शिष्य

_*पिंजरा (कोंडमारा )....*_ _काही अध्यात्मिक मानसिक स्थितींविषयी आपण कुणालाही स्पष्टपणे सांगू शकत नाही कारण त्याची इतर कुणाशी चर्चा केली की त्याचा व्यावहारिक उहापोह सुरु होतो.आपल्याला वाटणारी पारमार्थिक ओढ हा खरं तर आपला व्यक्तिगत प्रवास असतो म्हणून त्या प्रवासाची गरज आणि गांभीर्य इतर कुणाला पटवून देणं ही गोष्ट थोडी कठीण असते.कधी कधी आपला आतला आवाज स्पष्टपणे आपल्याला विरक्तीच्या सूचना देऊ लागतो.'तू कितीही प्रयत्न कर पण कुठल्याही गुंत्यात मी सुखी राहणार नाही,मला मुक्त कर 'अशी कळकळीची विनंती तो सतत करतो.आपण फक्त साधनेत सुख अनुभवतो आणि त्यातून बाहेर आल्यावर आत्म्याची एकांतवासाची ओढ आणि भ्रमंती सुरु होते.आपण असूनही कुठेच नसतो.अट्टाहासाने स्वतःला विखुरण्यात कसला आला आहे आनंद?कुठलंही स्वप्न नाही,महत्वकांक्षा नाही की,सुखाची वाट पाहून झुरणं नाही.आत्मा मुक्तीकडे जाऊ लागतो.कधी कधी आपल्या असण्याचाही त्रास आपल्याला होऊ लागतो.ध्यानात मन शांत आणि परिपूर्णता अनुभवत जातं.अशा स्टेजला पोहोचल्यावर व्यावहारिक गोष्टींच्या दलदलीमध्ये जीव गुदमरू लागतो.आपण इतरांसारखे आता उरले नाही आहोत हे कळत.इतरांसाठी स्वतःच्या ह्या प्रवासाला खीळ घालणं म्हणजे शाश्वत सत्याकडे पाठ फिरवून तात्कालिक सुखांच्या पायाशी लोळणं घेत जगणं.पण हे सगळं सांगायचं कुणाला?समाज सोडाच पण अगदी जवळची नाती देखील आपली ही तगमग,संघर्ष समजून न घेता आपल्याला आपल्यासाठी व्यर्थ असलेल्या गोष्टींमध्ये गुंतवण्याचा प्रयत्न सुरु ठेवतात.आपला हा मार्ग म्हणजे आपण दुःखातून स्वीकारलेला आहे असा गैरसमज अनेकदा ह्याच्या मुळाशी असतो.पण खरं तर दुःखापेक्षा सगळ्या गोष्टींची वेळेत लक्षात आलेली व्यर्थता त्याची झालेली जाणीव त्याच्या मुळाशी असते.शेवटी आपल्या आत्मिक सुखाची व्याख्या ही इतरांनी ठरवली की ती आपल्या दुःखाचं मूळ कारण होते.वेळेतच ह्या प्रयासाला खीळ घातला पाहिजे. *मोह आणि माया ह्यातून सुटण्याचा मार्ग एकदा मिळाला की त्या मार्गावरून परतीचा प्रवास कधी करू नये कारण जर असं झालं तर तो जिवंतपणी झालेला अंतच असतो....*_ _*मिञांनो,काळजी घ्या.....*_

1 कॉमेंट्स • 5 शेयर

*आजचे प्रवचन* १२ एप्रिल *सदवस्तू साध्य करून घेण्याचा उपाय सत्संगती.* एखाद्या दारूबाजाप्रमाणे विषयी मनुष्य वागत असतो. त्याला सर्व कळते, पण वळत नाही. एकीकडे स्वतःला तो परमात्म्याचा अंश म्हणवितो, आणि दुसरीकडे विषयांच्या आहारी जातो. खरोखर, भक्तीशिवाय सर्व काही वाया आहे. संताजवळ राहावे आणि भक्तीचे साधन करावे. आपल्याला काही करायचे उरले आहे असे जे वाटते, ते न वाटू लागले, म्हणजे साधनात प्रगती झाली असे समजावे. भगवंताची भक्ती घडायला गुरूसेवा हे एक मुख्य साधन आहे. जो शिष्य आज्ञा पाळतो त्याला भेटणे गुरूला भागच पडते. वास्तविक, गुरू मनात काही इच्छाच येऊ देत नाही; म्हणून कामधेनूपेक्षाही गुरू श्रेष्ठ आहे. अत्यंत तळमळीशिवाय भगवंताचा योग शक्य नाही. संतसमागम प्रारब्धाने होतो, पण 'सम' रीतीने जाता आले तर खरा 'समागम' घडतो. पण आमचा मार्ग विषय आहे; म्हणून संत भेटूनही त्याचा 'समागम' आपल्याला होत नाही. विषयांमध्ये धुंद असलेल्या आम्हांला पाहून संतांच्या मनात कालवाकालव होते; त्याची आपल्याला कल्पनाही येणार नाही. आपली बुद्धी आपल्याला समाधानप्रत नेत नाही, तर दुसर्‍याची मदत घेणे आवश्यक आहे. अशा वेळी, ज्यांची मदत आपण घेतो त्यांचे आपण ऐकायला नको का ? भगवंताच्या जिज्ञासेचा मार्ग आक्रमायला संतांनी सांगितले. संतांना जिज्ञासा मूळचीच असते. आपल्याला ती नाही, म्हणून ती उत्पन्न करणे भाग आहे. काही केल्याशिवायच सद्‌वस्तू साध्य करून घेण्याचा उपाय, म्हणजे सत्संगती हा होय. सत्संगती अती अपूर्व काम करणारी आहे. ज्याचे भाग्य थोर असेल त्यालाच ती लाभेल. एखादा मनुष्य भोवर्‌यात सापडला तर त्याला बाहेर काढण्याचे दोन मार्ग आहेत. एक मार्ग असा की, दुसर्‌या चांगल्या पोहणार्‌याने त्या भोवर्‌यामध्ये उडी मारून तो फोडायचा आणि बुडत्याला बाहेर ओढून काढायचे. पण यासाठी शक्ती फार लागते. दुसरा मार्ग असा की, आपणच भोवर्‌यामध्ये बुडी मारून तळाशी जायचे आणि खालून बाहेर निघायचे. विद्वत्ता ही भोवर्‌यासारखी आहे. वर वर पाणी फिरत असते तरी तळाशी ते संथ असते. तसे, जे लोक वरवर विद्या शिकतात ते वादाच्या आणि मतांतराच्या चक्रात सापडतात; पण जे लोक खोल तळाशी जातात त्यांना खरे काय ते आपोआप कळते, आणि ते सगळीकडे एकच असते. विद्येच्या भोवर्‌यामध्ये सापडणार्‌यांना बाहेर ओढून काढण्याचे काम फार मोठया संतांचे असते. शहाण्याने त्या भानगडीत न पडावे. हजारो लोक भगवंताच्या नामाला लावणे हे खरे संतांचे काम होय. *१०३. कोणत्याही सत्पुरूषाची परंपरा रक्षण केली पाहिजे. त्यात आपले घुसडू नये.* *श्रीराम जय राम जय जय राम*

+6 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 6 शेयर

🚩⚜️🌹 ब्रम्हांनंद 🌹⚜️🚩 🚩 अंतःकरणात भगवंताचे नाम, चांदीच्या घंटेतल्या नादासारखे जेव्हा निनादू लागते तेव्हाच प्रत्येक साधक भक्ताला आत्मानंद म्हणजे काय हे खर्‍या अर्थाने ज्ञात होते. 🚩 आनंदाची परमोच्च अवस्था अनुभवायची असेल तर आपल्याला अखंड नामस्मरणात बुडून जायला हवे. 🚩 तुकाराम महाराज हा अपूर्व आनंद अखंडपणे अनुभवत होते. म्हणून तर ते सहजपणे आपली अवस्था वर्णन करून सांगताना, तो अपूर्व असा नामानंदाचा अनुभव प्रगट करताना श्रीविठ्ठलाला सांगतात की..... आनंदाचे डोही आनंद तरंग | आनंदचि अंग आनंदाचे || "मी स्वतःच ब्रह्मानंदाने गच्च भरलेला डोह झाल्यामुळे माझ्या सर्वांगामधून केवळ आनंदाच्याच लाटा उसळून येत आहेत. माझे सर्वांग हाच आनंदाचा मूळ गाभा आहे. विठ्ठला, तुझ्या गोड नामात मी पूर्णपणे विरघळून गेल्यामुळे हा ब्रह्मानंद मी प्रत्यक्षपणे अनुभवतो आहे." 🚩 ह्याच अपूर्व स्थितीची पुढली पायरी म्हणजे अनाहत नादाचा आनंद लुटणे. 🚩 तुकाराम महाराज म्हणतात की..... अनुहाती गुंतला नेणे बाह्यरंग | वृत्ति येतां मग बळ लागे ॥ 🚩 आपल्या हृदयगाभार्‍यामध्ये जेव्हा अखंडपणे ‘सोऽहं सोऽहं’चा ध्वनी घुमू लागतो तेव्हा आपले शुद्ध विचारांनी भारलेले मन त्या ध्वनीच्या नादात अंतर्मुख होते. 🚩 हा जो अनाहत नाद आहे, त्या अपूर्व नादात मन गुंतले की, बाह्य जगात परतणे साधक भक्ताला खूप कठीण जाते. 🚩 आनंदाची ही तर विलक्षण अशी परमोच्च अवस्था. 🚩 ती अनुभवणे प्रत्येक साधकाला शक्य होत नाही. 🚩 म्हणून तुकाराम महाराज सांगतात की..... " विठ्ठलनामाने हृदयगाभारा गच्च भरण्याची साधना प्रथम करा म्हणजे अनाहत नाद ऐकू येईल. " मदें माते तया नाहीं देहभाव | आपुले अवयव आवरितां ॥ 🚩 एकदा का ब्रह्मरसात साधक भक्त तल्लीन झाला की त्याचे बाह्य मर्त्य विश्‍वाशी नातेच तुटते. 🚩 तो देहभान हरपून बसतो. 🚩 इतका की आपल्या देहाचे आणि अवयवांवरचे त्याचे भान संपुष्टात येते. आणिकांची वाणी वदे तेणें मुखें | उपचारदुःखे नाठवती ॥ 🚩 त्या आनंद अवस्थेत मर्त्य मानवी विश्‍वातले संदर्भ मनाच्या पलिकडे जातात. 🚩 त्यामुळे सुखदुःखाच्या लाटा आपोआप थांबतात. त्यांचा आठव संपुष्टात येतो. 🚩 फक्त विठ्ठलनामच मुखात निनादू लागते. तें सुख बोलतां आश्‍चर्य या जना | विपरीत मना भासतसे ॥ 🚩 अशा परमोच्च आनंद अवस्थेत साधक भक्ताचा देह नाचत असताना त्याच्या मुखातून केवळ श्रीविठ्ठलाच्या प्रत्यक्ष दर्शनाचा संदर्भ आपोआप उमटू लागतो. आणि ते विलक्षण बोलणे ऐकताना प्रापंचिक जीवांना खूप आश्‍चर्य वाटते. 🚩 कारण तो लोकविलक्षण आनंद हा त्यांच्या अनुभवाचा विषय नसतो. तुका म्हणे बाह्य रंग जों विटला | अंतरीं निवाला ब्रह्मरसें ॥ 🚩 तुकाराम महाराज म्हणतात की..... "अशी परमोच्च अद्वैती अवस्था एकदा का प्राप्त झाली की तो श्रेष्ठ साधक बाह्य विश्‍वातल्या संदर्भांना विटून जातो. त्याला कुणाशीच बोलू नये असे वाटते. कारण त्याचे अंतःकरण ब्रह्मरसाने तुडूंब भरलेले असते. तो साधक ह्या ब्रह्मनंदाने पूर्णपणे निवून जातो." 🚩 एकदा का ब्रह्मरसात साधक भक्त तल्लीन झाला की त्याचे बाह्य मर्त्य विश्‍वाशी नातेच तुटते. तो देहभान हरपून बसतो. 🚩 त्या आनंद अवस्थेत मर्त्य मानवी विश्‍वातले संदर्भ मनाच्या पलिकडे जातात. 🚩 सुखदुःखाच्या लाटा आपोआप थांबतात. 🚩 फक्त विठ्ठलनामच मुखात निनादू लागते. साभार.....🙏 *राम कृष्ण हरी* 🌹🌹🌹🚩🚩

+3 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 8 शेयर

सुख ही मनाची अवस्था आहे ....: माणूस जन्मभर सुखामागं, ऐश्वर्या मागं धाव धाव धावतो. पण ह्या धडपडीत तो सुखी नसतो, आणि धडपड यशस्वी ठरून, हवी ती वस्तु मिळाल्यावरही तो सुखी नसतो. ह्याचं कारण तो निर्भयता शिकत नाही. नेहमी माणसाला कशाची ना कशाची सातत्याने धास्ती वाटत राहते. तो जर निर्भय व्हायला शिकला तर जीवनातली गोष्ट नव्याने समजेल. माणसं, नद्या, डोंगर, समुद्र, सगळ्यांचा अर्थ बदलेल. आकाशाकडे सगळेच बघतात. पण त्रयस्थासारखं...! म्हणूनच ते जरा भरून आलं किंवा विजेचा लोळ कोसळतांना दिसला की माणसं पळत सुटतात. आकाशाकडे पाहायचं ते आकाश होऊन पाहावं म्हणजे ते जवळचं वाटतं. ‘विराट’ ह्या शब्दाला अर्थ तेव्हा समजतो. ‘अमर्याद’ शब्द पारखायचा असेल तर समुद्र पहावा. ‘विवीधता’ शब्द समजून घ्यायचा असेल तर ‘माणूस’ पहावा. पण तोही कसा, तर आतुन आतुन पहावा. मग माणसांची भीती उरत नाही. अगदी साध्यातला साधा माणूस देखील साधा म्हणून आवडतो. जीवनावर, जगावर, जगण्यावर असं प्रेम केलं म्हणजे सगळं निर्भय होतं. उपमा द्यायची झाली तर मी विजेचीच उपमा देईन. पृथ्वीची ओढ निर्माण झाली रे झाली की ती आकाशाचा त्याग करते. पृथ्वीवर दगड होऊन पडते. पण पडण्यापासून स्वत:ला सावरत नाही आणि तेजाचाही त्याग करीत नाही. प्रेम करताना माणसानं ही असं तुटून प्रेम करावं. डोळे गेले तरी चालतील पण नजर शाबूत हवी. स्वर नाही सापडला तर नाही, पण नाद विसरणार नाही, पाय थकले तरी बेहत्तर पण ‘गतीची’ ओढ टिकवून धरीन, ही भूक कायम असली की झालं. आयुष्यात ही भूक जिवंत ठेवावी आणि निर्भयतेने पुर्ण करीत राहावं..... !सुख जर मिळवायचे असेल तर मन व विचार बदलायला हवे मन बदलायला दोन मार्ग आहेत .* *1. सारख चिकाटीने त्याचे स्मरण ठेवायच यालाच नामस्मरण म्हणतात .* *2. सज्जनाची संगत .* *ईश्वराचे प्रेम हळु हळु आपल्या मनात यायला लागते . ईश्वरावर प्रेम करायला लागणार मन स्वच्छ पाहिजे . मोठा मनुष्य होऊन लहान मुलासारखी वृत्ती होणे ही भगवंताची कृपा होय. मी भगवंताच लहान मूल आहे आणि भगवंताच्या मांडीवर निजलो आहे हे जर खर वाटले तर किती निश्चींतता येईल ? आपल मोठेपण , विद्या , श्रीमंती , नौकरी सगळे* *विसरावे. जस लहान मूल जन्माला आले व आपल्या आईच्या मांडीवर पहुडते तसे भगवंता तुम्ही मला संभाळा आणि तशी श्रध्दा पाहिजे . ती सुमन , शुद्ध मति आपली व्हावयास पाहिजे .मन शुद्ध झाल की , बुद्धी शुद्ध होते काराण बुद्धी मनाचा भाग आहे . वाकड्यात कधीही शिरायच नाही . आपण कोणापासुन नुकसान सोसु नये , पण त्याला वाईट पण म्हणू नये. आपण कोणासही सुधारु शकत नाही.* *गुरुवरची श्रध्दा ही एक विचार* *करण्यासारखी गोष्ट आहे . आपली श्रध्दा ही पैशावर आहे . शरीराची काहीही अवस्था असली तरी अनुसंधान बरोबर चालले पाहीजे.* *समर्थ ..." ऐक ज्ञानाचे लक्षण / ज्ञान म्हणजे आत्मज्ञान / पहावे आपणासि आपण / या नाव ज्ञान //* *बुध्दीचे कार्य काय तर सत्य जे आहे ते असत्या पासून दूर करावयाचे . आत्मा आणि अनात्मा , सारा सार विचार हे वेगळे करणे ही शुध्द बुद्धी आहे .*

+9 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 35 शेयर