*गोपाळा गोपाळा देवकीनंदन गोपाळा.* *🎊🎉भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.🙏🏻💐* भगवान श्रीकृष्णाने धर्माचे रक्षण करण्याकरिता ज्या दिवशी पृथ्वीवर जन्म घेतला तो दिवस म्हणजे गोकुळाष्टमी होय. माधव, गोपाल, मुकुंद, मुरारी, मधुसुदन, श्रीहरी, श्रीकृष्ण ई. अनेक नावांनी ओळखले जाणारे व्यक्तिमत्व म्हणजे गीता सांगणारा श्रीकृष्ण होय. श्रीकृष्ण ही भारतीयांची लाडकी देवता. त्यामुळे गोकुळाष्टमी-कृष्णाष्टमीचा हा उत्सव मोठ्या थाटामाटाने सर्वत्र साजरा केला जातो. मंदिरातून आरास केली जाते. रात्री १२ वाजता श्रीकृष्ण जन्म सोहळा केला जातो. भजन, पूजन, कीर्तन इ. अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. गोकुळाष्टमीचा दुसर्या दिवशी सोडतात. त्यालाच कृष्णाष्टमीचे पारणे असे म्हणतात. दुसर्या दिवशी शहरात, गावा-गावांत, चौका-चौकांत दही हंडी लावली जाते. कृष्ण नामाच्या गजरांत ती फोडली जाते. आनंदोत्सव साजरा केला जातो.