गीतरामायण

+21 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 30 शेयर

+2 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 9 शेयर

*गीत रामायण* गीत रामायणाची सुरवात १ एप्रिल १९५५ (रामनवमी) या दिवशी झाली मराठी माणसाला तीन गोष्टींचे फार आकर्षण आणि प्रेम असते . १) राजकारण २) नाटक आणि ३)गीत रामायण . ६६ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी सुरु झालेल्या गीतरामायणाची मोहिनी आजही टिकून आहे.त्या काळी कधी एकदा रविवार उजाडतो आणि गीतरामायणातले पुढचे नवीन गाणे ऐकायला मिळेल याची अतीव ओढ समस्त मराठी माणसांना लागत होती. सर्वसाधारणपणे मोठेपण कवी आणि लेखकाच्या वाटयाला कमी येते. संगीतकाराला आणि गायकाला सगळयात जास्त शाबासकी मिळते. गीत-रामायणाच्या बाबतीत मात्र असे घडले आहे की, गायक सुधीर फडके, संगीतकार सुधीर फडके यांच्याइतकेच गीत-रामायणाचे कवी म्हणजे महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर हेही लोकांच्या विस्मरणातून कधीच गेले नाहीत. गीतरचना आणि संकल्पनेचा जन्म १९५४ च्या काळात पुणे आकाशवाणी केंद्रावर सीताकांत लाड नावाचे स्टेशन डायरेक्टर होते. त्यांना समाजप्रबोधन असलेला मनोरंजनात्मक कार्यक्रम आकाशवाणीवरून प्रसारित करावयचा होता. त्यांचे जवळचे मित्र गजानन दिगंबर माडगूळकर (गदिमा) यांना सीताकांत लाडांनी आपली कल्पना सुचवली. गदिमांनाही कल्पना आवडली आणि वाल्मिकींच्या ‘रामायणा’वरून गीतरामायणाची निर्मिती झाली. गीत रामायणातील गीतांची रचना ...... छंदवृत्तांमध्ये केली गेली. ..... गीतांत अनेक शब्दालंकार आणि अर्थालंकार सुयोग्य वापर असल्याने गीतरामायण हे एक सुश्राव्य काव्य झाले आहे गीतरामायण ही एक गीतांची शृंखला आहे. बर्‍याच गीतांचा शेवट पुढील प्रसंगाशी किंवा गाण्याशी जोडलेला आहे. उदाहरणार्थ अकारण जीवन हे वाटले - उदास का तू आवर वेडे नयनातील पाणी; इप्सित ते तो देईल अग्नी अनंत हातांनी - दशरथा घे हे पायसदान. गीतरामायणात मादकतेसहित अन्य सर्व मानवी प्रवृत्तींचे आणि भावनांचे दर्शन होते. गीतरामायणात बालगीत आहे, आणि आज्ञा, मागणी, आर्जव, हट्ट, स्त्री-हट्ट, दुराग्रह, हाव, संताप, समर्पण, काळजी, संशय, सूड, कर्तव्यभाव, मित्रभाव, कानउघाडणी, विजयोत्सव आहेत, आणि भक्तिभावही आहे. ग.दि. माडगूळकरांनी विविधांगी रसांनी परिपूर्ण अशा स्वरूपात गीतरामायण घडविले आहे. 'निमंत्रिला मी सुमंत मंत्री आज्ञा त्याला दिली', 'भावास्तव मी वधिले भावा', 'तुझ्या कृपेची शिल्प सत्कृती माझी मज ये पुन्हा आकृती' या पदात शाब्दिक समृद्धी; 'हीरकांच्या मेळाव्यात नीलमणी उजळतो', 'मोत्यांचा चूर नभी भरून राहिला' अशा शब्दरचनांतून कल्पनारम्यता; 'फुलापरी ते ओठ उमलती', 'ये अश्रूंचा पट डोळ्यावर' अशा रचनांतून चित्रमयता, तर "तव अधराची लालस कांती पिऊ वाटते मज एकांती" (कोण तू कुठला राजकुमार) या कडव्यातून सौम्य शृंगाररसाचे दर्शन कवी घडवतो. माडगूळकरांनी श्रीराम कथेचा भाग एकेका रामायणी व्यक्तीच्या तोंडून गीतातून प्रकट केला आहे. या कथाभागात एकूण २७ व्यक्ती येतात. सर्वाधिक दहा गीते ही श्रीराम या चरित्र नायकाच्या तोंडी आहेत, त्या खालोखाल सीतेची आठ, कौसल्या व लव-कुश प्रत्येकी तीन, दशरथ, विश्वामित्र, लक्ष्मण, सुमंत, भरत, शूर्पणखा व हनुमंत यांच्या तोंडी प्रत्येकी दोन तर निवेदक, यज्ञपुरुष, अयोध्येतील स्त्रिया, आश्रमीय, अहिल्या आणि इतर सर्वजण यांच्या तोंडी प्रत्येकी एक गीत घातलेले आहे. संगीत सुधीर फडके (बाबूजी) यांनी भारतीय रागांवर आधारित संगीत देऊन स्वतः गीतरामायणाचे 'प्रथम गायन' केले. प्रभाकर जोग यांच्या वाद्यवृंदाने साथ दिली. प्रभाकर जोग यांच्या सोबत वादकांमध्ये अप्पा इनामदार, अण्णा जोशी, सुरेश हळदणकर, केशवराव बडगे यांचा समावेश होता. गीतरामायणातील आधारभूत रागांची संख्या छत्तीस आहे. त्यातल्या मिश्र काफी चार, मिश्र जोगिया चार, भैरवी चार, भीमपलास, मिश्र मांड, मिश्र पिलू, पुरिया धनाश्री, शंकरा, केदार व मारु बिहाग प्रत्येकी दोन, अशा या २६ रचना सोडल्या तर उर्वरित ३० स्वररचना या २६ रागांत एकेक व दोन लोकगीतांवर आधारित आणि दोन स्वतंत्रपणे निर्मित आहेत. २६ रागांत भूप, मिश्र देशकार, देस, बिभास, बिहाग, मिश्र भैरव, मिश्र बहार, मधुवंती, तोडी, मिश्र खमाज, जोगकंस, राग अडाणा, यमन कल्याण, मिश्र हिंडोल, शुद्ध सारंग, वृंदावनी सारंग, मुलतानी, तिलंग, मालकंस, सारंग, हिंडोल, मिश्र आसावरी, यमनी बिलावल, शुद्ध कल्याण व मिश्र पहाडी यांचा समावेश आहे. गीतरामायणातील गीते डॉ. वसंतराव देशपांडे, माणिक वर्मा, सुरेश हळदणकर, राम फाटक, लता मंगेशकर यांनी गायिली आहेत. त्याशिवाय ललिता फडके, मंदाकिनी पांडे, प्रमोदिनी देसाई, बबन नावडीकर, जानकी अय्यर, सुमन माटे, कालिंदी केसकर इत्यादींनीही गीतरामायणातील गीते गायिली आहेत. पुण्याच्या आकाशवाणी, केंद्राचे तत्कालीन स्टेशन डायरेक्टर सीताकांत लाड यांच्या पुढाकाराने या कार्यक्रम शृंखलेचे संयोजन झाले. १ एप्रिल १९५५ या वर्षी गीतरामायणातील पहिले गीत ‘स्वयें श्री रामप्रभू ऐकती’ आकाशवाणी, पुणे ने प्रसारित केले. गीतरामायणात एकूण ५६ गीते आहेत. गीत रामायणातील गीतांचे प्रसारण १९५५ सालच्या रामनवमीला सुरू होऊन १९५६ सालच्या रामनवमीपर्यंत, म्हणजे १ एप्रिल १९५५ ते १९ एप्रिल १९५६ या काळात झाले. पहिले गाणे >> १ एप्रिल १९५५ << १ कुश लव रामायण गाती गायक >>सुधीर फडके>>निवेदक २ शरयू-तीरावरी गायिका >>प्रमोदिनी जोशी, मंदाकिनी पांडे ३ उगा का काळीज माझे उले >>गायिका >> ललिता फडके ४ उदास का तू? >>गायक>> बबनराव नावडीकर ५ दशरथा, घे हे पायसदान >>गायक >> सुधीर फडके ६ राम जन्मला ग सखे >>गायिका >> जानकी अय्यर, सुमन माटे, कालिंदी केसकर (आणि समूह) ७ सावळा गं रामचंद्र >>गायिका >> ललिता फडके ८ ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा >>गायक>> राम फाटक ९ मार ही त्राटिका रामचंद्रा >>गायक>> राम फाटक १० चला राघवा चला >>गायक>> चंद्रकांत गोखले ११ आज मी शापमुक्त जाहले >>गायिका>> मालती पांडे १२ स्वयंवर झाले सीतेचे >>गायक>> सुधीर फडके १४ मोडु नको वचनास >>गायिका>> कुमुदिनी पेडणेकर १५ नको रे जाऊ रामराया >>गायिका>> ललिता फडके १६ रामावीण राज्य पदी कोण बैसतो >>गायक>> सुरेश हळदणकर १७ जेथे राघव तेथे सीता >>गायिका>> माणिक वर्मा १८ थांब सुमंता, थांबवि रे रथ >> समूहगान १९ जय गंगे, जय भागिरथी >> समूहगान २० या इथे लक्ष्मणा बांध कुटी >>गायक >> सुधीर फडके २१ बोलले इतुके मज श्रीराम >>गायक>> गजानन वाटवे २२ दाटला चोहीकडे अंधार >>गायक>> सुधीर फडके २३ माता न तू वैरिणी >>गायक>> वसंतराव देशपांडे २४ चापबाण घ्या करी >>गायक>> सुरेश हळदणकर २५ दैवजात दु:खे भरता >>गायक>> सुधीर फडके २६ तात गेले, माय गेली, भरत आता पोरका >>गायक>> वसंतराव देशपांडे २७ कोण तूं कुठला राजकुमार? >>गायिका>> मालती पांडे २८ सूड घे त्याचा लंकापती >>गायिका>> योगिनी जोगळेकर २९ तोडिता फुले मी >>गायिका>> माणिक वर्मा ३० याचका थांबू नको दारात >>गायिका>> माणिक वर्मा ३१ कोठे सीता जनकनंदिनी >>गायक>> सुधीर फडके ३२ ही तिच्या वेणींतील फुले >>गायक>>सुधीर फडके ३३ पळविली रावणें सीता >>गायक>> राम फाटक ३४ धन्य मी शबरी श्रीराम >>गायिका>> मालती पांडे ३५ सन्मीत्र राघवाचा सुग्रीव आज झाला >>गायक>> व्ही. एल्. इनामदार ३६ वालीवध ना, खलनिर्दालन >>गायक>> सुधीर फडके ३७ असा हा एकच श्री हनुमान >>गायक>> वसंतराव देशपांडे ३८ हीच ती रामांची स्वामीनी >>गायक>> व्ही. एल्. इनामदार ३९ नको करुंस वल्गना >>गायिका>> माणिक वर्मा ४० मज सांग अवस्था दूता, रघुनाथांची >>गायिका>>माणिक वर्मा ४१ पेटवी लंका हनुमंत >>गायिका>> प्रमोदिनी जोशी, मंदाकिनी पांडे ४२ सेतू बांधा रे सागरी >> समूहगान ४३ रघुवरा बोलता का नाही? >>गायिका>> माणिक वर्मा ४४ सुग्रीवा हे साहस असले >>गायक>> सुधीर फडके ४५ रावणास सांग अंगदा >>गायक>> सुधीर फडके ४६ नभा भेदूनी नाद चालले >>गायिका >> प्रमोदिनी जोशी, मंदाकिनी पांडे ४७ लंकेवर काळ कठीण आज पातला >>गायक>> व्ही. एल्. इनामदार ४८ आज का निष्फळ होती बाण >>गायक>> सुधीर फडके ४९ भूवरी रावण वध झाला >> समूहगान ५० किती य्त्‍ने मी पुन्हां पाहिली >>गायक>> सुधीर फडके ५१ लोकसाक्ष शुद्धी झाली >>गायक>> सुधीर फडके ५२ त्रिवार जयजयकार रामा >> समूहगान ५३ प्रभो, मज एकच वर द्यावा >>गायक>> राम फाटक ५४ डोहाळे पुरवा रघुकुलतिलका माझे >>गायिका>> माणिक वर्मा ५५ मज सांग लक्ष्मणा, जाऊ कुठे? >>गायिका>> लता मंगेशकर ५६ गा बाळांनो, श्री रामायण >>गायक>> सुधीर फडके शेवटचे गाणे >>१९ एप्रिल १९५६<< प्रसाद जोग.सांगली ९४२२०४११५०

+5 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 6 शेयर
Siyaram Dubey Sep 28, 2020

+4 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 0 शेयर