🚩🚩🙏🚩🚩 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🙏🌹 सुमंगल_सुप्रभात 🌹🙏 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ 💢💐💢💐💢🕉💢💐💢💐💢 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ ☸🔆 दास-वाणी 🔆☸ ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ आपुले शक्तिनुसार । भावें पुजावा परमेश्वर । परंतु पुजूं नये हा विचार । कोठेंचि नाहीं ।। तुम्ही श्रोते जगदीशमूर्ति । तेथे माझी व्युत्पत्ती किती । बुद्धिहीण अल्पमती । सलगी करितों ।। ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🙏‼ जय जय रघुवीर समर्थ ‼🙏 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ आपली जितपत व्यावहारिक ऐपत भक्तीभाव आणि अध्यात्मिक शक्ती असेल त्यानुसार परमेश्वराचे पूजन करावे, करत राहावे असेच शास्त्रामधे सांगितलय. पुजा करूच नये असे कोणीही कोठेही म्हटलेले नाही. तुम्ही सभेमधील श्रोते तर प्रत्यक्ष जगदीशाच्या मूर्ती आहात. तुमच्या समोर माझे ज्ञान ते कितीसे असणार ? मी बुद्धीहीन आहे. अल्पमती आहे. तरीही आपुलकीच्या नात्याने मी तुमच्याशी सलगी करतोय. तुम्हा संतांच्या साक्षीनेच मी माझ्या बोबडया बोलांनी भगवंताची स्तुती करणार आहे. श्रोतेहो तुमच्या आशिर्वादाच्या अपेक्षेने मी ग्रंथलेखनाला सुरूवात करतानाच तुम्हाला वंदन करतोय. ⛳🍃⛳🍃⛳🌈⛳🍃⛳🍃⛳ 🙏‼श्री राम जय राम जय जय राम ‼🙏 🌅🔮🌅🔮🌅🌈🌅🔮🌅🔮🌅

+40 प्रतिक्रिया 5 कॉमेंट्स • 22 शेयर

🚩🚩🙏🚩🚩 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🙏🌹 सुमंगल_सुप्रभात 🌹🙏 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ 💢🍄💢🍄💢🕉💢🍄💢🍄💢 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🙏‼श्री संत तुकाराम महाराज ‼🙏 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🎪 🔆गाथा अभंग - निरुपण 🔆🎪 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ वेदाचें गव्हर न कळे पाठकां । अधिकार लोकां नाहीं येरां ॥१॥ विठोबाचें नाम सुलभ सोपारें । तारी एक सरे भवसिंधु ॥ध्रु.॥ जाणत्या असाध्य मंत्र तंत्र काळ । येर तो सकळ मूढ लोक ॥२॥ तुका म्हणे विधि निषेध लोपला । उच्छेद या जाला मारगाचा ॥३॥ ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✴🔆 निरुपण 🔆✴ ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *वेदपथं करणाऱ्या सर्व पंडिताना वेदाचा सार कळतोच असे नाही, इतराना वेद पठनाचा अधिकार नसल्यामुळे त्यांना वेदाचे सार कळण्याचा संबंधच येत नाही* *विठ्ठलाचे नाम हे सुलभ-सोपे आहे, भवसागर पार करणारे आहे, ते घेण्याचा अधिकार मात्र सर्वांना आहे.* *मंत्रतंत्र जाणणाऱ्या जाणकारांना कर्मकांड परिपुर्णरीत्या साध्य होत नाही, तर इतराना कसे समजणार ? तुकाराम महाराज म्हणतात, वेदांमधील विधिनीशेध लोप पावल्यामुळे हां मार्ग खुंटला आहे, त्यामुळे कलियुगात नामभक्तीवीणा दूसरा पर्याय नाही.* 🌅🍃🌅🍃🌅🌈🌅🍃🌅🍃🌅 🙏‼जय श्री राम कृष्ण हरी ‼🙏 🏵🔮🏵🔮🏵🌈🏵🔮🏵🔮🏵

+13 प्रतिक्रिया 3 कॉमेंट्स • 12 शेयर

🚩🚩🙏🚩🚩 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🙏🌹 सुमंगल_सुप्रभात 🌹🙏 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ 💢🔮💢🔮💢🕉💢🔮💢🔮💢 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✳🔆 दास-वाणी 🔆✳ ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ भगवद्वचनी अविश्वासे । ऐसा कवण पतित असे । भगवद्वाक्याविरहित नसे । बोलणें येथीचें ।। अभिमानें उठें मत्सर । मत्सरें ये तिरस्कार । पुढे क्रोधाचा विकार । प्रबळे बळें ।। ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🙏‼ जय जय रघुवीर समर्थ ‼🙏 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ माझ्या या दासबोधामधे मी अनेक धर्मग्रंथांचा संदर्भ घेत घेत लिखाण केले आहे. वेद उपनिषदे ही प्रत्यक्ष भगवंताची वचने आहेत. माझ्या ग्रंथामधे मी त्याव्यतिरिक्त काहीच लिहिलेले नाही. प्रत्यक्ष भगवंताच्या उपदेशावर अविश्वास कोणी अभागी करू शकेल काय? पूर्ण ग्रंथ वाचल्याशिवाय जो नावे ठेवतो तो अहंकारी दुरात्माच मानावा. दुराभिमानाची वरची पायरी मत्सर ! ग्रंथ चांगला असला तरी नावेच ठेवणार. मत्सरामधून वाचायच्या आधीच ग्रंथाचा तिरस्कार सुरू होतो. तिरस्काराची शेवटची पायरी म्हणजे आत्यंतिक क्रोधाची भावना. सद् ग्रंथाविषयी इतकी टोकाची विपरीत भावना असल्यावर इहलोकही साधणार नाही. परमार्थ तर फार दूरची गोष्ट . 🦚🍃🦚🍃🦚🌈🦚🍃🦚🍃🦚 🙏‼श्री राम जय राम जय जय राम ‼🙏 🥦🌅🥦🌅🥦🌈🥦🌅🥦🌅🥦

+16 प्रतिक्रिया 3 कॉमेंट्स • 32 शेयर

🚩🚩🙏🚩🚩 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🙏🌹 सुमंगल_सुप्रभात 🌹🙏 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ 💢🦚💢🦚💢🕉💢🦚💢🦚💢 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🏝🔆 दास-वाणी 🔆🏝 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ नाभीपासून उन्मेषवृत्ती । तेचि परा जाणिजे श्रोतीं । ध्वनिरूप पश्यंती । ह्रदईं वसे ।। नाभिस्थानीं परा वाचा । तोचि ठाव अंत:कर्णाचा । अंत:कर्णपंचकाचा । निवाडा ऐसा ।। ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🙏‼जय जय रघुवीर समर्थ ‼🙏 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ नाभीस्थानी मणिपूर चक्र आहे. तिथे जे विचाराचे पहिले स्फुरण होते, ती परावाणी. हे वाणीचे पहिले प्रकटीकरण होय. पश्य म्हणजे पाहाणे. परावाणीमधील स्फुरणाचा विस्तारपूर्वक विचार पश्यंतीमधे होतो. तिचे आकलन ह्रदयामधे अनाहत चक्रामधे होते.इथे अनाहत सूक्ष्म ध्वनीचे रूप त्या वाणीला येते. पुढे मध्यमा, स्थान कंठ. इथे अधिक स्पष्टता वाणीला येते. शेवटी वैखरी वाणी. जीभेवाटे शब्द व्यक्त होऊन समोरच्या व्यक्तीला ऐकू येतात. नाभीस्थानी असलेली परावाणी हे शांत निर्मळ अंत:करणाचे प्रतीक मानली जाते. त्यातूनच पुढे मन बुद्धी चित्त अहंकार हा अंत:करणपंचकाचा विस्तार होत जातो. 🍄🍃🍄🍃🍄🌈🍄🍃🍄🍃🍄 🙏‼श्री राम जय राम जय जय राम ‼🙏 💐☘💐☘💐🌈💐☘💐☘💐

+36 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 22 शेयर