एकनाथ

पैठण हे तेथील संत एकनाथांची समाधी, जायकवाडी धरण, ज्ञानेश्वर उद्यान तसेच पैठणी साडी यांच्यासाठी प्रसिद्ध आहे. औरंगाबादेपासून ५० किलोमीटर अंतरावर गोदावरीकाठी ते वसले आहे.  हे गाव प्राचीन कालापासून 'दक्षिण काशी' म्हणून ओळखले जाते. पैठण गावात जे नाथांचं मंदिर आहे, त्यांच्या देवघरात सर्वात वर तुळशीचं माळ घातलेली पांडुरंगाची मूर्ती आहे ती सदैव फुल वस्त्र अलंकाराने झाकलेली असते त्यामुळे मूर्तीचे फक्त मुखकमल दर्शन होत असते. वास्तविक या मूर्तीचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. आपण सहसा पांडुरंगाची मूर्ती दोन्ही हात कमरेवर ठेवून उभा असलेला पांडुरंग पाहतो पण या मूर्तीत पांडुरंगाचा डावा हात कमरेवर आहे तर उजवा हात कमरेच्या खाली आहे पण समोरच्या बाजूला उघडणारा तळवा किंवा तळहात दिसतो. म्हणून त्याला" विजयी पांडुरंग" असे म्हणतात. या विजयी पांडुरंग कसा याची एक सुंदर आख्यायिका आहे, हा भगवंत नाथांना प्रासादिक रुपाने मिळालेला आहे. ही मूर्ती दिडफुट उंचीची आणि अडीच किलो वजनाची पंचधातूंपासून बनवलेली मूर्ती आहे. कर्नाटकातील राजा रामदेवराय हा पंढरपूरच्या पांडुरंगाचा उपासक होता त्यामुळं त्यांनी मंदिर बांधलं आणि सोनारकरवी पंचधातूंची मूर्ती बनवून घेतली आणि त्याची प्राणप्रतिष्ठा करणार तोच पांडुरंग दृष्टांत देऊन त्यांना म्हणाला "माझी ही मूर्ती तू इथे स्थापलीस तर मी इथे राहणार नाही आणि माझ्या इच्छे विरुद्ध तू तसं केलंस तर तुझा निर्वंश होईल. "मग राजाने विचारले की या मूर्ती चे काय करू तेव्हा पांडुरंग म्हणाला की पैठणच्या नाथ महाराजांना नेऊन दे.  त्यानंतर राजाने ती मूर्ती वाजत गाजत पैठणला आणली तेव्हा नाथ महाराज मंदिरात असलेल्या खांबाला टेकून प्रवचन सांगत होते. ते ज्या खांबाला टेकून पुराण सांगायचे. त्या खांबाला पुराण खांब असे म्हणतात. राजा रामदेवराय नाथांचे प्रवचन संपेपर्यंत थांबले आणि त्यांनी ही मूर्ती तुमच्याकडे कशी किंवा का आणली हे सर्व नाथांना सांगितले आणि त्यामुळे भगवंतांना तुमच्याकडे ठेवून घ्या असे सांगितले.  त्यावर नाथांनी मूर्तीला नमस्कार केला आणि म्हणाले की तू राजाच्या घरी राहणारा आहेस माझ्याकडे तुझी रहायची इच्छा आहे पण राजा सारखे पंचपक्वान्न माझ्याकडे तुला मिळणार नाहीत तेव्हा या भगवंताच्या पायाखालच्या विटेवर अक्षरं उमटली "दास जेवू घाला न.. घाला" म्हणजे हे नाथ महाराज मी तुझ्याकडे दास म्हणून आलोय तू जेवायला दे अथवा न दे मी तुझ्याजवळ राहणार आहे.  हे ही या मूर्तीच एक वैशिष्ट्य सांगता येते की विटेवर अजूनही ही उमटलेली अक्षरे आहेत. प्रत्यक्ष भगवंत घरी आले म्हणल्यावर पूर्वी पाहुणचार म्हणून कोणी बाहेरून आले की गुळ पाणी दिले जायचे पण प्रत्यक्ष भगवंत आलेत म्हणल्यावर त्यांनी आपल्या पत्नीला आवाज दिला त्यांचे नाव गिरीजाबाई होते त्यांचा पाहुणचार म्हणून बाईंनी चांदीच्या वाटीत लोणी आणि खडीसाखर आणलं नि नाथांच्या समोर धरलं. हे लोणी घेण्यासाठी म्हणून भगवंतांनी आपला उजवा हात कमरेवरचा काढून पुढे केला नि लोणी चाटले नंतर तो हात लोणचट म्हणजेच थोडा लोणी लागलेला असल्याने परत कमरेवर ठेवताना हात व्यवस्थित कमरेवर ठेवला नाही म्हणून त्या मूर्तीचा हात असा आहे आणि या मूर्तीच दुसरं वैशिष्ट्य असं आहे की आजही प्रत्येक एकादशीला अभिषेकासाठी मूर्ती खाली घेतली जाते तेव्हा संपूर्ण अभिषेकानंतर मूर्तीला पिढीसाखरेने स्वच्छ पुसलं जातं तेव्हा हाताला ही पुसलं जातं तेव्हा त्या हातावरून हात फिरवला तर आजही लोण्याचा चिकटपणा जाणवतो. एकनाथांची विठ्ठलभक्ती एवढी श्रेष्ठ होती की साक्षात पांढुरंग श्रीखंड्याच्या रूपाने पाण्याच्या कावडी एकनाथांच्या घरी आणत असत अशी श्रद्धा आहे. पाण्याचा तो हौदही या वाड्यात अजून आहे. याच भगवंतांनी नाथांच्या घरी कावडीने पाणी वाहीले. मूर्तीच्या खांद्यावर पाणी वाहिल्याचे घट्टे आजही दिसतात. अशा तीन वैशिष्ठ्याने नटलेली ही विजयी पांडुरंगाची मूर्ती आहे. जय श्री हरी विठ्ठल जय श्री संत एकनाथ महाराज 👑 👏 🚩 जय श्री राम जय श्री कृष्ण जय श्री हरी ॐ 🙏 शुभ रात्री वंदन जय श्री गुरुदेव 👣 🌹 👏 जय श्री हरी विठ्ठल रुक्मिणी माता की 💐 👏 🐚 🚩

+10 प्रतिक्रिया 2 कॉमेंट्स • 1 शेयर
M.S.Chauhan Apr 2, 2021

*शुभ दिन शनिवार* *संत एकनाथ जी जय* *एकनाथ षष्ठी की हार्दिक शुभकामनाएं* *● 03 अप्रैल 2021 शनिवार को एकनाथ षष्‍ठी मनाई जा रही है। प्रसिद्ध मराठी संत एकनाथ जी का जन्म हिन्दू कैलेंडर के अनुसार चैत्र कृष्ण षष्ठी को पैठण में हुआ था। उनके पिता का नाम श्री सूर्यनारायण तथा माता का नाम रुक्मिणी था। एकनाथ अपूर्व संत थे। वे श्रद्धावान तथा बुद्धिमान थे। उन्होंने अपने गुरु से ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, श्रीमद्भागवत आदि ग्रंथों का अध्ययन किया।* *● वे एक महान संत होने के साथ-साथ कवि भी थे। उनकी रचनाओं में श्रीमद्भागवत एकादश स्कंध की मराठी-टीका, रुक्मिणी स्वयंवर, भावार्थ रामायण आदि प्रमुख हैं। संत एकनाथ ने जिस दिन समाधि ली, वह दिन एकनाथ षष्‍ठी के नाम से मनाया जाता है। इस दिन पैठण में उनका समाधि उत्सव मनाया जाता है।* *● भगवान रामेश्वरम ने संत एकनाथ की कुछ इस तरह संत एकनाथ महाराष्ट्र के विख्यात संत थे। वह स्वभाव से अत्यंत सरल और परोपकारी थे। एक दिन उनके मन में विचार आया कि प्रयाग पहुंचकर त्रिवेणी में स्नान करें और फिर त्रिवेणी से पवित्र जल भरकर रामेश्वरम में चढ़ाएं। उन्होंने अन्य संतों के समक्ष अपनी यह इच्छा व्यक्त की। सभी ने हर्ष जताते हुए सामूहिक यात्रा का निर्णय लिया। एकनाथ सभी संतों के साथ प्रयाग पहुंचे। सभी ने त्रिवेणी में स्नान किया। तत्पश्चात अपनी-अपनी कांवड़ में त्रिवेणी का पवित्र जल भर लिया। पूजा-पाठ से निवृत्त हो सबने भोजन किया, फिर रामेश्वरम की यात्रा पर निकल पड़े।* *● संतों का यह समूह यात्रा के मध्य में ही था कि मार्ग में एक गधा दिखाई दिया। वह प्यास से तड़प रहा था और चल भी नहीं पा रहा था। सभी संतों के मन में दया उपजी, किंतु उनके कांवड़ का जल तो रामेश्वरम के निमित्त था इसलिए सबने मन को कड़ा कर लिया। किंतु एकनाथ से रहा नहीं गया। उन्होंने तत्काल अपनी कांवड़ से पानी निकाल कर गधे को पिला दिया। प्यास बुझने के बाद गधे को मानो नवजीवन प्राप्त हो गया। वह उठकर सामने घास चरने लगा। संतों ने एकनाथ से कहा, ‘आप तो रामेश्वरम जाकर तीर्थ जल चढ़ाने से वंचित हो गए।*’ *● एकनाथ बोले, ‘ईश्वर तो सभी जीवों में व्याप्त है। मैंने अपनी कांवड़ से एक प्यासे जीव को पानी पिलाकर उसकी प्राण की रक्षा की। इसी से मुझे रामेश्वरम जाने का पुण्य मिल गया।’ वस्तुत: धार्मिक विधि-विधानों के पालन से बढ़कर मानवीयता का पालन है, जिसके निर्वाह पर ही सच्चा पुण्य प्राप्त होता है। सभी धर्मग्रंथों में परोपकार को श्रेष्ठ धर्म माना गया है। सही मायने में परोपकार से ही पुण्य फलित होता है। ईश्वर की सच्ची उपासना भी यही है। यही बात संत एकनाथ ने अपने आचरण से साबित किया। सारे संत उनकी बात सुन उनके सामने नतमस्तक हो गए।* *M.S.Chauhan* 🌷🏵️🌿🙏🏵️🌷

+35 प्रतिक्रिया 5 कॉमेंट्स • 38 शेयर

संत एकनाथ महाराजांनी ज्या दिवशी समाधी घेतली तो फाल्गुन वद्य षष्ठी हा दिवस नाथषष्ठी म्हणून ओळखला जातो. या दिवशी पैठण या गावी समाधी उत्सव होतो. त्यावेळी भरणाऱ्या यात्रेला लाखोंचा जनसमुदाय नाथांच्या समाधीच्या दर्शनाला येतो. श्री एकनाथष्ठी हा दिवस श्री एकनाथमहाराज जलसमाधी दिन म्हणून साजरा केला जातो. पैठण येथील नाथषष्ठीची वारी मोठी असून यासाठी मोठया प्रमाणावर वारकरी समाज एकत्रित होतो. विविध जागांहून आलेल्या ४७५ दिंडया, भानुदास-एकनाथ चा गजर हयाने संपूर्ण परिसर न्हाऊन निघतो. पैठण येथे फाल्गून वद्य षष्ठी, सप्तमी व अष्टमी ह्या दिवसांत हा उत्सव साजरा करण्यात येतो. द्वितीयेस गावातील नाथमंदिरातील रांजणाच्या पूजेनं उत्सवाची सुरूवात होते. द्वितीया ते पंचमीपर्यंत श्री केशवस्वामीकृत नाथ चरित्राचे पारायण होतं. षष्ठीला पहाटे २ वाजता श्रीविजयी पांडुरंगाच्या मूर्तीस महाभिषेक होतो.  गावातील मंदिरातून नाथवंशजांची मानाची पहिली दिंडी श्री एकनाथमहाराजांच्या समाधी मंदिराकडे प्रस्थान करते. मंदिरात वारकरी व हरिदासी कीर्तनं करण्यात येतात. येथे आरती होते आणि सोहळ्यासाठी आलेल्या सर्व दिंडया नगर प्रदक्षिणा करुन गोदाकाठी आपापल्या मठात विसावतात. सप्तमीच्या सोहळ्याला रात्री १२ वाजता नाथांच्या पादुकांची गावातून मिरवणूक काढण्यात येते. या मिरवणुकीला छबिना असे म्हणतात. मिरवणूक काढून पहाटेच्या सुमारास पालखी वाळवंटात आल्यानंतर येथे पादुकांना गोदास्नान घातलं जातं, भारुड सादर केली जातात. सकाळी ७ वाजेच्या सुमारास पालखी गावातील मंदिरात येते. येथे वारकऱ्यांच्या फडांमध्ये भजन कीर्तन इत्यादींचे आयोजन केलं जातं.  अष्टमीला काला दिंडी निघते. या दिवशी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास गावातील नाथ मंदिरातून काला दिंडी निघते. उदासीमठाजवळील पायऱ्यांवर पावल्या खेळल्या जातात. हे दृश्य बघण्यासाठी हजारो भक्त हाजर असतात. समाधी मंदिरात पोहचल्यानंतर मंदिराच्या समोर पटांगणावर शेकडो भाविक टाळमृदुंगाच्या गजरात पावल्या खेळण्यात लीन होऊन जातात.  मंदिराची सजावट म्हणजे येथे उंच ठिकाणी गुळ- लाह्यांचे मोठेमोठे लाडू बांधण्यात येतात. मध्यभागी काला भरलेली हंडी लटकवली जाते. सूर्यास्तावेळी दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ च्या जयघोषात नाथवंशजांकडून हंडी फोडण्यात येते. त्याचा प्रसाद मिळविण्यासाठी भाविकांची झुंबड उडते. अभंग, गौळणी, आरती झाल्यानंतर गोदावरीच्या वाळवंटात काला वाटण्यात येतो.  या उत्सवात हजारो वारकरी सहभागी होतात. फाल्गुन षष्ठी ह्या दिवशी पाच घटना घडल्याने याला पंचपर्वश्रेणी असं म्हणतात. नाथ स्वत: आपल्या गुरुंचा जन्मदिवस व पुण्यतिथी म्हणून यादिवशी उत्सव साजरा करीत. नंतर नाथांनीही ह्याच दिवशी जलसमाधी घेतली त्यामुळे श्री एकनाथषष्ठी म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो. पंचपर्व याप्रकारे आहेत - नाथांचे गुरू श्री जनार्दनस्वामी यांचा जन्म, स्वामींना दत्तात्रयांचे दर्शन व अनुग्रह, नाथांना स्वामींचे प्रथमदर्शन व अनुग्रह, श्री जनार्दनस्वामी पुण्यतिथी आणि श्री एकनाथमहाराज जलसमाधी. यामुळे फाल्गुन षष्ठीला वेगळचं महत्त्व आहे आणि भाविक या सोहळ्याचा आनंद घेतात. प्रसंग 1 : जेव्हा पुत्राने वडिलांना 1000 ब्राह्मणांच्या बरोबरीने स्वीकारले एकदा संत एकनाथांशी नाराज होऊन पुराणमतवादी लोकांनी त्यांच्या पुत्र हरि पंडितला त्यांच्याविरुद्ध हे सांगून विद्रोह करण्यास प्रवृत्त केले की तुझे वडील धर्मग्रंथाचे पाठ मराठी भाषेत करतात आणि कोणच्याही हाताने तयार जेवण जेवतात. हरि जेव्हा याबद्दल एकनाथांशी बोलण्याचा प्रयत्न करतात तेव्हा एकनाथ त्याला समजविण्याचा प्रयत्न करतात पण त्याला काहीही पटत नाही. एके दिवस मुलाने वडिलांना म्हटले की आपल्या दोघांची विचार करण्याची पद्धत अगदी वेगळी आहे आपण एकमत होऊ शकत नाही म्हणून मी घरी सोडत आहे. हे म्हणत तो घरून निघून गेला आणि वाराणसीमध्ये जाऊन राहू लागला. हरि गेल्यामुळे त्याची आई गिरिजा दुःखी राहू लागली. पत्नीने एकनाथांकडे मुलाला परत आणण्याची जिद्द केली. तेव्हा ‍हरि या शर्यतीवर परत आला की त्याचे वडील त्याच्या सांगण्याप्रमाणे वागतील. नंतर एकनाथांनी संस्कृत भाषेत पाठ करण्यास सुरू केले तर त्यांच्या श्रोत्यांची संख्या कमी होऊ लागली. या दरम्यान एक गरीब वृद्धा एकनाथांजवळ येऊन म्हणाली- मी एक हजार ब्राह्मणांना जेवू घालू इच्छित आहे परंतू हे माझ्यासाठी शक्य नाही. आपल्यासारख्या व्यक्तीला जेवू घातल्याने माझं संकल्प पूर्ण होईल म्हणून माझा आग्रह स्वीकार करावा. दुसर्‍या दिवशी वृद्धाच्या घरी जाऊन पिता-पुत्राने भोजन ग्रहण केलं. जेवल्यानंतर हरिने जशीच एकनाथांची पत्रावळ उचलली तर त्याऐवजी दुसरी पत्रावळ प्रकट झाली. हजार पत्रावळी होयपर्यंत असेच सुरू राहीले. तेव्हा हरि पंडितला समजले की आपले वडील हजार विद्वान ब्राह्मणांच्या समतुल्य आहे. त्याने वडिलांच्या पाया पडून क्षमा मागितली की आता मी कधीही आपल्या कोणत्याही कार्यांत अडथळे घालणार नाही. प्रसंग 2 उपकार आणि क्षमा महाराष्ट्रात संत एकनाथ नावाचे एक तपस्वी महात्मा होऊन गेले. ते अनेक सद्गुणांनी परिपूर्ण होते. त्यांच्या क्षमा करण्याची भावना अद्भुत होती. एकदा ते नदीत स्नान करून आपल्या निवास स्थळाकडे जात होते. रस्त्यात जात असताना एका झाडावर बसलेल्या व्यक्तीने त्यांच्यावर खळखळून गुळणी केली. हे बघून ते एकही शब्द न बोलता पुन्हा अंघोळीसाठी नदीवर गेले. स्नान केल्यावर पुन्हा त्या झाडाखालून जाताना त्या व्यक्तीद्वारे त्यांच्यावर थुंकण्यात आले. तेव्हा एकनाथ पुन्हा जाऊन स्नान करू लागले.  एकनाथ वारंवार स्नान करून त्या झाडाखालून निघत असताना झाडावरील व्यक्ती त्यांच्यावर गुळण्या करीत होता. असे 108 वेळ घडले आणि झाडावर बसलेला दुष्ट व्यक्ती आपली नीचता दाखवत राहिला पण एकनाथांनी धैर्य सोडलं नाही आणि क्षमा यावर अटल राहिले. त्यांनी एकदाही त्या व्यक्तीला काही म्हटले नाही. शेवटी दुष्ट व्यक्तीचे हृदय परिवर्तन झालं आणि त्याने महात्मांच्या चरणात वाकून म्हटले की महाराज माझ्या दुष्ट कृत्यासाठी मला माफ करा. माझ्यासारख्या पापी माणसाला तर नरकात देखील स्थान मिळणे संभव नाही. मी आपल्याला खूप त्रास दिला तरी आपण स्थिर राहिला. मला क्षमा करा महाराज. तेव्हा महात्मा एकनाथांनी त्याला म्हटले की काळजी करण्याची गरज नाही. तुझ्यामुळे आज मला 108 वेळा स्नान करण्याचं सौभाग्य लाभलं.‍ तुझे कितीतरी उपकार आहे! संताची ही वाणी ऐकून दुष्ट व्यक्तीला आपण केलेल्या कृत्याबद्दल लाज वाटली. प्रसंग 3 देवाची गुलामी करा संत एकनाथांकडे आलेल्या एका व्यक्तीने म्हटले की- नाथ! आपले जीवन किती मधुर आहे. आम्हाला तर क्षणभर देखील शांती लाभतं नाही. कृपया मार्गदर्शन द्या. तेव्हा नाथ म्हणाले की तू तर केवळ आठ दिवसांचा पाहुणा आहे, म्हणून पूर्वीप्रमाणेच आपलं जीवन व्यतीत करत राहा.  हे ऐकून व्यक्ती उदास झाला. तो घरी जाऊन पत्नीला म्हणाला की आजपर्यंत तुला उगाचच कष्ट दिले. त्यासाठी क्षमा असावी. नंतर मुलांना म्हणाला की तुमच्यावर अनेकदा हात उचलला आहे, त्यासाठी मला माफ करा. ज्या लोकांसोबत त्याने दुर्व्यवहार केला होता, त्या सर्वांकडे जाऊन त्याने क्षमा मागितली. या प्रकारे आठ दिवस सरले आणि नवव्या दिवशी तो एकनाथांकडे पोहचला आणि म्हणाला- नाथ, माझ्या शेवटल्या श्वासासाठी किती वेळ शेष आहे? ती वेळ तर परमेश्वरच ठरवू शकतो, परंतू हे आठ दिवस कसे व्यतीत झाले ते आधी सांग? भोग-विलास आणि आनंद यात व्यतीत केले असतील?  काय सांगावं नाथ, मला या आठ दिवसात मृत्यूव्यतिरिक्त काहीच दिसेनासे झाले. मला आपल्या हातून घडलेले सर्व दुष्कर्म आठवले आणि पश्चात्ताप करण्यातच वेळ निघून गेला. मित्र, ज्या गोष्टीचा ध्यास घेऊन तू हे आठ दिवस घालवले, आम्ही साधू तेच समोर ठेवून व्यवहार करतो. देह क्षणभंगुर आहे. देहाची माती होणार. देहाची गुलामी करण्यापेक्षा परमेश्वराची गुलामी करावी. जय श्री संत एकनाथ महाराज 👑 नमस्कार शुभप्रभात 🌅 वंदन 🌹 👣 👏 शुभ रविवार नमस्कार 🙏 जय श्री राम जय श्री कृष्ण जय श्री हरी 🌻🌷🌿💐🌹🙏🚩☝🐚

+47 प्रतिक्रिया 19 कॉमेंट्स • 10 शेयर

जेवढा मोठा अहंकार तेवढी जास्त असुरक्षितता; अहंकारमुक्त राहण्यासाठी लक्षात ठेवा ३ गोष्टी! संत नामदेव म्हणतात, 'अहंकाराचा वारा न लागो राजसा!' का? कारण अहंकार हे सर्व दु:खाचे मूळ आहे. गंमत म्हणजे अहंकार झालेल्या व्यक्तीला आपण अहंकारी आहोत, हेच कळत नाही आणि लोक सांगतात ते पटत नाही. म्हणून आपण अहंकारापासून मुक्त आहोत की नाही, याची स्वत: चाचपणी केली पाहिजे. देवी भागवतात सांगितले आहे, संसार नाशाचे मूळ कारण अहंकार आहे. धर्म विनाशाचे कारणही अहंकार आहे. अहंकार आपल्या मनात असुरक्षित भावनेला जन्म देतो. अहंकार यशप्राप्तीतून येतो, पण त्याचवेळेस अपयशाची भीती मनाला पोखरत जाते. जेवढा मोठा अहंकार तेवढी जास्त असुरक्षितता! सर्वांना माहित आहे, प्रत्येकाला एक ना एक दिवस या विश्वाचा निरोप घ्यायचा आहे. तरी स्वत:च्या नावाभोवती मोठे वलय निर्माण करण्याची धडपड कशासाठी? कोणासाठी? कालचक्र फिरत राहते. त्रिकालबाधित काही राहणार असेल, तर ते म्हणजे भगवंताचे नाम! हे माहित असूनही लोक स्वत:ला सर्वश्रेष्ठ म्हणवून घेण्यासाठी धडपडत राहतात. जर तुम्ही स्वत:ला सर्वश्रेष्ठ समजत असाल, तर तुमच्या मनाला कोणत्याही गोष्टीची भीती वाटता कामा नये. जर तुम्ही मनोमन घाबरत असाल, एखादी चिंता तुमच्या मनाला सलत असेल, तर लक्षात घ्या, आपण वृथा अभिमान बाळगत आहोत. आपल्यातील अहंकार ओळखण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. ज्यादिवशी मन भयमुक्त होईल, त्यादिवशी आपल्यातून अहंकाराचा लवलेश निघून गेला, असे म्हणता येईल. स्वत: सिद्ध करण्यासाठी आज प्रत्येक व्यक्ती प्रयत्न करत आहे. अशात अपयश आले, तर ते तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही आणि यश आले, तरी ते तुम्हाला गर्वाने भरून टाकेल. यश-अपयशाकडे जेव्हा आपण समतेने बघायला शिकू, तेव्हा आपण अहंकाराला हरवू शकू. जगद्गुरु शंकराचार्य म्हणतात, मन, बुद्धी, चित्त, अहंकार या तत्त्वांमध्ये मी नाही, मी आहे तो केवळ परमात्म्याच्या ठायी! ब्रह्म आणि अहंकार हे दोघे परस्परविरोधी आहेत. अहंकारी व्यक्ती ब्रह्नाची प्रचिती घेऊ शकत नाही. ब्रह्म म्हणजे सहजता. आपण जसे आहोत, तसा स्वत:चा स्वीकार करणे. आपल्या हातून झालेल्या चुकांची सहजतेने क्षमा मागणे आणि दुसऱ्यांकडून झालेल्या चुकांना सहजतेने क्षमा देणे, हेच ब्रह्मज्ञान आहे.  या तीन गोष्टी ज्यांनी समजून घेतल्या त्यांना अहंकार कधीच स्पर्श करू शकणार नाही. शांतिब्रम्ह श्री संत एकनाथ महाराज की जय जय श्री जगदंबा माता की नमस्कार शुभप्रभात 🌅 वंदन 🌹 👣 👏 शुभ षष्ठी नाथ संप्रदायातील एक संत श्री एकनाथ महाराज षष्ठी निमित्ताने सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभकामना ये नमस्कार 🙏 🌷 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

+17 प्रतिक्रिया 7 कॉमेंट्स • 0 शेयर