भगवतगीता

*गीता परिवार प्रणीत,* 🌹 *आओ गीता सीखें - Let's Learn Geeta*🌹 *FREE ONLINE GEETA CLASSES* Level -1 - 9th Batch Starting on Monday, April 12, 2021 ● 20 दिनों में 2 अध्यायों का शुद्ध संस्कृत पठन का प्रशिक्षण ● अगले स्तर पर नि:शुल्क प्रवेश ● पठन की परीक्षा उत्तीर्ण करने पर 'गीता गुंजन ई-प्रशस्तिपत्र' ● 5 Days classes in a week (Monday-Friday). ● हिंदी व अंग्रेजी में *साप्ताहिक अर्थ विवेचन सत्र* (Weekly Interpretation Session in Hindi & English ) ● प्रातः *6* बजे से रात्रि *10* बजे (IST) तक 10 Time Slots. (6AM to 10PM) ● 10 Languages option (हिंदी, English, मराठी, गुजराती, तेलुगु, तमिल, कन्नड़, मलयालम, बांग्ला, उड़िया) ● जून से अब तक 1,00,000 से अधिक गीताप्रेमी साधकों को प्रवेश, अप्रैल हेतु भी 20,000 से अधिक प्रशिक्षार्थियों को प्रवेश की व्यवस्था। भगवद्गीता में स्वयं श्रीभगवान के मुख से की गई घोषणा *"न च तस्मान्मनुष्येषु कश्चिन्मे प्रियकृत्तमः"* के अनुसार जो साधक पूर्ण मनोयोग से गीता का पठन करेंगे वह निश्चित ही भगवान के प्रिय हो जायेंगे, इस भावना को मन मे लेकर आप भी गीता का शुद्ध संस्कृत पठन सीखने हेतु ऑनलाइन गीता संथा हेतु रजिस्टर करें। फॉर्म ध्यानपूर्वक निम्न लिंक से भरें - https://learngeeta.com/reg/ Please select your Language and Time slots carefully in Online registration form. NRIs should be careful on time, all mentioned time in form is IST. _|| गीता पढ़ें पढ़ायें जीवन में लायें ||_

+2 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 1 शेयर

अतिशय उत्तम वाचनीय अशी पोस्ट कॉपी पोस्ट आहे। #गीतासार 🙏🏻🙏🏻🌷🌷 आमच्याकडे ती व्यक्ती जेवायला बसली होती. जेवणाच्या ताटाला नमस्कार करून त्यांनी चार पाच घास घेतले व सर्व पदार्थांना दाद दिली. अगदी कोशिंबिरीत दाण्याच्या कुटाबरोबर आणखी काय घातलंय वगैरेही विचारून घेतलं. मी मुद्दाम वेगळा गोड पदार्थ म्हणून श्रीखंड-बासुंदी ऐवजी मोदक केले होते. त्याचीही छान पावती दिली. मला फार प्रसन्न वाटत होतं कि पाहुणे आवडीने जेवताहेत. त्यांच्या बरोबर माझे सासरे व मुलीही जेवत होत्या. सासरे, मी व पाहुणे त्यांचा हातखंडा विषय "गीतासार " त्यावरची व्याख्यानं, प्रवास व इतर उपक्रम याबद्दल बोलत होतो. पण मुली मात्र शांतपणे जेवत होत्या. मधेच पाहुण्यांनी मुलींशी बोलायचा प्रयत्न केला, पण त्या बोलायला बिचकताहेत हे त्यांच्या लक्षात आलं. जेवण झाल्यावर पुन्हा काही तरी विचारल्यावर, माझ्या मुलीने सांगितलं कि काका, तुम्ही गीता या विषयावर बोलत होतात. त्यात मला काय कळणार, म्हणून मी मधे बोलले नाही !! ह्यावर पाहुणे छान हसले व तिला म्हणाले, "अगं, गीता कळायला खूप सोप्पी आहे. तुला न कळायला काय झालं? आत्ताचंच उदाहरण घेऊ या. तुझ्या आईने आम्हाला, सास-यांनी जेवायला बोलावलंय हे कळल्यावर, तत्परतेने आणि वेळेवर छान स्वयंपाक केला. हो ना बाळा ? हाच कर्मयोग !! आपल्या वाट्याला आलेलं काम आनंदाने व वेळच्या वेळी करणे !! माझ्या मुलीला हे इंटरेस्टिंग वाटलं ! पाहुणे पुढे म्हणाले, तुझ्या आईला स्वयंपाक कसा करावा हे शिकावं लागलं असेल. तिच्या आईकडून, मैत्रिणींकडून, किंवा पुस्तकं वाचून तिनं हे ज्ञान मिळवलं. ते स्वतः प्रॅक्टिस करून वाढवलं व आज योग्य पद्धतीनं वापरलंय. खरं ना? मुलीला हे सगळं छान पटत होतं! नवनवीन गोष्टी योग्य गुरूंकडून शिकणं, त्याचा अभ्यास करणं, त्याचा प्रत्यक्षात उत्तम उपयोग करणं. हाच गीतेतला ज्ञानयोग आहे, बरं का बाळा !! काकांचं बोलणं पटकन कळल्या मुळे मुलीला इंटरेस्ट घेऊन ऐकावसं वाटत होतं. मी ही थक्क झाले. मग काका म्हणाले, आता आणखी एक गंम्मत सांगतो. तुझ्या आईने किती सुंदर पद्धतीनं केलेले पदार्थ ताटात वाढले होते व प्रेमाने आग्रहाने स्वतः बाजूला उभी राहून ती वाढत होती, आग्रह करीत होती. होय ना बाळा ? हो, पण त्यात काय नवीन! .. मोकळेपणाने कन्या विचारती झाली. अगं, यालाच म्हणायचं भक्तियोग !! समोर जर देण्या योग्य कोणी असेल, तर आपल्याकडे जे असेल ते प्रेमाने, भावपूर्वक, आनंदाने समोरच्याला द्यावे, हेच तर भक्तियोगात सांगितलंय !! गीतेतील हे कळीचे मुद्दे एवढ्या सोप्या शब्दात, साध्या पद्धतीने सांगणारे हे पाहुणे होते, विद्यावाचस्पती श्री. शंकर अभ्यंकर ! 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 सुदंर विचारधारा

+10 प्रतिक्रिया 4 कॉमेंट्स • 21 शेयर