🌹 *पितृपक्ष* 🌹 शंकासमाधान 🌹

🌹 *पितृपक्ष* 🌹 शंकासमाधान 🌹

🌹 *पितृपक्ष* 🌹

शंकासमाधान

१. घरात / कुळात चालू वर्षात मृत झाले असल्यास महालय श्राद्ध करता येते का ?

:- नाही. मृत व्यक्तीस एक वर्ष पूर्ण झाल्याशिवाय महालय श्राद्ध करता येत नाही.

२. घरात / कुळात सवाष्ण मृत झाली असल्यास कोणत्या दिवशी श्राद्ध करावे ?

:- सवाष्ण व्यक्ती मृत होऊन एकवर्ष पूर्ण झाल्यानंतर पितृपक्षात “अविधवा नवमी”(भाद्रपद कृष्ण नवमी) या दिवशीश्राद्ध करता येते.

३. ज्या पूर्वजांची तिथी पौर्णिमा असेल त्यांचे श्राद्ध कोणत्या दिवशी घालतात ?

:- पंचमी, अष्टमी, द्वादशी किंवा सर्वपित्री अमावस्येला घालतात.

४. ज्यांचा मृत्यू हा घातपाताने झाला असेल किंवा आत्महत्या केली असेल त्यांचे श्राद्ध कोणत्या तिथीस घालावे. ?

:- शस्त्रदहित श्राद्ध म्हणजे भाद्रपद कृष्ण चतुर्दशी या तिथीस घालावे.

५. संन्याशी किंवा घर सोडून गेलेल्या व्यक्तींचे श्राद्ध कोणत्या तिथीस घालावे ?

:- अशा व्यक्तींचे श्राद्ध भाद्रपद कृष्ण द्वादशीला घालतात.

६. पितरांची तिथी माहित नसल्यास कोणत्या दिवशी श्राद्ध करावे ?

:- भाद्रपद कृष्ण द्वादशी किंवा अमावस्या ( सर्वपित्री अमावस्या ) या दिवशी सर्व पितरांचे (ज्ञात-अज्ञात)श्राद्ध घालता येते. तसेच ब्राम्हणास हिरण्यदान व अमावस्या मागणाऱ्या स्त्रीला शिधा दान द्यावे.

७. श्राद्ध घालतांना नैवेद्य मंडल कसे घालावे ?

:- पाण्याचे गोल मंडल करून त्यावर नैवेद्याचे ताट मांडावे व अंगठ्याच्या बाजूने उलट्या दिशेने पाणी फिरवावे.

८. अघोर पितरांच्या सद्गतीसाठी कोणती सेवा करावी ?

:- पितृस्तुती, बाह्यशांती सुक्त, पितरतुष्टीकारक स्तोत्र वाचावे तसेच दुपारी १२ वाजता एका पोळीवर थोडा भात,तूप,५-७काळे तीळ घेऊन खालील मंत्र दक्षिणाभिमुख बसून १ माळ जप करून अंती त्या माळेचा स्पर्श त्या भातास करणे. यामुळे अघोर पितरांना देखील सद्गती लाभते.

मंत्र : *मध्व: सोमास्याधीना मदाय प्रत्नो होता विवासते वाम |बहिर्ष्मती रातीर्वीश्रिता गिरीषा यांत नासत्योप वाजै: ||*

९. मातामह श्राद्ध म्हणजे काय? त्यचा अधिकार कोणाला असतो?

: - नवरात्रच्या पहिल्या दिवशी मातामह श्राद्ध म्हणजे आईच्या वडिलांचे श्राद्ध (दौहित्र) असते. ज्यांचे वडील जिवंत आहेत व आजोबा (आईचे वडील) जिवंत नाहीत अशा मुलांनाच दौहीत्राचा अधिकार असतो.ज्या स्त्रियांच्या माहेरी भाऊ किंवा कोणी पुरुष नाही त्यांच्यासाठी) आजोबा गेल्यावर एक वर्षाने दौहित्र करण्यास सुरवात करावी. स्वत:चे वडील गेल्यास दौहित्र करू नये. दौहीत्राचा अधिकार नातवास तिसऱ्या वर्षापासून येतो. हे दौहित्र श्राद्ध पूर्ण स्वयंपाक करून करणे अधिक इष्ट होय. नवरात्रीचा पहिला दिवस असला तरी देवीचा वेगळा स्वयंपाक करण्याची गरज नाही.

१०. पितृपक्षात पारायण करता येते का ?

हो. पितृपक्षात कोणत्याही ग्रंथाचे पारायण करता येते.(गुरुचरित्र/नवनाथ/भागवत/श्रीपाद चरित्र इत्यादी)पितृपक्षात केलेले पारायण हे पितरांना संतोषकारक असते.

+82 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 53 शेयर

कामेंट्स

Sanjay Singh Feb 27, 2020

+52 प्रतिक्रिया 3 कॉमेंट्स • 7 शेयर
A mishra Feb 27, 2020

+5 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 3 शेयर
Sundar lal sundar Feb 27, 2020

+4 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 0 शेयर
Sundar lal sundar Feb 27, 2020

+3 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 3 शेयर
satnarayan gadri Feb 27, 2020

+11 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 9 शेयर
Dr shobha Feb 27, 2020

+9 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 3 शेयर
Radha soni Feb 27, 2020

+36 प्रतिक्रिया 3 कॉमेंट्स • 5 शेयर
Geeta Sharma Feb 27, 2020

+65 प्रतिक्रिया 10 कॉमेंट्स • 6 शेयर
Sundar lal sundar Feb 27, 2020

+2 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 0 शेयर

भारत का एकमात्र धार्मिक सोशल नेटवर्क

Rate mymandir on the Play Store
5000 से भी ज़्यादा 5 स्टार रेटिंग
डेली-दर्शन, भजन, धार्मिक फ़ोटो और वीडियो * अपने त्योहारों और मंदिरों की फ़ोटो शेयर करें * पसंद के पोस्ट ऑफ़्लाइन सेव करें
सिर्फ़ 4.5MB