🌸 *काळ बदलला तशी साधनाही बदलली पाहिजे.* 🌸 *अहंकाराच्या वेगवेगळ्या जाती आहेत, आपण कुणीतरी विशेष आहोत, इतरांपेक्षा वेगळे आहोत असे वाटायला लागले की तो घसरला म्हणून समजायचे.* जगात राहायचे, पण इतर लोक राहातात तसेच राहायचे. मी इतरांपेक्षा वेगळा आहे असे तुम्हाला स्वतःलाच वाटते तेव्हा लोकांनाही तसेच वाटते, कारण लोक अज्ञानी असतात. त्यांनाही असे वाटते की, हा विशेष आहे. उदा. भगवे वस्त्र परिधान केले की हा संन्यासी झाला असे याला वाटते व लोकही त्याच्यामागून धावत सुटतात. का तर त्याच्या अंगावरचे कपडे विशेष आहेत. साधूने जटा वाढविलेली असते. अंगाला राख फासलेली आहे, तोंडाने काहीतरी ओम भूम भूम असे काहीतरी बोलतो आहे, मग लोकांनाही वाटते की हा काहीतरी विशेष आहे व याला स्वतःलाही आपण विशेष आहोत, असे वाटायला लागते. *हे मी का सांगतो आहे? साधेपणाने तुम्ही राहा. जीवनविद्येतली माणसे साधेपणाने राहतात तेव्हा लोकांना आश्चर्य वाटते की, हा माणूस परमार्थ करतो. जीवनविद्येतली माणसे परमार्थ करतात, हेसुद्धा इतरांना कळत नाही कारण त्यांचा वेश एकदम साधा असतो.* --- *सद्गुरु श्री वामनराव पै.* 🍃🌳🍃🌲🍃🎄🍃🌴

🌸 *काळ बदलला तशी साधनाही बदलली पाहिजे.* 🌸

      *अहंकाराच्या वेगवेगळ्या जाती आहेत, आपण कुणीतरी विशेष आहोत, इतरांपेक्षा वेगळे आहोत असे वाटायला लागले की तो घसरला म्हणून समजायचे.* जगात राहायचे, पण इतर लोक राहातात तसेच राहायचे. मी इतरांपेक्षा वेगळा आहे असे तुम्हाला स्वतःलाच वाटते तेव्हा लोकांनाही तसेच वाटते, कारण लोक अज्ञानी असतात. त्यांनाही असे वाटते की, हा विशेष आहे. 

     उदा. भगवे वस्त्र परिधान केले की हा संन्यासी झाला असे याला वाटते व लोकही त्याच्यामागून धावत सुटतात. का तर त्याच्या अंगावरचे कपडे विशेष आहेत. साधूने जटा वाढविलेली असते. अंगाला राख फासलेली आहे, तोंडाने काहीतरी ओम भूम भूम असे काहीतरी बोलतो आहे, मग लोकांनाही वाटते की हा काहीतरी विशेष आहे व याला स्वतःलाही आपण विशेष आहोत, असे वाटायला लागते. 

     *हे मी का सांगतो आहे? साधेपणाने तुम्ही राहा. जीवनविद्येतली माणसे साधेपणाने राहतात तेव्हा लोकांना आश्चर्य वाटते की, हा माणूस परमार्थ करतो. जीवनविद्येतली माणसे परमार्थ करतात, हेसुद्धा इतरांना कळत नाही कारण त्यांचा वेश एकदम साधा असतो.*

     --- *सद्गुरु श्री वामनराव पै.*
🍃🌳🍃🌲🍃🎄🍃🌴

+3 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 20 शेयर

*🙏🌿🏵श्री मनाचे श्लोक ८४🙏🌿🏵* *🌺II श्रीराम समर्थ II 🌺* *✡विठोने शिरी वाहिला देवराणा।* *तया अंतरी ध्यास रे त्यासि नेणा॥* *निवाला स्वये तापसी चंद्रमौळी।* *जिवा सोडवी राम हाअंतकाळीं॥८४॥✡* श्री विठ्ठलाने महादेवाला ,म्हणजेच श्री शंकरांना आपल्या डोक्यावर मिरवले .असे श्रेष्ठत्व त्याला प्राप्त झाले .पंढरीतील पांडुरंगाच्या शिरावर असलेल्या महादेवाच्या पिंडीला अनुसरून हे वर्णन आहे .विठ्ठल म्हणजे विष्णू हे शंकरांना मस्तकी धारण करतात ते त्यांच्या ज्ञानोत्तर भक्तीमुळे ! ज्ञानोत्तर भक्ती ही काही वेगळीच आहे .जसे मातेचे आणि बालकाचे देह वेगळे असले तरी अंतरंगात ऐक्यच असते .तसे ज्ञानोत्तर भक्तीत देव भक्ताचे ऐक्य असते .म्हणूनच शंकरांनी विष्णूच्या पायातील गंगा आपल्या डोक्यावर धारण केली आहे .तर विष्णूने म्हणजेच श्री विठ्ठलाने शंकरांना मस्तकावर धारण केले आहे . शंकरमहाराज ,ज्यांनी आपल्या मस्तकी चंद्र धारण केला आहे , तपस्वी ,उग्र तप करणारे होते .परंतु समुद्र मंथनात निघालेले हलाहल विष पिउन होणारा दाह केवल रामनामाने थांबला .तेच श्रीराम ताप निवारण करणारे असल्यामुळे जीवाची जन्म मरणाच्या फे-यातून मुक्तता करणारे आहेत ... *⛳🌺🌸 जय जय रघुवीर समर्थ 🌸🌻⛳*

+3 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 4 शेयर

*श्रीराम समर्थ* *समर्थ रामदासस्वामी रचित दासबोधावरील श्री रचित दासबोधावरील श्री रविंद्र पाठक यांची निरूपणें.दशक १२-विवेक-वैराग्य,समास ७- विषयत्याग, निरूपण क्रमांक ४६७ – भाग ३ मधील सार.* दासबोधातील बाराव्या दशकातील सातव्या समासात समर्थ वक्त्याने विचारलेल्या मुख्य प्रश्नाचे उत्तर देतात की, विषयत्याग ही बाह्यांगाची अवस्था नसून ती अंतरंगाची प्रवृत्ती आहे. आपल्या चित्तामध्ये या दृश्यजगाची किती आसक्ती भरलेली आहे यावर आपल्या विषयत्यागाचे प्रमाण ठरलेले आहे. आम्ही बाह्यांगाने कदाचित विषयत्यागाची भूमिका ठेवूत परंतु अंतरंगाची अवस्था ही भगवंताला अतिशय आवडणारी अवस्था आहे. श्रीमहाराज याचे समर्पक उत्तर देताना म्हणायचे की, प्रपंचातली आसक्ती काढली की तोच प्रपंच हा परमार्थ होतो आणि परमार्थामध्ये आसक्ती कालवली की तोच परमार्थ हा प्रपंच होऊन जातो. सगळं गणित आपल्या प्रवृत्तीचे, आपल्या आसक्तीचे आहे, आपण त्यात किती लडबडलेलो आहोत याच्या गुणात्मक स्थितीचा विषयत्यागाशी संबध आहे. ना की माझ्या बाह्यांगाचा. समर्थ यासाठी अतिशय सुंदर उदाहरण परात्पर सद्गुरू महादेवाचे देतात..... *अष्टमा सिद्धीची उपेक्षा ! करून घेतली योगदीक्षा !* *घरोघरीं मागे भिक्षा ! माहादेव !!१२.७.१९.!!* या महादेवाचे स्वरूप डोळ्यांसमोर आणले तर सर्वार्थाने केवळ नग्न, अंगाला लावलेले केवळ भस्म, गळ्यात नरमुंडाची माळ, मस्तकावर वाहणारी पवित्र गंगा असा हा महादेव साधनेच्या आधारे कुठल्याही सिद्धींचा आधिकारी होवू शकला असता पण त्याने हे जे स्वरूप स्विकारलेले आहे, हा योग दिक्षेचा पांथस्थ केवळ भिक्षा मागून समाधानी राहण्यात आपले जीवन व्यतीत करतो. अशा महादेवाच्या अंर्तबाह्य अवस्थेत विषयत्याग स्पष्टपणे आपल्याला दिसून येतो. परंतु समर्थ म्हणतात ....... *ईश्वराची बराबरी ! कैसा करील वेषधारी !* *म्हणोनियां सगट सरी ! होत नाही !!१२.७.२०.!!* एखाद्याला जर महादेवाची बरोबरी करावीशी वाटली, आपणही त्याच्या परंपरेचे पाईक आहोत अशी स्वतःची भावना दृढ करून राहावी आणि त्यासाठी बाह्रयांगाने देखील त्याच्यासारखेच कर्तृत्व करावे अशाने आपण महादेवाच्या बरोबरीचे होवू शकतो का? या परंपरेचे पाईक होण्याची पात्रता आपल्या अंगामध्ये येण्यासाठी, ईश्वराची बरोबरी करण्यासाठी केवळ बाह्यांगाची वेषभूषा हाच एकमेव निकष नसून हे सगळे अंतरंगाच्या स्थितीचे गणित आहे, आपल्या चित्ताची अवस्था कशी आहे हे विषयत्यागाचे निर्देशक आहे. या सर्व सुखवस्तूंमध्ये असूनही जो त्याच्याशी लिप्त नाही, जो त्याच्याशी बांधलेला नाही, मग कदाचित एखादी झोपडी असेल तर तो विषयत्याग नाही आणि एखादा राजा जनकासारखा महालात राहून, सर्व सुख भोगून, सर्व ऐश्वर्यात राहूनही त्याच्याशी attached नाही, त्याच्याशी बांधलेला नाही तर तो मुक्त आहे. इथं प्रभावाखाली त्याने विषयत्याग करताना घर-दार, मुलं-बाळं, याच्यावर पाणी सोडले म्हणून ते केलं असता विषयत्याग घडतो ही चुकीची समजूत आहे. आपल्याला भगवंताने ज्या स्थितीत ठेवलेले आहे त्या स्थितीत हे सर्वकाही त्याचेच आहे या भूमिकेमध्ये राहण्यात खरे विषयत्यागाचे मर्म सामावलेले आहे अन्यथा बाहेरील देखाव्याने भगवंत हा कधीही भूलत नाही. मग या विषयत्यागासाठी नेमके कुठल्या प्रवृत्तीचे गणित आपण शिकले पाहिजे, कुठंले साधन आयुष्यात उतरवले पाहिजे समर्थ म्हणतात ...... *वैराग्यापरतें नाही भाग्य ! वैराग्य नाहीं तें अभाग्य !* *वैराग्य नस्तां योग्य ! परमार्थ नव्हे !!१२.७.१७.!!* हा सर्व साधनेचा खरा प्राण आहे. भगवंताने तुम्हांला ज्या स्थितीत ठेवलेले आहे त्या स्थितीत अत्यंत आनंदाने राहणे हीच प्रापंचिकाच्या आयुष्यातली वैराग्याची व्याख्या आहे. आपण जीवनाच्या सर्व अवस्थांमध्ये अशी वैराग्याची संकल्पना उतरवू शकलो तर या वैराग्यासारखे भाग्य नाही. आपण दुसऱ्याच्या संपत्तीने मत्सरामध्ये तर पडत नाही ना? हा प्रश्न स्वतःला विचारून त्याचे उत्तर शोधावे आणि ते उत्तर जर आपल्या मत्सराला प्रेरित करणारे असेल तर समजावे की अजूनही वैराग्य पूर्णपणे आयुष्यात उतरलेले नाही. या भगवंताच्या इच्छेला खऱ्या अर्थाने आपण अजूनही स्विकारू शकलेलो नाही. जीवनात मनाविरूद्ध घडणाऱ्या घटनांनी किती प्रमाणात अजूनही क्रोधाच्या अधीन जातो हे आपल्या जीवनातले वैराग्याचे निर्देशक आहे. बऱ्याच घटनांमध्ये आपल्या इच्छेप्रमाणे निर्णय प्राप्त होत नाही आणि मग असे निर्णय पचवणे हे अत्यंत अवघड जाते. वैराग्याचे गणित हेच की घडणारी प्रत्येक गोष्ट ही भगवंताच्या इच्छेने घडत आहे आणि ती माझ्यासाठी योग्यच आहे, माझ्या अंतिम कल्याणाचीच आहे हे सहज स्विकारण्याची प्रवृत्ती हे वैराग्य आहे. वैराग्य या गोष्टीला खूप कष्टप्रद खूप जड करण्याची गरज नाही. श्रीमहाराज म्हणायचे की जसं आई मुलाला घास भरवतांना कुंड्यामध्ये काहीतरी दूध-भात, दही-भात, आमटी-भात काहीतरी घेऊन येते, ते मूल खेळण्यात गर्क असते आणि आईने घासाचा हात पुढं करताच मूल जितक्या सहजतेने त्या घासाला ग्रहण करतो त्यावेळेला त्याच्या मनात विचारही येत नाही की आई आपल्याला जे देते ते चांगलं आहे का? वाईट आहे का? माझ्यासाठी हिताचे आहे का? या कुठल्याही गोष्टीचा ते विचारही करत नाही ती गोष्ट सहज स्विकारते त्याप्रमाणे जीवनात घडणारी प्रत्येक गोष्ट, त्याचा निर्णय सहजपणे स्विकारता येणे आणि आपली इच्छा भगवंताच्या इच्छेमध्ये विलीन करून दर पाऊलागणिक राहण्याची आपल्या जीवनातली धारणा याचा अर्थ वैराग्य आहे. असे हे वैराग्य आज भगवंताच्या इच्छेमध्ये विलीन करून त्यापासून निर्माण होणाऱ्या संतापाला, उद्वेगाला जर दूर करू शकत असूत तर समजावे की आपल्या जीवनामध्ये वैराग्याची प्राप्ती निकट होवू लागलेली आहे. दुसऱ्याचे सुख, संपत्ती त्याचा हर्ष बघून जर आपल्याला आनंद होत असेल तर समजावे जीवनामध्ये वैराग्याचे मांगल्य आता उजळायला लागलेले आहे आणि या वैराग्यासारखे दुसरं भाग्य नाही. त्यामुळे शंकरासारखा सर्व गोष्टींचा त्याग करून आपण बाह्यांगाने केवळ एखाद्या संताचे वस्त्र परिधान केले म्हणून आपण त्या परंपरेचे पाईक होवू शकत नाही. आणि एखादा सुटबूट घातलेला मनुष्य देखील सर्व अंतस्थ प्रवृत्तींचा त्याग करून केवळ हे सगळं त्या भगवंताचे आहे आणि त्याने मला एक निमित्त म्हणून ठेवलेले आहे या भूमिकेत जर आपले जीवन जगू शकला तर तो वस्त्रधारी संतापेक्षा भगवंताला प्रिय असू शकतो. त्यामुळे समर्थ म्हणतात ..... *उदास आणी विवेक ! त्यास शोधिती सकळ लोक !* *जैसें लालची मूर्ख रंक ! तें दैन्यवाणें !!१२.७.२१.!!* असा हा अंतरी जो वैराग्यशील आहे, आणि भगवंताने ज्या स्थितीत ठेवले त्या स्थितीत तो प्रपंच त्याचा आहे म्हणून त्याची सेवा म्हणून तो करतोय असा विवेक देखील त्याच्या ह्रदयात आहे, जो आहे त्या स्थितीपासून कुठल्याही वेगळ्या अक्षेपांना घेऊन जगत नाही असा विवेकवैरागी सामान्य जीव नसून तो सत्पुरूष असतो. असा सत्पुरूष जरी तो कुठल्याही वेषात असला, तो कुठेही बसलेला असला तरी देखील अनेक लोक त्याला शोधत येतात आणि याच्या उलट केवळ बाह्यांगाने वैराग्याचे प्रदर्शन करून आतमध्ये मात्र लोभ, आसक्ती ही जर चित्तामध्ये भरलेली असेल तर समर्थ म्हणतात की याच्याइतके दैन्यवाणं जीवन दुसरं कुठंलही नाही. मग आपल्याला स्वतः जीवनामध्ये हा निर्णय घ्यायचय की आज ज्या प्रपंचात मला भगवंताने ठेवलेले आहे त्याच स्थितीत जर भगवंताने माझ्या घरामध्ये यावे असे वाटत असेल तर श्रीमहाराजांनी ज्याप्रमाणे घरावरती तुळशीपत्र ठेवून आपली लीला केली तशी मानसिकरित्या जिथं, जिथं म्हणून माझे आसक्तीचे पाश बांधलेले आहेत त्या, त्या ठिकाणी जर तुळशीपत्र ठेवण्याची प्रवृत्ती निर्माण झाली तर समजावे की कुठल्याही गोष्टींचा त्याग न करताही जीवनात विषयत्यागाची स्थिती,तो मांगल्यक्षण घेऊन आपल्या दरवाजात उभी राहायला लागलेली आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम लक्ष्मीकांत खडके 🙏

+11 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 15 शेयर

+9 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 17 शेयर

*एक सणसणीत चपराक* (सर्वांनी अवश्य वाचावे, ही विनंती 🙏🙏) *माणुसकी ,स्वच्छता , निस्वार्थीपणा , कुटुंब व्यवस्था , पैशांचा दुरुपयोग, व्यसनाधीन होणे, विलासीपणा , ऐषारामी जीवन , विनाकारण केले जाणारे प्रवास , देवस्थानांच वाढलेलं प्रस्थ , श्रीमंती , माजमस्ती , वडीलधाऱ्या सोबत उद्धटपणे बोलणे , सत्तालोलुपता , मग्रुरी , गुंडगिरी , जगण्याचा अर्थ , मरणाची भीती , केलेल्या वाईट कृत्यांची आठवण , समारंभात केलेला पैशांचा अपव्यय , निकृष्ट जीवन शैली , अशा अनेक गोष्टी शिकवायला आलेला हा एक संदेश आहे .* *पूर्वीच्या परंपरा विसरून आम्ही आधी तुळशीला घराबाहेर काढलं ! " त्याला काय होतंय ? " हा प्रश्न विचारणाऱ्या नवीन पिढीला हा चांगलाच झटका आहे !!! सकाळी शुचिर्भूत होणे ही संकल्पना हळू हळू लयास चालली होती . कधीतरी वाट्टेल तेव्हा अंथरुणातून उठून " शॉवर " खाली दोन मिनिटं उभे रहाणाऱ्या पिढीला , आता दोन दोन मिनिटाला हात धुवावे लागत आहेत . घरात, कापूर , उदबत्ती , देवापुढे दिवा ह्या सगळ्या गोष्टींना अंधश्रद्धेच्या सोईस्कर नावाने फाटा दिला गेला होता. आता त्याच कापरासाठी मॉल मध्ये लाईन लागलीय . संध्याकाळची उदबत्ती लावून म्हटलेली रामरक्षा ही वरदान ठरतेय . घरी आल्यावर आधी पायावर पाणी घेणारी आपली संस्कृती सोडून बुटासकट बेडवर झोपून , बूट मोजे काढून भिरकवणारे आता चांगलेच पोळले आहेत. धूप, दीप, नैवेद्य, आरतीमुळे प्रसन्न होणारं घरातलं वातावरण आता कमालीचं गढूळ झालं होतं. पुण्या-मुंबई सारख्या ठिकाणी तर " घरचं जेवण " लोक हळू हळू विसरत चालले होते. आता त्याची नितांत गरज भासतेय. उठलं की सुटलं,प्रत्येक सुट्टीला गाडी घेऊन पर्यटन हेच जीवन असं थोडं वाटायला लागलं होतं, त्यावर पण थोडा आळा बसेल. अंधश्रद्धेच्या नावाखाली आपणच आपल्या संस्कारांची दिलेली तिलांजली आता आपल्याच बोकांडी बसलीय . सणासुदीच्या रूपाने पूर्वजांनी केलेली रचना किती वेडगळ पणा आहे हे शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध करणारी पिढी आता त्या मार्गाचा अवलंब नक्की करेल असं वाटायला लागलय .* *शेवटी निसर्गापुढे सगळे सारखेच . रस्त्यावरच्या भिकाऱ्याला किंवा स्कॉर्पियोमधून फिरणाऱ्या श्रीमंताला " मास्क " बांधून फिरायची वेळ आलीय .* हे मानवा.......तू कितीही पुढारलास तरी शेवटी तुझ्या जगण्याची गुरू-किल्ली फक्त त्या नियंत्याकडेच आहे. त्यामुळे त्याचं स्मरण कर . *जैन मुनींनी तोंडाला फडकं बांधलेलं* *बघून हसणारे आज तेच करताहेत*. *फक्त त्यांचा उद्देश कीटक मरू नयेत हा होता* पण आज आपला उद्देश फक्त आपण जगावं हाच आहे. *पुराण ,ग्रंथ ,उपनिषदे यांच्यावरची धूळ झटका तरच हा झटका पचवण्याची ताकद तुमच्यात येईल. अन्यथा वडापाव, बर्गरच्या पिढीला असे कितीतरी कोरोना दर चार वर्षांनी झेलावे लागतील त्यासाठी.......*. *हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे ,* *आरोग्य दे , सर्वांना सुखात ,आनंदात , ऐश्वर्यात ठेव* जगावरील संकट टळून सर्वांना उदंड आयुष्य दे... *सर्वाचं भलं कर,कल्याण कर,रक्षण कर आणि तुझे गोड नाम सर्वांचे मुखात अखंड राहू दे* ही प्रार्थना 🙏 जयश्रीराम 🙏

+13 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 34 शेयर

*आजचे प्रवचन* १२ एप्रिल *सदवस्तू साध्य करून घेण्याचा उपाय सत्संगती.* एखाद्या दारूबाजाप्रमाणे विषयी मनुष्य वागत असतो. त्याला सर्व कळते, पण वळत नाही. एकीकडे स्वतःला तो परमात्म्याचा अंश म्हणवितो, आणि दुसरीकडे विषयांच्या आहारी जातो. खरोखर, भक्तीशिवाय सर्व काही वाया आहे. संताजवळ राहावे आणि भक्तीचे साधन करावे. आपल्याला काही करायचे उरले आहे असे जे वाटते, ते न वाटू लागले, म्हणजे साधनात प्रगती झाली असे समजावे. भगवंताची भक्ती घडायला गुरूसेवा हे एक मुख्य साधन आहे. जो शिष्य आज्ञा पाळतो त्याला भेटणे गुरूला भागच पडते. वास्तविक, गुरू मनात काही इच्छाच येऊ देत नाही; म्हणून कामधेनूपेक्षाही गुरू श्रेष्ठ आहे. अत्यंत तळमळीशिवाय भगवंताचा योग शक्य नाही. संतसमागम प्रारब्धाने होतो, पण 'सम' रीतीने जाता आले तर खरा 'समागम' घडतो. पण आमचा मार्ग विषय आहे; म्हणून संत भेटूनही त्याचा 'समागम' आपल्याला होत नाही. विषयांमध्ये धुंद असलेल्या आम्हांला पाहून संतांच्या मनात कालवाकालव होते; त्याची आपल्याला कल्पनाही येणार नाही. आपली बुद्धी आपल्याला समाधानप्रत नेत नाही, तर दुसर्‍याची मदत घेणे आवश्यक आहे. अशा वेळी, ज्यांची मदत आपण घेतो त्यांचे आपण ऐकायला नको का ? भगवंताच्या जिज्ञासेचा मार्ग आक्रमायला संतांनी सांगितले. संतांना जिज्ञासा मूळचीच असते. आपल्याला ती नाही, म्हणून ती उत्पन्न करणे भाग आहे. काही केल्याशिवायच सद्‌वस्तू साध्य करून घेण्याचा उपाय, म्हणजे सत्संगती हा होय. सत्संगती अती अपूर्व काम करणारी आहे. ज्याचे भाग्य थोर असेल त्यालाच ती लाभेल. एखादा मनुष्य भोवर्‌यात सापडला तर त्याला बाहेर काढण्याचे दोन मार्ग आहेत. एक मार्ग असा की, दुसर्‌या चांगल्या पोहणार्‌याने त्या भोवर्‌यामध्ये उडी मारून तो फोडायचा आणि बुडत्याला बाहेर ओढून काढायचे. पण यासाठी शक्ती फार लागते. दुसरा मार्ग असा की, आपणच भोवर्‌यामध्ये बुडी मारून तळाशी जायचे आणि खालून बाहेर निघायचे. विद्वत्ता ही भोवर्‌यासारखी आहे. वर वर पाणी फिरत असते तरी तळाशी ते संथ असते. तसे, जे लोक वरवर विद्या शिकतात ते वादाच्या आणि मतांतराच्या चक्रात सापडतात; पण जे लोक खोल तळाशी जातात त्यांना खरे काय ते आपोआप कळते, आणि ते सगळीकडे एकच असते. विद्येच्या भोवर्‌यामध्ये सापडणार्‌यांना बाहेर ओढून काढण्याचे काम फार मोठया संतांचे असते. शहाण्याने त्या भानगडीत न पडावे. हजारो लोक भगवंताच्या नामाला लावणे हे खरे संतांचे काम होय. *१०३. कोणत्याही सत्पुरूषाची परंपरा रक्षण केली पाहिजे. त्यात आपले घुसडू नये.* *श्रीराम जय राम जय जय राम*

+6 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 4 शेयर

श्री राम समर्थ दीर्घ सूचना आधीच कळे समर्थ नेहमीच भाग देत होते की पुढे काळ कठीण आहे.आणि आज तसेच घडत आहे व यापुढेही महाकठीण काळ येणार आहे.पण दासाने चिंता करू नये.स्वारी सतत सांगत आली आहे की उपासना करा ,उपासना वाढवा.आज उपासना किती आवश्यक आहे याची जाणीव प्रत्येक देहाला आहे.अशा वाईट परिस्थितीत परमार्थ आपला सहारा आहे व उपासना म्हणजे सामर्थ्य आहे. भाग लक्षात घ्या जेव्हा डॉक्टर हात वर करतो व सांगतो की आता देवाच्या हातात आहे. तेव्हा लोकं देव पाण्यात ठेवून रडत रडत देवाचा धावा . आपण देव पाण्यात नाही तर हृदयात आहे ही जाणीव ठेवून त्याच स्मरण करतो.काहीही होऊ द्या आत्मस्थिती ढासळू देऊ नये.मालक आपल्याला सामर्थ्य पुरवतात. द्वैत भाग सांगतो सतत न्युज पाहू नये.कोरोना चे व्हिडिओ व पोस्ट तर पाहू नये व वाचू ही नये व कोणाला पाठवू नये. सतत सतत कोरोना चा विचार करून मनात भीती निर्माण होते. वेळ आहे तर बालभक्ती पुस्तक,दासबोध , सदगुरु चरित्र प्रस्तावना, सत्य दत्त कथा वाचन करावे.युट्युब वर धार्मिक चित्रपट , मालिका पहावे म्हणजे आपल्या मनात दुसरा विचार करायला मार्ग राहणार नाही. जय सद्गुरू.....

+10 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 39 शेयर

*श्रीराम समर्थ* *समर्थ रामदासस्वामी रचित दासबोधावरील श्री रविंद्र पाठक यांची निरूपणें.दशकृ १२-विवेक-वैराग्य,समास ७- विषयत्याग,निरूपण क्रमांक ४६६ – भाग २ मधील सार.* दासबोधातील बाराव्या दशकातील सातव्या समासामध्ये समर्थ वक्त्याच्या भूमिका आपल्यासामोर मांडत आहेत. श्रोत्याने मनातला प्रश्न बोलून दाखवला की,संतमंडळी हे प्रापंचिक सुख भोगतात, त्यांच्या जीवनात विषयत्याग घडलेला नाही तरीदेखील भगवद् भक्ती प्राप्त केली याचा अर्थ परमार्थप्राप्तीसाठी विषयत्यागाची गरज नाही का? आणि जर आम्ही तसा विषयत्याग केला नसेल तर आम्हांला भगवंत का प्राप्त होत नाही? अशा दृष्टीने एकप्रकारे मनातली खळखळ एका प्रश्नाच्या आधारे श्रोत्याने व्यक्त केली आहे. वक्त्याच्या भूमिकेतून मानसिकता बघितली तर मनुष्य जीवनात येऊन सामान्य जीवात राहून संतपदापर्यंत पोहचणे यासारखे दुसरं कुठलेही अग्नीदिव्य नाही. संतांना या सामाज जीवनात प्रचंड निंदेला सामोरे जावे लागते. संतांना देहामध्ये ओळखण्याची पात्रता प्रापंचिकामध्ये नाही. कालचेच महाराजांचे प्रवचन होते की संत विषयात देव पाहतात तर प्रापंचिक देवामध्ये विषय पाहतो हाच प्रापंचिकांमधला आणि संतांमधला फरक आहे. या सगळ्यांच्या मागे आसक्तीचे मूळ आहे. आसक्तीपायी प्रापंचिकाच्या मनात कितीतरी प्रकारचे द्वेष, मत्सर हे सतत जागृत होतात. प्रापंचिकाची मानसिकता अशी असते की ते संतांचे निर्मळत्व बघू शकत नाही ते त्यांच्यावरचे शेवाळच बघतात. प्रापंचिक हा कल्पना विलासाने संताबरोबर स्वतःची तुलना करू लागतो, आणि मग त्याच्या मनात प्रश्न येतो की त्याच्या आणि माझ्या बाबतीत खाण्यापिण्याच्या गोष्टी, मुलाबाळांच्या गोष्टी, प्रपंचातल्या पैशाच्या गोष्टी या सगळ्या गोष्टी साधर्म्यात आहेत, पण संतांना मात्र जगाने मान्यता दिली, ते जगत् वंद्य झाले,संतांची संपत्ती, त्यांचा आधिकार,त्यांचे जनप्रियत्व,लोकप्रियत्व याची तुलना जगातल्या कुठल्याही संपत्तीवान, लौकिकता असलेला एखादा मनुष्य, एखादा खेळाडू, संगीतकार,गायक यांची कोणाशीही तुलना होवू शकत नाही.असे आद्वितीय त्यांचे व्यक्तीमत्व आहे. आणि अशा संतांनी प्रापंचिकाच्या दृष्टीने विचार केला तर त्यांनी देखील संसार केला, मुलबाळं झाली, सर्व प्रकारचे उत्तम उपभोग भोगले, हे सर्व विषय त्यांनी देखील भोगले आणि ते मात्र एवढे लोकप्रिय होवून गेले, संजीवन होवून गेले आणि आम्ही प्रापंचिक त्यांच्या सारख्याच गोष्टी करत असताना आमची मात्र ओळख बाराव्या नंतर देखील कोणी ठेवत नाही अशी परिस्थिती आहे.त्यामुळे समर्थ म्हणतात ........ *येर मत्सर करितांच गेलीं!अन्न अन्न म्हणतां मेलीं!* *कित्येक भ्रष्टलीं ! पोटासाठीं !!१२.७.११.!!* *ऐसे प्रकारीचे जन ! आपणास म्हणती सज्जन !* *पाहों जातां अनुमान ! अवघाच दिसे !!१२.७.१३.!!* वक्त्याला असा प्रश्न नेमका मत्सरातून आलेला आहे. सामान्य जीवाची अवस्था संतांकडे बघताना एकच असते की हे सगळं तुझ्यात आणि माझ्यात सारखे आहे, पण तुला जी लोकप्रियता, जे जनप्रियत्व, तुझी जी संजीवन अवस्था झाली ती आम्हांला मिळू शकत नाही, मला मिळत नाही ना मग हे तुला देखील योग्य दिसत नाही. आम्ही प्रपंच करतो पण आम्हांला तुझ्यासारखे पद मिळू शकत नाही. मग आम्हांला नाही तर तुलाही नाही या मत्सरापोटी हा प्रश्न श्रोता बोलून दाखवत आहे. *मज नाहीं तुज साजेना ! हें तों अवघें ठाउकें जना !* *खात्यास नखातें देखों सकेना ! ऐसें आहे !!१२.७.१५.!!* एखादा मनुष्य जर भुकेलेला असेल आणि त्याचवेळी समोरचा मनुष्य जर ताटभर अन्न घेऊन जेवत असेल तर स्वाभाविक मत्सरापोटी भूकेल्या माणसाला तो जेवत असलेला मनुष्य जसा सहन होत नाही, तसं प्रापंचिकाला परमार्थात अत्यंत अग्रेसर असलेल्या संतांच्या जीवनाकडे बघून त्याच्या अंतरंगात मत्सर निर्माण होतो की आम्ही असे रिकामे पोटी बसलेलो, आम्हांला तर कोणी विचारत नाही आणि हे मात्र सर्व जनमानसांत एवढे प्रचंड स्थान मिळवून गेले. त्यामुळे मला खायला मिळत नाही तर तुलाही नको अशा भूमिकेतून हा प्रश्न निर्माण झालाय की संत देखील विषयातच होते आणि आम्ही देखील विषयातच आहोत मग त्यांच्यात आणि आमच्यात एवढा फरक कशा दृष्टीने पडावा. समर्थ आणखीन एक नविन दिशा या विचारांमध्ये आपल्याला देतात ती म्हणजे या जगामध्ये चालणारी बूवाबाजी. अनेक लोक बाह्यांगाने आपले संतस्वरूप दाखवत असतात. संतांसारखेच ते कपडे घालतात, आचरणही संतांसारखेच करतात, त्यांच्यासारखेच बोलतात, सर्वकाही बाह्यांगाने त्यांची अवस्था संतांसारखी असते, त्याचप्रमाणे जीवनामध्ये विलास देखील ग्रहण करत असतात, अशा या विलासाकडे बघून त्या साधुविषयी आपल्या मनात संभ्रम निर्माण होवू शकतो. पण असे ढोंग फार काळ टिकू शकत नाही. एकना एक दिवस ते ढोंग तुटते, हा निळा कोल्हा कुईकुई करत आपल्या कोल्ह्यामध्ये जसा जावून बसतो त्यापद्धतीने देहबुद्धीच्या आधारे ते संतांसारखे ढोंग जरी बाहेरून कितीही केलं तरी ते टिकणारे ढोंग नसते. त्यामुळे अशी लोकं कुठं ना कुठंतरी फसतात आणि मग त्यावेळेला आपल्या मत्सराला अगदी छान वृक्षरूप प्राप्त होतं की, आम्ही म्हणतच होतो ना हे सगळे नुसते बाहेरून दाखवणारी प्रकरणं आहेत, यांच्या आत काही नसतं हो, हे आपल्यासारखेच आहेत, आणि हे एक जसे आहेत तसेच सगळे आहेत अशी आम्ही आमच्या मनाची समजून काढतो आणि त्यामुळे या बुवाबाजीपायी आम्ही बऱ्याचदा खऱ्या संतांवरती देखील अशाच प्रकारचे डाग लावत असतो. समर्थ म्हणतात की..... *वैराग्य मुळींहून नाहीं ! ज्ञान प्रत्ययाचें नाहीं !* *सुचि आचार तोहि नाहीं!भजन कैंचें !!१२.७.१२.!!* अशा बहुरूपी संतांच्या अंतरंगात खरे वैराग्य नाही, ज्ञान नाही, आचार नाही, भजन-पूजन नाही परंतु अशी लोकं जेव्हा सज्जन म्हणून या समाज जीवनामध्ये वावरतात त्यावेळी अशा प्रश्नांना सामान्य मनुष्याच्या जीवनामध्ये स्थान प्राप्त होत असते. त्यामुळे अशा प्रश्नांना निर्माण होण्याची दोन कारणे एक प्रापंचिकाच्या अंतरंगातला मत्सर आणि समाजामध्ये चालणारी बुवाबाजी जी कुठल्या ना कुठल्या टप्प्यावरती पकडली जाते. मग ही अशी पकडली गेलेली बुवाबाजी एका संतांच्या विषयत्यागाला काळाच्या पडद्याआड घेऊन जाते. आणि सामान्य माणसाच्या अंतरंगामध्ये असा संशय निर्माण करते की हे सर्वकाही विषयामध्येच गुंतलेले आहेत.त्यामुळे आपण आणि ते वेगळे नसूनही त्यांना या जगामध्ये एवढं प्रचंड स्थान कशा दृष्टीने प्राप्त झालं, त्यांनी हा परमार्थ कसा प्राप्त केला, ते या विषयामध्ये असताना देखील भगवंताशी कसे तद्रूप होवू शकले. जानकी जीवन स्मरण जय जय राम लक्ष्मीकांत खडके 🙏

+2 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 0 शेयर

भारत का एकमात्र धार्मिक सोशल नेटवर्क

Rate mymandir on the Play Store
5000 से भी ज़्यादा 5 स्टार रेटिंग
डेली-दर्शन, भजन, धार्मिक फ़ोटो और वीडियो * अपने त्योहारों और मंदिरों की फ़ोटो शेयर करें * पसंद के पोस्ट ऑफ़्लाइन सेव करें
सिर्फ़ 4.5MB