_*वैचारिकता.....*_ _माणसं बदलली की का बदलली म्हणून चर्चा होऊ लागते.पण त्यांच्यावर असं बदलायची वेळ का आणि कोणी आणली याचा मात्र कोणीही विचार नाही करत.माणसानं धडधड बोलावं खळखळून हसावं दिलखुलास विनोद करावा आणि मनसोक्त रडावं थोडक्यात सांगायचे म्हणलं तर स्वत:चं व्यक्तीमत्व स्वतःच बनवावं.शारीरिक सौंदर्याने माणसं फक्त नोटीस केली जातात.आठवणीत राहण्यासाठी मात्र स्वभावच महत्त्वाचा असतो._ _ज्याला दु:खाची जाणीव असते,त्याला सुखाची किंमतही असते म्हणून आपण जे दिवस काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवावी.सुंदर चेहरा म्हतारा होतो,बलाढ्य शरीर एक दिवस गळून पडते,पदसुध्दा एक दिवस निघून जातं परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो._ _एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आयुष्यात कधीही स्वतःला कुणा पेक्षा कमी समजू नका आणि कुणा पेक्षा श्रेष्ठही समजू नका.कारण स्वतःला कमी समजल्याने आत्मविश्वास कमी होतो आणि श्रेष्ठ समजल्याने अहंकार निर्माण होतो.सर्व काही जिंकता येते संस्काराने आणि जिंकलेले सर्व हरू शकते अहंकाराने._ _ज्याला प्रेम समजतं,शब्द समजतो तो वेळ पाळतो आणि ज्याला फक्त स्वार्थ समजतो तो वेळ साधतो.पश्चात्ताप भूतकाळ बदलू शकत नाही आणि काळजी भविष्याला आकार देऊ शकत नाही.म्हणूनच वर्तमानाचा आनंद घेणे हेच जीवनाचे खरे सुख आहे.माणसानं राजहंसासारखं असावं.आपल्याला जे पटेल तेच घ्यावं नाही ते सोडून द्यावं.ज्या निर्णयामुळे सगळ्या आयुष्याला वेगळं वळण मिळण्याची शक्यता असते तिथं स्पीड कमी करावा.इतकच नाही तर क्षणभर थांबावं सुध्दा._ _मानवी नाते हे कधीच नैसर्गिक रित्या तुटत नाही मनुष्यच त्याला संपवतो.कारण ते मरते एकतर तिरास्कराने दुसरे दुर्लक्ष केल्यामुळे तिसरे गैरसमजामुळे आणि चौथे लोकांनी कान भरल्यामुळे तरी कृपया नात्यांमधे विश्वास ठेवा व नाती प्रेमाने जपा.....

_*वैचारिकता.....*_

_माणसं बदलली की का बदलली म्हणून चर्चा होऊ लागते.पण त्यांच्यावर असं बदलायची वेळ का आणि कोणी आणली याचा मात्र कोणीही विचार नाही करत.माणसानं धडधड बोलावं खळखळून हसावं दिलखुलास विनोद करावा आणि मनसोक्त रडावं थोडक्यात सांगायचे म्हणलं तर स्वत:चं व्यक्तीमत्व स्वतःच बनवावं.शारीरिक सौंदर्याने माणसं फक्त नोटीस केली जातात.आठवणीत राहण्यासाठी मात्र स्वभावच महत्त्वाचा असतो._
_ज्याला दु:खाची जाणीव असते,त्याला सुखाची किंमतही असते म्हणून आपण जे दिवस काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवावी.सुंदर चेहरा म्हतारा होतो,बलाढ्य शरीर एक दिवस गळून पडते,पदसुध्दा एक दिवस निघून जातं परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो._
_एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आयुष्यात कधीही स्वतःला कुणा पेक्षा कमी समजू नका आणि कुणा पेक्षा श्रेष्ठही समजू नका.कारण स्वतःला कमी समजल्याने आत्मविश्वास कमी होतो आणि श्रेष्ठ समजल्याने अहंकार निर्माण होतो.सर्व काही जिंकता येते संस्काराने आणि जिंकलेले सर्व हरू शकते अहंकाराने._
_ज्याला प्रेम समजतं,शब्द समजतो तो वेळ पाळतो आणि ज्याला फक्त स्वार्थ समजतो तो वेळ साधतो.पश्चात्ताप भूतकाळ बदलू शकत नाही आणि काळजी भविष्याला आकार देऊ शकत नाही.म्हणूनच वर्तमानाचा आनंद घेणे हेच जीवनाचे खरे सुख आहे.माणसानं राजहंसासारखं असावं.आपल्याला जे पटेल तेच घ्यावं नाही ते सोडून द्यावं.ज्या निर्णयामुळे सगळ्या आयुष्याला  वेगळं वळण मिळण्याची शक्यता  असते तिथं स्पीड कमी करावा.इतकच नाही तर क्षणभर  थांबावं सुध्दा._
_मानवी नाते हे कधीच नैसर्गिक रित्या तुटत नाही मनुष्यच त्याला संपवतो.कारण ते मरते एकतर तिरास्कराने दुसरे दुर्लक्ष केल्यामुळे तिसरे गैरसमजामुळे आणि चौथे लोकांनी कान भरल्यामुळे तरी कृपया नात्यांमधे विश्वास ठेवा व नाती प्रेमाने जपा.....

+8 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 31 शेयर

_*नियती....*_ _*नियती* कधीच कुणावर अन्याय करत नाही,कधीच नाही.ती फक्त न्यायच करते.स्वतःविषयी अवास्तव कल्पना,इतरांच्या परिस्थितीशी तुलना आणि कसलाही शेंडाबुडखा नसलेला हव्यास यामुळे आपल्याला तो न्यायही अन्यायच वाटू लागतो.नियती ही एखाद्या पिठाच्या गिरणीसारखी आहे.एकीकडून जे कर्म टाकाल,दुसरीकडून त्याचंच पीठ काढून तुमच्या पिशवीत दिलं जातं.रांगेत तुमच्या आधी उभ्या असलेल्या माणसाला स्वच्छ सोनेरी रंगाचं,ताजं गव्हाचं पीठ मिळालं म्हणजे मलाही तेच हवं असा अट्टाहास तुम्ही करता आणि स्वतःच्या कर्माच्या पिशवीत मात्र कण्याच आणल्या आहेत ते सोयिस्करपणे विसरता बरं.जे पेराल तेच उगवेल म्हणून आत्ताचं क्रियमाण (वर्तमान कर्म )सुधारा तेच उद्यासाठीचं पूर्वसंचित आहे.*कितीही तुलना केलीत तरी तुमच्या नशिबात केवळ तुमच्याच हक्काचं आणि संचिताचं पीठ दिलं जातं हे विसरु नका....*_ _*मिञानो;काळजी घ्या.....*_

+10 प्रतिक्रिया 2 कॉमेंट्स • 33 शेयर

_*तुका म्हणे सारासार विचार करा उठाउठी !!....*_ _विचाराचा ज्ञान-प्रकियेशी संबंध आहे.यातील तात्विक विचार बाजूला ठेवला तरी विचार नावाचे काहीतरी आपल्या डोक्यात चालू असते.एका विचारातून दुसऱ्या विचाराकडे आपण जात असतो आणि अनेकदा अशा विचाराच्या समुद्रात आपण मग्न होत असतो.व्यवहारात या विचारांची उपयुक्तता आपल्याला तपासून पाहावी लागते.योग्य विचार आपण निवडू शकलो तर आपल्या जगण्यात अडथळे येत नाहीत.प्रत्येकाने आत्मपरीक्षण करून स्वतःला विचारावे की;या पृथ्वीवर आपण जीव धारण करण्याचे प्रयोजन काय असावे?जर असेल आणि काही कार्य करायचे असेल तर,आपण आपल्या सामर्थ्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.आपल्या कमकुवतपणा आणि नातेसंबंधांची काळजी घ्यायला हवी.यामुळे कदाचित जीवनातील कर्तव्यांचे ज्ञान होईल आणि आपल्या सर्व कार्यात मार्ग दिसतील.तुम्हाला जे काही काम करायचे आहे त्यात तुमची आवड आणि समर्पण आसल्याशिवाय ते काम करू नका.याचा परिणाम असा होईल की अकीर्ति,अपमान तुमच्यापासून कायम दूर राहतील,पश्चात्ताप तुमच्या जवळ येणार नाही,तुम्हाला शोक करावा लागणार नाही.जोपर्यंत तुम्हाला खात्री पटत नाही तोपर्यंत तोंड उघडू नका.जो अविचारी आहे तो आपल्या जिभेवर ताबा ठेवू शकत नाही,मन जे ऐकेल ते म्हणतो आणि मग आपल्याच मूर्खपणाच्या बोलण्यातून भांडणात अडकतो.जो माणूस घाईघाईने धावतो आणि पलीकडे काय आहे याचा विचार न करता किंवा न पाहता भिंतीवर चढतो,तो त्याच्या पलीकडे असलेल्या खड्ड्यात पडू शकतो.परिणामांचा विचार न करता काही काम करणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीतही असेच होते.म्हणून *विचारांच्या हाकेला मान द्या.त्याचे शब्द शहाणपणाचे शब्द आहेत,त्याने दाखवलेल्या मार्गांनी तुमचे रक्षण होईल आणि शेवटी तुम्हाला सत्याची भेट होईल....*_ _*मिञानो;काळजी घ्या.....*_

+6 प्रतिक्रिया 2 कॉमेंट्स • 24 शेयर

_*तुका म्हणे सारासार विचार करा उठाउठी !!....*_ _विचाराचा ज्ञान-प्रकियेशी संबंध आहे.यातील तात्विक विचार बाजूला ठेवला तरी विचार नावाचे काहीतरी आपल्या डोक्यात चालू असते.एका विचारातून दुसऱ्या विचाराकडे आपण जात असतो आणि अनेकदा अशा विचाराच्या समुद्रात आपण मग्न होत असतो.व्यवहारात या विचारांची उपयुक्तता आपल्याला तपासून पाहावी लागते.योग्य विचार आपण निवडू शकलो तर आपल्या जगण्यात अडथळे येत नाहीत.प्रत्येकाने आत्मपरीक्षण करून स्वतःला विचारावे की;या पृथ्वीवर आपण जीव धारण करण्याचे प्रयोजन काय असावे?जर असेल आणि काही कार्य करायचे असेल तर,आपण आपल्या सामर्थ्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.आपल्या कमकुवतपणा आणि नातेसंबंधांची काळजी घ्यायला हवी.यामुळे कदाचित जीवनातील कर्तव्यांचे ज्ञान होईल आणि आपल्या सर्व कार्यात मार्ग दिसतील.तुम्हाला जे काही काम करायचे आहे त्यात तुमची आवड आणि समर्पण आसल्याशिवाय ते काम करू नका.याचा परिणाम असा होईल की अकीर्ति,अपमान तुमच्यापासून कायम दूर राहतील,पश्चात्ताप तुमच्या जवळ येणार नाही,तुम्हाला शोक करावा लागणार नाही.जोपर्यंत तुम्हाला खात्री पटत नाही तोपर्यंत तोंड उघडू नका.जो अविचारी आहे तो आपल्या जिभेवर ताबा ठेवू शकत नाही,मन जे ऐकेल ते म्हणतो आणि मग आपल्याच मूर्खपणाच्या बोलण्यातून भांडणात अडकतो.जो माणूस घाईघाईने धावतो आणि पलीकडे काय आहे याचा विचार न करता किंवा न पाहता भिंतीवर चढतो,तो त्याच्या पलीकडे असलेल्या खड्ड्यात पडू शकतो.परिणामांचा विचार न करता काही काम करणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीतही असेच होते.म्हणून *विचारांच्या हाकेला मान द्या.त्याचे शब्द शहाणपणाचे शब्द आहेत,त्याने दाखवलेल्या मार्गांनी तुमचे रक्षण होईल आणि शेवटी तुम्हाला सत्याची भेट होईल....*_ _*मिञानो;काळजी घ्या.....*_

+6 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 5 शेयर

+8 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 16 शेयर

_*श्रावण....*_ _तिन्ही सांजेला तेलाचा दिवा,तुपाचं निरांजन लावून केलेल्या दिपपूजनानंतर प्रकाशमान होणारं घर आणि त्यांत मिसळलेले शुभंकरोतीचे सूर,दिव्याची आवस म्हणून जाड कणिक,केशरी गूळ वापरून केलेले खमंग दिवे आणि त्यावर मुक्तहस्ते घातलेलं रवाळ तूप म्हणजेच येणाऱ्या श्रावणाची चाहूल.डबा भर चिरलेला पिवळा धम्मक गूळ,हरभरा डाळ,भाजलेले दाणे,फुटाणे,दाण्याचं खमंग कूट,नुकतीच करून ठेवलेली वेलचीची पुड,उपासाची भाजणी राजगिरा लाडू व खजूर यांनी भरलेले डबे म्हणजेच श्रावणाच्या स्वागतासाठी सजलेलं घरातलं स्वयंपाकघर.जिवतीचा फोटो,कहाण्यांच पुस्तक,स्वच्छ घासून चमकणारं पळीपंचपात्र,दिव्यांनी सजलेलं देवघर,फुलपुडीतून डोकावणाऱ्या दुर्वा आघाडा फुलं आणि सगळी मरगळ झटकून सजलेेलं घर म्हणजेच श्रावणाचं आगमन.श्रावण म्हणजे आवर्जून करायचं पुरण,भाजणीचे वडे,नारळी भात, नारळाच्या वडया,वालाचं बिरडं,गव्हाची खीर,हारोळ्याचे लाडू,भोपळयाचे घारगे,गाकर,पुरणाची पोळी,पुरणाचे दिंड आणि दूध फुटाण्याचा नैवेद्य.श्रावण म्हणजे वेगवेेगळ्या चवींतून घरांत दरवळणारा गंध.श्रावण म्हणजे बहीण भावाच्या प्रेमाची राखी,आईने मुलांसाठी केलेली जिवतीची पूजा,शुक्रवारी मुलांच केलेलं पुरणाचं औक्षण,आपल्या घरासाठी सर्वांच्या आनंदासाठी केलेली देवीची पूजा,माहेरची येणारी आठवण म्हणून आई वहीनीकडे झालेलं सौवाष्ण जेवण व मैत्रिणींबरोबर सजलेली मंगळागौर,प्रत्येक नात्याला जपणारा हा श्रावण अनेक रंगांची उधळण करत येणारा श्रावण.श्रावण म्हणजे गाभाऱ्यात उमटणारे ओंकार,श्रावण म्हणजे समईतल्या शुभ्र प्रकाशात दिसणारं पांढऱ्या फुलांनी सजलेलं शिवलिंग,कापसाच्या वस्त्रानं,हळदी कुंकवाच्या करंड्यानं धुप अगरबत्ती दिवा आणि चंदनाने सजलेलं पूजेचं ताट,गोकर्ण जाई जुई तगर जास्वंद बेल दुर्वा पत्री तुळस यांनी सजलेली पूजेची परडी.श्रावण म्हणजे प्राजक्ताच्या सडयाने नटलेलं आणि श्रावण सरींनी सजलेलं आपल आंगण.श्रावण म्हणजे हिरवा ऋतु या सजलेल्या निसर्गाच्या बरोबरीने सजायचे दिवस.कांकणांची किणकीण,काचेचा चुडा,हातावरची मेंदी,जरी काठाच्या साड्या,केसांत जुईचा गजरा,पायी जोडव्यांचा आवाज,गळ्यांत मंगळसूत्राबरोबर चमकणारा सर,कानांत कुड्या आणि पायांत पैंजण म्हणजेच घरातही भेटणारा,सजवणारा श्रावण.श्रावण म्हणजे आठवणींची सर,श्रावण म्हणजे डोळे मिटतां केवड्याच्या पानाचा पसरलेला गंध तर कधी तिच्या चाहुलीने दरवळणारा सभोवताल,श्रावण म्हणजे नेमाने देवळांत जाणाऱ्या आठवणी करून देणारा सण तर कधी मंगळागौर उजवताना दिलेल्या वाणाची एक गोड आठवण,श्रावण म्हणजे शुक्रवारी न चुकता केलेलं औक्षण,माहेरवाशीण म्हणून भरलेली ओटी आणि आग्रहानं खावू घातलेली पुरणाची मऊसूत पोळी श्रावण म्हणजे देव्हाऱ्यांत समईच्या मंद प्रकाशात दिसणारं प्रसन्न रूप श्रावण म्हणजे आई तुझ्या आठवणींचा पाऊस...._ _*मिञानो;काळजी घ्या.....*_

+5 प्रतिक्रिया 2 कॉमेंट्स • 10 शेयर

तमसो मा ज्योतिर्गमय🙏🙏🙏 आज दीप अमावस्या. दीप पूजनाचा दिवस. हा दीप आपले जीवन सर्वार्थाने उजळो हीच शुभेच्छा !! आषाढ अमावस्या म्हणजेच दिव्यांची अमावस्या. घरातील दिव्यांना घासून-पुसून स्वच्छ करावेत. पाटावर वस्त्र घालून भोवती रांगोळ्या काढाव्या. पाटावर दिवे मांडून त्यांची पूजा करावी. आज पासूनच पत्रीचे महत्त्व सुरु होते. आघाडा, दुर्वा, पिवळी फुले यांनी दिव्यांची पुजा करावी. दुर्वा ही वंश वृद्धीचे प्रतिक आहे , त्यामुळे ते ही अर्पण करून प्रार्थना करावी. गोडाचा नेवैद्य अर्पण करावा. आपल्या घरातील लहान मुलांना औक्षण करावे. दिव्याची प्रार्थना : ‘दीप सूर्याग्निरुपस्त्वं तेजसां तेज उत्तमम्‌| गृहाण मत्कृतां पूजां सर्वकामप्रदो भव॥ त्याचा अर्थ असा...हे दीपा, तू सूर्यरुप व अग्निरुप आहेस. तेजा मध्ये तू उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर.

+5 प्रतिक्रिया 3 कॉमेंट्स • 4 शेयर

भारत का एकमात्र धार्मिक सोशल नेटवर्क

Rate mymandir on the Play Store
5000 से भी ज़्यादा 5 स्टार रेटिंग
डेली-दर्शन, भजन, धार्मिक फ़ोटो और वीडियो * अपने त्योहारों और मंदिरों की फ़ोटो शेयर करें * पसंद के पोस्ट ऑफ़्लाइन सेव करें
सिर्फ़ 4.5MB