वर्षभरातील एकादशीमध्ये आषाढी एकादशीचे स्वत:च वेगळे स्थान आहे. या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते. आषाढ मासाच्या शुक्ल पक्षातील एकादशीला ‘देवशयनी (देवांच्या निद्रेची)’ आणि वद्य पक्षातील एकादशीला ‘कामिका एकादशी’, असे म्हणतात. ‘पूर्वी देव आणि दानव यांच्यात युद्ध पेटले. कुंभ दैत्याचा पुत्र मृदुमान्य याने तप करून शंकराकडून अमरपद मिळवले. त्यामुळे तो ब्रह्मदेव, विष्णू, शिव अशा सर्व देवांना अजिंक्य झाला. त्याच्या भयाने देव त्रिकूट पर्वतावर धात्री (आवळी) वृक्षातळी एका गुहेत दडून बसले. त्यांना त्या आषाढी एकादशीला उपवास करावा लागला. पर्जन्याच्या धारेत स्नान घडले. अकस्मात त्यांच्या सर्वांच्या  श्वासापासून एक शक्ती उत्पन्न झाली. त्या शक्तीने गुहेच्या दाराशी टपून बसलेल्या मृदुमान्य दैत्याला ठार मारले. ही जी शक्तीदेवी, तीच एकादशी देवता आहे. आषाढी एकादशी व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते. एकादशीच्या दिवशी सर्व प्राणिमात्रांची सात्त्विकता वाढत असल्याने या दिवशी व्रत केल्याने त्याचा अधिक लाभ होतो. शैव आणि वैष्णव अशा दोन्ही संप्रदायांत एकादशीचे व्रत केले जाते.  मनुष्याचे एक वर्ष हे देवांचे एक अहोरात्र असते. दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो. आषाढ महिन्यात येणाऱ्या कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते, म्हणजेच देवांची रात्र सुरू होते म्हणून आषाढी एकादशीला ‘देवशयनी’ (देवांच्या निद्रेची) एकादशी, असे म्हणतात. जय श्री राम 👏 जय श्री कृष्ण जय श्री राधे राधे नमस्कार शुभ प्रभात 🌅 👣 वंदन 🚩 जय श्री हरी विठ्ठल नमस्कार 🙏

+90 प्रतिक्रिया 12 कॉमेंट्स • 3 शेयर

कालिंदीचा काठ कान्हाची झाली पहाट; बासरी हातात घेताच राधाने ऐकली हाक. राधा ही अशी धावे कान्हाच्या पाठीपाठी; कान्हा हा कसा? बासरी वाजवी कुणासाठी? सांज ढळत आली कान्हाची न थांबे बासरी; सुरात रंगुन गेली राधा नाचे त्यावरी.  "मराठी मातीच्या भांड्याला प्रसंगानुसार नाव मराठीत मातीच्या भांड्याला उपयुक्ततेनुसार व प्रसंगानुसार वेगवेगळ्या नांवांनी संबोधले जाते पाण्याचा - माठ अंत्यसंस्काराला - मडकं नवरात्रात - घट वाजविण्यासाठी - घटम् संक्रांतीला - .सुगडं दहिहंडीला - हंडी दही लावायला - गाडगं लक्ष्मीपूजनाचे - बोळकं लग्न विधीत - अविघ्न कलश अक्षय्य तृतीयेला - केळी व करा (स्वर्गीय माता म्हणून लाल रंगाचे त्याला केळी व स्वर्गीय पिता म्हणून काळ्या रंगाचे त्याला करा) जय श्री कृष्ण जय श्री हरी विठ्ठल जय श्री राम 👏 जय श्री राधे राधे नमस्कार 🙏 शुभ रात्री वंदन 🚩 मित्रांनो नमस्कार 🙏

+82 प्रतिक्रिया 20 कॉमेंट्स • 3 शेयर

जय श्री कृष्ण जय श्री राधे राधे जय श्री राम 👏 जय श्री हरी विठ्ठल जय श्री पांडूरंग नमस्कार शुभ प्रभात 🌅 शुभ शनिवार जय जय रघुवीर समर्थ नमस्कार 🙏 पंढरपूर आणि विठोबा याच्या स्थानाविषयी आणि तो मुळचा कुठला हा वाद त्याच्या जन्माइतकाच जुना असावा. त्यात त्याच्याविषयी केलेले कानडा, कर्नाटकू, कानडे हे उल्लेख त्याचे मूळ रूप कानडी असावे हे दर्शवितात की काय असा प्रश्न पडतो. अनेक संतांच्या अभंगात त्याच्या कानडीपणाविषयी उल्लेख आहेत. वास्तविक पंढरपूरला पांडरंगपल्ली, पंडरंगे, पौंडरीकक्षेत्र, फागनिपूर, पंडरीपूर, पांडुरंगपूर, पंडरी अशी नावे वेगवेगळ्या काळात देण्यात आली. पंढरपूरचा पांडरंगपल्ली या नावाने सर्वांत जुना उल्लेख राष्ट्रकूट राजा अविधेय याने नोव्हेंबर 516 मध्ये जयद्विठ्ठ नावाच्या ब्राह्मणास दिलेल्या ताम्रपटात आढळतो. सोळखांबी मंडपाच्या पूर्वद्वारासमोरील दगडी तुळईच्या तिन्ही बाजूंवर देवनागरी लिपीत आणि संस्कृत व कानडी भाषांतील शिलालेखांत पंढरपूरला पंडरंगे म्हटले असून होयसळ वीर सोमेश्वर याने विठ्ठल देवाचे अंगभोग आणि रंगभोग यांसाठी आसंदी नाडामधील हिरिय गरंज (कर्नाटकातील चिकमगळूर जिल्ह्यातील कट्टर तालुक्यातील हिरे गरंजी गाव) हे गाव दान केल्याचे म्हटले आहे. बेळगावजवळच्या बेंडेगिरी गावाच्या सुसंस्कृत ताम्रपटात पंढरपुरास पौंडरीकक्षेत्र आणि विठोबास विष्णू म्हटले आहे. पंडरगे हेच या क्षेत्राचे मूळ नाव असून ते कर्नाटकी असल्याचे काही पुरावे आढळतात. हिप्परगे, सोन्नलिगे, कळबरगे या कन्नड नावप्रमाणे पंडरगे हे नाव आहे. पंडरगे या क्षेत्र नावाचा अपभ्रंश होऊन पांडूरंग हे विठ्ठलाचे नाव झाल्याचेही एक मत आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगातही विठ्ठलाच्या कानडेपणाचे उदाहरण आढळते. कानडा हो विठ्ठलु कर्नाटकु| येणे मज लाविले वेधीं || असे ते म्हणतात. ज्ञानेश्वरांनी त्याला कानडा म्हणताना त्याच्या कर्नाटक प्रांताचाही उल्लेख केला आहे. याशिवाय एकनाथांनी तर तीन अभंगात विठ्ठल आणि कानडा हे नाते रंगविले आहे. कानडा विठ्ठल असे त्याला संबोधून नाथ म्हणतात नाठवेचि दुजें कानड्यावाचुनी | कानडा तो मनी ध्यानी वसे || याशिवाय या विठ्ठलाचे तीर्थ कुठले हे सांगताना नाथ म्हणतात तीर्थ कानडे देव कानडे | क्षेत्र कानडे पंढरिये | विठ्ठल कानडे भक्त हे कानडे | पुंडलिके उघडे उभे केले || नामदेवांच्या अभंगातही कानडेपणाचा उल्लेख येतो. कानडा विठ्ठल वो उभा भीवरेतीरी भक्तांचे आर्त वो जीवा लागले भारी || इतकेच नव्हे तर नामदेव त्याच्या भाषेचाही उल्लेख करतात विठ्ठल कानडे बोलू जाणे | त्याची भाषा पुंडलिक नेणे || रा. ज. पुरोहित व डॉ. रा. गो. भांडारकर हे अनुक्रमे पुंडरीकपूर व पांडुरंगपूर यांपासून पंढरपूर हा शब्द उत्पन्न झाला असे मानतात. चौ-याऐंशीच्या शिलालेखात (1273) पंढरपूरास फागनिपूर व विठोबास विठठ्ल किंवा विठल म्हटले आहे. 1260 ते 1270 च्या दरम्यानच्या हेमाद्रीच्या चतुर्वर्गचिंतामणि ग्रंथात पंढरपूरला पौंडरीक व विठोबाला पांडुरंग संबोधिले आहे. 1258 च्या सुमारास चौंडरस या कानडी कवीने आपल्या अभिनव दशकुमारचिरते ग्रंथात पंढरपूर, विठठ्ल मंदिर व तेथील गरूड, गणपती, क्षेत्रपाल, विठ्ठल, रूक्मिणी यांचे वर्णन केले आहे. चोखामेळ्याच्या समाधीजवळच्या 1311 च्या मराठी शिलालेखात पंडरीपूर व विठल आणि विठ्ठल असे उल्लेख आढळतात. संत साहित्याचे गाढे अभ्यासक आणि विठ्ठलाच्या मूळ रूपाचा शोध घेऊन त्यावर विठ्ठल एक महासमन्वय हा ग्रंथ लिहिणाऱ्या रा. चिं. ढेरे यांच्या मते मूळ विठ्ठल हा कानडीच आहे हे आपण मान्य केले पाहिजे. ते म्हणतात, संतांनी विठ्ठलाला लावलेले कानडा हे विशेषण त्याच्या स्वरूपाच्या अगम्यतेचे द्योतक आहे, असे म्हटले जाते. वेदा मौन पडे |श्रुतीसी कानडे यातून ते स्पष्ट होते. पम तरीही कानडा याचा अगम्य हा लक्ष्यार्थही त्या शब्दाच्या कर्नाटकीय या वाच्यार्थावरून आलेला आहे, हे विसरता येणार नाही. ज्ञनदेवांनी तर कानडा आणि कर्नाटकू हे दोन्ही शब्द वापरून याबाबतीतील संदिग्धता पूर्णतः मिटवली आहे, असे ढेरे यांचे मत आहे. कानडा म्हणजे अगम्य आणइ कर्नाटकू म्हमजे करनाटकू (लीलालाघवी) असे अर्थ घेऊन विठ्ठलाच्या कर्नाटकियत्वाचे त्याच्या कानडेपणाचे निराकरण करण्याचा प्रयत्न अनेक मराठी अभ्यासक करताना दिसतात. प्रादेशिक अस्मिता म्हणून हे कितीही सुखद असले तरी वस्तुस्थिती तशी नाही, असे श्री. ढेरे यांचे स्पष्ट मत आहे. पंढरपूर हे स्थान महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर आहे. पंढरपूरजवळचे मंगळवेढे महात्मा बसवेश्वर यांचे कार्यक्षेत्र होते. पंढरपूरचे पुरातन नाव पंडरगे हे पूर्णपणे कन्नड आहे. विठ्ठलाचे बहुतेक हक्कदार, सेवेकरी कर्नाटकीय आहेत. त्यांचे मूळचे कुळदेव कर्नाटकातले आहेत. याशिवाय यासंदर्भातील अनेक लहान सहान गोष्टी विठ्ठलाच्या कानडी रूपाला अधोरेखित करतात, असा निष्कर्ष श्री. ढेरे यांनी त्यांच्या संशोधनातून काढला आहे. तथापि हे मात्र खरे की, संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, सावता माळी, गोरा कुंभार, चोखामेळा इ.मराठी संतांनी पंढरपूरचा महिमा वाढविला व गाजविला. महाराष्ट्रातील वारकरी आणि कर्नाटकातील हरिदास येथे सारख्याच भक्तिभावाने येतात. त्यामुळे प्रादेशिक संस्कृतीचा समन्वय आणि मराठी-कानडी सामंजस्याचा दुवा साधला जातो. पांडूरंग पांडूरंग पांडूरंग विठ्ठल विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरी विठ्ठल नमस्कार शुभ प्रभात 🌅 👣 👏 शुभ शनिवार जय जय रघुवीर समर्थ नमस्कार 🙏

+77 प्रतिक्रिया 16 कॉमेंट्स • 4 शेयर

"सतरावे शतक म्हणजे महाराष्टÑातील पुण्यपूर्वच म्हणावे लागते.  शिवाजीराजाने भगवा फडकावून स्वराज्याचे तोरण बांधले.  अनेक शतकाच्या पारतंत्र्याच्या बेड्या तोडल्या आणि अध्यात्माच्या क्षेत्रातही दोन उत्तुंग महात्मे याच शतकात जन्मले व सामान्यांच्या उद्धाराचा मार्ग त्यांनी सोपा केला.  यात जगद्गुरू तुकाराम महाराज व समर्थ रामदास हे होत.  आज फाल्गुन व।। द्वितीया म्हणजेच तुकाराम बीज.  महाराजांच्या वैकुंठगमनाचा पर्वकाळ.  म्हणून त्यांचे पुण्यस्मरण. तुकाराम महाराजांचा जन्म देहू गावी झाला.  बोल्होबा व कनकाईच्या पोटी तीन पुत्र होते.  सावजी, तुकाराम व कान्होबा.  घरी शेती, सावकारकी, महाजनकी.  त्यामुळे घर अगदी संपन्न होते.  पण माता-पितरांच्या मृत्यूनंतर व १६२८ व २९ साली दुष्काळ नंतर अतिवृष्टी. त्यामुळे शेती अर्थातच तोट्यात.  घरी असणारा व्यापारही तोट्यात.  त्यात सावजी तीर्थयात्रेला निघून गेला.  घराची सर्व जबाबदारी तुकारामावर आली, मन सैरभैर झाले. त्या काळी सामान्य समाजाची, बहुजनाची स्थिती अतिशय दयनीय होती.  वर्णवाद तर पराकोटीचा, म्हणूनच क्षत्रिय असूनसुद्धा तुकाराम महाराज स्वत:ला शूद्र म्हणवून घेतात.  कारण ब्राह्मणवर्ग त्यांना शूद्रच मानीत होता म्हणून अभंग करणे, गाणे, कीर्तन करणे या महाराजांच्या कृतीला त्यांच्याकडून विरोध होता व म्हणूनच त्यांचा छळ केला जात होता.  भक्ती, कीर्तन, भजन-पूजन ही फक्त ब्राह्मणांची मक्तेदारी होती. अशा अंधारयुगात तुकाराम महाराजांनी - ‘‘बुडती हे जन, न देखवे डोळा म्हणूनी कळवळा, येत असे’’ हे ध्यानी घेऊन अतिशय सोप्या भाषेत, व्यवहारातील उदाहरणांनी जनप्रबोधन केले.  भाषा अतिशय फटकळ पण मर्माघाती.  बोध साधा पण भवतारक म्हणूनच आज साडेतीनशे वर्षांनंतरही ‘‘ज्ञानोबा-तुकाराम’’ हा गजर कानी येतो.  ज्ञानेश्वरी, गाथा व भागवत ही वारकºयांची प्रस्थानत्रयी आहे.  हजारो वारकºयांना गाथेतील अभंग मुखोद्गत आहेत.  एवढे अमोल संचित आम्हाला तुकाराम महाराजांनी ठेवले आहे.  म्हणूनच ही कृतज्ञता. सुमारे चार हजार अभंगातून महाराजांनी अध्यात्म, भक्ती याचा मार्ग तर दाखवलाच आहे.  पण रोजच्या व्यवहारातील अनेक गोष्टी  सांगून ‘‘शहाणे करून’’ सोडण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. ।। वाघे उपदेशिला कोल्हा,  सुखे खाऊ द्यावे मला ।। ।। तुका म्हणे ऐशा नरा, मोजू माराव्या पैजारा ।। ।। नवसे कन्यापुत्र होती, मग का कारणे लागे पती।। ।। धिक जिणे तो बाईले अधिन, परलोक मान नाही दोघा ।। ।। तुका म्हणे शुद्ध नाही जो आपण, तया त्रिभुवन अवघे खोटे ।। ।। वेचुनिया धन उत्तम वेव्हारे, उदास विचारे वेचकरी ।। असा सोपा पण अतिशय परखड भाषेत उपदेश केला आहे.  तो आजही आम्हाला मार्गदर्शक व लाभदायक आहे.  म्हणूनच हे त्यांचे पुण्यस्मरण.  तुकोबांना सर्व मराठीजनांचे लाख-लाख प्रणाम!" - तुका झालासे कळस...! जय श्री गुरुदेव जय श्री संत तुकाराम महाराज 👑 नमस्कार शुभ प्रभात 🌅 👣 👏 शुभ एकादशी शुभ सोमवार ॐ नमः शिवाय जय श्री भोलेनाथ जय श्री हरी विठ्ठल नमस्कार 🙏

+16 प्रतिक्रिया 6 कॉमेंट्स • 0 शेयर

पंढरपुरातील हे तुळशीवृंदावन राज्यात पर्यटन स्थळ म्हणून उदयास आले पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेले भाविक तुळशीवृंदावनास भेट देतातवनविभागाकडून तुळशीवृंदावन पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांकडून नाममात्र फी घेण्यात येणार पंढरपूर : श्री यंत्राच्या आकारामध्ये साकारण्यात आलेले तुळशीवृंदावन पर्यटनाचे केंद्र बनले आहे. मात्र तुळशीवृंदावनाच्या देखभालीसाठी येणाऱ्या लाखो रुपयांच्या खर्चाचा बोजा वनविभागावर पडत आहे. त्यामुळे आता प्रवेश शुल्क म्हणून प्रौढासाठी ५ तर बालकांसाठी ३ रुपये दर आकारण्याचे विचाराधिन असल्याचे वनविभागाच्या वतीने कळविण्यात आले. या तुळशीवृंदावनात श्री विठ्ठलाची २५ फूट उंचीची मूर्ती, विविध संतांच्या मूर्ती असलेल्या ८ संतकुटी तयार करण्यात आल्या आहेत. वारकरी संप्रदायातील २३ संतांच्या जीवनावर आधारित आकर्षक भित्तीचित्रे साकरण्यात आली आहेत. विविध आठ प्रकारच्या तुळशी व विविध रंगीबेरंगी आकर्षक फुलांची झाडे लावण्यात आली आहेत. यामुळे पंढरपुरातील हे तुळशीवृंदावन राज्यात पर्यटन स्थळ म्हणून उदयास आले आहे. पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेले भाविक तुळशीवृंदावनास भेट देतात. त्याचबरोबर शहरातील नागरिक देखील रोज या ठिंकाणी येतात. यामुळे रोज हजारोंची गर्दी त्याठिकाणी जमते. त्या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी उद्यानामध्ये ३० ते ३२ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येत आहेत. तुळशीवृंदावनाच्या देखभालीसाठी १२ कमांडो, २ माळी, १ स्विपर, २ स्वच्छता कामगार, १ इलेक्ट्रिशियन असे कामगार कार्यरत आहेत़ शिवाय तुळशीवनाचे महिन्याचे विजेचे बिल अंदाजे ४० हजार रुपयांच्या आसपास येते. त्याचबरोबर कर्मचाºयांचा पगार असा लाखो रुपयांचा बोजा वनविभागावर पडत आहे. यामुळे वनविभागाकडून तुळशीवृंदावन पाहण्यासाठी येणाºया पर्यटकांकडून नाममात्र फी घेण्यात येणार आहे. पर्यटकांसाठी सेल्फी पॉइंट - श्री विठ्ठलाची २५ फूट उंच मूर्ती तुळशीवनात आहे़ रंगीबेरंगी विद्युत रोषणाईतील कारंजेदेखील तुळशीवनाचे आकर्षण ठरत आहेत. त्याठिकाणी गेलेला प्रत्येक जण श्री विठ्ठलाची मूर्ती व कारंजासमोर सेल्फी काढताना पाहावयास मिळत आहे. त्यामुळे पर्यटकांसाठी हे सेल्फी पॉइंट ठरत असल्याचे दिसून येते. पिण्याच्या पाण्याची सोय करा - तुळशीवृंदावन पाहण्यासाठी रोज हजारो नागरिक व भाविक त्याठिकाणी येतात. मात्र त्याठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय नाही. यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पैसे मोजावे लागतात. पिण्याच्या पाण्याची सोय करावी, अशी मागणी काँग्रेस युवकचे संजय घोडके यांनी केली. नाममात्र प्रवेश शुल्क - तुळशीवृंदावन पाहण्यासाठी येणाºया १५ वर्षांपुढील व्यक्तींना ५ रुपये तर १५ वर्षांखाली व्यक्तींना ३ रुपये असे नाममात्र फी आकारण्यात येणार आहे. तुळशीवृंदावन सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत व. सायंकाळी ५ ते ९ वाजेपर्यंतच्या वेळेत सुरु राहणार असल्याचे उपवनसंरक्षक विलास पोवळे यांनी सांगितले. भाव-भक्तिगीतांची धून - तुळशीवनात सुंदर कारंजे साकारण्यात आलेले आहेत तसेच याठिकाणी उत्कृष्ट साऊंड सिस्टीमदेखील बसवण्यात आली आहे. यामुळे तुळशीवन परिसरात विठोबाची व संतांची गीते ऐकण्यास मिळत आहेत. भाव व भक्तिगीतांमुळे या ठिकाणी आलेल्या प्रत्येक नागरिकाचे व भाविकाचे मन प्रफुल्लित होत असल्याचे अ‍ॅड. अखिलेश वेळापूर यांनी सांगितले." - पंढरपुरातील सुंदर तुळशीवृंदावन पाहायचंय..? मोठ्यांसाठी पाच तर बालकांसाठी तीन रूपये जय श्री कृष्ण जय श्री राधे राधे जय श्री हरी विठ्ठल नमस्कार शुभ प्रभात 🌅 👣 👏 शुभ शनिवार जय जय रघुवीर समर्थ नमस्कार 🙏

+45 प्रतिक्रिया 8 कॉमेंट्स • 3 शेयर