आरोग्‍य

*झोप घेण्याची सर्वोत्तम वेळ कोणती ?* -जेफ्री ह्आंल (नोबेल विजेते-2017) *झोप* (विश्रांती) घेण्यासाठी योग्य वेळ असू शकते का ? असे ऐकीवात आहे की *"लवकर नीजे लवकर ऊठे तया आरोग्यसंपदा लाभे "*हे किती खरे आहे ? ऊशिरा झोपून ऊशिरा ऊठले तर नाही चालणार का ? चला पाहूया.... खरे तर तुमच्या शरीरात एक जैवीक घड्याळ सातत्याने टीकटीक करत असते. आणि ते अतिशय तंतोतत कार्यरत असते. ते तुमच्या शरीरातील विविध क्रियांसोबतच तुमच्या झोपण्याच्या वेळेचेही नियमन करत असते. *रात्री 11 ते पहाटे 3 या* कालावधीत तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया मुख्यत्वे तुमच्या यकृतात(Liver) रोखलेलीअसते.तुमचे यकृत अधिकचे रक्त साठल्यामुळे मोठे होते. ह्या महत्वाच्या वेळेस खरेतर तुमच्या शरीरातून विषारी पदार्थ बाहेर टाकण्याची(Detoxification) महत्वाची प्रक्रिया होत असते. तुमचे यकृत तुमच्या शरीरातील दिवसभरात साठलेल्या विषद्रव्यांचे निष्क्रियीकरण करुन त्याना बाहेर काढण्याचे अतिमहत्वाचे कार्य ह्या *रात्री 11 ते पहाटे 3*च्या वेळेत होत असते. तथापि जर तुम्ही ह्या वेळेस झोप घेऊ शकला नाहीत तर तुमचे *यकृत ही विषद्रव्ये बाहेर फेकण्याचे काम सुलभरित्या करू शकणार नाही.* . जर तुम्ही रात्री 11 वाजता झोपी गेलात तर तुमच्या यकृताला तुमच्या शरीरातील विषद्रव्ये बाहेर काढण्यासाठी पुर्ण *4* तासांचा वेळ मिळतो. जर 12 वाजता झोपलात तर *3*तास . जर 1 वाजता झोपलात तर *2* तास . आणि जर 2 वाजता झोपलात तर फक्त *1* तास तुमच्या शरीरातील विषद्रव्ये बाहेर काढण्यासाठी..... आणि जर तुम्ही पहाटे 3 नंतर झोपलात तर ? *दुर्दैवाने तुमच्या शरीराकडे खरेतर विषद्रव्ये बाहेर काढण्यासाठी वेळ नाही.*जर तुम्ही तुमच्या झोपेची ही चुकीची वेळ अशीच पाळली तर हे विषारी द्रव्ये तुमच्या शरीरात कालानुक्रमे वाढत जातील.. आणि तुम्हाला माहीत आहे पुढे काय होईल ? काय होते जेव्हा तुम्ही ऊशिरा झोपता आणि ऊशिरा ऊठता ? ऊशिरा झोपण्याचा तुम्ही कधी प्रयोग केला आहे का ? तुम्ही रात्रभर कीतीही तास झोपला तरी सकाळी खुप थकल्यासारखे वाटले असेल ? ऊशिरा झोपुन ऊशिरा उठणे खरेतर तुमच्या आरोग्यासाठी खुप धोकादायक आहे. तुम्ही विषद्रव्ये बाहेर टाकण्याच्या प्रक्रीयेशिवाय शरीराच्या आणखी अतिमहत्वाच्या क्रियांचे वेळापत्रक सुद्धा बिघडवता. *पहाटे 3 ते 5 वाजण्याच्या वेळेत तुमच्या शरीरात रक्ताभिसरणाची क्रिया ही फुफ्फुसांच्या मधे केंद्रीत होते*. ह्या वेळेस तुम्ही काय करणे योग्य आहे ? खरेतर, तुम्ही शारिरीक हलचाली आणि मोकळ्या हवेत श्वास घेऊन शरीरात ऊर्जा साठवण्यासाठी बागेत फिरायला जायला हवे. ह्या सकाळच्या वेळेस हवा ही खुप शुद्ध असते आणि शरीरास आवश्यक अशा ऋण भाराच्या विद्युत कणानी परीपुर्ण असते. *सकाळच्या 5 ते 7 ह्या वेळेस रक्ताभिसरणाची क्रिया मोठ्या आतड्यात केंद्रित होते.* आता तुम्ही काय करायला हवे ? तुम्ही शौचकर्म ऊरकून घ्यायला हवे. तुमच्या मोठ्या आतड्यातून सर्व मैला बाहेर जाऊ द्या. तुमच्या शरीराला दिवसभरात आवश्यक असणारी पोषणद्रव्ये आत्मसात करण्यासाठी तयार करा. *सकाळी 7 ते 9 च्या वेळेत रक्ताभिसरण तुमच्या पोटाच्या ठिकाणी केंद्रीत होते.* आता तुम्ही काय करायला हवे ? तुमचा नाश्ता ऊरकून घ्या. हा नाश्ता तुमच्या संपुर्ण दिवसभरातील सर्वात महत्वाचा आहार आहे. आणि तुम्हाला आवश्यक ती सर्व पोषणद्रव्ये मिळतील याची काळजी घ्या. परीपुर्ण नाश्ता न केल्यामुळे तुम्हाला भविष्यात अनेक आरोग्यविषयक तक्रारीना सामोरे जावे लागू शकते. असा आहे तुमचा दिवस ऊत्तम प्रकारे सुरु करण्याचा राजमार्ग.... अश्याप्रकारे ह्या आदर्श पद्धतीने तुम्ही तुमचा दिवस आरंभ करा. निद्रावस्थेत विषद्रव्ये निष्कासीत केल्यानंतर तुम्ही श्वसनाद्वारे आवश्यक ऊर्जा सामावून घेण्यासाठी ताजेतवाने होऊन ऊठा. त्यानंतर तुम्ही मोठया आतड्यातील मैला बाहेर टाकून द्या. आणि त्यानंतर तुम्ही नवीन दिवसाच्या नव्या सुरवातीला आवश्यक तो पोषणयुक्त आहार योग्य प्रमाणात घ्या. ह्यात काहीच आश्चर्य नाही की *ग्रामिण भागातील किंवा शेतावर राहणारे शेतकरी हे सदृढ असतात.*ते लवकर झोपून लवकर ऊठतात. ते त्यांचे शरीरीचे नैसर्गिक जैविक घड्याळ पाळतात. शहरात रहात असताना आपल्याला झोपेचे वेळापत्रक पाळताना खुप अवघड जाते. आपल्याकडे चांगला विद्युत प्रकाश , टी व्ही , आणि ईंटरनेट असल्यामुळे आपण आपली अमुल्य अशी झोपेची वेळ पाळत नाही. आपले नैसर्गिक वेळापत्रक पाळताना.... एकदा मला माझ्या शरीरातील जैविक घड्याळाची माहीती मिळाल्यावर मी ते पाळण्याचा पुरेपुर प्रयत्न करीन. जर मी लवकर ऊठलो तर जरी माझा दिवस नेहमीप्रमाणे कंप्युटर वर चालू झाला आणि मला *घड्याळात 7 वाजलेले दिसले तर मला माहीत आहे की ही नाश्त्याची सर्वोत्तम वेळ आहे*. तर मी माझा नाश्ताआहार शरीराद्वारे ऊत्तम प्रकारे शोषण करण्यासाठी 9 च्या वेळेआधी करण्याचा प्रयत्न करीन. जर तुम्हाला कुणी रात्रपाळीची नोकरी देऊ केली तर ? मी तुम्हाला जरी जास्त पगार दिला तरी नोकरी नाकारण्याचा सल्ला देईन. दूरदृष्टीने विचार केला तर तुम्हाला कमाईपेक्षा जास्त पैसे आरोग्यविषयक तक्रारींवर खर्च करावे लागतील. ह्याप्रकारे जास्तत जास्त ह्या वेळा पाळण्याचा प्रयत्न करा. तुमचे दैनंदीन वेळापत्रक असे तयार करा. मला खात्री आहे तुम्ही संपुर्ण दिवस अधिक उत्साही आणि ताजेतवाने रहाल संकलित व प्रसारीत 🌸🌸🌸धन्यवाद 🌸🌸🌸

+9 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 16 शेयर

🌷शरीरात उष्णता निर्माण करणारे हे पदार्थ हिवाळ्यात जरूर खावेत🌷 Loksatta 4 Dec 2019 17:08 pm loksatta.com 🌷हिवाळ्यात काय खावे याचे काही साधे निकष सांगता येतील. 🌷हिवाळ्यात काय खावे याचे काही साधे निकष सांगता येतील. जे खाऊ ते ‘बृहण’ करणारे, म्हणजेच पोषण करणारे हवेत. या ऋतूत होणाऱ्या विकारांना दूर ठेवणारे, नैसर्गिकरीत्या सहज मिळणारे व शरीरात उष्णता निर्माण करणारे पदार्थ हिवाळ्यात जरूर खावेत. अशा पदार्थाची काही उदाहरणे देत आहोत. 🌷गाजर : गाजर हे चांगले पोषण करणारे, उष्ण व मधुर रसात्मक आहे. त्यात ‘अ’ जीवनसत्त्वही उत्तम प्रमाणात आहे. त्यामुळे हिवाळ्यात गाजर कोशिंबिरीच्या स्वरूपात किंवा तसेच कच्चे खाता येईल. हिवाळ्यात मूळव्याधीची प्रवृत्ती वाढते. त्याला प्रतिबंध करण्यासाठी गाजर आहारात असलेले चांगले. ज्या लहान मुलांचे वजन कमी आहे त्यांना गाजर दुधाबरोबर शिजवून केलेला हलवा जरूर द्यावा, त्याने वजन वाढायला मदत होते. 🌷जव : जवाला ‘धान्यराज’ किंवा संस्कृतमध्ये ‘यव’ असेही संबोधले जाते. उत्तर भारतात थंडी खूप असते आणि तिथे हे धान्यही पुष्कळ प्रमाणात खातात. पण आपल्याकडे ते फारसे खाल्ले जात नाही. फार तर ‘बार्ली वॉटर’ किंवा ‘पफ बार्ली’ आपल्याला माहिती असते. जव हे बलकारी, गुरू व मधुर रसात्मक आहे. थंडीत ज्यांना सारखा सर्दी-खोकला होतो, नाक वाहते अशांना आजारांना प्रतिबंध करण्यासाठी आहारात जवाचा समावेश करता येईल. 🌷बोरे : हिवाळ्यात बोरे मुबलक मिळतात. बोरे गुणांनी स्निग्ध, बृहण करणारी, पचायला जड (गुरू) व मधुर आहेत. हिवाळ्यात अनेकांना आव पडण्याचा किंवा आमांशाचा त्रास होतो. तो टाळण्यासाठीही बोरे चांगली. बोरे अग्निदीपन करणारी असून ती पित्त व कफ कमी करणारी व सारकदेखील आहेत. त्यामुळे पोट साफ होण्यासाठी बोरे मदत करतात. लहान मुलांसाठी बोरे उत्तम टॉनिकसारखे काम करतात. त्यात मेंदू व मज्जातंतूंचे टॉनिक असल्यासारखे घटक आहेत. 🌷लसूण : स्निग्ध गुणांचा, बृहण करणारा, उष्ण आणि मधुर गुणांचा लसूण हिवाळ्यासाठी उत्तम आहे. लसणीत कॅल्शियम आणि फॉस्फरसचा चांगला साठा असतो. त्वचेखालच्या लहान रक्तवाहिन्यांचे विस्तारण करून शरीराला उबदार वाटण्याचा अनुभव देणारा लसूण आहे. असा हा लसूण थंडीत विविध सूप्समध्ये वापरता येईल किंवा रोज एक लसूण पाकळी कच्चीच चावून खाल्ली तरी चालते. एक कप पाण्यात लसणीची एक पाकळी किंचित ठेचून घाला व पाणी उकळवून अर्धा कप होईपर्यंत आटवा. असा काढा गाळून दिवसात एकदाच कोमट असताना घेता येतो. अनेक स्त्रियांना रजोनिवृत्तीनंतर वारंवार मूत्रमार्गाचा जंतुसंसर्ग होतो. अशा तक्रारींमध्ये जंतुघ्न असलेला लसूण आहारात ठेवल्यास फायदा होऊ शकतो. 🌷आणखी वाचा- शरीरात उष्णता निर्माण करणारे हे पदार्थ हिवाळ्यात जरूर खावेत 🌷– मांसाहर करणाऱ्यांनी कोळंबी, ऑयस्टर, चिकन या पदार्थांचा आहारात समावेश करावा. या पदार्थांमध्ये झिंक हे मूलद्रव्य असतं. रोगकारक विषाणू-जीवाणूंवर हल्ला चढविण्यासाठी आपल्या पांढऱ्या पेशींना हे मूलद्रव्य पुरेशा प्रमाणात मिळणं आवश्यक आहे. 🌷– या शिवाय मशरूम, तृणधान्य, ओट्स, मोड आलेल्या कडधान्याचाही समावेश करावा. तावरी, कांद्याची पात, लसूण, रताळे, कोबी, सफरचंद आणि हिरव्या पालेभाज्या आवर्जून खा. 🌷– उन्हाळ्यामध्ये भरपूर घाम येऊन तहान लागत असल्याने आपण भरपूर पाणी पितोपण हिवाळ्यामध्ये हवेतील बाष्प कमी झाल्याने आणि थंड वातावरणामुळे घाम येत नाही. थेट तुमच्या त्वचेतून पाणी शोषले जाते, त्यामुळे तुम्हाला घाम येत नसला तरीही तुमच्या शरीरात पाण्याची पातळी योग्यप्रमाणात राखणे महत्त्वाचे असते. म्हणूच या काळात भरपूर पाणी आणि भाज्यांचे सूप प्या. 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

+4 प्रतिक्रिया 2 कॉमेंट्स • 5 शेयर

+6 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 6 शेयर
sharda Agawane Dec 3, 2019

+13 प्रतिक्रिया 2 कॉमेंट्स • 19 शेयर