गीताज्ञान

Devanand Jadhav Aug 21, 2019

★🕉गितासार🕉★ 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 >भगवद्गीता के संस्कृत श्लोक जो बदल सकते हैं आपका जीवन< ●अध्याय अठरावा● ◆मोक्षसन्यासयोग◆ न हि देहभृता शक्यं त्यक्तुं कर्माण्यशेषतः । यस्तु कर्मफलत्यागी स त्यागीत्यभिधीयते ॥ १८-११ ॥ कारण शरीरधारी कोणत्याही माणसाकडून पूर्णपणे सर्व कर्मांचा त्याग केला जाणे शक्य नाही. म्हणून जो कर्मफळाचा त्यागी आहे, तोच त्यागी आहे, असे म्हटले जाते. ॥ १८-११ ॥ अनिष्टमिष्टं मिश्रं च त्रिविधं कर्मणः फलम्‌ । भवत्यत्यागिनां प्रेत्य न तु संन्यासिनां क्वचित्‌ ॥ १८-१२ ॥ कर्मफळाचा त्याग न करणाऱ्या मनुष्यांना कर्माचे बरे, वाईट व मिश्र असे तीन प्रकारचे फळ मेल्यानंतर जरूर मिळते; परंतु कर्मफळाचा त्याग करणाऱ्या मनुष्यांना कर्माचे फळ कधीही मिळत नाही. ॥ १८-१२ ॥ पञ्चैतानि महाबाहो कारणानि निबोध मे । साङ्ख्ये कृतान्ते प्रोक्तानि सिद्धये सर्वकर्मणाम्‌ ॥ १८-१३ ॥ हे महाबाहो अर्जुना, सर्व कर्मांच्या सिद्धींची ही पाच कारणे, कर्मांचा शेवट करण्याचा उपाय सांगणाऱ्या सांख्यशास्त्रात सांगितली गेली आहेत, ती तू माझ्याकडून नीट समजून घे. ॥ १८-१३ ॥ अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथग्विधम्‌ । विविधाश्च पृथक्चेष्टा दैवं चैवात्र पञ्चमम्‌ ॥ १८-१४ ॥ कर्म पूर्ण होण्यासाठी अधिष्ठान, कर्ता, निरनिराळ्या प्रकारची करणे, अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या क्रिया आणि तसेच पाचवे कारण दैव आहे. ॥ १८-१४ ॥ शरीरवाङ्‍मनोभिर्यत्कर्म प्रारभते नरः । न्याय्यं वा विपरीतं वा पञ्चैते तस्य हेतवः ॥ १८-१५ ॥ मनुष्य मन, वाणी आणि शरीर यांनी शास्त्राला अनुसरून किंवा त्याविरुद्ध कोणतेही कर्म करतो, त्याची ही पाचही कारणे असतात. ॥ १८-१५ ॥ 🔶 🔶 🔶 🔶 🔶 🔶 🔶 🔶 🔶 ●🌹●सुप्रभात●🌹● ========================

+4 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 0 शेयर
Anchal Devi Aug 20, 2019

+22 प्रतिक्रिया 2 कॉमेंट्स • 55 शेयर
Devanand Jadhav Aug 20, 2019

★🕉गितासार🕉★ 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 >भगवद्गीता के संस्कृत श्लोक जो बदल सकते हैं आपका जीवन< ●अध्याय अठरावा● ◆मोक्षसन्यासयोग◆ एतान्यपि तु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा फलानि च । कर्तव्यानीति मे पार्थ निश्चितं मतमुत्तमम्‌ ॥ १८-६ ॥ म्हणून हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), ही यज्ञ, दान व तप रूप कर्मे तसेच इतरही सर्व कर्तव्य कर्मे आसक्ती आणि फळांचा त्याग करून अवश्य केली पाहिजेत. हे माझे निश्चित असे उत्तम मत आहे. ॥ १८-६ ॥ नियतस्य तु संन्यासः कर्मणो नोपपद्यते । मोहात्तस्य परित्यागस्तामसः परिकीर्तितः ॥ १८-७ ॥ (निषिद्ध आणि काम्य कर्मांचा तर स्वरूपतः त्याग करणे योग्यच आहे.) परंतु नियत कर्मांचा स्वरूपतः त्याग योग्य नाही. म्हणून मोहाने त्याचा त्याग करणे याला तामस त्याग म्हटले आहे. ॥ १८-७ ॥ दुःखमित्येव यत्कर्म कायक्लेशभयात्त्यजेत्‌ । स कृत्वा राजसं त्यागं नैव त्यागफलं लभेत्‌ ॥ १८-८ ॥ जे काही कर्म आहे, ते दुःखरूपच आहे, असे समजून जर कोणी शारीरिक त्रासाच्या भीतीने कर्तव्य कर्मे सोडून देईल, तर त्याला असा राजस त्याग करून त्यागाचे फळ कोणत्याही प्रकारे मिळत नाही. ॥ १८-८ ॥ कार्यमित्येव यत्कर्म नियतं क्रियतेऽर्जुन । सङ्गं त्यक्त्वा फलं चैव स त्यागः सात्त्विको मतः ॥ १८-९ ॥ हे अर्जुना, जे शास्त्रविहित कर्म करणे कर्तव्य आहे, या भावनेने आसक्ती आणि फळ यांचा त्याग करून केले जाते, तोच सात्त्विक त्याग मानला गेला आहे. ॥ १८-९ ॥ न द्वेष्ट्यकुशलं कर्म कुशले नानुषज्जते । त्यागी सत्त्वसमाविष्टो मेधावी छिन्नसंशयः ॥ १८-१० ॥ जो मनुष्य कुशल नसलेल्या कर्मांचा द्वेष करीत नाही आणि कुशल कर्मांत आसक्त होत नाही, तो शुद्ध सत्त्वगुणी पुरुष संशयरहित ज्ञानी व खरा त्यागी होय. ॥ १८-१० ॥ 🔶 🔶 🔶 🔶 🔶 🔶 🔶 🔶 🔶 ●🌹●सुप्रभात●🌹● ========================

+5 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 1 शेयर