संस्कृति

*वरमाला नक्की कोणाची* ? परवा मी एका लग्नाला गेलो होतो .लग्न कसले सर्कसच म्हणा ना आता तुम्ही म्हणाल हा असं काय बोलतो . हो विवाह सोहळा हा हल्ली सर्कस पेक्षा कमी नाही . लग्नकार्य हा विधी सोळा संस्कारापैकी एक मग अशा कार्याच आपण सर्कशीत रूपांतर केले आहे का ?मलाही हाच प्रश्न पडतो .जिथे जिथे  मी जातो तिथे वरमाला सारखी पवित्र विधीचा कार्यक्रम असतो तिथे वेगळीच सर्कस चालू असते .मग मला प्रश्न पडतो की नक्की वरमाला कोणाच्या गळयात पडते . अश्याच एका  लग्नाचे विधी पार पडत असताना वरमाला घालायची वेळ आली तेव्हा काही जणांनी नवरदेवाला उचलून खांद्यावर घेतले. नवरीच्या बाजूनी असलेल्या लोकांनी पण नवरीला उचलून घेतले, मग काय कुस्तीचा आखाडा सुरू जवळ जवळ पाच  ते सात मिनिटे हा खेळ चालू होता. वयस्कर लोकांनी  मध्यस्थी केल्यावर कसे तरी वरमाला दोघांच्या गळ्यात पडली . का करतो  असे आपण  लग्न मंडपात एका पवित्र बंधनात दोन कुटूंबीय जोडले जातात ,दोन मनाचं पवित्र असे मिलन होत असते यातून काय सिद्ध करायचं असते लोकांना कधीकधी तर वाटते वरमाला कमी कुस्तीचा आखाडा आहे की काय का कोणी प्रतिस्पर्धी आहे .आपल्या हिंदूधर्मानुसार एखादे कार्य करत असताना ज्यांचे हात त्या कार्याला लागतात तिथे त्या माणसांची उपस्थिती ग्राह्य धरली जाते. उदाहरणच द्यायचे झाले तर पहा नेत्यांच्या वाढदिवसाच्या वेळी जी पुष्पहार घातला जातो तिथे सारे जण हात लावताना दिसतात म्हणजे सगळ्यांनी मिळून घातला असा त्याचा अर्थ होतो किंवा प्रेताला दफन करताना काही विधी मध्ये सगळ्यांचे हात लागावे म्हणून सगळे जण  एकमेकांना हात लावतात .किंवा कोणाची साथ हवी असेल ,एक साखळी तयार करायची असेल तर आपण सगळे हातात हात घेऊन उभे राहतो म्हणजेच हम साथ साथ है . मग मला तुम्ही सांगा वरमाला घालताना ज्या लोकांनी नववरदेवा ला उचलले आहे त्यापैकी नवरी नक्की कोणाच्या गळ्यात माळ घालते . नवरी मुलगी ज्या पवित्र क्षणांची वाट पाहत असते ती वरमाला नवरदेवासकट सगळ्यांच्या गळ्यात घालते असाच याचा अर्थ होतो .नवरदेवाच पण तेच असते मग नवरीला कधी तिचा मामा उचलतो कधी भाऊ मग नवरदेवाची नक्की नवरी कोण मामा की भाऊ मग हा कोणता विवाह म्हणायचा . विवाहासारख्या पवित्र कार्याला तुम्ही एक चेष्टेचा विषय बनवत आहात का? आपल्या अर्धांगिनी ला तुम्ही हजार पाचशे लोकांत मजाक म्हणून पाहता का ? भरजरी वजनदार शालू घालून पूर्ण साज लेऊन ती आपल्या पतीसाठी एक नव्या आयुष्याची सुरवात करायला मंडपात आलेली असते ,तुम्ही तिला चक्क उड्या मारून वरमाला घालायला लावता हे कितपत योग्य  आहे ते तुम्हीच ठरवा. रामो विग्रहि धर्म : प्रभू रामचंद्रानी सीतेकडून , साक्षात शिवशंकरांनी माता पार्वतीकडून किती आदराने वरमाला स्वीकारली आहे हे आपण फोटोत पाहतोच . आपण हा खेळ का चालवला आहे. हा सगळा प्रकार कुठेतरी थांबला पाहिजे भावी नवरदेव आणि नवरीमुलींनी हे लक्षात ठेवले पाहिजे असे बऱ्याच ठिकाणी घडते आहे . अक्षदारूपी आशीर्वाद द्यायला ज्या मंगलअक्षदा गुरुजींच्या तोंडावर फेकून मारणे ,नवरा नवरीला फेकून मारणे , गुरुजींच्या धोतराची गाठच मारणे, पिशवी लपविणे , यात काही लोकांना खूपच वेगळा आनंद मिळतो . जसे काय वर्ल्डकप जिंकून आणला बहुतेक असे त्याला वाटत असावे . पण आपणच आपल्या आईवडिलांनी दिलेल्या संस्काराच्या  शिकवनीचे लोकांसमोर पितळ उघडे पाडत असतो हे त्याच्या लक्षातच येत नाही . मुहुर्ताची वेळ निघून गेली तरी नवरदेव मंडपाच्या बाहेरच असतो. गुरुजी ओरडून सांगत असतात की मुहूर्ता ची  वेळ निघून जात आहे नवरदेवाला मंडपात आणा ,पण नवरदेव मात्र बाहेरच नाचत असतो किंवा त्याला त्याच्याच  चार पाच मित्रांनी घेरलेले असते.  टाईम इज मनी हे आपण विसरतो  जन्मवेळ ,मृत्यूवेळ , ऑफिसला  जायची वेळ ,बस पकडायला केलेल्या धावपळीची वेळ , जेवणाची वेळ , थिएटर मध्ये सिनेमा सुरू व्हायची वेळ आपण पाळतो मग विवाहासारख्या पवित्र कार्याची वेळ आपण का बरे पाळत नाही . माझी  हात जोडून आपणाला विनंती आहे आपल्या लग्नकार्याची सर्कस करू नका , आणि कोणाला करू ही देऊ नका . ही पोस्टमध्ये काय चुकले असेल तर मी आपली माफी मागतो . ही पोस्ट जशीच्या तशी पुढे पाठवा ही विनंती , कारण ही पोस्ट लिहिताना विचाऱ्यांच्या  भांडार सागरात जाऊन एक एक शिंपल्यातील मोती वेचावे तसे शब्द जुळवताना तास अन तास प्रयत्न केलेले  असतात . फुकटे आणि चिकट्यानी आपले नाव लावून ही पोस्ट फॉरवर्ड करू नये ... लेखन *चंद्रकांत जंगम (स्वामी) केंडबे , सातारा* 9404516108/8830228057

+5 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 8 शेयर
Neeru Miglani Sep 15, 2020

#दान......!! ▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪ एक संत ने एक द्वार पर दस्तक दी और आवाज लगाई " भिक्षां देहि "एक छोटी बच्ची बाहर आई और बोली, ‘बाबा, हम गरीब हैं, हमारे पास देने को कुछ नहीं है।’ संत बोले, ‘‘बेटी, मना मत कर, अपने आंगन की धूल ही दे दे। लड़की ने एक मुट्ठी धूल उठाई और भिक्षा पात्र में डाल दीशिष्य ने पूछा, ‘‘गुरु जी, धूल भी कोई भिक्षा है? आपने धूल देने को क्यों कहा?’ संत बोले, ‘‘बेटे, अगर वह आज ना कह देती तो फिर कभी नहीं दे पाती। आज धूल दी तो क्या हुआ, देने का संस्कार तो पड़ गया। आज धूल दी है, उसमें देने की भावना तो जागी ! कल समर्थवान होगी तो फल-फूल भी देगी। जितनी छोटी कथा है निहितार्थ उतना ही विशाल साथ में आग्रह भी दान करते समय दान हमेशा अपने परिवार के छोटे बच्चों के हाथों से दिलवाये जिससे उनमें देने की भावना बचपन से बने | 💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠 🚩||जय श्री राम ||🚩

+114 प्रतिक्रिया 20 कॉमेंट्स • 50 शेयर