प्रेम

ॐ नामसंध्या ॐ 🌹🙏🏻श्रीराम समर्थ 🙏🏻🌹 प्रेम हा भक्तीचा प्राणः भक्तीमधून प्रेम काढलें तर ती उरतच नाहीं. प्रेम दोन प्रकारचें असतें : देहकेंद्रित व देवकेंद्रित. "देव माझा आहे" हें देहकेंद्रित प्रेम,तर "मी देवाचा आहे" हें देवकेंद्रित प्रेम. पहिले प्रेम स्वार्थी,मोहमय आणि जड असतें ,दुसरें प्रेम निःस्वार्थी, त्यागमय आणि सूक्ष्म असतें. पहिल्यामधें स्वतःच्या सुखासाठीं धडपड असतें , दुसऱ्यांमधें भगवंताला अर्पण असतें. पहिले वासनामय असतें तर दुसरे निष्काम असतें. पहिल्या प्रेमांत परिस्थिती चांगली असून चैन पडत नाहीं, तर दुसऱ्यांत प्रत्येक परिस्थितीत समाधान टिकतें. भक्त स्वःताचा 'मी' भगवंताला अर्पण करून केवळ त्याच्यासाठीच जगतो. हे प्रेम फार पवित्र असतें. त्यानें भगवंत देखील वेडा बनतो व भक्तांसाठी स्वःताला विसरतो. या प्रेमामधें चूक कधी होतच नाहीं. तें शुद्ध चिंतनमय असतें.म्हणून भक्ताला कर्माकर्माचे नियम बाधूं शकत नाहींत. इतकेंच नव्हे तर आत्मचिंतनात बुडालेल्या भक्ताचें कर्म स्वतः भगवंत नीट पार पाडतो. प.पू.बाबांच्या भावार्थ भागवतामधून 🌹🙏🏻जय श्रीराम🙏🏻🌹

+17 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 17 शेयर

लोकसत्ता :: मनोयोग १८६. प्रेम : १ :: २६ सप्टेंबर १८६. प्रेम : १ मुळात सद्गुरूंवर प्रेम करणं म्हणजे तरी काय? केवळ सद्गुरूंवर प्रेम करायचं म्हटलं मुळात सद्गुरूंवर प्रेम करणं म्हणजे तरी काय? केवळ सद्गुरूंवर प्रेम करायचं म्हटलं तरी एखाद्या बाबाबुवाच्या नादी लागून घरादाराची वाताहत करणाऱ्या कुणाकुणाची उदाहरणं ऐकवली जातील. इथं अभिप्रेत आहे तो खरा सद्गुरू, भोंदू नव्हे, हे जरी खरं तरी मुळात हे प्रेम आहे तरी काय? खरं प्रेम म्हणजे काय, याची शाब्दिक व्याख्यादेखील माहीत नसलेल्या कल्याणांचं रामदासस्वामींवर खरं प्रेम होतं! नव्हे याला प्रेम म्हणतात एवढीदेखील जाणीव त्यांना नव्हती कारण त्यांची सर्व जाणीवच समर्थानी व्यापून टाकली होती.. तसं प्रेम ब्रह्मानंदबुवांचं, भाऊसाहेब केतकरांचं गोंदवलेकर महाराजांवर होतं.. रामकृष्ण परमहंस, साईबाबा, गजानन महाराज.. प्रत्येक लीलाचरित्रांत त्यांच्यावर निस्सीम प्रेम असलेल्या भक्तांचीही चरित्रं सापडतात.. तसं खरं विशुद्ध प्रेम ज्यायोगे साधतं ती वृत्ती फार दुर्लभ आहे.. म्हणून आपल्यासारख्या सर्वसामान्य साधकानं सद्गुरूंवर प्रेम करायचं म्हणजे काय करायचं हे जाणण्याचा आपण प्रयत्न करू. पहिली गोष्ट ही की प्रेम केलं जात नाही, ते होतं. पण आपल्याला ते करावं लागणार आहे, याचाच अर्थ सुरुवात कृतीनं आहे.. भावबळानं नाही! लहान मुलं जसं भातुकली खेळतात तसं आपलं हे ‘प्रेम’ आहे! तरीही लहान मुलाच्या बोळक्यातला खोटा शिरा, खोटं श्रीखंड आई ज्या खऱ्या प्रेमानं स्वीकारते त्याच प्रेमानं आपल्या खोटय़ा प्रेमाचाही सद्गुरू स्वीकार करतात! लहान भाऊ बहिणीला ओवाळणीत दहा रुपये टाकतो. ते काही त्यानं कमावले नसतात. ते वडिलांनीच त्याला दिले असतात. तसं जे काही तोडकंमोडकं ‘प्रेम’ आपण सद्गुरूंवर करतो ते त्यांनीच आपल्या अंतरंगात आधी उत्पन्न केलं असतं! त्यांनीच अंतरंगात उत्पन्न केलेलं शुद्ध प्रेम आपण जगाकडे वळवत राहातो आणि जगावर प्रेम करीत राहातो. खऱ्या निस्वार्थ प्रेमाला स्वार्थी जग पात्र नसताना आपण आपल्याच स्वार्थपूर्तीच्या सुप्त हेतूनं ते प्रेम जगात वाया घालवत राहातो. त्यामुळेच सद्गुरू ते प्रेम प्रथम भगवंताकडे वळवायला सांगतात! भगवंतावरील आपल्या ‘प्रेमा’ची सुरुवात इतकी कच्च्या पायवाटेनं आहे!! पण ते प्रेमही आपल्याला साधत नाही.. कारण जग खरं वाटतं, जगावर प्रेम करणं खरं वाटतं, जगाचं प्रेम खरं वाटतं.. ज्यानं प्रेमाचं बीज आपल्या अंतरंगात रुजवलं त्या भगवंतावर आणि अधिक अचूक सांगायचं तर त्या सद्गुरूंवर आपण खरं प्रेम करू शकत नाही कारण आपलं आपल्यावरही खरं प्रेम नाही! आपण स्वत:ला देह मानतो पण त्या देहावर तरी आपलं खरं प्रेम आहे का? देहाला घातक ठरणाऱ्या आवडी आपण सोडू शकतो का? मानवी शरीराइतकं अमूल्य उपकरण आपल्याला लाभलं असताना आणि या देहातल्या प्रत्येक अवयवाला कृत्रिम पर्याय द्यायचा तर लाखो रुपये खर्चावे लागतील, असं असताना फुकटात मिळालेल्या या देहाच्या उपकरणाची आपण खरी किती काळजी घेतो? त्यामुळे ‘मी म्हणजे देह’ ही आपली धारणा असली तरी त्या देहाची खरी काळजी घेणारं खरं प्रेम त्या देहावरदेखील आपण करीत नाही.. ‘मी म्हणजे मन’ असं आपण मानतो खरं, पण त्या मनावरही आपलं खरं प्रेम नाही! जिथं दु:खंच वाटय़ाला येईल तिकडेच धावणाऱ्या आपल्या मनाला आपण कधी समजावत नाही.. नव्हे त्या मनाचाच बागुलबुवा उभा करून मनाच्या खऱ्या सुखात मनाचाच अडथळा आपण उभा करतो! मानवी आयुष्याची फार मोठी संधी लाभूनही आयुष्यातला प्रत्येक क्षण आपण निर्थक गमावतो, मग या आयुष्यावर तरी आपलं खरं प्रेम आहे का? हा देह, हे मन, हे आयुष्य पुन्हा लाभेल याची हमी नसताना आपण त्यांचा वापर किती बेपर्वाईनं करतो.. मग आपण आपल्यावरही खरं प्रेम करीत नसताना सद्गुरूंवर प्रेम करण्याचा विचार तरी साधेल का?

+17 प्रतिक्रिया 2 कॉमेंट्स • 7 शेयर

प्रेम सरोवर की उत्पत्ति कथा वृन्दावन के प्रेम सरोवर से भलीभांति सब परिचित है। यह वरसाना एवम् नंद गाव के विच परिक्रमा मार्ग मे स्थित एक भव्य सरोवर जिसकी भक्त जनो मे वहुत मान्यता है। एकदिन गोचारन करते हुये श्याम अपने सखायो संग इस स्थान पर आये। इहा पर श्री राधे जु आपनी सखीयो के श्री मुख से कृष्ण की मधुर रुप और नटखट लीलायो की कथा सुनकर कृष्ण मिलन इच्छा से व्याकुल हो रही थी। अतएव श्री हरि का आगमन उनके लिए वहुत आनंद दायक हो गयी। कृष्ण आते ही वे कृष्ण को अपनी भुजायो के वन्धन मे पकड़े और कही नही जाने देंगी इस भाव से लिपटे रहे। देर तक ऐसै ही हरि जी की वक्षस्थल पर विश्राम करती रही। अचानक वहा एक भ्रमर आया। कमल की सुगंध युक्त राधे जी की केश तो कभी लालिमा युक्त कपोल को छुंने की चेष्टा करता रहा। श्री नन्दकुमार ने सखा मधुमंगल को ईशारे मे भ्रमर को कुंज के वाहर निकाल देने को कहे।वे नही चाहते थे राधे जु की विश्राम मे वाधा पंहुचे । मधुमंगल भ्रमर को दुर ले जाने की प्रयत्न कीये। मगर हठी भ्रमर उसे तंग करता रहा। अन्तता वे उसे भगाने मे सफल रहा। वो विजयी की तरह आकर वोले ''मधुसुदन चला गया''। मतलव है मधुसुदन भ्रमर चला गया। मगर राधारानी के कर्ण मे जैसे ही प्रवेश किया ''मधुसुदन चला गया '' वे सोची कृष्ण चले गये। उन्होने अपनी सुधी खो कृष्ण कृष्ण करके रोने लगी ।कभी कुंज से वाहर दौरी। सखीयो ने उन्हे पकड़ के वैठाये। कृष्ण कहने लगे में तो यही हुं राधे पर राधारानी जु विरह में सव सुधी विसार चूकी थी। इस अद्भुत प्रेम को समझने में असमर्थ नंद कुमार भी राधे की हालत पे रोने लगे। उन दो को रोते देख सखा सखीया रोने लगे। वृक्ष पक्षी पशु तक रोने लगे। उस प्रेमाश्रु से एक सरोवर प्रकट हुया वही हमारे प्रेम सरोवर है। में जब भी इसमे डुबकी लगाती हुं भाव होता है मुझे प्रेम ने ही स्पर्श किया हो। में भी अश्रु से प्लावित होती हुं। श्री राधे प्राणेश्वरी विजयते

+42 प्रतिक्रिया 9 कॉमेंट्स • 3 शेयर

🙏🏻🌹🌹।। जय श्रीराम.।। पूज्य बाबा सांगत.... उच्च शिक्षण घेतल्याचे एक समाधान असते , पैसा मिळतो त्याचे समाधान असते तसेच अधिकार मिळाल्याचे देखील समाधान असते. पण या सर्वांपेक्षा कुणीतरी आपल्यावर प्रेम करते याचे समाधान किती असते ! संत निस्वार्थी प्रेम करतात त्या प्रेमाचे समाधान किती असेल ? ते समाधान मागावे. महाराजांना म्हणावे मला त्या प्रेमाचा अनुभव द्या ! श्री गणपतराव दामले एक गोष्ट सांगत. कुणी एका शेतकऱ्याने महाराजांना भुईमूगाच्या शेंगा आणून दिल्या. त्या उकडल्या व रात्री आरती झाल्यानंतर गंगुताईनी श्रीमहाराजांसमोर आणून ठेवल्या. महाराज म्हणाले , " अरे ! रामाला नैवेद्य दाखवून मग खायच्या. " गंगुताई म्हणाल्या , " आम्हाला रामबीम काही माहीत नाही , तुम्ही खा म्हणजे रामाने खाल्या. " महाराज काही बोलले नाहीत. गप्प बसले. मग म्हणाले , " बोलवा सगळ्याना " पाच-दहा मंडळी होती , शेंगा खाणे चालू होते आणि महाराज आपल्या गुरुंच्या गोष्टी सांगू लागले. रात्रीचे बारा, एक, दोन.... वाजून गेले ! गणपतराव म्हणाले , " महाराज पुन्हा असा दिवस येईल का ? " हे ऐकून सगळ्याना भरुन आले. महाराज काही बोलले नाहीत. ही हकीकत सांगून पूज्य बाबा म्हणाले , " हा परमार्थ खरा ! अशा वेळी खाण्याकडे कुठे लक्ष राहणार ? आपण नाम सुध्दा घेऊ नये. एकमेकांवर निस्वार्थी प्रेम करावे. महाराजांना ते फार आवडेल. त्यातूनच ते तुम्हाला नाम घ्यायची बुध्दी देतील. " (संदर्भ - अध्यात्म संवाद) 🌹🙏🏻🙏🏻

+15 प्रतिक्रिया 2 कॉमेंट्स • 4 शेयर