+12 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 27 शेयर

+13 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 19 शेयर

+3 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 6 शेयर

+5 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 4 शेयर

+4 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 5 शेयर

+9 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 6 शेयर

+14 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 6 शेयर

*■ सिध्दबोध* *◆ ६८ 】 मृत्यू* °-°-°-°-°-°-°-°-°-°- संपूर्ण आयुष्यभर मनुष्य अनंत कल्पना करतो. फक्त एकाच विषयाची साधी कल्पनाही तो करीत नाही किंवा तो विषय चुकून सुद्धा त्याच्या मनात येत नाही. तो विषय म्हणजे मृत्यू. मृत्यू केवळ शब्दउच्चार सुद्धा माणसाला भयानक वाटतो. रोज शेकडो माणसे मरत असतांना मानवाला वाटते छे ! आपल्याला मृत्यू येणार नाही. म्हणजे अगदी पन्नास साठ वर्ष तरी येणार नाही. अशी सुखद कल्पना करून मनुष्य मृत्यूचा विषय मनातून झटकून टाकतो. मनुष्याच्या मनात मृत्यूची ही भीती अनंत काळापासून वास करून राहिलेली आहे. जगण्यासाठी मानवाची सतत धडपड चाललेली असते आणि तरीही पुढचा क्षण त्याच्या हातात नसतोच. खरे पाहिले तर मानवजन्म हा मागील अनेक जन्मातील झालेल्या चुकांची दुरुस्ती करण्यासाठी असतो. स्वतःला सुधारण्यासाठी असतो , परंतु तसे न घडता जर मनुष्य केवळ पोट भरण्यासाठीच जगू लागला. तर दीर्घायुष्याचा तरी उपयोग काय ? जो पुढच्या तासाला मरण्याची तयारी ठेवतो , तो योगी किंवा तपस्वी होतो. पुढच्या तासाला मरायचे आहे असे जीवाला सांगत तो साधना करीत राहतो व शेवटी मृत्यूला मारून उरतो. दूरदृष्टीचा लाभ असलेला मनुष्य जीवनाची अशाश्वताता ओळखून सदैव ईश्वरभक्ती , साधुसेवा , परोपकार , दान , व सज्जनता यांची जोपासना करून स्वतःला मृत्यूपूर्वीच तयार करून ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्याला ठाऊक असते की मृत्यू कुठल्याही क्षणी झडप घालील म्हणून तो सदैव सत्कर्मात मग्न राहतो. वेळेचा सदुपयोग करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो. तर असा हा मृत्यू केव्हाही येऊ शकणारा. इच्छा असो वा नसो तो आल्याशिवाय राहतच नाही आणि तरीही या मृत्यूची भयानक भीती मानवाला वाटत राहते. परंतु प्रत्यक्षात जेव्हा मनुष्य मरतो तेव्हा त्याला खूपखूप आनंद होत असतो. कारण त्याच्या लक्षात येते की आजपर्यंत मी देहरूपी पिंजऱ्यात अडकलेला होतो. माझ्या पूर्वसंचिताने मला हाडामासाच्या गोळ्यात नरदेहात कोंबून ठेवलेले होते व आजपर्यंत ' देह म्हणजेच मी ' अशी खोटी धारणा आयुष्यभर वागवून नश्वर देहाला खाऊ-पिऊ घालून सजवित-नटवीत होतो त्याचे प्रमाणाबाहेर लाड करीत होतो. मृत्यूनंतर लक्षात येते की देह म्हणजे फक्त एक वाहन होते व हे वाहन मी पृथ्वीवर फेरफटका मारण्यासाठी भाड्याने घेतले होते. परंतु या वाहनाचा उपयोग आत्मिक प्रगतीसाठी करून न घेता या वाहनाचा उपयोग परमेश्वराच्या दिशेने प्रवास करण्याकरिता न करता मी मरेपर्यंत त्या वाहनाला सजवित-नटवीत त्याची सेवा करीत राहिलो. जीवाला मृत्यूनंतर खरी जागृती येते. त्याला कळून चुकते , खरे स्वातंत्र्य खरा जिवंतपणा देहाच्या बाहेर आहे ; देहाच्या आत नाही. स्वातंत्र्यामुळे तो आनंदीत झालेला असतो. त्याला कुणाचीही व कशाचीही माया राहिलेली नसते. पण एका गोष्टीचा खेद वाटत राहतो की विशिष्ट आध्यात्मिक उंची गाठेपर्यंत देहरूपी वाहनांची अत्यंत आवश्यकता असते व परमेश्वराने देहरूपी वाहन दिलेले असताना आपण त्याचा वापर परमेश्वराच्या दिशेने किंवा विशिष्ट आध्यात्मिक उंची गाठण्याच्या दिशेने प्रवास करण्याकरिता न वापरता त्या वाहनालाच आयुष्यभर घासत पुसत बसलो. देवाने गाडी दिली पण त्या गाडीने प्रवास न करता त्या गाडीचीच सेवा करण्यात आयुष्य खर्ची घातले. ह्या गोष्टीचा त्याला पश्चाताप होतो , पुढील आध्यात्मिक उंची गाठण्यासाठी नरदेहाची गरज असते. ती निश्चय करतो की या खेपेला जन्म मिळविल्यापासून अगदी सावधगिरीने वागायचे व आध्यात्मिक प्रगती साधून घ्यायची. असे म्हणून तो नर जन्म प्राप्त होण्यासाठी धडपडू लागतो. यथावकाश त्याला नरजन्म प्राप्त होत जातो पण मायेचा वारा लागताच तो पुनश्च अज्ञान अंधकाराच्या भोवऱ्यात सापडतो , व देहरूपी गाडीची सेवा करण्यासाठी म्हणजे पोटासाठी , प्रतिष्ठेसाठी , मानसन्मानासाठी धडपडने , अहंकाराने वागणे इ. सुरु होते. जीवाला या जन्म मृत्यू या संसार बंधनातुन सोडविण्यासाठी श्रीगुरु भूतलावर प्रकट होतात. ते मानावांमध्ये आत्मजागृती निर्माण करतात. किंवा मानवाकडून सेवा करून घेतात. व मृत्यूनंतर त्याला अशी आध्यात्मिक उंची देतात की पुन्हा त्याला नर देहाची गरज भासणार नाही. ---------------------------------------- *ऊँ चैतन्य गगनगिरी नाथाय नमः* ----------------------------------------

+10 प्रतिक्रिया 2 कॉमेंट्स • 6 शेयर