+1 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 1 शेयर
Pratibha Jadhao Apr 12, 2021

+8 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 5 शेयर
Pratibha Jadhao Apr 12, 2021

विनोबा यांची एक गोष्ट करोना हे सायकॉलॉजिकल युद्ध आहे आणि सध्या तरी हे युद्ध शत्रू जिंकत आहे असे भासत आहे. मनाच्या अंधारकोठडीतून बाहेर कसे पडावे... विनोबांना इंग्रजानी अंधाऱ्या कोठडीची शिक्षा दिली, ज्यात अगदी छोट्या खोलीत फक्त एक वेळ पहारेकरी जेवण घेऊन येई. जिथे प्रकाशही नाही अशा या कोठडीत ते खचतील, त्यांची प्रकृती खालावेल आणि निराश होऊन ते माफी मागतील ही सरकारची अपेक्षा होती. पण जसजसे दिवसांमागून दिवस जायला लागले तसतसे विनोबा अजून तजेलदार, सशक्त दिसू लागले, हे पाहून तो जेलरही अचंबित झाला. विनोबांनी काही संकल्प आणि त्यांचं २४ तासांचं नियोजन केलं होतं. आपल्या कोठडीची लांबी मोजून ते रोज जितके मैल चालत होते, तेवढे अंतर काढून खोलीतल्या खोलीत चालायला त्यांनी सुरुवात केली. याशिवाय त्यांनी नियमित ध्यानधारणेची वेळही वाढवली. जे पहारेकरी त्यांच्यासाठी रोज जेवण घेऊन यायचे, त्यांच्या आयुष्यात काही दुःख आहे का हे विचारून त्यांना योग्य सल्ला द्यायचे. त्यामुळे त्या जेलमधले इतर पहारेकरीही आपापली गाऱ्हाणी घेऊन विनोबांकडे येऊ लागले. त्यांचा सायंकाळचा वेळ समस्या निवारणातच जाऊ लागला. जे काही कच्चं भरड अन्न मिळायचं तेही विनोबा समाधानाने व्यवस्थित चावून खायचे. रोजचा व्यायाम तर होताच. त्यांना झोपही शांत लागत होती. सायंकाळी इतकी लोकं त्यांच्याकडे येत आहेत हे बघून इंग्रज जेलरही थक्क झाला. एकदा तर त्यानेच स्वतः विनोबांशी संवाद साधला आणि मग त्याने विनोबांना रोजच जेलमध्ये सभा घेता यावी म्हणून वेगळी स्वतंत्र जागा दिली. यापुढे जाऊन विनोबांसाठी काही पुस्तकं मागावून घेतली. आणि नंतर जेलमध्येच कैद्यांसाठी विनोबांचे गीता प्रवचनांचे वर्ग सुरू झाले. हे सगळं किती थक्क करणारं आहे... आज आपल्याला तर अंधारी कोठडीत नाही, घरात रहायचंय. आपल्याबरोबर आपले नातलग आहेत, मनोरंजनासाठी असंख्य साधनं आहेत, कित्येक पर्याय आहेत. विनोबांसारखं सकारात्मकतेने विचार करणारं फक्त मन हवं आहे, नाही का?

+15 प्रतिक्रिया 2 कॉमेंट्स • 26 शेयर
Chandrakant Apr 10, 2021

0 कॉमेंट्स • 0 शेयर

भारत का एकमात्र धार्मिक सोशल नेटवर्क

Rate mymandir on the Play Store
5000 से भी ज़्यादा 5 स्टार रेटिंग
डेली-दर्शन, भजन, धार्मिक फ़ोटो और वीडियो * अपने त्योहारों और मंदिरों की फ़ोटो शेयर करें * पसंद के पोस्ट ऑफ़्लाइन सेव करें
सिर्फ़ 4.5MB