बोधकथा

vithu mauli Jul 22, 2019

+8 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 10 शेयर
Pratibha Jadhao Jul 20, 2019

बिरबल एक ईमानदार व धर्मप्रिय व्यक्ती होता. तो दररोज कशाचीही अपेक्षा न करता देवाची प्रार्थना करायचा. देवाच्या प्रार्थनेमुळे त्याला आत्मिक समाधान व मानसिक बळ मिळत असे. बिरबल नेहमी म्हणायचा की ‘देव जे काही करतो, ते मनुष्याच्या भल्यासाठीच असते’. कधी कधी आपल्याला असे वाटते की देवाचे आपल्याकडे लक्ष नसावे परंतु असे नसते. कधी कधी देवाच्या आशीर्वादाला लोक शाप समजण्याची चूक करतात. तो आपल्याला थोडे कष्ट देतो, कारण आपण येणाऱ्या मोठया संकटापासून स्वतःला वाचवू शकू. एका दरबाऱ्याला बिरबलचे हे बोलणे आवडत नसे. एक दिवस तो दरबारामध्ये बिरबलला उद्देशून बोलला - हे बघ, देवाने माझ्याबरोबर काय केले. काल रात्री जेव्हा मी जनावरांसाठी चारा कापत होतो तेव्हा अचानक माझ्या हाताची करंगळी कापली गेली. तरी तू असेच बोलशील की देव जे काही करतो, ते मनुष्याच्या भल्यासाठीच करतो? काही वेळ स्तब्ध राहून बिरबल बोलला - माझा आत्तापण देवावर विश्वास आहे कारण ‘देव जे काही करतो, ते मनुष्याच्या भल्यासाठीच असते’. हे ऐकून तो दरबारी नाराज झाला व म्हणाला - माझी करंगळी कापली गेली तरीपण बिरबलला यात चांगलेच काहीतरी दिसते आहे. माझे कष्ट जसे काहीच नाही. अन्य दरबाऱ्यांनी पण त्या दरबाऱ्याच्या सुरात सूर मिळविला. तेव्हा बादशाह अकबर बिरबलला बोलला मी पण देवावर विश्वास ठेवतो पण, मी तुझ्याशी सहमत नाही. या दरबाऱ्याच्या बाबतीत असे काहीही घडलेले नाही की ज्यासाठी देवाची प्रशंसा केली जावी. बिरबल स्मितहास्य करत बोलला - ‘ठिक आहे महाराज, आता योग्य वेळ आल्यावरच आपल्याला कळेल’. तीन महिन्यानंतर करंगळी कट झालेला दरबारी घनदाट जंगलात शिकारासाठी गेला. जेव्हा तो हरणाच्या मागे गेला तेव्हा तो बाकीच्या सहकाऱ्यापासून वेगळा झाला, व अचानक त्याला आदिवासींच्या एका घोळक्याने पकडले जे की देवाला प्रसन्न करण्यासाठी नरबळीवर विश्वास ठेवायचे. त्यामुळे ते आदिवासी त्या दरबाऱ्याला पकडून बळी देण्यासाठी मंदिरात घेऊन गेले. पण जेव्हा मंदिराच्या पुजाऱ्याने दरबाऱ्याच्या शरीराचे निरिक्षण केले तेव्हा त्याला त्याच्या हाताची करंगळी कापलेली असल्याचे आढळले व तो बोलला की ‘बळीसाठी हा व्यक्ती चालणार नाही’. मंदिराचा तो पुजारी बोलला - जर आपण हाताला नऊ बोटे असलेल्या माणसाचा बळी दिला तर आपले देव प्रसन्न न होता क्रोधित होतील कारण, त्यांना अपूर्ण बळी आवडत नाही व आपल्याला महामारी, पूर किंवा दुष्काळाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे या दरबाऱ्याला सोडून देणे हे आपल्यासाठी उचित असेल व त्यांनी त्या दरबाऱ्याला सोडून दिले. दुसऱ्या दिवशी, तो दरबारी दरबारात बिरबलकडे जावून रडायला लागला तेव्हा महाराज पण दरबारात आलेले होते व त्या दरबाऱ्याला बिरबलकडे रडताना पाहून चकित झाले. तुला काय झाले, तु का रडतो आहेस? - महाराज अकबरने दरबाऱ्याला विचारले. उत्तरादाखल दरबाऱ्याने घडलेला पूर्ण वृत्तांत महाराजांना सांगितला व तो म्हणाला - आता माझा विश्वास बसला आहे की, ‘देव जे काही करतो, ते माणसाच्या भल्यासाठीच असते’. जर माझी करंगळी कापली गेली नसती तर मला बळी चढविले गेले असते त्यामुळे मी रडत आहे, पण हे माझे आनंदअश्रू आहेत कारण मी जिवंत आहे. बिरबलच्या देवावरचा विश्वासावर शंकेच्या दृष्टिने बघणे ही माझी चूक होती. महाराज अकबर सौम्य हासत दरबाऱ्याकडे बघत होते, जे खाली मान घालून शांतपणे उभे होते. महाराजांना आता अभिमान वाटत होता की बिरबल सारखा बुध्दिमान व्यक्ती आपल्या दरबारातील एक आहे. तात्पर्य - जे काही होते ते चांगल्यासाठीच होते.🙏🙏🙏🙏🌼🌼🌼🌼🌼🌼🙏🙏

+5 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 3 शेयर
GOPAL H. GAJJAR Jul 19, 2019

+6 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 10 शेयर
Harcharan Pahwa Jul 20, 2019

+11 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 2 शेयर