अमावस्या

Sajjan Singhal Mar 23, 2020

+16 प्रतिक्रिया 2 कॉमेंट्स • 6 शेयर
Sajjan Singhal Mar 23, 2020

+19 प्रतिक्रिया 2 कॉमेंट्स • 3 शेयर
A.G. JOSHI Mar 23, 2020

--------------------------------- *सोमवती अमावास्या* ---------------------------------- *ज्या अमावस्येला सोमवार येतो त्या अमावास्येला सोमवती अमावास्या म्हणतात.* अमावास्या प्रत्येक महिन्यात येते. पण, सोमवारी अमावस्या येण्याचा योग मात्र फार कमी वेळा येते. म्हणून सोमवती अमावस्या खास आहे सोमवार हा भगवान शंकरांचा वार आहे त्यामुळे याला अधिक महत्त्व आहे. गंगेच्या पाण्यात स्नान करण्याला या दिवशी महत्व आहे. गंगेच्या पाण्यात स्नान करणे शक्य नसेल तर घराजवळील कुंडात स्नान करावे आणि भगवान शिव, पार्वती आणि तुळशीची मनोभावे पूजा करावी. धार्मिक ग्रंथांमध्ये सोमवती अमावास्या भाग्याची अमावास्या असल्याचे सांगितले आहे. या अमावास्येच्या दिवशी स्नान आणि दानाचे महात्म्य आहे. नदीत किंवा तीर्थक्षेत्री स्नान करणे भाग्याचे मानले जाते. त्याचसोबत गोदान, अन्नदान, ब्राह्मणाला भोजन आणि वस्त्रदान हे दान करणे पुण्याचे मानले आहे. सोमवार महादेवाच्या उपासनेचा विशेष दिवस मनाला जातो आणि याच दिवशी अमवस्या असल्यास या दिवसाचे महत्व वाढते. या दिवशी शिवलिंगावर अक्षता अर्पण केल्यास स्थायी लक्ष्मीची प्राप्ती होते *असे मानले जाते की,* महाभारतामध्ये पितामह भीष्म यांनी युधिष्ठिरला सोमवती अमावस्येचे महत्व सांगितले होते. या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान केल्यास अक्षय पुण्याची प्राप्ती होते. अनेक जन्मांचे पाप नष्ट होतात. पितर देवतांची तृप्ती होते. *सोमवती अमावास्येच्या दिवशी* ◆सूर्याला अर्घ्य दिल्यास दारिद्र्य दूर होते. ◆ या दिवशी तुळशीला १०८ प्रदक्षिणा घालाव्यात. ◆ एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत चंद्राचा अशुभ प्रभाव असल्यास , गाईला हिरवा चारा, दही, पोळी आणि तांदूळ खाऊ घालावेत. ◆सोमवती अमावास्येच्या दिवशी पिंपळाची छाया(सावली) ग्रहण केल्यास, प्रदक्षिणा घातल्यास समस्त पापांचा नाश होतो आणि कुंडलीत सर्व दोष दूर होतात. या उपायांनी लक्ष्मीची प्राप्ती होते तसेच दीर्घायुष्य लाभते. ◆विवाहित महिलांनी सोमवती अमावस्येच्या दिवशी पिंपळाची विशेष पूजा करावी. दुध, जल, अक्षता, चंदन अर्पण करावे. ◆शास्त्रानुसार जर पत्नीने पतीसाठी या योगामध्ये मौन व्रत धारण केले तर त्याला दीर्घायुष्याची प्राप्ती होते. पती-पत्नीमधील प्रेम वाढते. घरामध्ये सुख-समृद्धी कायम राहते ◆सोमवती अमावस्येला मौन धारण केल्यास गाय दान केल्याचे पुण्य प्राप्त होते. -------------------------------------------------- *संकलन :- सतीश अलोणी @* --------------------------------------------------

+17 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 13 शेयर
Sajjan Singhal Mar 23, 2020

+16 प्रतिक्रिया 2 कॉमेंट्स • 5 शेयर