[1/15, 5:13 PM] Sangale Samadhan: ❄❄❄❄❄🏵️❄❄❄❄❄
*स्त्रियांनी भांगात कुंकू किंवा सिंदूर भरल्याने होणारे लाभ*
*🔹पतीमध्ये क्षात्रतेजरूपी ज्योत सतत तेवत रहाणे ‘सुवासिनी स्त्रियांच्या भांगातील कुंकू किंवा सिंदूर पाहून हिंदु पुरुषांना शत्रूशी लढण्यासाठी मारक शक्ती आणि चैतन्य मिळून त्यांची क्षात्रवृत्ती अन् उत्साह वाढत असे. पतीमध्ये क्षात्रतेजरूपी ज्योत सतत तेवत ठेवण्यासाठी सुवासिनी स्त्रियांनी कुंकू किंवा सिंदूर यांचा कपाळावर किंवा भांगात लावण्यास वापर करणे, हे मानसिक आणि आध्यात्मिक या दोन्ही कारणांसाठी योग्य आहे. (युद्धासाठी जाणार्या पुरुषांनीही सतत स्वतःला सात्त्विकता, मारक शक्ती आणि चैतन्य मिळण्यासाठी कपाळाला कुंकू किंवा सिंदूर याचा टिळा लावावा.)*
*🔹वाईट शक्तींपासून संरक्षण.*
*स्त्रियांचे मस्तक पुरुषांच्या मस्तकाच्या तुलनेत मऊ आणि संवेदनशील असते. केसातील भांगाचा भाग हा मध्यभागी असल्याने तो सर्वाधिक संवेदनशील असतो. या भागाचे वाईट शक्तींपासून रक्षण होण्यासाठी भांगात सिंदूर भरला जातो.*
*🔹सिंदुरापेक्षा कुंकवाचा वापर करणे अधिक योग्य.*
*कुंकवातील मारक तत्त्वामुळे स्त्रीच्या सूक्ष्मदेहाचे वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून संरक्षण होते आणि कुंकवातील चैतन्यामुळे तिचा सूक्ष्मदेह सात्त्विकता ग्रहण करतो. त्यामुळे त्याची शुद्धी होण्यास साहाय्य होते. सिंदुरामध्ये कुंकवाच्या तुलनेत मारक तत्त्व अल्प प्रमाणात असते; त्यामुळे सिंदुरापेक्षा कुंकवाचा वापर करणे अधिक योग्य आहे.*
❄❄❄❄❄🏵️❄❄❄❄❄
[1/15, 8:30 PM] Sangale Samadhan: पायाभरणी
बांधकाम पायाभरणीत टाकावयाच्या वस्तू
1) नारळ, नारळाचे साल काढून शेंडी ठेवा, श्री सुक्त, एकवेळा ,वल्गला सुक्त एक वेळ, कालभैरव अष्टक एक वेळ वाचुन नारळ मध्यावर बुजवून ठेवा ,
2) एक रुपयाचे काँइन्स घेऊन (९) त्यावर कालभैरव अष्टक वाचुन ते पुर्ण ल्पाँटवर आठ बाजु आणि मध्यभागी ठेवावे.
3) रक्षाकवच - रक्षा पाडुन त्या रक्षेवर स्वामीमंत्र अर्धातास करावा. आणि ती रक्षा पुर्ण ल्पाँटवर आणि सिंमेट मध्ये कालवावी ,
4)दरवाजा (मुख्य)चौकट खाली शनिचे दान ठेवावे .काळ्या कपड्यात घोड्याची नाल, खिळा, काजळ डबी, गोकर्णाच्या बिया, कींवा निळे फुल.
ऊडीद, काळे मीठ, बांधून चौकट ठेवण्या अगोदर खाली ठेवावे.
5) कुदळ टाकते वेळ भटजींनी दीलेल्या दगडावर भुसुक्त वाचावे आणि तो दगड वास्तूच्या मध्यावर बुजवून ठेवा
टीप - वरील सर्व स्तोत्र आणि सुक्त नित्यसेवा ह्या पुस्तकात आहे
‼️श्री स्वामी समर्थ ‼️
✍️ सौ ज्योतीताई यशवंतराव दुसाने पाचोरा जि जळगांव महाराष्ट्र साईपार्क वय वर्षे 56.🖋
[1/15, 8:30 PM] Sangale Samadhan: स्वभाव (चांगला आणि जालिम)
श्री स्वामी समर्थ
स्वभाव कसा असावा हा विषय नाही. पण कसा आहे आणि जोडीदाराचे वागणे कसे आहे, समोरच्या व्यक्तीला काय त्रास होतो हा विषय आहे. कुणाचा स्वभाव फार भोळा असतो, व्यक्ती ओळख लवकर होत नाही. आणि ओळख होते तेव्हा खूप वेळ निघून गेलेली असते.
तर कुणाचा स्वभाव फार चंचल असतो. विषेशता आपली चुक कबुल न करणे. चोरावर मोर होने. चोराच्या उलट्या बोंबा असन. कामचोर असुन समोरच्या व्यक्तीच्या कष्टाकडे दुर्लक्ष करणं. स्वतःमध्ये अवगुण असुन कुणाचे सत़गुण कबुल न करणं. कुणाचे कौतुक होतांना पहावले न जाने.
कुणाच्या भोळे पणाचा फायदा घेणे आणि कामं झाले म्हणजे भाडंन उकरुन बाजुस होने.
तसेच काही घरांमध्ये कुटुंबात प्रमुख एखादी व्यक्ती स्री कींवा पुरुष असतात, कुटुंब प्रमुख म्हटले की सत्ता हाती असते. काही महाभाग विचारु नये असे वागतात. सर्व काही कुलुपबंद, त्यात खाद्य पदार्थ ही, नवे कपडे, लोकरी कपडे, देण्याघेण्याचे कपडे. अगदी टुथपेस्ट आणि मंजन ही कुलुप पँक असते, काही घरामध्ये स्रिया, सुना यांना कुटुंब प्रमुखांना विचारले शिवाय साखर काढणेची ही परवानगी नसते .(हे खरं आहे की काटकसर करावी, उधलमानकी करु नये. पण हे असे कुढवर चांगले आहे) ....?
मणुष्याला मणुष्यासारखे न वागवता पशु सारखे वागवतात. कुणास खूप भुक लागली तरी अगोदर जेवनाची परवानगी नसने, किंवा टोचुन बोलन. आजारी आहे अशक्त आहे तरी रोजचा पुर्ण रहाडा आवरणं. स्वतःसाठी काहीच खर्च मोजायचा नाही पण इतरांसाठी थोड जरी केले तरी बोलून दाखवणे.
घरातील सुनां आणि स्रीयांना दुयम स्थान देण्यात काहीच कसर न ठेवणे.
खोट बोलण्यामुळे इतरांना होणारा त्रास तर फार भयानक असतो. सर्रास तोडांवर ही खोट बोलणे. आता कुटुंब प्रमुख म्हटल की मान ही मोठाच असतो
ते कींवा त्या कश्याही वागल्या तरी कुणी तोडांवर न बोलता निमुट सहन करणारा मणुष्य रोज असे होत राहील्यास याला कंटाळून दुर होण्याचा प्रयत्न करतात. कींवा जीवनात नैराश्याच्या गर्तेत अडकलेल्या एकांताचा अनुभव घेतात.
उदाहरणार्थ - जेवत असताना हे सांगणार आज स्वयपांक केला नाही आणि जेवायला वाढले नाही.
आता अशा वातावरणात गुदमरायला होते कबुल आहे पण नित्य मरे त्याला कोण रडे. शेवटी हे घर त्यांचेही असते, जरी ते कुटुंब प्रमुख नसले तरी त्यांनाही त्याच घरात रहायचे असते. शेवटी सवय करुन घ्यावी लागते बाकी सदस्यांना .
काय करणार, कुठे जाणार, आपले दात आणि आपलेच ओठ असतात. बरं बाहेर कुणा जवळ बोलायची सवय आणि सोय नसते. अजुन बाहेरचे म्हमांजी कठीण असतात. बाहेर मंधरा, कैकयी, शकुनी, दुर्योधन, रावण, कंस अगदी सर्वच तयार बसलेले असतात .म्हणुन घरातले लोखंडाचे चणे घरातच दलायचे असतात.
एक मात्र खरे की असे कुटुंब प्रमुख असनार्या घराचे सदस्य नक्कीच पुण्यशिल आणि सहनशील असतात. कारण दुखांचा आहेर तर वैकुंठ माहेर असते... ..!
🖋 सौ ज्योतीताई यशवंतराव दुसाने पाचोरा जि जळगांव महाराष्ट्र साईपार्क गिरनापंपिग रोड ✍️
[1/16, 9:24 AM] Sangale Samadhan: दिनांक: १२ /०१ /२०२१
*२६७. अभंग क्र. ८८*
*सुख पाहतां जवापाडें ।*
*दु:ख पर्वता एवढें ।।१।।*
*धरीं धरीं आठवण ।*
*मानी संतांचे वचन ।।धृ।।*
*नेलें रात्रीनें तें अर्धें ।*
*बाळपण जराव्याधें ।।३।।*
*तुका म्हणे पुढा ।*
*घाणा जुंती जसी मुढा ।।३।।*
जीवनात सुख शोधायला गेलो तर ते जवाच्या दाण्याइतकं छोटसं असतं. पण दु:ख मात्र एखाद्या पर्वतासारखं मोठं असतं. म्हणून संतांच्या वचनाची, संतांच्या उपदेशाची सतत आठवण ठेव, संतांचा उपदेश ऐक. अर्ध आयुष्य तर रात्र घेऊन जाते, बाळपण, जरा म्हणजे म्हातारपण आणि विविध व्याधींमध्ये बरचसं आयुष्य खर्च होतं. तुकाराम महाराज म्हणतात, "अशा वागण्याने अशा वागण्याने घाण्याला जुंपलेल्या बैलासारखा संसाराचा गाड्याला जुंपला जाशील."
जगद्गुरू तुकाराम महाराजांना अवघं चाळीस-एक्केचाळीस वर्षांचं आयुष्य लाभलं. इ. स. १६०८ मध्ये तुकाराम महाराजांचा जन्म झाला आणि इ. स. १६४९ मध्ये तुकाराम महाराज हा इहलोक सोडून गेले. *सांसारिक आयुष्य एक्केचाळीस वर्षांचं लाभलं तरी खऱ्या अर्थाने ज्याला सामाजिक आयुष्य म्हणतात ते फक्त एकोणीस-वीस वर्षांचंच होतं. या अल्प आयुष्यात तुकाराम महाराजांनी हजारो अभंग रचले, सांसारिक सुखदुःखं अनुभवली आणि सामाजिक सुखदुःखांवरही भाष्य केलं. समाजाच्या हाडीमांसी रुजलेल्या जुनाट रुढी, परंपरा, अंधश्रद्धा, देवाधर्माच्या नावावर माजवण्यात आलेलं कर्मकांड आणि होत असलेलं शोषण, जन्माधिष्ठीत उच्चनीचता, स्त्रीया आणि शूद्रातीशूद्रांची गुलामगिरी याविरोधात संघर्ष केला. अस्मानी, सुलतानी आणि धार्मिक अत्याचारांमुळे बहुजन समाज अतिशय गतीहीन होऊन गेला होता. रसातळाला पोचला होता. त्यात जीव ओतण्याचं काम तुकाराम महाराजांनी केलं.*
तसं तुकाराम महाराजांचं घराणं चांगलं तालेवार घराणं होतं. त्यांच्या घरात पिढीजात सावकारी होती. शेती होती. बागायत होती. किराणा दुकान होतं. व्यापार होता. पण निरभ्र आकाशात एकाएकी काळे ढग जमा व्हावेत आणि त्यांनी सर्व आकाशच व्यापून टाकावं तसं झालं. थोरला भाऊ सावजी आध्यात्मिक वृत्तीचा होता. त्याच्या पत्नीचं निधन झालं. पत्नीच्या निधनानंतर सावजी एक दिवस कोणालाही न सांगता घर सोडून निघून गेला. त्याने संन्यास घेतला असं सांगितलं जातं.
सुनेचा मृत्यू आणि मुलाचं घर सोडून जाणं यामुळे बोल्होबा, तुकाराम महाराजांचे वडील, खचले. त्यामुळे संसाराचा भार आला फक्त बारा वर्षांच्या तुकारामांवर ! तो त्यांनी यशस्वीपणे पेललाही. तुकाराम महाराजांचं लग्न झालं. त्यांना एक मुलगाही झाला. पण पत्नी सतत आजारीच असायची. म्हणून बोल्होबांनी तुकाराम महाराजांचं दुसरं लग्न पुण्याच्या गुळवे सावकाराच्या मुलीशी करुन दिलं. जरा बरे दिवस आले तोच पुन्हा महाभयंकर दुष्काळ पडला. सतत तीन वर्षांच्या दुष्काळाने सामान्य लोकांची स्थिती त्राही माम्, त्राही माम् अशी झाली. अन्न नाही, पाणी नाही. लोकांनी झाडाचा पाला पोटात भरला. कित्येक लोक अन्न अन्न करत मेले. कित्येकांनी पोटचे गोळे बाजारात विकले. पशूपक्षी किती मेले त्याची तर गणतीच नाही. तुकाराम महाराजांच्या पहिल्या पत्नीचा आणि मुलाचा याच दरम्यान मृत्यू झाला. पाठोपाठ वडिल गेले. आईही गेली. संकटं येतात तेंव्हा एकटी येत नाही म्हणतात. सुखाचे काही क्षण मिळत नाही तोच दु:खाचे पहाड अंगावर कोसळावेत असं आयुष्य सुरु होतं. "सुख पाहता जवापाडे । दु:ख पर्वता एवढे ।।" ही तुकाराम महाराजांची आत्मानुभूती होती.
वैयक्तिक जीवनातली दु:खं माणूस सहन करु शकतो. पण दुष्काळाने सर्वांचीच दैना उडाली होती. आभाळच फाटलं होतं. सभोवतालची परिस्थिती पाहून उद्विग्न झालेले तुकाराम महाराज एके दिवशी घरातून बाहेर पडले ते पंधरा दिवस घरी परतलेच नाहीत. धाकटा भाऊ कान्होबा त्यांना इथे तिथे शोधत होता. पंधराव्या दिवशी त्याला ते भामनाथच्या डोंगरावर सापडले. कान्होबांनी त्यांची समजूत घालून त्यांना घराकडे चालवलं. वाटेत इंद्रायणी लागली. तुकाराम महाराज इंद्रायणीच्या काठावरच थांबले. कान्होबाला घरुन सर्व गहाणखतं आणायला सांगितली. आपल्या वाटेची सर्व गहाणखतं त्यांनी इंद्रायणीत सोडून दिली. मग ते घरी परतले. वैयक्तिक हितसंबंधांवर तुळशीपत्र ठेऊन स्वतः शोषण करणाऱ्या व्यवस्थेतून बाहेर पडले आणि मग समाजाचं शोषण करणाऱ्या व्यवस्थेविरोधात तुकाराम महाराजांनी रणशिंग फुंकलं.
गुलामाला गुलामीतून मुक्त व्हायचं असलं तर सर्वात आधी त्याला आपल्या गुलामगिरीची जाणीव व्हावी लागते. तुकाराम महाराजांनी जनसामान्यांना ही जाणीव करुन द्यायला सुरुवात केली. आणि इथूनच एका नव्या संघर्षाला तोंड फुटलं. प्रस्थापित व्यवस्थेचे लाभार्थी तुकाराम महाराजांवर संतप्त झाले. त्यांनी सुरुवातीला तुकाराम महाराजांची अवहेलना केली, नंतर ते त्यांची चेष्टा करु लागले. त्यानंतर त्यांना तुकाराम महाराजांचा राग यायला लागला. ते कठोर शब्द वापरु लागले. तुकाराम महाराजांच्यावर धर्मपीठापुढे खटला भरण्यात आला. तुकाराम शूद्र असूनही त्यांच्या अभंगातून वेदांचा सार व्यक्त होतो. तुकाराम शूद्र असून ब्राह्मणांकडून पाया पडून घेतात, तुकाराम शूद्र असून स्वतःला गुरु म्हणवतात, असे आरोप त्यांच्या वर ठेवण्यात आले. शिक्षेपोटी त्यांचं घरदार जप्त करण्यात आलं. त्यांचे सर्व अभंग पाण्यात बुडवण्याची शिक्षा देण्यात आली. तुकाराम महाराजांना आपल्या हाताने आपले अभंग पाण्यात बुडवावे लागले. ही गोष्ट त्यांच्या मनाला फार लागली. त्यांनी अन्नपाणी सोडलं आणि त्या डोहाकाठीच धरणं धरलं. एकेक दिवस जात होता तसतशी त्यांच्याभोवताली गर्दी वाढतच गेली. तेरा दिवसांनी बुडालेले अभंग वर आले असं सांगतात. बुडालेले अभंग वर येऊच शकत नाहीत, पण आसपासच्या हजारोंच्या गर्दीच्या मुखाने आपले अभंग ऐकताना तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं असावं की आपले अभंग जनमानसात रुजले आहेत, त्यांना आता कोणी नष्ट करु शकत नाही. चौदा दिवसांनी तुकाराम महाराजांनी उषोषण सोडलं आणि पुन्हा जोमाने हाती घेतलेलं कार्य सुरु केलं. एकदा देवळाभोवतीचा प्रदक्षिणा मार्ग मंबाजीने काटे टाकून बौद केला तेंव्हा तुकाराम महाराजांनी भक्तांना काटे टोचू नये म्हणून ते काटे काढून टाकले. मंबाजी इतका संतापला की त्याच काटेरी फांदीने त्याने तुकाराम महाराजांना रक्तबंबाळ होईतो मारहाण केली. एकदा लोहगावी एका स्त्रीने तुकाराम महाराजांच्या अंगावर उकळतं पाणी टाकलं. तुकाराम महाराजांच्या अनेक अभंगातून या छळांची वर्णनं येतात. *"कोपला पाटील गांवचे हे लोक । आता मज भीक कोण घाली ।।" पासून "लावूनि कोलित माझा करतील घात । सापडलो खोळेमधी ।।"* पर्यंतच्या अनेक अभंगांतून जगद्गुरू तुकाराम महाराज आपल्या छळाचा ताळेबंद मांडतात. या काळात तुकाराम महाराजांचा एक दिवसही असा गेला नाही की ज्या दिवशी त्यांना अपमान, अवहेलना वा मारहाण सहन करावी लागली नाही. *"रात्री दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग ।"* अशा शब्दात तुकाराम महाराजांनी या संघर्ष काळाचं वर्णन केलं आहे. तुकाराम महाराज जेंव्हा म्हणतात, *"सुख पाहता जवापाडे । दु:ख पर्वता एवढे ।।"* तेंव्हा तो त्यांचा स्वतःचा अनुभव असतो.
अशा जीवनात किती गुंतावं हे आपण ठरवायचं असतं. दुसऱ्या चरणात जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात, *"धरीं धरीं आठवण ।*
*मानी संतांचे वचन ।।धृ।।* जीवनात दु:ख फार आहे हे लक्षात ठेवा. आणि संतांचा उपदेश ध्यानी ठेऊन वागा. *चोरीमारी, व्यभिचार यापासून दूर रहा. परधन, परनारीपासून दूर रहा. स्वकष्टाने, उत्तम व्यवहारातून धन मिळवा आणि उदास मनाने खर्च करा. परोपकार करा. भूतमात्रांवर प्रेम करा.* तिसऱ्या चरणात तुकाराम महाराज सांगतात, *"*नेलें रात्रीनें तें अर्धें । बाळपण जराव्याधें ।।३।।*
आयुष्य फार थोडं आहे. त्यातलं अर्ध तर झोपेतच जातं. बाळपण, म्हातारपण, आजारपाजारचे दिवस वजा केले तर शिल्लक किती रहातं ? म्हणून विचारपूर्वक जगा. पुण्याचा संचय करा. पापाचा संचय करु नका. शेवटच्या चरणात तुकाराम महाराज सांगतात, *"तुका म्हणे पुढा । घाणा जुंती जसी मुढा ।।३।।* घाण्याला जुंपलेला बैल गोल गोल फिरत रहातो. आपण फिरुन फिरुन त्याच जागेवर येतो आहे हे बैलाला कळत नाही. त्याच्या डोळ्यावर झापडं बांधलेली असतात. तसंच नुसतं वय वाढतं आहे पण प्रगती काहीच नाही, विकास नाही, बदल नाही, परिवर्तन नाही. सुधारणा नाही. आहे तसाच ठोंब्या आहे. पालथी घागर आहे. वरुन कितीही पाणी ओता, रिकामी ती रिकामीच रहाते. तसं तुमचं होऊ देऊ नका. त्याच त्याच चक्रात फिरत राहू नका. विचारपूर्वक जगा. सुखात उन्मत्त होऊ नका. दु:खात निराश होऊ नका. सर्व अनित्य आहे. सुखही कायमचं रहाणार नाही. दु:खही कायमचं रहाणार नाही. जे थोडं आयुष्य मिळालं ते सफल करा. यातच जीवनाचं साफल्य आहे.
आज भारतातल्या अंधभक्तांची आणि जनतेची अवस्था घाण्याच्या बैलापेक्षा वाईट झाली आहे. घाण्याचा बैल गोल गोल फिरतो, फिरुन फिरुन एकाच जागी येतो. त्याची प्रगती नाही, पण निदान अधोगती तरी नाही. अंधभक्त स्वतःसह संपूर्ण देशाला पतनाच्या मार्गाने वेगाने घेऊन चालले आहेत. हिंसा, द्वेष अन्याय, अत्याचार यांना राजाश्रय लाभला आहे. देशाची अर्थव्यवस्था मोडून पडण्याच्या अंतीम टप्प्यावर उभी आहे. अतिशय थोड्या कालावधीत + ९ वरुन विकासाचा दर - २६ वर पोचला आहे. सामाजिक ऐक्य नष्ट करुन देश दुभंगवू पाहणाऱ्या शक्ती प्रबळ झालेल्या आहेत. अशा परिस्थितीत *आज आपला शिक्षित तरुण काय करत आहे ? शिक्षण-नोकरी-लग्न-संसार-पोरंबाळं-घरसंसार-म्हातारपण आणि शेवटी मरण ! प्राणी तरी यापेक्षा वेगळे काय जगतात ? उच्चशिक्षित, सुशिक्षित म्हणवणारे जर असे जनावरासारखंच जगत असतील तर मग शिक्षणाचा उपयोग काय? तरुणांनी केवळ पोटार्थी न होता, केवळ स्वतःचाच विचार न करता, समाजाचा, देशाचा विचार केला पाहिजे. समाजापुढे आज अनंत समस्या आहेत. बेरोजगारी, दारिद्र्य, कुपोषण, उपासमार, समाजात धुमसत असलेली हिंसा, स्त्रीयांवरचे अत्याचार, पूर्वास्पृश्यांवर होणारे अनाचार, भ्रष्टाचार, जातीयता, धर्मांधता, अंधश्रद्धा, बुवाबाबांचं फुटलेलं पेव, राजकारणात शिरलेले लबाड, ढोंगी, संधीसाधू, सतत ढासळत असलेली सामाजिक नैतिकता अशा अनेक क्षेत्रात करण्यासारखं युवकांना खूप काही आहे. स्वतःच्या आणि स्वतःच्या कुटुंबाच्या पलिकडे जाऊन समाजाच्या उत्थानासाठी, उद्धारासाठी आपली शक्ती आणि बुद्धी यांचा उपयोग करा. जन्माचं सार्थक करा असं तुकाराम महाराज या अभंगातून सांगत आहेत. तुकाराम महाराजांचा पांडुरंग या दीनदुबळ्या सामान्य रयतेत सामावलेला आहे. त्यांची सेवा म्हणजेच ईश्वराची सेवा !*
*जगद्गुरूंचा उपदेश ध्यानी धरु तर हा भवसागर सुखरूप पार करु. आयुष्य सफल होईल. जीवनाचं सोनं होईल.*
*जय जगद्गुरू !*
- उल्हास पाटील
*गाथा परिवार*
gathaparivar.org
9975641677
[1/16, 9:56 AM] Sangale Samadhan: जय हरि माऊली!
आज आपण "कालसर्प दोष" या विषयी माहिती घेणार आहोत.
साधकांनो! मला बर्याच आपल्या समुहातील साधकांचे समस्या आल्या,येत आहे. त्या समस्या मध्ये प्रामुख्याने पितृदोष, कालसर्प दोष आढळून येत आहे.
पितृदोषावर समुहावर बर्याच जाणकार सातत्याने माहीती देत आहे. त्यामुळे साधकांची पितृदोषावरची बरीच भीती कमी होत आहे,पण कालसर्प दोष आहे म्हणलं की बरेच साधक घाबरतात. कारण त्यांना कालसर्प दोष म्हणजे काय? तो कसा समजतो? त्यावर नेमका काय उपाय आहे?
हेच माहीत नसते. मग कोणाकडून काहीतरी चुकीची माहिती मिळते व ते पार गोंधळून जातात. व निराश होतात.
तसेच बर्याच साधकांनी मला कालसर्प दोषा संबंधित माहिती लेख टाकण्याची मागणी केली. याच कारणास्तव हा लेख प्रपंच!
जन्मकुंडलीत कालसर्प दोष हा खूप काही भयंकर आहे, असे मानले जाते. मात्र, तसे नाही. कालसर्प दोष नसून तो एक योग आहे. कालसर्प योगाचा आपल्या जीवनावर काही थोड्याफार प्रमाणावर नकारात्मक प्रभाव आपल्यावर पडू शकतो.
कालसर्प दोष/योग म्हणजे नक्की काय?
त्याचे किती प्रकार आहेत?
त्यावर परिणामकारक उपाय काय? ..
कुंडलीत सर्व ग्रह राहू व केतू यांच्या मध्ये येतात, तेव्हा कालसर्प योग येतो. त्यामुळे हा दोष नसून योग आहे. या योगात राहू सापाचे मुख व केतू शेपटी असतो. यामुळे भविष्यातील काही घटनांची पूर्वकल्पना मिळू शकते, असे सांगितले जाते. हा योग ज्यांच्या कुंडलीत येतो, ते अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही उत्तम प्रकारे यश प्राप्त करू शकतात. अशा मंडळींना अचानक धनलाभ होतो; उच्चाधिकाराच्या जागा मिळतात. मात्र, उलटपक्षी हा योग तीव्र स्वरूपात असेल, तर दारिद्र्यही येते. खूप परीश्रम करून काहीही पदरात पडत नाही. कालसर्प योगाचे खालीलप्रमाणे प्रकार आहेत.....
१) अनंत कालसर्प योग :-
ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत राहू पहिल्या आणि केतू सातव्या घरात असून, इतर सर्व ग्रह या दोन ग्रहांच्या मध्ये आले असतील, तर त्याला अनंत कालसर्प योग म्हणतात. अशा व्यक्तींच्या वैवाहिक जीवनावर परिणाम होतात. विवाह योग लांबतात. मतभेद निर्माण होतात. नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. पहिल्या घरातील राहूच्या अस्तित्वामुळे व्यक्तीला सतत संघर्ष करावा लागतो तर सातव्या घरातील केतुमुळे जोडीदारासोबत असमाधानकारक वातावरण राहते.
२) कुळीक कालसर्प योग :-
ज्या व्यक्तींच्या पत्रिकेत राहू दुसऱ्या आणि केतू आठव्या घरात असून, इतर सर्व ग्रह या दोन ग्रहांच्या मध्ये आले असतील, तर त्याला कुळिक कालसर्प योग म्हणतात. शैक्षणिक समस्या निर्माण होऊ शकतात. खाणे, पिणे, वाईट सवयी यांमुळे वारंवार आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात. अनेक रोग-व्याधी जडू शकतात. पत्रिकेतील द्वितीय स्थान हे धन-स्थान मानले जाते. या प्रकारच्या दोषामुळे माणसाला दारिद्र्य येऊ शकते. कुंडलीत कुलिक कालसर्प योगामुळे गंभीर अपघात होऊ शकतात.
३) वासुकी कालसर्प योग :-
ज्या व्यक्तींच्या पत्रिकेत राहू तिसऱ्या आणि केतू नवव्या घरात असून, इतर सर्व ग्रह या दोन ग्रहांच्या मध्ये आले असतील, तर त्याला वासुकी कालसर्प योग असे म्हटले जाते. यामुळे माणसाच्या आयुष्यात अनेक आघाड्यांवर त्याला अडचणी येतात. प्रयत्नांना यश मिळत नाही. पैसे कमविण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. जन्मकुंडलीतील तिसरे घर हे व्यक्तीची मेहनत दर्शवते. तर नववे घर हे व्यक्तीचे नशीब आणि भाग्य दर्शवते. कुटुंबासाठी अनेक पातळ्यांवर झगडावे लागते.
४) पदम् कालसर्प योग :-
ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत राहू पाचव्या घरात आणि केतू अकराव्या घरात असून इतर सर्व ग्रह या दोन ग्रहांच्या मध्ये आले असतील, तर त्याला पदम कालसर्प योग म्हणतात. यामुळे शिक्षणाची समस्या, प्रेमसंबंध, प्रेम विवाह, आरोग्य आणि दैनिक उत्पन्नाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात, असे मानले जाते. विद्यार्थीच्या जन्म कुंडलीमध्ये हा योग असल्यास अभ्यासात खूप परिश्रम केल्यानंतरही त्यांना चांगले परिणाम मिळत नाहीत.
५) महापदम् कालसर्प योग :-
ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत राहू सहाव्या आणि केतू बाराव्या घरात असून अन्य सर्व ग्रह या दोन ग्रहांच्या मध्ये आले असतील, तर त्याला महा पदम कालसर्प योग म्हणतात. यामुळे नोकरी, सेवा, हितशत्रूंचा त्रास, आरोग्य, अतिरिक्त खर्च, कमी उत्पन्न, सरकारी प्रशासन खात्यांकडून अडचणी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. आपल्याला जर अशा समस्यांशी संबंधित विषयांवर प्रश्न पडत असल्यास तज्ज्ञ व्यक्तीकडून आपल्या कुंडलीचे विश्लेषण केले पाहिजे.
६) शंकफळ कालसर्प योग :-
ज्या व्यक्तींच्या पत्रिकेत राहू चौथ्या आणि केतू दहाव्या घरात असून, इतर सर्व ग्रह या दोन ग्रहांच्या मध्ये आले असतील तर त्याला शंकफळ कालसर्प योग म्हणतात. याचा नकारात्मक प्रभाव बालपणी तीव्र प्रकारे दिसतो, असे सांगितले जाते. पत्रिकेलीत चतुर्थ स्थान हे बालपणीचा काळ दर्शवते. लहान वयात अनेक वाईट सवयी लागणे, शाळा बुडवणे तसेच वाईट मित्रांची संगत, अशा गोष्टींचा सामना करावा लागतो. यामुळे व्यवसाय धंद्यावर तसेच कामावर परिणाम होऊ शकतो.
७) तक्षक कालसर्प योग :-
ज्या व्यक्तींच्या पत्रिकेत राहू सातव्या आणि केतू पहिल्या घरात असून, इतर सर्व ग्रह या दोन ग्रहांच्या मध्ये आले असतील, तर त्याला तक्षक कालसर्प योग म्हणतात. यामुळे आयुष्यावर मोठे परिणाम होऊ शकतात. वैवाहिक जीवनात जोडीदारासोबतचे संबंध बिघडू शकतात. केतू प्रथम स्थानात असल्यामुळे आरोग्यावर परिणाम होतात. या योगात भागीदारीत धंदा करू नये. धंद्यात नुकसान होऊ शकते, असा सल्ला दिला जातो. यामुळे अनेक विरोधक निर्माण होतात.
८) कर्कोटक कालसर्प योग :-
ज्या व्यक्तींच्या पत्रिकेत राहू आठव्या आणि केतू दुसऱ्या घरात असून इतर सर्व ग्रह या दोन ग्रहांच्या मध्ये आले असतील, तर त्याला कर्कोटक कालसर्प योग म्हणतात. या योगामुळे आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर कमनशिबी असल्याचा भास होऊ शकतो. यामुळे वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ घेता येत नाही, असे सांगितले जाते. या कालसर्प योगामुळे मित्र फसवतात. विवाह लांबतात. आरोग्याच्या तक्रारी वारंवार निर्माण होतात.
९) शंखनाद कालसर्प योग :-
ज्या व्यक्तींच्या पत्रिकेत राहू नवव्या आणि केतू तिसऱ्या घरात असून, इतर सर्व ग्रह या दोन ग्रहांच्या मध्ये आले असतील, तर त्याला शंखनाद कालसर्प योग, असे म्हटले जाते. अशा व्यक्तीस त्याच्या वडिलांकडून काही समस्या उद्भवू शकतात, असे सांगितले जाते. वडिलांकडून कोणताही पाठिंबा मिळत नाही. आर्थिक नुकसान, मित्रांकडून फसवणूक, आदी गोष्टींना सामोरे जावे लागू शकते. तसेच अगदी छोटी गोष्ट साध्य करण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात, असे सांगितले जाते.
१०) घातक कालसर्प योग :-
ज्या व्यक्तींच्या पत्रिकेत राहू दहाव्या आणि केतू चौथ्या घरात असून, इतर सर्व ग्रह या दोन ग्रहांच्या मध्ये आले असतील, तर त्याला घातक कालसर्प योग म्हणतात. यामुळे अशा व्यक्तींच्या जीवनात अनेक अडचणी येऊ शकतात. राहू दहाव्या घरात असल्यामुळे त्याला व्यावसायिक जीवनात अडचणी येऊ शकतात. सतत नोकरी तसेच व्यवसाय बदलत राहावे लागतात. आपल्या मातृभूमीपासून दूर राहण्याची वेळ येऊ शकते, असे सांगितले जाते.
११) विषधर कालसर्प योग :-
ज्या व्यक्तींच्या पत्रिकेत राहू अकराव्या आणि केतू पाचव्या घरात असून, इतर सर्व ग्रह या दोन ग्रहांच्या मध्ये आले असतील, तर त्याला विषधर कालसर्प योग म्हणतात. या योगामुळे डोळे तसेच हृदयाचे विकार उद्भवू शकतात. लहान किंवा मोठ्या भावंडांशी असलेले संबंध बिघडतात. पैसा अत्यल्प प्रमाणात असतो. अभ्यासातील प्रगती खुंटते. अर्थार्जनासाठी घरापासून दूर राहावे लागते. आयुष्यात खूप संघर्षाला सामोरे जावे लागते.
१२) शेषनाग कालसर्प योग :-
ज्या व्यक्तींच्या पत्रिकेत राहू बाराव्या आणि केतू सहाव्या घरात असून, इतर सर्व ग्रह या दोन ग्रहांच्या मध्ये आले असतील, तर त्याला शेषनाग कालसर्प योग, असे म्हटले जाते. हा योग असलेल्या व्यक्तींना सापाचे भय सतत सतावते. काहीही कारण नसताना कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागू शकते. आरोग्याच्या तक्रारी वारंवार उद्भवू शकतात. हा योग असलेल्या व्यक्तींना दोनदा विवाहाचे योग असू शकतात, असे सांगितले जाते.
कुंडलीतील कालसर्प योगामुळे वारंवार वाईट स्वप्ने पडतात. स्वप्नात वारंवार साप दिसतात. यावर उपाय म्हणजे
प्रतिदिन श्रीविष्णूंची उपासना केल्यास कालसर्प दोष दूर होऊ शकतो. याशिवाय गोमेद रत्न धारण करणे, नागकृती असलेली अंगठी चांदीत करून परिधान करणे, नागपंचमीचे व्रत करणे, राहू-केतूचे जप करणारी अनुष्ठाने करणे, असे काही उपाय केल्यास कालसर्प दोष दूर होण्यास मदत होऊ शकते.
नाशिक येथील श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे जाऊन पूजा-अनुष्ठान केले गेल्यास कालसर्प दोष दूर होतो.
ज्या व्यक्तींना आपल्या कुंडलीत कालसर्प योग आहे, अशी शंका असल्यास ज्योतिषशास्त्रातील तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेऊनच उपाय करावा.
टिप:- सदरील लेख आस्तिक लोकांसाठी असुन नास्तिक लोकांनी या लेखनाकडे दुर्लक्ष करावे अथवा मनोरंजन म्हणून पहावे पण समूहावर विनाकारण वादविवाद करु नये हि विनंती.
।।श्री स्वामी समर्थ।।
स्वामी सेवक
श्री मनोज देवा
बालमटाकळीकर
९४२२८२६६९०