कथा

+36 प्रतिक्रिया 5 कॉमेंट्स • 50 शेयर

भाव तेथे देव... एक म्हातारी मुसलमान बाई बेगमपुरात राहत असे. तिने घरी लावलेले दही खूप प्रसिद्ध होते. लांबून लोक ते दही विकत घ्यावयास येत असत. आणि त्यावर त्या बाईचा उदरनिर्वाह चाले. ती बाई स्वामींची कीर्ती आईकून होती पण तिने कधी स्वामींचे दर्शन घेतले नव्हते. एक दिवस आपण लावलेले दही स्वामिना भरवण्याची तिला प्रबळ इच्छा झाली. एक दिवस भल्या पहाटे ती बाई त्या गोड दह्याचे मडक घेऊन अक्कलकोटच्या वाटेला लागली. झपझप पाऊले टाकत ती म्हातारी बाई तो लांब रस्ता तुडवत होती. दुपारच्या आत तिला स्वामिना दही भरवायचे होते. कारण दुपारनंतर दही आंबट होण्याचा धोका होता. ती म्हातारी नेटाने पाऊले पुढे टाकत चालत होती. उन्हाळ्याचे दिवस होते. गर्मीमुळे म्हातारीच्या घशाला कोरड पडली. थकव्याने तिला एकही पाऊल पुढे टाकता येईना. अगदी दमून गेली बिचारी. थकून एका झाडाच्या सावलीत ती टेकली. डोक्यावरचे दह्याचे मडके तिने आपल्यासमोर ठेवले. त्या मडक्याकडे बघून तिच्या डोळ्यात टचकन पाणी आले. मला माझ्या स्वामींना हातानी दही भरवायच होत. पण माझे तसे नशीब नाही. संध्याकाळी पोचल्यावर झालेलं आंबट दही कसे भरवणार देवाला? ह्या विचाराने तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या दिवशी स्वामींना मालोजीराज्याचे राजभोगाचे आमंत्रण होते. सगळी तयारी झाली होती. राजेशाही थाट, भलीमोठी पंगत. धुपदिपाचा सुवास. अनेक पंचपक्वान्ने ,सगळे राजेशाही. ठरल्यावेळी स्वामी आले. मालोजीराज्यानी त्यांना आसनावर बसवले. त्यांची पूजा केली. चरण धुतले. आता स्वामीनी पहिला घास घेतला की सभाही जेवायला मोकळी. सगळेजण स्वामीनी पहिला घास घ्यायची वाट बघत होते. स्वामीनी पहिला घास आपल्या तोंडाजवळ आणला आणि ते थबकले. त्यांची नजर शून्यामध्ये स्थिर झाली, जणू समाधीच लागली. इकडे झाडाखाली, स्वामी या म्हाताऱ्या बाईकडे आले आणि म्हणाले “आई जेवायला बसलो ग, पण दहीच नाही. तुझ्याकडच दही भरवतेस? बाईने पण विचार केला ह्या बाबड्याला देऊन टाकाव दही. तिने त्यांना दही भरवले. भरवताना तिच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. स्वामी ते अश्रू पुसत पुसत आनंदात दही खात होते. झाले,, दही खाऊन स्वामी निघून गेले. इकडे राजवाड्यात स्वामी थोडयावेळाने भानावर आले आणि त्यांनी पहिला घास घेतला.आणि मालोजीराज्याना म्हणाले “मालोज्या! दही छान लागलं आहे. गोड दह्याशिवाय जेवणात मजा नाही बघ!!” कोणाला काही कळेना, कारण त्यादिवशी जेवणांत दहीच नव्हते. मग संध्याकाळी ती म्हातारी बाई अक्कलकोटला पोहोचल्यावर सगळ्या प्रकरणाचा खुलासा झाला. साभार

+58 प्रतिक्रिया 7 कॉमेंट्स • 48 शेयर
amey Sindkar Aug 19, 2019

ता. १७/८/२०१९ आज दुपारी मी माझ्या कुंभारगल्लीत राहणाऱ्या मित्राकडे गेलो होतो. पंचगंगेच्या महापुराचे पाणी त्याच्याही घरी आले होते त्याची भेट घेण्यासाठी मी त्याच्या घरी गेलो होतो. प्रत्येक वर्षी प्रमाणे त्याने याही वर्षी गणपतीच्या मूर्ती बनवल्या होत्या. जागे अभावी तो २०० घरगुती छोट्या मूर्तीच बनवतो अंतिम टप्यात आलेल्या अर्धेनिम्मे रंगकाम झालेल्या सर्व मूर्ती पुरामुळे पूर्ण खराब झाल्या. त्याने शक्य तितकी इन्व्हेस्टमेंट केली होती पण ती सगळी महापुरामुळे व्यर्थ ठरली. मी तिथे गेलो तेव्हा त्याच्या घरात त्या सर्व खराब झालेल्या तुटक्या मोडक्या फक्त पी ओ पी रुपी मूर्तीचा कचऱ्याचा ढिग असावा तसा ढिग होता. आमच्या दोघांचं बोलणं चालू होतं तितक्यात एक माणूस दारात मोटरसायकल लावून दारात बूट काढून घरात आत आला. चांगला इन शर्ट केलेला ३०-३५ वयाचा कोणत्या तर ऑफिस मधला असावा. अमोलला 'नमस्कार भाऊ' म्हणाला अमोल थोडा चाचपडला कारण हा कोण त्याच्या ओळखीचा नव्हता. वाटलं पूर येऊन गेला म्हणून बरेच लोक भेटून जातात बघायला येतात तसा हा पण आला असेल. आता तो माणूस अमोलशी बोलू लागला मी तिथेच बाजूला उभारून ऐकत होतो. तो माणूस अमोलला म्हणाला 'भाऊ प्रत्येक वर्षी गणपतीची मूर्ती मी तुमच्याकडून घेतो आणि १०-१२ दिवस आदी येऊन मूर्ती ठरवून जातो म्हणून आता आलो होतो'. असं बोलल्यावर अमोल त्यांना म्हणाला 'या वर्षी माझ्याकडे मूर्ती नाही मिळणार ओ दादा, सगळ्या मूर्ती पुराच्या पाण्यात खराब झाल्यात'. मग तो माणूस अमोलला म्हणाला 'मला यावेळी रंगरंगीत गणपतीची मुर्ती नको आहे फक्त चिखलाची गणोबाची छोटी मूर्ती हवी आहे' असं बोलत त्याचे दोन हजाराची नोट कडून अमोलच्या हातात ठेवली आणि म्हणाला 'हे घ्या ऍडव्हान्स'. अमोल म्हणाला 'चिखलाचा गणोबा दहा रुपयाला आहे मग हे दोन हजार कशा? अमोलचे बोलणे मधूनच तोडत तो माणूस म्हणाला 'भाऊ तुमचे हात मूर्ती नाही आमचा देव बनवतात, हे देव बनवणाऱ्या हातांना बळकटी येण्यासाठी ! एवढच बोलून तो माणूस निघून गेला. अमोलचा उर भरून आला होता आणि त्याच्या नकळत त्याच्या डोळ्यातून अश्रूंचा थेंब गालावरून ओघळून टपकण मातीमोल झालेल्या मूर्त्यांच्या मातीत पडला. एक सत्य घटना. 🙏🏻

+12 प्रतिक्रिया 2 कॉमेंट्स • 6 शेयर

+21 प्रतिक्रिया 8 कॉमेंट्स • 17 शेयर