रामायण

ll श्रीराम जय राम जय जय राम ll आजच्या कथा निरुपणातील चौपाई आणि दोहा मराठीतून.... चौपाई :- --------- चतुर गँभीर राम महतारी। बीचु पाइ निज बात सँवारी॥ पठए भरतु भूप ननिअउरें। राम मातु मत जानब रउरें॥1॥ भावार्थ :- --------- रामाची आई (कौसल्या) खूप चतुर (धूर्त) व पाताळयंत्री आहे. सुसंधी पाहून तिने आपला स्वार्थ साधला. राजाने भरतास आजोळी पाठविले ते रामाच्या मातेच्या सल्ल्यानेच असे तुम्ही नक्की समजा. सेवहिं सकल सवति मोहि नीकें। गरबित भरत मातु बल पी कें॥ सालु तुमर कौसिलहि माई। कपट चतुर नहिं होई जनाई॥2॥ भावार्थ :- --------- कौसल्येला असं वाटतं की सगळ्या सवती माझी चांगली सेवा करतात. (पण) भरताची आई मात्र पतीच्या जोरावर (असल्याने घमेंडीत) गर्विष्ठ आहे. (म्हणून) कौसल्येच्या मनात तुम्ही फार सलत आहांत; पण ती कपट करण्यात चतुर आहे. म्हणून ( त्यांचे कपट ओळखतां येत नाही ) त्यांच्या मनातला भाव ओळखता येत नाही. राजहि तुम्ह पर प्रेमु बिसेषी। सवति सुभाउ सकइ नहिं देखी॥ रचि प्रपंचु भूपहि अपनाई। राम तिलक हित लगन धराई॥3॥ भावार्थ :- --------- राजांचे तुमच्यावर फार (विशेष) प्रेम आहे हे तिला सवतीमत्सराने पाहवत नाही. म्हणून तिने जाळं रचून राजांना वश करुन घेतले आणि ( भरताच्या अनुपस्थितिमध्ये ) रामराज्याभिषेकासाठी मुहुर्त सुद्धा ठरवला. यह कुल उचित राम कहुँ टीका। सबहि सोहाइ मोहि सुठि नीका॥ आगिलि बात समुझि डरु मोही। देउ दैउ फिरि सो फलु ओही॥4॥ भावार्थ :- --------- रामाचा राज्याभिषेक व्हावा हे या कुळाला योग्यच आहे. सर्व लोकांना ते प्रिय आहे व मला तर विशेषच बरे वाटते. (परंतु) भविष्यकाळाकडे पाहिले म्हणजे भयाने थरकांप सुटतो ! ते फळ दैव फिरून तिलाच ( कौसल्येलाच ) मिळो. दोहा : रचि पचि कोटिक कुटिलपन कीन्हेसि कपट प्रबोधु। कहिसि कथा सत सवति कै जेहि बिधि बाढ़ बिरोधु॥18॥ भावार्थ :- --------- अशा तर्‍हेने पुष्कळ कुटिल काल्पनिक कथा आहे रचुन सांगत, कपटाची जाणीव करुन दिली. या आणि सवतींच्या कित्येक गोष्टी सांगून राणीच्या मनात विरोध वाढविला (विरोध वाढेल अशा गोष्टी सांगितल्या) ॥ दो० १८ ॥ ।। जानकी जीवन स्मरण जय जय राम ।।

+9 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 0 शेयर

+49 प्रतिक्रिया 6 कॉमेंट्स • 41 शेयर

+47 प्रतिक्रिया 8 कॉमेंट्स • 55 शेयर