🌹 *ब्रह्मगिरी प्रदक्षिणा* 🌹 त्र्यंबकेश्वर येथील श्रावण महिन्यातील तिसर्या सोमवारची ब्रह्मगिरी प्रदक्षिणेचे महात्म्य आहे. श्री संत निवृत्तीनाथ महाराजांना याच ब्रह्मगिरी प्रदक्षिणेच्या दरम्यान योगीराज गहिनीनाथांचा अनुग्रह लाभला आणि भागवत धर्माची स्थापना झाली. अशा पुराणकालापासून ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा प्रचलित आहे. पुण्यप्राप्तीसाठी, तर कधी पापक्षालनासाठी प्रदक्षिणा झाल्याचे जाणकार म्हणतात. प्रदक्षिणा तिसर्या सोमवारीच करावी, हा नवा पायंडा वर्षानुवर्षे रूढ झाला आहे. सलग पाच वर्षे तिस-या सोमवारी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा केली जाते. वास्तविक पाहता, ब्रह्मगिरी प्रदक्षिणा वर्षभरात केव्हाही केली तरी चालते, अशी ज्येष्ठ मंडळी सांगतात. केवळ श्रावणातील तिस-या सोमवारचा आग्रह धरल्याने ठराविक वेळेत काही भाविक या २० किलोमीटच्या मार्गावर चालतात. श्रावणी सोमवारला फेरी करणे विशेष फलदायी मानले जाते. पूर्वी पहिल्या दोन श्रावण त्र्यंबकला विशेष गर्दी असायची. पौर्णिमेपर्यंत लिंगार्चन, पोथीपुराण व पारायण आदी धार्मिक विधींची रेलचेल, भाविकांची गर्दी त्यातून व्यावसायिकांना उसंत मिळायची नाही. श्रावण उतरणीला लागल्यानंतर तिस-या सोमावरी फेरीला प्राधान्य दिले जायचे. तिसरा सोमवार हा प्रदक्षिणेचा पर्वकाळ मानला गेला. १९९६ नंतर तिसरा सोमवार अक्षरश: लाखोंच्या गर्दीने फुलायला लागला. ब्रह्मगिरी प्रदक्षिणा तीन प्रकारची आहे. ब्रह्मगिरी प्रदक्षिणा, हरिहर ब्रह्मगिरी प्रदक्षिणा आणि इंद्रपर्वत (अंजनेरी पर्वत) यासह ब्रह्मगिरी प्रदक्षिणा. या प्रदक्षिणेत ब्रह्मगिरी पर्वतास फेरी मारली जाते. सर्वसाधरणत: त्यास 'फेरी' म्हणून संबोधण्यात येते. ही ब्रह्मगिरी पर्वतास असलेली लहान प्रदक्षिणा आहे. सुमारे २० किलोमीटरचा हा मार्ग असून या मार्गावर अनेक तीर्थ आहेत. त्यापैकी काळाच्या ओघात लुप्त झाले आहेत. ही प्रदक्षिणा करण्यासाठी काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. प्रदक्षिणेला सुरुवात करताना पंचपंच उषका:ली सूर्योदयापूर्वी दोन तास उठून कुशावर्तावर स्नान करून श्री त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन मार्गक्रमण करावे, म्हणजे साधारणत: पहाटे पाच वाजता ही फेरी सुरू करावी. सूर्योदय होताना प्रयाग तीर्थास वळसा घालून पेगलवाडीमार्गेसृष्टी सौंदर्याचा अस्वाद घेत बहरलेल्या निसर्गाचे अवलोकन करत, शिवाचे नामस्मरण करत सात्विक मनाने फेरी करावी. प्रदक्षिणा मार्गावर अनेक तिर्थे लागतात. प्रयाग तीर्थ, सरस्वती तीर्थ, नागा तीर्थ, राम तीर्थ, वैतरणा बाणगंगा निर्मल तीर्थ, बाणगंगा धवलगंगा पद्मतीर्थ, नरसिंह तीर्थ, बिल्व तीर्थ आदी आणि नद्या व मंदिरे लक्ष वेधून घेतात. प्रदक्षिणेदरम्यान गौतमाची टेकडी उतरल्यानंतर नमस्काराचे ठिकाण लागते. येथे पंचमुखी शिवस्वरूप ब्रह्मगिरीस आपण पूर्वाभिमुख होऊन साष्टांग नमस्कार घालावा, अशी प्रथा आहे. सकाळाच्या वेळेस प्रदक्षिणा सुरू केल्यानंतर येथे हा अर्धा प्रवास संपतो. येथून होणारे ब्रह्मगिरीचे विलोभनीय दर्शन पाहायला मिळते. श्रावण महिना सुरू होताच महिनाभर प्रदक्षिणा करणारे भाविक या मार्गावर असतात. तसेच श्रावणात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी निसर्गप्रेमीदेखील येतात. *"दृष्टी पडता ब्रम्हगिरी । त्यासी नाही यमपुरी ॥* *"नामा म्हणे प्रदक्षिणा । त्याच्या पुण्या नाही गणना ।।* शिव शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांमध्ये त्र्यंबकेश्वरचा समावेश होतो. दक्षिणेची काशी मानले जाणार्या नाशिकपासून हे ज्योतिर्लिंग ३५ किलोमीटरवर आहे. ज्योतिर्लिंग स्तोत्रातही त्र्यंबक 'गौतमी तटे' असे म्हणून त्र्यंबकेश्वराचा उल्लेख केला आहे. त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी या पर्वताच्या पायथ्याशी वसले आहे. हा पर्वत म्हणजे शिवाचे एक रूप मानले जाते. श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी असते. प्रत्येक श्रावणी सोमवारी ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घातली जाते. तिसऱ्या सोमवारी तर मोठी गर्दी असते.या काळात कुशावर्तात स्नान करणे फार पवित्र मानले जाते. धार्मिक ग्रंथात असा उल्लेख केलेला आहे की ब्रम्हगिरीच प्रदक्षिणा केली तर पृथ्वी प्रदक्षिणेचे पुण्य मिळते. असा पुराणात उल्लेख आहे. सर्वात प्रथम संत निवृत्तीनाथांनी ब्रम्हगिरीस प्रदक्षिणा घातली आहे. ज्या ठिकाणी संत निवृत्तीनाथ थांबले त्याठिकाणीच फेरी मारणारे भाविक थांबून आराम करत असतात. यावेळी लाखो भाविक ब्रम्हगिरी पर्वताला फेरी मारत असतात. कुशावर्तात स्नान करून भाविक कुशावर्ताला एक प्रदक्षिणा घालून पुढे त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतात. आमची प्रदक्षिणेला सुरुवात करतात. साधारणत: मंदिरापासून एक किलोमीटरवर प्रयागतीर्थ या ठिकाणी एक तळे लागते. त्या तळ्याला प्रदक्षिणा घालून पुढे निघावे लागते. श्रावणामध्ये दर रविवारी रात्री कुशावर्तापासून फेरीची सुरुवात होते. प्रचंड गर्दी असते तेथे २० किमी आणि ४० कि.मी अशा दोन प्रदक्षिणा आहेत. अनुभवी लोक मोठी प्रदक्षिणा करतात. बाकी छोटी प्रदक्षिणा करतात. त्यासाठी १२ तास लागतात. ही सगळी प्रदक्षिणा अनवाणी होते. दहा ते पंधरा वर्षापूर्वी फक्त श्रावण महिन्यातील तिसर्या रविवारी रात्री १२ वा. कुशावर्त तीर्थावर स्नान करून फेरीस भाविक सुरूवात करत असत. आता श्रावणातील प्रत्येक सोमवारी ब्रम्हगिरीची फेरी घातली जाते. प्रदक्षिणा ही दोन प्रकारे असते. एक फक्त ब्रम्हगिरी पर्वताला फेरी मारणे-ती साधारणत: ३० किलोमीटरची आणि दुसरी म्हणजे ब्रम्हगिरी आणि हरिहर पर्वत - ६० किलोमीटरची तर ६० किलोमीटरची प्रदक्षिणा ही कठीण आहे. त्यात ७ पर्वत चढावे आणि उतरावे लागतात. याठिकाणचा जंगल परिसर आहे. *ब्रम्हगिरी प्रदक्षिणा मार्गावरील देवालये* प्रदक्षिणा मार्गावर अनेक तीर्थ आहेत. प्रयाग तीर्थ, सरस्वती तीर्थ, नागतीर्थ, रामतीर्थ, वैतरणा, बाणगंगा, निर्मल तीर्थ, धवल गंगा, बिल्व्तीर्थ, आदी तीर्थ मंदिरे लक्ष वेधतात. प्रदक्षिणा दरम्यान गौतमाची टेकडी उतरल्यानंतर नमस्काराचे ठिकाण लागते. येथे पंचमुखी शिव स्वरूप ब्र्म्हगिरीस पूर्वाभिमुख होत साष्टांग नमस्कार घालावा, अशी प्रथा आहे. *🌹🙏🏻*

🌹 *ब्रह्मगिरी प्रदक्षिणा* 🌹

त्र्यंबकेश्वर येथील श्रावण महिन्यातील तिसर्या सोमवारची ब्रह्मगिरी प्रदक्षिणेचे महात्म्य आहे. श्री संत निवृत्तीनाथ महाराजांना याच ब्रह्मगिरी प्रदक्षिणेच्या दरम्यान योगीराज गहिनीनाथांचा अनुग्रह लाभला आणि भागवत धर्माची स्थापना झाली. अशा पुराणकालापासून ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा प्रचलित आहे. पुण्यप्राप्तीसाठी, तर कधी पापक्षालनासाठी प्रदक्षिणा झाल्याचे जाणकार म्हणतात. प्रदक्षिणा तिसर्या सोमवारीच करावी, हा नवा पायंडा वर्षानुवर्षे रूढ झाला आहे. सलग पाच वर्षे तिस-या सोमवारी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा केली जाते.
वास्तविक पाहता, ब्रह्मगिरी प्रदक्षिणा वर्षभरात केव्हाही केली तरी चालते, अशी ज्येष्ठ मंडळी सांगतात. केवळ श्रावणातील तिस-या सोमवारचा आग्रह धरल्याने ठराविक वेळेत काही भाविक या २० किलोमीटच्या मार्गावर चालतात. श्रावणी सोमवारला फेरी करणे विशेष फलदायी मानले जाते. पूर्वी पहिल्या दोन श्रावण त्र्यंबकला विशेष गर्दी असायची. पौर्णिमेपर्यंत लिंगार्चन, पोथीपुराण व पारायण आदी धार्मिक विधींची रेलचेल, भाविकांची गर्दी त्यातून व्यावसायिकांना उसंत मिळायची नाही. श्रावण उतरणीला लागल्यानंतर तिस-या सोमावरी फेरीला प्राधान्य दिले जायचे. तिसरा सोमवार हा प्रदक्षिणेचा पर्वकाळ मानला गेला.
१९९६ नंतर तिसरा सोमवार अक्षरश: लाखोंच्या गर्दीने फुलायला लागला. ब्रह्मगिरी प्रदक्षिणा तीन प्रकारची आहे. ब्रह्मगिरी प्रदक्षिणा, हरिहर ब्रह्मगिरी प्रदक्षिणा आणि इंद्रपर्वत (अंजनेरी पर्वत) यासह ब्रह्मगिरी प्रदक्षिणा. या प्रदक्षिणेत ब्रह्मगिरी पर्वतास फेरी मारली जाते. सर्वसाधरणत: त्यास 'फेरी' म्हणून संबोधण्यात येते. ही ब्रह्मगिरी पर्वतास असलेली लहान प्रदक्षिणा आहे. सुमारे २० किलोमीटरचा हा मार्ग असून या मार्गावर अनेक तीर्थ आहेत. त्यापैकी काळाच्या ओघात लुप्त झाले आहेत.
ही प्रदक्षिणा करण्यासाठी काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. प्रदक्षिणेला सुरुवात करताना पंचपंच उषका:ली सूर्योदयापूर्वी दोन तास उठून कुशावर्तावर स्नान करून श्री त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन मार्गक्रमण करावे, म्हणजे साधारणत: पहाटे पाच वाजता ही फेरी सुरू करावी. सूर्योदय होताना प्रयाग तीर्थास वळसा घालून पेगलवाडीमार्गेसृष्टी सौंदर्याचा अस्वाद घेत बहरलेल्या निसर्गाचे अवलोकन करत, शिवाचे नामस्मरण करत सात्विक मनाने फेरी करावी. प्रदक्षिणा मार्गावर अनेक तिर्थे लागतात. प्रयाग तीर्थ, सरस्वती तीर्थ, नागा तीर्थ, राम तीर्थ, वैतरणा बाणगंगा निर्मल तीर्थ, बाणगंगा धवलगंगा पद्मतीर्थ, नरसिंह तीर्थ, बिल्व तीर्थ आदी आणि नद्या व मंदिरे लक्ष वेधून घेतात. प्रदक्षिणेदरम्यान गौतमाची टेकडी उतरल्यानंतर नमस्काराचे ठिकाण लागते. येथे पंचमुखी शिवस्वरूप ब्रह्मगिरीस आपण पूर्वाभिमुख होऊन साष्टांग नमस्कार घालावा, अशी प्रथा आहे.
सकाळाच्या वेळेस प्रदक्षिणा सुरू केल्यानंतर येथे हा अर्धा प्रवास संपतो. येथून होणारे ब्रह्मगिरीचे विलोभनीय दर्शन पाहायला मिळते. श्रावण महिना सुरू होताच महिनाभर प्रदक्षिणा करणारे भाविक या मार्गावर असतात. तसेच श्रावणात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी निसर्गप्रेमीदेखील येतात.
*"दृष्टी पडता ब्रम्हगिरी । त्यासी नाही यमपुरी ॥*
*"नामा म्हणे प्रदक्षिणा । त्याच्या पुण्या नाही गणना ।।*
शिव शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांमध्ये त्र्यंबकेश्वरचा समावेश होतो. दक्षिणेची काशी मानले जाणार्या नाशिकपासून हे ज्योतिर्लिंग ३५ किलोमीटरवर आहे. ज्योतिर्लिंग स्तोत्रातही त्र्यंबक 'गौतमी तटे' असे म्हणून त्र्यंबकेश्वराचा उल्लेख केला आहे. त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी या पर्वताच्या पायथ्याशी वसले आहे. हा पर्वत म्हणजे शिवाचे एक रूप मानले जाते. श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी असते. प्रत्येक श्रावणी सोमवारी ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घातली जाते. तिसऱ्या सोमवारी तर मोठी गर्दी असते.या काळात कुशावर्तात स्नान करणे फार पवित्र मानले जाते.
धार्मिक ग्रंथात असा उल्लेख केलेला आहे की ब्रम्हगिरीच प्रदक्षिणा केली तर पृथ्वी प्रदक्षिणेचे पुण्य मिळते. असा पुराणात उल्लेख आहे. सर्वात प्रथम संत निवृत्तीनाथांनी ब्रम्हगिरीस प्रदक्षिणा घातली आहे. ज्या ठिकाणी संत निवृत्तीनाथ थांबले त्याठिकाणीच फेरी मारणारे भाविक थांबून आराम करत असतात. यावेळी लाखो भाविक ब्रम्हगिरी पर्वताला फेरी मारत असतात. कुशावर्तात स्नान करून भाविक कुशावर्ताला एक प्रदक्षिणा घालून पुढे त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतात. आमची प्रदक्षिणेला सुरुवात करतात. साधारणत: मंदिरापासून एक किलोमीटरवर प्रयागतीर्थ या ठिकाणी एक तळे लागते. त्या तळ्याला प्रदक्षिणा घालून पुढे निघावे लागते.
श्रावणामध्ये दर रविवारी रात्री कुशावर्तापासून फेरीची सुरुवात होते. प्रचंड गर्दी असते तेथे २० किमी आणि ४० कि.मी अशा दोन प्रदक्षिणा आहेत. अनुभवी लोक मोठी प्रदक्षिणा करतात. बाकी छोटी प्रदक्षिणा करतात. त्यासाठी १२ तास लागतात. ही सगळी प्रदक्षिणा अनवाणी होते. दहा ते पंधरा वर्षापूर्वी फक्त श्रावण महिन्यातील तिसर्या रविवारी रात्री १२ वा. कुशावर्त तीर्थावर स्नान करून फेरीस भाविक सुरूवात करत असत. आता श्रावणातील प्रत्येक सोमवारी ब्रम्हगिरीची फेरी घातली जाते. प्रदक्षिणा ही दोन प्रकारे असते. एक फक्त ब्रम्हगिरी पर्वताला फेरी मारणे-ती साधारणत: ३० किलोमीटरची आणि दुसरी म्हणजे ब्रम्हगिरी आणि हरिहर पर्वत - ६० किलोमीटरची तर ६० किलोमीटरची प्रदक्षिणा ही कठीण आहे. त्यात ७ पर्वत चढावे आणि उतरावे लागतात. याठिकाणचा जंगल परिसर आहे.
*ब्रम्हगिरी प्रदक्षिणा मार्गावरील देवालये*
प्रदक्षिणा मार्गावर अनेक तीर्थ आहेत. प्रयाग तीर्थ, सरस्वती तीर्थ, नागतीर्थ, रामतीर्थ, वैतरणा, बाणगंगा, निर्मल तीर्थ, धवल गंगा, बिल्व्तीर्थ, आदी तीर्थ मंदिरे लक्ष वेधतात. प्रदक्षिणा दरम्यान गौतमाची टेकडी उतरल्यानंतर नमस्काराचे ठिकाण लागते. येथे पंचमुखी शिव स्वरूप ब्र्म्हगिरीस पूर्वाभिमुख होत साष्टांग नमस्कार घालावा, अशी प्रथा आहे.

*🌹🙏🏻*

+9 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 10 शेयर

भारत का एकमात्र धार्मिक सोशल नेटवर्क

Rate mymandir on the Play Store
5000 से भी ज़्यादा 5 स्टार रेटिंग
डेली-दर्शन, भजन, धार्मिक फ़ोटो और वीडियो * अपने त्योहारों और मंदिरों की फ़ोटो शेयर करें * पसंद के पोस्ट ऑफ़्लाइन सेव करें
सिर्फ़ 4.5MB