*क्रिया तशी प्रतिक्रिया* एक स्त्री आपल्या आलिशान कारने हायवे वरून शहराकडे जात असते. अचानक तिची कार बंद पडते. आकाश ही ढगांनी भरून आलेले असते. लगेच धो धो पाऊस पडतो. तिला गाडी दुरुस्त करण्याची काहीच माहिती नसते.ती इकडे तिकडे मदतीसाठी कोणी आहे का ते पाहते तिला कोणीच दिसत नाही. मदतीसाठी इतर गाडयांना हात दाखविते पण कोणताच गाडीचालक थांबत नाही. बराच वेळ जातो आता मात्र तिच्या डोळ्यात काळजीने पाण्याच्या धारा लागतात. तेवढयात सखाराम नावाचा माणूस तिच्या जवळ येतो . त्याला पाहून ती स्त्री प्रथम घाबरते .पण सखाराम म्हणतो घाबरू नका ताई मी प्रयत्न करून पाहतो आणि गाडी दुरूस्तीच्या कामाकडे वळतो. थोडा वेळ प्रयत्न केल्यानंतर त्या स्त्रीची कार सुरू होते.ती स्त्रि सखाराम ला खूप खूप धन्यवाद देते आणि सखाराम ला म्हणते "तुम्ही माझी खूप मोठी अडचण सोडविली मी त्या बदल्यात सांगा तुम्हाला किती रुपये देऊ"?तेंव्हा सखाराम म्हणतो काही नको , हे माझे काम नव्हतेच मी तर तुम्हाला मदत केली. मलाही एका माणसाने मदत केली होती आणि त्याचा कोणताही मोबदला त्यांनी न घेता आपणही इतरांना अशीच मदत करा असे सांगितले आणी मी ही आपणास मदत केली. तुम्हीही अशीच मदत करा हाच माझा मोबदला समजा. हे ऐकून त्या स्त्रिला खुप छान वाटले आणि तिनेही हसत मी ही अशीच मदत नक्की करेन असे वचन देऊन हसतमुखाने निरोप घेऊन निघून गेली. एव्हाना खूप वेळ प्रवास व थकव्यामुळे तिला भूक लागली होती. तिने एका रेस्टोरंट जवळ जेवण्यासाठी कार थांबविली आणि रेस्टोरंट मध्ये जाऊन जेवणाची ऑर्डर दिली. जेवण टेबलवरती येण्यास थोडा वेळ लागणार होतो. ती स्त्रि आता जरा रिलॅक्स झाली होती व सहजच रेस्टोरंट मधील शो पीस , सुंदर टेबल, स्वच्छतेकडे व उत्साहाने व हसतमुखाने सेवा देणाऱ्या वेटरकडे पाहू लागली . तेवढयात तिचे लक्ष तिला सेवा देणाऱ्या एका उत्साही लेडी वेटरकडे गेले.ती हसतमुखाने त्या स्त्रीला सेवा देत होती. ती वेटर ७ महिन्याची गरोदर आहे हे त्या स्त्रिने हेरले व लगेच तिच्या मनात विचार आला आपण हिला मदत करायलाच हवी. हिला सध्या पैश्याची खूप गरज असणार म्हणूनच ती गरोदर असतानाही काम करत आहे. तिने तिच्या पर्समधून काही नोटा व एक चिठ्ठी लिहून पॉकेट मध्ये ठेवली. जेवण झाल्यानंतर बील रक्कम व टिप म्हणून एक पॉकेट त्या स्त्रि ने त्या वेटरच्या हातात दिले. काउंटरला तिने बिल दिले व पॉकेट उघडून पाहिले तर त्यात एक चिठठी व काही नोटा होत्या तिने चिठ्ठी वाचली तर त्यात लिहीले होते तु खूप उत्साही आहेस गरोदर असूनही ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देते .तुला खर तर आराम करायला हवा पण तुला पैश्याची खूप गरज असल्याने तू काम करत आहेस . मलाही अशीच एका माणसाने मदत केली म्हणून मी तुला मदत करत आहे. तु ही अशीच मदत कर. मदतीची ही साखळी तोडू नकोस. तिने त्या पॉकेटातील नोटा मोजल्या तर त्यात चक्क दहा हजार रुपये निघाले.एवढी मोठी रक्कम पाहून तिच्या डोळ्यात पाणी आले. तिने मनोमन त्या मदत करणाऱ्या स्त्रिला धन्यवाद दिले. तिची कामाची शिफ्ट संपल्यानंतर ती घरी गेली. घरी तिचा नवरा नेहमीसारखाच चिंतातूर होऊन काळजी करत होतो. ती नवऱ्याजवळ त्याच्या मिठीत गेली व म्हणाली आता माझ्या डिलेव्हरीची काळजी नका करू आज मला एका स्त्री ने खूप मदत केली आहे. घडलेला प्रसंग सांगितला दोघांनाही खूप आनंद झाला. तो काळजी करणारा नवरा दुसरा तिसरा कोणी नसून तो असतो सखाराम... ह्यालाच म्हणतात 'क्रिया तशी प्रतिक्रिया' मित्रांनो नैसर्गिक न्याय तत्व असतेच आपण जे इतरांना दयाल तेच आपल्याला परत मिळते. आपणच जर दुसऱ्याला दुःख दिले, त्रास दिला तर आपल्या ला दुःख आणि त्रासच मिळणार.आपण जर दुसऱ्याला नेहमी मदत केली, सुख दिले आनंद दिला तर आपल्यालाही आनंद आणि सुख मिळणारा आपल्यालाही नेहमीच इतरांकडून मदतच मिळणार. कितीही संकटे जिवनात आली तरी मदतीला अगणित हात धावून येणार हे मी छातीठाकपणे सांगतो. म्हणून आपण नेहमीच दुसऱ्यांना सुख, आनंद देऊया मदत करु या... आपल्यालाही तेच मिळेल जे आपण दुसऱ्याला देऊ.... सुख , आनंद, मदत दया आणि सुख, आनंद, मदत मिळवा हेच तर आहे नैसर्गिक न्याय तत्व अर्थातच 'क्रिया तशी प्रतिक्रिया मराठी शायरी संग्रह - https://goo.gl/vD1pJR *क्रिया तशी प्रतिक्रिया* एक स्त्री आपल्या आलिशान कारने हायवे वरून शहराकडे जात असते. अचानक तिची कार बंद पडते. आकाश ही ढगांनी भरून आलेले असते. लगेच धो धो पाऊस पडतो. तिला गाडी दुरुस्त करण्याची काहीच माहिती नसते.ती इकडे तिकडे मदतीसाठी कोणी आहे का ते पाहते तिला कोणीच दिसत नाही. मदतीसाठी इतर गाडयांना हात दाखविते पण कोणताच गाडीचालक थांबत नाही. बराच वेळ जातो आता मात्र तिच्या डोळ्यात काळजीने पाण्याच्या धारा लागतात. तेवढयात सखाराम नावाचा माणूस तिच्या जवळ येतो . त्याला पाहून ती स्त्री प्रथम घाबरते .पण सखाराम म्हणतो घाबरू नका ताई मी प्रयत्न करून पाहतो आणि गाडी दुरूस्तीच्या कामाकडे वळतो. थोडा वेळ प्रयत्न केल्यानंतर त्या स्त्रीची कार सुरू होते.ती स्त्रि सखाराम ला खूप खूप धन्यवाद देते आणि सखाराम ला म्हणते "तुम्ही माझी खूप मोठी अडचण सोडविली मी त्या बदल्यात सांगा तुम्हाला किती रुपये देऊ"?तेंव्हा सखाराम म्हणतो काही नको , हे माझे काम नव्हतेच मी तर तुम्हाला मदत केली. मलाही एका माणसाने मदत केली होती आणि त्याचा कोणताही मोबदला त्यांनी न घेता आपणही इतरांना अशीच मदत करा असे सांगितले आणी मी ही आपणास मदत केली. तुम्हीही अशीच मदत करा हाच माझा मोबदला समजा. हे ऐकून त्या स्त्रिला खुप छान वाटले आणि तिनेही हसत मी ही अशीच मदत नक्की करेन असे वचन देऊन हसतमुखाने निरोप घेऊन निघून गेली. एव्हाना खूप वेळ प्रवास व थकव्यामुळे तिला भूक लागली होती. तिने एका रेस्टोरंट जवळ जेवण्यासाठी कार थांबविली आणि रेस्टोरंट मध्ये जाऊन जेवणाची ऑर्डर दिली. जेवण टेबलवरती येण्यास थोडा वेळ लागणार होतो. ती स्त्रि आता जरा रिलॅक्स झाली होती व सहजच रेस्टोरंट मधील शो पीस , सुंदर टेबल, स्वच्छतेकडे व उत्साहाने व हसतमुखाने सेवा देणाऱ्या वेटरकडे पाहू लागली . तेवढयात तिचे लक्ष तिला सेवा देणाऱ्या एका उत्साही लेडी वेटरकडे गेले.ती हसतमुखाने त्या स्त्रीला सेवा देत होती. ती वेटर ७ महिन्याची गरोदर आहे हे त्या स्त्रिने हेरले व लगेच तिच्या मनात विचार आला आपण हिला मदत करायलाच हवी. हिला सध्या पैश्याची खूप गरज असणार म्हणूनच ती गरोदर असतानाही काम करत आहे. तिने तिच्या पर्समधून काही नोटा व एक चिठ्ठी लिहून पॉकेट मध्ये ठेवली. जेवण झाल्यानंतर बील रक्कम व टिप म्हणून एक पॉकेट त्या स्त्रि ने त्या वेटरच्या हातात दिले. काउंटरला तिने बिल दिले व पॉकेट उघडून पाहिले तर त्यात एक चिठठी व काही नोटा होत्या तिने चिठ्ठी वाचली तर त्यात लिहीले होते तु खूप उत्साही आहेस गरोदर असूनही ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देते .तुला खर तर आराम करायला हवा पण तुला पैश्याची खूप गरज असल्याने तू काम करत आहेस . मलाही अशीच एका माणसाने मदत केली म्हणून मी तुला मदत करत आहे. तु ही अशीच मदत कर. मदतीची ही साखळी तोडू नकोस. तिने त्या पॉकेटातील नोटा मोजल्या तर त्यात चक्क दहा हजार रुपये निघाले.एवढी मोठी रक्कम पाहून तिच्या डोळ्यात पाणी आले. तिने मनोमन त्या मदत करणाऱ्या स्त्रिला धन्यवाद दिले. तिची कामाची शिफ्ट संपल्यानंतर ती घरी गेली. घरी तिचा नवरा नेहमीसारखाच चिंतातूर होऊन काळजी करत होतो. ती नवऱ्याजवळ त्याच्या मिठीत गेली व म्हणाली आता माझ्या डिलेव्हरीची काळजी नका करू आज मला एका स्त्री ने खूप मदत केली आहे. घडलेला प्रसंग सांगितला दोघांनाही खूप आनंद झाला. तो काळजी करणारा नवरा दुसरा तिसरा कोणी नसून तो असतो सखाराम... ह्यालाच म्हणतात 'क्रिया तशी प्रतिक्रिया' मित्रांनो नैसर्गिक न्याय तत्व असतेच आपण जे इतरांना दयाल तेच आपल्याला परत मिळते. आपणच जर दुसऱ्याला दुःख दिले, त्रास दिला तर आपल्या ला दुःख आणि त्रासच मिळणार.आपण जर दुसऱ्याला नेहमी मदत केली, सुख दिले आनंद दिला तर आपल्यालाही आनंद आणि सुख मिळणारा आपल्यालाही नेहमीच इतरांकडून मदतच मिळणार. कितीही संकटे जिवनात आली तरी मदतीला अगणित हात धावून येणार हे मी छातीठाकपणे सांगतो. म्हणून आपण नेहमीच दुसऱ्यांना सुख, आनंद देऊया मदत करु या... आपल्यालाही तेच मिळेल जे आपण दुसऱ्याला देऊ.... सुख , आनंद, मदत दया आणि सुख, आनंद, मदत मिळवा हेच तर आहे नैसर्गिक न्याय तत्व अर्थातच 'क्रिया तशी प्रतिक्रिया मराठी शायरी संग्रह - https://goo.gl/vD1pJR

0 कॉमेंट्स • 0 शेयर

फारच उत्साहजनक. पूर्ण वाचा, अंमलात आणा...! ₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹ *विश्वास नावाची गोळी व कोरोना.....* by Dr. Sameer Gahane, MBBS .. आजकाल कोरोनाने जे थैमान मांडलं आहे..डाॅ. म्हणून काही अनुभव मला आलेले आहेत.. ते मी इथे सांगत आहे.. काही रुग्णांचा सिटी स्कोअर हा २१-२२ पर्यंत गेलेला होता.. व तब्बेत ढासळत होती.. पण नंतर ते लोक अचानक बरे होवू लागले.. आपोआप...... माझ्या निदर्शनास असे आले की ४-५ लोक जे मरणाच्या दारात होते ते विना ऑक्सिजन, विना हाॅस्पिटलला जाता बरे झाले.. ते कसे बरे झाले ह्याचं उत्तर डॉक्टरांकडे किंवा विज्ञानाकडे नाही.. .. ह्या सर्वांमध्ये एक गोष्ट मला दिसली की ही सर्व लोकं सकारात्मक होती.. म्हणजे आहेत ..भरपूर सकारात्मकता .. ह्या लोकांचा हा विश्वास होता की ते बरे होणारच.. मला ह्यातुन बरे व्हायचचं आहे.. व चमत्कार झाला.. ज्या लोकांना मानवी शरीर व त्याच्या क्षमता कळतात , त्यांच्यासाठी हे नवीन नाही.. हा चमत्कार नाही, मनाच्या प्रचंड शक्तीचा एक नमुना आहे.. मानवी शरीर जगातल्या कोणत्याही आजाराला स्वतःहून बरे करू शकते असे काहींचे मत आहे.. किंवा त्या शक्तीची जाणीव व्हावी... व हे 1000% सत्य आहे.. असे कितीतरी न बरे होणारे आजार विश्वासाच्या बळावर बरे झालेले आहेत.. असे कितीतरी कॅन्सर पेशन्ट आहेत. की ज्यांना डाॅ नी सांगितलं की मृत्यू समोरच्या ५-६ महिन्यात अटळ आहे..पण नंतर ६ महिन्यांनी चेक केल तर कॅन्सरचं नामोनिशाण नव्हतं.... प्रत्येक गोष्ट ही मानवी ज्ञानाच्या चौकटीतच बसेल असं नाही.. वैद्यकीय ज्ञानाला बऱ्याचश्या सीमा आहेत व त्यातं बघितलं तर मानवी शरीर आजही अनभिज्ञ आहे.... मानवी शरीर स्वतःच एक डाॅक्टर आहे.. जगातला सर्वात मोठा व सर्वात उत्तम डाॅक्टर.. आपल्या शरीरात / आपल्या रक्तात एक अशी फौज असते की जी सतत कोणत्याही आजाराशी झगडत राहते.. हे वाचता वाचताच शरीराने लाखों विषाणु किंवा जीवाणूंचा खात्मा केला असेल.. आपल्या शरीरात नेहमी केमिकल रिऍक्शन सुरु असतात.. जो प्राणावायू आपण नाकावाटे घेतो ते त्याचं मूळ आहे.. ते नसानसांत पोहोचतं.. प्रत्येक पेशीला भेटतं.. कमीत कमी 30,000,000,000,000 ( 30 लाख कोटी ) इतक्या पेशींना .. किंवा त्यापेक्षाही जास्त.. औषध नेमकं काय करत ?. एक तर ते ह्या शरीरात चालणाऱ्या केमिकल रिऍक्शनला कमी करते किंवा वाढवते. सगळ गणित ह्या दोन गोष्टींवर चालतं.. ते वेगळं असं स्वतःहून काही करत नाही.. औषध अशी वेगळी जादू करत नाही.. शेवटी जे करायचं ते शरीरच करतं.. आपले विचार हे ह्या सगळ्या पेशींवर राज्य करतात.. जर आपण आपलं मन आनंदी केलं तर आपोआप शरीरात चांगल्या केमिकल रिऍक्शन घडून येतात.. व आपल्याला चांगलं वाटायला लागतं.. जेव्हा चांगला विचार करतो, तेव्हा शरीरात हॅप्पी हार्मोन्स स्त्रवतात व आपल्याला चांगलं वाटतं.. जेव्हा आपण वाईट विचार करतो किंवा घाबरतो तेव्हा एकदम त्याच्या विरुद्ध होतं.. आपली रोगप्रतिकार शक्ती ही इतकी प्रभावी आहे.... व रोगप्रतिकार शक्ती व विचारांचा खूप जवळचा संबंध आहे.. ह्या कठीण वेळी आपण ह्या संबंधाचा कसा वापर करु शकतो हे महत्वाचं आहे.. थोडक्यात सांगायचं तर आपलं शरीर अमृतही बनवू शकते व विषही.. आत्तापर्यंत कोणत्याचं वैज्ञानिकांना हे गणित पूर्णपणे समजलेले नाही.. माणूस जरी चंद्रावर पोहोचला असला तरीही तो मानवी शरीराचे जे गूढ रहस्य आहे, त्याच्या जवळपासही पोहोचलेला नाही.. तर कोरोनावर येतो.. १०० पैकी ९५ लोकांना काहीच होणार नाही.. पण नुसत्या भितीमुळे त्यांना लक्षणे दिसायला लागतील.. कारण आपण जसा विचार केला तसं आपल्या अंसख्य पेशींना क्षणात खरं वाटायला लागेल.. व तशी लक्षणे आपोआपच जाणवू लागतील.. त्यामुळे जरी थोडा त्रास जाणवला तरी घाबरु नका.. अजिबात घाबरु नका.. ताप आला तर घाबरु नका..आपलं शरीर त्या बाहेरील शत्रूशी भांडत आहे.. व त्यामुळे चिंता करु नका.. शरीराचे कोरोना विरुद्ध प्रयत्न सुरु आहेत हे समजून घ्या.. जर दोन- तीन दिवसानंतर सुद्धा ताप गेला नाहीच.. लक्षणे कमी झालीच नाहीत.. तर मग औषध घ्या.. ते पण न घाबरता.. घाबरलात तर कोरोना राहिला बाजूला, तुमचं स्वतःचं शरीरच शरीरात विष तयार करेल.. त्यामुळे शांत राहा.. आपल्या कडे ह्या सर्वांवर जगातील सर्वात प्रभावी औषध आहे, आपला स्वतःचा विश्वास.. त्याच्या बळावर आपण कसे बरे होऊ शकतो हे पुढे सांगतो.. आपण आपल्या विश्वास नावाच्या शक्तीला वापरु शकतो.. आपल्या शरीराला फक्त तसे आदेश द्यायचे आहेत.. मग सगळं त्याच्यावर सोपवा... डॉक्टरांवर विश्वास ठेवा कारण मी स्वतःच एक डाॅक्टर आहे .. त्यामुळे हे सांगतोय.. डाॅक्टर वर अविश्वास दाखवू नका.. पण समोरचा डाॅक्टर हा शिकलेला असावा.. आजकाल योग्य डीग्री नसतांना सुद्धा लोक स्वतःला डाॅक्टर म्हणवून घेतात.. किंवा ज्याचं ज्ञान नाही ते दुसऱ्याचं बघून औषधं देतात.. त्यांच्यापासून सुद्धा सावधान.. पण सर्वात महत्वाचं म्हणजे आपल शरीर स्वतःच एक डाॅक्टर आहे.. फक्त त्याला योग्य तो आदेश हवा.. त्याला योग्य तो आदेश द्यायचा.. सकारात्मकता द्यायची.. काही गोष्टी सांगतो .. त्याचा अवलंब करा.. _ तुमच्या आवडीची गाणी ऐका.. जेणेकरुन तुमचं मन प्रसन्न राहील.. - तुम्हाला कोरोना ची कितीही लक्षणे असली , औषध उपचार सुरु असला.. तरी अजिबात घाबरु नका.. - मनातल्या मनात स्वतःला हे सांगत राहा की मी नक्की नक्की बरा होणारच आहे.. मी नक्की बरा होणारच आहे.. मी नक्की बरा होणारच आहे.. मला काहीही झालेलं नाही.. - कोरोना झाला असेल किंवा नसेल .. श्वसनाचे व्यायाम करा. अनुलोम, विलोम (कमीत कमी ४ मिनिट).. ओम चा जप हा कमीत कमी २५ वेळ तरी करा (दिवसातुन ३-४ वेळा).. - ज्यांना कोरोना झाला असेल त्यांना आवर्जुन फोन करा.. त्यांना सांगा की तू नक्की बरा होशीलच... कारण १०० पैकी ९० -९५ टक्के लोकं बरी होत आहेत... - जरी कुणी आयुर्वेदीक काढ्याने कोरोना बरा होतो अस सांगत असेल तर ते घेण्यास सुद्धा हरकत नाही.. ( त्यावर विश्वास ठेवण्यास हरकत नाही.. विश्वास ठेवा..विश्वास स्वतःच एक मोठं औषध आहे.. .. .. ).. - भूक लागत नसेल तरी स्वत:ला हे सांगा की मला ह्या ह्या वेळी चांगलं पोटभर जेवायचं आहे.. तशी कल्पना करा ..की मी जेवत आहे.. पोटभर जेवत आहे.. - चांगलं पौष्टिक अन्न खा.. वरण, पोळी, भात, भाजी, नारळ पाणी ( दिवसातुन ४-५ ग्लास ), फळांचा रस/दूध, लिंबुपाणी, अंडी .. तुम्हाला जी भाजी आवडते, जे आवडतं ते वेगवेगळे पदार्थ आवर्जून खा..ते पदार्थ पौष्टिक असावेत.. - चांगली आनंदी झोप घ्या.. झोप सुद्धा औषधाचं काम करते..अजिबात चिंता करायची नाही.. शांत झोप घ्यायची मित्रांनो.. उद्याचं उद्या बघुया.. - ज्यांना कोरोना झालेला आहे ..त्यांनी परत परत कागदावर, वहीवर, मोबाईलवर लिहा की मी बरा होईन, मला काही एक झालेलं नाही आहे.. जेणेकरुन तुमच्या मनाला ते मान्य होईल.. कमीत कमी १० वेळा तरी हे लिहा.. उगीच टाईमपास करत असाल तर हे करा.. परत परत लिहा, परत परत टाईप करा.. एकच वाक्य.. _ आजकाल समाजमाध्यमं, न्यूज चॅनेल्स नकारात्मकता जास्त पसरवत आहेत... पण ते जे सांगत आहेत.. ते अर्धसत्य आहे.. हजार पैकी ५ लोकांना त्रास आहे.. तर ते हे कधीच दाखविणार नाहीत की ९९५ लोक स्वस्थ आहेत.. त्यामुळे ते बघणे टाळा.. ते तुम्हाला व तुमच्या शरीराला विष तयार करण्यासाठी प्रवृत्त करत आहेत.. - डोळे बंद करा.. व १० मिनिटं तरी फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करा... श्वास येत आहे, श्वास जात आहे.. बस्स, इतकीच अनुभूती. बाकी सगळं त्या क्षणासाठी विसरुन जा... कोणता मनात विचार नाही.. कोणती मनात आस नाही... कोणती मनात भिती नाही.. आपल्या स्वतःला त्या श्वासाला समर्पित करा.. जेव्हा कधी तुम्हाला घाबरल्या सारखं वाटेल.. तेव्हा तेव्हा हे करा.. तुम्ही हे बेडवर झोपून सुद्धा करु शकता.. हे तुमच्या आंतरिक मनापर्यंत पोहोचण्याचं एक उत्तम साधन आहे. ह्याचा हजारो-लाखो पटीने फायदा होईल.. (कमीत कमी ५ दिवस तरी हे नियमित करा, नियमितपणे केल्यास तुमचं पूर्ण जीवन बदलून जाईल ह्याची शाश्वती देतो.. ).. - चांगल्या डाॅक्टरांचा योग्य तो सल्ला घ्या.. स्वत:हुन किंवा मेडीकल शाॅपवाल्याच्या सल्ल्यावरुन औषधं घेवू नका.. जरी तुम्हाला नावे माहीत असली तरीही .. डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचं पालन करा.. औषधं वेळेवर घ्या.. व एक शेवटचं.. १०-१५ दिवस कोरोनाचे संपले की तुम्हाला काहीही होणार नाही.. आपल्या शरीराने कोरोना विरुद्धचं युद्ध जिंकलेले आहे, पण ह्या युद्धात आपलंही थोडं नुकसान झालेलं आहे, त्यामुळे काही दिवस थोडा अशक्तपणा राहील.. त्याची काळजी अजिबात करू नका.. परत तेच पौष्टिक आहार व सकारात्मक विचारांची संगत.. काही दिवसात तुमचं शरीर पूर्वीसारखंच सुदृढ होईल.. मित्रांनो, मन व मनाची शक्ती अथांग आहे.. चला ह्या शक्तीचा कोरोना ला पळविण्यासाठी उपयोग करुया.. जसं काही लोकांनी शेवटच्या क्षणी सुद्धा आंतरिक उर्जेच्या बळावर कोरोनावर मात केलीय , तसंच आपण करुया.. जे कुणी हे वाचत असेल किंवा जो कुणी ह्या वेळी त्रासात असेल.. विश्वातिल समस्त चांगल्या शक्तींना मी ह्या क्षणी प्रार्थना करतो की त्या सर्वांची दु:ख दूर व्हावीत .. त्यांचा आजार बरा व्हावा.. लवकरात लवकर बरे व्हा.. तुम्ही बरे होणारच.. अहंह, अजिबात घाबरायचं नाही.. थोडं दोन क्षणांसाठी हसा बघू... कोरोना, दो दिन की बात है दोस्तहो.. जिंदगी अभी बाकी है.. बहुत सी जंग अभी फतेह करनी है.. ये तो बस एक मामुली जंग है.. हिम्मत नही हारनी है.. हमे जितनाही हैं..हम जरुर जितेंगे.. - by Dr. sameer gahane, MBBS .. मराठी शायरी संग्रह - https://goo.gl/vD1pJR

0 कॉमेंट्स • 6 शेयर

*🌹गेल्या 175 दिवसांतील सर्वोत्कृष्ट पोस्ट!* 👌👍👌👍👌👍👌👍👌👍👌 *🍁 तेही दिवस येतील...* *जेव्हा एक दिवस मी टिव्ही चालू करून एखादं न्यूज चॅनल लावीन आणि माझ्यासमोर एक ब्रेकिंग न्यूज झळकेल – “भारताची कोरोनाच्या विळख्यातून सुटका. सलग तिसाव्या दिवशी एकाही नव्या रुग्णाची नोंद नाही.” पत्रकार बांधवांसाठी ही न्यूज ‘हार्ट-ब्रेकिंग’ असेल कदाचित, कारण आता लोकांना काळजीत पाडणाऱ्या बातम्या चोवीस तास आणायच्या कुठून हा मोठा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला असेल...!!!* *🍁 तेही दिवस येतील...* *जेव्हा माझ्या जिवलग मित्रांना मी तेवढीच ‘घट्ट’ मिठी मारीन. ह्या दिवसांत मला त्यांची किती काळजी वाटली हे त्यांना सांगताना मला शब्द शोधायची गरज पडणार नाही. त्यांच्यासोबत गप्पा मारताना एकमेकांची खेचण्याव्यतिरिक्त बोलायला खूप काही असेल आमच्याकडे...!!!* *🍁 तेही दिवस येतील...* *जेव्हा माझ्यासमोर माझा एखादा मित्र आत्मविश्वासाने खोकेल किंवा शिंकेल, आणि मीही तेवढ्याच सहजपणे आणि मिश्किलपणे माझा नेहमीचा डायलॉग मारीन, “ काही नाही काही नाही गेला तो"...!!!* *🍁 तेही दिवस येतील...* *जेव्हा खरेदीची टीचभर आवड नसलेला मी, कुठल्या तरी भव्य सुपरमार्केटमध्ये जाऊन उगाच तासनतास भटकीन, खिसा रिकामा असला तरी उत्साहाने काठोकाठ भरलेलं मन सोबत घेऊन...!!!* *🍁 तेही दिवस येतील...* *जेव्हा एखाद्या बाणासारखा सुटेन मी, दिशाहीन, कुठेही, कधीही...आणि जाईन एखाद्या डोंगराच्या कुशीत, माझ्या प्रिय मित्राशी म्हणजेच 'निसर्गाशी' गुजगोष्टी करायला, माझ्या जीवन परिवर्तनाच्या कथा त्याला ऐकवायला, त्या डोंगरापलीकडच्या दरीतून सुसाट वाहणारं वारं अंगावर झेलायला, आणि तोही तितक्याच तन्मयतेने ऐकेल माझ्या गोष्टी, शाबसाकी देईल मला, मी जे कमावलं त्याबद्दल आणि फुंकर घालेल मला झालेल्या त्रास आणि वेदनांबद्दल....शेवटी म्हणेल, “अरे वेड्या, मीच घडवून आणलेलं नाटकं होतं हे, तुला आणि तुझ्या साथीदारांना शहाणं करण्यासाठी!”...!!!* *🍁 तेही दिवस येतील...* *जेव्हा मला जिवंत माणसांची आणि माणसं जिवंत असल्याची, दोन्हींची किंमत कळेल. माझं बोलणं, वागणं सौम्य आणि हळूवार होईल. ‘माणसं शाश्वत नसतात’, या जाणीवेने पोखरून गेलेला मी त्यांना जपण्यासाठी कोणत्याही थराला जाईन. मतभेद असायलासुद्धा आयुष्यात माणसं असावी लागतात हे कळल्यामुळे माझ्या वैचारिक शत्रूंकडेही मी आदराने बघायला लागीन ...!!!* *🍁 तेही दिवस येतील...* *जेव्हा मला प्रार्थनेतली ताकद कळेल. इतकी वर्षे पार्थना सुरू झाली की नुसते ओठ हलवणारा मी आज माझ्या प्रार्थनेने आभाळालाही पाझर फोडीन...!!!* *🍁 तेही दिवस येतील...* *जेव्हा मला समजेल की या निसर्गात आवाज करणारा, किंबहुना करू शकणारा मी काही एकमेव प्राणी नाही. पक्ष्यांचे गुंजन, गाईंचे हंबरणे, कोकिळेचे गायन, रातकिड्यांची किरीकीरसुद्धा हवीहवीशी वाटेल मला, त्यांना दादही देऊ लागीन मी, अगदी मनापासून.....माझ्या अवतीभवती घडणाऱ्या असंख्य घटनांपैकी निदान काही गोष्टींकडे तरी मी मुद्दाम डोळसपणे पाहायला शिकेन, माझ्यातला ‘मीपणा’ अगदी क्षणभरासाठी बाजूला ठेवून...!!!* *🍁 तेही दिवस येतील...* *जेव्हा मला चिकटलेली गेंड्याची कातडी सैल होऊ लागेल हळूहळू. मी खूप संवेदनशील होईन, माझ्या पर्यावरणाविषयी, प्राणीमात्रांविषयी. चालताचालता वाटेत आलेल्या किडामुग्यांना बिनधास्तपणे मारणाऱ्या मला, एकेकाळी मृत्यूच्या भयाने ग्रासलेला ‘‘मी’ आठवेल, आणि माझा पाय अचानकपणे मागे जाईल, सुकलेली पानंसुद्धा मी कदाचित कधीच पायदळी तुडवणार नाही यापुढे, कारण सर्व चैतन्य आटून गेल्यानंतर कसं वाटतं, याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला असेन मी...!!!* *🍁 तेही दिवस येतील...* *जेव्हा कामाव्यतिरिक्त इतरही गोष्टींना माझ्या आयुष्यात मानाचं स्थान असेल. कारण काही गोष्टी पैशांनी विकत घेता येत नाहीत हे तोपर्यंत मला पुरते उमगलेले असेल. आणि वाईट परिस्थिती आली की काम जातं, पण जगणं थांबत नाही याची मला लख्ख जाणीव झाली असेल. या प्रवासात मी अशाही काही गोष्टींचा शोध घेईन, ज्या मला ‘उत्पन्न’ मिळवून देणार नाहीत कदाचित, पण माझं जगणं अधिक ‘संपन्न’ करून जातील, आणि त्यातली उर्मी टिकवून ठेवतील, अगदी पुढची शंबर वर्षं...!!!* *🍁 तेही दिवस येतील...* *जेव्हा मी बाकीच्यांपेक्षा कसा वेगळा, वरचढ, किंवा श्रेष्ठ हे दाखवण्याची स्पर्धा मी माझ्याकडून संपवलेली असेल. कारण माझ्या आवाजाचं वेगळेपण दाखवण्याच्या नादात या मैफिलीची हरवलेली मजा मला पुन्हा उद्युक्त करेल माझा आवाज बदलावयाला आणि इतरांच्या सुरात माझा सूर मिसळायला...!!!* *🍁 तेही दिवस येतील...* *जेव्हा मी गरजांच्या शर्यतीमध्ये भाग घेणं कमी करीन.... आणि आनंदाची शर्यत अशी कोणती शर्यत असते आणि त्याची नोंदणी कुठे करावी लागते याची आवर्जून चौकशी करीन...!!!* *🍁 तेही दिवस येतील...* *जेव्हा माझं प्रायश्चित्त पूर्ण होईल, आणि गरज पडणार नाही मला तोंड लपवून जगण्याची.....माझा मास्क भिरकावून देईन मी हवेमध्ये...खूप उंच... इतका उंच की इतके महिने मला गच्च बांधून ठेवणारी त्याची ती दोरी पूर्णपणे दृष्टिआड होईल माझ्या....आणि सज्ज होईन एका नव्या भरारीसाठी, पण यावेळी जबाबदारीचे पंख घेऊन...!!!* *आयुष्य सुंदर आहे. आनंदात जगा, आपला जिव्हाळा कायम राहो...!!!✌* *❣स्वत: ची व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. आपल्यामुळे कुणालाही कुठलाही त्रास होणार नाही याची जास्त काळजी घ्या व तसे वागा, एकमेकांना धीर द्या, त्यांना आधार द्या, त्यांना साथ द्या...!!!❣* || *जागृत रहा,सतर्क रहा, सुरक्षित रहा*|| 🌺🌲🙏🌺🌲🙏🌺🌲🙏🌺🌲 मराठी शायरी संग्रह - https://goo.gl/vD1pJR

0 कॉमेंट्स • 0 शेयर

🙏🌹 *सातत्याने 8 दिवस कोव्हिड वार्ड मधे थांबल्याने निरिक्षनातुन सुचलेली एक समर्पक कविता*..🌹🙏👇👇👇 😈 *कोरोना* 😈 *बरं झाल देवा*..... *मला कोरोना झाला* | *आयुष्याचा आलेला*,.. *सगळा माज निघुन गेला* || *म्हनीत होतो नेहमीच मी*, *माझी गाडी,आंन माझा बंगला* | *पन जवा बसलो आम्बुलन्समधी* *आख्हा जीव उशाला टांगला* || *गाडी राहिली..बंगल्याम्होरं* ... *आन रस्ता दिसेनासा झाला*, *बरं झाल देवा...मला कोरोना झाला*...|| 1 *प्रत्येक खोकल्याच्या उबळीनिशी* *केली कर्म आठवत होती*..| *प्रत्येक अडकनारया श्वासासंगे*, *माणुसकीची जान साठवत होती* ..... *पुण्यसंचय आला संपत* .. *आणी ऑक्सीजन शॉर्ट झाला*,| *तेंव्हा कुठ..देवा..तुझ्यावर भरोसा आला*..|| *बरं झाल देवा...मला कोरोना झाला*.......2 *होती पैशांची मस्ती*.. *आनं पदाचीबी गुरमी* | *सगळं संपल देवा आता* *आलीया पुरती नरमी*..|| *जवा आता मिळालाय*, *गरिबा शेजारी खाट*.| *तवाच माझा जिरलाय* | *आता समदा थाट* || *सगळ आठवुन आता* | *जीव घाबरा झाला* || *बर झाल देवा...मला कोरोना झाला* ||| 3 *नाही दिली कोणा गरिबा कधी*, *रुपया आणीक दमडी* ..| *इथं सुयांच्या भोकानी*, *थकून गेलीया चमडी* || *पै-पै कमावलेला,पैसा ना कामी आला* | *बर झाल देवा...मला कोरोना झाला* || 4 *खर सांगतो...मित्रांनो आता*, *पैसा,पद आणी खोटी प्रतिष्ठा*, *यात काही दम नाही*......| *कोरोनाच्या बेडवर मात्र फक्त*, *प्रेमाचं व्हेंटीलेटरच कामी येई* || *नात्यांमधील ऑक्सिजन कधी*, *कमी होऊ देऊ नका* | *मैत्रीच्या ऑक्सिमिटर मधले*, *बोट कधी सोडवु नका* || *आनंदाचे " *रेमड़ीसीव्हियर*", आणी आत्मविश्वासाचे" *टेमीफ्लू*" व्यायामाचे " *एन्टीबायोटिक*" आणिक हास्याचे *"मल्टी-व्हिट्यामिन"* मित्रांच्या सोबतीचे असते, *व्हिट्यामिन "सी"*.....आणि वरुन नात्यांच्या प्रेमाचे *"झिंक" आवरण*,.... हाच आहे कोरोनाचा खरा *प्रोटोकॉल*, *आज मला ह्याचा खरा उलगडा झाला*....... *आन* *बर झाल देवा* .... मला *कोरोना* झाला | 🙏...✍ मराठी शायरी संग्रह - https://goo.gl/vD1pJR

0 कॉमेंट्स • 0 शेयर

*पहाटेची अमर्याद ताकद*...💪💪💪 तुम्ही सकाळी किती वाजता उठता? झोपायला कितीही उशीर झाला तरी, तरी रोज तो पाच वाजता उठतो! मोठी माणसं सांगायची, “लवकर निजे, लवकर उठे, त्यास आयु-आरोग्य लाभे !” आणि ते खरं आहे, हेल एरॉल्ड नावाचं एक जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे, ते एक प्रचंड यशस्वी व्यावसायीक होते, मोठ्या जिद्दीने त्यांनी एका अपघातामुळे आलेल्या शारिरीक विकलांगतेवर मात केली होती. पण २००८ च्या महामंदीत त्यांचा प्रचंड लॉस झाला, अब्जोपती हेल कर्जबाजारी झाला. पण तो हार मानणारा नव्हता, यातुन बाहेर कसं पडावं, हे विचारण्यासाठी तो आपल्या एका यशस्वी मित्राकडे गेला, मित्राने त्याला काय सल्ला दिला असेल बरं? “हेल, तु सकाळी लवकर उठ!” “बाकी सगळं आपोआप होईल” या चमत्कारिक सल्ल्याने हेल निराश झाला, त्याला काहीतरी आगळेवेगळे उपाय अपेक्षित होते, काही दिवस त्याने कसेबसे ढकलले, पण दिवसेंदिवस निराशा त्याला घेरत होती, मग नाईलाज म्हणुन त्याने सकाळी चार वाजता उठायची सुरुवात केली, आणि हेल सांगतो, त्याचं आयुष्यच बदलुन गेलं! पहाट आणि सुर्योदय इतके जादुई असतात का? इतक्या सकाळी उठुन काय करावं? ह्या प्रश्णावर हेल ने एक कोडवर्ड सांगितलाय. *‘SAVERS’* ह्या आयुष्य बदलुन टाकणार्‍या सहा सवयी आहेत. १) *Silence – (ध्यान)* - शांत बसुन स्वतःच्या आत डोकावणे, म्हणजे ध्यान! - स्वतःच्या आतल्या चेतनेला स्पर्श करणे, म्हणजे ध्यान! - मनाच्या कॉम्पुटरला फॉर्मेट करुन व्हायरस रिमुव्ह करणे म्हणजे ध्यान! - मन प्रफुल्लीत आणि ताजतवानं करण्यासाठी आवश्यक असते ध्यान! - माणसाच्या गरजा किती कमी आहेत, आणि सगळ्या चिंता किती व्यर्थ आहेत याची आत्मप्रचिती म्हणजे ध्यान! - अफाट, अदभुत आणि आनंददायी विश्वशक्तीसोबत स्वतःला जोडून घेणे, आणि स्वतःच्या मन-शरीराचा कणकण प्रफुल्लित करवुन घेण्याची कृती म्हणजे ध्यान! २) *Affirmations – (सकरात्मक स्वयंसुचना)* - अफरमेशन्स म्हणजे स्वसंवाद! - स्वतः स्वतःला सुचना देणं, - प्रचंड शक्तिशाली असलेल्या अंतर्मनावर आपण निश्चित केलेलं ध्येय कोरणं! - येत्या पाच वर्षात, येत्या एक वर्षात, पुढच्या एका महिन्यात, पुढच्या एका आठवड्यात, आणि आज दिवस भर मी काय काय करणार आहे, याचं मनातल्या मनात पुन्हा पुन्हा रिव्हीजन करणे म्हणजे स्वयंसुचना! - स्वयंसुचनांमुळे कल्पना खोल अंतर्मनात झिरपतात, आणि नाटकीयरित्या सत्यातही उतरतात. - अंतर्मनाची शक्ती प्रचंड असल्यामुळे तिथे रुजलेला प्रत्येक विचार मग तो चांगला असो की वाईट, खराच होतो. - आपले पुर्वज म्हणायचे, शुभ बोल नाऱ्या!..किंवा जिभेवर सरस्वती असते, आपण बोलु तसेच घडते, जिभेवरचे देवता तथास्तु म्हणते, वगैरे वगैरे - या सगळ्या अंधश्रद्धा नव्हत्या, ह्यामागे मनोविज्ञान आहे. - एखादी गोष्ट हजारो वेळा बोलली तर ती अंतर्मनात प्रक्षेपित होते, मग अशुभ कशाला बोलायचे? - वाईट बोलुन विनाशाला आमंत्रण देण्यापेक्षा, ‘या सुखांनो या’!... ३) *Visualize – (चांगल्या कल्पना मनात घोळवणे.)* तीव्र इच्छा पुर्ण झाली आहे, अशी मनातुन कल्पना करणं, ती पुर्ण झाल्याचा आनंद व्यक्त करणं आणि मनःपटला वर तिला बारीक सारीक रुपात साकारणं, म्हणजे व्हिज्वलायजेशन! - कल्पनाशक्ती ही भगवंताने माणसाला दिलेली सर्वात अनमोल आणि सर्वात प्रभावशाली भेट आहे. - कल्पनाशक्तीचा योग्य वापर केल्यास साधारण माणसाचं यशस्वी व्यक्तीमध्ये रुपांतर होतं. - दररोज आपण आपली ध्येयं पुर्ण झाली आहेत, असं मनात घोळवलं पाहीजे. - पोहण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदकांची रास उभी करणारा मायकेल फेल्प्स म्हणतो. ज्यावेळी मला झोप येऊ लागते, तेव्हा मला जे नक्की करायचे आहे, ते मनातल्या मनात बघण्याचा मी प्रयत्न करतो. - ऑलंपिकविजेती एथलिट लेन बीचले म्हणाली होती, मागचे चार वर्ष मी एकच निकाल डोळ्यापुढे आणत होते, ते म्हणजे, मी हातात विजेतापदक घेऊन उभी आहे, आणि माझ्यावर शॅंपेनचा वर्षाव होत आहे. - मायकेस स्मिथ म्हणाला, मी मला हवे असलेल्या स्वप्नाचे रेखाचित्र कागदावर रेखाटतो, स्वप्नांबद्द्ल टिपण लिहतो, आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्याला डोळ्यांसमोर उभे करतो. - प्रसिद्ध उद्योगपती अझीम प्रेमजींना त्यांच्या यशाचे रहस्य विचारले तर ते म्हणाले, “यश दोनदा मिळते, एकदा मनात आणि दुसऱ्यांदा वास्तव जगात!” ४) *Exercise – (व्यायाम)* - शरीरातुन आळसाला पळवुन लावण्यासाठी, शरीरातील उर्जा वाहती ठेवण्यासाठी, मनाने कणखर आणि आनंदी राहण्यासाठी आवश्यक असतो, व्यायाम! - शरीर आळसावलं की मन भ्रष्ट झालंच समजा! - व्यायाम, योगासने, प्राणायाम यांच्या माध्यमातुन उर्जेला वळण न दिल्यास ती अतिरिक्त मैथुनाकडे वळते, आणि माणुस वासनांचा गुलाम बनतो. - वाईट सवयींचा गुलाम झालेल्या माणसातले चैतन्य हरपते, अशा व्यक्तीला एकाकी असल्याची जाणीव अस्वस्थ करते. - तो कशावरच एकाग्र होवु शकत नाही, आणि म्हणुन तो आनंदी होवु शकत नाही, मनात एक अनामिक भय तयार होते. - ह्या सगळ्या दुष्ट श्रंखलेला तोडण्याचा एकच उपाय, तो म्हणजे, व्यायाम करा, डिप्स मारा, सुर्यनमस्कार घाला, पुलअप्स करा, ट्रेडमिलवर घाम गाळा, - शरीरातले चैतन्य जिवंत ठेवा. ५) *Reading – (वाचन)* - पुस्तकं वाचणारी माणसं एका आयुष्यात अनेक आयुष्य जगतात. - पुढच्याच ठेस, मागचा शहाणा, ह्या न्यायाने दुसर्‍यांच्या अनुभवाने शहाणे होणारे लोक जगावर राज्य करतात. - वॉरेन बफे, बिल गेटस, मार्क जुकरबर्ग हे सगळे आठवड्याला दोन पुस्तके वाचून पूर्ण करतात. ६) *Scribing – (लिहिणे.)* - माझे ठाम मत आहे, की माझ्या आयुष्यातल्या खडतर काळात मी जर लिहीत राहीलो नसतो तर मी आज जिवंत राहीलो नसतो. - लिहिल्याने तुमची तुमच्याशी नव्याने भेट होते. - लिहिल्याने मन रिकामे होते, दुःख नाहीसे होते, मनात नव्या उर्जेचा संचार होतो. - लिहल्याने नवे रस्ते उघडतात, नव्या प्रगतीच्या वाटा खुलतात. - म्हणुन संतानी सांगून ठेवले आहे, दिसामाजी काहीतरी लिहीत जावे. - लिहणं, हे सुद्धा स्वसंवादाचं प्रभावी साधन आहे. - लिहिल्याने विचार पक्के होतात. - सकाळी उठल्यावर आज दिवस भर मी काय करणार आहे, ते लिहावं, - एखादी समस्या छळत असेल तर ती लिहून त्याचे उपाय लिहावेत, - मनाला स्वप्नांच्या आकाशात मुक्त पणे पाठवुन कागदावर स्वप्ने रेखाटावीत. - ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मी काय काय करणार आहे, त्याचं प्लानिंग, नियोजनही लिहावं, - आणि रोज स्वतःला कामे नेमुन द्यावीत, आणि पुर्ण झाली की स्वतःला विजयी घोषित करावं. - लिहिल्यानं मन मोकळं होतं, चिंतांचं ओझं हलकं हलकं होतं! - जवळच्या व्यक्तीला पत्रं लिहावीत, कधी प्रेरणादायक किस्से कहाण्या लिहाव्यात. - अशाने अंतरंग फुलुन येतात, उर्जेचा स्रोत खळखळत वाहतो. ह्या सहा सवयींपैकी प्रत्येक सवय आयुष्य बदलुन टाकणारी आहे. वरील सहा सवयींपैकी किती सवयी तुम्ही स्वतःला लावुन घेतल्या आहेत. मला ह्या सगळ्या सवयींचा खूप खूप फायदा झाला . तुम्हालाही ह्या सवयी उपयुक्त ठरतील. सुदैवाने म्हणा अथवा दुर्दैवाने म्हणा, पण आता आपल्यापैकी प्रत्येकाकडे भरपूर रिकामा वेळ आहे...तो वेळ नकारात्मक पोस्ट वाचून त्यावर चिंतन करण्यात वाया घालवावा की वरील पैकी कोणत्याही एका किंवा जमत असल्यास सर्वच गोष्टी अमलात आणण्यासाठी प्रयत्न करायचा हे सर्वस्वी आपणच ठरवायचे आहे...कोणतीही गोष्ट अंगवळणी पाडण्यासाठी किमान 21 दिवसांचा सराव आवश्यक असतो...आणि आपल्याकडे आता कदाचित 21 पेक्षा जास्त दिवस रिकामे असणार आहेत..तेव्हा या वेळेचा सदुपयोग करून भावी जीवनासाठी सशक्त मन आणि सशक्त शरीर बनवू.... अशी वेळ व संधी पुन्हा येणार नाही व ती येऊ ही नये..... वेळ आहे स्वतःवर काम करण्याची....स्वतःसाठी जगण्याची.....आलेल्या परिस्थीचा फायदा करून घेण्याचा *काळजी घ्यायची आहे,काळजी करायची नाही.* मराठी शायरी संग्रह - https://goo.gl/vD1pJR

0 कॉमेंट्स • 0 शेयर

समुद्रात अपघात होतो.* *त्याच बोटीवर एक जोडप (पती-पत्नी) प्रवास करत असतात.* *ते दोघेही एकमेकांचे जीव की प्राण असतात. बोटीच्या अपघातामुळे ते एकमेकांना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असतात.* *त्यांची नजर आधारासाठी काहीतरी शोधण्यासाठी चहूकडे भीरभीरत असते.* *आणि अचानक त्यांना एक जीवरक्षक बोट दिसते.* *एका म्हणीत म्हटलेल आहे की,* *"डुबत्याला काठीचा आधार"* *अगदी तसच होते, ते दोघेही जिवाच्या आकांतान त्या जीवरक्षक बोटीजवळ येतात.* *परंतु त्यांची घोर निराशा होते. *त्यांना दिसत की, बोटीत फक्त एकच जागा शिल्लक आहे.* *पती, पत्नीला बुडत्या बोटीवर मागे ठेउन जीवरक्षक बोटीत उडी मारतो.* *पत्नी बुडत्या बोटी वर थांबते.* *बोट पाण्याखाली जाण्याआधी ती पतीकड़े पाहून जीवाच्या* *आकांताने काही तरी ओरडून सांगण्यांचा प्रयत्न करते.* *शिक्षक गोष्ट सांगायचे थांबवतात.* *वर्गात निरव शांतता* *वर्गातील प्रत्तेक विद्यार्थी अगदी मन लावून तल्लीन होवून गोष्ट ऐकण्यात गुंग झालेला असतो.* *अनपेक्षितपणे शिक्षकांनी गोष्ट सांगायची का थांबवली हा प्रत्तेकालाच प्रश्न पडलेला असतो. आणि तेवढ्यात शिक्षक वर्गातील मुलांना विचारतात की,* *पत्नी पतीला काय म्हणाली असेल?* *बहुतेक विद्यार्थी तर्क करुन सांगतात की, पत्नी पतीला म्हणाली असेल,* *'मला तुम्ही धोका दिलात, मी तुम्हाला ओळखलेच नाही, तुम्ही स्वार्थी आहात..!'* *प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपआपली मते मांडली. तेवढ्यात शिक्षकांचे एका विद्यार्थ्याकडे लक्ष जाते.* *एक मुलगा मात्र गप्पच असतो.* *शिक्षक त्याला विचारतात,** *"अरे, तुला काय वाटते ते पण सांग!"* *तो मुलगा म्हणतो,* *"गुरुजी, मला वाटत, त़ी म्हणाली असेल, मुलांना सांभाळा..!"* *शिक्षक चकित होउन विचारतात, "तुला ही गोष्ट माहीत आहे का?"* *तो नकारार्थी मान हलवतो आणि म्हणतो,* *"नाही गुरुजी, मला माहित नाही. पण; माझी आई वारली तेंव्हा शेवटच्या श्वासाला ती हेच म्हणाली होती!"* *"तुझे उत्तर बरोबर आहे!"* *शिक्षक हलकेच म्हणाले.* *बोट बुडाली. पतीने घरी जाउन, मुलीला एकट्यानेच लहानाचे मोठे केल.* *खूप वर्षानंतर, वार्धक्याने त्या पतीला जेंव्हा मरण आले तेंव्हा, त्याच्या पश्चात राहिलेले सामान आवरत असताना, त्याच्या* *मुलीला एक डायरी सापडते.* *त्यातून असे समजते की, तीच्या आईला आधीच दुर्धर आजार झालेला असतो.* *आणि ती त्यातून वाचणार नसते. त्यामुळे पतीला स्वत: जीवंत रहाण्याव्यतिरिक्त दूसरा पर्यायच नसतो.* *त्या डायरीत पतीने पुढे लिहिलेले असते,* *"तुझ्या शेजारीच जलसमाधी घ्यायची माझी किती इच्छा होती. पण आपल्या मुलीसाठी मला तुला त्या सागराच्या तळाशी एकटीलाच कायमसाठी सोडून याव लागल!"* *ही गोष्ट आपल्याला सांगण्या मागचा एवढाच उद्देश की, चांगल्या किंवा वाईट कृतीच्या पाठीमागे, कधी कधी मोठी गुंतागुंत असते. जी आपल्या सहज लक्षात येत नाही.* *त्यामुळे वरवर पाहून आपण कुणाहीबद्दल लगेच मत बनवून घेउ नये.* *जे कोणत्याही कामात पुढाकार घेतात, ते मुर्ख असतात म्हणून नव्हे तर त्याना त्यांची जबाबदारी कळते म्हणून.* *जे भांडल्यावर आधी क्षमा मागतात, त्यांची चुक असते म्हणून नव्हे,तर त्यांना आपल्या माणसांची पर्वा असते म्हणून.* *जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे, तर ते तुमच्यावर मनापासून आपले मानतात म्हणुन...!*🌹 मराठी शायरी संग्रह - https://goo.gl/vD1pJR

0 कॉमेंट्स • 0 शेयर

*नियतीची एक सणसणीत चपराक* *माणुसकी ,स्वच्छता , निस्वार्थीपणा , कुटुंब व्यवस्था , पैशांचा दुरुपयोग, व्यसनाधीन होणे,विलासीपणा , ऐशारामी जीवन , विनाकारण केले जाणारे प्रवास , देवस्थानांच वाढलेलं प्रस्थ , श्रीमंती , माजमस्ती ,वडीलधाऱ्या सोबत उद्धटपणे बोलणे , सत्तालोलुपता , मग्रुरी , गुंडगिरी , जगण्याचा अर्थ , मरणाची भीती , केलेल्या वाईट कृत्यांची आठवण , समारंभात केलेला पैशांचा अपव्यय , निकृष्ट जीवन शैली , अशा अनेक गोष्टी शिकवायला आलेला हा एक संदेश आहे .* *पूर्वीच्या परंपरा विसरून आम्ही आधी तुळशीला घराबाहेर काढलं ! " त्याला काय होतंय ? " हा प्रश्न विचारणाऱ्या नवीन पिढीला हा चांगलाच झटका आहे , सकाळी शुचिर्भूत होणे ही संकल्पना हळू हळू लयास चालली होती . कधीतरी वाट्टेल तेव्हा अंथरुणातून उठून " शॉवर " खाली दोन मिनिटं उभे रहाणाऱ्या पिढीला , आता दोन दोन मिनिटाला हात धुवावे लागत आहेत . घरात, कापूर , उदबत्ती , देवापुढे दिवा ह्या सगळ्या गोष्टींना अंधश्रद्धेच्या सोईस्कर नावाने फाटा दिला गेला होता. आता त्याच कापरासाठी मॉल मध्ये लाईन लागलीय . संध्याकाळची उदबत्ती लावून म्हटलेली रामरक्षा ही वरदान ठरतेय . घरी आल्यावर आधी पायावर पाणी घेणारी आपली संस्कृती सोडून बुटासकट बेडवर झोपून , बूट मोजे काढून भिरकवणारे आता चांगलेच पोळले आहेत. धूप, दीप, नैवेद्य, आरतीमुळे प्रसन्न होणारं घरातलं वातावरण आता कमालीचं गढूळ झालं होतं. पुण्यामुंबई सारख्या ठिकाणी तर " घरचं जेवण " लोक हळू हळू विसरत चालले होते. आता त्याची नितांत गरज भासतेय. उठलं की सुटलं. प्रत्येक सुट्टीला गाडी घेऊन पर्यटन हेच जीवन असं थोडं वाटायला लागलं होतं, त्यावर पण थोडा आळा बसेल. अंधश्रद्धेच्या नावाखाली आपणच आपल्या संस्कारांची दिलेली तिलांजली आता आपल्याच बोकांडी बसलीय . सणासुदीच्या रूपाने पूर्वजांनी केलेली रचना किती वेडगळ पणा आहे हे शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध करणारी पिढी आता त्या मार्गाचा अवलंब नक्की करेल असं वाटायला लागलय .* *शेवटी निसर्गापुढे सगळे सारखेच . रस्त्यावरच्या भिकाऱ्याला किंवा स्कॉर्पियोमधून फिरणाऱ्या श्रीमंताला " मास्क " बांधून फिरायची वेळ आलीय .* *हे मानवा....... तू कितीही पुढारलास तरी शेवटी तुझ्या जगण्याची गुरू किल्ली फक्त त्या नियंत्याकडेच आहे . त्यामुळे त्याचं स्मरण कर . जैन मुनींनी तोंडाला फडकं बांधलेलं बघून हसणारे आज तेच करताहेत . फक्त त्यांचा उद्देश कीटक मरू नयेत हा होता . पण आज आपला उद्देश फक्त आपण जगावं हाचआहे .* *पुराण ,ग्रंथ ,उपनिषदे यांच्यावरची धूळ झटका तरच हा झटका पचवण्याची ताकद तुमच्यात येईल. अन्यथा वडापाव, बर्गरच्या पिढीला असे कितीतरी कोरोना दर चार वर्षांनी झेलावे लागतील त्यासाठी.......*. *हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे ,* *आरोग्य दे , सर्वांना सुखात ,आनंदात , ऐश्वर्यात ठेव* *जगावरील संकट टाळून सर्वांना उदंड आयुष्य दे*. *सर्वाचं भलं कर,कल्याण कर,रक्षण कर आणि तुझे गोड नाम सर्वांचे मुखात अखंड राहू दे. ही प्रार्थना* 🙏 🙏 मराठी शायरी संग्रह - https://goo.gl/vD1pJR

0 कॉमेंट्स • 0 शेयर

0 कॉमेंट्स • 1 शेयर