श्रावण महिना

Mymandir Marathi Aug 16, 2019

+135 प्रतिक्रिया 7 कॉमेंट्स • 29 शेयर
Mymandir Marathi Aug 6, 2019

मंगळागौर का साजरी करतात. श्रावण महिन्यातील मंगळवारी मंगळागौर साजरी करण्याची प्रथा आहे, लग्नानंतर पुढील पाच ते सात वर्ष श्रावणात हे व्रत नवविवाहिता करतात, पहिली मंगळागौर साधारणपणे माहेरी साजरी केली जाते. श्रावणातील मंगळवारी हे व्रत नित्यनियमाने ठेवतात. त्यापैकी पहिला व शेवटचा मंगळवार अधिक महत्वाचे मानले जातात. सुवासिनी पहाटे उठून अंघोळ करून मंगळागौरीच्या पूजनाची तयारी करतात, श्रावणातील चारी मंगळवारी देवी अन्नपूर्णेच्या मूर्तीची पूजा करायची असते. या पूजेसाठी पाच नवविवाहितांचीही गरज असते. या पूजा करणाऱ्या मुलींना वशेळ्या असे म्हटले जाते. सोळा प्रकारची फुले, तांदूळ, चण्याची डाळ, जिरे सारखे सोळा दाणे, सोळा प्रकारची पत्री व पाच बिल्वदले, हळदमिश्रीत कणकेचे सोळा दिवे आणि सोळा प्रकारचे कणकेचेच देवीला अर्पण करण्यासाठी तयार केले जातात शेणाने सारवलेल्या जागेत रांगोळी घालतात. चारी बाजुस खुंट बांधून मखर पाना फुलांनी सुशोभित करतात. आत पाण्याने भरलेला तांब्या ठेवतात. मखरात शिव, गणपती, अन्नपूर्णेच्या प्रतिमा ठेवून दीप प्रज्वलन करून तिला उष्णोदकाने स्नान घातले जाते ,ही पूजा म्हणजे जणू अन्नपूर्णेचा सोहळा असतो. मूर्तींना कणकेत हळद आणि तेल लावून तसेच घट्ट भिजवून तयार केलेले दागिने घातले जातात. अंग पूजा, पत्रीपूजा, पुष्पपूजा करून नमस्कार करतात. शेजारील वशेळ्या सुवासिनींना आमंत्रित केले जाते. त्यांच्या पायाला भिजलेली हळद लावुन, डोळ्यांत काजळ घालतात. वाण म्हणून भिजलेले वाटाणे, तांदळाचे पदार्थ विषम संख्येने भेट देतात. पूजेनंतर पिठाच्या किंवा पुरणाच्या दिव्यांनी आरती करतात. मंगळागौरीची कहाणी वाचतात. गोडधोडाचा नैवेद्य देवीला दाखवून भोजन केले जाते. जेवणातील पदार्थांत मीठ पूर्ण वर्जित करून जेवणावेळी मौनव्रत परंपरेने पळाले जाते. संध्याकाळी हळदीकुंकू, तिन्ही सांजेला धुपारती केली जाते. मंगळागौरीची रात्र पारंपरिक फुगड्यांच्या असंख्य प्रकारांनी जागविली जाते. आजूबाजूच्या मुली, बायका, नवविवाहिता यांना बोलावले जाते. या रात्री जेवत नाहीत त्याऐवजी फराळ केला जातो. म्हणजे भाजके अन्न ग्रहण करण्याची पद्धत आहे. रात्रभर फुगड्या, झिम्मा, पिंगा, बसफुगडी, टिपऱ्या खेळून रंगीत दोऱ्यांचा गोफ विणणे असे खेळ खेळले जातात. यासाठी एक लिंबू बाई दोन लिंबू झेलू, किस बाई किस दोडका किस यासारखी पारंपरिक गाणी म्हटली जातात. म्हणली जाणारी ही गाणी माहेरचे वर्णन करणारी व सासरला टोमणे मारणारी असतात. रात्रभर जागरण ठेऊन दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा करतात. रोजच्या कामाच्या धबडग्यात हरवलेल्या महिला मंगळागौरीच्या निमित्ताने धमाल करून तोपर्यंतचे कष्ट, श्रम विसरतात आणि ताज्यातवान्या होतात. अन्नपूर्णा ,गौरी म्हणजे पार्वती. हिरवाईने नटलेली वसुंधरा ही साक्षात पार्वती तिचे सारखे जन्मभराचे अहेवपण लाभावे, हीच या व्रता मागची भावना. साभार

+96 प्रतिक्रिया 17 कॉमेंट्स • 184 शेयर
Mymandir Marathi Aug 4, 2019

नागपंचमी गाणी खानदेशातल्या शंभर वर्षांपूर्वीच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी तिकडच्या अहिराणी बोलीत अप्रतिम काव्यरचना केली आहे. "माझी माय सरसोती, माले शिकयते बोली।" असे त्यांनीच स्वतःबद्दल लिहिले आहे. त्यांच्यावर सरस्वतीचा वरदहस्त होता. शालेय शिक्षण घेतले नसले तरी त्यांना सणवार आणि देवदेवतांची खूप माहिती होती. त्यांच्या आयुष्यात घडून गेलेल्या एका नाजुक प्रसंगाचे सुरेख चित्रण त्यांनी खाली दिलेल्या ओव्यांमध्ये केले आहे. बहिणाबाई शेतात काम करायला जात असत. तान्ह्या सोपानदेवांना आंब्याच्या झाडाखाली एका टोपलीत निजवून त्या उसाच्या मळ्यात कामाला लागल्या असतांना एक नाग त्या मुलाच्या जवळ आला. ते पाहून लोकांनी ओरडा केला. बहिणाबाई येऊन पाहते तर लहानगा सोपान टोपलीच्या बाहेर येऊन त्या नागाबरोबर खेळत होता. तिने नागोबाला दोन्ही हात जोडून नमस्कार केला आणि शंकराची शपथ घालून सोपानदेवाला दंश न करण्याची विनंती केली शिवाय कृष्णाचा धांवा करून सांगितले की आपली बांसुरी वाजवून नागोबाची समजूत घाल. तेवढ्यात गुराख्यांनी वाजवलेले पाव्याचे सूर ऐकून नाग तिकडे निघून गेला. बहिणाबाईने नागोबाचे आभार मानून त्याला नागपंचमीच्या दिवशी दुधाची वाटी देईन असे आश्वासन दिले. ते तिने नक्कीच पाळले असणार. उचलला हारा, हारखलं मन भारी । निजला हार्‍यात, तान्हा माझा शिरीहारी ।। डोईवर हारा, वाट मयाची धरली । भंवयाचा मया, आंब्याखाले उतरली ।। उतारला हारा, हालकलं माझं मन । निजला हार्‍यात, माझा तानका 'सोपान' ।। लागली कामाले, उसामधी धरे बारे । उसाच्या पानाचे, हातीपायी लागे चरे ।। ऐकूं ये आरायी, धांवा धांवा घात झाला । अरे, धांवा लव्हकरी, आंब्याखाले नाग आला ।। तठे धांवत धांवत, आली उभी धांववर । काय घडे आवगत, कायजांत चरचर ।। फना उभारत नाग, व्हता त्याच्यामधीं दंग । हारा उपडा पाडूनी, तान्हं खेये नागासंगं ।। हात जोडते नागोबा, माझं वांचव रे तान्हं । अरे, नको देऊं डंख, तुले शंकराची आन ।। आतां वाजव वाजव, बालकिस्ना तुझा पोवा । सांग सांग नागोबाले, माझा आयकरे धांवा ।। तेवढ्यांत नाल्याकडे, ढोरक्याचा पोवा वाजे । त्याच्या सूराच्या रोखानं, नाग गेला वजेवजे ।। तव्हां आली आंब्याखाले, उचललं तानक्याले । फुकीसनी दोन्हीं कान, मुके कितीक घेतले ।। देव माझा रे नागोबा, नही तान्ह्याले चावला । सोता व्हयीसनी तान्हा, माझ्या तान्ह्याशीं खेयला ।। कधीं भेटशीन तव्हां, व्हतील रे भेटी गांठी । येत्या नागपंचमीले, आणीन दुधाची वाटी ।। साभार

+86 प्रतिक्रिया 24 कॉमेंट्स • 130 शेयर