो. नीलकण्ठ दंत्तपंक्तिचे आणि स्वतः हर माझ्या अधरोष्टाचे रक्षण करो. ९) चन्द्रचूड कण्ठाचे आणि वृषभवाहन दोन्ही खांद्यांचे रक्षण करो. नीलकण्ठ छातीचे व दिगम्बर पाठीचे पालन करो.  १०) विश्र्वेश नेहमी सर्व दिशांकडून माझ्या संपूर्ण शरिराचे रक्षण करो. झोपल्यावर व जागेपणी स्थाणुदेव माझे रक्षण करो. ११) बाणा, ह्याप्रकारे मी तुझ्यासाठी या अत्यंत अद्भुत कवचाचे वर्णन केले. ऐर्‍यागैर्‍याला ह्याचा उपदेश करु नये. मात्र हे गुप्त ठेवले पाहीजे. हे कवच धारण केले असतां सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्यावर जे फळ मिळते तसेच फळ मिळते. मन्दबुद्धि माणुस या कवचाला न जाणता माझी उपासना करतो, त्याला लाखों जप केल्यावरही मंत्र सिद्ध होत नाही. अशाप्रकारे श्रीब्रह्मवैवर्त पुराणांतील हे संसारपावन नावाचे शिवकवच पू्र्ण झाले.  *संकलन :- रामचंद्र विठ्ठल गोळेसर *

+4 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 5 शेयर

*प्रत्येक हिंदूला "श्रीमद् भगवतगीते"च्या बाबतीत सर्व माहिती असायलाच हवी.* ॐ . कुणी कुणाला सांगितली..??? उ.- श्रीकृष्ण यांनी अर्जुनाला सांगितली. ॐ . कधी सांगितली ??? उ.- आज पासून ७ हजार वर्षा पूर्वी सांगितली ॐ. ईश्वरांनी कोणत्या दिवशी गीता सांगितली..??? उ.- रविवार च्या दिवशी... ॐ. कोणत्या तिथि ला ??? उ.- एकादशी ॐ. कुठे सांगितली...??? उ.- कुरुक्षेत्रच्या रणभूमि वर... ॐ. किती वेळा मध्ये सांगितली..??? उ.- ४५ मिनीटे.. ॐ. का सांगितली...??? उ.- कर्तव्या पासून भरकटलेल्या अर्जुनाला कर्तव्य शिकवण्यासाठी आणि पुढ्या येणाऱ्या पिढ्यांना धर्म, ज्ञान आणि कर्तव्य कर्म शिकवण्यासाठी.. !!! ॐ. किती अध्याय आहेत? उ.- एकूण १८ अध्याय.. !!! ॐ. किती श्लोक आहेत? उ.- ७०० श्लोक ॐ. गीता मध्ये काय काय सांगितलेले आहे..? उ.- ज्ञान-भक्ति-कर्म योग या मार्गांची विस्तृत व्याख्या केली आहे.., ह्या मार्गावर चालणाऱ्या व्यक्ती निश्चितपणे उच्चपदस्थ होतात.. ॐ. गीते ला अर्जुना शिवाय अजून कोणी कोणी ऐकलेले आहे.. ??? उ.- धृतराष्ट्र आणि संजय ने.. ॐ. अर्जुनाच्या आधी गीतेचे पावन ज्ञान कुणाला मिळाले होते.. ??? उ.- भगवान सूर्यदेवला.. ॐ. गीतेची माहिती कोणत्या धर्म-ग्रंथ मध्ये आहे.. ??? उ.- उपनिषदां मध्ये.. ॐ. गीता कोणत्या महाग्रंथाचा भाग आहे ??? उ.- गीता महाभारताचा एक अध्याय शांति-पर्व याचा एक हिस्सा आहे... ॐ. गीता चे दूसरे नाव काय आहे...??? उ.- गीतोपनिषद ॐ. गीतेचे सार काय आहे.. ??? उ.- प्रभु श्रीकृष्ण यांना शरण जाणे.. ॐ. गीते मध्ये कोणी किती श्लोक सांगितले आहेत ??? उ.- श्रीकृष्ण यांनीे- ५७४ अर्जुना ने- ८५ धृतराष्ट्र ने- १ संजय ने- ४० एकूण = ७०० अर्धवट ज्ञान योग्य ठरत नाही... ३३ करोड नाही.. ३३ कोटि (प्रकार) देवी देवता आहेत हिँदू धर्मा मध्ये.... कोटि = म्हणजे प्रकार ।। देवभाषा संस्कृत मध्ये कोटि चेे दोन अर्थ होतात.. कोटि चा एक अर्थ म्हणजे *प्रकार* होय आणि दुसरा अर्थशास्राचा अर्थ करोड हा ही होतो... आपल्या हिंदू धर्माचा चा दुष्प्रचार करण्यासाठी असा बनाव केला गेला की हिंदूंचे के ३३ करोड देवी देवता आहेत... आणि आज आपण पणं हेच बोलतो की आमचे ३३ करोड देवी देवता आहेत... एकूण ३३ प्रकार चे देवी देवता आहेत हिँदू धर्मा मध्येे :- १२ प्रकार आहेत., आदित्य, धाता, मित, आर्यमा, शक्रा, वरुण, अँश, विवास्वान, पूष, सविता, तवास्था, आणि विष्णु...! ८ प्रकार आहेत :- वासु:, धर, ध्रुव, सोम, अह, अनिल, अनल, प्रत्युष आणि प्रभाष। ११ प्रकार आहेत :- रुद्र: हर, बहुरुप, त्र्यंबक, अपराजिता, बृषाकापि, शँभू, कपार्दी, रेवात, मृगव्याध, शर्वा, आणि कपाली। आणि अजून २ प्रकार आहेत अश्विनी आणि कुमार.. ।। एकूण :- १२+८+११+२= ३३ कोटी एक हिंदू या नात्याने आपला धर्म ग्रंथ श्रीमद् भगवत गीता जो साक्षात भगवान कृष्णांनी सांगितलेले याची माहिती आपणा सर्वांना कळावी, म्हणून ही पोस्ट , 👏👏👏👏👏👏 आयुष्यात एकदा तरी गीता वाचा. ✍ 🙏🏻 🌹... *जयकी श्रीकृष्ण* ...🌹 🙏🏻

+17 प्रतिक्रिया 3 कॉमेंट्स • 17 शेयर

18 दिन के युद्ध ने, द्रोपदी की उम्र को 80 वर्ष जैसा कर दिया था... शारीरिक रूप से भी और मानसिक रूप से भी शहर में चारों तरफ़ विधवाओं का बाहुल्य था.. पुरुष इक्का-दुक्का ही दिखाई पड़ता था अनाथ बच्चे घूमते दिखाई पड़ते थे और, उन सबकी वह महारानी द्रौपदी हस्तिनापुर के महल में निश्चेष्ट बैठी हुई शून्य को ताक रही थी । तभी, *श्रीकृष्ण* कक्ष में दाखिल होते हैं द्रौपदी कृष्ण को देखते ही दौड़कर उनसे लिपट जाती है ... कृष्ण उसके सिर को सहलाते रहते हैं और रोने देते हैं थोड़ी देर में, उसे खुद से अलग करके समीप के पलंग पर बिठा देते हैं । *द्रोपदी* : यह क्या हो गया सखा ?? ऐसा तो मैंने नहीं सोचा था । *कृष्ण* : नियति बहुत क्रूर होती है पांचाली.. वह हमारे सोचने के अनुरूप नहीं चलती ! हमारे कर्मों को परिणामों में बदल देती है.. तुम प्रतिशोध लेना चाहती थी और, तुम सफल हुई, द्रौपदी ! तुम्हारा प्रतिशोध पूरा हुआ... सिर्फ दुर्योधन और दुशासन ही नहीं, सारे कौरव समाप्त हो गए तुम्हें तो प्रसन्न होना चाहिए ! *द्रोपदी*: सखा, तुम मेरे घावों को सहलाने आए हो या, उन पर नमक छिड़कने के लिए ? *कृष्ण* : नहीं द्रौपदी, मैं तो तुम्हें वास्तविकता से अवगत कराने के लिए आया हूँ हमारे कर्मों के परिणाम को हम, दूर तक नहीं देख पाते हैं और जब वे समक्ष होते हैं.. तो, हमारे हाथ मे कुछ नहीं रहता । *द्रोपदी* : तो क्या, इस युद्ध के लिए पूर्ण रूप से मैं ही उत्तरदाई हूँ कृष्ण ? *कृष्ण* : नहीं द्रौपदी तुम स्वयं को इतना महत्वपूर्ण मत समझो... लेकिन, तुम अपने कर्मों में थोड़ी सी भी दूरदर्शिता रखती तो, स्वयं इतना कष्ट कभी नहीं पाती। *द्रोपदी* : मैं क्या कर सकती थी कृष्ण ? *कृष्ण*:- जब तुम्हारा स्वयंवर हुआ... तब तुम कर्ण को अपमानित नहीं करती और उसे प्रतियोगिता में भाग लेने का एक अवसर देती तो, शायद परिणाम कुछ और होते ! 👉इसके बाद जब कुंती ने तुम्हें पाँच पतियों की पत्नी बनने का आदेश दिया... तब तुम उसे स्वीकार नहीं करती तो भी, परिणाम कुछ और होते । और 👉उसके बाद तुमने अपने महल में दुर्योधन को अपमानित किया... वह नहीं करती तो, तुम्हारा चीर हरण नहीं होता... तब भी शायद, परिस्थितियाँ कुछ और होती । हमारे *शब्द* भी हमारे *कर्म* होते हैं द्रोपदी... और, हमें अपने हर शब्द को बोलने से पहले तोलना बहुत ज़रूरी होता है... अन्यथा, उसके *दुष्परिणाम* सिर्फ़ स्वयं को ही नहीं... अपने पूरे परिवेश को दुखी करते रहते हैं । संसार में केवल मनुष्य ही एकमात्र ऐसा प्राणी है... जिसका "ज़हर" उसके "दाँतों" में नहीं, "शब्दों " में है... *इसलिए शब्दों का प्रयोग* *सोच समझकर करिये।* *ऐसे शब्द का प्रयोग करिये... जिससे,* *किसी की भावना को ठेस ना पहुँचे।*

+5 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 3 शेयर

🌹 *उध्दवगीता* 🌹 *अध्याय दहावा* उध्दव म्हणाला, कृष्णा तू प्रत्यक्ष परब्रह्म आहेस तू अनादी , अनंत, मायेचे आवरण नसणारा, स्वतंत्र आहेस. तूच सर्व विश्वाचे जन्मकारण, स्थितिकारण आणि संहारकारण आहेस. ॥१॥ जे अकृतात्मे म्हणजे अज्ञानी व मलिन चित्ताचे लोक आहेत, त्यास तू लहानमोठ्या पदार्थांत कोठेही दिसत नाहीस. परंतु जे श्रुतींचा इत्यर्थ जाणणारे ज्ञानी असतात, ते मात्र तुझी उपासना तुझे यथार्थ स्वरुप जाणून करीत असतात. ॥२॥ म्हणून ज्या ज्या स्वरुपांमध्ये तुझी भक्ती करणारे महर्षी तुझी उपासना करुन मोक्ष मिळवितात ती ती स्वरुपे, त्या तुझ्या विभूती मला सांग . ॥३॥ हे भूतभावन म्हणजे जीवांस (जडासही) उत्पन्न करुन त्यांचे कल्याण, करणार्या भगवंता ! तू भूतांचा नियंता आहेस. तू भूतांमध्ये नित्य वागतोस. तथापि प्राणी तुला ओळखीत नाहीत. तथापि तू मात्र सर्वांस मोहित झालेले पाहतोस. ॥४॥ म्हणून या लोकी स्वर्गात व पाताळांत , सारांश दाही दिशांमध्ये ज्या ज्या तुझ्या विभूति (स्वरुपे) प्रकट झाल्या आहेत, त्या विभूति व त्यांचे विशेष मला सांग. तुझ्यामुळेच त्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. सर्व पुण्यतीर्थांचे माहेरघर असणारे हे जे तुझे चरणकमल त्याला मी सर्व भावांनी नमस्कार करतो. ॥५॥ श्रीकृष्णा म्हणतात, संशयांचा उच्छेद करणारे प्रश्न कोणते व ते कसे करावे, हे जाणण्यात कुशल असणार्या उध्दवा, कुरुक्षेत्रांत शत्रू बनलेल्या कौरवांचा विरुध्द लढू इच्छिणार्या अर्जुनाने हाच प्रश्न मला विचारला होता. ॥६॥ स्वजातीचा म्हणजे बंधुबांधवांचा वध करणे निंद्य आहे अधार्मिक आहे, असे अर्जुनास वाटले आणि तो युध्दापासून पराडमुख झाला . उध्दवा ! अर्जुन, त्यावेळी ‘ माझा आत्मा इतर आत्म्यास मारणारा व इतरांचे आत्मे मरणारे’ यांत मग्र झाला होता. ॥७॥ त्या प्रसंगी त्या नरश्रेष्ठाची समजूत मी अनेक युक्तिप्रयुक्तींनी घालून त्याचे अज्ञान दूर केले. युध्दाच्या अग्रभागी असे म्हणाला. ॥८॥ उध्दवा ! मी या सर्व स्थावरजंगम भूतांचा आत्मा आहे. त्यांचा उपकारक मित्र आहे, त्यांचा नियंता -स्वामी आहे. मीच सर्व प्राणिमात्र आहे. आणि त्यांच्या उत्पत्ति- स्थिती- लयांचे कारणही मीच आहे. ॥९॥ जे वेगवान् आहेत, त्यांचा वेग मी आहे. कालादी सर्व सत्ताधार्यांचा स्वामी मीच आहे. सत्त्वादी गुणांत साम्य असणारा व गुणवंतांचा स्वाभाविक गुणही मीच आहे. ॥१०॥ या गुणवंतांमधील सुत्र (हिरण्यगर्भ प्राण) मी, महत्तत्त्वातील महान् मी, सूक्ष्मातील अतिसूक्ष्म जीव मी, आणि अजिंक्य वस्तूत श्रेष्ठ मनही मीच. ॥११॥ तसेच (श्रुतीचा उत्पादक व अध्यापक जो ) हिरण्यगर्भ आहे. मंत्रांतील श्रेष्ठ ऊँ, अक्षरांतील श्रेष्ठ अक्षर अ व छंदांतील पद.. मीच आहे. ॥१२॥ सर्व देवांमधील इंद्र, अष्टवसूंमधील श्रेष्ठ जो अग्नी , बारा अदित्यांतील श्रेष्ठ विष्णू व अकरा रुद्रांमधील श्रेष्ठ शंकरही मीच. ॥१३॥ मी ब्रह्मर्षींमधील भृगू आहे, राजर्षींमधील श्रेष्ठ मनू, देवर्षिश्रेष्ठ नारद व यज्ञोपयोगी धेनुश्रेष्ठ कामधेनुही मीच आहे. ॥१४॥ सिध्दश्रेष्ठांमध्ये मी कपिल, पक्षांमध्ये गरुड, प्रजापतींमध्ये दक्ष व पितरांमध्ये अर्यमाही मीच आहे. ॥१५॥ दैत्यांमध्ये असुरपति प्रल्हाद तो मी, नक्षत्रे आणि वनस्पतींमध्ये सोम मी व यक्षराक्षसांमध्ये मी कुबेरहि. गजेंद्रश्रेष्ठ ऐरावत, जलचरांचा ईश्वर वरूण, उष्णता व प्रकाश देणार्या भूतांमध्ये मी श्रेष्ठ सूर्य आणि मनुष्यांमध्ये राजाही मीच आहे. ॥१६-१७ अश्वांमध्ये उच्चै:श्रवा, धातुंमध्ये सुवर्ण, दंडधारी लोकांमध्ये मी यम, सर्पश्रेष्ठ वासुकी, नागोत्तमांमध्ये अनंत,श्वपदांमध्ये सिंह आणि आश्रमांमध्ये चौथा संन्यासाश्रम, वर्णांतील प्रथम ब्राह्मण वर्ण मीच आहे. पवित्र नद्यांत गंगा , सरोवरांमध्ये मी सागर, आयुधांमध्ये धनुष्य मी, श्रेष्ठ धनुर्धार्यांमध्ये मी त्रिपुरघ्न म्हणजे शंकर, वास्तव्याचे उत्तम स्थान मेरु, अत्यंत दुर्गमांमध्ये मी हिमाचल, वृक्षांमध्ये मी पिंपळ (अश्वत्थ), औषधीमध्ये यव ही सर्व माझीच रुपे आहेत. ॥१८-२१॥ त्याचप्रमाणे पुरोहितांमध्ये मी वसिष्ठ, ब्रह्मज्ञान्यांमध्ये मी बृहस्पती, सेनापतींमध्ये मी स्कंद (षडानन), नायकांमध्ये मी अज (ब्रह्मा), यज्ञांमध्ये मी ब्रह्मयज्ञ, व्रतांमध्ये मी अहिंसा आणि वायू, अग्नी, सूर्य, जल वाणी या शुध्द करणार्या पदार्थांचा आत्मा जी शुध्दता, ती मीच होय. ॥२२-२३॥ अष्टांगयोगामध्ये समाधी, विजयाकांक्षीचे रहस्य जो मंत्र ( मसलत) तो, विवेक्यांच्या विवेकाचा राजा आन्वीक्षिकी नामक विवेक (आत्मनात्मविवेकविद्या) आणि अख्याति, अन्यथाख्याति इत्यादिक संशयवाद करणारांमध्ये विक्लप मीच होय.॥२४॥ स्त्रियांमध्ये मी शतरुपा (सरस्वती किंवा मनुपत्नी अथवा विद्युत् ), पुरुषांमध्ये स्वायंभुव मनु, मुनींमध्ये नारायण, ब्रह्माचार्यांमध्ये सनत्कुमार, धर्मात मी संन्यास, निर्भरहस्य आत्मश्रध्दा, गुह्यांमध्ये प्रियवचन व मौन, दांपत्यांमध्ये ब्रह्मा , अप्रमत्तांचा संवत्सर, ऋतूंमध्ये वसंत (मधु व माधव ही अनुक्रमे चैत्र व वैशाख या महिन्यांची नावे), मासांमध्ये मी मार्गशीर्ष आणि नक्षत्रांत अभिजित् मीच आहे. ॥२५-२७॥ तसेच युगांत कृतयुग, बुध्दिवंतांत कृष्ण देव, व्यासांत व्दैपायन व्यास, कवींमध्ये सूक्ष्मबुध्दि काव्य (शुक्र) मी होय. ॥२८॥ भगवंतांत वासुदेव, भागवतांत तू (उध्दव), किंपुरुषांत हनुमान व विद्याधरांतील सुदर्शन मीच होय. ॥२९॥ त्याचप्रमाणे रत्नांत मी पद्मराग, सुंदर कोशांत मी पद्मकोश , दर्भांत मी कुश, हवींमध्ये मी गाईच तूप, व्यावहारिकांत मी लक्ष्मी, लबाडांतील मी छलग्रह (खोटया फाशांनी खेळणारा किंवा खोटा फांसा), तितिक्षूंची सहनशीलताशक्ती , सात्त्विकांचे सत्त्व, बलवंताचे ओज व सह (ओजस्= चढाईची शक्ति, सहस् = बचावाची शक्ति), आणि सात्त्वत म्हणजे भगवद्भक्त भावगत त्यांची भक्ति व नऊ सात्त्वांचा आदि व सर्वश्रेष्ठ मीच आहे. ॥३०-३२॥ गंधर्वांमध्ये मी विश्वावसू, अप्सरामध्ये मी पूर्वचित्ति, पर्वतांचे स्थैर्य, भूमीचा गुण गंध जलांचा रस,तेजतत्त्वाचा अग्रि किंवा सूर्य, सूर्यचंद्रतारा यांची प्रभा, आकाशाचा गुण जो शब्द तो मी, ब्रह्मण्यांतील (पवित्र वस्तूंतील) मी बलि= हव्यद्रव्य अथवा दानशूरांतील शुक्रशिष्य बलि, वीरांत मी अर्जुन, भूतांची उत्पत्ति स्थिति व संहार करणारी शक्ति मी; हस्तपादादि कमेद्रियांचे गति-उक्ति - प्रभृति, ज्ञानेद्रियांचे श्रवण- दर्शनादि, इंद्रियांचें इंद्रिय (मन?) पंचमहाभूतांच्या तन्मात्रा, अहंकार, महत् ( महाभूतांच्या तन्मात्रा, अहंकार व महत् हे प्रकृतीचे विकार असून हे सात महाभूतांच्या ज्ञानकमेंद्रियांच्या प्रकृति होतात), विकार (५ महाभूते, ११ इंद्रिये = १६ विकार ) मी, जीव मी प्रकृति मी, सत्त्वादी गुण मी, व परब्रह्म मी होय. ॥३३-३७॥ या गुणांचे परिगणन, ज्ञान आणि तत्त्वनिश्चय मी आहे. मी जो सर्वात्मा तद्व्यतिरिक्त जीव -शिव , गुण- गुणी वगैरे काही नसते. मी आहे म्हणून सर्व आहे. ॥३८॥ त्याचप्रमाणे परमाणूंची मला मोजदाद केव्हातरी करिता येईल. परंतु कोटयावधी जीव निर्माण करणार्या माझ्या विभूतींची संख्या मलाही करता येणार नाही. ॥३९॥ तथापि तेज, शोभा, कीर्ति, ऐश्वर्य ही ( मर्यादा प्रकट करणारा गुण) सौंदर्य, भाग्य, वीर्य, विज्ञान, तितिक्षा, हे धर्म जेथे जेथे दिसतात, ते ते माझेच अंश आहेत असे समज. ॥४०॥ उध्दवा, याप्रमाणे संक्षेपत: सर्व विभूती तुला सांगितल्या. ह्या विभूती म्हणजे मनाचे अथवा मनाने उत्पन्न केलेले विकार आहेत. कारण, वाणी मात्र ह्या विकारांस प्रकट करु शकते. ॥४१॥ म्हणून वाणी , मन , प्राण, इंद्रिये, बुध्दि, अहंकार या सर्वावर ताबा ठेव म्हणजे तुझे जन्ममरण संपेल. ॥४२॥ जो यति सद्बुध्दिपूर्वक, वाणी व मन यांचा संयमरुप त्याग करीत नाही, त्याचे व्रत (दीक्षा), त्याची तपश्चर्या, त्याचे ज्ञान, ही सर्व पाणी पाझरणार्य माठातील पाण्याप्रमाणे नाहीशी होतात. ॥४३॥ म्हणून माझा जो अनन्य भक्त आहे, त्याने भद्भक्तीने प्रेरिलेली जी बुध्दी, तिच्या साह्याने अर्थात् बुध्दिपूर्वक मनाचा, वाणीचा व प्राणांचा संयम करावा. हा सिध्द होऊन ब्रह्मात्मैक्य झाले की तो मद्भक्त कृतकृत्य होतो. ॥४४॥ अध्याय दहावा समाप्त. *संकलन : रामचंद्र विठ्ठल गोळेसर .

+5 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 1 शेयर

श्री ॐ श्री ॐ देखीली तुळजा माता । निवालो अंतरी सुखे । तुटली सर्वही चिंता । थोर आधार वाटला । संसार पाहता मागे । पाळीले सर्वही कुळा । प्रस्तुत प्रत्ययो आला । रक्षिते बहुतांपरी । पुरवीते कामना सर्वै । ईच्छा पुर्ण मनोगते । धन्य हा देव लोभाळु । सांभाळ करीतो सर्वदा । आघात संकटे वारी । निवारी दुष्ट दुर्जना । संकटी भरवसा मोठा । तत्काळ काम होतसे । लालची चुकते वेडे । कृपाळु जननी खरी । लक्ष की कोटी अन्याये । बहुत क्षमिले खरे । वन्ही हो सर्प हो विंचू । बाळकु घेतसे बळे । सर्वही चुकवी माता । पोर लाबाड नेणते । लोभाळु बायका माया । त्यामध्ये मुख्य जन्ननी । बाळका वाढवी माता । मातेला मुख्य जन्ननी । सर्वही बाळके जित्री । त्रैलोक्य जननी पहा । साक्षिणी सर्व लोभाळु । मर्यादा कोण रे करी । अनंत रुपिणी माया । काय रक्षी परोपरी । विचित्र महिमा आहे । कळला नव्हे कदा । सर्वांचे मुळ हे माया । मुळमाया म्हणोनिया । सृष्टीची आदिशक्ती हे आदिशक्ती म्हणोनिया । राम उपासना आहे । हे रामवरदायीनी । सख्य ते चालते सर्वै । प्रवृत्ती निवृत्ती कडे । ॒ संत रामदास स्वामी

+6 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 1 शेयर

🌿  *५१९ वा दिवस*✔️ 🌹  *_सार्थ ज्ञानेश्वरी_* 🌿  *अध्याय चौदावा* 🌹  *_|गुणत्रयविभागयोगः |_* 🌿  *_ओवी ९१ पासून_* ⛳⛳⛳🐚🔔🐚⛳⛳⛳ *🍨उभयसंगु पहिलें| बुद्धितत्त्वें प्रसवलें| बुद्धितत्त्व भारैलें| होय मन ||१४-९१||*     उभयतांच्या, म्हणजे माझ्या व मायेच्या संगात प्रथम बुद्धी तत्व जन्मास आले, ते बुद्धी तत्व रजोगुणाने भारले गेले, म्हणजे मन तयार होते.  *🍧तरुणी ममता मनाची| ते अहंकार तत्त्व रची| तेणें महाभूतांची| अभिव्यक्ति होय ||१४-९२||*     मनाची तरुण स्त्री जी ममता ती अहंकारतत्व तयार करते व त्यायोगाने पंचमहाभूते स्पष्ट दशेस येतात.  *🍨आणि विषयेंद्रियां गौसी| स्वभावें तंव भूतांसी| म्हणौनि येती सरिसीं| तियेंही रूपा ||१४-९३||*     आणि विषय व इंद्रिये यांचा स्वभावत:च पंचमहाभूतात अंतर्भाव होत असल्यामुळे विषय व इंद्रिये देखील त्या भूतांबरोबरच आकारास येतात. *🍧जालेनि विकारक्षोभें| पाठीं त्रिगुणाचें उभें| तेव्हां ये वासनागर्भें| ठायेंठावों |९४|*      पंचभूते, विषय व इंद्रिये ही तयार झाल्यानंतर मागील सूक्ष्मप्रकृतीपासून उत्पन्न झालेला हा गर्भपिंड व्यक्त होतो. त्यावेळी वासनेत सूक्ष्मरूपाने राहिलेला जीव जसा असावयास पाहिजे, तसा त्या गर्भपिंडात प्रवेश करतो.  *🍨रुखाचा आवांका | जैसी बीजकणिका | जीवीं बांधें उदका भेटतखेंवो  ||९५||*     ज्याप्रमाणे बीजाचा दाणा पाण्याला भेटल्याबरोबर आपल्यामधे वृक्षाचा सूक्ष्म आकार तयार करतो   *🍧तैसी माझेनि संगें| अविद्या नाना जगें| आर घेवों लागे| आणियाची ||१४-९६||*     त्याप्रमाणे माझ्या संगाने अविद्या ही अनेक जगरूपी अणकुचीदार अंकुर घेऊ लागते.  *🍨मग गर्भगोळा तया| कैसें रूप तैं ये आया| तें परियेसें राया| सुजनांचिया ||१४-९७||*    हे सुजनाच्या राजा अर्जुना, त्यावेळी मग त्या गर्भगोलाचा आकार कसा व्यक्त होतो ते ऐक. *🍧पैं मणिज स्वेदज| उद्भिज जारज| उमटती सहज| अवयव हें ||१४-९८||*      तेव्हा अंडज, स्वेदज, उद्भिज व जरायुज असे हे अवयव स्वभावत: उमटतात.  *🍨व्योमवायुवशें| वाढलेनि गर्भरसें| मणिजु उससे| अवयव तो ||१४-९९||*      मणीज हा अवयव आकाश व वायू यांच्या योगाने गर्भरस वाढाल्याने जीवन पावतो.  *🍧पोटीं सूनि तमरजें| आगळिकां तोय तेजें| उठितां निफजे| स्वेदजु गा ||१००||*      तम व रज हे दोन गुण पोटात घालून आप आणि तेज यांचे आधिक्य झाले असता, निश्चयेकरून स्वेदज हा अवयव उत्पन्न होतो. ⛳⛳⛳🐚🔔🐚⛳⛳⛳ 🍨 *ओवी १०१ पासून उद्या*   🍨 *¦जयजय रामकृष्ण हरि¦*

+5 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 1 शेयर