Daksha
Daksha Mar 26, 2020

*Don't underestimate माझे गाव🔴 स्मार्ट सिटी ओस पडल्या,2-3 bhk उदास वाटला* *मृत्यू समोर आल्यावर शेवटी गावच कामास आला* शॉपिंग ऍप्स बंद झाले ऑफर गेल्या उडत कोपऱ्यावरचा दुकानदार शेवटी आला धावत पैसा प्रतिष्ठा नाही माणूस कामास आला डबल ट्रिपल टोन्ड मिल्कचा साठा संपत आला फटफटीवरून दूधवाला पहाटेच दूध देऊन गेला जाती विसरून त्याने जीव जीवास दिला पॅकिंग भाज्या फळे आऊट ऑफ स्टॉक झाली नाक्यावरची भाजीवाली घरपोच भाजी देऊन गेली पोरांकडे पाहून 2 काकड्या तिने जास्तच टाकल्या हॉटेल्स रेस्टॉरंट कधीच कुलूपबंद झाले गल्लीबोळातले खानावळवले जेवण घेऊन आले रेशन संपलं म्हणून त्यांचा चुला नाही थांबला हायफाय हॉस्पिटल हताश होऊन बसली सरकारी दवाखान्यात मात्र कुणी सुट्टी नाही घेतली जीवावर उदार होऊन प्रत्येक डॉक्टर लढला शेवटी एकच सांगेन गड्या पैसा प्रतिष्ठा घडीचा खेळ आहे गावाच्या गल्लीत अजूनही माणुसकीला वेळ आहे आपला माणूस जगला म्हणून आनंद गावभर दाटला तुला पाहून आजही गावाला आपलेपणा वाटला *मृत्यू समोर आल्यावर गावच कामास आला* 🍂🍁🍁🍂

*Don't underestimate माझे गाव🔴

स्मार्ट सिटी ओस पडल्या,2-3 bhk उदास वाटला*
*मृत्यू समोर आल्यावर शेवटी गावच कामास आला*

शॉपिंग ऍप्स बंद झाले ऑफर गेल्या उडत
कोपऱ्यावरचा दुकानदार शेवटी आला धावत
पैसा प्रतिष्ठा नाही माणूस कामास आला

डबल ट्रिपल टोन्ड मिल्कचा साठा संपत आला
फटफटीवरून दूधवाला पहाटेच दूध देऊन गेला
जाती विसरून त्याने जीव जीवास दिला

पॅकिंग भाज्या फळे आऊट ऑफ स्टॉक झाली
नाक्यावरची भाजीवाली घरपोच भाजी देऊन गेली
पोरांकडे पाहून 2 काकड्या तिने जास्तच
टाकल्या

हॉटेल्स रेस्टॉरंट कधीच कुलूपबंद झाले
गल्लीबोळातले खानावळवले जेवण घेऊन आले
रेशन संपलं म्हणून त्यांचा चुला नाही थांबला

हायफाय हॉस्पिटल हताश होऊन बसली
सरकारी दवाखान्यात मात्र कुणी सुट्टी नाही घेतली
जीवावर उदार होऊन प्रत्येक डॉक्टर लढला

शेवटी एकच सांगेन गड्या पैसा प्रतिष्ठा घडीचा खेळ आहे
गावाच्या गल्लीत अजूनही माणुसकीला वेळ आहे
आपला माणूस जगला म्हणून आनंद गावभर दाटला
तुला पाहून आजही गावाला आपलेपणा वाटला
*मृत्यू समोर आल्यावर गावच कामास आला*
              🍂🍁🍁🍂

+8 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 15 शेयर

कामेंट्स

सौ मंजुषा दिलीप राव मेतकुटे Apr 2, 2020
मोठी डी मारटमुळे छोट्या दुकानदाराची किमंत कमी होतो पण शेवटी अडचणी ला तोच कामी आला जीवन जगताना माणसाला कुठल्याही परिस्थितीत कुणाचा आधार लागेल हे सागंता येत नाही

Daksha Mar 27, 2020

करोना व्हायरचा वाढता संसर्ग पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर केले. या २१ दिवसांच्या लॉकडाउनमध्ये घरात बसून काय करायचे असा प्रश्न अनेकांना पडला होता. अशातच सोशल मीडियावर ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ पुन्हा दाखवण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती. त्यावर प्रसार भारतीचे मुख्य अधिकारी शशी शेखर प्रेक्षकांच्या या मागणीचा विचार करत असल्याचे समोर आले होते. आता रामायण लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडे यांनी दिली आहे. प्रकाश जावडे यांनी ट्विट करत शनिवारपासून रामायण पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी दाखवण्यात येणार असल्याची माहिती दिली. ‘मला सांगताना आनंद होत आहे की, लोकांच्या मागणीनुसार, आम्ही रामायण ही लोकप्रिय मालिका शनिवार, २८ मार्च रोजी डीडी नॅशनल या चॅलेनलवर टेलिकास्ट करणार आहोत. दररोज सकाळी ९ ते १० आणि पुन्हा रात्री ९ ते १० या वेळेत रोज एक एपिसोड दाखवण्यात येणार आहे’ असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

+12 प्रतिक्रिया 3 कॉमेंट्स • 18 शेयर
Daksha Mar 27, 2020

*ऊसाच्या मुलांची लग्न* 💑 *कुणी लिहिले आहे माहीत नाही पण खूप छान आहे वाचा सर्वानी एकदा* 👌😊 ऊसाला झाली दोन दोन पोरं, मोठा मुलगा *'गुळ'* 👨🏾‍🦱 अन् धाकटी मुलगी *'साखर'* 👩‍🦳 साखर दिसायला गोरीगोमटी अन् सुंदर, गुळ मात्र ओबडधोबड अन् काळा कलुंदर 😀 साखर तशी स्वभावाला गोड, तिच्यात उणेपणा शोधणं अवघड 😉 गुळ मात्र स्वभावाला चिकट, समोर दिसला की ईतरांना वाटे संकट 😅 साखर तशी मनमिळाऊ, जेथे जाई तेथे मिसळुन जाई, गुळ पण गेला ईतरात मिसळायला,पण त्याला ते जमलेच नाही 😧 साखरेला गर्दीत शोधणे असे फार अवघड, गुळ मात्र गर्दीत लगेच दिसे, कारण तो होता 'ओबडधोबड' 😆 साखरेचे रव्यावर प्रेम जडले, बापाने लगेच् दोघांचे लग्नच् लावुन टाकले 😍 तीला झाला एक मुलगा दिसायला होता तो गोरागोरा, यथावकाश बारसे झाले, नांव ठेवले *'शिरा'* 😘 ऊसाला आता काळजी वाटु लागली गुळाची, त्याच्या साठी मुलगी कशी अन् कुठे शोधायची ? 🤔 ऊसाला होते माहीत, आपल्या मुलाला ना रुप ना रंग, सतत काळजी वाटायची, कसा जाईल काशीला हा संग 😥 बर्‍याच मुली पाहील्या, कोणी त्याला पसंत करीना, काळजी वाटे ऊसाला रात्री झोप येईना 😔 ऊसाला मित्र एक होता, नांव त्याचे तूप 🤓 त्याने प्रयत्न केले खुप, अन् ऊसाला आला हुरुप 🤪 त्याने मुलगी सुचविली गव्हाची, जी दिसायला होती बेत्ताची 🥰 धान्यकुळीत उच्च गव्हाचे घराणे, होते ऊसाच्या तोलामोलाचे, ऊस म्हणे मागणी घालणे मुलीला, नाही ठरणार फोलाचे 😁 अंगाने ती होती लठ्ठ नी जाडजुड, रुपाला साजेसे, नांंव होते तीचे *'भरड* 🤩 गव्हाला मुलीच्या रुपाची होती कल्पना, तो कशाला करतो नसत्या वल्गना ? 😂 होकार दिला कारण, गुण दोघांचे जुळले, लग्न जमले अन् सारे तयारीला लागले 😎 किचन ओटा झाला, लग्नासाठी बुक, स्वयंपाकघर पण सजविले खुप 😌 'भरड' ला तूप कढईत घेउन गेले, तेथेच् तीचे खरपुस मेक-अप पण केले 🙆‍♂ भरपुर लाजली 'भरड', अन् झाली गुलाबी, गरम पाणी कढईत शिरले, अन् भरड झाली 'शराबी' 🥰 लग्नाची तयारी पहायला आलेले दुध सुद्धा कढईत शिरले, अन् हळुच् त्याने गुळाला कढईत पाचारीले ☺ गुळाने केला कढईप्रवेश, अन् उकळ्यारुप मंगलाष्टकांना आला आवेश 🥳 मनाने दगड असलेल्या भावनाशुन्य गुळाला, 'भरडी' चे रुप पाहुन, वेळ नाही लागला पाघळायला 😇 काजु बदाम किसमीच्या पडल्या अक्षता, कढईचे झाकण लावण्याची भटजीने घेतली दक्षता 😋 काळांतराने मुलगी झाली त्यांना, सुंदर गोड अशी, थाटामाटात बारसे झाले, नांव ठेवले *लापशी* 💃 आवडली ना 😀

+10 प्रतिक्रिया 5 कॉमेंट्स • 36 शेयर
Daksha Mar 27, 2020

करोना व्हायरचा वाढता संसर्ग पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर केले. या २१ दिवसांच्या लॉकडाउनमध्ये घरात बसून काय करायचे असा प्रश्न अनेकांना पडला होता. अशातच सोशल मीडियावर ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ पुन्हा दाखवण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती. त्यावर प्रसार भारतीचे मुख्य अधिकारी शशी शेखर प्रेक्षकांच्या या मागणीचा विचार करत असल्याचे समोर आले होते. आता रामायण लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडे यांनी दिली आहे. प्रकाश जावडे यांनी ट्विट करत शनिवारपासून रामायण पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी दाखवण्यात येणार असल्याची माहिती दिली. ‘मला सांगताना आनंद होत आहे की, लोकांच्या मागणीनुसार, आम्ही रामायण ही लोकप्रिय मालिका शनिवार, २८ मार्च रोजी डीडी नॅशनल या चॅलेनलवर टेलिकास्ट करणार आहोत. दररोज सकाळी ९ ते १० आणि पुन्हा रात्री ९ ते १० या वेळेत रोज एक एपिसोड दाखवण्यात येणार आहे’ असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

0 कॉमेंट्स • 0 शेयर

+8 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 5 शेयर

भारत का एकमात्र धार्मिक सोशल नेटवर्क

Rate mymandir on the Play Store
5000 से भी ज़्यादा 5 स्टार रेटिंग
डेली-दर्शन, भजन, धार्मिक फ़ोटो और वीडियो * अपने त्योहारों और मंदिरों की फ़ोटो शेयर करें * पसंद के पोस्ट ऑफ़्लाइन सेव करें
सिर्फ़ 4.5MB