भोलेनाथ‬

Ravi Mittal Dec 6, 2019

+3 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 1 शेयर

रुद्राक्ष महिमा आपल्या अनेक शास्त्रांतून सांगितला आहे. ‘देवी भागवतात सांगितले आहे की, स्नानादीने निवृत्त होऊन शुद्ध वस्त्र परिधान करावे व भस्म लावून रुद्राक्षमाला धारण करावी. नंतर विधिसहीत मंत्र जप करावा. जर बत्तीस रुद्राक्ष गळ्यात, चाळीस मस्तकाभोवती, सहा-सहा दोन्ही कानांत, बारा-बारा दोन्ही हातांत, सोळा-सोळा दोन्ही भुजांत, एक शेंडीत, तसेच एकशे आठ रुद्राक्ष वक्षस्थळी धारण केल्यास धारण करणारा स्वत: नीलकंठ शीव बनतो. रुद्राक्षास सोने किंवा चांदीच्या तारेत ओवून शेंडीत व कानात धारण करावे. यज्ञोपवीत, हात, कंठ व पोटावर रुद्राक्ष धारण करून पंचाक्षर मंत्र ‘नम: शिवाय’ चा जप करावा. विद्वान पुरुषाने प्रसन्न मन व निर्मल बुद्धीने रुद्राक्ष धारण करावेत. कारण तोच शिव ज्ञानाचे प्रत्यक्ष साधन आहे. जो पुरुष रुद्राक्ष शेंडीत धारण करतो, त्याच्यासाठी रुद्राक्ष तारक तत्त्वा (ओंकार) प्रमाणे महान आहे. दोन्ही कानांत धारण केलेले रुद्राक्ष साक्षात शिवस्वरूप आहेत. यज्ञोपवीतामध्ये धारण केल्यास रुद्राक्ष वेदांप्रमाणे असतात. हातांत धारण केल्यास दिशाप्रमाणे, तसेच कंठात धारण केल्याने सरस्वती व अग्निदेवतेप्रमाणे महिमावान असतात. रुद्राक्ष धारणाचा निर्देश चारी आश्रमांत व चारी वर्णांत केलेला आहे. रुद्राक्ष धारण करणा-यांना निषिद्ध दर्शन, निषिद्ध श्रवण, निषिद्ध स्मरण, निषिद्ध वस्तूपासून दोष लागत नाही. जरी तो निषिद्ध वस्तू हुंगेल, निषिद्ध पदार्थ खाईल किंवा निषिद्ध मार्गक्रमण करील, तरी तो पापमुक्त राहतो. जरी रुद्राक्ष धारण केलेला मनुष्य कोणाकडे जेवला, तर साक्षात रुद्राने जेवण केले, असे मानावे. जो मनुष्य रुद्राक्ष धारण करणा-यास श्राद्धास जेवण घालतो, त्यास पितरलोकाची प्राप्ती होते. हर हर महादेव ॐ नमः शिवाय जय श्री भोलेनाथ जय श्री महाकाली माता की जय श्री महाकाल जी नमस्कार 🙏 शुभ प्रभात शुभ सोमवार 🌅 नमस्कार 🙏 शुभ प्रभात वंदन 🚩 🍃 🔔 🎪 👣 🌅👏🌹🚩💕

+47 प्रतिक्रिया 8 कॉमेंट्स • 1 शेयर