नवरात्री

A.G. JOSHI Jan 3, 2020

🌹 *शाकंभरी नवरात्र* 🌹 आज शाकंभरी नवरात्र प्रारंभ होत आहे . संपूर्ण जगाची अधिष्ठात्री असणार्या दुर्गेचे एकरूप म्हणजे शाकंभरी देवी होय. दीर्घकालीन दुष्काळाला दुर्गा देवीचा दुष्काळ असे म्हणतात. दुर्ग भावाच्या दैत्यांचा संहार करून देवीला दुर्गा हे नाव पडले. तसेच शंभर वर्षे पाऊस नव्हता म्हणून देवीने पाऊस पाडून सर्व पृथ्वी हिरवीगार केली. त्यामुळे तिला शाकंभरी असे नाव पडले. ऋग्वेदाच्या सौभाग्यलक्ष्मी उपनिषदामध्ये श्रीसुक्त दिले त्यात लक्ष्मीला पद्मा, पद्मिनी, पद्मस्थिता, पद्मवर्णा, पद्मसंभवा या शब्दांनी वर्णिले आहे. ही शक्ती सोळा कलांनी संहार करतात म्हणून तिला षोडशीदेखील म्हणतात. संपूर्ण जगाची ही अधिष्ठात्री आहे. हिला चिदग्निकुण्डसंभुता असं म्हटलं आहे. ही स्थूल सूक्ष्म आणि कारणरुप शरीरात वास करते. पौष शुक्ल सप्तमीपासून पौष पौर्णिमेपर्यंत शाकंभरी नवरात्र साजरा केले जाते. भारताच्या विविध प्रांतांसोबतच महाराष्ट्रातही शाकंभरी देवीची पूजा केली जाते. महाराष्ट्रातील काही देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मणांची ही कुलदेवता आहे. शाकंभरी देवीला 'बनशंकरी' असे आणखी एक नांव आहे. तिचे मुख्य स्थान विजापूर जवळ बदामी येथे आहे. देवीभागवत ग्रंथामध्ये शाकंभरी देवीच्या उत्पत्तीबद्दल दिलेल्या माहितीनुसार, एकदा खूप मोठा दुष्काळ पडला. लोक अन्नपाण्याविना उपाशी राहिले. त्यामध्ये अनेकांचा मृत्यूही झाला. देवीला या करुणा आली. तिने आपल्या अंगातून असंख्य शाक भाज्या उत्पन्न केल्या. त्या भूकेलेल्यांना खाऊ घातल्या. त्यामुळे अनेक लोक दुष्काळातूनही वाचले. त्यामुळे या देवीला 'शाकंभरी' हे नांव मिळाले. तर एका धार्मिक कथेनुसार हरिद्वार- केदार रस्त्यावर कुमाऊॅं टेकडीवर देवीने एक हजार वर्षे केवळ शाकभाज्या खाऊन तपश्चर्या केली. त्यामुळे ही देवी ‘शाकंभरी देवी' या नावाची प्रसिद्धी मिळाली. महाभारताच्या वनपर्वात आणि पद्मपुराणात त्याबाबतचे संदर्भ आढळतात . *शाकंभरी देवी वर्णन* बदामीच्या तीर्थस्थानी असलेली देवीची मूर्ती अष्टभुजाधारी असून ती सिंहारूढ आहे.काळ्या पाषाणातील मूर्ती भव्य आणि जागृत आहे.देवीच्या उजव्या हातांमध्ये खडग,घंटा , त्रिशूल व वेद आहेत तर डाव्या हातांमध्ये पानपात्र, मुंड (रुंड), ढाल व डमरू आहे.देवीची मूर्ती सालंकृत आहे.गळ्यात हार असून अंगा-खांद्यावर अलंकार आहेत.डोक्यावर लखलखणारा नवरत्नांचा (नवग्रहांचा ) मुकुट आहे.देवीच्या मुखावर प्रसन्न भाव असून पूजा -अर्चना यामुळे आलेले दिव्यत्व जाणवते. देवीच्या नित्य पूजाविधीमध्ये स्तोत्रे, मंत्र, कवच, स्तुतिपाठ , अष्टोत्तरशत नामावलीने कुंकुमार्चन व नैवेद्य आणि आरती यांचा समावेश असतो. नित्यपूजेशिवाय देवीच्या मंदिरात लघुन्यासपूर्वक रुद्राभिषेक, श्रीसूक्तशीरभिषेक, सर्वसेवा, महापूजा, पंचामृत आभिषेक, अस्तोत्तरषातनामावलीने कुंकुमार्चन, रजतपालखीसेवा,व रात्री त्वत्तलसेवा(शेजारती) संपन्न होत असते. श्री शाकंभरी देवी शिवस्वरूपी असल्यामुळे देवीची पूजा रोज शुक्ल यजुर्वेद कण्व शाखा पद्धतीप्रमाणे संपन्न होत असते. *संकलन :- अशोककाका कुलकर्णी*

+18 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 7 शेयर

+7 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 12 शेयर