Basavaraj Krishna Naik
Basavaraj Krishna Naik Aug 16, 2017

महालक्ष्मी मंदिर कोल्हापुर

महालक्ष्मी मंदिर कोल्हापुर

करवीरनिवासिनी श्रीमहालक्ष्मी
कोल्हापूरचे #महालक्ष्मी #मंदिर (अंबाबाईचे देऊळ) हे पुराणात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी एक, व महाराष्ट्रात असलेल्या देवीची साडेतीन पीठांपैकी एक आहे. मंदिराच्या मांडणीवरून ते चालुक्यांच्या काळात इ.स. ६०० ते ७०० मध्ये बांधले असण्याची शक्यता आहे. मंदिराचे पहिले बांधकाम राष्ट्रकूट किंवा त्या आधीचा शिलाहार राजांनी सुमारे आठव्या शतकात केले असावे.
पुराणे, अनेक जैन ग्रंथ, ताम्रपत्रे व सापडलेली अनेक कागदपत्रे यांवरून अंबाबाई मंदिराचे पुरातनत्व सिद्ध होते आणि कोल्हापूरची अंबाबाई खर्‍या अर्थाने अखिल महाराष्ट्राची कुलस्वामिनी ठरते..
कधी काळी मोगलांनी या देवळाचा विध्वंस केला तेव्हा देवीची मूर्ती पुजार्‍याने अनेक वर्षे लपवून ठेवली होती, असे म्हणतात. पुढे संभाजी महाराज यांच्या कारकीर्दीत इ.स. १७१५ ते १७२२ या कालखंडात मंदिराचे पुनरुज्जीवन करण्यात आले. उत्तम कोरीव काम असलेल्या भिंती व अगदी साधे वरचे शिखर हा कारागिरीतला फरक त्यामुळेच पडला असावा.
मूर्तीच्या जवळील सिंह व शिरावरील शिवलिंगामुळे देवी अनेकांच्या मते पार्वतीचे रूप आहे. देवीची मूर्ती दगडी असून तिचे वजन ४० किलोग्रॅम आहे. मूर्तीमागे दगडी सिंह आहे. डोक्यावर मुकुट आहे आणि त्यावर शेषनाग आहे.अकराव्या शतकातील शिलालेखात ​'लिंगशैषाघौषहारिणी' असा देवीचा उल्लेख आहे. देवीच्या संस्कृत आरतीमध्येही तिच्या मस्तकावरील नागाचे वर्णन केले जाते. करवीर माहात्म्य ग्रंथात १३ व्या अध्यायातील सातव्या श्लोकात असे म्हटले आहे की, पन्नागांकित मस्तकाम म्हणजे नागांनी आपला फणा देवीच्या मस्तकावर पाहिला आहे असा उल्लेख आहे. हेमाडपंथी मंदिर प्रणालीचा प्रणेता हेमाद्री यांनी रचलेल्या हेमाद्री वीरचित चतुर्वर्गचिंतामणी या व्रतखंडात मस्तकावर नाग असे वर्णन असलेली मूर्ती करवीरनिवासिनीच आहे असे नमूद केले आहे.नाग, लिंगयोनी, पानपात्र आणि म्हाळुंग अशी महत्त्वाची चिन्हे हीच ज्या देवीची महत्त्वाची ओळख आहे.कांहीच्या मते महालक्ष्मी ही विष्णूची भार्या व म्हणून समोर गरुडमंडपात विष्णुवाहन गरूडाची स्थापना केली

+186 प्रतिक्रिया 9 कॉमेंट्स • 24 शेयर

कामेंट्स

Kanaiyalal Gupta Aug 16, 2017
महामाई महालक्ष्मी आपके बगैर इस धरती पर कुछ भी नहीं हो सकता जय हो महालक्ष्म

+9 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 8 शेयर
Shanti Pathak Mar 27, 2020

🌹🌹जय मां चन्द्रघण्टा, जय मां महालक्ष्मी 🌹🌹 🌹🌹शुभ शुक्रवार, सुप्रभात वंदन 🌹🌹 नवरात्र तीसरा दिन माँ चंद्रघंटा माँ दुर्गा के तीसरे स्वरुप व शक्ति को चंद्रघंटा के नाम से जाना जाता है नवरात्रो में तीसरे दिन इनकी पूजा का अत्यधिक महत्व बताया गया है मां की दस भुजाएं दसों हाथों में खड्ग बाण और गले में सफेद फूलों की माला है। माँ के मस्तक पर घंटे के आकार का अर्धचंद्र है जिस कारण इनका नाम चंद्रघंटा पड़ा ऐसी मान्यता है की इनकी पूजा मात्र से ही साधक को मणिपुर चक्र के जाग्रत होने वाली सिद्धियां प्राप्त हो जाती हैं इनके आशीर्वाद स्वरुप व्यक्ति को सभी प्रकार के सांसारिक कष्टों से मुक्ति मिलती है। माँ चन्द्रघण्टा मंगलदायनी और अपने भक्तों को आरोग्य यश वैभव तथा ऐश्वर्य प्रदान करती है। भोग विधि नवरात्रि के तीसरे दिन मां चंद्रघंटा को दूध या दूध से बनी हुई चीजे जैसे खीर मिठाई आदि का भोग लगाना शुभ होता है ऐसा करने से माँ प्रसन्न होकर भक्तो के समस्त दुखों को दूर करती है

+94 प्रतिक्रिया 26 कॉमेंट्स • 56 शेयर
Rajesh Kumar Mar 27, 2020

+128 प्रतिक्रिया 14 कॉमेंट्स • 0 शेयर

+13 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 1 शेयर

+32 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 1 शेयर

भारत का एकमात्र धार्मिक सोशल नेटवर्क

Rate mymandir on the Play Store
5000 से भी ज़्यादा 5 स्टार रेटिंग
डेली-दर्शन, भजन, धार्मिक फ़ोटो और वीडियो * अपने त्योहारों और मंदिरों की फ़ोटो शेयर करें * पसंद के पोस्ट ऑफ़्लाइन सेव करें
सिर्फ़ 4.5MB