गुरु

Surekha Sonar Jun 1, 2020

+10 प्रतिक्रिया 2 कॉमेंट्स • 2 शेयर

+5 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 0 शेयर
A.G. JOSHI Apr 20, 2020

❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄ *🌹🙏।।श्री स्वामीसमर्थ।।🙏🌹* *आज चैत्र वद्य त्रयोदशी. योगीराज, परब्रह्म श्री स्वामी समर्थांची पूण्यतिथी. १४२ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी त्यांनी आपला जडदेह सोडून दिला, त्या निमित्ताने....!* *------------------------------------------------* *संकलन- सदानंद पाटील, रत्नागिरी.* *--------------------------------------- --------* * महापरिनिर्वाण * *श्रध्दा आणि विश्वास, ही भक्तिचीच दोन रूपे आहेत. किंबहुना भक्तीमध्येच श्रध्दा आणि विश्वास हे दोन रंग मिसळलेले आहेत. परंतु भक्ती, श्रध्दा, विश्वास आणि अंधश्रद्धा यातील सीमारेषा अतिशय पूसट आहेत. आपली श्रध्दा केव्हा आणि कशी अंधश्रद्धेत बदलते, हे लक्षात सुध्दा येत नाही. भगवान श्री स्वामी समर्थांनी आपल्या भक्तांना मार्गदर्शन करताना अशा प्रकारच्या अंधश्रध्देवरच प्रहार केले. या कलियुगात चमत्काराशिवाय नमस्कार नाही, हे तत्व ते पूर्णपणे जाणून होते. म्हणूनच त्यांनी आपल्या रंजल्या- गांजल्या भक्तांसाठी चमत्कार केले. परंतु प्रामुख्याने त्यांचा भर होता तो, समाज सुधारणेवर, समाज प्रबोधनावर.* *बकऱ्यांचा, कोंबड्यांचा बळी देऊन देवाला प्रसन्न करणे त्यांना मंजूर नव्हते. त्यांचा भक्त चोळाप्पा यांच्या घरात एकदा घुबड शिरले. या घटणेने चोळाप्पा पूरते हादरून गेले. आता आपल्या कुटुंबावर फार मोठे अरिष्ट येणार, या भितीपोटी चोळाप्पा कुटुंबियांसह ते घर-दार सोडावयास निघाले. त्या वेळेस त्यांना समजावतांना स्वामी म्हणाले, "चोळ्या, अरे.... घरात घुबड शिरले, म्हणून घरातील माणसांनी घर सोडायचे, की घरातील माणसांनी त्या घुबडाला बाहेर काढायचे ? चोळ्या, असल्या रुढींवर विश्वास ठेवू नकोस !" कुणी खेळण्यासाठी किंवा मनोरंजनासाठी जरी हातात पत्ते घेतले, तर ते त्यांना सहन होत नसे. दगडाला शेंदूर फासून गोर-गरिबांना फसवणाऱ्यांचा तर त्यांनी नेहमीच धिक्कार केला. एकदा तर अश्याप्रकारे शेंदूर फासून देव बनवलेल्या दगडावरच त्यांनी लघूशंका केली!!* *तुमच्या आचरणानेच तुमची विद्वत्ता उजळून निघते, हे त्यांनी वेदांचे गाढे अभ्यासक व प्रकाडपंडित विष्णुबुवा ब्रम्हचारी यांचा गर्व नष्ट करताना सांगितले. देवापुढे राव आणि रंक समानच असतात, हे त्यांनी अक्कलकोटचे राजे, श्रीमंत मालोजी राजे भोसले यांच्या थोबाडीत मारूनच सर्वांना सांगितले.* *स्वामी म्हणजे चैतन्याचा झरा होता, कृपेची सावली होती, आईची माया होती, कल्पतरूची छाया होती! स्वामींनी आपल्या भक्तांना कधीही निराश केले नाही. "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे !" असे ते नेहमी सांगत. प्रत्यक्ष परब्रह्म स्वामीच पाठीराखा असल्यावर धीर कुणाचा खचणार होता ? स्वामींचे भक्त निर्भय होते, आणि निर्भयता तेथेच असते, जेथे श्रध्दा आणि विश्वास वास करीत असतो.* *स्वामींची दिनचर्या अक्कलकोटमधील प्रत्येकाला माहीतहोती. स्वामी नेहमी वेदांतील वाक्ये, पौराणिक श्लोक, पंजाबी दोहे, अभंग म्हणत असत. त्यांना अगदी स्वस्थपणे झोपलेले कुणीही, कधीही पाहिले नाही. ते डोक्यावर पांघरूण घेऊन झोपत असत; परंतु पहाटे दोन वाजल्यापासूनच त्यांचे श्लोक, दोहे, अभंग सुरू होत असत. पहाटे पासूनच स्वामींच्या दर्शनासाठी लोकांची वर्दळ सुरू होत असे. मग दिवसभर स्वामी त्यांच्यातच रमत असत!* *स्वामींचा परमभक्त चोळाप्पा यांचा अंत स्वामींच्या अगोदर सहा महिने झाला. चोळाप्पांचे निधनानंतर मात्र स्वामींच्या दिनचर्येत फरक पडू लागला. स्वामी निजधामास जाण्यापूर्वी सुमारे एक वर्षापासून "आपण आता जाणार " अशी चिन्हे दर्शवू लागले. ते वारंवार जंगलात जावून वस्ती करत. पूर्वी जेव्हा ते कुठे जात असत, तेव्हा त्यांचे बरोबर सारा सरंजाम असे. पण आता कधी कधी स्वामी कुठे गेले, हे कुणालाच माहीत नसे. एके दिवशी स्वामी सलगर म्हणून एक गाव आहे, तेथे गेले. सायंकाळचे वेळेस तेथील कब्रस्तानात जाऊन फिरून आले, व पलिकडे सराट्याचे रान होते, तेथे जाऊन राहिले. परंतु तेथेही दर्शनासाठी गर्दी झालीच. लोकांच्या पायास काटेरी सराट्याचे काटे लागत, तेव्हा स्वामी थट्टेने हसत असत. त्या ठिकाणी पहाटेस स्वामींनी बाळाप्पाकडे हुक्का भरून मागितला, व म्हणाले, "आम्हांस फार उंच जावयाचे आहे...., लांब जावयाचे आहे..., काय रे, तू आमची नोकरी करावयास येणार की नाही ?" स्वामींच्या या बोलण्याचा अर्थ त्या वेळेस बाळाप्पांस समजला नाही. हा दिवस होता, इ.स. १८७७ च्या चैत्र वद्य त्रयोदशीचा. म्हणजे बरोबर एक वर्षानंतर म्हणजेच इ.स. १८७८ च्या चैत्र वद्य त्रयोदशीलाच स्वामींनी देह ठेवला.* *या वेळेपासून स्वामी वरचेवर दुःश्चिन्ह दाखवू लागले. कुणी त्यांची आरती ओवाळू लागले म्हणजे स्वामी ती आरती हिसकावून घेऊन पालथी टाकत असत. सेवेकरी रात्री स्वामींना निजण्यासाठी बिछाना घालू लागले की, स्वामी अडवत असत. म्हणत, यापुढे आम्हांस बिछाना नको, आता आम्हांस बिछान्यावर निजायचे नाही !" स्वामींच्या या बोलण्याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न अनेकजण करीत असत...! काय सुचवायचे होते स्वामींना ? मातीचे शरीर मातीत मिसळण्याची वेळ जवळ आली आहे, आता बिछान्यावर निजून त्याचे कोडकौतुक करण्याची गरज काय ?" ज्या अक्कलकोटमध्ये स्वामींच्या आगमना नंतर सदैव उत्साहाचे, चैतन्याचे वातावरण होते, त्याच अक्कलकोटवर आता उदासीनतेचे सावट निर्माण झाले होते. स्वामी जे काही संकेत देत होते, त्याने सर्व सेवेकरी अस्वस्थ होत होते. आपले सुखनिधान, कृपाछत्र, मायेची सावली हरपणार की काय ? या कल्पनेने सर्वजण चिंतेत होते.* *देह ठेवण्याचे सुमारे वीस दिवस अगोदरची घटणा आहे. स्वामीं अक्कलकोट येथे तात्या सुभेदार यांचे घरी असताना एक वेगळीच लीला केली. त्यांचे अंगणात असलेली एक कुंडी उचलून त्यांनी ती मुरलीधर मंदिराजवळील तलावात नेली. स्वामींबरोबर कित्येक सेवक होते. स्वामी कुंडी घेऊन तलावात का आले, असा प्रश्न त्यांना पडला असतानाच स्वामींनी त्या कुंडीसह तलावात बुडी मारली. सर्वजण आवाक झाले. तळ्यात बुडालेले स्वामी पाण्यावर आले नाहीत. सारेजण कासावीस झाले. काहींनी तर रडण्यास सुरूवात केली. क्षणांत वातावरण शोकाकूल झाले; आणि अचानक स्वामी पाण्यावर आले. त्यांना पाहतांच सर्वांना आनंदझाला. रडणारेही हसू लागले, आणि त्याच क्षणी स्वामी ओरडले, "रडा, मंडळींनो रडा ! सर्व मंडळी बोंबा ठोका !, रडून घ्या, पोटभर रडून घ्या !" स्वामींचे बोलणे ऐकून मात्र प्रत्येकालाच रडू फुटले. स्वामींनी दिलेल्या अशुभाचा संकेत सर्वांच्या लक्षात आला होता. स्वामी आपल्याला लवकरच सोडून जाणार, या कल्पनेने प्रत्येकजण हळवा झाला.* *स्वामी आता दिवसेंदिवस अबोल आणि गंभीर दिसत होते. त्यांना निवृत्तीचे वेध लागले आहेत, ही खबर वायुवेगाने सर्वत्र पसरली. सर्वत्र असलेले स्वामीभक्त या वार्तेने व्यथित झाले. त्यांच्या कृपेने कित्येकांच्या जीवनाचे सोने झाले होते. स्वामींचा संचार मात्र अजूनही थांबला नव्हता. निवृत्तीचे संकेत देत ते फिरतच होते. स्वामी आता परसाकडे बसले म्हणजे स्वस्थ न बसतां, लहान मुलांप्रमाणे काहीतरी खेळ करीत असत. ते चौकोनी खडे घेऊन समाधी सारखी आकृती बनवत असत. जमीनीवर समाधीचे चित्र काढत असत. सर्वांना वाटे, स्वामी मातीत रेघोट्या ओढत आहेत, पण नीट पाहिल्यावर कळे की, ते समाधीचे चित्र आहे. !* *देह ठेवण्याच्या पंधरा दिवस अगोदरची घटणा. पहाटे पहाटे स्वामी बाळाप्पांचे अगोदरच उठून बसले. नीद्रेमुळे स्वामी सेवेत अंतर पडले, म्हणून लज्जीत होऊन अपराधी मनाने बाळाप्पा स्वामींजवळ गेले. नित्याप्रमाणे स्वामीसेवेची सर्व कामे मोठ्या भक्तियुक्त अंतःकरणाने त्यांनी पार पाडली. स्वामींनी बाळाप्पांस जवळ घेतले, त्यांचा हात हातात घेतला. "श्री स्वामी समर्थ" ही सुबक अक्षरे कोरलेली आपल्या हातातील प्रसाद रूपी अंगठी त्यांनी बाळाप्पांचे हाताचे बोटात घातली व म्हणाले, "माझे शिक्कामोर्तब तुला देत आहे ! माझा हा शिक्का यावच्चंद्र दिवाकरौ.... तू असाच पुढे चालव !!" आपल्या गळ्यातील रुद्राक्ष काढून तो बाळाप्पांचे गळ्यात मोठ्या प्रेमाने बांधला. अंगावर आपली छाटी घातली. हातात निशाण दिले. प्रसादरुपी पादुका दिल्या. मस्तकावर वरदहस्त ठेवला, व म्हणाले, एक स्वतंत्र मठ तू स्थापन कर ! तेथे या पादुकांची स्थापना कर !!"* *त्या नंतरच्या दिवशी, स्वामी तात्या सुभेदार यांच्या घरी असताना दुपारच्या वेळेस शौचास जाऊन बसले. काही कारण नसताना अचानक लवंडले. सेवेकऱ्यांनी विचारले, "स्वामी, असे काय झाले ?" स्वामी म्हणाले, "रांड पटकीने मला ढकलले..!" त्या वेळेस स्वामींच्या अंगात भरपूर ताप होता. त्या दिवशी स्वामींना अनेक वेळा शौचास झाले. परंतु दुसऱ्या दिवशी त्यांना आराम वाटल्याने, तिसऱ्या दिवशी मेण्यात बसून ते नागणहळ्ळीस गेले. तेथे आंब्याच्या बागेत चार दिवस राहिले. पण तेथे गेल्यापासून स्वामींनी अन्नपाणी वर्ज्य केले, आणि एक गोष्ट मात्र सुरू केली, ती म्हणजे ते सतत भजन करूं लागले.... "शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो... हे गिरीजापति भवानी शंकर शिवशंकर शंभो...!" सर्वजण गोंधळून गेले, कारण स्वामींनी हे भजन अश्याप्रकारे कधीही म्हटले नव्हते. स्वामींना आराम पडत नाही, हे पाहून त्यांचा एक भक्त सखाराम लोखंडे जवळ होता, त्याने स्वामींना प्रार्थना केली की, "आपण अक्कलकोटला वडाखाली बसावे..!" ही गोष्ट स्वामींनी मान्य केली. मेण्यातूनच स्वामी अक्कलकोटला आले. अन्न बिल्कुल वर्ज्य केले तरी स्वामींच्या अंगात तत्परता मात्र विशेष होती. दुखण्यातील कण्हणे, कुंथणे किंवा कोणतीही तक्रार बिल्कुल नव्हती. सर्व आनंदमय होते.* *इतक्या वर्षांचा देह आता थकला होता. त्या देहाला आता विश्रांतीची गरज होती. वडाखाली गेल्यावर स्वामींचा प्रिय नापिक गोपाळ, ज्यास स्वामी नाईक म्हणत, त्यास स्वामींच्या आदेशाने बोलावणेत आले. त्याचेकडून स्वामींनी श्मश्रू करवून घेतली. स्वामींना स्नान घालून, पूजा करून सेवेकऱ्यांनी त्यांची मंगल आरती केली. परंतु स्वामी काही खाईनात. त्यामुळे सर्वांस फार काळजी वाटत होती. "आपण आता जाणार" असे स्वामी वारंवार सांगू लागले. परंतु स्वामींनी अवतार समाप्ती करावी, हे कुणालाही पटत नसल्याने जो - तो सेवेकरी आपापल्या परीने उपचार करू लागला. नामांकित डाॅक्टर, वैद्य, हकिम, अंगारे- धुपारे करणारे सर्वजण आपापल्या परीने प्रयत्नांची शिकस्त करीत होते, पण स्वामींच्या मनातच देहत्याग करण्याचा निर्णय पक्का असल्याने कुणाचाच उपाय चालेना..!"* *स्वामी आता निश्चल पडून होते. त्यांचे प्रकृतीस आराम पडावा म्हणून सर्वत्र प्रार्थना होत होत्या. ही सर्व परिस्थिती पाहून बाळाप्पा स्वामींस म्हणाले, महाराज, तुम्ही केव्हा उठाल ?" तेव्हा स्वामी म्हणाले, "डोंगर बोलतील तेव्हा उठेन !" हाच प्रश्न श्रीपाद भटजीने केला तेव्हा म्हणाले, "पंढरी जळेल तेव्हा उठेन !" प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत, हे ध्यानात येताच प्रत्येकाच्या काळजात कालवाकालव झाली. सेवेकरी शोकाकूल झाले. परब्रम्हाच्या सान्निध्याला आता आपण मुकणार, ही जाणीव सर्वांना क्लेशदायक होती. परंतु त्यांनी आशा सोडली नव्हती. औषधोपचार, अंगारे, धुपारे, उतारे सुरूच होते. डॉक्टरांच्या गोळ्या तोंडात घातल्यावर स्वामी त्या थु़ंकून टाकत आणि हसत असत.* *अशुभाची जाणीव सर्वप्रथम मुक्या जनावरांना होते, असे म्हणतात. स्वामींनी पाळलेली, आणि अवती भवती वावरणारी जनावरे आता स्वामींपासून दूर जावयास तयार नव्हती. एकटक स्वामींकडे पहात आज्ञाधारकपणे उभी रहात असत. स्वामी प्रत्येक जनावराच्या पाठीवरून आईच्या प्रेमाने हात फिरवताच त्यांच्या डोळ्यांतून अश्रू येत होते, व ते पाहून सेवेकऱ्यांचा धीर मात्र खचत होता. अक्कलकोटवासी आणि सेवेकरी आता स्वामींपासून दूर व्हावयास तयार नव्हते. प्रत्येकाला स्वामींची तेजस्वी मूर्ती आपल्या डोळ्यात साठवून ठेवायची होती.* *स्वामींनी अन्न-पाणी वर्ज्य केल्याने त्यांना आता बाहेर, परसाकडे जाण्याचेही त्राण नव्हते. त्यावेळेस स्वामींचा परमभक्त भुजंग म्हणाला, "महाराज, आपण पाटावर बसावे, मी आपणांस उचलून बाहूर नेतो." त्या वेळेस स्वामी म्हणाले, "अरे, आज पाटावरून उचलून नेतो म्हणतोस, उद्या काय देऊळ उचलून नेशील ?" परंतु स्वामींनी त्याला तसे करू दिले.* *आजपर्यंत आपण सर्व आनंदात होतो, पण स्वामी माऊलींनी देह ठेवल्यावर आपले कसे होणार ? याची भक्तांना चिंता होती. प्रत्येकजण "मी आता काय करावे स्वामी ?" असे विचारू लागला. श्रीपाद भटजीला स्वामींनी "तू वडाची मुळे खणत बैस !" असे सांगितले. गणपतरावांस देवळात बसून रहावयास सांगितले. बाळाप्पांस औदुंबराच्या छायेत बसून रहावयास सांगितले, काकूबाईस अक्कलकोटास राहावयास सांगितले. "आपले वाड-वडिल ज्या रितीने वागले, त्याच रितीने सर्वांनी वागावे" असा स्वामींनी सर्वांस उपदेश केला. कुणास काही- कुणास काही सांगून समजूत केली. परंतु असे हजारो भक्त असल्याने सर्वांसाठी एकच मंत्र पुनः पुनः उच्चारला...! "अनन्याश्चिंतयंतोमा ये जनां पर्युपासते । तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ।! भगवद्गीतेतील नवव्या अध्यायातील हा बावीसावा श्लोक ! स्वामींनी अनेक वेळा उच्चारला. जो माझी अनन्यभावाने भक्ती करेल, त्याचा योगक्षेम मी स्वतः करीन...! हे वचन दिले. मनोभावे स्वामींना शरण जाऊन त्यांचा कृपाशीर्वाद प्राप्त करण्याची जणू सनदच स्वामींनी सर्वांना दिली..!"* *अखेर स्वामींचा निजधामास जाण्याचा दिवस उजाडला. शके अठराशे, बहुधान्य नाम संवत्सर, चैत्र वद्य त्रयोदशी, वार- मंगळवार...! सकाळी सकाळी स्वामींनी डोळे उघडतांच बाळाप्पा, कृष्णाप्पा, श्रीपादभट तात्काळ स्वामींजवळ गेले. त्यांनी स्वामींना साद घातली... "स्वामी..!" स्वामींनी सर्वांकडे पाहीले, व शांतपणे म्हणाले, "आम्ही पाळलेली सर्व जनावरे घेऊन या..!" स्वामी जनावरांसह सर्वांचा निरोप घेऊ पहात आहेत, हे पाहून सर्वजण व्याकूळ झाले. दुपार झाली. वातावरण उदास होते. स्वामींचे निर्गमन होणार हे कळून की काय, निसर्ग ही मंदावला होता. सूर्य ढगाआड गेला होता. वृक्ष-वेली, पाने-फुले सर्व स्तब्द होते. स्वामींनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी बाळगलेली गाय, वासरे, बैल, घोडे इत्यादी सारी जनावरे स्वामींसमोर आणू उभी केली. स्वामी स्वतः उठून त्या जनावरांजवळ गेले. प्रत्येकाचे डोक्यावरून, पाठीवरून त्यांनी मातृप्रेमाने हात फिरविला. त्या स्पर्शाक्षणी त्या मुक्या जनावरांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. सर्व जनावरे देखील स्वामींचे हात-पाय चाटू लागली. त्या दिवशी स्वामींसमोर जेवढे म्हणून नैवेद्य सेवेकऱ्यांनी आणून ठेवले होते, ते सारे स्वामींनी स्वतःचे हातांनी त्या जनावरांना खाऊ घातले. आपली शिल्लक असलेली सर्व वस्त्रे स्वामींनी त्या जनावरांच्या अंगावर घातली.* *दोन प्रहर उलटून गेले. तिसरा प्रहर सुरू झाला. दोनच्या प्रहरास राणीसाहेब राजवाड्यावरून स्वामींच्या खुशालीसाठी आल्या. दहा-बारा दिवस स्वामींचे अन्न बिल्कुल वर्ज्य झाले होते. परंतु या वेळी राणीसाहेबांच्या व इतर सेवेकऱ्यांचे विंतीवरून स्वामींनी काकुबाईचे हातून थोडी पेज घेतली. तोंड धुऊन रूमालाने पुसले. सेवेकऱ्यांनी हाताला धरून स्वामींना अंथरूणावर निजवले. बाळाप्पांनी सुपारी कातरून दिली, ती त्यांनी घेतली. स्वामींनी थोडेतरी अन्न घेतले, याचा राणीसाहेबांना परमानंद झाला. राणीसाहेबांच्या गालावरून आनंदाश्रू ओघळत असतानाच त्या पुटपुटल्या, "आता माझ्या स्वामींस भय नाही..! आता माझ्या स्वामींस भय नाही..!" असे म्हणतच त्या निश्चिंतपणे राजवाड्यावर परतल्या.* *एव्हाना सेवेकऱ्यांनी भजन करण्यास सुरूवात केली होती, पण सर्वांचे लक्ष स्वामींकडेच होते. एका सेवेकऱ्याने स्वामींसाठी तक्का आणून ठेवला. त्याला टेकून स्वामी बसले. बाळाप्पा, कृष्णाप्पा, श्रीपादभट, गणपणराव, भुजंग, काकुबाई आदी सेवेकऱ्यांसह सर्व भक्त स्वामींकडे पापणीही न हालवितां एकटक पहात होते.* *दुपारचे चार वाजले, स्वामींच्या प्रयाणाची वेळ जवळ आली. स्वामींच्या देहाची विचित्र चलबिचल पाहून श्रीपादभट स्वामींस म्हणाले, "स्वामी आपण असे का करता ? बाळगोपाळांस कुणाचे स्वाधीन करणार ?" स्वामींनी आपणांस उठवून बसवावे, अशी आज्ञा केल्याने श्रीपादभटाने तसे केले. स्वतः मांडी घालून स्वामी बसले. भजन ऐकतां ऐकतां स्वामींनी डोळे मिटले. कुणाच्याही लक्षात ही गोष्ट आली नाही. काही वेळाने जेव्हा ही गोष्ट लक्षात आली, तेव्हा भजन थांबले. सर्वजण व्याकूळ नजरेने स्वामींकडे पहात होते.* *अभूतपूर्व शांतता पसरली, आणि ही शांतता भंगली ती भक्त़ाच्या हाकांनी...! "स्वामी...!, महाराज...!, डोळे उघडा स्वामी...!, एकदा तरी आमचेकडे पहा स्वामी...!, आम्हाला आशीर्वाद द्या स्वामी...!" पण स्वामींचे डोळे मिटलेलेच होते. तेथे हजर असलेल्या डॉक्टर, वैद्य यांनी स्वामींचा हात हातात घेऊन नाडी तपासली. नाडी हाताला लागत नव्हती. आणि हे सर्वांना समजताच एकच हलकल्लोळ झाला. सारे भक्त आक्रोश करूं लागले. "स्वामी आम्हांस पोरकें करूं नका हो!, स्वामी आता आम्ही कुठें जावें, आधारासाठी कुणाकडे पहावे ?" प्रत्येक जण शोकाकूल झाला होता. कुणी जमिनीवर डोके आपटू लागला, कुणी डोक्याचे केस उपटूं लागला, कुणी ऊर बडवू लागला..! वेगवेगळ्याप्रकारे प्रत्येकजण आक्रोश करीत होते, स्वामींना हाका मारीत होते, ढसा ढसा रडत होते.* *डोळे मिटलेल्या अवस्थेत स्वामी तक्क्याला टेकून निश्चल बसून होते. त्यांच्या पायावर डोके ठेवण्यासाठी काहीजण रडत रडत धावले, आणि अचानक स्वामींनी डोळे उघडले व कडाडले, "अरे हा...ट !" पायांवर डोके ठेवण्यासाठी धावणारे भक्त थबकले. अचंब्याने पाहू लागले. "स्वामी गेले नाहीत ! स्वामी आहेत ! स्वामी आहेत !!" सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान पसरले. "तुम्हांस काय वाटले, मी गेलो ? हम गया नही जींदा है !" स्वामी म्हणाले. ज्यांची माझेवर श्रध्दा आहे, त्यांचेसाठी मी सदैव आहे ! अनन्याश्चिंतयंतोमां ये जनां पर्युपासते । तेषा नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ।" हा श्लोक स्वामींनी या वेळीही काही वेळा पुन्हा म्हटला. जो माझी अनन्यभावाने भक्ती करेल, त्याचा योगक्षेम मी स्वतः करीन. स्वामींच्या या आश्वासनाने सर्वांना दिलासा मिळाला.* *आम्ही उगाचच भयभीत झालो ! सर्वांना असे वाटत असतानाच स्वामींनी हातानेच सर्वांना आशीर्वादाचा संकेत करून पुन्हा डोळे मिटले. या वेळी स्वामींच्या मुखातून खसखशी एवढे तीन पांढरे दाणे बाहेर आले. तेव्हा सर्वांना खात्री झाली की, आता मात्र स्वामींनी आपला अवतार संपविला. आपण स्वप्न तर पाहिले नाही ना ? असेच सर्वांना वाटले. पण नंतर सर्वांच्या भावना अनावर झाल्या. कुणी कुणाचे सांत्त्वन करावे ? प्रत्येकाचेच सुखनिधान हरपले होते. शके १८००, बहुधान्य नाम संवत्सर, चैत्र वद्य त्रयोदशी, मंगळवार, चौथ्या प्रहरी, चार वाजता स्वामी निजधामास गेले.* *काहींना वाटले स्वामी लीला करीत आहेत. स्वामी पुन्हा डोळे उघडतील. कारण त्यांच्या चेहऱ्यावरील तेज कायम होते. ते सजीव आहेत असेच वाटत होते, म्हणून कित्येकजण आशेने त्यांचेकडे पहात होते, पण त्यांच्या पदरी निराशाच आली.* *हा हा म्हणता ही बातमी सगळीकडे पसरली. हलकल्लोळ झाला. भुजंग व काही निस्सीम भक्त डोके आपटून घेऊन प्राण देण्यास सिध्द झाले. सर्वभक्त आक्रोश करत समर्थांचे गुण गाऊ लागले. तान्हुल्याची माय गेली असता ते जसे पोरके होते, तसे सारे भक्त क्षणांत अनाथ झाले. हजारों लोकांच्या झुंडीच्या झुंडी वडाजवळ जमू लागल्या. "हर हर महादेव" असा एकच घोष होऊ लागला. भजनी मंडळींची भजने सुरू झाली. खेड्यापाड्यातून बातमी कळतांच हजारो लोक आक्रोश करीतच अक्कलकोटास आले. त्यावेळच्या -हदयद्रावक, पाषाणासही पाझर फुटणाऱ्या भक्तांच्या विलापाचे वर्णन करणे केवळ अशक्य आहे..!* *काही विचारवंत सेवेकऱ्यांनी आपले दुःख आवरून स्वामींना निरोप देण्याची तयारी सुरू केली. काही वेळातच स्वामींसाठी एक लाकडी विमान तयार केले गेले. ते केळींच्या खांबांनी व फुलांच्या माळांनी सुशोभित केले. स्वामींना अभिषेक करून त्यांना भरजरी पोषाख चढविण्यात आला. नंतर सर्वांनीच स्वामींची आरती केली. स्वामींचा निष्प्राण देह त्या विमानातील सिंहासनावर बसवून मिरवणूक निघाली. मिरवणूक वैभवशाली होती. जरीपटक्याचे सजवलेले हत्ती, अंबारीचे हत्ती, घोडदळ, पायदळ, तोफा व सरदार- मानकरी मिरवणुकीत सामील होते. ना-ना प्रकारची वाद्ये वाजत होती. गुलाल- बुक्का उधळला जात होता, दारुकामही केले जात होते.* *चोळाप्पाने बुधवार पेठेतील आपल्या घराजवळ अगोदरच बांधून ठेवलेल्या समाधीवर स्वामींच्या पादुकांची स्थापना अगोदरच करण्यात आली होती. सनई, चौघडे, वाजंत्रीच्या सुरात वाजत गाजत स्वामींना समाधीच्या जागी आणून बसविण्यात आले. तेथे त्यांची शेवटची शास्त्रोक्त पूजा करून पुन्हा शेवटची आरती करण्यात आली. त्या वेळचे कारभारी नानासाहेब बर्वे, मामलेदार- बाबुराव विष्णू मोघे व बाळाप्पा यांनी स्वामींचा देह उचलून समाधीच्या गाभाऱ्यात नेऊन ठेवला. इतक्यांत दुःखाने उन्मळलेल्या बाळाप्पांस आठवले की, आपल्या बि-हाडी एक अत्तराची कुपी शिल्लक आहे, पुढे तिचा काय उपयोग होणार ? आत्ताच ती स्वामींना अर्पण करावी, असे त्यांच्या मनात आले. परंतु सभोवताली हजारो भक्तांची गर्दी. त्यातून बि-हाडी कसे जाणार ? अशा विवंचनेत बाळाप्पा असतानाच एकजण उत्तम प्रकारची अत्तराची कुपी घेऊन आला, व एवढ्या गर्दीत नेमके बाळाप्पांच्याच हाती देऊन स्वामींस अर्पण करण्याची विंती केली. आणि "हम गया नही जिंदा है ।" या स्वामींनी काही तासांपूर्वीच दिलेल्या वचनाची पहिली प्रचिती आली. बाळाप्पांनी त्या अत्तराचे स्वामींच्या अंगास लेपन केले. स्वामी चरणी अखेरचे मस्तक टेकवले. समाधीचे दार बंद करून, स्वामींच्या अनुग्रहाने पुनीत होऊन तपोनिधी बाळाप्पा पोरक्या पुत्राप्रमाणे जेव्हा वर आले, तेव्हा जमलेल्या मंडळींचा शोक अनावर झाला. या प्रसंगाचे वर्णन सारामृतकार विष्णू बलवंत थोरात असं करतात, "संपवावा अवतार आता । ऐसे मनामाजी येता । जडदेह त्यागोनी तत्त्वतां । गेले स्वस्थानी यतिराज ।। शके अठराशे पूर्ण । संवत्सर तो बहुधान्य । मास चैत्र पक्ष कृष्ण । त्रयोदशी मंगळवार ।। दिवस गेला तीन प्रहर । चतुर्थ प्रहराचा अवसर । चित्त करोनी एकाग्र । निमग्न झाले निजरूपी ।। षट्चक्राते भेदून । ब्रम्हरंध्रा छेदून । आत्मज्योत निघाली पूर्ण । -हदयामधुनीं तेधवा ।।* *वातावरण स्तब्ध झाले होते. सारे अश्रुभरल्या नजरेने उभे होते. वृक्ष-झाडे-पाने-फुले स्तब्ध होते. इ.स ११४९ रोजी तत्कालीन आर्यावर्तातल्या, पंजाब प्रांतातल्या, "छेली" नांवाच्या छोट्या खेड्यामध्ये सुरू झालेले हे अध्यात्मिक क्रांतीचं वादळ, ७२९ वर्षे कार्य करून इ.स. १८७८ मध्ये अक्कलकोटास शांत झाले.* *थोड्या वेळानंतर मात्र सर्वजण भानावर येऊन सर्वांनी उत्स्फुर्तपणें श्रींचा एकच जयघोष केला. "अनंतकोटी ब्रम्हांडनायक, भक्तवत्सल, भक्ताभिमानी, श्रीपादवल्लभ, नृसिंहसरस्वती, राजाधिराज, योगीराज, श्री स्वामी समर्थ महाराज की जय..!!* *संकलन- सदानंद पाटील, रत्नागिरी.* *संदर्भ ग्रंथ,* *परब्रम्ह- श्री रामचंद्र सडेकर* *श्री अक्कलकोट निवासी स्वामी महे यांचे चरित्र- श्री गणेश बल्लाळ मुळेकर.* *🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹* ❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄

+38 प्रतिक्रिया 4 कॉमेंट्स • 16 शेयर
Daksha Mar 29, 2020

।। सर ।। दिवाळी, उन्हाळी व गणपती, ह्या सुट्यात काय करायचे ह्याचे नियोजन मी केलेले असते.कोणत्या दिवशी काय करायचे हे ही ठरलेले असते.आपण आपल्या विद्यार्थ्यांनपासून दूर राहणार याची जाणीवही असते.पण गेल्या दहा दिवस मी एका हाकेला मुकलो आहे. आणि ती हाक आहे," सर " शाळेची पायरी चढायला सुरुवात होते ना होते तोच ही हाक ऐकू येते आणि क्षणात माझ्यातला सामान्य पुरुष हा शिक्षिक होतो .घर,संसार, जगरहाट सर्व विसरण्याची ताकद या शब्दात आहे. कोणाशी कितीही मोठा वाद होऊ दे,एवढाही मोठा अपमान होऊ दे,किती ही मोठे दु:खणे असू दे,समोर विद्यार्थी बघितले की सारे विसरायला होते. आणि त्यांना घडवायची उर्मी उफाळून येते. नवीन संकल्पना, विचार,आपोआप अभ्यासक्रमात शिरतात. त्यांच्यासंग तल्लीन झाल्यावर वेळचे घड्याळ कधी पुढे सरकते हेही कळत नाही. वाचता न येणाऱ्या विद्यार्थ्यांला हळूहळू वाचता येऊ लागलं की त्याच्या " सर " या हाकेत मिठास जाणवतो प्रश्न विचारल्यावर सर मी,सर मी असं ओरडणाऱ्या हुशार मुलांच्या हाकेत आत्मविश्वास जाणवतो. तर मस्ती करताना पकडल्यावर सर मी नाही, मी नाही, असे ओरडणाऱ्या हाकेतून फसवेपणा लगेच समजतो 'सर ' शब्द तेच पण वर्गातील प्रत्येकाचा आवाज, नाद,लय वेगळी असल्याने कोणी हाक मारली हे बसल्याजागी नजर न टाकता नुसत्या श्रवणाने समजते. व त्यांनी का हाक मारली असावी हेही न सांगता उमजते. 'सर' म्हणजे .तुम्हाला बाबा व आईची दोन्ही भूमिका पुर्ण शिक्षकी पेशात निभवायच्या आहेत हे डी.एडला खूप वेळा सांगितलेले वाक्य आहे. त्यामुळे ही हाक ऐकताना आपल्या जबाबदारीची जाणीव लगेच होते. पालकसभेत वा पालकभेटीला येतात त्यावेळेला सर,तुम्ही याला समजवा,हा तुमचंच ऐकतो. किंवा हीला जरा मला मदत करायला सांगा. अशा अर्थाची वाक्य ऐकतो.तेव्हा मला या सर शब्दाची ताकद समजते व पालकाचा आपल्यावरील विश्वास जाणवतो. तर अशी ही हाक ,"सर" अजून किती तरी दिवस ऐकायला मिळणार नाही.तिच्यातल्या गोडवेला, मायेला मी मुकलो. आहे. माझ्या मनाची तगमग होत आहे.ती तगमग वाढली तरी चालेल. पण दाटीवाटीत राहणाऱ्या माझ्या विद्यार्थ्यांपर्यंत हा कोरोनाचा संसर्ग न घडो.मला 'सर ' साथ घालणाऱ्या या उगवत्या ता-याना बंद घरात राहण्याची ताकद येऊ दे.त्याच्या स्वस्थ न बसणाऱ्या वृत्तीला वैज्ञानिक दृष्टिकोनाचे महत्त्व समजू दे. मी लवकर ऐकेल, त्यांची हाक 'सर 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

+8 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 5 शेयर