*श्रीराम समर्थ* *समर्थ रामदासस्वामी रचित दासबोधावरील श्री रविंद्र पाठक यांची निरूपणें.दशक १३-नामरुप,समास ८-कर्तानिरूपण,निरूपण क्रमांक ५१० – भाग २ मधील सार.* दासबोधातील तेराव्या दशकातील आठव्या समासामध्ये या विश्वाचा कर्ता कोण? या विश्वात घडणाऱ्या घडामोडींचे कर्तृत्व नेमके कोणाचे? असा प्रश्न सर्व श्रोत्यांसमोर समर्थांनी केला आहे. वक्ता देखील अत्यंत चतुर आहे. एखाद्या सभेत आपल्याला निर्णय जरी घ्यायचा असेल आणि निर्णय काय आहे हे जरी माहिती असेल तरी तो सभेत एकमुखाने संमत होणे अत्यावश्यक आहे. ही एकमुखता येण्यासाठी प्रत्येकाच्या मनात काय विचार आहेत ते समजून घेणे हे त्या सभेच्या नायकाचे काम असते. परमार्थ हा मुळातच स्वातंत्र्याचा विषय आहे. इथे कुठलेही बंधन जीव आज्ञातवश भूमिकेतून कुठलीही गोष्ट स्वतःचे अनुकरण करण्याच्या दृष्टीने स्विकारून परमार्थात कधीच प्रचीतीच्या मार्गावर जाऊ शकत नाही. परमार्थ हा शास्त्रप्रचीती, गुरूप्रचीती, आणि आत्मप्रचीतीचा त्रिवेणी संगम आहे. त्यामुळे परमार्थात नेतृत्व करणारा सद्गुरू हा कधीही कुठलाही निर्णय लादत नाही. त्या ज्ञानाची अनुभूती घेण्यासाठी समर्थ आपल्याला हे स्वातंत्र्य देऊ इच्छितात की तुमच्या अंतःकरणात या कर्तेपणाबद्दल नेमके काय, काय सिद्धांत आहेत हे तुम्ही व्यक्त करा. संतांची भूमिका ही केव्हाही अज्ञानी जीवाच्या विचारांना प्रवृत्त करण्याची असते. समर्थरूप संत आज्ञानी जीवाला देखील या अशा विश्वाच्या कर्तेपणाविषयी प्रश्न विचारून त्यांच्या मनाची बाजू उघड करण्याचा प्रयत्न करतात. कारण मनुष्य हा मनन करू शकतो आणि संत आम्हांला मननाला प्रवृत्त करत असतात, ते आम्हांला आत्मप्रचीतीसाठी उद्यूक्त करत असतात. म्हणून समर्थ या सभेमध्ये जरी श्रोत्यांनी निश्चयात्मकरित्या या विश्वाचा कर्ता कोण असे विचारले असले तरी संत मुभा देतात आणि म्हणतात की तुम्ही या विषयावर तुमचे मत सांगा. *तव बोलिले सभानायेक ! जे बोलिके येकाहून येक !* *या बोलण्याचें कौतुक ! श्रोतीं सादर ऐकावें !!१३.८.२.!!* तुम्ही हे सर्व चार लोकांनी येऊन केलेले हे विचारमंथन ऐका, या सभेत अनेक लोक बसलेले आहेत प्रत्येकाची पार्श्वभूमी, जीवनाचे अनुभव, जीवनात केलेली साधना यांचे स्तर वेगवेगळे आहेत परंतु संत जे प्रत्येकामध्ये रामरूप बघतात त्यांना या प्रत्येक स्तरावरून या विश्वाच्या कर्तेपणाविषयी व्यक्त केलेल्या मतांचे कौतुक आहे. संत त्यांच्या उत्तराला ऐकून घेतात आणि त्यांच्या मनामध्येच प्रतिप्रश्न निर्माण करतात. जसं पहिला श्रोता उठून बोलतो. *येक म्हणती कर्ता देव ! येक म्हणती कोण देव !* *आपुलाला अभिप्राव ! बोलते जाले !!१३.८.३.!!* एक म्हणतो या विश्वाचे कर्तेपण ईश्वराचे आहे. यावर स्वाभाविकपणे प्रश्न वक्ता त्याच्या अंतःकरणात निर्माण करतो की ईश्वराकडे कर्तेपण आहे हे योग्य आहे पण हा ईश्वर कोण आहे? अशारितीने समर्थ या सभेमध्ये प्रत्येकाला आपला अभिप्राय व्यक्त करण्याची मुभा देतात. *उत्तम मध्यम कनिष्ठ ! भावार्थें बोलती पष्ट !* *आपुलाली उपासना श्रेष्ठ ! मानिती जनीः !!१३.८.४.!!* जगामध्ये सर्व स्तरांवरील लोक या गुह्य प्रश्नाचे अखंड चिंतन करत असतात. त्यात काही आत्मिक पातळीवर साधनेच्या आधारे उत्तम मशागत करून उत्तम प्रतीचे साधक या दृष्टीने या सभेत बसलेले आहेत. काही मध्यम प्रतीचे आहेत ज्यांची प्रपंचातली आसक्ती अजूनही संपलेली नाही परंतु त्यांच्या मनात मुमुक्षत्व निर्माण होवू लागलेले आहे आणि काही कनिष्ठ दर्जाची मंडळी आहेत की ज्यांच्या दृष्टीने हे दृश्यजगच केवळ सत्य आहे. अशा तीन पातळीवरचे लोक प्रत्येकजण आपआपल्या पद्धतीने मत,अभिप्राय व्यक्त करू लागलेला आहे. आणि समर्थ शांतपणे हा चाललेला सगळा गदारोळ या सभेत चाललेल्या वेगवेगळ्या मतमतांतराचा विचार ऐकून घेत आहेत. यामध्ये साधे उदाहरण द्यायचे झाले तर तुमची आमची प्रत्येकाची श्रद्धा कुठल्या ना कुठल्या अराध्य दैवतावर असते. आणि ते अराध्यदैवत हेच माझ्या जीवनाचा सूत्रधार आहे याची स्पष्ट अनुभूती आपल्याला वैयक्तिक पातळीवर होते. वेगवेगळ्या प्रकारच्या उपासना करणाऱ्या देवतांची जिथं आपली श्रद्धा आहे, जिथं आपला अनुभव आहे, ज्याची आपण उपासना केली असता बऱ्याचदा मनासारखे फळही मिळालेले आहे त्याच्याकडे आपण अगदी निःशंकपणे आपले कर्तेपण देत असतो. वैयक्तिक पातळीवर हे बरोबर आहे कारण जिथं माझी श्रद्धा आहे तोच या विश्वाचा कर्ता याविषयी माझ्या वैयक्तिक जीवनात मला कुठल्याही प्रकारची शंका असता कामा नये. परंतु हे सामुदायिक पातळीवर जेव्हा एकमुखाने उत्तर शोधण्याचा प्रसंग येतो त्यावेळेला बऱ्याचदा माझा देव हाच माझा अहंकार होतो का? हा देखील अंर्तमुख करणारा प्रश्न आहे. इथं प्रत्येकजण आपआपल्या निष्ठेनूसार त्या, त्या देवतेकडे त्या विश्वाचे कर्तृत्व देतो. सामुदायिक पातळीवर होणाऱ्या चर्चेचे रूपांतरण सांप्रदायिक पातळीवर होते. अज्ञानवश या विश्वाचा खरा कर्ता कोण हे शोधण्याच्या ऐवजी अहंकारापोटी आपल्याच स्वतःमध्ये भीती बाळगून आपल्याच अहंकाराला आपण गोंजारत बसतो. अशीच काहीशी अवस्था या सभेमध्ये झालेली आहे. संताना या गदारोळातूनच ज्याप्रमाणे समुद्रमंथनात पहिल्यांदा हलाहल विष निघाले आणि त्यानंतर शेवटी अमृत निघाले त्यापद्धतीने बुद्धीच्या या अमृतमंथनात लोकांच्या अंतरंगात पसरलेले हे हलाहल, ही सांप्रदायिकता, मी म्हणतो तोच खरा देव इतर दुय्यम, माझाच गुरू श्रेष्ठ इतरांचा गुरू कनिष्ठ अशा पद्धतीने चाललेली आपल्या अंतःकरणातली सांप्रदायिकता दूर करण्याच्या दृष्टीने समर्थ आपल्याला या विश्वाचा कर्ता कोण? ही शोधण्याची भूमिका एका सामुदायिक पातळीवरती देतात आणि त्यामध्ये हे विषयरूपी हलाहल या वेगवेगळ्या विचारांच्या आधाराने व्यक्त होते. अशा हलाहलामधूनच गुरूराया आपल्याला या विश्वाचा खरा कर्ता कोण या उत्तराकडे हळूहळू घेऊन चाललेले आहेत. त्याचे निश्चयात्मक उत्तर तुम्हां-आम्हां प्रत्येकाला हवंय ते उत्तर समर्थ या समासामध्ये देतात. जानकी जीवन स्मरण जय जय राम लक्ष्मीकांत खडके 🙏

*श्रीराम समर्थ*

*समर्थ रामदासस्वामी रचित दासबोधावरील श्री रविंद्र पाठक यांची निरूपणें.दशक १३-नामरुप,समास ८-कर्तानिरूपण,निरूपण क्रमांक ५१० – भाग २ मधील सार.*

दासबोधातील तेराव्या दशकातील आठव्या समासामध्ये या विश्वाचा कर्ता कोण? या विश्वात घडणाऱ्या घडामोडींचे कर्तृत्व नेमके कोणाचे? असा प्रश्न सर्व श्रोत्यांसमोर समर्थांनी केला आहे. वक्ता देखील अत्यंत चतुर आहे. एखाद्या सभेत आपल्याला निर्णय जरी घ्यायचा असेल आणि निर्णय काय आहे हे जरी माहिती असेल तरी तो सभेत एकमुखाने संमत होणे अत्यावश्यक आहे. ही एकमुखता येण्यासाठी प्रत्येकाच्या मनात काय विचार आहेत ते समजून घेणे हे त्या सभेच्या नायकाचे काम असते.

परमार्थ हा मुळातच स्वातंत्र्याचा विषय आहे. इथे कुठलेही बंधन जीव आज्ञातवश भूमिकेतून कुठलीही गोष्ट स्वतःचे अनुकरण करण्याच्या दृष्टीने स्विकारून परमार्थात कधीच प्रचीतीच्या मार्गावर जाऊ शकत नाही. परमार्थ हा शास्त्रप्रचीती, गुरूप्रचीती, आणि आत्मप्रचीतीचा त्रिवेणी संगम आहे. त्यामुळे परमार्थात नेतृत्व करणारा सद्गुरू हा कधीही कुठलाही निर्णय लादत नाही. त्या ज्ञानाची अनुभूती घेण्यासाठी समर्थ आपल्याला हे स्वातंत्र्य देऊ इच्छितात की तुमच्या अंतःकरणात या कर्तेपणाबद्दल नेमके काय, काय सिद्धांत आहेत हे तुम्ही व्यक्त करा. संतांची भूमिका ही केव्हाही अज्ञानी जीवाच्या विचारांना प्रवृत्त करण्याची असते.

समर्थरूप संत आज्ञानी जीवाला देखील या अशा विश्वाच्या कर्तेपणाविषयी प्रश्न विचारून त्यांच्या मनाची बाजू उघड करण्याचा प्रयत्न करतात. कारण मनुष्य हा मनन करू शकतो आणि संत आम्हांला मननाला प्रवृत्त करत असतात, ते आम्हांला आत्मप्रचीतीसाठी उद्यूक्त करत असतात. म्हणून समर्थ या सभेमध्ये जरी श्रोत्यांनी निश्चयात्मकरित्या या विश्वाचा कर्ता कोण असे विचारले असले तरी संत मुभा देतात आणि म्हणतात की तुम्ही या विषयावर तुमचे मत सांगा.

*तव बोलिले सभानायेक ! जे बोलिके येकाहून येक !*
*या बोलण्याचें कौतुक ! श्रोतीं सादर ऐकावें !!१३.८.२.!!*

तुम्ही हे सर्व चार लोकांनी येऊन केलेले हे विचारमंथन ऐका, या सभेत अनेक लोक बसलेले आहेत प्रत्येकाची पार्श्वभूमी, जीवनाचे अनुभव, जीवनात केलेली साधना यांचे स्तर वेगवेगळे आहेत परंतु संत जे प्रत्येकामध्ये रामरूप बघतात त्यांना या प्रत्येक स्तरावरून या विश्वाच्या कर्तेपणाविषयी व्यक्त केलेल्या मतांचे कौतुक आहे. संत त्यांच्या उत्तराला ऐकून घेतात आणि त्यांच्या मनामध्येच प्रतिप्रश्न निर्माण करतात. जसं पहिला श्रोता उठून बोलतो.

*येक म्हणती कर्ता देव ! येक म्हणती कोण देव !*
*आपुलाला अभिप्राव ! बोलते जाले !!१३.८.३.!!*

एक म्हणतो या विश्वाचे कर्तेपण ईश्वराचे आहे. यावर स्वाभाविकपणे प्रश्न वक्ता त्याच्या अंतःकरणात निर्माण
करतो की ईश्वराकडे कर्तेपण आहे हे योग्य आहे पण हा ईश्वर कोण आहे? अशारितीने समर्थ या सभेमध्ये प्रत्येकाला आपला अभिप्राय व्यक्त करण्याची मुभा देतात.

*उत्तम मध्यम कनिष्ठ ! भावार्थें बोलती पष्ट !*
*आपुलाली उपासना श्रेष्ठ ! मानिती जनीः !!१३.८.४.!!*

जगामध्ये सर्व स्तरांवरील लोक या गुह्य प्रश्नाचे अखंड चिंतन करत असतात. त्यात काही आत्मिक पातळीवर साधनेच्या आधारे उत्तम मशागत करून उत्तम प्रतीचे साधक या दृष्टीने या सभेत बसलेले आहेत. काही मध्यम प्रतीचे आहेत ज्यांची प्रपंचातली आसक्ती अजूनही संपलेली नाही परंतु त्यांच्या मनात मुमुक्षत्व निर्माण होवू लागलेले आहे आणि काही कनिष्ठ दर्जाची मंडळी आहेत की ज्यांच्या दृष्टीने हे दृश्यजगच केवळ सत्य आहे. अशा तीन पातळीवरचे लोक प्रत्येकजण आपआपल्या पद्धतीने मत,अभिप्राय व्यक्त करू लागलेला आहे. आणि समर्थ शांतपणे हा चाललेला सगळा गदारोळ या सभेत चाललेल्या वेगवेगळ्या मतमतांतराचा विचार ऐकून घेत आहेत. यामध्ये साधे उदाहरण द्यायचे झाले तर तुमची आमची प्रत्येकाची श्रद्धा कुठल्या ना कुठल्या अराध्य दैवतावर असते. आणि ते अराध्यदैवत हेच माझ्या जीवनाचा सूत्रधार आहे याची स्पष्ट अनुभूती आपल्याला वैयक्तिक पातळीवर होते. वेगवेगळ्या प्रकारच्या उपासना करणाऱ्या देवतांची जिथं आपली श्रद्धा आहे, जिथं आपला अनुभव आहे, ज्याची आपण उपासना केली असता बऱ्याचदा मनासारखे फळही मिळालेले आहे त्याच्याकडे आपण अगदी निःशंकपणे आपले कर्तेपण देत असतो. वैयक्तिक पातळीवर हे बरोबर आहे कारण जिथं माझी श्रद्धा आहे तोच या विश्वाचा कर्ता याविषयी माझ्या वैयक्तिक जीवनात मला कुठल्याही प्रकारची शंका असता कामा नये. परंतु हे सामुदायिक पातळीवर जेव्हा एकमुखाने उत्तर शोधण्याचा प्रसंग येतो त्यावेळेला बऱ्याचदा माझा देव हाच माझा अहंकार होतो का? हा देखील अंर्तमुख करणारा प्रश्न आहे. इथं प्रत्येकजण आपआपल्या निष्ठेनूसार त्या, त्या देवतेकडे त्या विश्वाचे कर्तृत्व देतो. सामुदायिक पातळीवर होणाऱ्या चर्चेचे रूपांतरण सांप्रदायिक पातळीवर होते. अज्ञानवश या विश्वाचा खरा कर्ता कोण हे शोधण्याच्या ऐवजी अहंकारापोटी आपल्याच स्वतःमध्ये भीती बाळगून आपल्याच अहंकाराला आपण गोंजारत बसतो. अशीच काहीशी अवस्था या सभेमध्ये झालेली आहे.

संताना या गदारोळातूनच ज्याप्रमाणे समुद्रमंथनात पहिल्यांदा हलाहल विष निघाले आणि त्यानंतर शेवटी अमृत निघाले त्यापद्धतीने बुद्धीच्या या अमृतमंथनात लोकांच्या अंतरंगात पसरलेले हे हलाहल, ही सांप्रदायिकता, मी म्हणतो तोच खरा देव इतर दुय्यम, माझाच गुरू श्रेष्ठ इतरांचा गुरू कनिष्ठ अशा पद्धतीने चाललेली आपल्या अंतःकरणातली सांप्रदायिकता दूर करण्याच्या दृष्टीने समर्थ आपल्याला या विश्वाचा कर्ता कोण? ही शोधण्याची भूमिका एका सामुदायिक पातळीवरती देतात आणि त्यामध्ये हे विषयरूपी हलाहल या वेगवेगळ्या विचारांच्या आधाराने व्यक्त होते. अशा हलाहलामधूनच गुरूराया आपल्याला या विश्वाचा खरा कर्ता कोण या उत्तराकडे हळूहळू घेऊन चाललेले आहेत. त्याचे निश्चयात्मक उत्तर तुम्हां-आम्हां प्रत्येकाला हवंय ते उत्तर समर्थ या समासामध्ये देतात.

जानकी जीवन स्मरण जय जय राम
      लक्ष्मीकांत खडके 
          🙏

+10 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 26 शेयर

_*योग्य पोषण....*_ _दक्षिणेत अनंतरमण नावाचा उत्तम,प्रजेची काळजी घेणारा,साधूसंतांचा मान ठेवणारा राजा होता.राजपूत्र सुशांत मात्र लहानपणापासूनच बंड मस्तीखोर होता.जसा-जसा मोठा होत होता तसा जास्त अहंकारी,प्रजेला त्रास देणारा आणि सज्जनांचा अपमान करणारा झाला त्यामुळे राजा नेहमीच चिंतित असे.एक दिवस राजपुत्र सुशांत म्हणाला;”आपल्याकडे इतके सैनिक आहेत पण त्यांची आपल्याला गरज नाही.उगाच त्यांच्यावर पैसा खर्च होतोय जेव्हा युद्धस्थिति निर्माण होईल तेव्हा त्यांना बोलावता येईल आता विनाकारण त्यांना पोसण्याची जरूरी नाही.”राजा काहीच बोलला नाही.एका रात्री ते दोघं जंगलात गेले.सोबत भरपूर खाद्यपदार्थ घेतले होते ते एका झाडाखाली ठेवले.राजा म्हणाला;”इतके पदार्थ पाहून आता भरपूर कावळे येतील त्यांनी अन्नग्रहण केलं की आपण जाऊ.”राजपूत्र गोंधळला आणि आश्चर्याने म्हणाला;”आपण कितीही अन्न ठेवलं तरी रात्री ऐनवेळेवर कावळे कसे येतील?”राजा मंद स्मित करत उत्तरला;”मग अचानक युद्धस्थिती निर्माण झाली तर ऐनवेळी कितीही द्रव्य दिलं तर मरणाच्या भितीने सैनिक कसे येतीलआणि आले तरी त्यांच्यात युद्धकौशल्य कसे येईल?त्यामुळे सैनिकांना युद्ध नसले तरी पोसणे हितावहच असते.सैन्य तयार असल्यामुळे आपल्यावर आक्रमण करण्याची हिम्मतही कुणी करणार नाही." *आपल्याही बऱ्याच गोष्टी आपण जेव्हा गरज पडेल तेव्हा पाहू या यादीत ठेवतो आणि गरज पडली की भांबावून जातो.शाळाकाॅलेजमध्ये असताना अभ्यासाच्या बाबतीत हेच करतो आणि मग परिक्षा आली की भांबावतो.अभ्यासाव्यतिरीक्त काही छंद जोपासणे किंवा एखादी कला शिकणे यातही आळशीपणा दाखवतो आणि मग पस्तावतो.मोठे झाल्यावरही कामाच्या नियोजनात चुकतो आणि एखादा अवघड प्रसंग हाताळण्याचे कौशल्य नसल्यामुळे धीर सोडतो.पैशाचही नियोजन व्यवस्थित नसल्यामुळे मोठा खर्च आला की इकडे-तिकडे व्यवस्था लागते का पहातो.आणि सर्वात महत्वाचे नियमीत जीवनशैली योग,व्यायाम,प्राणायाम हे आजारी पडल्यावर किंवा शरीराच्या तक्रारी वाढल्यावर सुरू करतो.तोपर्यंत पाहू नंतर या यादीतच ठेवतो.ऐनवेळेला जसे सैन्य कुशलतेने लढू शकत नाही तसेच आपणही कौशल्य दाखवू शकत नाही कारण आपण आपलं शरीर आणि मन त्यादृष्टीने पोसलेलच नसतं.कठीण प्रसंग,परिस्थितीचा,मनाचा,शरीराचा,स्वास्थ्याचा हाताळण्यासाठी नियमीत पोषण जरूरी....*_ _*मिञानो;काळजी घ्या.....*_

+6 प्रतिक्रिया 2 कॉमेंट्स • 11 शेयर

_*मनाचा ताबा....*_ _चारूदत्त नावाचा राजा होता तो चांगला चित्रकार होता,विशेष करून त्याला निसर्गचित्रे काढायला आवडायची.एकदा एका उंच टेकडीवर चित्र काढायला गेला आणि समोरचं सुंदर दृश्य चित्रीत केलं.आपलं चित्र दूरून कसं दिसतं हे पहाण्यासाठी तो एकेक पाऊल मागे-मागे सरकू लागला.ती उंच टेकडी एका ठिकाणी दुभंगलेली होती.आता एक पाउल जरी मागे पडलं असतं तरी तो खोल दरीत पडला असता पण त्याला ते माहित नव्हतं.जवळच एक मेंढपाळ होता त्याने ते पाहिलं राजाला सावध करण्यासाठी आवाज दिला पण राजाला काही ऐकू आलं नाही.शेवटी मेंढपाळाने त्याच्या हातातली काठी जोरात फेकून चित्रावर मारली आणि चित्र फाटलं.राजा भानावर आला मेढपाळाला जवळ बोलवून त्याला देहान्ताची शिक्षा दिली.मेंढपाळाने भीत-भीत त्याची माफी मागितली आणि म्हणाला;"आपल्या राजाला वाचवण्यासाठीच मी हे केलं आणि ते माझं पहिलं कर्तव्य आहे त्यासाठी मला जीव गमवावा लागला तरी चालेल.महाराज असतील तरच राज्य सुरक्षित राहिल आणि चित्रं तर कितीही बनतील.”आणि त्याने पूर्ण घटना सांगितली.क्रोधित राजा भानावर आला त्याने माफी मागुन मेंढपाळाला भरपूर बक्षिस दिलं.*कधीकधी आपणही एखाद्या गोष्टीत खुप रमतो.आजूबाजूचं,परिस्थितीचं आणि महत्वाचं म्हणजे कर्तव्याचंही भान रहात नाही.मोबाइल टिव्ही सारख्या गोष्टीत इतकं गुंतत जातो की आपली रोजची आवश्यक कामं मागे पडतात किंवा पूर्ण केली तरी मनासारखी न करता ती संपवण्याकडेच आपला कल असतो.यात सर्वात जास्त नुकसान आपण आपल्या स्वत:चं करतो,आपल्या तब्येतीचं करतो.योग व्यायाम तर दूरच पण जेवण्याच्या झोपण्याच्या वेळाही आपण पाळत नाही आणि स्वत:चं नुकसान करून घेतो.छंद तर हवेच,विरंगुळाही हवा त्यात तन्मयताही पाहिजेच आणि मनापासून आनंदही घ्यावा पण कुठे थांबायचं याचं भानही पाहिजेच.एखादा मेंढपाळरूपी क्षण आपल्याला आवाज देतो सावध होण्यासाठी तो जीवनात वेळेवर आला तर चांगलंच जीवनही वाचतं आणि चित्रही सुरक्षित रहातं.पण उशीर झाला तर आपल्या स्वास्थ्याशिवाय आपले छंद काय कामाचे?मेंढपाळाचा आवाज वेळेवर ऐकला,सगळ्यात समतोल असला तरच सगळं सुरळीत राहिल....*_ _*मिञानो;काळजी घ्या.....*_

+12 प्रतिक्रिया 4 कॉमेंट्स • 39 शेयर

_*सुख म्हणजे काय असतं....?*_ _*सुख* एक अल्हाददायक मानसिक अवस्था जी प्रत्येकालाच हवी असते.पण ही मानसिक अवस्था कशी तयार होते?यावेळी मनाची नेमकी काय अवस्था असते?याचा आपण कधी विचारच करत नाही.खूपदा वाढणाऱ्या अपेक्षा,दुसऱ्यांविषयी असणारी असूया,कुठे थांबायचे हे न समजणं,अति हव्यास,वैचारिक समज नसणं अशी अनेक कारणं मानवी सुखाच्या आड येत राहतात.त्यामुळे माणूस कधीच सुखाची अंतीम पातळी गाठू शकत नाही.मुळात वैचारिक पातळीवर खूपच भेद असतात.त्यामुळे प्रत्येक मानवाच्या सुखाच्या व्याख्या वेगवेगळ्या असतात.मला ज्यात सुख वाटतं त्यात समोरच्या व्यक्तीला सुख वाटेलंच असं नाही.म्हणूनच तर जगात सुखी कोणीच दिसत नाही.पण जीवन जगताना नेमकं आपणास काय हवं असतं?मग ते भौतिक असो!शारिरीक असो!वा मानसिक.माणसांना नेमकं काय हवं असतं हेच समजतं नाही.नेमकं सुख म्हणजे काय हे तरी आपणास समजतं का?कारण जगातलं प्रत्येक सुख हे क्षणभंगुर असतं.आणि दु:खं देखील क्षणभंगुरच असतं.आयुष्यात घडणाऱ्या काही घटना का घडतात हे आपणास समजतंच नाही.आणि जे समजत नाही ते सहज सोडून देऊन पुढ जायचं असतं.कारण काही नैसर्गिक घटना आपण टाळू शकत नाही.उदा:-जवळच्या व्यक्तीचा मृत्यू,अचानक झालेल आर्थिक नुकसान अशा गोष्टींंचं दु:खं विसरून पुढेच जावं लागतं.शेवटी सुख म्हणजे काय असतं तुम्हाला जे जे हवं ते ते मिळणं म्हणजे सुख असतंच पण त्याहुनही महत्त्वाचं म्हणजे आयुष्य जगताना आपल्या मुलभूत गरजा भागवून तणाव विरहित वातावरण निर्माण करुन ज्याला जगता येतं तिथं सुख नक्कीच असतं.पण मानवागणिक सुखाच्या व्याख्या बदलत जातात.काहींना खरं सुख म्हणजे काय हेच समजत नाही.काहींना खूप पैसा म्हणजे सुख वाटतं,काहींना माणुसकी म्हणजे सुख वाटतं,काहींना मानसिक आरोग्य,मानसिक शांतता हेच सुख वाटतं.सुखाकडे पाहण्याचे दृष्टीकोन वेगवेगळे असतात.पण आम्हांला वाटतं *आयुष्यातील छोट्या-छोट्या गोष्टीत आनंद शोधत आपलं शारिरीक आणि मानसिक आरोग्य उत्तम ठेवणं.आपला स्वभाव प्रेमळ ठेवून आपल्या सभोवताली शक्य तितका आनंद पसरवणं यालाच सुख म्हणावं.जीवनाचं अंतीम सत्य मृत्यू आहे.जो अचानक केव्हाही येऊ शकतो आणि जाताना आपणास रिकाम्या हातांनी घेऊन जातो.पण मन:शांती,समाधान हेच जीवनाचं खरं सुख असतं आणि ते मिळवणं आपल्याच हातात असतं....*_ _*मिञानो;काळजी घ्या.....*_

+8 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 25 शेयर
Renuka Saluja Jan 16, 2022

+10 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 2 शेयर

भारत का एकमात्र धार्मिक सोशल नेटवर्क

Rate mymandir on the Play Store
5000 से भी ज़्यादा 5 स्टार रेटिंग
डेली-दर्शन, भजन, धार्मिक फ़ोटो और वीडियो * अपने त्योहारों और मंदिरों की फ़ोटो शेयर करें * पसंद के पोस्ट ऑफ़्लाइन सेव करें
सिर्फ़ 4.5MB