+6 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 5 शेयर

_*भव्य शामियाना....*_ _प्रवेशद्वारापासुनच सुंदर मनमोहक सजावट,थर्माकोल आणि कृत्रिम फुलांची.वातावरण आल्हाददायक करण्यासाठी मंद सुगंधित कृत्रिम परफ्युमची अधूनमधून होणारी फवारणी.स्टेजवरची सजावट अगदी सुंदर कृत्रिम फुलापानांनी केलेली,डोळ्यात भरणारी.जेवणाचा थाट तर विचारायचं कामच नाही.सलादचेच कितीतरी प्रकार,लोणची आणि चटण्या,फास्टफुडची रेलचेल,बेकरी आयटम्स.मेनकोर्सपर्यंत जायच्याआधीच पोट भरलेलं,विविध प्रांतांची खासियत असणारे चविष्ट पदार्थ,मिठाया शेवटी आईस्क्रीम,कॅाफी,मसाला दुध आणि पानाने समारोप.मुद्दाम तीन चार तासांचा वेळ काढून आलेलेच इतक्या सगळ्यांचा मनसोक्त अस्वाद घेऊ शकले असतील.बहुतेकांनी तर प्रत्येक स्नॅक्सची चव चाखायच्या नादात कमीतकमी जरी वाटीत घेतलं तरी १० ते ४० टक्के वाटीत टाकलेलं दिसत होतं.तीच गत प्रत्येक स्टॅालवर ,प्रत्येक आयटमसाठी सुप,सलाद,मेनकोर्स,मिठाया,आईस्क्रीम किंवा कॅाफी काहीच यातून सुटलेलं नव्हतं.बुफे सिस्टिम मधे नेहमीच होणारी अन्नाची नासाडी इथेही होत होतीच.काही हळहळत होते,घेतलेलं पुर्ण संपवत होते,पण त्यांचं प्रमाण अगदीच कमी दिसत होतं.बऱ्याच किंवा बहुतेक प्रत्येकच स्वागत समारोहात दिसणारं,मनाला व्यथित करणारं हे चित्र.पिण्याच्या पाण्यासाठी थंड पाण्याचे जार एखाद्या कोपऱ्यात असतात.खुपदा पाण्यासाठी बरीच पायपीट करावी लागते किंवा शोधत फिरावं लागतं.खुपदा यामुळे बरेच जण त्रासलेले आणि तहानलेले असतात,नाईलाजाने पाणी शेवटी घेतात.एका दृष्टीने हे जरी त्रासदायक असले तरी पाण्याचा अपव्यय यात कमीच होतो.अर्थात ग्लास भरून पाणी घेणारे आणि अर्धंच पीणारे इथेही पाणी वाया घालायची संधी सोडत नाहीत तो भाग वेगळा.तर या समारोहात जागोजागी बिसलेरीच्या अर्धा लिटर पाण्याच्या बाटल्यांचे स्टॅाल होते.पाहुण्यांची सुविधा महत्वाचीच नाही का?मग काय थोडंसं काही खाल्लं की घे एक बॅाटल,दोन घोट पिलं की दे टाकून.कारण दुसरी डिश धरायला हात रिकामे नकोत का?मग जिथेतिथे लगेच मिळणाऱ्या पाण्यासाठी उरलेली बॅाटल कशाला वागवायची?मग एक एका व्यक्तीमागे चारपाच अर्धवट संपलेल्या बॅाटल्स डस्टबीन मध्ये पडू लागल्या.बरं सोबत असणाऱ्यांनी एकच बॅाटल शेअर केली तर काही बिघडणारं नसतं,पण प्रत्येकजण आपली स्वतःची सेपरेट बॅाटल घेतोय आणि घोट दोन घोट पाणी पिऊन टाकतोय हे अगदीच विषण्ण करणारं चित्र दिसत होतं.अन्नाइतकीच पाण्याचीही नासाडी होत होती आणि फेकलेल्या प्लॅस्टिक बॅाटलचा खच पडत होता,वाढत होता,पर्यावरणाचीही हानी सोबत सोबत वेगाने होत होती.सजावटीसाठी वापरलेलं थर्माकोल आणि कृत्रिम फुले परत वापरल्या जात असतील तर उत्तमच,पण तीही जर फेकल्या जात असतील तर सजावटीच्या नादात पृथ्वीमातेला विद्रुप करण्यातच आपला हातभार लागतोय ही जाणिव आपल्याला कधी होणार?नैसर्गिक फुले,पाने,झाडे वापरली तर कदाचित थोडा खर्च जास्त लागेल,पण बाकीचाही अवाढव्य खर्च करतोच की आपण दिखाव्यासाठी.मग हा ही खर्च केला तर शेतकरी बांधवांना मदतच होईल हे कधी मनावर घेणार आपण? *भपकेबाजीला न जुमानता ,इतरांची वाट न पहाता स्वतःपासुनच पर्यावरणपुर्वक वागण्याची सुरूवात करणं आता आवश्यक आहे,मग थोडीशी असुविधा झाली तरी चालेल....*_ _*मिञानो;काळजी घ्या.....*_

+11 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 14 शेयर

_*ईच्छा....*_ _सगळ्या लौकिक ईच्छा पूर्ण झाल्या की मनातील अस्वस्थता संपुष्टात येईल हा समज चुकीचा ठरतो उलट 'काहीच नको 'ह्या स्थितीत जे समाधान आणि मनःस्वास्थ लाभतं त्याची तुलना कशाशी होत नाही.आपलं आयुष्य आपल्या आत्म्याच्या झोळीत काय टाकतं हे देखील पहावयास हवे ना!शेवटी ही जगण्याची वणवण,ही भटकंती असते तरी कशासाठी आणि कुणासाठी?माणसांची सोबत कधी आधी तर कधी नंतर सुटतेच सुटते पण जोवर सोबत असते तोवर ती कायमस्वरूपी असावी ह्या आशेने आपण रहातो.अचानक सुटलेले हात आपल्याला काही काळ विरक्त करतात खरे पण नंतर पुन्हा एकटेपणाची भिती 'नवा गडी नवे राज्य 'शोधायला भाग पाडते.हणजे पुन्हा आशेने,तडजोडीतून पुढील मार्गक्रमणा जोवर हा शोध बाह्य जगात आपण करतो तोवर एक असुरक्षिततेची भावना सतत मनात घर करते पण जेव्हा ह्या शोधाची दिशा अंतर्गत होते तेव्हा आपल्याला एका सुरक्षित नात्याची जाणीव,ओळख होते.जिथे गमावण्याची भीती नसते.जोवर श्वास आहेत तोवर ते सोबत असणारच आहे ही खात्री असते.*सतत काहीतरी हवं,कुणीतरी हवं ही गरज संपली की आपण खर्या अर्थाने परीपूर्ण होतो....*_ _*मिञानो;काळजी घ्या.....*_

+10 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 34 शेयर

_*माणूस निराश का होतो?....*_ _एक क्षण एका दिवसाला बदलू शकतो.एक दिवस एक जीवन बदलू शकतो.अन् एक जीवन म्हणजेच एक जीव एक मनुष्य जग बदलू शकतो.पण हा क्षण कधी येणार आहे?तो दिवस कधी येणार आहे,हे आपल्याला माहित नाही.त्या क्षणाच्या प्रतीक्षेतच मनुष्य निराश होतो.ही निराशा म्हणजेच जीवनात कसलीच आशा न उरणे.निराशा आली की माणूस जीवनातली साऱ्या आशा,आकांशा,धैर्य,हिंमत सोडतो.काम करण्याची इच्छा सोडतो.ही इच्छा सोडली की मग तो आळशी बनतो,निष्क्रिय बनतो.आपण ह्या जगावर एक भार म्हणून जगत आहोत.आपल्या जीवनात कोणतंही ध्येय नाही.आपल्या जीवनात आता काहीच अर्थ नाही.सारं जीवन व्यर्थ आहे,असं तो समजू लागतो.पण या साऱ्या गोष्टी बाहेरून येत नाहीत.त्या आपल्याच अंतर्मनातून उत्पन्न होत असतात.निराशेचे बीज आपल्या आतूनच अंकुरत असते अन् आशेचा सागरही आपल्या आतच सामावलेला असतो.निराशेच्या या छोट्याशा बीजातूनच एक दिवस मोठा वृक्ष तयार होतो अन् आशेचा सागर हळूहळू सुकत जातो.निराश,दुःखी किंवा उदास व्यक्ती दुसऱ्याला ज्ञान देऊच शकत नाही.जी गोष्ट आपल्याजवळ आहे,तीच तो दुसऱ्याला देऊ शकणार.तुम्ही दुःखी असाल तर तुम्ही दुसऱ्याला आनंद,सुख देऊच शकणार नाही,तर फक्त दुःख आणि दुःखच देणार.आपल्या निराशेचे खरे कारण आपण कधी जाणूनच घेत नाही.पहिली चूक आपण करतो ती म्हणजे आपलं काम आपण लक्षपूर्वक करत नाही.त्यामुळे ते काम व्यवस्थित होत नाही अन् आपण निराश होतो.कोणतेही काम करताना आपण एकाग्रता टिकवली पाहिजे,संयम पाळला पाहिजे.माणूस निराश होण्याचं आणखी एक कारण म्हणजे तो सतत आपली तुलना इतरांशी करत असतो.मनुष्य स्वभावानुसार तो आपल्यापेक्षा श्रेष्ठ असणाऱ्या व्यक्तीशींच तुलना करतो.अन् तिथंच तो फसतो.स्वतःला कमी समजतो,आपला आत्मविश्वास गमावतो.त्यामुळे तो दुःखी,निराश होतो.म्हणून बुध्द सांगतात;श्रेष्ठ व्यक्तीला श्रेष्ठ समजा,पण आपल्याशी त्याची तुलना करायचं टाळा.कारण जगातली प्रत्येक व्यक्ती एकसारखी कधीच नसते.आपल्यासारखी दुसरी व्यक्ती कोणतीच नसते.त्यामुळे आपली कुणाशीही बरोबरी करू नये.आपण दुसऱ्यासारखं होऊच शकत नाही.म्हणून आपण जसं आहोत,तसंच स्वतःला स्वीकारायचं,स्वतःला जाणा,स्वतःला ओळखायला शिका.दुसऱ्याच्या प्रभावानं अजिबात विचलित होऊ नका.या विश्वामध्ये आपण जन्म घेतलाय,त्याला काहीतरी कारण आहे,उद्देश आहे.विश्वातील आपल्या निर्मितीवर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे.*गौतम बुध्द सांगतात;आपण जेव्हा निराश होऊ तेव्हा सर्वप्रथम डोळे बंद करावे.एक दीर्घ श्वास घ्यावा.श्वासावर लक्ष केंद्रित करावे.आपला श्वास सुरू आहे.म्हणजेच आपण जिवंत आहे.अन् जिवंत आहे याचाच अर्थ आपण काहीतरी करू शकतो.जे काहीच करू शकत नसतात,ते मृत मुडदे असतात.अन् त्यांची घरे स्मशानात असतात.जगात अशक्य असं काहीच नसतं.फक्त एक गोष्ट करायची,आपलं जीवन दुसऱ्याच्या स्वाधीन कधीच करायचं नाही.आपल्या आयुष्यावर फक्त आपलाच हक्क असला पाहिजे....*_ _*(गौतम बुध्द यांचे ऐकलेले अन् त्यानंतर रूपांतरित केलेले विचार...)*_ _*मिञानो;काळजी घ्या.....*_

+14 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 64 शेयर

+5 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 19 शेयर

भारत का एकमात्र धार्मिक सोशल नेटवर्क

Rate mymandir on the Play Store
5000 से भी ज़्यादा 5 स्टार रेटिंग
डेली-दर्शन, भजन, धार्मिक फ़ोटो और वीडियो * अपने त्योहारों और मंदिरों की फ़ोटो शेयर करें * पसंद के पोस्ट ऑफ़्लाइन सेव करें
सिर्फ़ 4.5MB