[1/22, 6:49 PM] Sangale Samadhan: ************[9] गोरक्षनाथाची गुरुभक्ती [भा.३रा] ************ ***************।। नवनाथ भक्ती कथासार ।।*************** "वडे पाहिजेत ना ! तुझा एक डोळा काढून दे !" असे विप्रस्त्रीचे शब्द कानी पडताच क्षणाचाही विलंब न करता गोरक्षाने आपल्या एका डोळ्यात बाजूने बोटे खुपसून जोराने डोळा उपटून काढला आणि म्हणाला, "माई ! हा घ्या डोळा. आता वडे द्या. "धन्य तो माझा डोळा जो गुरुंच्या कारणी लागला. असे म्हणून तो वडे घेऊन तात्काळ धावतच गुरु मच्छिंद्राजवळ आला. _/\_ नवनाथांच्या अद़्भूत नवलकथा _/\_ ***************************************************** ************[9] गोरक्षनाथाची गुरुभक्ती [भा.३रा] ************ ***************।। नवनाथ भक्ती कथासार ।।*************** मच्छिंद्रनाथांना भूक लागली तेव्हा गावात त्याला भिक्षा मागण्यास पाठविले. बारा तेरा वर्षाचा तापसी मुलगा झोळी घेऊन भिक्षेला निघाला. गोरक्ष अशा एका विप्राच्या घरी गेला की तेथे पितृश्राध्द झाले होते. अंगणात जाऊन गोरक्षाने "अलख निरंजन !" अशी हांक देऊन भिक्षा मागितली. त्या घरातील विप्रस्त्रीने, बाहेर एक बारा वर्षाचा सोज्ज्वळ, विनम्र बालक तपस्वी भिक्षा मागतो असे पाहून, भक्तीभावानेने त्याला कोणीतरी योगी समजून त्याला सर्व प्रकारचे अन्न भिक्षा म्हणून घातले. षड्रसाने युक्त अशी अन्नाची भरपूर भिक्षा मिळाली ती पुरेशी वाटून गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांकडे गेला. दोघांनी ते अन्न त्या विप्रस्त्रीची स्तुती करीत, मोठ्या आनंदाने भक्षण केले व प्रत्येक पदार्थाचा आकार, रंगरुप व चव यांचे गुणवर्णन करीतकरीतच संपविले. अन्न संपवल्यावर वडे आणखी असते तर बरे झाले असते असा विचार मच्छिंद्रनाथाच्या मनात आला. त्यांनी गोरक्षाच्या तोंडाकडे सहेतुकपणे पाहिले. गोरक्षाने लगेच म्हणाला, "गुरुजी ! मनांत काय आहे, ते स्पष्ट सांगा." तेव्हा गुरु म्हणाले, "मनांत येते, वडे किती चांगले झाले आहेत. आणखी असते तर बरे झाले असते. तृप्ती झाली असती." एवढेच ना ? मी आणखी मागून आणतो." लगेच तो पुन्हा झोळी घेऊन तडक गावात गेला व त्याच विप्राच्या अंगणात गेला व पीन्हा भिक्षा मागू लागला. गोरक्ष म्हणाला, "माई ! माझ्या गुरुजींना वडे एवढे आवडलेत, की त्यांना आणखी खावेसे वाटले. म्हणून मी पुन्हा आलो. कृपा करुन मला आणखी वडे द्या. मी गुरुसेवा करीन." ती विप्रस्री म्हणाली, "गुरुचे नाव आणि आपलेच पोट. अरे मुला, असा लोभीपणा बरा नव्हे. एकदा अगदी भरपूर भिक्षा घातली, ती आतिथ्याची. आता आणखी पाहिजे असेल तर त्यासाठी किंमत मोजावी लागेल. एवढी गुरुभक्ति म्हणतोस तर गुरुसाठी, मी मागेन ते दे, मग देईन वडे. फुकट नाही मिळायचे." गोरक्षनाथ चकित झाला, पण मुळीच न डगमगता म्हणाला, "काय हवे ते मागा माई. गुरुसाठी मी काहीही देण्यास तयार आहे." तेव्हा त्याची परीक्षा पहावी म्हणून ती म्हणाली, "तुझा एक डोळा काढून दे." आला मोठा गुरुभक्त ! गोरक्षाने तिचे शब्द कानी पडताच आपल्या एका डोळ्यात बाजूने बोटे खूपसून जोराने डोळा उपटून काढला. रक्त भळभळा वाहू लागले. तरी सर्व वेदना सहन करीत तो म्हणाला, "माई ! हा घ्या माझा डोळा. आता वडे द्या. माझा एक डोळा गुरुंच्या कारणी लागला, तो धन्य !" त्याचे हे घोर कृत्य पाहून ती विप्रस्त्री फारच भयभीत झाली.आपणा बोललो काय आणि होऊन बसले काय याचा तिने धसका घेतला. तिला अत्यंत पश्चाताप झाला. रडत रडत त्या स्त्रीने आणखी वडे आणून त्याच्या झोळीत टाकले. तेव्हा ती म्हणाली, "तुझा डोळा मला नको. तू मजवर कोप करु नकोस. डोळापण घेऊन जा. हे वडेपण घेवून जा." एका हातात आपला काढलेला डोळा घेऊन व दुसऱ्या हातात वडे घेऊन गोरक्ष तात्काळ धावत धावत मच्छिंद्रनाथांजवळ आला व म्हणाला, "गुरुमहाराज ! हे घ्या वडे " असे म्हणून त्याने ते वडे पर्णपात्रात वाढले. मच्छिंद्रनाथ पहातच राहिले. गोरक्षाने एक डोळा झाकलेला होता. अंगावरल्या वस्त्राचीच त्यावर पट्टी बांधलेली होती मच्छिंद्रनाथ म्हणाले, "एक डोळा कां झाकला आहेस ?" गोरक्ष म्हणाला, "काही नाही, डोळ्याला जरा ठणका लागला आहे. लाल झाला आहे. तुम्ही काही काळजी करु नका. मी वडे पुन्हा आणले आहेत, ते कृपया सेवन करावे." असे बोलून तो दुसरीकडे तोंड वळवून दूर जाऊ लागला. तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाले, "तुझा डोळा दाखव. नाहीतर मी वडे खाणार नाही." काय करणार गोरक्ष ! त्याने हात काढला व पट्टी सोडली. आत रक्ताळलेली नुसती खोबण होती. "हाय रे बाळा ! हे काय झाले ? असे कसे झाले ? असे म्हणत मच्छिंद्रनाथाने शिष्याला पोटाशी धरले. गोरक्षाने सर्व घडलेला वृतांत कथन करताच मच्छिंद्रनाथांचे मन द्रवले. आपल्या शिष्याची अलौकिक गुरुभक्ती पाहून त्यांचे अंतःकरण भरुन आले. ते म्हणाले, "गोरक्षा ! तूं धन्य आहेस. ते बुबुळ कुठे आहे ? गोरक्षाने एका मुठीत बुबुळ ठेवले होते ती मूठ उघडून दाखविली. मच्छिंद्रनाथांनी ते बुबु हातात घेऊन खोबणीत बसवून संजीवनी मंत्र म्हणून तो डोळा पुन्हा जशाच्या तसा चांगला केला. गोरक्षाने आपल्या गुरुच्या पायांवर लोटांगण घालून आनंदाने तो रडू लागला. त्याला उठवून मच्छिंद्रांनी त्याला आलिंगन दिले. त्याला आपल्या मांडीवर बसवून प्रेमाने त्याला वडे भरविले व आपण स्वतःही घेतले. ---- बोला, अलख निरंजन ! ---- [1/22, 6:57 PM] Sangale Samadhan: *श्री समर्थ रामदास स्वामी* *महानिर्वाणदिन(२२ जानेवारी,१६८२)* सूर्याजीपंतांना शके १५३० - चैत्र शुक्ल ९ - रामनवमी (इसवीसन १६०८) या शुभमुहूर्तावर दुसरा पुत्र झाला. त्याचे नांव नारायण ठेवले. हे नारायण सूर्याजीपंत ठोसर म्हणजेच श्री समर्थ रामदास स्वामी. वयाच्या पाचव्या वर्षी नारायणाची मुंज झाली. बुद्धी तीव्र असल्यामुळे त्याचे प्राथमिक अध्ययन संस्कृतासह लवकर झाले. अध्ययनाबरोबरच सूर्यनमस्कार मल्लविद्या यांचा अभ्यास करून नारायणाने अचाट शरीरसामर्थ्य मिळविले.सर्वकाळ सवंगड्यांबरोबर नारायणाचे हिंडणे राणूबाईंना आवडत नसे. एकदा त्या रागावून नारायणाला म्हणाल्या, "नारोबा, पुरुषांना काहीतरी संसाराची काळजी पाहिजे." हे शब्द ऐकून सर्वांच्या नकळत नारायण आसनात बसून चिंतनात मग्न झाला. सगळीकडे शोधाशोध झाली. राणूबाईंना फार काळजी वाटली. काही कामानिमित्त राणूबाई त्या खोलीत गेल्या, तेव्हा नारायणाचा पाय लागून दचकल्या. नारायण आहे असे समजतांच त्या म्हणाल्या, "नारोबा, येथे अंधारात काय करतोस ?" त्यावर नारायणाने उत्तर दिले, "आई, चिंता करीतो विश्वाची" वयाची १२ वर्षे पूर्ण होतांना नारायणाला एका श्रीरामावाचून अन्य कोणी जिवलग उरले नव्हते. नाशिक पंचवटीतील श्रीराम मंदिरात नारायणाने प्रवेश केला तेव्हा रामनवमीचा उत्सव सुरु होता. मंदिरात मानसपूजा व प्रार्थना केली. सामर्थ्य मिळवल्याशिवाय समाजोद्धाराचे कार्य तडीस नेणे अशक्य आहे हे जाणून खडतर तप:श्चर्येचा संकल्प केला आणि रामाची आज्ञा घेऊन आपल्या तप:श्चर्येस योग्य असे स्थान निवडले. नाशिकपासून जवळच पूर्वेस टाकळी हे गांव आहे. तेथे गोदावरी व नंदिनी या दोन नद्यांचा संगम आहे. तप:श्चर्येस हे स्थान अनुकूल आहे असे पाहून तेथेच एका गुहेत नारायणाने वास्तव्य केले. श्रीराम जयराम जयजय राम या त्रयोदशाक्षरी मंत्राचा जप करणे. दुपारी पंचवटीत जाऊन माधुकरी मागून टाकळी येथे येऊन भोजन करणे. थोडा वेळ विश्रांती घेऊन ग्रंथावलोकन करणे. नंतर पंचवटीत कीर्तन व पुराणश्रवणास जाणे. संध्याकाळी टाकळीत येऊन आन्हिक आटोपून विश्रांती घेणे. एकच वेळ भोजन व उरला वेळ अनेक ग्रंथांचे अध्ययन आणि वाल्मिकी रामायणाचे लेखन व नामस्मरण याप्रमाणे अव्याहत १२ वर्षे नेम चालू होता. इतक्या लहान वयात अशी खडतर तप:श्चर्या करीत असताना तत्कालीन समाजाकडून त्याला बराच त्रास सहन करावा लागला. यातूनच "अनुदिनी अनुतापे तापलो रामराया" अशी करुणाष्टके प्रगटली. ऐन तारुण्याचा काळ, त्यात १२ वर्षाच्या तप:श्चर्येने बाणलेल्या प्रखर ज्ञान वैराग्याचे तेज, सूर्योपासनेने सुदृढ झालेली देहयष्टी आणि अनन्य भक्तिने अंत:करणात वसलेली कृपादृष्टी असे हे समर्थांचे व्यक्तिमत्व पाहून अनेक जण प्रभावित झाले. त्यापैकी काही निवडक लोकांना अनुग्रह देऊन उपासनेस लावले. श्री समर्थ रामदास स्वामींनी महाराष्ट्रातील कृष्णाकाठ आपल्या कार्यास निवडला कारण इतर स्थळांपेक्षा येथे शांतता होती. कार्यास सुरुवात करताना परिस्थितीचा आढावा घेणे, चांगले कार्यकर्ते शोधणे, कोणते कार्य कोणाकडून व कोठे करायचे, कसे करायचे याचा आराखडा तयार करणे व ते अंमलात आणणे याचा पूर्ण विचार करून समर्थ प्रथम महाबळेश्वर येथे आले. तेथे चार महिने राहिले. तेथे मारुतीची स्थापना करून दिवाकर भट व अनंत भट यांना अनुग्रह दिला. नंतर समर्थ दासबोध लिखाणास शिवथरघळ येथे गेले. १६७६ साली समर्थ सज्जनगड येथे कायमस्वरुपी वास्तव्यास आले. शिवाजी महाराजांनी समर्थांसाठी मठ बांधून दिला व हवालदार जिजोजी काटकर यांस उत्तम व्यवस्था ठेवण्यास सांगितले. प्रतापगड येथील बालेकिल्ल्याच्या दाराजवळ मारुतीची स्थापना केली. हा समर्थ स्थापित शेवटचा मारुती. त्यावेळी दासबोधाचा विसावा दशक पूर्ण केला. माघ वद्य पंचमी १६८२ या दिवशी चंदावरहून व्यंकोजीराजांनी पाठविलेल्या राममूर्ती सज्जनगडावर आल्या. समर्थांनी त्यांची स्वहस्ते पूजा केली. समर्थांनी शेवटची निरवानिरव करण्यास सुरुवात केली. समर्थांचा अंतकाळ जवळ आला असे जाणून शिष्य व्याकुळ झाले. आम्ही यापुढे काय व कसे करावे असे त्यांनी विचारले असता समर्थ म्हणाले - माझी काया आणि वाणी । गेली म्हणाल अंत:करणी । परी मी आहे जगज्जीवनी । निरंतर ॥आत्माराम दासबोध । माझे स्वरुप स्वत:सिद्ध । असता न करावा हो खेद । भक्त जनीं ॥ माघ कृष्ण ९ , शके १६०३, (२२ जानेवारी, १६८२ ) वार शनिवार दुपारी दोन प्रहरी सज्जनगडावर रामनामाचा घोष करून समर्थ रामरुपात विलीन झाले. त्यानंतर अक्कास्वामी व दिवाकर गोसावी यांनी सज्जनगड व चाफळ मठाचा कारभार अनेक वर्षे सांभाळला. समर्थानी दासबोध आत्माराम ग्रंथ, मनाचे श्र्लोक (मनोबोध), करुणाष्टके, सवाया, अभंग, पदे-चौपदी,काही स्‍फूटरचना, भीमरूपी- मारुतीस्तोत्र, अनेक आरत्या रचल्या शेवट करताना एवढेच म्हणावेसे वाटते समर्थाचिया सेवका वक्र पाहे। असा सर्व भूमंडळीं कोण आहे।। जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही। नुपेक्षी कदा रामदासाभिमानी।। जय जय रघुवीर समर्थ. संकलन : प्रसाद जोग.सांगली. ९४२२०४११५० संदर्भ :श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांची वेबसाईट [1/22, 7:07 PM] Sangale Samadhan: दिनांक: २२ /०१ /२०२१ *२७५. अभंग क्र. २३०६* *हें चि दान देगा देवा ।* *तुझा विसर न व्हावा ।।१।।* *गुण गाईन आवडी ।* *हे चि माझी सर्व जोडी ।।धृ।।* *न लगे मुक्ती आणि संपदा ।* *संतसंग देई सदा ।।३।।* *तुका म्हणे गर्भवासीं ।* *सुखें घालावें आम्हासी ।।३।।* मला तुझा कधी विसर पडू नये हेच दान देवा मला दे. मी आवडीने तुझे गुण गाईन, मला जे काही कमवामचं, मिळवायचं ते फक्त हेच मिळवायचं, कमवायचं आहे. मला मुक्ती नको, धनसंपदा नको, मला फक्त संतांचा सहवास नेहेमी दे. तुकाराम महाराज म्हणतात, "मला पुन्हा सुखाने गर्भवासी घाल." या अभंगातून तुकाराम महाराज विठ्ठलाकडे अशी मागणी करत आहेत की मला तुझा विसर पडणार नाही इतकंच वरदान दे. आपण अनेक पुराणकथा ऐकलेल्या, वाचलेल्या असतात. त्यात कोणी देवाकडे अढळपद मागतो. कोणी चिरंजिवित्वाचा वर मागतो. कोणी स्वर्ग मागतो तर कोणी धनसंपदा मागतो. कोणी पोटी पुत्र यावा अशी मागणी करतो, तर कोणी राज्यलक्ष्मी मागतो. कोणाला विद्या हवी तर कोणाला अमरत्व हवं. पण तुकाराम महाराज म्हणतात, "मला तुझा विसर पडू नये, इतकंच वरदान दे." दुसऱ्या एका अभंगातूनही जगद्गुरू तुकाराम महाराज हाच भाव व्यक्त करतात. ते म्हणतात, *"समचरण दृष्टी विटेवरी साजिरे । तेथें माझी हरी वृत्ती राहो ।। आणीक न लगे मायिक पदार्थ । तेथे माझें आर्त नको देवा ।। ब्रह्मादिक पदें दु:खाची शिराणी । तेथें दुश्चित झणी जडों देसी ।। तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म । जे जे कर्मधर्म नाशिवंत ।।"* माझी दृष्टी तुझ्या चरणावरुन हलू नये. कोणत्याही प्रकारच्या मायिक पदार्थांची आस माझ्या मनात निर्माण होऊ नये. ब्रम्हादिक पदं म्हणजे स्वर्गीचं इंद्रपद वगैरे अंतिमत: दु:खच देतात. जगद्गुरू तुकाराम महाराजांनी दुसऱ्या अभंगात म्हटलं आहे की मला स्वर्ग नको, कारण पुण्य संपलं की स्वर्गातून बाहेर काढून टाकलं जातं. मला अढळ पद नको, कारण ध्रुवाला अढळपद मिळालं तरी तो तिथून इकडेच पहात राहतो. मला मुक्ती नको कारण मुक्ती मिळाल्यास भक्तीच्या अवीट सुखाला मुकावं लागतं. त्यापेक्षा मला पुन्हा पुन्हा जन्म दे आणि प्रत्येक जन्मात मला भक्तीच्या अवीट सुखाची गोडी चाखू दे. तिसऱ्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात, *" न लगे मुक्ती आणि संपदा ।"* मला धनसंपदा नको. सर्व सुखं ही धनाच्या आधीन असतात अशा अर्थाचा एक संस्कृत श्लोक आहे. धन असेल तरच सर्व नाती असतात. निर्धन व्यक्ती तिचे आईबाप बहिणभाऊ इतकंच काय पण बायकापोरंही मान देत नाहीत. असं असताना जगद्गुरू तुकाराम महाराज विठ्ठलाकडे धन मागत नाहीत. राज्य मागत नाहीत, स्वर्ग मागत नाहीत. मोक्ष मागत नाहीत वा मुक्तीही मागत नाहीत. तर फक्त मला तुझा विसर पडू देऊ नको इतकंच मागतात. हे खरं वैराग्य आहे. हा खरा निर्लोभीपणा आहे. देव या शब्दाचा एक अर्थ प्रकाश असाही होतो. जिथे प्रकाश आहे तिथे अंधार नसतो. अंधारात घाण बुजबुजते. तिथं विषाणू निर्माण होतात. अंधाराचा संबंध अज्ञानाशीही असतो. तसा इंद्रादी देवाच्या क्रिया पाहिल्या तर त्यात भोगविलास, स्वार्थ, दंभ, कुटीलता, वासनांधता यासारख्या मानवी दुर्गुणांशिवाय दुसरं काही दिसत नाही. पण उदात्त अर्थाने देव या संकल्पनेची सांगड सत्, मंगल, पवित्र आचार, विचाराशी घातली जाते. मला तुझा विसर पडू देऊ नकोस असं तुकाराम महाराज सांगतात तेंव्हा त्यांना हेच सांगायचं असतं की मला या चांगल्या गोष्टींचा विसर पडू देऊ नको. मला काम, क्रोध, लोभ, दंभ, मद,मत्सरादी विकारांपासून मुक्त ठेव. मला मायिक, नाशवंत, अशाश्वत गोष्टींचा मोह होऊ देऊ नको. पण मला सतत संतांचा सहवास दे. संतांच्या संगतीत राहू दे. तुकाराम महाराजांना अभिप्रेत संत कोणते तेही समजून घेतले पाहिजे. आजकालच्या पोशाखी संतांसारखे संत तुकाराम महाराजांना मान्य नाहीत. भगवे कपडे घालून, अंगाला राख फासून दारुगांजा पिणारे, वैराग्याचं सोंग आणून करोडोंचे मठ हजारो एकर जमिनी, आपल्यासारख्याच ढोंगी शिष्यांचं लटांबर भोवताली गोळा करुन, ऐष करणारे, पंचतारांकित आश्रमात राहून आपल्याच शिष्यिणींची अनैतिक संबंध ठेवणारे, त्यांच्यावर बलात्कार करणारे, भक्तांना ठगवणारे, गुप्तधनासाठी लहान बालकांचे बळी देणारे, दुष्काळात रंगपंचमी खेळणारे संत जगद्गुरू तुकाराम महाराजांना अभिप्रेत नाहीत. तर खरे संत, जे मायबापाप्रमाणे समाजाच्या हितासाठी आयुष्यभर, अव्याहतपणे कार्यरत असतात. ज्यांचा वरपांगी वेश नाही तर स्वभाव, विचार आमि आचरण संतांसारखं असतं. जे सामान्य, अज्ञ जनांना देवाधर्माच्या नावाखाली लुटत नाहीत, फसवत नाहीत, भ्रमीत करत नाहीत असे संत तुकाराम महाराजांना अभिप्रेत आहेत. ते संत समाजाची अज्ञानातून सुटका करतात. अंधश्रद्धेपासून समाजाला मुक्त करतात. स्वतः नैतिक आचरण करतात आणि समाजालाही नैतिकतेचे धडे देतात. नीतिमार्ग दाखवतात. त्यांचा जन्मच मुळी जगाचं कल्याण करण्यासाठी झालेला असतो. जगद्गुरू तुकाराम महाराज संतांचं वर्णन करताना म्हणतात, *"जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती । देह कष्टविती परउपकारे ।। भूतांची दया हे चि भांडवल संता । आपुली ममता नाही देही ।। तुका म्हणे सुख पराविया सुखें । अमृत हें मुखें श्रवतसे ।।"* भक्तांना लुटून गब्बर होणारे संत तुकाराम महाराजांना अभिप्रेत नाहीत. लबाड, ढोंगी, अप्रामाणिक, स्वार्थी, वैराग्याचं सोंग घेऊन सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठेवर डोळा ठेवणारे, संन्याशी म्हणवून सांसारिक सुखोपभोगात डुंबणारे साधु तुकाराम महाराजांना अभिप्रेत नाहीत. देवाधर्माच्या नावावर समाजात हिंसा आणि द्वेष फैलावणारे योगी तुकाराम महाराजांना अभिप्रेत नाहीत. ब्रह्मचारी म्हणवून विषयसुखाने लडबडलेले वासनांध तुकाराम महाराजांना अभिप्रेत नाहीत. तर जगाच्या कल्याणासाठी, परोपकारासाठी आपला देह चंदनाप्रमाणे झिजवणारे, जे दुसऱ्याच्या सुखाने सुखी होतात आणि दुसऱ्याच्या दु:खाने दु:खी होतात असे सह्रदयी, संवेदनशील , ज्ञानी, सत्चरित्र संत तुकाराम महाराजांना अभिप्रेत आहेत. अशा सत्शील संतांच्या सहवासासाठी जगद्गुरू तुकाराम महाराज आतुर आहेत. जगात सर्वत्र लबाड आणि ढोंगी भरलेले असताना जर त्यांच्यात एखादा विरळा असा खरा संत, सज्जन जर कोणी भेटला तर तुकाराम महाराज त्याच्या चरणी लोटांगण घालायला तयार आहेत. *"विरळा ऐसा कोणी । तुका त्याच्या लोटांगणी ।।"* असं तुकाराम महाराज सांगतात. इयकंच काय तर असा संत जर कोणी भेटला तर मी त्याचा दास व्हायला तयार आहे. मी त्याचं अंगण झाडायला तयार आहे. मी त्याचं उच्छिष्ट खाऊन त्याची सेवा करायला तयार आहे असंही तुकाराम महाराज सांगतात. *"अंगे झाडीन अंगण । त्याचे दास्यत्व करीन ।।"* दुष्टांचं, मुर्खांचं, दुर्जनांचं नेतृत्व करण्यापेक्षा सज्जनांचं, संतांचं, भल्या माणसांचं दास्यत्व करणं शतपटीने चांगलं असाच विचार यामागे दिसून येतो. शेवटच्या चरणात जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात, *"तुका म्हणे गर्भवासी । सुखे घालावें आम्हासी ।।"* तुकाराम महाराज असं का म्हणतात ? हे आपण समजून घ्यायला हवं. ज्याला आता हिंदू धर्म म्हटलं जातं, ज्याला पूर्वी वैदिक धर्म, सनातन धर्म वा ब्राह्मणी धर्म असं म्हटलं जाई त्या धार्मिक परंपरेत एक शोषकांची परंपरा जुनी, सनातन परंपरा आहे. दुष्ट सनातनी विचार आहे. या विचाराच्या लोकांनी आत्मा, ब्रह्म, परब्रह्म, मोक्ष, मुक्ती , पुनर्जन्म, पूर्वजन्म, कर्मविपाकाचा सिद्धांत, प्रारब्ध, कर्म, कर्मफल स्वर्ग-नरक अशी काय काय भारुडं रचून सामान्य जनांना भ्रमीत केलं. स्वर्ग आणि मुक्तीचं गाजर दाखवून तसंच नरक आणि चौऱ्यांशीच्या फेरा यांची भीती दाखवून सामान्य लोकांना शेकडो वर्षे फसवण्याचं आणि लुटण्याचं काम या सनातनी परंपरेने केलं. जगद्गुरू तुकाराम महाराज आम्हा सुखें गर्भवासी घाला म्हणतात त्याचं इंगित जर कळलं तरच या अभंगाचा अर्थ आणि त्याचं क्रांतिकारकत्व समजू शकतं. हे शोषक असं सांगत होते की हे जग माया आहे. जे जे दिसतं तो भ्रम आहे. जे दिसत नाही, ज्याचा जिवंतपणी कधी अनुभव घेता येत नाही, ज्याचा काही पुरावा मिळत नाही ते सत्य आहे. अमिबासारख्या सूक्ष्मातिसूक्ष्म जीवांपासून हत्ती, देवमासा यासारख्या अजस्त्र प्राण्यांच्या चौऱ्यांशी लक्ष योनी आहेत. या चौऱ्यांशी लक्ष योनीत प्रत्येक जीवाला जन्म घ्यावा लागतो. असं एक एक जन्म घेत चौऱ्यांशी लक्ष योनी पार केल्या की मग हा नरदेह मिळतो. म्हणून तो फार महत्त्वाचा आहे. या जन्मात तुम्ही ऐहिकाच्या नादी लागू नका. ऐहिक सुखोपभोगात गुरफटू नका. पुण्य कमवा. म्हणजे तुम्हाला मोक्ष मिळेल. मुक्ती मिळेल. तुमचा जन्ममरणाचा फेरा चुकेल. चौऱ्यांशी लक्ष जन्माचे भोग चुकतील. पण जर मुक्ती मिळाली नाही तर तुमचं काही खरं नाही. मग 'पुनरपि जनन, पुनरपि मरणम्' चुकणार नाही. तुम्ही शेणातले कीडे म्हणून जन्म घ्याल आणि आयुष्यभर शेण खात रहाल. तुम्ही विष्ठेतल्या अळ्या व्हाल आणि आयुष्यभर विष्ठेतच डुबून रहाल. तुम्ही डुक्कर व्हाल आणि घाणीत लोळाल. कोल्हे, कुत्रे, लांडगे .. असे चौऱ्यांशी लक्ष जन्म तुम्हाला घ्यावे लागतील आणि दुसऱ्या फेरीतही मोक्ष मिळाला नाही तर असे फेरे एकामागे एक सुरुच राहतील. सामान्य माणूस सांसारिक दु:खाने इतका पिचलेला असतो की हे ऐकून त्याच्या मनात एकप्रकारची भीती बसते. एकदा तो भयभीत झाला, घाबरला की मग त्याला लुटण्याचा मार्ग मोकळा होतो. मग हे पुजारी सांगतील ते विधी, कर्मकांड, वर्तवैकल्यं करायला असे भित्रे लोक तयार होतात. तुकाराम महाराज या शोषणाच्या मुळाशीच घाव घालतात. हे लबाड लोक सांगतात की पुन्हापुन्हा जन्म घ्यायचा म्हणजे आईच्या गर्भात, मळमूत्राच्या संगतीत, विटाळात, त्या नरकात नऊ महिने रहावं लागतं आणि नको त्या वाटेने बाहेर यावं लागतं. पण तुकाराम महाराज म्हणतात, "आम्हा सुखे घालावे गर्भवासी" ! आम्ही आईच्या गर्भात सुखाने राहू. पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागला तरी त्यात आम्हाला आनंदच आहे. आम्ही जन्म घेऊ आणि विठ्ठलाची भक्ती करु. अवीट असा भक्तीरस प्राशन करु. *चौऱ्यांशीच्या फेऱ्याची भीती झुगारून जगद्गुरू तुकाराम महाराज एक शोषण व्यवस्थेच्या मुळावरच घाव घालतात. जनसामान्यांना या शोषणापासून मुक्तीचा मार्ग दाखवतात. जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या अभंगात असा क्रांतिकारी आशय ठासून भरलेला असल्यानेच त्यांचे अभंग नष्ट करण्याचे प्रयत्न वर्णवर्चस्ववादी ब्राह्मणांनी वारंवार केले. पण त्यांच्या या दुष्ट कारस्थानाला हे अभंग पुरुन उरले. जगद्गुरू तुकाराम महाराजांचे विचार समजून घेऊ आणि त्यानुसार आचरण ठेऊ तर आपलीही शोषणातून, मानसिक गुलामगिरीतून निश्चितच सुटका होईल यात शंका नाही.* *जय जगद्गुरू !* - उल्हास पाटील *गाथा परिवार* gathaparivar.org 9975641677 [1/22, 7:30 PM] Sangale Samadhan: मंत्र व त्यांचे वैज्ञानिक विश्लेषण.... आपण सर्व भाविकहि छोट्या मोठ्या समस्यांमुळे काही सेवा करत असतो. उपासना करत असतो. त्या अंतर्गत आपले सद्गुरु आपल्याला काही मंत्र पठण करवयास सांगतात. ते स्तोत्र, मंत्र, उतारे, तोडगे करत असताना मनात श्रद्धा भाव हा खुप महत्वाचा असतो. पण काही लोक त्याला अंधश्रद्धेचे नाव देऊन ढोंग ठरविण्याचा प्रयत्न करतात आणि आपण ही हळू हळू त्यांच्या बोलण्याने भुलु लागतो. पण आपण हे विसरतो की आपल्या ऋषि मुनी यांनी निर्मित केलेले हे सर्व स्तोत्र मन्त्र यांना केवळ आध्यात्मिक कारण नसून एक वैज्ञानिक पार्श्वभूमी ही असते.* *ती समजून घेतली तर आपल्या हजारो लाखो वर्षाचा इतिहास असलेल्या हिन्दू धर्माचा अभिमान तर वाटेलच, पण आपण करत असलेली सेवा ही लवकर फलद्रुप होईल व देवाला न मानणाऱ्या लोकांना सडतोड़ उत्तर देता येईल. त्याचसाठी आपण आज काहि मंत्राचे वैज्ञानिक विश्लेषण करणार आहोत. 🍁ऐक्य मंत्र :- ऐक्य मंत्राच्या पठणाने ओक्सिटोसिन नावाचे हार्मोन तयार होते. घरात समाजात मिळून मिसळून एकोप्याने राहण्याची भावना वाढीस लागते. 🍁 नवार्णव मंत्र :- मानवाच्या शरीरातील सर्व चक्रांना जागृत करते. नऊ अक्षरांचा या मध्ये समावेश आहे. मुलींनी बांगड्या घातल्याने त्यांच्या मनगटातील धमन्या व शिरा active होतात. रामरक्षा स्तोत्रातील 'र ' च्या उच्चाराने पित्ताशय, पित्त आणि आतड्यांचे काम balance होते. 🍁 गायत्री मंत्र :- गायत्री मंत्राच्या पठणाने इपोनोप्रिन्स (Epinopnrins) नावाचे हार्मोन तयार होते. रोग प्रतिकारक शक्तीची वाढ होते. 🍁 कालभैरावाष्टक :- कालभैरावाष्टक स्तोत्राच्या पठणाने विशिष्ट प्रकारचे vibrations तयार होते त्यामुळे आपले ३ इंच पर्यंत संरक्षण होते. *मुलांनी गंध टिळा लावल्याने भृकुटीमध्या वरील आज्ञाचक्र active होतात. 🍁 प्रज्ञाविवर्धन स्तोत्र :- याच्या पठणाने पिनियल gland ला धक्का बसून मेमरी चार्जेस ची निर्मिती होते. स्मृतीभ्रंश चे आजार होत नाहीत. 🍁 सरस्वती मंत्र , सुर्य मंत्र , गणपतीअथर्वशीर्ष :- मेंदू मध्ये cortex नावाचा भाग असतो त्यात Cortizone नावाचे हार्मोन तयार होते. त्यामुळे बुद्धीमत्तेत वाढ होते सदबुद्धी वाढते. 🍁 विद्याप्राप्तीकारक स्तोत्र :- या स्तोत्राच्या पठणाने DHA नावाचे हार्मोन तयार होते. बुद्धीचा योग्य वापर या हार्मोन मुळे होतो. 🍁 दत्त महाराजांचा मंत्र :- "द्रां " हा दत्त महाराजांचा बीजमंत्र आहे. त्याच्या उच्चारणाने (सेल टिश्यू फॉरमेशन ) cell tissue formation चे काम प्रॉपर होते (जखम भरून येण्याचे काम ). 🍁 शाबरीमंत्र* :- *Dopamine हार्मोनची निर्मिती होते. विशेष महत्वाचे म्हणजे या हार्मोनचा balance राखला जातो. जर हार्मोन वाढले तर व्यसन गुन्हेगारी व कमी झाले तर नैराश्य. *🍁🌹 ॐ शुभम भवतु 🌹🍁*

+1 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 0 शेयर
Anita Sharma Mar 4, 2021

. "गुरु अवज्ञा" एक बार की बात है, एक भक्त के दिल में आया कि गुरु महाराज जी को रात में देखना चाहिए कि क्या वो भी भजन सिमरन करते हैं ? वो रात को गुरु महाराज जी के कमरे की खिड़की के पास खड़ा हो गया। गुरु महाराज जी रात 9:30 तक भोजन और बाकी काम करके अपने कमरे में आ गये। वो भक्त देखता है कि गुरु महाराज जी एक पैर पर खड़े हो कर भजन सिमरन करने लग गये। वो कितनी देर तक देखता रहा और फिर थक कर खिड़की के बाहर ही सो गया। 3 घंटे बाद जब उसकी आँख खुली तो वो देखता है कि गुरु महाराज जी अभी भी एक पैर पर खड़े भजन सिमरन कर रहे हैं, फिर थोड़ी देर बाद गुरु महाराज जी भजन सिमरन से उठ कर थोड़ी देर कमरे में ही इधर उधर घूमें और फिर दोनों पैरो पर खड़े होकर भजन सिमरन करने लगे। वो भक्त देखता रहा और देखते-देखते उसकी आँख लग गई और वो सो गया। जब फिर उसकी आँख खुली तो 4 घंटे बीत चुके थे और अब गुरु महाराज जी बैठ कर भजन सिमरन कर रहे थे। थोड़ी देर में सुबह हो गई और गुरु महाराज जी उठ कर तैयार हुए और सुबह की सैर पर चले गये। वो भक्त भी गुरु महाराज जी के पीछे ही चल गया और रास्ते में गुरु महाराज जी को रोक कर हाथ जोड़ कर बोलता है कि गुरु महाराज जी मैं सारी रात आपको खिड़की से देख रहा था कि आप रात में कितना भजन सिमरन करते हो। गुरु महाराज जी हंस पड़े और बोले:- बेटा देख लिया तुमने फिर ? वो भक्त शर्मिंदा हुआ और बोला कि गुरु महाराज जी देख लिया पर मुझे एक बात समझ नहीं आई कि आप पहले एक पैर पर खड़े होकर भजन सिमरन करते रहे फिर दोनों पैरों पर और आखिर में बैठ कर जैसे कि भजन सिमरन करने को आप बोलते हो, ऐसा क्यूँ ? गुरु महाराज जी बोले बेटा एक पैर पर खड़े होकर मुझे उन सत्संगियो के लिए खुद भजन सिमरन करना पड़ता है जिन्होंने नाम दान लिया है मगर बिलकुल भी भजन सिमरन नहीं करते। दोनों पैरो पर खड़े होकर मैं उन सत्संगियो के लिए भजन सिमरन करता हूँ जो भजन सिमरन में तो बैठते हैं मगर पूरा समय नहीं देते। बेटा जिनको नाम दान मिला है, उनका जवाब सतपुरख को मुझे देना पडता है, क्योंकि मैंने उनकी जिम्मेदारी ली है नाम दान देकर। और आखिर में मैं बैठ कर भजन सिमरन करता हूँ, वो मैं खुद के लिए करता हूँ, क्योंकि मेरे गुरु ने मुझे नाम दान दिया था और मैं नहीं चाहता की उनको मेरी जवाबदारी देनी पड़े। भक्त ये सब सुनकर एक दम सन्न खड़ा रह गया।

+66 प्रतिक्रिया 12 कॉमेंट्स • 44 शेयर
white beauty Mar 5, 2021

+4 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 1 शेयर
Neha G Mar 4, 2021

+47 प्रतिक्रिया 9 कॉमेंट्स • 32 शेयर

+3 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 5 शेयर
Manoj Prasadh Mar 4, 2021

+36 प्रतिक्रिया 2 कॉमेंट्स • 16 शेयर

+20 प्रतिक्रिया 3 कॉमेंट्स • 15 शेयर

+1 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 0 शेयर

+1 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 2 शेयर

पूजन में महिलाओं की चूडिय़ों पर क्यों लगाते हैं तिलक? 🔸🔸🔹🔸🔸🔹🔸🔸🔹🔸🔸🔹🔸🔸🔹🔸🔸 पूजन कर्म में स्त्री हो या पुरुष, दोनों को कुमकुम, चंदन आदि का तिलक लगाने की परंपरा है। सभी पंडित पुरुषों के मस्तक या माथे पर तिलक लगाते हैं लेकिन स्त्रियों के संबंध में कुछ पंडित या ब्राह्मण माथे पर नहीं चुडिय़ों पर तिलक लगाते हैं। इसके पीछे कुछ खास कारण मौजूद है। शास्त्रों के अनुसार सभी प्रकार के विधिवत पूजन कर्म ब्राह्मण या पंडितों द्वारा ही कराए जाने चाहिए। यदि कोई पति-पत्नी कोई धार्मिक कार्य करवाते हैं तब उन दोनों का पूजन में सम्मिलित होना अनिवार्य माना गया है। इस प्रकार के आयोजन में ब्राह्मण द्वारा यजमान को कई बार तिलक लगाया जाता है। कई वेदपाठी ब्राह्मण स्त्रियों की चुडिय़ों पर ही तिलक लगाते हैं मस्तक पर नहीं। इसकी वजह यह है कि विवाहित स्त्री को पति के अलावा किसी अन्य पुरुष का स्पर्श करना निषेध माना गया है। वेद-पुराण के अनुसार किसी भी विवाहित स्त्री को स्पर्श करने का अधिकार अन्य महिलाओं के अतिरिक्त केवल उसके पति को ही प्राप्त है। अन्य पुरुषों का स्पर्श होने से उसका पतिव्रत धर्म प्रभावित होता है। इसी वजह से वेदपाठी ब्राह्मण महिलाओं की चुडिय़ों पर तिलक लगाते हैं, माथे पर नहीं ताकि उन्हें स्पर्श न हो सके। स्त्री के बीमार होने पर या संकट में होने पर कोई वैद्य या डॉक्टर स्पर्श कर सकता है, इससे स्त्री का पतिव्रत धर्म नष्ट नहीं होता है। ऐसी मान्यता है कि धार्मिक कर्म में चुडिय़ों पर तिलक लगाने से विवाहित स्त्री पतिव्रत धर्म हमेशा पवित्र रहता है और पति की उम्र लंबी होने के साथ स्वस्थ और सुखी जीवन रहता है। पति और पत्नी दोनों के जीवन में सुख, समृद्धि और शांति बनी रहती हैं, उन्हें धन आदि की भी कमी नहीं होती। 🔸🔸🔹🔸🔸🔹🔸🔸🔹🔸🔸🔹🔸🔸🔹🔸🔸

+4 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 1 शेयर

भारत का एकमात्र धार्मिक सोशल नेटवर्क

Rate mymandir on the Play Store
5000 से भी ज़्यादा 5 स्टार रेटिंग
डेली-दर्शन, भजन, धार्मिक फ़ोटो और वीडियो * अपने त्योहारों और मंदिरों की फ़ोटो शेयर करें * पसंद के पोस्ट ऑफ़्लाइन सेव करें
सिर्फ़ 4.5MB