_*स्वानुभवातुन वारी म्हणजे....*_ _अत्यंत प्रतीकुल परिस्थितीत आनंदी कसे जगायचे याची शाळा म्हणजे पंढरीची पायी वारी._ _भगवंताची शारीरिक,मानसिक आणि वाचिक सेवा किंवा तन,मन व धन देवाच्या कारणी लावणे म्हणजे पंढरीची पायी वारी._ _सदविचाराची शाळा म्हणजे पंढरीची पायी वारी._ _सर्व जाती धर्माच्या लोकांनी गुण्यांगोविंदाने कसे रहावे याचे प्रात्यक्षीक म्हणजे पंढरीची पायी वारी._ _शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी पंढरीची पायी वारी._ _सत्पात्री दान करण्याची संधी म्हणजे पंढरीची पायी वारी._ _बौध्दीक क्षमतेत वाढ होते अभंग पाठांतरामुळे._ _किर्तन प्रवचनामुळे ज्ञानामध्ये वाढ होते._ _समाजातील सर्वच स्तरातील माणसांच्या विचाराची देवाण घेवाण होते._ _जातीभेद निर्मुलनाचे कार्य मोठ्या प्रमाणात होते तेथे कोणीच कोणाची जात विचारात नाही._ _आर्थीक बाबतीत गरीब व श्रीमंत असा विचार केला जात नाही._ _गायन वादन ह्या कला गुणांना योग्य वाव मिळतो._ _आपल्या पेक्षा शारीरिक,आर्थिक,कमजोर माणसे पायी वारी करताना पाहून आपले मनोधर्य वाढते._ _पायी वारी मध्ये ज्या संताच्या पालखी सोहळ्या बरोबर आपण चालतो त्या संताचे अस्तित्व जाणवते व त्यांच्या विचारांचा पगडा नकळत आपल्यावर पडतो._ _तुकोबाराय म्हणतात;*देवा आता ऐसा करी उपकार ! देहाचा विसर पाडी मज !! तरीच हा जीव सुख पावे माझा !* पंढरीच्या पायी वारी मध्ये एवढा विसर पडतो की तारीख वार सुध्दा लक्षात रहात नाही मग काय तर देह नव्हे मी हे सरे ।उरला उरे विठ्ठल._ _सहभोजन नेहमीच तर कधी वनभोजनाचा आनंद मिळतो._ _नेहमीच्या कंटाळवाण्या जीवनापेक्षा वेगळा अनुभव घेता येतो._ _प्रीय व्यक्तीचा विरह,भेटीची ओढ आणि प्रत्यक्ष भेट ह्याचा आगळा वेगळा अनुभव घेता येतो._ _खुप लोक दान धर्म करतात,खुप लोक सेवा करतात ऐकमेकांना मदत करतात हे पाहुन आपल्या परोपकाराची प्रेरणा मीळते._ _साधू संताच्या भेटी होतात._ _देव आणि धर्माचे बाबतीत प्रेम भावना वाढीस लागते.नास्तीक विचार मनातून निघून जातात._ _ज्याची जसी भावना असेल त्याप्रमाणात त्याला तसा लाभ होतो एक मात्र निश्चित तूमचा तोटा किंवा हानी मात्र काहीच होत नाही...._ _*मिञानो;काळजी घ्या.....*_