दिनविशेष

A.G. JOSHI Aug 21, 2019

💐 || सुमंगल सुप्रभात || 💐 🌞 दिन विशेष इसवी सन २०१९- २१ अॉगष्ट शालिवाहन शक १९४१ विक्रम संवत २०७५ भा. रा. ३० श्रावण (५) १९४१ युगाब्द ५१२१ संवत्सर नाम: विकारी अयन : दक्षिणायण ऋतु : वर्षा मास: श्रावण पक्ष : कृष्ण तिथी : षष्ठी वार : बुधवार नक्षत्र : अश्विनी राशी : मेष १८८८: विल्यम बरोज यांनी बेरजा करणाऱ्या यंत्राचे पेटंट घेतले. १९११ : पॅरिसच्या लुव्र या संग्रहालयातुन लिओनार्डो-द-व्हिन्सी याचे मोनालिसा हे जगप्रसिद्ध चित्र चोरीला गेले. जन्मदिवस १९०९ नागोराव घनःशाम तथा ना.घ. देशपांडे, कवी. १९३४ सुधाकरराव नाईक, मुख्यमंत्री १९८६ उसेन बोल्ट, जमैकन धावपटू मृत्यूदिन १९३१ पं विष्णू दिगंबर पलुस्कर, गायक, संगीतकार, संगीत प्रसारक १९८१ काकासाहेब कालेलकर, शिक्षतज्ञ १९९५ सुब्रमण्यन चंंद्रशेखर, नोबेल विजेते वैज्ञानिक २००१ शरद तळवळकर, हास्य अभिनेता २००६ बिस्मिल्लाखान, भारत रत्न सनई वादक *।। दास-वाणी ।।* याकारणे पदार्थज्ञान । नाना जिनसीचा अनुमान । सर्व सांडून निरंजन । धुंडीत जावे ।। अष्टांग योग पिंडज्ञान । त्याहून थोर तत्वज्ञान । त्याहून थोर आत्मज्ञान । तें पाहिलें पाहिजे ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १७/०३/२३-२४ सर्व दृष्य पदार्थ आणि वस्तुंचे ज्ञान हे नेहमीच सीमित असते. तो निव्वळ अंदाज असतो. शास्त्रशुद्ध अंदाज म्हणा हवं तर. दृष्य गोष्टींचे नाम रंग रूप ज्ञानेद्रियांना भुलवून टाकते , हे खरेच आहे.सामान्य माणसाला आकर्षित करते. जे आवडते ते पुन्हा हवेसे वाटते. पंरतु हया दिखाऊ आणि नाशवंत गोष्टी असल्याने त्यामधे कधीच अडकून पडू नये. आसक्ती सोडून निरंजन म्हणजे परब्रह्माचा शोध घेत रहाणे हेच हितकर आहे. पिंड म्हणजे देह. अष्टांग योग हा देहप्रधान आहे. पिंडज्ञान हे त्यात महत्वाचे मानले आहे. आत्म अनात्म, सार असार, नित्य अनित्य हया तत्वज्ञानाचा विचार पिंडज्ञानापेक्षा श्रेष्ठ अाहे. तत्वज्ञानामधे द्वंद्व आहे.साधकाने निवड करायची आहे. परंतु आत्मज्ञान हे एकमेव आहे. सर्वश्रेष्ठ आहे. ते ज्याला होईल तो सिद्धच ! श्रवणनिरूपण समास. 🙏 💐💐💐💐💐 🙏

+5 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 11 शेयर
A.G. JOSHI Aug 20, 2019

💐 || सुमंगल सुप्रभात || 💐 🌞 दिन विशेष इसवी सन २०१९- २० अॉगष्ट शालिवाहन शक १९४१ विक्रम संवत २०७५ भा. रा. २९ श्रावण (५) १९४१ युगाब्द ५१२१ संवत्सर नाम: विकारी अयन : दक्षिणायण ऋतु : वर्षा मास: श्रावण पक्ष : कृष्ण तिथी : पंचमी वार : मंगळवार नक्षत्र : रेवती राशी : मीन *प.पू. टेंबेस्वामी (वासुदेवानंद सरस्वती महाराज) जयंती* *राष्ट्रीय सद् भावना दिवस* *अक्षय ऊर्जा दिन* जागतिक मच्छर दिन १६६६  शिवाजीराजांनी दख्खनेमधे येण्यासाठी नरवीर घाटी हे ठाणे खोटे दस्तऐवज दाखवून ओलांडले. १८२८: राजाराममोहन रॉय, द्वारकानाथ टागोर, कालिनाथ रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. १८९७: सर रोनाल्ड रॉस यांनी भारतात हिवतापाच्या जिवाणूचा शोध लावला. १९२०: डेट्रॉइट,मिशिगन येथे जगातील पहिले व्यावसायिक नभोवाणी केंद्र 8MK (सध्याचे WWJ) सुरू झाले. १९९५ : फिरोजाबाद रेल्वे अपघातात २५८ लोक ठार अनेक जखमी जन्मदिवस १९४४: राजीव गांधी १९४६: एन. आर. नारायण मूर्ती, इन्फोसिसचे सह संस्थापक मृत्यूदिन १९८४: रघुवीर भोपळे तथा सुप्रसिद्ध जादूगार रघुवीर १९८६ : हरचरणसिंह लोंगोवाल, अकाली दलाचे अध्यक्ष २०१३ : डॉ. नरेंद्र दाभोळकर, अंनिसचे संस्थापक २०१३ : जयंत साळगांवकर, ज्योतिर्भास्कर, काल निर्णयचे संस्थापक, लेखक, उद्योजक २०१४: बी. के. अय्यंगार, सुप्रसिद्ध योगाचार्य ।। दास-वाणी ।। बीज फोडुन आणलें मना । तेथें फळ तों दिसेना । वाढत वाढत पुढें नाना । फळें येती ।। फळ फोडितां बीज दिसे । बीज फोडितां फळ नसे । तैसा विचार असे । पिंडब्रह्मांडीं ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १७/०२/१३-१४ कोणतेही बी फोडून अगदी बारकाईने निरखून पहा. त्यामधे त्याचे फळ कधीच दिसत नाही. मात्र तेच बीज एकदा रूजले, वाढले की फांदी फांदीवर शेकडो फळे लागलेली दिसतात. ते फळ फोडले तर आत पुष्कळ बिया दिसतात. परंतु प्रत्येक बी जरी फोडले तरी त्यामधे एकही फळ दिसत नाही. पिंडब्रह्मांडातही अशीच स्थिती आढळते. ब्रह्मांडरूपी फळामधे असंख्य पिंड असतात. मात्र एकाही पिंडामधे ब्रह्मांड दिसत नाही. म्हणजेच बी मधे फळ दिसत नाही. इथे फल बीज दृष्टांतरूपाने पिंडब्रह्मांड न्याय सांगितलाय. शिवशक्तीनिरूपण समास. 🙏 💐💐💐💐💐 🙏

+7 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 2 शेयर
A.G. JOSHI Aug 19, 2019

💐 || सुमंगल सुप्रभात || 💐 🌞 दिन विशेष इसवी सन २०१९- १९ अॉगष्ट शालिवाहन शक १९४१ विक्रम संवत २०७५ भा. रा. २८ श्रावण (५) १९४१ युगाब्द ५१२१ संवत्सर नाम: विकारी अयन : दक्षिणायण ऋतु : वर्षा मास: श्रावण पक्ष : कृष्ण तिथी : चतुर्थी वार : सोमवार नक्षत्र : उत्तरभाद्रपदा राशी : मीन *संकष्ट चतुर्थी* (९.३२) जागतिक छायाचित्रण दिन १८५६ गेल बाॕर्डन या शास्त्रज्ञाला दुधाच्या शीतकरणाचे पेटंट मिळाले १९९१ सोविएत संघाचे राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव नजर कैदेत. जन्मदिवस १९१८: शंकर दयाळ शर्मा, भारताचे राष्ट्रपती १८८६: स्वातंत्र्यसैनिक मोरेश्वर वासुदेव तथा नरकेसरी अभ्यंकर मृत्यूदिन १९४७ मास्टर विनायक, अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते १९९३ उत्पल दत्त, हास्य अभिनेता १९७५: शिक्षणतज्ञ, देशभक्त, तत्त्वज्ञ, कुशल संघटक, लेखक, पत्रकार आणि ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक डॉ. विनायक विश्वनाथ तथा अप्पासाहेब पेंडसे ।। दास-वाणी ।। देहदेऊळामधें बैसला । न भजतां मारितो देहाला । म्हणौनि त्याच्या भेणें तयाला । भजती लोक ।। जे वेळेसी भजन चुकलें । तें तें तेव्हां पछ्याडिलें । आवडीने भजो लागले । सकळ लोक ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १७/०१/०६-०७ मुख्य परमात्मा जीवात्म्याच्या रूपात प्रत्येक शरीरात राहातोय. त्यामुळे प्रत्येक देह हे जणू देऊळच बनलय. जीवात्म्याला शब्द स्पर्श रूप रस गंध हा पाच विषयांचा नैवेद्य नेमका आणि नियमीत दिला तर तो संतुष्ट होईल . देह धडधाकट राहील. या सुदृढ देहाने मुख्य परमात्म्याची नित्य उपासना केलीच पाहिजे. ती जर घडली नाही तर पुन्हा पुन्हा जन्म आणि मरण. जीवाला हे फेरे चुकवायचे असतील तर उपासना घडते. नाहीतर विषयासक्त बद्ध जीव भौतिक सुखातच धन्यता मानून जगत राहातात. आपल्या हातून भजन किंवा उपासना जेव्हा जेव्हा होत नाही तेव्हा ईश्वरच पश्चात्तापाची भावना निर्माण करतो. याला मुमुक्षत्व म्हणतात. त्यानंतर आपोआपच माणूस भजन भक्तीकडे खेचला जातो. त्याचीच पुढे गोडी लागते. तेव्हा तो खरा साधक बनतो. अशा पद्धतीने पूर्वसुकृतानुसार प्रापंचिकाचे पारमार्थिक मार्गक्रमण सुरू होते. देवबळात्कार समास. 🙏 💐💐💐💐💐 🙏

+6 प्रतिक्रिया 2 कॉमेंट्स • 3 शेयर