विष्णु सहस्रनाम

*श्री विष्णू सहस्रनाम ...एक अद्भुत व दिव्य सिद्ध स्तोत्र* श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र हे जवळपास गेली साडेपाच हजार वर्षे लाखो भक्तांकडून मनोभावे म्हटले जात आहे. आजवरच्या सर्व भक्तांकडून या स्तोत्राची किती आवर्तने झाली असतील याची गणनाच आपण करू शकणार नाही. किंबहुना एवढी आवर्तने झालीत म्हणूनच हे स्तोत्र असे अलौकिक प्रभावी ठरलेले आहे. आजवरच्या असंख्य महात्म्यांनी या स्तोत्राची स्वत: अनुभूती घेऊन लक्षावधी भक्तांना याची उपासना दिलेली आहे. अनेक संतांच्या चरित्रात या स्तोत्राशी संबंधित अद्भुत हकिकती वाचायला मिळतात. पू.श्री.शिरीषदादा कवडे यांनी त्यांच्या 'श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य' या पुस्तकात असे भरपूर प्रसंग कथन केले आहेत. त्यातील काही आपण मुद्दाम पाहूया. शिर्डीत असताना एक रामदासी बुवा श्रीसंत साईबाबांच्या समोर 'अध्यात्म रामायण’ आणि ‘श्रीविष्णुसहस्रनाम’ यांची पारायणे करीत असे. एके दिवशी आपल्या पोटदुखीसाठी बाजारातून सोनामुखी आणून देण्यास बाबांनी त्याला सांगितले. त्यांच्या आज्ञेप्रमाणे तो रामदासी आपल्या पोथ्या गुंडाळून ठेवून बाजारात गेला असता, बाबांनी त्याच्या दप्तरातील ‘विष्णुसहस्रनामा’ची पोथी काढून घेतली आणि ती परमभक्त शामाच्या हातात देऊन बाबा त्याला म्हणाले की, “एकदा माझे प्राण कासावीस झाले. त्या बिकट प्रसंगी मी हे पुस्तक माझ्या छातीवर घट्ट धरून त्याचे पारायण केले; आणि मला अलभ्य लाभ झाला; प्रत्यक्ष श्रीभगवंतांचे दर्शन झाले ! म्हणून तूही रोज हे वाचीत जा. किमान एक नाम वाचण्याचा प्रयत्न केलास तरी चालेल !” या प्रसंगावरून, श्री साईबाबांसारख्या अवतारी सत्पुरुषांचीही केवढी गाढ श्रद्धा या स्तोत्रावर होती, हे कळून येते. श्रीसंत दासगणू महाराजांच्या चरित्रातही ‘श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रा’च्या प्रभावाने त्यांच्यावरील करणी प्रयोग असफल झाल्याची कथा आली आहे. प.प.श्री.टेंब्ये स्वामी महाराजांनीही या स्तोत्राची उपासना सांगून अनेकांना दुःखमुक्त, बाधामुक्त केल्याचे दाखले त्यांच्या चरित्रात आहेत. योगिराज सद्गुरु श्री.गुळवणी महाराज देखील त्यांचा या स्तोत्राच्या संबंधातला एक सुंदर प्रसंग नेहमी सांगत असत, श्री.मानवतकर महाराजांच्या घरी घडलेला. तो प्रसंग मोठा असल्याने पू.दादांच्या पुस्तकातून मुळातूनच वाचावा. त्याच्या शेवटी पू.श्री.गुळवणी महाराजांनी या स्तोत्राचे सांगितलेले माहात्म्य मात्र येथे आवर्जून देत आहे. श्री महाराज म्हणत, "श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्राच्या श्रवण-पठण-चिंतनाने मनुष्य सर्व प्रकारच्या संकटांतून तरून जातो आणि आपले मनोरथ सिद्धीस नेऊ शकतो. या स्तोत्राच्या शब्दाशब्दांंतून अशुभ नाहीसे करणारी परममंगल अशी मंत्रशक्ती भरलेली आहे !" योगिराज श्री.गुळवणी महाराज आणि योगिराज श्री.मामासाहेब देशपांडे महाराज हे थोर गुरु-शिष्य नित्यनेमाने या स्तोत्राचे पठण करीत असत आणि आपल्या शिष्यांनाही आवर्जून करायला सांगत असत. म्हणूनच या अधिक महिन्याच्या निमित्ताने आता आपण सर्वांनी न चुकता दररोज हे स्तोत्र म्हणायचा किंवा ऐकायचा तरी नियम करू या आणि श्रीभगवंतांच्या दिव्य कृपेची साक्षात् अनुभूती घेऊ या !! विष्णू सहस्त्रनामावली पठण महिमा आणि चमत्कार.... एका परिचितांनी सांगितलेला हा प्रसंग आहे. ह्या परिचित ताईंना काही दिवसांपूर्वी एक त्यांच्या परिचित असणाऱ्या स्त्री भेटल्या. बरीच दिवसांनी भेटल्ल्यांनंतर त्या स्त्री परिचित ताईंच्या घरी गेल्या. काही चर्चा झाल्यावरती त्या स्त्री म्हणाल्या गेले कित्येक रात्री मी झोपू शकत नाही. कारण मला घरामध्ये ३/४ मृत व्यक्ती रात्री फिरताना दिसत आहेत. त्यामुळे नाईलाजाने दिवसा झोपावे लागत आहे. त्या मृत व्यक्ती काही त्रास देत नाहीत पण एकूणच त्या समोर दिसल्यावरती घाबरायला होत आहे. हे ऐकून आमच्या ताईंनी त्यांना विष्णू सहस्त्रनामावली चे दर बुधवारी पठण करायला सांगितले. आणि कशा प्रकारे करायचे तेसुद्धा सांगितले. ह्या पठणामुळे त्या मृत व्यक्तीना चांगली गती मिळून त्यांची या योनीतुन सुटका होईल. त्या स्त्री आधीच घाबरल्या असल्या कारणाने म्हणाल्या हे एकाच बुधवारी केले तर चालेल का ? तर आमच्या ताईंनी सांगितले हरकत नाही करून पहा. त्या परिचित स्त्रीने सांगितल्याप्रमाणे एका बुधवारी संकल्प सोडून ४ वेळा विष्णू सहस्त्रनामावली चे पठण केले आणि त्यांना रात्री दिसणाऱ्या मृत व्यक्ती बंद झाल्या. बहुतेक दुसऱ्यासाठी केलेली त्यांची प्रार्थना फळाला आली आणि श्री विष्णू भगवंतांनी त्यांची प्रार्थना ऐकून त्या मृत व्यक्तींची मृत योनीतुन सुटका केली. हे वाचून प्रश्न पडेल कि हे मृतात्मे त्या बाईंनाच का दिसत असावेत याचे कारण म्हणजे शुभ स्थानातील उच्चीचा नेपच्युन आणि त्यावरती शुभ ग्रहांची दृष्टी अशी पत्रिकेत स्थिती असेल तर अशा व्यक्ती अतींद्रिय शक्तींशी संवाद साधू शकतात किंवा त्यांच्या संबंधात येऊ शकतात. यात मृतात्मे सुद्धा येऊ शकतात. विष्णू सहस्त्रनामावली चे पठण व त्याचे फलित.... ज्यांच्यामुळे आपले अस्तिव आहे त्या आपल्या पितरांना संतुष्ट करून त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळावेत यासाठी दर बुधवारी " विष्णूसहस्रनामाचे " पठण करावे. आधी आपल्या ज्ञात आणि नंतर अज्ञात पितरांसाठी याचे पठण करावे. लग्न झालेल्या स्त्रियांनी सुद्धा आपल्या माहेरच्या पितरांसाठी आणि सासरच्या पितरांसाठी सदगती मिळवून देण्यासाठी याचे पठण करायला हरकत नाही. आमच्या सर्व ज्ञात आणि अज्ञात पितरांना सदगती मिळावी यासाठी विष्णूसहस्रनामाचे पठण करीत आहे .तरीही विष्णू भगवानांनी त्यांना सदगती मिळवून द्यावी. जेणेकरून त्यांचे शुभाशीर्वाद आम्हाला मिळतील. आमच्याकडून काही चूक झाली असेल तर त्यांनी आम्ही त्यांचाच एक अंश आहोत असे समजून मोठ्या मनाने आम्हाला माफ करावे. *स्तोत्र एक उपयोग अनेक... श्री विष्णू सहस्त्रनामावली पठण इतर गोष्टींसाठी सुद्धा करतात जसे की, व्यावसायिक उत्कर्ष , आपसी सु - संबंध , आर्थिक विकास , शत्रू भाव नष्ट होणे, मानसिक समाधान इत्यादी पण पितरांना सद्गती प्राप्त होण्यासाठी याचा विशेष उपयोग होतो हे निश्चित. श्रीविष्णूसहस्रनामस्तोत्र ..रहस्य व इतिहास शतकानुशतके , पिढ्यान् पिढ्या भारतीय सुसंस्कृत घरांमध्ये ज्या महत्त्वाच्या स्तोत्रांचा नित्यपाठ होतो, त्यातील एक कल्याणकारी स्तोत्र म्हणज श्रीविष्णूसहस्रनामस्तोत्र याची संक्षिप्त माहिती पाहू - प्रसंग असा आहे की , महाभारत युद्ध समाप्त झाल्यावर धर्मराज युधिष्ठिरास राज्याभिषेक झाला. धर्मराज्याची स्थापना झाली. यानंतर शरपंजरी पडलेल्या पितामह भीष्मांनी निजधामास जाण्याचे ठरविले. त्या वेळी त्यांच्या इच्छेनुसार पांडव व भगवान श्रीकृष्ण भीष्मांसन्मुख उपस्थित होतात. तेव्हा युधिष्ठिर भीष्मांना या जगात एकच देव कोण ? एकच परम आश्रय कोण ? कोणत्या देवाची स्तुती केल्यास कल्याण होईल ? कोणाचा जप केल्यास संसारबंधातून मुक्ती मिळेल ? असे प्रश्न विचारले. यावर भीष्मांनी दिलेले उत्तर व श्रीकृष्णांची केलेली स्तुती म्हणजेच विष्णूसहस्रनाम स्तोत्र होय. हे स्तोत्र गातच भिष्म निजधामास गेले.* आद्य शंकराचार्यांनी तर महाभारत ही गाय , गीता हे तिचे दुध व विष्णू सहस्त्रनाम म्हणजे तूप असे म्हणून गौरव केला आहे . या दिव्य स्तोत्राच्या नित्य पठणामुळे पारमार्थिक , ऐहिक कल्याण होईल असे फलश्रुतीत म्हटले आहे. साधका भोवती अदृश्य संरक्षक कवच निर्माण होऊन संकटातून रक्षण होईल. याचा एक दृष्टांत म्हणजे दत्त संप्रदायातील एक सत्पुरूष म्हणजे टेंबे स्वामी उर्फ वासुदेवानंद सरस्वती यांच्या जीवनातील एक प्रसंग. त्यांच्यावर एका मांत्रिकाने अघोरी शक्तीचा प्रयोग केला. ती शक्ती जेव्हा स्वामींजवळ आली तेव्हा ती शक्ती त्या मूर्ख मांत्रिकावरच उलटली व त्याला त्रास होउ लागला. पुढे तो मांत्रिक स्वामींना शरण गेला. स्वामींनीही त्याला क्षमा केली आणि दुःख मुक्त केले. मांत्रिकाने याबाबत विचारले असता स्वामींनी सांगितले की, माझा विष्णूसहस्रनामाचा नित्यनेम आहे. त्यामुळे कोणतीही वाईट शक्ती त्यांचे काहीही वाईट करू शकत नाही. म्हणूनच तुम्ही कोणत्याही संप्रदायाचे असाल , कोणत्याही देवतेचे उपासक असाल तरी ( शेवटी अंतिम परमेश्वरी तत्त्व एकच आहे ) दररोज विष्णूसहस्रनाम म्हणत चला. प्रापंचिक समस्याहि कमी होण्यास मदत होईल. संकटात ठाम उभे राहण्याचे सामर्थ्य प्राप्त होईल. *विष्णु सहस्रनाम स्तोत्र* भगवान विष्णु के 1000 नामों की महिमा अवर्णनीय है। इन नामों का संस्कृत रूप विष्णुसहस्रनाम के प्रतिरूप में विद्यमान है। विष्णुसहस्रनाम का पाठ करने वाले व्यक्ति को यश, सुख, ऐश्वर्य, संपन्नता, सफलता, आरोग्य एवं सौभाग्य प्राप्त होता है तथा मनोकामनाओं की पूर्ति होती है। पेश है भगवान विष्णु के 1000 नाम- ॐ नमो भगवते वासुदेवाय नम: ॐ विश्वं विष्णु: वषट्कारो भूत-भव्य-भवत-प्रभुः । भूत-कृत भूत-भृत भावो भूतात्मा भूतभावनः ।। 1 ।। पूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमं गतिः। अव्ययः पुरुष साक्षी क्षेत्रज्ञो अक्षर एव च ।। 2 ।। योगो योग-विदां नेता प्रधान-पुरुषेश्वरः । नारसिंह-वपुः श्रीमान केशवः पुरुषोत्तमः ।। 3 ।। सर्वः शर्वः शिवः स्थाणु: भूतादि: निधि: अव्ययः । संभवो भावनो भर्ता प्रभवः प्रभु: ईश्वरः ।। 4 ।। स्वयंभूः शम्भु: आदित्यः पुष्कराक्षो महास्वनः । अनादि-निधनो धाता विधाता धातुरुत्तमः ।। 5 ।। अप्रमेयो हृषीकेशः पद्मनाभो-अमरप्रभुः । विश्वकर्मा मनुस्त्वष्टा स्थविष्ठः स्थविरो ध्रुवः ।। 6 ।। अग्राह्यः शाश्वतः कृष्णो लोहिताक्षः प्रतर्दनः । प्रभूतः त्रिककुब-धाम पवित्रं मंगलं परं ।। 7।। ईशानः प्राणदः प्राणो ज्येष्ठः श्रेष्ठः प्रजापतिः । हिरण्य-गर्भो भू-गर्भो माधवो मधुसूदनः ।। 8 ।। ईश्वरो विक्रमी धन्वी मेधावी विक्रमः क्रमः । अनुत्तमो दुराधर्षः कृतज्ञः कृति: आत्मवान ।। 9 ।। सुरेशः शरणं शर्म विश्व-रेताः प्रजा-भवः । अहः संवत्सरो व्यालः प्रत्ययः सर्वदर्शनः ।। 10 ।। अजः सर्वेश्वरः सिद्धः सिद्धिः सर्वादि: अच्युतः । वृषाकपि: अमेयात्मा सर्व-योग-विनिःसृतः ।। 11 ।। वसु:वसुमनाः सत्यः समात्मा संमितः समः । अमोघः पुण्डरीकाक्षो वृषकर्मा वृषाकृतिः ।। 12 ।। रुद्रो बहु-शिरा बभ्रु: विश्वयोनिः शुचि-श्रवाः । अमृतः शाश्वतः स्थाणु: वरारोहो महातपाः ।। 13 ।। सर्वगः सर्वविद्-भानु:विष्वक-सेनो जनार्दनः । वेदो वेदविद-अव्यंगो वेदांगो वेदवित् कविः ।। 14 ।। लोकाध्यक्षः सुराध्यक्षो धर्माध्यक्षः कृता-कृतः । चतुरात्मा चतुर्व्यूह:-चतुर्दंष्ट्र:-चतुर्भुजः ।। 15 ।। भ्राजिष्णु भोजनं भोक्ता सहिष्णु: जगदादिजः । अनघो विजयो जेता विश्वयोनिः पुनर्वसुः ।। 16 ।। उपेंद्रो वामनः प्रांशु: अमोघः शुचि: ऊर्जितः । अतींद्रः संग्रहः सर्गो धृतात्मा नियमो यमः ।। 17 ।। वेद्यो वैद्यः सदायोगी वीरहा माधवो मधुः। अति-इंद्रियो महामायो महोत्साहो महाबलः ।। 18 ।। महाबुद्धि: महा-वीर्यो महा-शक्ति: महा-द्युतिः। अनिर्देश्य-वपुः श्रीमान अमेयात्मा महाद्रि-धृक ।। 19 ।। महेष्वासो महीभर्ता श्रीनिवासः सतां गतिः । अनिरुद्धः सुरानंदो गोविंदो गोविदां-पतिः ।। 20 ।। मरीचि:दमनो हंसः सुपर्णो भुजगोत्तमः । हिरण्यनाभः सुतपाः पद्मनाभः प्रजापतिः ।। 21 ।। अमृत्युः सर्व-दृक् सिंहः सन-धाता संधिमान स्थिरः । अजो दुर्मर्षणः शास्ता विश्रुतात्मा सुरारिहा ।। 22 ।। गुरुःगुरुतमो धामः सत्यः सत्य-पराक्रमः । निमिषो-अ-निमिषः स्रग्वी वाचस्पति: उदार-धीः ।। 23 ।। अग्रणी: ग्रामणीः श्रीमान न्यायो नेता समीरणः । सहस्र-मूर्धा विश्वात्मा सहस्राक्षः सहस्रपात ।। 24 ।। आवर्तनो निवृत्तात्मा संवृतः सं-प्रमर्दनः । अहः संवर्तको वह्निः अनिलो धरणीधरः ।। 25 ।। सुप्रसादः प्रसन्नात्मा विश्वधृक्-विश्वभुक्-विभुः । सत्कर्ता सकृतः साधु: जह्नु:-नारायणो नरः ।। 26 ।। असंख्येयो-अप्रमेयात्मा विशिष्टः शिष्ट-कृत्-शुचिः । सिद्धार्थः सिद्धसंकल्पः सिद्धिदः सिद्धिसाधनः ।। 27।। वृषाही वृषभो विष्णु: वृषपर्वा वृषोदरः । वर्धनो वर्धमानश्च विविक्तः श्रुति-सागरः ।। 28 ।। सुभुजो दुर्धरो वाग्मी महेंद्रो वसुदो वसुः । नैक-रूपो बृहद-रूपः शिपिविष्टः प्रकाशनः ।। 29 ।। ओज: तेजो-द्युतिधरः प्रकाश-आत्मा प्रतापनः । ऋद्धः स्पष्टाक्षरो मंत्र:चंद्रांशु: भास्कर-द्युतिः ।। 30 ।। अमृतांशूद्भवो भानुः शशबिंदुः सुरेश्वरः । औषधं जगतः सेतुः सत्य-धर्म-पराक्रमः ।। 31 ।। भूत-भव्य-भवत्-नाथः पवनः पावनो-अनलः । कामहा कामकृत-कांतः कामः कामप्रदः प्रभुः ।। 32 ।। युगादि-कृत युगावर्तो नैकमायो महाशनः । अदृश्यो व्यक्तरूपश्च सहस्रजित्-अनंतजित ।। 33 ।। इष्टो विशिष्टः शिष्टेष्टः शिखंडी नहुषो वृषः । क्रोधहा क्रोधकृत कर्ता विश्वबाहु: महीधरः ।। 34 ।। अच्युतः प्रथितः प्राणः प्राणदो वासवानुजः । अपाम निधिरधिष्टानम् अप्रमत्तः प्रतिष्ठितः ।। 35 ।। स्कन्दः स्कन्द-धरो धुर्यो वरदो वायुवाहनः । वासुदेवो बृहद भानु: आदिदेवः पुरंदरः ।। 36 ।। अशोक: तारण: तारः शूरः शौरि: जनेश्वर: । अनुकूलः शतावर्तः पद्मी पद्मनिभेक्षणः ।। 37 ।। पद्मनाभो-अरविंदाक्षः पद्मगर्भः शरीरभृत । महर्धि-ऋद्धो वृद्धात्मा महाक्षो गरुड़ध्वजः ।। 38 ।। अतुलः शरभो भीमः समयज्ञो हविर्हरिः । सर्वलक्षण लक्षण्यो लक्ष्मीवान समितिंजयः ।। 39 ।। विक्षरो रोहितो मार्गो हेतु: दामोदरः सहः । महीधरो महाभागो वेगवान-अमिताशनः ।। 40 ।। उद्भवः क्षोभणो देवः श्रीगर्भः परमेश्वरः । करणं कारणं कर्ता विकर्ता गहनो गुहः ।। 41 ।। व्यवसायो व्यवस्थानः संस्थानः स्थानदो-ध्रुवः । परर्रद्वि परमस्पष्टः तुष्टः पुष्टः शुभेक्षणः ।। 42 ।। रामो विरामो विरजो मार्गो नेयो नयो-अनयः । वीरः शक्तिमतां श्रेष्ठ: धर्मो धर्मविदुत्तमः ।। 43 ।। वैकुंठः पुरुषः प्राणः प्राणदः प्रणवः पृथुः । हिरण्यगर्भः शत्रुघ्नो व्याप्तो वायुरधोक्षजः ।। 44।। ऋतुः सुदर्शनः कालः परमेष्ठी परिग्रहः । उग्रः संवत्सरो दक्षो विश्रामो विश्व-दक्षिणः ।। 45 ।। विस्तारः स्थावर: स्थाणुः प्रमाणं बीजमव्ययम । अर्थो अनर्थो महाकोशो महाभोगो महाधनः ।। 46 ।। अनिर्विण्णः स्थविष्ठो-अभूर्धर्म-यूपो महा-मखः । नक्षत्रनेमि: नक्षत्री क्षमः क्षामः समीहनः ।। 47 ।। यज्ञ इज्यो महेज्यश्च क्रतुः सत्रं सतां गतिः । सर्वदर्शी विमुक्तात्मा सर्वज्ञो ज्ञानमुत्तमं ।। 48 ।। सुव्रतः सुमुखः सूक्ष्मः सुघोषः सुखदः सुहृत । मनोहरो जित-क्रोधो वीरबाहुर्विदारणः ।। 49 ।। स्वापनः स्ववशो व्यापी नैकात्मा नैककर्मकृत । वत्सरो वत्सलो वत्सी रत्नगर्भो धनेश्वरः ।। 50 ।। धर्मगुब धर्मकृद धर्मी सदसत्क्षरं-अक्षरं । अविज्ञाता सहस्त्रांशु: विधाता कृतलक्षणः ।। 51 ।। गभस्तिनेमिः सत्त्वस्थः सिंहो भूतमहेश्वरः । आदिदेवो महादेवो देवेशो देवभृद गुरुः ।। 52 ।। उत्तरो गोपतिर्गोप्ता ज्ञानगम्यः पुरातनः । शरीर भूतभृद्भोक्ता कपींद्रो भूरिदक्षिणः ।। 53 ।। सोमपो-अमृतपः सोमः पुरुजित पुरुसत्तमः । विनयो जयः सत्यसंधो दाशार्हः सात्वतां पतिः ।। 54 ।। जीवो विनयिता-साक्षी मुकुंदो-अमितविक्रमः । अम्भोनिधिरनंतात्मा महोदधिशयो-अंतकः ।। 55 ।। अजो महार्हः स्वाभाव्यो जितामित्रः प्रमोदनः । आनंदो नंदनो नंदः सत्यधर्मा त्रिविक्रमः ।। 56 ।। महर्षिः कपिलाचार्यः कृतज्ञो मेदिनीपतिः । त्रिपदस्त्रिदशाध्यक्षो महाश्रृंगः कृतांतकृत ।। 57 ।। महावराहो गोविंदः सुषेणः कनकांगदी । गुह्यो गंभीरो गहनो गुप्तश्चक्र-गदाधरः ।। 58 ।। वेधाः स्वांगोऽजितः कृष्णो दृढः संकर्षणो-अच्युतः । वरूणो वारुणो वृक्षः पुष्कराक्षो महामनाः ।। 59 ।। भगवान भगहानंदी वनमाली हलायुधः । आदित्यो ज्योतिरादित्यः सहिष्णु:-गतिसत्तमः ।। 60 ।। सुधन्वा खण्डपरशुर्दारुणो द्रविणप्रदः । दिवि:स्पृक् सर्वदृक व्यासो वाचस्पति:अयोनिजः ।। 61 ।। त्रिसामा सामगः साम निर्वाणं भेषजं भिषक । संन्यासकृत्-छमः शांतो निष्ठा शांतिः परायणम ।। 62 ।। शुभांगः शांतिदः स्रष्टा कुमुदः कुवलेशयः । गोहितो गोपतिर्गोप्ता वृषभाक्षो वृषप्रियः ।। 63 ।। अनिवर्ती निवृत्तात्मा संक्षेप्ता क्षेमकृत्-शिवः । श्रीवत्सवक्षाः श्रीवासः श्रीपतिः श्रीमतां वरः ।। 64 ।। श्रीदः श्रीशः श्रीनिवासः श्रीनिधिः श्रीविभावनः । श्रीधरः श्रीकरः श्रेयः श्रीमान्-लोकत्रयाश्रयः ।। 65 ।। स्वक्षः स्वंगः शतानंदो नंदिर्ज्योतिर्गणेश्वर: । विजितात्मा विधेयात्मा सत्कीर्तिश्छिन्नसंशयः ।। 66 ।। उदीर्णः सर्वत:चक्षुरनीशः शाश्वतस्थिरः । भूशयो भूषणो भूतिर्विशोकः शोकनाशनः ।। 67 ।। अर्चिष्मानर्चितः कुंभो विशुद्धात्मा विशोधनः । अनिरुद्धोऽप्रतिरथः प्रद्युम्नोऽमितविक्रमः ।। 68 ।। कालनेमिनिहा वीरः शौरिः शूरजनेश्वरः । त्रिलोकात्मा त्रिलोकेशः केशवः केशिहा हरिः ।। 69 ।। कामदेवः कामपालः कामी कांतः कृतागमः । अनिर्देश्यवपुर्विष्णु: वीरोअनंतो धनंजयः ।। 70 ।। ब्रह्मण्यो ब्रह्मकृत् ब्रह्मा ब्रह्म ब्रह्मविवर्धनः । ब्रह्मविद ब्राह्मणो ब्रह्मी ब्रह्मज्ञो ब्राह्मणप्रियः ।। 71 ।। महाक्रमो महाकर्मा महातेजा महोरगः । महाक्रतुर्महायज्वा महायज्ञो महाहविः ।। 72 ।। स्तव्यः स्तवप्रियः स्तोत्रं स्तुतिः स्तोता रणप्रियः । पूर्णः पूरयिता पुण्यः पुण्यकीर्तिरनामयः ।। 73 ।। मनोजवस्तीर्थकरो वसुरेता वसुप्रदः । वसुप्रदो वासुदेवो वसुर्वसुमना हविः ।। 74 ।। सद्गतिः सकृतिः सत्ता सद्भूतिः सत्परायणः । शूरसेनो यदुश्रेष्ठः सन्निवासः सुयामुनः ।। 75 ।। भूतावासो वासुदेवः सर्वासुनिलयो-अनलः । दर्पहा दर्पदो दृप्तो दुर्धरो-अथापराजितः ।। 76 ।। विश्वमूर्तिमहार्मूर्ति:दीप्तमूर्ति: अमूर्तिमान । अनेकमूर्तिरव्यक्तः शतमूर्तिः शताननः ।। 77 ।। एको नैकः सवः कः किं यत-तत-पद्मनुत्तमम । लोकबंधु: लोकनाथो माधवो भक्तवत्सलः ।। 78 ।। सुवर्णोवर्णो हेमांगो वरांग: चंदनांगदी । वीरहा विषमः शून्यो घृताशीरऽचलश्चलः ।। 79 ।। अमानी मानदो मान्यो लोकस्वामी त्रिलोकधृक । सुमेधा मेधजो धन्यः सत्यमेधा धराधरः ।। 80 ।। तेजोवृषो द्युतिधरः सर्वशस्त्रभृतां वरः । प्रग्रहो निग्रहो व्यग्रो नैकश्रृंगो गदाग्रजः ।। 81 ।। चतुर्मूर्ति: चतुर्बाहु:श्चतुर्व्यूह:चतुर्गतिः । चतुरात्मा चतुर्भाव:चतुर्वेदविदेकपात ।। 82 ।। समावर्तो-अनिवृत्तात्मा दुर्जयो दुरतिक्रमः । दुर्लभो दुर्गमो दुर्गो दुरावासो दुरारिहा ।। 83 ।। शुभांगो लोकसारंगः सुतंतुस्तंतुवर्धनः । इंद्रकर्मा महाकर्मा कृतकर्मा कृतागमः ।। 84 ।। उद्भवः सुंदरः सुंदो रत्ननाभः सुलोचनः । अर्को वाजसनः श्रृंगी जयंतः सर्वविज-जयी ।। 85 ।। सुवर्णबिंदुरक्षोभ्यः सर्ववागीश्वरेश्वरः । महाह्रदो महागर्तो महाभूतो महानिधः ।। 86 ।। कुमुदः कुंदरः कुंदः पर्जन्यः पावनो-अनिलः । अमृतांशो-अमृतवपुः सर्वज्ञः सर्वतोमुखः ।। 87 ।। सुलभः सुव्रतः सिद्धः शत्रुजिच्छत्रुतापनः । न्यग्रोधो औदुंबरो-अश्वत्थ:चाणूरांध्रनिषूदनः ।। 88 ।। सहस्रार्चिः सप्तजिव्हः सप्तैधाः सप्तवाहनः । अमूर्तिरनघो-अचिंत्यो भयकृत्-भयनाशनः ।। 89 ।। अणु:बृहत कृशः स्थूलो गुणभृन्निर्गुणो महान् । अधृतः स्वधृतः स्वास्यः प्राग्वंशो वंशवर्धनः ।। 90 ।। भारभृत्-कथितो योगी योगीशः सर्वकामदः । आश्रमः श्रमणः क्षामः सुपर्णो वायुवाहनः ।। 91 ।। धनुर्धरो धनुर्वेदो दंडो दमयिता दमः । अपराजितः सर्वसहो नियंता नियमो यमः ।। 92 ।। सत्त्ववान सात्त्विकः सत्यः सत्यधर्मपरायणः । अभिप्रायः प्रियार्हो-अर्हः प्रियकृत-प्रीतिवर्धनः ।। 93 ।। विहायसगतिर्ज्योतिः सुरुचिर्हुतभुग विभुः । रविर्विरोचनः सूर्यः सविता रविलोचनः ।। 94 ।। अनंतो हुतभुग्भोक्ता सुखदो नैकजोऽग्रजः । अनिर्विण्णः सदामर्षी लोकधिष्ठानमद्भुतः ।। 95।। सनात्-सनातनतमः कपिलः कपिरव्ययः । स्वस्तिदः स्वस्तिकृत स्वस्ति स्वस्तिभुक स्वस्तिदक्षिणः ।। 96 ।। अरौद्रः कुंडली चक्री विक्रम्यूर्जितशासनः । शब्दातिगः शब्दसहः शिशिरः शर्वरीकरः ।। 97 ।। अक्रूरः पेशलो दक्षो दक्षिणः क्षमिणां वरः । विद्वत्तमो वीतभयः पुण्यश्रवणकीर्तनः ।। 98 ।। उत्तारणो दुष्कृतिहा पुण्यो दुःस्वप्ननाशनः । वीरहा रक्षणः संतो जीवनः पर्यवस्थितः ।। 99 ।। अनंतरूपो-अनंतश्री: जितमन्यु: भयापहः । चतुरश्रो गंभीरात्मा विदिशो व्यादिशो दिशः ।। 100 ।। अनादिर्भूर्भुवो लक्ष्मी: सुवीरो रुचिरांगदः । जननो जनजन्मादि: भीमो भीमपराक्रमः ।। 101 ।। आधारनिलयो-धाता पुष्पहासः प्रजागरः । ऊर्ध्वगः सत्पथाचारः प्राणदः प्रणवः पणः ।। 102 ।। प्रमाणं प्राणनिलयः प्राणभृत प्राणजीवनः । तत्त्वं तत्त्वविदेकात्मा जन्ममृत्यु जरातिगः ।। 103 ।। भूर्भवः स्वस्तरुस्तारः सविता प्रपितामहः । यज्ञो यज्ञपतिर्यज्वा यज्ञांगो यज्ञवाहनः ।। 104 ।। यज्ञभृत्-यज्ञकृत्-यज्ञी यज्ञभुक्-यज्ञसाधनः । यज्ञान्तकृत-यज्ञगुह्यमन्नमन्नाद एव च ।। 105 ।। आत्मयोनिः स्वयंजातो वैखानः सामगायनः । देवकीनंदनः स्रष्टा क्षितीशः पापनाशनः ।। 106 ।। शंखभृन्नंदकी चक्री शार्ङ्गधन्वा गदाधरः । रथांगपाणिरक्षोभ्यः सर्वप्रहरणायुधः ।। 107 ।। सर्वप्रहरणायुध ॐ नमः इति। वनमालि गदी शार्ङ्गी शंखी चक्री च नंदकी ।

+7 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 43 शेयर
Gayatri Kulkarni Dec 30, 2020

॥श्रीमहालक्ष्मीस्तोत्रम् विष्णुपुराणान्तर्गतम्॥ श्रीगणेशाय नमः। श्रीपराशर उवाच सिंहासनगतः शक्रस्सम्प्राप्य त्रिदिवं पुनः। देवराज्ये स्थितो देवीं तुष्टावाब्जकरां ततः॥ १॥ इन्द्र उवाच नमस्ये सर्वलोकानां जननीमब्जसम्भवाम्। श्रियमुन्निद्रपद्माक्षीं विष्णुवक्षःस्थलस्थिताम्॥ २॥ पद्मालयां पद्मकरां पद्मपत्रनिभेक्षणाम् वन्दे पद्ममुखीं देवीं पद्मनाभप्रियाम्यहम्॥ ३॥ त्वं सिद्धिस्त्वं स्वधा स्वाहा सुधा त्वं लोकपावनी। सन्ध्या रात्रिः प्रभा भूतिर्मेधा श्रद्धा सरस्वती॥ ४॥ यज्ञविद्या महाविद्या गुह्यविद्या च शोभने। आत्मविद्या च देवि त्वं विमुक्तिफलदायिनी॥ ५॥ आन्वीक्षिकी त्रयीवार्ता दण्डनीतिस्त्वमेव च। सौम्यासौम्यैर्जगद्रूपैस्त्वयैतद्देवि पूरितम्॥ ६॥ का त्वन्या त्वमृते देवि सर्वयज्ञमयं वपुः। अध्यास्ते देवदेवस्य योगचिन्त्यं गदाभृतः॥ ७॥ त्वया देवि परित्यक्तं सकलं भुवनत्रयम्। विनष्टप्रायमभवत्त्वयेदानीं समेधितम्॥ ८॥ दाराः पुत्रास्तथाऽऽगारं सुहृद्धान्यधनादिकम्। भवत्येतन्महाभागे नित्यं त्वद्वीक्षणान्नृणाम्॥ ९॥ शरीरारोग्यमैश्वर्यमरिपक्षक्षयः सुखम्। देवि त्वद्दृष्टिदृष्टानां पुरुषाणां न दुर्लभम्॥ १०॥ त्वमम्बा सर्वभूतानां देवदेवो हरिः पिता। त्वयैतद्विष्णुना चाम्ब जगद्व्याप्तं चराचरम्॥ ११॥ मनःकोशस्तथा गोष्ठं मा गृहं मा परिच्छदम्। मा शरीरं कलत्रं च त्यजेथाः सर्वपावनि॥ १२॥ मा पुत्रान्मा सुहृद्वर्गान्मा पशून्मा विभूषणम्। त्यजेथा मम देवस्य विष्णोर्वक्षःस्थलाश्रये॥ १३॥ सत्त्वेन सत्यशौचाभ्यां तथा शीलादिभिर्गुणैः। त्यज्यन्ते ते नराः सद्यः सन्त्यक्ता ये त्वयाऽमले॥ १४॥ त्वयाऽवलोकिताः सद्यः शीलाद्यैरखिलैर्गुणैः। कुलैश्वर्यैश्च पूज्यन्ते पुरुषा निर्गुणा अपि॥ १५॥ सश्लाघ्यः सगुणी धन्यः स कुलीनः स बुद्धिमान्। स शूरः सचविक्रान्तो यस्त्वया देवि वीक्षितः॥ १६॥ सद्योवैगुण्यमायान्ति शीलाद्याः सकला गुणाः। पराङ्गमुखी जगद्धात्री यस्य त्वं विष्णुवल्लभे॥ १७॥ न ते वर्णयितुं शक्तागुणाञ्जिह्वाऽपि वेधसः। प्रसीद देवि पद्माक्षि माऽस्मांस्त्याक्षीः कदाचन॥ १८॥ श्रीपराशर उवाच एवं श्रीः संस्तुता सम्यक् प्राह हृष्टा शतक्रतुम्। शृण्वतां सर्वदेवानां सर्वभूतस्थिता द्विज॥ १९॥ श्रीरुवाच परितुष्टास्मि देवेश स्तोत्रेणानेन ते हरेः। वरं वृणीष्व यस्त्विष्टो वरदाऽहं तवागता॥ २०॥ इन्द्र उवाच वरदा यदिमेदेवि वरार्हो यदिवाऽप्यहम्। त्रैलोक्यं न त्वया त्याज्यमेष मेऽस्तु वरः परः॥ २१॥ स्तोत्रेण यस्तवैतेन त्वां स्तोष्यत्यब्धिसम्भवे। स त्वया न परित्याज्यो द्वितीयोऽस्तुवरो मम॥ २२॥ श्रीरुवाच त्रैलोक्यं त्रिदशश्रेष्ठ न सन्त्यक्ष्यामि वासव। दत्तो वरो मयाऽयं ते स्तोत्राराधनतुष्ट्या॥ २३॥ यश्च सायं तथा प्रातः स्तोत्रेणानेन मानवः। स्तोष्यते चेन्न तस्याहं भविष्यामि पराङ्गमुखी॥ २४॥ श्रीपाराशर उवाच एवं वरं ददौ देवी देवराजाय वै पुरा। मैत्रेय श्रीर्महाभागा स्तोत्राराधनतोषिता॥ २५॥ भृगोः ख्यात्यां समुत्पन्ना श्रीः पूर्वमुदधेः पुनः। देवदानवयत्नेन प्रसूताऽमृतमन्थने॥ २६॥ एवं यदा जगत्स्वामी देवराजो जनार्दनः। अवतारः करोत्येषा तदा श्रीस्तत्सहायिनी॥ २७॥ पुनश्चपद्मा सम्भूता यदाऽदित्योऽभवद्धरिः। यदा च भार्गवो रामस्तदाभूद्धरणीत्वियम्॥ २८॥ राघवत्वेऽभवत्सीता रुक्मिणी कृष्णजन्मनि। अन्येषु चावतारेषु विष्णोरेखाऽनपायिनी॥ २९॥ देवत्वे देवदेहेयं मानुषत्वे च मानुषी। विष्णोर्देहानुरुपां वै करोत्येषाऽऽत्मनस्तनुम्॥ ३०॥ यश्चैतशृणुयाज्जन्म लक्ष्म्या यश्च पठेन्नरः। श्रियो न विच्युतिस्तस्य गृहे यावत्कुलत्रयम्॥ ३१॥ पठ्यते येषु चैवर्षे गृहेषु श्रीस्तवं मुने। अलक्ष्मीः कलहाधारा न तेष्वास्ते कदाचन॥ ३२॥ एतत्ते कथितं ब्रह्मन्यन्मां त्वं परिपृच्छसि। क्षीराब्धौ श्रीर्यथा जाता पूर्वं भृगुसुता सती॥ ३३॥ इति सकलविभूत्यवाप्तिहेतुः स्तुतिरियमिन्द्रमुखोद्गता हि लक्ष्म्याः। अनुदिनमिह पठ्यते नृभिर्यैर्वसति न तेषु कदाचिदप्यलक्ष्मीः॥ ३४॥ ॥ इति श्रीविष्णुपुराणे महालक्ष्मी स्तोत्रं सम्पूर्णम्॥

+41 प्रतिक्रिया 4 कॉमेंट्स • 18 शेयर
Kiran Khairnar Dec 1, 2020

+9 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 3 शेयर