महत्वाच्या धार्मिक घडामोडी

*जेवताना चव महत्त्वाची की खडा*? एका रेस्टॉरंट मध्ये सुप्रसिद्ध शेफ ने उच्च प्रतीचा तांदूळ वापरून अतिशय चवदार पुलाव बनवला. पुलाव तयार होताच त्याचा सुगंध आसमंतात पसरला. प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटले.😋 सगळ्यांना त्या पुलावाची चव घेण्याची घाई लागली. जवळपास शंभर लोकांना रेस्टॉरंट मध्ये वेटरने पुलाव वाढला. 🥘 प्रत्येकजण पहिला घास हातात घेऊन तोंडात घालणार तोच शेफने येऊन सांगितले की यात गारेचा एक खडा पडला आहे. तो तांदळाच्या रंगाचा आणि आकाराचा असल्याने मला सापडला नाही. तो कोणाला येईल सांगता येणार नाही. काळजी घ्या. कुणाच्या दाडेखाली आला तर इजा होऊ शकते म्हणून सांगितले. 🤔🤭😯 आता पुलावाचा स्वाद चांगला आहे…. चव उत्तम आहे…. तरी पण खाण्याची गंमत निघून गेली. प्रत्येकजण घास खाताना चवी कडे लक्ष न देता, याच घासात तर खडा नसेल ना या संशयाने एक एक घास ढकलत होता.😬 जो तो सावध झाल्याने गप्पागोष्टी विनोद काहीही झाले नाही. एकत्र जेवणाची मजाच गेली होती. सर्वजण एकत्र असूनही एक-एकटे विचारात पडले होते. सगळ्यांनी शेवटपर्यंत जेवण केले. अगदी शेवटचं घास देखील सावधपणे घेतला.🧐 सर्वांनी आपल्याला खडा न आल्याबद्दल सुसस्कारा सोडला. हात धुतले. तेव्हा कोणाच्यातरी लक्षात आले कि, अरेच्च्या? कुणालाच खडा आला नाही ??🤔😠 मग त्यांनी त्या शेफला बोलावले. त्याला विचारले तू तर म्हणाला होतास खडा येईल !🥵 तो शेफ म्हणाला मी बहुतेक सर्वच खडे काढले होते, परंतु न जाणो चुकून एखादा राहिला असेल तर आपल्याला सावध केलेले बरे म्हणून सांगितले !☹️ सगळे एकमेकांकडे बघू लागले. अतिशय उत्तम स्वादिष्ट झालेल्या पुलावाबद्दल चर्चाच झाली नाही. जेवण करून सगळे दमले होते. कारण प्रत्येक घास खाण्यातली सहजता गेली होती. सगळ्यांच्या हालचालींची सहजता गेली होती. म्हणून भोजन करणे एवढे कष्टदायक झाले होते !! 🙃 एका रोगामुळे, सध्या आपली अवस्था पुलावातल्या खड्यासारखी झाली आहे. कोणाला हा खडा येईल हे सांगता येत नाही. जगण्यातली सहजता गेली. अगदी मदत करणारा हात देखील, कोरोनाचा असेल का? दूधवाला, भाजीवाला, किराणावाला, जीवनावश्यक वस्तू घेताना, वस्तू बरोबर काय येईल याचीच जास्त चिंता घेऊन जगतोय आपण….!😷🤥🤤🤒 पूर्वी शिंक आली की वाटायचं कुणीतरी आठवण काढली ! परंतु आता वाटते की देवाने आपली फाईल बाहेर काढली की काय…? माहिती नाही किती दिवस चालेल हे सर्व. परंतु त्या चविष्ट जेवणाप्रमाणे आपले आनंदी जीवन मात्र आता बेचव होऊ देऊ नये ही नम्र विनंती. नकारात्मक बातम्या, पोस्ट न वाचता, मनाला उत्साही करणा-या पोस्ट, माहिती, पुस्तक वाचा, छंद जोपासा आणि किलो किलोमधे आपल्याच कडून आनंद विकत घ्या !

+1 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 0 शेयर

+17 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 33 शेयर

+7 प्रतिक्रिया 2 कॉमेंट्स • 4 शेयर