*श्रीराम समर्थ* *समर्थ रामदासस्वामी रचित दासबोधावरील श्री रविंद्र पाठक यांची निरूपणें.दशक ११- भीमदशक,समास ७ – चंचळनदीनिरूपण,निरूपण क्रमांक ४२५ – भाग १ मधील सार.* श्रीमद् दासबोधातील अकरावा दशक ज्याचे शीर्षक समर्थांनी भीमदशक असे ठेवलेले आहे त्यामध्ये समर्थांना अभिप्रेत असलेला महंत कशा पद्धतीने ओळखायचा त्याची अंतरंगाची आणि बहिरंगाची लक्षणे कोणती, तो रामकार्यासाठी तयार होत असतो ती प्रक्रिया नेमकी कशी असते याचे चिंतन गेल्या सहा समासातून आपण बघितले, हा सातवा समास या महंताने गाजवलेल्या भीम पराक्रमाचा आहे. या चंचळनदी निरूपणाच्या समासातून समर्थ महंताचा पुरूषार्थ काय असतो तो आपल्याला सांगणार आहेत. समर्थांनी मूळमायेवर नदीचे मोठे सुरस रूपक रचलेले आहे. मूळमाया चंचळ व वासनामय असल्याने ती वाहत्या नदीसारखी आहे, मग ही नदी कुठली आहे? कुठला हा प्रवाह आहे जो अशा या दृश्याजगाला सर्वत्र व्यापून उरलेला आहे अशी चंचळनदी म्हणजे नेमके काय? ज्ञानदशकामध्ये आपण या सृष्टीची रचना बघितली की, निश्चळ,निर्गुण, निराकार परब्रह्मामध्ये ही मूळमाया निर्माण झाल्याचा जो भास होतो की ज्याच्यामुळे हे ब्रह्म आपल्याला चंचळ झाल्यासारखे भासते अशी ही मूळमाया जी जाणीवरूप आहे, तिच्यात प्रचंड ऊर्जा आहे, जिथं ऊर्जा आहे तिथं त्याचे स्थित्यंतर होणं हे अभिप्रेत आहे. मग ही मूळमाया ज्या ॐकार स्वरूपामधून एकप्रकारे या मितिकाक्षराच्या ध्वनीच्या आधाराने जाणीव रूपाने वाहू लागते, जाणीव रूपात जिच्यामध्ये चंचळपण दिसू लागतं, हालचाल दिसू लागते, ही हालचाल, हे चंचळपण जिच्यात सर्व ऊर्जा सामावलेली आहे, या पंचमहाभूतांचे बीज सामावलेले आहे अशी ही प्रचंड ऊर्जा असलेली हालचाल किती विलक्षण असेल. ही मूळमाया ज्यावेळेला स्थित्यंतराच्या आधाराने चंचळत्व धारण करते तेव्हा तिचा प्रचंड मोठा प्रवाह वाहू लागतो. समर्थ म्हणतात की, मूळमाया ही जोपर्यंत तुम्हांला अनुभूतीच्या आधाराने कळणार नाही तोपर्यंत हे केवळ शब्दांचे बुडबूडे तुमच्यासाठी राहतील, तुम्हांला कधीच तिच्या अस्तित्वाची प्रचिती येऊ शकणार नाही. कारण तुमची बुद्धी तर्काच्या आधारे कल्पना प्रांताला ओलांडून पुढं जाऊच शकणार नाही, आणि जोपर्यंत कल्पना आहे तोपर्यंत अनुमान आहे, जोपर्यंत कल्पनेचा प्रांत संपत नाही तोपर्यंत प्रचितीचा प्रांत उघडत नाही, आणि या प्रचितीच्या प्रांताला जोपर्यंत साधक अंतरंगामध्ये श्रद्धेच्या आधारे दृढ करत नाही तोपर्यंत या मूळमायेच्या अस्तित्वाचा भाग कळू शकत नाही. तोपर्यंत या चंचळनदीचा उद्गमबिंदू नीट कळू शकणार नाही. भगवंताच्या नामाचा जो उद्गमबिंदू आहे जिथून या मूळमायेची निर्मिती, तिचा प्रसव या ब्रह्मस्वरूपात दृश्यबाजूनी आपल्याला दिसू लागला तो हा प्रचितीचा प्रांत आहे. मग या प्रचितीच्या प्रांताला कसं बरं समजून घ्यायचं? या प्रचितीच्या प्रांताला तोच जाणू शकतो ज्याच्यावरती ही मूळमाया जाणण्याची कृपा करत असते, ही मूळमाया जोपर्यंत त्या जिवावरती कृपाप्रसाद देऊन आपले स्वतःचे स्वरूप दाखवत नाही तोपर्यंत मूळमायेची, या जगदंबेची व्याप्ती जीव बुद्धीच्या, तर्काच्या आधारे जाणू शकत नाही. ज्ञानेश्वरीत माऊली म्हणते की, आईच्या गर्भात असलेले बालक जसे आपल्या आईला बघू शकत नाही तशी आम्ही या मूळमायेचीच सर्व लेकरं आहोत, या मूळमायेच्या आधाराने आम्ही सर्वजण हा देह धारण करून बसलेलो आहोत, आम्ही कशा पद्धतीने सांगणार की ही मूळमाया कशी आहे? आम्ही जे काही सांगूत ते आमचे अनुमान असेल, म्हणून मग तिला जाणण्याचा मार्ग एकच तो म्हणजे तिची संपूर्ण कृपा प्राप्त करून घेणं. आणि तिच्या कृपेचा मार्ग समर्थ आपल्याला सांगतात... *चंचळनदीगुप्त गंगा | स्मरणें पावन करीं जगा |* *प्रचित रोकडी पाहा गा | अन्यथा नव्हे ||११.७.१.||* ही मूळमाया,ही जगदंबा,अर्थातच मूळपुरूषाची भार्या,अर्थातच मूळपुरूषाची अर्धांगिनी ही केवळ त्या नारायणाच्या स्मारणातून, तिच्या असलेल्या अस्तित्वाच्या बोधातून आपल्याला कळू शकते. आणि तिच्या स्मरणाने जेव्हा आपलं मन अति शुद्ध होऊ लागतं तेव्हा मनामध्ये प्रकाश रूपाने आपली स्वतःची प्रचिती ही मूळमाया दाखवते. माया या शब्दाला आम्ही बऱ्याचदा नकारात्मक दृष्टीने वापरतो. माया म्हणजे मिथ्या आहे, माया या शब्दामध्ये काही अर्थ नाही अशा विचित्र पद्धतीने मायेचा अर्थ आजपर्यंत आपल्याला कळालेला आहे. पण समर्थ या मूळमायेला कुठल्याही प्रकारच्या या प्रवाहाला नदीमध्ये सर्वोत्तम असलेली अत्यंत पावन अशा गंगेचे रूप देतात. केवळ लौकिक जगातली गंगा ही आपल्याला प्रगट झालेली दिसते. पण मूळमायारूपी गंगा ही चंचळनदी गुप्तगंगा आहे. आणि जसं गंगेच्या स्नानाने आपण देहाने पवित्र होतो तसं या मूळमायेच्या चंचळरूपी गंगेच्या स्मरणाने सर्व जगाला पावन करणारी ही मूळमाया प्रसाद रूपाने आपली प्रचिती देते तरच आपण तिच्या रूपाला जाणू शकतो अन्यथा तिला जाणण्याचा दुसरा कुठलाही मार्ग नाही. ज्यापद्धतीने एखादा धबधबा हा डोंगराच्या माथ्यावरून खाली पडावा त्यापद्धतीने या परब्रह्माचे एका सूक्ष्मरूपाने एका मितीकाक्षराच्या रूपाने प्रसवलेली ही मूळमाया तिच्या या प्रवाहामध्ये एखाद्या धबधब्यासारखी अधोमुख पद्धतीने वाहू लागली. अशा पद्धतीने परब्रह्मात अत्यंत सूक्ष्मरूपाने निर्माण झालेली ही जाणीव रूपाने विस्तार पावलेली मूळमाया ज्यावेळेला या अधोमुखाच्या दृष्टीने वाहत,वाहत गुणमायेच्या रूपातून या सृष्टीमध्ये आपल्या वेगवेगळ्या रंगाच्या आधारे प्रगटू लागते तेव्हा तिचा खरा असलेला ऊर्जेचा भाग, तिचे हे जाणीवेच्या आधारे चाललेले कार्य आपल्याला कळू लागतं. अशा मूळमायेला या चराचरांमध्ये ठायी, ठायी आपण बघू शकतो, आणि जर ती दृष्टी नसेल तर तिला आपण कधीच या दृश्यजगामध्ये अनुभवू शकत नाही. त्यामुळं या मूळमायेला आणि महादेवाला श्रद्धा विश्वास रूपीनो असे नाव दिलेले आहे. महादेवाला श्रद्धेचे तर मूळमायेला विश्वासाचे रूप याच दृष्टीने सर्व संतांनी दिलेले आहे. कारण की त्या विश्वासातून जो या दृश्यजगाकडे बघतो त्यालाच केवळ आणि केवळ ही मूळमायाच सर्वत्र भरून उरलेली आहे असे दिसते. जानकी जीवन स्मरण जय जय राम लक्ष्मीकांत खडके 🙏

*श्रीराम समर्थ*

*समर्थ रामदासस्वामी रचित दासबोधावरील श्री रविंद्र पाठक यांची निरूपणें.दशक ११- भीमदशक,समास ७ – चंचळनदीनिरूपण,निरूपण क्रमांक ४२५ – भाग १ मधील सार.*

श्रीमद् दासबोधातील अकरावा दशक ज्याचे शीर्षक समर्थांनी भीमदशक असे ठेवलेले आहे त्यामध्ये समर्थांना अभिप्रेत असलेला महंत कशा पद्धतीने ओळखायचा त्याची अंतरंगाची आणि बहिरंगाची लक्षणे कोणती, तो रामकार्यासाठी तयार होत असतो ती प्रक्रिया नेमकी कशी असते याचे चिंतन गेल्या सहा समासातून आपण बघितले, हा सातवा समास या महंताने गाजवलेल्या भीम पराक्रमाचा आहे. या चंचळनदी निरूपणाच्या समासातून समर्थ महंताचा पुरूषार्थ काय असतो तो आपल्याला सांगणार आहेत.

समर्थांनी मूळमायेवर नदीचे मोठे सुरस रूपक रचलेले आहे. मूळमाया चंचळ व वासनामय असल्याने ती वाहत्या नदीसारखी आहे, मग ही नदी कुठली आहे? कुठला हा प्रवाह आहे जो अशा या दृश्याजगाला सर्वत्र व्यापून उरलेला आहे अशी चंचळनदी म्हणजे नेमके काय?

ज्ञानदशकामध्ये आपण या सृष्टीची रचना बघितली की, निश्चळ,निर्गुण, निराकार परब्रह्मामध्ये ही मूळमाया निर्माण झाल्याचा जो भास होतो की ज्याच्यामुळे हे ब्रह्म आपल्याला चंचळ झाल्यासारखे भासते अशी ही मूळमाया जी जाणीवरूप आहे, तिच्यात प्रचंड ऊर्जा आहे, जिथं ऊर्जा आहे तिथं त्याचे स्थित्यंतर होणं हे अभिप्रेत आहे. मग ही मूळमाया ज्या ॐकार स्वरूपामधून एकप्रकारे या मितिकाक्षराच्या ध्वनीच्या आधाराने जाणीव रूपाने वाहू लागते, जाणीव रूपात जिच्यामध्ये चंचळपण दिसू लागतं, हालचाल दिसू लागते, ही हालचाल, हे चंचळपण जिच्यात सर्व ऊर्जा सामावलेली आहे, या पंचमहाभूतांचे बीज सामावलेले आहे अशी ही प्रचंड ऊर्जा असलेली हालचाल किती विलक्षण असेल. ही मूळमाया ज्यावेळेला स्थित्यंतराच्या आधाराने चंचळत्व धारण करते तेव्हा तिचा प्रचंड मोठा प्रवाह वाहू लागतो.

समर्थ म्हणतात की, मूळमाया ही जोपर्यंत तुम्हांला अनुभूतीच्या आधाराने कळणार नाही तोपर्यंत हे केवळ शब्दांचे बुडबूडे तुमच्यासाठी राहतील, तुम्हांला कधीच तिच्या अस्तित्वाची प्रचिती येऊ शकणार नाही. कारण तुमची बुद्धी तर्काच्या आधारे कल्पना प्रांताला ओलांडून पुढं जाऊच शकणार नाही, आणि जोपर्यंत कल्पना आहे तोपर्यंत अनुमान आहे, जोपर्यंत कल्पनेचा प्रांत संपत नाही तोपर्यंत प्रचितीचा प्रांत उघडत नाही, आणि या प्रचितीच्या प्रांताला जोपर्यंत साधक अंतरंगामध्ये श्रद्धेच्या आधारे दृढ करत नाही तोपर्यंत या मूळमायेच्या अस्तित्वाचा भाग कळू शकत नाही. तोपर्यंत या चंचळनदीचा उद्गमबिंदू नीट कळू शकणार नाही. भगवंताच्या नामाचा जो उद्गमबिंदू आहे जिथून या मूळमायेची निर्मिती, तिचा प्रसव या ब्रह्मस्वरूपात दृश्यबाजूनी आपल्याला दिसू लागला तो हा प्रचितीचा प्रांत आहे. मग या प्रचितीच्या प्रांताला कसं बरं समजून घ्यायचं?
या प्रचितीच्या प्रांताला तोच जाणू शकतो ज्याच्यावरती ही मूळमाया जाणण्याची कृपा करत असते, ही मूळमाया जोपर्यंत त्या जिवावरती कृपाप्रसाद देऊन आपले स्वतःचे स्वरूप दाखवत नाही तोपर्यंत मूळमायेची, या जगदंबेची व्याप्ती जीव बुद्धीच्या, तर्काच्या आधारे जाणू शकत नाही.

ज्ञानेश्वरीत माऊली म्हणते की, आईच्या गर्भात असलेले बालक जसे आपल्या आईला बघू शकत नाही तशी आम्ही या मूळमायेचीच सर्व लेकरं आहोत, या मूळमायेच्या आधाराने आम्ही सर्वजण हा देह धारण करून बसलेलो आहोत, आम्ही कशा पद्धतीने सांगणार की ही मूळमाया कशी आहे? आम्ही जे काही सांगूत ते आमचे अनुमान असेल, म्हणून मग तिला जाणण्याचा मार्ग एकच तो म्हणजे तिची संपूर्ण कृपा प्राप्त करून घेणं. आणि तिच्या कृपेचा मार्ग समर्थ आपल्याला सांगतात...

*चंचळनदीगुप्त गंगा | स्मरणें पावन करीं जगा |*
*प्रचित रोकडी पाहा गा | अन्यथा नव्हे ||११.७.१.||*

ही मूळमाया,ही जगदंबा,अर्थातच मूळपुरूषाची भार्या,अर्थातच मूळपुरूषाची अर्धांगिनी ही केवळ त्या नारायणाच्या स्मारणातून, तिच्या असलेल्या अस्तित्वाच्या बोधातून आपल्याला कळू शकते. आणि तिच्या स्मरणाने जेव्हा आपलं मन अति शुद्ध होऊ लागतं तेव्हा मनामध्ये प्रकाश रूपाने आपली स्वतःची प्रचिती ही मूळमाया दाखवते.

माया या शब्दाला आम्ही बऱ्याचदा नकारात्मक दृष्टीने वापरतो. माया म्हणजे मिथ्या आहे, माया या शब्दामध्ये काही अर्थ नाही अशा विचित्र पद्धतीने मायेचा अर्थ आजपर्यंत आपल्याला कळालेला आहे. पण समर्थ या मूळमायेला कुठल्याही प्रकारच्या या प्रवाहाला नदीमध्ये सर्वोत्तम असलेली अत्यंत पावन अशा गंगेचे रूप देतात. केवळ लौकिक जगातली गंगा ही आपल्याला प्रगट झालेली दिसते. पण मूळमायारूपी गंगा ही चंचळनदी गुप्तगंगा आहे. आणि जसं गंगेच्या स्नानाने आपण देहाने पवित्र होतो तसं या मूळमायेच्या चंचळरूपी गंगेच्या स्मरणाने सर्व जगाला पावन करणारी ही मूळमाया प्रसाद रूपाने आपली प्रचिती देते तरच आपण तिच्या रूपाला जाणू शकतो अन्यथा तिला जाणण्याचा दुसरा कुठलाही मार्ग नाही.

ज्यापद्धतीने एखादा धबधबा हा डोंगराच्या माथ्यावरून खाली पडावा त्यापद्धतीने या परब्रह्माचे एका सूक्ष्मरूपाने एका मितीकाक्षराच्या रूपाने प्रसवलेली ही मूळमाया तिच्या या प्रवाहामध्ये एखाद्या धबधब्यासारखी अधोमुख पद्धतीने वाहू लागली.

अशा पद्धतीने परब्रह्मात अत्यंत सूक्ष्मरूपाने निर्माण झालेली ही जाणीव रूपाने विस्तार पावलेली मूळमाया ज्यावेळेला या अधोमुखाच्या दृष्टीने वाहत,वाहत गुणमायेच्या रूपातून या सृष्टीमध्ये आपल्या वेगवेगळ्या रंगाच्या आधारे प्रगटू लागते तेव्हा तिचा खरा असलेला ऊर्जेचा भाग, तिचे हे जाणीवेच्या आधारे चाललेले कार्य आपल्याला कळू लागतं.
अशा मूळमायेला या चराचरांमध्ये ठायी, ठायी आपण बघू शकतो, आणि जर ती दृष्टी नसेल तर तिला आपण कधीच या दृश्यजगामध्ये अनुभवू शकत नाही. त्यामुळं या मूळमायेला आणि महादेवाला श्रद्धा विश्वास रूपीनो असे नाव दिलेले आहे. महादेवाला श्रद्धेचे तर मूळमायेला विश्वासाचे रूप याच दृष्टीने सर्व संतांनी दिलेले आहे. कारण की त्या विश्वासातून जो या दृश्यजगाकडे बघतो त्यालाच केवळ आणि केवळ ही मूळमायाच सर्वत्र भरून उरलेली आहे असे दिसते.

जानकी जीवन स्मरण जय जय राम
     लक्ष्मीकांत खडके 
         🙏

+14 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 9 शेयर

*श्रीराम समर्थ* *समर्थ रामदासस्वामी रचित दासबोधावरील श्री रविंद्र पाठक यांची निरूपणें.दशक १२-विवेक-वैराग्य,समास ८- काळरूपनिरूपण,निरूपण क्रमांक ४७२–भाग ४ मधील सार.* दासबोधातील बाराव्या दशकातील आठव्या समासामध्ये समर्थांनी काळाचे स्वरूप आपल्याला समजावून सांगितले त्यातून एक मुद्दा समर्थ आपल्या ह्रदयामध्ये ठसवण्याचा प्रयत्न करतात की जिवनामध्ये प्रत्येकाचे श्वास हे ठरलेले आहेत,एकदा गेलेला श्वास,क्षण हा परत येवू शकत नाही, त्यामुळे आम्हांला जिवनात जे ख-या क्षणाच्या आधारे प्राप्त करायचे आहे,या काळावर भगवंताच्या स्मरणाच्या आधाराने जी सोन्याची मोहर उमटवायचीआहे ती जिवनात राहूनच जाते.श्रीमहाराजांचे या तत्वज्ञानाचे प्रतिपादन करताना पूज्य बाबांनी एका निरूपणामध्ये सांगितलं होतं की प्रपंच हा होत असतो व परमार्थ हा करावा लागतो. समर्थांनी सांगितले प्रपंच करावा नेटका नेटका म्हणजे सुटसुटीत, जेवढा गरजेचा आहे तेवढा,उगीच अवास्तव पसरलेला नाही की ज्याच्यामुळे आम्ही आमच्या जिवनाचे ध्येय हरवून बसूत.या नेटाकेपणात जेवढ्या काही प्रपंचचाला लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या अगदी अल्प काळात पूर्ण करून जास्तीत जास्त का हा भगवंताच्या स्मरणासाठी उपलब्ध करून देणे म्हणजे नेटकेपणा आहे. मनुष्याने त्याच्या जिवनामधल्या बालपण आणि तरूणपणाच्या काळात जिवनाला योग्य दिशा द्यायची ज्यामध्ये त्याचे योग्य शिक्षण,नोकरी-धंदा,योग्य पद्धतीने आयुष्य हे मध्यम टप्प्यावरती यायला सुरूवात होते तेव्हापासूनच आपल्या विचारांची दिशा परिपक्व ठेवली तर समर्थ म्हणतात...... *पदार्थी असावें उदास ! विवेक पाहावा सावकास !* *येणेंकरितां जगदीश ! अलभ्य लाभे !!१२.८.२९.!!* *जगदीशापरता लाभ नाही ! कार्याकारण सर्व कांहीं !* *संसार करित असतांनाही ! समाधान !!१२.८.३०.!!* प्रपंचमधल्या पदार्थरूपी वस्तूंविषयीच्या अपेक्षाच आम्हांला प्रपंचात बांधून ठेवत असतात,पदार्थाविषयीची आसक्ती हाच काळाचा अपव्यय करणारा मोठा दोष आमच्या जिवनात आहे.समर्थ म्हणतात की या प्रपंचात जे,जे काही कर्म करणे गरजेचे आहे ती कर्म तुम्ही यथासांग करा ते करत असतानाही तुम्हांला तुमच्या जिवनामध्ये समाधान टिकवता येवू शकते.संसारात कार्यकारणभावाच्या आधारे जगत असतानाही तुम्हांला जर या पदार्थाविषयी थोडीशी उदासीनता आणता आली तर खूप काळ भगवंताच्या स्मरणासाठी उपलब्ध होवू शकतो,प्रपंचचात राहत असतानाही हे सगळं करता येणे शक्य आहे.समर्थ म्हणतात ..... *मागा होते जनकादिक ! राज्य करितांहि अनेक !* *तैसेचि आता पुण्यश्लोक ! कित्येक असती !!१२.८.३१.!!* राजा जनक हा त्रेतायुगामध्ये झाला होता त्याने संपत्तीत राहत असतानाही त्याच्यामध्ये निर्लेपपण ठेवलं,तो कशानेही बांधला गेला नव्हता,असे अनेक राजा जनक या कलीयुगात देखील आहेत.म्हणजे प्रवृत्तीपर असतानाही निवृत्तीपर जीवन जगता येवू शकते हे केवळ त्रेतायुगातच नाही तर कलीयुगामध्येही असे अनेक पुण्यश्लोकी लोक आहेत. जिवनात आम्ही आंब्याची कोय आहोत का चिक्कुचे बी आहोत हा ज्याचा त्याने विचार करायचा, मग कदाचित जनकासारखी संपत्ती असेल किंवा एखादी चंद्रमोळी झोपडी असेल,आमच्या प्रपंच्यामधल्या अवस्थेत अंतरंगाची स्थिती काय आहे,या विषयत्यागाची स्थिती किती आहे हा विचार करण्याचा प्रश्न आहे.आणि ही निवृत्तीपर अवस्था प्रपंचात आम्हांला टिकवता आली तर समजावे की आम्ही आमच्या जिवनामध्ये हे सूत्र स्विकारले आहे की, प्रपंच हा होत असतो,परमार्थ हा करावा लागतो. या जन्ममृत्यूच्या चक्रातनं आम्हांला जर सुटायचे असेल तर प्रवृत्तीपर विचारधारेला आम्हांला सोडले पाहिजे.जिवनात अगदी उत्तुंग कर्म करत असतानाही निवृत्त्तीपर स्थिती जर आमच्या अंतरंगाची आम्ही ठेवू शकलो तर आम्ही काहीही प्राप्त करू शकत नाही.यासाठी समर्थ १७व्या शतकातले उदाहराण देऊन आपल्याला म्हणतात.... *हाट भरला संसाराचा ! नफा पाहावा देवाचा !* *तरीच या कष्टाचा ! परियाये होतो !!१२.८.३४.!!* आपण या प्रपंचरूपी असलेल्या व्यापारात हे सगळे काळाची गणिते त्यात किती क्षण आपले प्रवृत्तीपर गेले किती क्षण निवृत्तीपर गेले या सगळ्यांच्या बेरीज वजाबाकीमधून प्रवृत्तीपर आणलेल्या गोष्टींनी माझ्या जिवनात मला काय मिळवून दिले,निवृत्तीपर असलेल्या गोष्टींनी नेमकं मला काय मिळालं या सगळ्यांचे गणित आपण मांडावे आणि यातून शेवाटी जे राहाते ती एकच गोष्ट माझ्या जिवनात माझ्या बरोबर येणार आहे ती म्हणजे भगवंतरूपी नफा.मी या मनुष्यजन्मात येवून किती प्रमाणात भगवंतरूपी नफा कमवला. जिवनामध्ये मी प्रपंच किती छोटा मांडला का मोठा मांडला,किती पद्धतीने यश मिळवलं का अपयश मिळवलं या सर्व गोष्टी एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला या सगळ्यांपेक्षा मी भगवंत किती प्राप्त केला हा निकष जर मांडला आणि लक्षात आलं की आपण प्रपंच जरी बेताचा केला असला तरी भगवंतप्राप्ती केली तर आपण सर्वकाही मिळवलं आणि जिवनामध्ये केवळ एकावर अनेक शून्य मिळवत राहिलो तर जिवनामध्ये आपण काहीच मिळवलं नाही हा सगळा तोट्याचा व्यापार झाला असे समजावे. त्यामुळे समर्थ म्हणतात की जागे व्हा जे गेलेले क्षण आहेत, जो गेलेला काळ आहे तो काही भरून येणार नाही पण आत्तापासून जेवढे काही भगवंताने आपल्याला श्वास दिलेले आहेत त्या श्वासावर तळमळून त्याच्या स्मरणाला लागूयात. जानकी जीवन स्मरण जय जय राम लक्ष्मीकांत खडके 🙏

+1 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 0 शेयर

*श्रीराम समर्थ* *समर्थ रामदासस्वामी रचित दासबोधावरील श्री रविंद्र पाठक यांची निरूपणें.दशक १२-विवेक-वैराग्य,समास ८- काळरूपनिरूपण,निरूपण क्रमांक ४७१ – भाग ३ मधील सार.* दासबोधातील बाराव्या दशकातील आठव्या समासात या काळाच्या प्रत्येक क्षणावरती भगवंताच्या नामाची मोहर लावण्यासाठी आपल्या अंतरंगाची प्रवृत्ती कशी बदलावी, या काळाच्या दर क्षणाचं सोनं करायचं तर प्रत्येक क्षणाला प्रवृत्तीरूप न ठेवता परमार्थाकडे अर्थात निवृत्तीकडे वळवणे आवश्यक आहे अशा परमार्थातल्या प्रवृत्ती आणि निवृत्तीच्या दोन अंगाचे चिंतन समर्थ सांगताना म्हणतात..... *प्रवृत्ती चालें अधोमुखें ! निवृत्ती धावें ऊर्धमुखें !* *ऊर्धमुखें नाना सुखें ! विवेकी जाणती !!१२.८.१९.!!* प्रवृत्तीची दिशा ही नेहमी अधोगतीची आहे, आम्हांला जो सुखाचा प्रांत वाटतो ते या प्रवृत्तीपर केलेल्या कर्मातून मिळालेले हे क्षणिक सुख हे भगवंताच्या अत्यंत सुंदर सुखापासून दूर नेणारे आहे. परंतु ज्यांना काळाचा खरा अर्थ समजला आणि या संसाराच्या सुखांना केवळ प्रारब्धवश आपल्या जीवनात स्विकारले आणि आयुष्यात कर्म करत असतांनाही निवृत्तीची दिशा ज्याने ठेवली त्यांना खरं सुख म्हणजे काय आहे ते कळालं. आम्ही सुखाच्या भ्रमात, मायाजाळात फिरलो पण सुखाच्या मूळ स्वरूपाला कधी जाणू शकलो नाही. आम्ही सुख नामक वस्तू आशेवरती घेऊन या काळामध्ये जगलो पण संत हे दर क्षणाला परमानंदामध्ये राहिलेले आहेत. दिवसाला साधारण चोवीस तास आपल्याकडे आहेत पण आपली निद्रा, आपला प्रपंच, नोकरी-धंदा या सगळ्या गोष्टी जर बाजूला काढल्या तर दिवासातले जवळजवळ सोळा/सतरा तास तर सहज संपून जातात, त्यानंतर राहिलेल्या वेळात मुलाबाळांसोबत थोडी चर्चा, प्रपंचाविषयीचे खटाटोप हे सगळं करता, करता भगवंताच्या स्मरणासाठी किती वेळ आपल्याकडे शिल्लक राहतो निदान तेवढा वेळ तरी प्रत्येकाने भगवंतासाठी द्यावा असा सर्व संतांचा आर्जव आहे. गुरूदेव रानडे म्हणतात की ज्याचे साधन दिवसामध्ये सहा तासांच्या पुढं आहे तो प्रथम वर्गाचा विद्यार्थी, तीन ते सहा तासांच्या मधले विद्यार्थी हे दुसऱ्या वर्गातले आहेत आणि तिसऱ्या वर्गातले तीन तासांच्या खालचे आहेत यावरून आपण विचार करावा की आपली गणना कुठल्या वर्गात होते. अशी आपल्या जीवनात साधनेची अवस्था आहे. पूज्य बाबा एका प्रवाचनात म्हणाले की,गुरूदेव रानडेंनी सांगितल्याप्रमाणे आपण सर्व 3rd class या पदावरचे विद्यार्थी आहोत,परंतु एक करता येईल का दिवसात निदान एक माळ तरी श्रीमहाराजांचे अत्यंत मनापासून स्मरण करत, त्यांना आवडते म्हणून करू शकूत, एक माळ ती पण अवघड होत असेल तर आपण जेवण, फराळ जे काही खाणार असूत त्यावेळेला भगवंताचे स्मरण करू शकतो का? निदान झोपताना तरी राम म्हणू शकतो का? आणि यातील जर कुठलीच गोष्ट आपल्या जीवनात होत नसेल तर एक करावं आयुष्यात एकदा तरी तळमळून त्यांच्या चरणांवर जावून पडावं आणि म्हणावं की असा मी आहे या जन्मात मी आलो खरा पण या काळाचे गणित नीट समजू शकलेलो नाही, या जीवनात केवळ प्रकृतीवर जगत राहिलो आणि असा हा विवेकहीन माझा जन्म गेलेला आहे. श्रीमहाराज म्हणायचे की एवढे कष्ट करून तुम्ही माझ्या गोदंवल्याला येता परंतु रिकाम्या हाताने परत जाता हे बघुन माझं ह्रदय कळवळतं. म्हणजे मनुष्यजन्म प्राप्त होणं हे आधीच दुरापास्त आहे त्यात चांगले संस्कार त्यामध्येही असे ब्रह्मचैतन्य महाराजांसारखे सद्गुरू जीवनात मिळणे त्यांचे नाम मिळणे म्हणजे एवढे कष्ट करून गोदंवल्यात येण्यासारखे आहे. आणि एवढं सगळं करून रिकाम्या हाताने परत जातो म्हणजे त्यांना जसे अभिप्रेत आहे जीवनाचे खरे कल्याण करणारे साधन आमच्या हातून काही घडून येत नाही म्हणून श्रीमहाराज म्हणायचे की माझं ह्दय कळवळतं. *बरें आमचें काये गेलें ! जें केलें तें फळास आलें !* *पेरिलें तें उगवलें ! भोगिती आतां !!१२.८.२५.!!* समर्थ म्हणतात की आम्ही तुला सांगायचे काम केले, या मनुष्यजन्मात प्रत्येक क्षणावर त्याच्या स्मरणाची मोहर उमटव हा आमचा आर्जव आहे. तू स्वतःच विचार कर की किती क्षण प्रवृत्तीपर जातात आणि यामध्ये जे प्रवृत्तीपर क्षण गेले ते वाया गेले आणि हे समजत असूनही तू तुझ्या विचारांची दिशा बदलत नाहीस. या मनुष्यजन्माचे प्रयोजन तू समजून घेऊ शकत नाहीस आता आम्ही कशा पद्धतीने सांगावे. समर्थ कळवळून सांगतात...... *पुढेंहि करी तो पावे ! भक्तियोगें भगवंत फावे !* *देवा भक्त मिळतां दुणावें ! समाधान !!१२.८.२६.!!* जीवनामध्ये पैसा-अडका, मानमरातब किती कमवला, प्रपंच किती उत्कृष्ट केला, समाजात किती प्रतिष्ठा मिळवली हे सगळं ठीक आहे ते तर करतच रहा परंतु यातील सर्व मिळवले पण भगवंताची प्राप्ती, भगवंताची भक्ती, भगवंताची तद्रूपता प्राप्त केली नाही तर जीवनामध्ये समाधान तुम्हांला मिळू शकत नाही. समर्थ पुढं म्हणतात..... *येथील येथें अवगघेंचि राहातें ! ऐसें प्रत्ययास येतें !* *कोण काये घेऊन जातें ! सांगाना कां !!१२.८.२८.!!* या जगात जे,जे काही तुम्ही इथं मिळवलं ते इथंच राहणार आहे आणि आपण रिकाम्या हाताने परत जातोय याच्यातले बरोबर काहीच येत नाही. एक गोष्ट मात्र जीवना नंतरही तुमच्या बरोबर राहील ती म्हणजे तुम्ही केलेली या जन्मामध्ये काळाच्या सत्तेमध्ये असताना केलेली भगवंताची भक्ती, त्याचे स्मरण. श्रीमहाराजांच्या भाषेत सांगायचे झाले तर यमाचीया हाती घडे यातायाती, जिवाचा सांगाती कोणी नाही ही केवळ यातायात आहे. हा सगळा प्रपंच आणि त्यामध्ये आम्ही धावत असणारे त्यातील सर्वजण त्यामुळे खरी जीवनामध्ये प्रत्येक क्षणावर सोन्याची मोहर उमटवणे याचे नाव भगवंताचे नाम आहे. अशा या भगवंताच्या नामाच्या साध्या सोप्या उपाधीरहित साधनाला संतांनी आपल्याला दिलं ज्याच्यामुळं जागृती, स्वप्न आणी सुषुप्ती या तिन्हीही अवस्था या तिन्हीही काळामध्ये आपल्याला साधनेचे वेगळे कष्ट घ्यावे लागणार नाहीत ज्या अवस्थेत जिथं असाल तिथून या भगवंताची भक्ती तुम्हांला करता येवू शकेल असे हे अत्यंतिक सुंदर, जीवनामध्ये मांगल्य असे सुंदरप्रभा देणारे आणि अज्ञानाचा अंधःकार दूर करून आनंदाची सुप्रभात देणारे खरं काही असेल तर हे भगवंताचे नाम आहे. अशा हरिचे नाम आपण आनंदाने घ्यावं आणि आपल्या जीवनातला काळ खऱ्या अर्थाने सार्थकी करावा हाच श्रीसमर्थांचा या काळरूपातला आर्जव आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम लक्ष्मीकांत खडके 🙏

+10 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 11 शेयर

*श्रीराम समर्थ* *समर्थ रामदासस्वामी रचित दासबोधावरील श्री रविंद्र पाठक यांची निरूपणें.दशक १२-विवेक-वैराग्य,समास ८-काळरूपनिरूपण,निरूपण क्रमांक ४७० – भाग २ मधील सार.* दासबोधातील बाराव्या दशकातील आठव्या समासात समर्थ काळरूपाची विस्तृत चर्चा करताना म्हणतात की, ज्याप्रमाणे मूळमाया शुद्ध आहे त्याचप्रमाणे या मूळमायेच्या उद्गमबिंदूजवळ काळ देखील अत्यंत शुद्ध आहे. परंतु सामान्य मनुष्याच्या जीवनामध्ये तो काळ हा कधीही शुद्धरूपाने अनुभवू शकत नाही याचे कारण आम्ही सर्वजण या काळाच्या उपाधीने बांधलेलो आहोत, मनुष्य काळाच्या आधीन राहून या सुख-दुःखरुपी उपाधींची मोजदाद करत असतो त्या उपाधी कोणत्या आहेत?समर्थ आपल्याला त्या उपाधींची नावे सांगू लागतात.समर्थ म्हणतात........ *उत्पन्नकाळ सृष्टिकाळ ! स्थितिकाळ संव्हारकाळ !* *आद्यंत अवघा काळ ! विलंबरूपी !!१२.८.१२.!!* *जें जें जये प्रसंगीं जालें ! तेथें काळाचें नांव पडिलें !* *बरें नसेल अनुमानलें ! तरी पुढें ऐका !!१२.८.१३.!!* *प्रजन्यकाळ शीतकाळ ! उष्णकाळ संतोषकाळ !* *सुखदुःखआनंदकाळ ! प्रत्यये येतो !!१२.८.१४.!!* *प्रातःकाळ माध्यानकाळ ! सायंकाळ वसंतकाळ !* *पर्वकाळ कठिणकाळ ! जाणिजे लोकीं !!१२.८.१५.!!* *जन्मकाळ बाळत्वकाळ ! तारूण्यकाळ वृधाप्यकाळ !* *अंतकाळ विषमकाळ ! वेळरूपें !!१२.८.१६.!!* *सुकाळ आणि दुष्काळ ! प्रदोषकाळ पुण्यकाळ !* *सकळ वेळा मिळोन काळ ! तयास म्हणावें !!१२.८.१७.!!* काळाची रूपरेषा तशी बघितली तर एकसारखीच चालू असते. त्या काळाला खरंतर कुठलाही गुण नाही परंतु प्रत्येक मनुष्य त्या काळाला आपल्या गुणधर्मांच्या आधारे संज्ञा देत असतो. सृष्टीची निर्मिती झाली याला आपण उत्पन्नकाळ म्हणूत, ही सृष्टी आज अस्तित्वात आहे याला सृष्टीकाळ म्हणूत, या सृष्टीमध्ये चाललेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्थित्यंतराला आपण स्थितीकाळ म्हणूत आणि शेवटी या कल्पांताच्या अंती जेव्हा संपूर्ण सृष्टी लयास जाईल त्यावेळेला आपण त्याला संहांरकाळ म्हणूत. हा सगळा काळावरती लावलेला एका अज्ञानी जीवाने उपाधीचा प्रांत आहे, काळतर त्याच्या पद्धतीने चाललेलाच आहे तो केवळ आहे परंतु आम्ही त्याला या वेगवेगळ्या उपाधींच्या आधारे सांगू लागतो. समर्थ म्हणतात या काळाच्या उपाधी तुम्हांला समजेल अशा भाषेत सांगतो पावसाळ्यात जेव्हा मेघ आकाशात येऊन वर्षाव करतात तेव्हा त्याला आपण पर्जन्यकाळ म्हणतो पण हा काळ ज्याच्यामध्ये पाऊस पडतो तो काही त्या पावसाच्या पाण्याने भिजतो का? पण त्या काळाला आपण पर्जन्यकाळ अशी उपाधी देतो. नंतर येणारा शीतकाळ आहे, आता चालू असलेला उष्णताकाळ आहे, कित्येकदा आपण संतोषरूपाचा काळ देखील संध्या या रूपाने अनुभवतो असा संतोषकाळ देखील जीवानात असतो. म्हणजे एकच काळ एकाच वेळेला वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळा असू शकतो. सृष्टीचा उत्पत्ती, स्थिती संहार हा काळ कदाचित ब्रह्मांडासाठी योग्य आहे परंतु ज्या अनंतकोटी ब्रह्मांडनायक असा आपल्या सद्गुरूंचा आपण दररोज जयघोष करतो त्यामध्ये एक सत्य आपण स्विकारतो की या सृष्टीमध्ये अनंत ब्रह्मांड आहेत त्यातील कुठल्या ब्रह्मांडाला ज्यावेळेला आपल्या इथं कदाचित स्थितीकाळ असेल तेव्हा कुठंतरी संहार चालू असेल, कुठंतरी नवीन ब्रह्मांड उदयास येत असेल तिथं उत्पत्तीकाळ असेल म्हणजे काळाचे गणित एकच आहे परंतु ब्रह्मांडाच्या आधाराने कदाचित वेगळं असेल. भारतात ईशान्य-नैऋत्य कडून येणारे वारे हे पर्जन्यकाळ आणतात परंतु याचा अर्थ संपूर्ण विश्वात पाऊस पडत नाही. प्रत्येकाची भौगोलिक रचना वेगळी पण काळ एकच आहे. पण ज्यावेळेस कदाचित आपण लोक ज्याला पर्जन्यकाळ म्हणतो त्यावेळेस दुसऱ्या देशातील लोक त्याला शीतकाळ म्हणत असतील किंवा उष्णताकाळ म्हणत असतील त्यामुळे काळ एकच आहे पण मनुष्याच्या उपाधींनी त्याला वेगवेगळी नावे दिली जातात. काळ ही सापेक्ष संज्ञा आहे, प्रत्येकाच्या मनोवृत्तीच्या आधारे या काळावर आपण वेगवेगळ्या उपाधी लावून त्याआधारे काळाला वेगवेगळ्या संज्ञेत बांधायचा प्रयत्न केला आहे. दिवसामध्येही प्रातःकाळ, माध्यान्हकाळ, सांयकाळ, वसंतकाळ, पर्वकाळ, कठिणकाळ, अशा अनंत प्रकारे क्षणाक्षणाने चालणाऱ्या काळाला आम्ही वेगवेगळ्या संज्ञा देत असतो. मनुष्याच्या आयुष्याकडे बघितलं तर जन्मकाळ, बालपणाचा काळ, तारूण्यकाळ वृद्धापकाळ,अंतःकाळ, विषमकाळ अशी वेगवेगळी काळाच्या आधारे एक अत्यंत शुद्ध रूपामध्ये वाहणाऱ्या काळावरतीच आम्ही लोकांनी मांडलेल्या या उपाधी आहेत. एखाद्या भौगोलिक प्रदेशाच्या आधाराने बघावे तर सुकाळ, दुष्काळ, प्रदोषकाळ, पुण्यकाळ या सगळ्या जणूकाही काळाच्या संज्ञा समर्थ आपल्याला इथं सांगत आहेत. हे सगळं समर्थांचा आपल्याला सांगण्याचा हेतू, त्यामागचे तत्वज्ञान समर्थ सांगतात की... *असतें येक वाटतें येक ! त्याचें नांव हीन विवेक !* *नाना प्रवृत्तीचे लोक ! प्रवृत्ती जाणती !!१२.८.१८.!!* काळ हा त्याच्या मूळ स्वरूपात जसाच्या तसाच आहे पण आम्ही ज्यावेळी आमच्या अंतरंगाच्या प्रवृत्तींतून त्याच्याकडे बघतो प्रत्येकाची प्रवृत्ती काळावर लावतो आणि त्यानुसार काहीतरी एक संज्ञा, काहीतरी गुणधर्म काळाला देऊन टाकतो, आणि मग मनुष्याला त्या काळाच्या आधारे भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमानकाळ या संज्ञा त्याच्याभोवती जणूकाही घोंगावू लागतात मग अनुकूल काळ कधी येणार या विचाराने त्याचे मन भविष्यकाळात रमू लागते, परंतु या सर्व अवस्थेत जो शुद्ध वर्तमानकाळ आहे ज्याच्यामध्ये कुठलीही उपाधी नाही असा क्षण मात्र आमच्या आयुष्यातून झरझर सरत असतो. या उपाधींच्या आधारे आपण काळाला बांधले गेलेलो आहोत त्यामुळे जीवनामध्ये स्वाभाविक स्वस्थता नाही, आमचे मन स्वस्थ राहू शकत नाही, आमचे मन सतत भूत आणि भविष्य यामध्येच खेळत राहते. अशा या काळाच्या उपाधीला तोडण्यासाठी स्वाभाविकपणे जो आत्ताचा क्षण आमच्या हातून जातोय, जो अत्यंत शुद्ध आहे अशा येणाऱ्या क्षणावर आपण खऱ्या अर्थाने सार्थकतेची मोहर लावणे आवश्यक आहे आणि ते जर लावले नाही तर आमच्या हातून हा क्षणदेखील निसटून जात असतो. म्हणून या उपाधीच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे, ज्याने या काळाच्या उपाधींचा त्याग केला त्याला एकच कळतं की हा गेलेला क्षण आयुष्यात परत येवू शकत नाही, म्हणून समर्थ आपल्याला आर्जव करतात....... *तरीच जन्माचें सार्थक ! भले पाहाती उभये लोक !* *कारण मुळींचा विवेक ! पाहिला पाहिजे !!१२.८.२३.!!* यासाठी परमार्थाच्या आधारे आपण आपल्या जन्माचे सार्थक करून घ्यावे आणि याला आणखीन सोपं करत श्रीमहाराज म्हणायचे की, आलेल्या प्रत्येक क्षणावर भगवंताची मोहर उमटवली की त्या क्षणाचे सार्थक झाले. तोच क्षणांनी साठवलेला हा भगवंत स्मरणाचा संचय आमच्या जीवनात सार्थकतेचे खरे भांडवल ठरणार आहे. अन्यथा या उपाधींमध्ये आमचे आयुष्य संपून जाईल. परंतु वर्तमानामध्ये असलेल्या क्षणांचे कसे सार्थक करावे हे आम्ही आमच्या आयुष्यात कधीच समजू शकणार नाही असे हे विलक्षण काळरूपाचे शास्त्र समर्थ माऊली आपल्याला या समासामध्ये सांगत आहेत. जानकी जीवन स्मरण जय जय राम लक्ष्मीकांत खडके 🙏

+1 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 0 शेयर

*बोध कथा...* *एक दहा बारा वर्षाचा मुलगा उन्हाळ्याच्या सुटीत आईबाबा बरोबर त्याच्या आजी आजोबाकडे जायाचा..हा नेम कायम सुरू होता,* *एकदा तो मुलगा बाबांना म्हणतो बाबा आता मी मोठा झालोय..मला सगळं समजत..या वर्षी मी एकट्याने प्रवास करणार आणि आजीकडे जाणार.बाबा त्याची हरप्रकारे समजूत काढतात पण तो पठ्ठ्या यावेळेला काही ऐकत नाही..शेवटी सर्व सुचना देऊन बाबा एकदाचे तयार होतात.* *स्टेशनला त्याला गाडीत बसवून द्यायला ते येतात..खूप सुचना करतात.नीट जा .पहिल्यांदा एकटा जातोय.* *गाडी सुटायच्या अगोदर ते त्याच्या खीशात एक चिठ्ठी टाकतात आणि त्याला सांगतात की हे बघ तुला भिती वाटली ...एकट वाटायला लागलं की मगच ही चिठ्ठी वाच...* *गाडी सुरू होते.मुलाचा हा पहिलाच एकट्याने करायचा प्रवास.* *जसा गाडीने वेग घेतला तो खिडकीतून गंमत बघायला लागला..पळती झाडे ..नदी डोंगर पाहून तो खुश झाला .* *हळूहळू गर्दी वाढू लागली...अनोळखी लोकांच्या गराड्यात त्याला भिती वाटायला लागली.* *कुणीतरी आपल्याकडे एकटक बघतय अस त्याला उगाचच वाटायला लागलं .तो रडवेला झाला...* *त्याला आता आईबाबा हवे होते अस वाटायला लागलं .* *तेवाढ्यात त्याला आठवलं की बाबांनी सांगितलं होत..की अस काही वाटायला लागलं तर खीशातली चिठ्ठी वाच...* *त्याने भितभितच ती बाबांनी दिलेली चिठ्ठी काढली..* *त्यावर एकच ओळ लिहीली होती..* *बाळ भिऊ नको...मी पुढल्या डब्यात बसून तुझ्या सोबतच प्रवास करतोय..* *त्याचे डोळे डबडबले...केवढा धीर आला त्याला..हायस वाटल...भिती कुठल्याकुठे पळाली.* *भगवंतानेही आपल्या सर्वाच्या खीशात अशी एक चिठ्ठी लिहून आपल्याला या जगात प्रवासाला पाठवले आहे.या प्रवासात तो आपल्या सोबतच आहे...* *मग कसली आता भिती.* *हा प्रवास छान हसत,हसत करूया..ठरलं .* 👍👍👍 🙏🏻🌺शुभ सकाळ 🌺🙏🏻

0 कॉमेंट्स • 0 शेयर

*खूप सुंदर मनाला भावलेली श्री महाराजांवरची कविता* 🙏🙏 *श्रीराम* 🙏🙏 *महाराज* वाट चुकलोय थोडी वाट दाखवाना वादळात हरवलेल्या जहाजाला थोडा काठ दाखवाना ! *महाराज* अंधार खूप आहे थोडा प्रकाश दाखवाना दुःखाच्या पिंजऱ्यात कैद मनाला मोकळं आकाश दाखवाना ! *महाराज* रण खूप मोठं आहे थोडा धीर द्या ना ! जगण्याच्या युद्धात सर्वाना हरवेल, असा एक तीर द्या ना ! *महाराज* तहान खूप लागलीये थोडं नाव घेण्याची शक्ती द्या ना जीव जाताना हि तुमचंच नाव आठवावं इतकी भक्ती द्या ना ! *महाराज* मी मागत राहीन तुम्ही देत राहाल पण शेवटचं वचन द्या ना ! तुम्ही कधीही सोडणार नाही या बाळाची साथ आणि कधीच नाही काढणार हा *डोक्यावरचा हात*! !! *महाराज* !

+5 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 13 शेयर

_*पिंजरा (कोंडमारा )....*_ _काही अध्यात्मिक मानसिक स्थितींविषयी आपण कुणालाही स्पष्टपणे सांगू शकत नाही कारण त्याची इतर कुणाशी चर्चा केली की त्याचा व्यावहारिक उहापोह सुरु होतो.आपल्याला वाटणारी पारमार्थिक ओढ हा खरं तर आपला व्यक्तिगत प्रवास असतो म्हणून त्या प्रवासाची गरज आणि गांभीर्य इतर कुणाला पटवून देणं ही गोष्ट थोडी कठीण असते.कधी कधी आपला आतला आवाज स्पष्टपणे आपल्याला विरक्तीच्या सूचना देऊ लागतो.'तू कितीही प्रयत्न कर पण कुठल्याही गुंत्यात मी सुखी राहणार नाही,मला मुक्त कर 'अशी कळकळीची विनंती तो सतत करतो.आपण फक्त साधनेत सुख अनुभवतो आणि त्यातून बाहेर आल्यावर आत्म्याची एकांतवासाची ओढ आणि भ्रमंती सुरु होते.आपण असूनही कुठेच नसतो.अट्टाहासाने स्वतःला विखुरण्यात कसला आला आहे आनंद?कुठलंही स्वप्न नाही,महत्वकांक्षा नाही की,सुखाची वाट पाहून झुरणं नाही.आत्मा मुक्तीकडे जाऊ लागतो.कधी कधी आपल्या असण्याचाही त्रास आपल्याला होऊ लागतो.ध्यानात मन शांत आणि परिपूर्णता अनुभवत जातं.अशा स्टेजला पोहोचल्यावर व्यावहारिक गोष्टींच्या दलदलीमध्ये जीव गुदमरू लागतो.आपण इतरांसारखे आता उरले नाही आहोत हे कळत.इतरांसाठी स्वतःच्या ह्या प्रवासाला खीळ घालणं म्हणजे शाश्वत सत्याकडे पाठ फिरवून तात्कालिक सुखांच्या पायाशी लोळणं घेत जगणं.पण हे सगळं सांगायचं कुणाला?समाज सोडाच पण अगदी जवळची नाती देखील आपली ही तगमग,संघर्ष समजून न घेता आपल्याला आपल्यासाठी व्यर्थ असलेल्या गोष्टींमध्ये गुंतवण्याचा प्रयत्न सुरु ठेवतात.आपला हा मार्ग म्हणजे आपण दुःखातून स्वीकारलेला आहे असा गैरसमज अनेकदा ह्याच्या मुळाशी असतो.पण खरं तर दुःखापेक्षा सगळ्या गोष्टींची वेळेत लक्षात आलेली व्यर्थता त्याची झालेली जाणीव त्याच्या मुळाशी असते.शेवटी आपल्या आत्मिक सुखाची व्याख्या ही इतरांनी ठरवली की ती आपल्या दुःखाचं मूळ कारण होते.वेळेतच ह्या प्रयासाला खीळ घातला पाहिजे. *मोह आणि माया ह्यातून सुटण्याचा मार्ग एकदा मिळाला की त्या मार्गावरून परतीचा प्रवास कधी करू नये कारण जर असं झालं तर तो जिवंतपणी झालेला अंतच असतो....*_ _*मिञांनो,काळजी घ्या.....*_

1 कॉमेंट्स • 5 शेयर

*नाम हे भवताप हारक असून त्रिविध तापाने व्यापलेल्या मनाला चित्तवृत्ती स्थिर करून देणारे आहे. नामाच्या उच्चाराने देहासह वातावरणातील स्पदनांना ऊर्जा प्राप्त होऊन ईश्वरीय लहरीशी साधकाचे विचार जोडले जातात. नामाचा उच्चार शरीरातील चक्र जागृती करतो, वारंवार उच्चारल्या गेलेल्या बीजांमुळे बीजतत्व उपासना पूर्ण होऊन देहाला सद्गुरुकृपेने साधनेचा मार्ग मिळत राहतो. ही साधना साधकाला त्रिकाल ज्ञानी बनवते हे ज्ञान साधकांच्या जगण्याला दिव्यत्व प्राप्त करून देते. नाम हे वरदान आहे जे मनुष्य जन्माचे कल्याण करू शकते या कलियुगात सहज भगवंताची कृपा प्राप्ती करून देते अशा या दिव्य शब्दबीजांची साधना केली पाहिजे.*

0 कॉमेंट्स • 3 शेयर

॥श्री गणेशाय नमः॥ ॥ श्री कुलदेवताय नमः॥ #कुलदेवी चा आशिर्वाद का महत्वाचा आहे. • विषय खुप महत्वाचा आहे. हा विषय जाणून घेते वेळी सर्व साधना, कुंडलिनी, श्रीविद्या, दसमहाविद्या, जीकाही उपासना,साधना करत असाल सर्व बाजुला ठेऊन द्या. कारण कुलदेवीच्या कृपेचा अर्थ आहे, ‘सौ सुनार की एक लोहार की’’ कुलदेवतेच्या आशिर्वादा विना वंश काय कुठलीच गोष्ट पुढे जाऊ शकत नाही. लोक वेळ-प्रसंगी भाऊक होऊन, वेगवेगळ्या उपासना, उपाययोजना करतात, परंतु त्यांना ज्ञात नसते आपण आपल्या कुलदेवतेचा आशीर्वादा शिवाय साधना करत असतो. आणि ती साधना कधी यशस्वी होत नसते, त्याउलट कुलदेवतेच्या रूष्टते मध्ये वाढ होत जाते. काही ठिकाणी अजुनही परंपरा अशा आहेत, घरात पूजेत कुलदेवीच्या रूपात सुपारी अथवा प्रतिमेचे पूजन करणे, लांबचा प्रवास असेल, घरातील शुभ कार्ये असतील कुलदेवीच्या भेटी, मानपान करणे, काही जण दरवर्षी लघुद्र, नवचंडी करतात, हे सर्व अजुनही आठवणीने करतात, तशी त्यांना प्रचीतीही येत असते. प्रत्तेक घराण्याची कुलदेवी असतेच. आज आपल्यात ७०टक्के लोकांना आपली कुलदेवी ज्ञात नसते, काही परिवार असे आहेत की ज्यांना पिढ्यान-पिढ्या पासून आपल्या कुलदेवतेचे नाव ही माहीत नसते. त्या मुले एक प्रकारचा नकारात्मक दबाव त्या कुलावर असतो, आणि अंनुवाशिक समस्या निर्माण होतात. कुलदेवतेच्या विसरा मुळे अनुवांशीक आजार पिढीत उत्पन्न होतात, मानसिक विकृती किंवा स्ट्रेस सर्व कुटुंबात निर्माण होतात, काही परिवावर त्यात संपुष्टात येतात, मुले वाईट मार्गाला जातात. शिक्षणात आढथळे येतात, शिक्षण पूर्ण करून पण करिअर होत नाही, काही लोकां जवळ पैसा-अडका भरपूर असतो परंतु मानसिक समाधान, सुख नसते, काही वेळा दुर्घटना-अपघात अशा अनिष्ट घटना पण घडतात. ही समस्या आपण कुठची ही हिलिंग्स, ध्यान, किंवा कुटल्याही दसमहाविद्या मंत्र साधनेने दुरकरू शकत नाही. यात सांगण्या सारखा विषय आहे की कुठची ही दसमहाविद्या, दीक्षा, साधना देताना गुरु साधकास प्रथमता आपल्या कुलदेवतेचीच उपासना सूचित करतात. किंव्हा कुठली ही विधी, शांती विधी करताना गुरूजी प्रथम कुलदेवतेचा मान करतात. कारण कुलदेवतेच्या आशीर्वादा शिवाय कुठचीच साधना, मंत्र, उपासना कामी येत नाही. म्हणून कुलदेवतेची उपासन अत्यावश्क असते. आपण अनेक वेळा तीर्थयात्रा करतो, तिरुपति, चारधाम, शिर्डी, ज्योतिर्लिंग करत असतो, पण त्याने काही फरक पडत नसतो, उलट ह्या सर्व शक्ति हेच सांगतील प्रथम आपल्या आईवडिलांचे पाय धरा, आपल्या कुलदेवतेचे पाय धरा नंतर आपल्या कडे या. कुलदेवतेच्या रोषाने, कोपाने काही संस्थान, राजवाडे, कुटुंब नष्ट झाली आहेत, म्हणुन नेहमी कुलदेवतेचे पूजन प्रथम करा. धन्यवाद. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

0 कॉमेंट्स • 3 शेयर

❄❄❄❄❄🏵️❄❄❄❄❄ *🔸वज्र हनुमान मारुती...!🔸* *रामदास म्हणजे समर्थ रामदास स्वामी! त्यांनी संपूर्ण कार्य करताना हनुमंताची, मारुतीरायाची मंदिरं जागोजागी स्थापन केली. भारतात अनेक ठिकाणी समर्थ स्थापित हनुमंताची मंदिरं आजही दिसतात. सुमारे अकराशे मारुती मंदिरं समर्थांनी निर्माण केली.* *त्यामधील तेलंगणमधील श्रीक्षेत्रबासरपासून ४० कि.मी. अंतरावर ’सारंगपूर’ गाव आहे. या ठिकाणी रामदास स्वामींनी हनुमंताची मूर्ती स्थापन केलेली आहे. सारंगपूरला मारुती मंदिराची स्थापना का केली असावी? यामागे घडलेली एक घटना आहे.* *सारंगपूरजवळ एक तलाव आहे. यवन बादशाह इथे जुलूम करीत होता. त्याच्या राज्यात दुष्काळ पडला, पर्जन्यवृष्टी झाली नाही. पाऊस पडावा यासाठी या यवन राजाने ६० ब्राह्मणांना पकडून आणलं. त्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यांना फर्मान सोडलं, ’’तुम्ही असे मंत्र म्हणा की पाऊस पडला पाहिजे. पाऊस पडला नाही तर तुमची डोकी उडविली जातील.’’* *तलावाच्या काठावर त्या ६० ब्राह्मणांना उपाशी ठेवण्यात आलं. तहान-भुकेनं व्याकूळ झालेले ब्राह्मण वेदांमधील ’पर्जन्यसूक्त’ अखंड म्हणत होते. जीवाच्या भितीने व भुकेने त्रस्त झाले होते. पाऊस काही केल्या पडत नव्हता. यवन राजा सतत त्रास देत होता. अशा संकटसमयी ते भगवंताची करुणा भाकू लागले.* *त्यावेळी रामदास स्वामी आपले लाडके शिष्य उद्धव स्वामींसह त्या भागातून जात होते. त्यांना ब्राह्मणांनी सगळी हकीकत कथन केली. रामदास स्वामींना ब्राह्मणांची दया आली.* *समर्थ रामदास स्वामींनी एका शिलेवर कोळशाने हनुमंताचे चित्र रेखाटले. समर्थ रामदास स्वामी चांगले चित्रकार होते. त्या शिळेवर आपली छाटी घातली. त्यावर ब्राह्मणांना रुद्राभिषेक करायला सांगितला आणि काय आश्‍चर्य!* *आकाशामधून धो... धो पाऊस तप्त भूमीवर बरसू लागला. सर्व धरती पाण्याने भरुन गेली. दुष्काळ संपला. ब्राह्मणांनी रामदास स्वामींच्या पायावर लोटांगण घातली.* *तेवढ्यात यवन राजा आला. तो ब्राह्मणांवर खूश झाला. तेव्हा ब्राह्मणांनी विन्रमपूर्वक कथन केलं की, ’’ही शक्ती आमची नाही. हे सामर्थ्य समर्थाचे आहे. त्यांच्या शक्तीमधून पर्जन्यवृष्टीची करामत घडलेली आहे.’’* *हा यवन राजा समर्थांच्या दर्शनाला आला. इतकंच नव्हे तर त्याने रामदास स्वामींचे यथासांग पूजन केले. शीलेवर समर्थांनी रेखाटलेल्या मारुतीच्या चित्राचे मूर्तीत आपोआप रुपांतर झाले. बादशाहने हनुमंताच्या मंदिरासाठी जागा देऊ केली.* *समर्थ रामदास स्वामींनी एक तप (१२ वर्ष) नंदिनी-गोदावरी नदीच्या संगमात कमरेएवढ्या पाण्यात उभे राहून ’’श्रीराम जयराम जय जय राम’’ या त्रयोदशाक्षरी मंत्राचा जप केला. नदीकाठावर गायत्री मंत्र जपला.* *या काळामध्ये एक दिवस एक महाकाय वानर समर्थांच्या पुढे येऊन वाट अडवून उभे राहिले. समर्थांना काही कळेना! ते वानर वेगाने समर्थांच्या समीप आले व त्यांना आलिंगन दिले. हे वानर म्हणजे दुसरं कोणीही नसून *प्रत्यक्ष मारुतीराया -हनुमंतराय होते.* *रामदास स्वामींना आलिंगन देऊन शक्तिसंपन्न केलं. त्यावेळी रामदास स्वामींच्या मुखातून सगळ्यांना सुपरिचित असणारं स्तोत्र स्फुरलं...,* *भीमरुपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती।* ❄❄❄❄❄🏵️❄❄❄❄❄

0 कॉमेंट्स • 0 शेयर

*ॐ दिगंबराय नमः* 🌺✨🌺✨🌺✨🌺✨ *🌺||जय श्री स्वामी समर्थ||🌺* यतीरूप दत्तात्रया दंडधारी पदी पादुका शोभती सौख्यकारी दयासिंधु ज्याची पदें दुःखहारी तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी पदें पुष्करा लाजवीती जयाचीं मुखाच्या प्रभे चंद्र मोहुनि याची घडो वास येथें सदा निर्विकारी तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी सुनीटा असती पोटऱ्या गुल्फ जानू कटिं मौंज कौपीन ते काय वानूं गळां माळिका ब्रह्मसूत्रासि धारी तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी गळां वासुकीभूषणे रुंडमाळा टिळा कस्तुरी केशरी गंध भाळा जयाची प्रभा कोटिसूर्यासी हारी तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी अनुसूया सत्त्व हरावयासी त्रिमुर्ति जातां करी बाळ त्यांसी निजे पालखीं सर्वदा सौख्यकारी तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी दरिद्रें बहु कष्टला विप्र त्यासी क्षणें द्रव्य देऊनि संतोषवीसी दिला पुत्र वंध्या असुनी वृद्ध नारी तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी द्विजाच्या घरी घेवडा वेल ज्याने मुळापासुनी तोडिला तो तयाने दिली संतती संपदा दुःखहारी तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी अनंतावधी जाहले अवतार परी श्री गुरुदत्त सर्वांत थोर त्वरें कामना कामिकां पूर्णहारी तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी मनीं आवडी गायनाची प्रभुला करी सुस्वरें नित्य जो गायनाला तयाच्या त्वरें संकटातें निवारी तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी काषायवस्त्रं करदंडधारिणं कमंडलुं पद्मकरेण शंखम् चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्येत् 🌺🌷🌺🌷🌺🌷🌺 *।।ॐ. नमो: भगवते श्री स्वामी समर्थाय नम:।।* *!!अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज* *श्री सद्गुरु शंकर महाराज कि जय!!* 🌹🙏🏻🌹🙏🏻 *!!श्री सदगुरु श्री स्वामी समर्थ!!* *दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा* ☘️🌻🌹🌹🌹🌹🌻☘️

+5 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 7 शेयर

भारत का एकमात्र धार्मिक सोशल नेटवर्क

Rate mymandir on the Play Store
5000 से भी ज़्यादा 5 स्टार रेटिंग
डेली-दर्शन, भजन, धार्मिक फ़ोटो और वीडियो * अपने त्योहारों और मंदिरों की फ़ोटो शेयर करें * पसंद के पोस्ट ऑफ़्लाइन सेव करें
सिर्फ़ 4.5MB