राम

Arun keni Nov 9, 2019

+52 प्रतिक्रिया 2 कॉमेंट्स • 3 शेयर
Arun keni Nov 9, 2019

+47 प्रतिक्रिया 3 कॉमेंट्स • 5 शेयर

श्रीराम समर्थ श्री रविंद्र पाठक यांचे गोस्वामी तुलसीदासरचित रामचरितमानस ग्रंथातील द्वितीय सोपान अयोध्याकाण्ड कथाचिंतन क्रमांक *४८१* मधील सार. *(दोहा क्रमांक ११२ वनविचरण प्रसंग )* *पुनि सियँ राम लखन कर जोरी। जमुनहि कीन्ह प्रनामु बहोरी।।* *चले ससीय मुदित दोउ भाई। रबितनुजा कइ करत बड़ाई।।* *पथिक अनेक मिलहिं मग जाता। कहहिं सप्रेम देखि दोउ भ्राता।।* *राज लखन सब अंग तुम्हारें। देखि सोचु अति हृदय हमारें।।* *मारग चलहु पयादेहि पाएँ। ज्योतिषु झूठ हमारें भाएँ।।* *अगमु पंथ गिरि कानन भारी। तेहि महँ साथ नारि सुकुमारी।।* *करि केहरि बन जाइ न जोई। हम सँग चलहि जो आयसु होई।।* *जाब जहाँ लगि तहँ पहुँचाई। फिरब बहोरि तुम्हहि सिरु नाई।।* *दोहा-एहि बिधि पूँछहिं प्रेम बस पुलक गात जलु नैन।* *कृपासिंधु फेरहि तिन्हहि कहि बिनीत मृदु बैन ।। ११२ ।।* प्रभू रामचंद्र या तपस्वाला जो अत्यंत मनापासून तो ज्या सौंदर्याचे रसपान करण्यासाठी आला होता,ज्या सगुण चरित्राचा तो ख-या अर्थाने ग्राहक होता त्या सगुण चरित्राच्या आधारे,तुलसीदासांच्या अनन्य भक्तीच्या आधारे त्यांना दर्शन देतो आणि त्यानंतर पुन्हा या चरित्राचा प्रवास पुढच्या दिशेने सुरू होतो. गोस्वामीजी लिहितात की समस्त गावकरी रामचंद्रांचे दर्शन घेऊन सुखावत आहेतच परंतु त्याचवेळेला या सर्वांच्या ह्रदयाला एक व्याकुळता देखील व्यापून जात आहे की यांच्या आई-वडिलांनी यांना या वनवासात कसे बरे जाऊ दिले असेल. अशा या समस्त गावक-यांचे प्रेम प्राप्त करत,करत प्रभू रामचंद्र यमुनेच्या किनाऱ्यावरून आता त्यांचा सखा गुहकाला आज्ञा देतात.गोस्वामीजी लिहितात की,रामरायांनी सखा गुहकाला अनेक प्रकारांनी घरी परत जाण्यासाठी समजून सांगितले.आणि प्रभू रामचंद्रांची आज्ञा शिरोधार्य मानून गुहकाने देखील आपल्या घरी शृंगवेरपूरच्या दिशेने गमन केलेले आहे. खरंतर त्याची इच्छा होती की पर्णकुटी बांधूनच आपण जावे परंतु भगवंताची आज्ञा शिरसावंद्य मानून भगवंताचे दर्शन घेऊन शृंगवेरपूरला गमन केलेले आहे. प्रभू रामचंद्र,सीताजी आणि लक्ष्मणजी गुहकाला परत पाठवतात आणि तद्पश्चात यमुनाजींना प्रणाम करून अत्यंत प्रसन्नतेने हे तिघेही यमुनाजींची प्रशंसा करत पुढच्या मार्गाने निघालेले आहेत.सूर्याची मुलगी असलेली ही यमुना म्हणजे जणूकाही प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांच्या सूर्यवंशात असलेली एक जेष्ठ नारी आणि आपण आपल्या घरातील जेष्ठ व्यक्तिंची मनात वंदना करत असतो त्याप्रमाणे प्रभू रामचंद्रांनी यमुनाजींना सूर्याची कन्या या रूपाने आपल्या घराण्यातील घरातील जेष्ठ नारी अशादृष्टीने त्यांची वंदना केलेली आहे.आणि हे तिघेही जण अत्यंत प्रसन्नतेने पुढच्या वाटेने निघालेले आहेत. गुहकाने यमुना पार करून तो शृंगवेरपूरच्या दिशेने निघून गेलेला आहे.प्रभू रामचंद्र,लक्ष्मण,सीताजी वेगवेगळ्या प्रांतातून जातात आणि रस्ताने जाताना त्यांना अनेक प्रांतस्थ बघत आहेत,भेटत आहेत.या दोन्हीही भावंडांचे दर्शन घेतल्यानंतर अत्यंत प्रेमाने ते त्यांच्याविषयी विचार करताना आपल्याकडे असलेल्या ज्ञानाच्या आधारे प्रभू रामचंद्र,लक्ष्मणाच्या विषयी तर्क मांडू लागतात की आम्हांला तुमच्या दर्शनाने तुमच्या देहातील खुणा स्पष्टपणे सांगत आहेत की जरी आपण या वनवासीरूपात असला तरी आपण निश्चितपणे कुठल्यातरी राजघराण्यातील युवक आहात,आपल्याबरोबर असलृली ही स्त्री देखील कुठल्यातरी राजघराण्यातील आहे.हे आम्ही आजपर्यंत शिकलेल्या सांकेतिक अभ्यासावरून सांगतो आहे. कारण राजघराण्यातील काही चिन्ह असतात मानस- पियूषकारांनी त्या सर्व चिन्हांची चर्चा केलेली आहे की कुठली,कुठली चिन्ह या मंडळींनी पाहिली असतील. सर्वप्रथम चरण या चरणांतील लाल-तांबुस रंग अत्यंत सुंदर असे हे चरण, सरळ बोटे,अत्यंत आटीव अशी शरीरयष्टी,सिंहासारखे खांदे,अत्यंत सुंदर कुरळे केस,सुंदर नेत्र आणि सर्वार्थाने शरीरावर असलेली ही सर्व राजलक्षणे ही काही केल्या झाकायची म्हटली तरी झाकली जात नाहीत. अशी लक्षणे या पांतस्थांना दिसत आहेत परंतु ते सांसारीक असल्यामुळे याचा अर्थ ते वेगळ्या पद्धतीने काढतात की मनामध्ये विचार करतात की आजपर्यंत जे ज्योतिषशास्त्र आम्ही शिकलो की अशाप्रकारच्या खुणा असतील तर त्या मनुष्याला राजयोग असतो त्या कदाचित कुठंतरी चुकल्यासारख्या वाटू लागल्या कारण या सर्व राजलक्षणाच्या खुणा असताना देखील आपल्याला मात्र एवढे भयानक कष्ट सहान करावे लागतात.आपण ख-या अर्थाने राजलक्षणाने परिपूर्ण असूनही अनवाणी पायाने या भयानक वनात चालत आहात,असे वन जे मोठमोठया पर्वतांनी,दुर्गम रस्त्यांनी भरलेले आहे आणि त्याबरोबर केवळ दोन पुरुष नाही तर एका सुकुमारीलाही हे दुःख सहान करावे लागत आहे. आजपर्यंत ज्योतिष शास्त्रातील खुणा या आम्हांला सांगत आहेत की आपला जन्म केवळ राजभोगासाठीच आहे परंतु आपले समस्त चरित्र आज डोळ्यांनी बघतांना असे वाटते की कुठंतरी ज्योतिषशास्त्र चुकले की काय.अशापद्धतीने या सर्व पांतस्थ मंडळींना देखील या तिघांविषयी विशेष प्रेम,आकर्षण वाटू लागले प्रत्येकजण भगवंताजवळ प्रार्थना करतो की या वनात मोठमोठे हत्ती,सिंह आहेत अशा भयानक वनात तुम्ही जात आहात आणि आम्ही या वनाचे सर्वजण जाणकार आहोत आपली जर आज्ञा असेल तर आम्ही देखील आपल्याबरोबर येतो. आपली जर इच्छा असेल तर आपल्याला जिथं जायचे आहे तिथपर्यन्त आपल्याला घेऊन जातो,तिथं आपल्याला पोहचवून आपल्याला नमस्कार करून आम्ही परत येतो.अशापद्धतीने हे सर्वजाण प्रभू रामचंद्रांच्या सेवेसाठी आपण काय करू शकतो असा विचार करतात.आणि प्रभू रामचंद्र मृदुवाणीने त्यांना पुन्हा आपआपल्या घराकडे परत पाठवतात अशाप्रकारे प्रेमवश पुलकित होऊन अश्रूंनी सद्गदित झालेले हे सर्व पांतस्थ प्रभू रामचंद्र,सीताजी आणि लक्ष्मणाच्या दर्शनाने धन्य होतात. जानकी जीवन स्मरण जय जय राम लक्ष्मीकांत खडके 🙏

+7 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 4 शेयर