🍁•┈✤ *आज का सुविचार*✤┈•🍁 🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋 दुनिया में कोई भी चीज़ कितनी भी कीमती क्यों न हो परन्तु... नींद, शांति और आनन्द से बढ़कर कुछ भी नहीं हमारी हर समस्या का समाधान केवल हमारे पास है दूसरों के पास तो केवल सुझाव हो सकता है 🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋 🙇‍♂ जय श्री कृष्णा 🙇‍♂ 🙏 *सुप्रभातम्* 🙏

+8 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 13 शेयर

_*नियती....*_ _*नियती* कधीच कुणावर अन्याय करत नाही,कधीच नाही.ती फक्त न्यायच करते.स्वतःविषयी अवास्तव कल्पना,इतरांच्या परिस्थितीशी तुलना आणि कसलाही शेंडाबुडखा नसलेला हव्यास यामुळे आपल्याला तो न्यायही अन्यायच वाटू लागतो.नियती ही एखाद्या पिठाच्या गिरणीसारखी आहे.एकीकडून जे कर्म टाकाल,दुसरीकडून त्याचंच पीठ काढून तुमच्या पिशवीत दिलं जातं.रांगेत तुमच्या आधी उभ्या असलेल्या माणसाला स्वच्छ सोनेरी रंगाचं,ताजं गव्हाचं पीठ मिळालं म्हणजे मलाही तेच हवं असा अट्टाहास तुम्ही करता आणि स्वतःच्या कर्माच्या पिशवीत मात्र कण्याच आणल्या आहेत ते सोयिस्करपणे विसरता बरं.जे पेराल तेच उगवेल म्हणून आत्ताचं क्रियमाण (वर्तमान कर्म )सुधारा तेच उद्यासाठीचं पूर्वसंचित आहे.*कितीही तुलना केलीत तरी तुमच्या नशिबात केवळ तुमच्याच हक्काचं आणि संचिताचं पीठ दिलं जातं हे विसरु नका....*_ _*मिञानो;काळजी घ्या.....*_

+10 प्रतिक्रिया 2 कॉमेंट्स • 38 शेयर

_*तुका म्हणे सारासार विचार करा उठाउठी !!....*_ _विचाराचा ज्ञान-प्रकियेशी संबंध आहे.यातील तात्विक विचार बाजूला ठेवला तरी विचार नावाचे काहीतरी आपल्या डोक्यात चालू असते.एका विचारातून दुसऱ्या विचाराकडे आपण जात असतो आणि अनेकदा अशा विचाराच्या समुद्रात आपण मग्न होत असतो.व्यवहारात या विचारांची उपयुक्तता आपल्याला तपासून पाहावी लागते.योग्य विचार आपण निवडू शकलो तर आपल्या जगण्यात अडथळे येत नाहीत.प्रत्येकाने आत्मपरीक्षण करून स्वतःला विचारावे की;या पृथ्वीवर आपण जीव धारण करण्याचे प्रयोजन काय असावे?जर असेल आणि काही कार्य करायचे असेल तर,आपण आपल्या सामर्थ्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.आपल्या कमकुवतपणा आणि नातेसंबंधांची काळजी घ्यायला हवी.यामुळे कदाचित जीवनातील कर्तव्यांचे ज्ञान होईल आणि आपल्या सर्व कार्यात मार्ग दिसतील.तुम्हाला जे काही काम करायचे आहे त्यात तुमची आवड आणि समर्पण आसल्याशिवाय ते काम करू नका.याचा परिणाम असा होईल की अकीर्ति,अपमान तुमच्यापासून कायम दूर राहतील,पश्चात्ताप तुमच्या जवळ येणार नाही,तुम्हाला शोक करावा लागणार नाही.जोपर्यंत तुम्हाला खात्री पटत नाही तोपर्यंत तोंड उघडू नका.जो अविचारी आहे तो आपल्या जिभेवर ताबा ठेवू शकत नाही,मन जे ऐकेल ते म्हणतो आणि मग आपल्याच मूर्खपणाच्या बोलण्यातून भांडणात अडकतो.जो माणूस घाईघाईने धावतो आणि पलीकडे काय आहे याचा विचार न करता किंवा न पाहता भिंतीवर चढतो,तो त्याच्या पलीकडे असलेल्या खड्ड्यात पडू शकतो.परिणामांचा विचार न करता काही काम करणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीतही असेच होते.म्हणून *विचारांच्या हाकेला मान द्या.त्याचे शब्द शहाणपणाचे शब्द आहेत,त्याने दाखवलेल्या मार्गांनी तुमचे रक्षण होईल आणि शेवटी तुम्हाला सत्याची भेट होईल....*_ _*मिञानो;काळजी घ्या.....*_

+8 प्रतिक्रिया 2 कॉमेंट्स • 26 शेयर

तमसो मा ज्योतिर्गमय🙏🙏🙏 आज दीप अमावस्या. दीप पूजनाचा दिवस. हा दीप आपले जीवन सर्वार्थाने उजळो हीच शुभेच्छा !! आषाढ अमावस्या म्हणजेच दिव्यांची अमावस्या. घरातील दिव्यांना घासून-पुसून स्वच्छ करावेत. पाटावर वस्त्र घालून भोवती रांगोळ्या काढाव्या. पाटावर दिवे मांडून त्यांची पूजा करावी. आज पासूनच पत्रीचे महत्त्व सुरु होते. आघाडा, दुर्वा, पिवळी फुले यांनी दिव्यांची पुजा करावी. दुर्वा ही वंश वृद्धीचे प्रतिक आहे , त्यामुळे ते ही अर्पण करून प्रार्थना करावी. गोडाचा नेवैद्य अर्पण करावा. आपल्या घरातील लहान मुलांना औक्षण करावे. दिव्याची प्रार्थना : ‘दीप सूर्याग्निरुपस्त्वं तेजसां तेज उत्तमम्‌| गृहाण मत्कृतां पूजां सर्वकामप्रदो भव॥ त्याचा अर्थ असा...हे दीपा, तू सूर्यरुप व अग्निरुप आहेस. तेजा मध्ये तू उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर.

+5 प्रतिक्रिया 3 कॉमेंट्स • 4 शेयर

_*तुका म्हणे सारासार विचार करा उठाउठी !!....*_ _विचाराचा ज्ञान-प्रकियेशी संबंध आहे.यातील तात्विक विचार बाजूला ठेवला तरी विचार नावाचे काहीतरी आपल्या डोक्यात चालू असते.एका विचारातून दुसऱ्या विचाराकडे आपण जात असतो आणि अनेकदा अशा विचाराच्या समुद्रात आपण मग्न होत असतो.व्यवहारात या विचारांची उपयुक्तता आपल्याला तपासून पाहावी लागते.योग्य विचार आपण निवडू शकलो तर आपल्या जगण्यात अडथळे येत नाहीत.प्रत्येकाने आत्मपरीक्षण करून स्वतःला विचारावे की;या पृथ्वीवर आपण जीव धारण करण्याचे प्रयोजन काय असावे?जर असेल आणि काही कार्य करायचे असेल तर,आपण आपल्या सामर्थ्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.आपल्या कमकुवतपणा आणि नातेसंबंधांची काळजी घ्यायला हवी.यामुळे कदाचित जीवनातील कर्तव्यांचे ज्ञान होईल आणि आपल्या सर्व कार्यात मार्ग दिसतील.तुम्हाला जे काही काम करायचे आहे त्यात तुमची आवड आणि समर्पण आसल्याशिवाय ते काम करू नका.याचा परिणाम असा होईल की अकीर्ति,अपमान तुमच्यापासून कायम दूर राहतील,पश्चात्ताप तुमच्या जवळ येणार नाही,तुम्हाला शोक करावा लागणार नाही.जोपर्यंत तुम्हाला खात्री पटत नाही तोपर्यंत तोंड उघडू नका.जो अविचारी आहे तो आपल्या जिभेवर ताबा ठेवू शकत नाही,मन जे ऐकेल ते म्हणतो आणि मग आपल्याच मूर्खपणाच्या बोलण्यातून भांडणात अडकतो.जो माणूस घाईघाईने धावतो आणि पलीकडे काय आहे याचा विचार न करता किंवा न पाहता भिंतीवर चढतो,तो त्याच्या पलीकडे असलेल्या खड्ड्यात पडू शकतो.परिणामांचा विचार न करता काही काम करणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीतही असेच होते.म्हणून *विचारांच्या हाकेला मान द्या.त्याचे शब्द शहाणपणाचे शब्द आहेत,त्याने दाखवलेल्या मार्गांनी तुमचे रक्षण होईल आणि शेवटी तुम्हाला सत्याची भेट होईल....*_ _*मिञानो;काळजी घ्या.....*_

+6 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 6 शेयर

भारत का एकमात्र धार्मिक सोशल नेटवर्क

Rate mymandir on the Play Store
5000 से भी ज़्यादा 5 स्टार रेटिंग
डेली-दर्शन, भजन, धार्मिक फ़ोटो और वीडियो * अपने त्योहारों और मंदिरों की फ़ोटो शेयर करें * पसंद के पोस्ट ऑफ़्लाइन सेव करें
सिर्फ़ 4.5MB