🌺 *परमार्थाला दुसऱ्याची नव्हे, तर आपली स्वतःचीच दृष्ट लागू शकते.* *अभिमान उत्पन्न होऊ शकतो.* *तेंव्हा, परमार्थ साधणे कठीण,* *सांभाळणें जास्त कठीण,* *तर टिकवणें अत्यंत कठीण आहे.* *संकल्प ही फार मोठी शक्ती आहे.* *इच्छा जर खरोखर अती प्रबळ झाली, तर ती वस्तूला आपल्याकडे खेचून घेतल्याशिवाय राहणार नाही. तसेच, भगवंताच्या प्राप्तीसाठी, प्रबळ इच्छा धारण केली,* *तर भगवंत नक्की भेटतो.* *ज्या माणसाच्या जवळ सत्य, पावित्र्य, आणि निःस्वार्थवृत्ती,* *या तीन गोष्टी असतील,* *त्या माणसाचा नाश करण्याची क्षमता विश्वातील कोणत्याही शक्तीत नाही.* *हया तीन गोष्टी असल्यावर, अखिल विश्व जरी विरोधात उभे राहिले,* *तरी त्याला तो एकटाच माणूस,* *सहज तोंड देऊ शकतो...!!* **श्री गुरुदेव दत्त* 🙏🏻🌹🙏🏻

🌺
*परमार्थाला दुसऱ्याची नव्हे, तर आपली स्वतःचीच दृष्ट लागू शकते.* 
*अभिमान उत्पन्न होऊ शकतो.* 
*तेंव्हा, परमार्थ साधणे कठीण,* 
*सांभाळणें जास्त कठीण,* 
*तर टिकवणें अत्यंत कठीण आहे.*
*संकल्प ही फार मोठी शक्ती आहे.* 
*इच्छा जर खरोखर अती प्रबळ झाली, तर ती वस्तूला आपल्याकडे खेचून घेतल्याशिवाय राहणार नाही. तसेच, भगवंताच्या प्राप्तीसाठी, प्रबळ इच्छा धारण केली,* 
*तर भगवंत नक्की भेटतो.*
*ज्या माणसाच्या जवळ सत्य, पावित्र्य, आणि निःस्वार्थवृत्ती,* 
*या तीन गोष्टी असतील,* 
*त्या माणसाचा नाश करण्याची क्षमता विश्वातील कोणत्याही शक्तीत नाही.* 
*हया तीन गोष्टी असल्यावर, अखिल विश्व जरी विरोधात उभे राहिले,* 
*तरी त्याला तो एकटाच माणूस,* 
*सहज तोंड देऊ शकतो...!!*
      **श्री गुरुदेव दत्त*
        🙏🏻🌹🙏🏻

+5 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 11 शेयर

*श्रीराम समर्थ* *समर्थ रामदासस्वामी रचित दासबोधावरील श्री रविंद्र पाठक यांची निरूपणें.दशक १३-नामरुप,समास ३- उभारणीनिरूपण, निरूपण क्रमांक ४९०–भाग २ मधील सार.* दासबोधातील तेराव्या दशकातील तिसऱ्या समासात समर्थ या परब्रह्माच्या अंतरंगात दिसणारे विश्व कशा पद्धतीने निर्माण झाले हे सांगताना म्हणतात.... *परब्रह्म असतां निश्चळ ! तेथें संकल्प उठिला चंचळ !* *तयास बोलिजे केवळ ! आदिनारायेण !!१३.३.३.!!* एकच एक परब्रह्म या निश्चळ रूपामध्ये आहे आणि त्या निश्चळाला आम्ही आज जाणू शकत नाही, परंतु या निश्चळात कुठलाही विकार, कुठलाही कार्यकारी सिद्धांत नाही, कुठलाही कर्तुम् भाव नाही असे या परब्रह्माच्या अंतरंगात हे विश्व कसं निर्माण झालं हा मानवी तर्काला जो प्रश्न पडत आहे त्याचेच समर्थ आपल्याला उत्तर देतात. संकल्प या शब्दांत खूप मोठे सामर्थ्य सामावलेले असते, सामान्य जीव एखादा संकल्प करतो त्यावेळी या विश्वात असलेल्या ऊर्जा देखील त्या संकल्पपूर्तीसाठी धावू लागतात. या विश्वातल्या परब्रह्मामध्ये, परब्रह्मस्वरूपाच्या निश्चळ अंतरंगामध्ये हा संकल्प निर्माण झाला इथं या परब्रह्माचे कर्तुम् अकर्तुम् अन्यथा कर्तुम् असे स्वरूप आपल्याला दिसते. ज्याला वेदांनी एकोऽहम् बहुस्याम् असे वर्णन करून आपल्याला सांगितलं की एकच एक परब्रह्म या दृश्यजगामध्ये वेगवेगळ्या नाम आणि रूपाच्या आधारे आलं, त्याच्या मागचे कारण त्याच्या अंतरंगात निर्माण झालेला संकल्प. सामान्य जीव आपल्या संसारासाठी संकल्प करतो आणि वेगवेगळ्या गोष्टी सहज घडवून आणतो, जर सामान्य जीवाला हे शक्य आहे तर इथं या दृश्यजगाचा, या परब्रह्मस्वरूपाचा निर्माता जो ईश्वर आहे, जो सर्व संकल्पाचा, सर्व सिद्धींचा राजा आहे त्याचा संकल्प आहे आणि त्याच्या संकल्पशक्तीला सर्वप्रकारच्या ऊर्जा येणार नाहीत तर ते नवलंच, त्यामुळे भगवंचा हा संकल्प की ज्याच्यामुळे या विश्वउभारणीचा त्याच्या अंतरंगातला हा मानस त्याच्या ह्रदयामध्ये कुठंतरी खोल दडून बसलेला या संकल्पशक्तीची ऊर्जा म्हणजे मूळमाया आहे. या संकल्पाच्या आधारानेच मूळमायेने या परब्रह्मस्वरूपावर एकप्रकारे अच्छादन आणले. एकच एक परब्रह्म संपूर्णपणे या विश्वात भरून उरलेले असतानाही त्यावर या ईश्वरीय सत्यसंकल्पाची शुद्ध जाणीव म्हणजे ही मूळमाया आहे. हा सत्यसंकल्प आहे या सत्यसंकल्पाला कुठल्याही प्रकारे परताव्याची अपेक्षा नाही केवळ लोकांचे कल्याण व्हावे म्हणून या संकल्पाला सत्यसंकल्प म्हटले जाते. पण हा संकल्प जरी सत्य असला तरी या संकल्पाला चंचळत्व आहे, म्हणजे त्यामध्ये हालचाल आहे, हालचाल असल्यामुळे त्याला उत्पत्ती, स्थिती, लय आहे. या सर्व गोष्टी जरी या दृश्यजगामध्ये घडत असल्या तरी या घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींना एक कालमर्यादा आहे, या काळाच्या आधीन असलेल्या सर्व गोष्टी आहेत. जरी हा सत्यसंकल्प अगदी कल्पांतापर्यंत चालला तरी कल्पांताला त्याला शेवटी एक विराम देणे आवश्यक पडते. असा हा संकल्प ज्याच्यामध्ये सामान्य जन हा दृश्यजगातला संकल्प करत असतो आणि संत हे विश्वाच्या कल्याणासाठी वासनारहित सत्यसंकल्प करतात, परंतु तो देखील शेवटी एका चंचळस्वारूपाच्या अंतरंगातला असतो. तसं परब्रह्मस्वरूपाने देखील हा खेळ मांडला या विश्वाच्या उत्पत्तीचे प्रयोजन त्याने आपल्या अंतरंगामध्ये कुठंतरी खोलवर ठेवलं आणि त्या संकल्पाला सर्वप्रकारे ऊर्जा देणारी ही मूळमाया त्याच्यावरती एका आवरणरूपाने निर्माण झाली. या मूळमायेलाच समर्थ मूळपुरुष देखील म्हणतात कारण त्याला शक्ती आणि पुरुष या दोन्हीही गोष्टींचे अधिष्ठान आहे, त्याला समर्थ आदिनारायण असा सुंदर शब्द देतात. आदिनारायण याचा अर्थ प्रथम ईश्वराचे नाव, ज्याला आपण आरंभबिंदू, उद्गमबिंदू म्हणू शकतो. परब्रह्म जोपर्यंत निर्मळ, निश्चळ, निर्विकार, या स्थितीमध्ये आहे तोपर्यंत त्याला आपण नामरूपाने बांधू शकत नाही. या परब्रह्माचा हा प्रथम संकल्प की ज्याच्यामुळे या विश्वाची उभारणी झाली तो संकल्प ज्याने केला त्या उद्गमबिंदूला या मूळप्रकृती आणि मूळपुरुषाच्या असलेल्या या मिश्रणाला, या शुद्ध जाणीवेला, या अंतरात्म्याला आदिनारायण असं नाम या परब्रह्मावरती निर्माण झालेल्या संकल्पशक्तीने दिले. *मूळमाया जगदेश्वर ! त्यासीच म्हणिजे शड्गुणैश्वर !* *अष्टधा प्रकृतीचा विचार!तेथें पाहा !!१३.३.४.!!* या मूळमायेचीच ही वेगवेगळी नावे आहेत, त्याला मूळपुरुष, आदिनारायण, जगदेश्वर किंवा शड्गुणेश्वर म्हणूया सगळ्यांच्या अंतरंगात जो ही प्रचंड ऊर्जाशक्ती या संकल्पशक्तीला घेऊन आलेला आसतो. आपल्या स्वतःच्या निजइच्छाशक्तीने निर्माण झालेलं हे स्वरूप आहे. त्याच्या अंतरंगातला मी एक आहे आणि अनंत पद्धतीने माझं रूप बघायचंय ही केवळ इच्छाशक्ती आणि या इच्छाशक्तीचा संकल्प पूर्ण करण्यासाठी आपल्या अंतरंगामध्ये, सूक्ष्मामध्ये त्या संकल्पाच्या आधाराने अनंत प्रकारच्या शक्ती धारण करून आणल्या होत्या, त्यामुळे या संकल्पामध्येच अष्टधाप्रकृतीचा विचार देखील सामावलेला आहे. अष्टधाप्रकृती म्हणजे पाच पंचमहाभूतें आणि तीन त्रिगुण यांचे एकत्रिकरण म्हणजे हे सर्व या संकल्पशक्तीमध्येच सामावलेले आहे. जशी आपण घरी एखादी पूजा करतो तेव्हा गुरूजी आपल्याकडून सुरवातीला संकल्प करून घेतात या संकल्पामध्येच सर्वकाही विधीविधान,वेगवेगळ्या प्रकारच्या फलश्रुती या सगळ्या जशा सामावलेल्या असतात त्यापद्धतीने या ईश्वरीय संकल्पामध्ये या दृश्यजगाचा एकप्रकारे सर्व ऊर्जेचे स्त्रोत सामावलेले आहे. या संकल्पशक्तीमध्ये ही अष्टधाप्रकृती सूक्ष्मरूपाने वास करत असते आणि मग या संकल्पाच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू होते. जानकी जीवन स्मरण जय जय राम लक्ष्मीकांत खडके 🙏

+1 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 2 शेयर

🙏 *आत्म्याचे अस्तित्व खरंच आहे का??* उत्तर = जी माता गरोदर असते, त्या मातेला सुद्धा, आपण गरोदर आहोत, हें दोन महिन्यांनी कळते, याचा अर्थ *तो सूक्ष्म जीव* *कसा प्रवेश करतो कसा संघर्ष करतो?* दोन महिन्यांनी त्या मातेला कळते कि आपण आई होणार आहोत 👍 *मग त्या आधी का नाही कळले?? कारण कि तो आत्मा संघर्ष करत असतो*, जेव्हा एक संपूर्ण चेहरा तयार होतो, आणि दोन हात तयार होतात, तेव्हा तो *आईच्या गर्भात दोन्ही हात जोडून, प्रार्थना करतो,* आणि *बोलतो कि, सोडविशी येथूनी, तर मी स्वहीत करिन, स्वहीत म्हणजे, परमार्थ करिन,* 🙏 हें वचन तो ईश्वराला देतो, आणि *पण जसा मोठा होतो, तसे ईश्वराला दिलेलं वचन विसरतो,* आईचा गर्भ म्हणजेचं नरक, या गर्भात *असंख्य यातना गर्भ सहन करत असतो,* *पृथ्वीवर जन्म घेणे, याचाच अर्थ स्वर्गात* *ऋण घेणे होय* अवकाशात फक्त ब्रह्मांड आहे, आणि *पृथ्वी म्हणजेचं स्वर्ग आहे* 🙏 संत ज्ञानेश्वर महाराजांनी, ज्ञानेश्वरीत, शुक्राणूची माहिती दिली आहे, आठशे वर्षापूर्वी हें लिखाण केले आहे, *गरुड पुरणातही* हे स्पष्ट व स्वच्छ लिहले आहे.आपण गरुड पुराण अनेकवार वाचले आहे .मग त्या काळात तर सोनोग्राफी नव्हती मग हें गूढ ज्ञान संत ज्ञानेश्वर यांना कुठून प्राप्त झाले,?? आता राहिला, *आत्म्याचे अस्तित्व खरेच आहे का?* मनुष्य देहाची पुण्याई असे पर्यंतच जिवंत राहतो, पुण्याई संपली कि देह ठेवावा लागतो, *आपल्याला दिसतो तो फक्त देह* 🍁🌻 मग तो शरीरातील सूक्ष्म आत्मा आपल्याला का दिसतं नाही,?? *आत्मा येताना त्या गर्भवती मातेला ही दिसला नाही,* *आणि जेव्हा मनुष्य देह सोडतो तेव्हाही दिसतं नाही*, पण जेव्हा शरीरातुन आत्मा बाहेर निघतो, तेव्हा एक तर तो *दुःखी* असतो किंवा तो *तृप्त झालेला* असतो, जर तो अंतरात्मा *दुःखी* असेल, तर त्या शरीराला लाथ मारतो, आणि बोलतो, स्वहीत करिन असे बोलला होतास, पण या *पृथ्वीवर जन्माला येऊन, मनुष्य देहाचे सार्थक, करू शकलास नाहीस* 🌻🍁🌻🍁 संपूर्ण आयुष्य केवळ देह सुख पाहिलेस, *या कलियुगात संतांची ओळख करून घेऊ शकला नाहीस,* आता मला पुन्हा 84 लक्ष योनीचा फेरा मारावा लागणार 😭😭😭 असे बोलून तो अंतरिचा आत्माराम पुढील प्रवासाला निघतो, आता ज्या व्यक्तीने प्राण सोडले आहेत, ती व्यक्ती, कुठे अडकली, जसे कि *लोभात, किंवा काही खाण्याची इच्छा, अपूर्ण वासना राहिली, तर पुन्हापुन्हा त्या आत्म्यास जन्म घ्यावा लागतो*,😭😭😭 अश्या कित्येक परमार्थिक व्यक्ती आहेत, जे उपासना करुन, घरात सगळ्यांना सांगून गेलेत, कि आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम नाम घ्यावा 🙏 *म्हणून मरणाचे स्मरण असावे* शरीराचे सार्थक करावे, *पूर्वजास उद्धरावे हरी भक्ती करुनी* 🙏 गुरूचरित्र ग्रंथात दुसऱ्या अध्याय मध्ये, *कलिकाळ* हा ब्रम्ह देवा समोर, आपली जीभ आणि लिंग धरून उभा आहे, आणि त्याने शपथ घेतली आहे कि, पृथ्वीवर मी मनुष्याला नागडा करिन, त्याला कपडे काढायला लावीन, परमार्थ करुन देणार नाही, जीभ, आणि वासना हेच माझं शस्त्र राहील, तेव्हा ब्रह्म त्याला बोलतात, कि *जे संतांना शरण जातील, जे परमार्थ करतील, त्यांना तू बाधा करू नकोस, कली ही अट मान्य करतो, आज आपण पाहतो कि मनुष्य हा केवळ, देहाचे भोग घेत आहे, त्याचा रसनेवर, आणि वासनेवर ताबा नाही, अंगावर कपडे राहिले नाहीत, जे लिहिले आहे, तेच सत्य आता अनुभवायला मिळत आहे, *यातून सुटायचं असेल, तर जा सदगुरूंना शरण,* सुटेल तुझे जन्म आणि मरण, 🌻🍁 *शरणा गतांची वाहे चिंता, तो एक सदगुरु दाता* *जैसे बालके वाढवी माता, नाना यत्ने करुनी* 🙏 प्रत्येक मनुष्याकडे आठ विषय आहेत, 1= *लोभ* , 2 *क्रोध*, 3 *वासना* 4 *मद* 5 *मत्सर 6 चिंता 7 भावना 8 संशय* हें आठ विषयी मनुष्याचे मन, आणि अंतरात्मा चालवतात, हें *आठही विषय कोणत्याही शाळेत शिकवले जात नाहीत, ते दिसतं देखील नाहीत, पण मनुष्य त्यांचा अनुभव घेत असतो,* मग अंतरात्माची ओळख कशी घ्यायची,?? *ज्याला परमार्थाची प्राप्ती झाली आहे, जो लोभात, आणि वासनेत ना अडकता, केवळ परमार्थ करत आहे, त्यालाच *अंतरीच्या आत्मारामाची ओळख होते*, कारण कि अंतिम समय जेव्हा येतो, तेव्हा त्या व्यक्तीला जाणीव होते, कि आपले या इहलोकांतील कार्य संपले आहे, *मी जे वचन आईच्या गर्भात दिले होते, त्याच सार्थक झाले आहे, आता मला जिवंत पणीच मोक्ष प्राप्ती व्हावी* जेव्हा तो असे *नामस्मरण* करत अंतरी संवाद साधत असतो, तेव्हा, परेतून आवाज येतो, आता तुझी जाण्याची वेळ आली आहे, सगळ्यांना निरोप दे, उपासना करुन, पूजा करुन, मनुष्य देह सोडतो, *काही जण अंतिम समयी नामस्मरण* करताना, देह त्याग करुन गेलेत,🙏🙏🙏🌻🍁🌻🍁🌻🍁 आपण काय करायचे, ते प्रत्येकाने ठरवायचे!!!!! *|| अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||*

+2 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 14 शेयर

*श्रीराम समर्थ* *समर्थ रामदासस्वामी रचित दासबोधावरील श्री रविंद्र पाठक यांची निरूपणें.दशक १३-नामरुप,समास ३–उभारणीनिरूपण, निरूपण क्रमांक ४८९–भाग १ मधील सार.* श्रीमद् दासबोधातील तेरावा दशकातील तिसऱ्या समासाच्या आधारे या विश्वाच्या उभारणीची प्रक्रिया समर्थ आपल्याला समजावून सांगत आहेत. या दशकाचे शीर्षक नामरूप असे आहे त्या दशकाला आपण शब्दांच्या आधारे न बघता आजूबाजूच्या पसरलेल्या सर्व विश्वाकडे एकदा नजर टाकून बघितलं तर लक्षात येतं की हे संपूर्ण विश्व नाम आणि रूपाच्या अधीन आहे.जे, जे काही डोळ्यांनी दिसतंय त्याला एक विशिष्ट रूप आहे आणि त्या रूपाला एक नावदेखील आहे त्यामुळे या दृश्यजगामध्ये नाम आणि रूपाच्या पलिकडे दुसरं काहीच नाही. मनुष्याची जिज्ञासा अशी असते की,या संपूर्ण विश्वाची उभारणी कशी झाली या नामरूपाने हे जग आज मला दिसतंय किंवा आपल्या आत्मज्ञानानी हे भासतंय असं जाणलं तरी या सर्व प्रक्रियेची नेमकी उभारणी कशी झाली?हे नामरूपाने असलेले विश्व नेमकं कशा पद्धतीने उदयास येतं?याचा जनक कोण आहे?कोणी निर्माण केलं हे?असे अनेक प्रश्न मनुष्याच्या जिज्ञासेला नेहमीच आकर्षित करत असतात.या विश्वउत्पत्तीचा शोध प्रत्येकजण आपआपल्या पद्धतीने घेत असतो.समर्थ या विश्वनिर्मितीची प्रक्रिया सांगताना म्हणतात.... *ब्रह्म घन आणि पोकळ ! आकाशाहून विशाळ !* *निर्मळ आणि निश्चळ ! निर्विकारी !!१३.३.१.!!* या ईश्वरीय तत्वाच्या अंतरंगामध्ये असलेले ब्रह्मतत्व हे मनुष्याच्या तर्कवादाला आकलन होत नाहीत. ज्याला प्रत्यक्ष वेद देखील नेती,नेती म्हणून मागे हटतात कारण एकाच वेळेला दोन विरूद्धार्थी शब्द संकल्पना मानवी मनाला कधीच तर्कवादाच्या आधारे पडू शकत नाहीत. घन देखील आहे आणि पोकळ देखील आहे, अशी कुठली वस्तू आहे की जी गच्च भरलेली आहे आणि त्याचवेळेला ती पोकळ देखील आहे. जे आकाशापेक्षाही विशाल आहे ही कल्पना मनुष्य करूच शकत नाही. मानवी मनाला आकाशाचा ठाव काही प्रमाणात घेता आलेला आहे अशावेळी आकाशापेक्षा विशाल काय असू शकतं, आम्ही आकाशातही मळ बघणारी लोकं आहोत, खरंतर आकाशात कुठलाही मळ नाही, आम्हांला जो आकाशाचा रंग दिसतो तो आकाशाला चिकटलेला नाही तर वातावरणात असलेल्या धुळीकणांच्या आधारे आलेला रंग आहे. त्यामुळे आकाश देखील निर्मळ बघण्याची आमची प्रवृत्ती होवू शकत नाही. इथं ब्रह्मस्वरूप हे त्याच्याहीपेक्षा शुद्ध त्याच्याहीपेक्षा स्वच्छ, विमळ हे मानवी भूमिकेमध्ये आपल्याला कळू शकत नाही, आम्हांला आकाशदेखील हालताना दिसतं. खरंतर आकाश तर जिथल्या तिथंच आहे परंतु आमच्या अंतरंगातली माया सांगते की आकाशदेखील हालतं. ज्यावेळी वैज्ञानिकांनी पृथ्वी फिरते का सूर्य पृथ्वीभोवती फिरतो अशा पद्धतीचे निकष मांडले होते त्यावेळी काही शास्त्रज्ञांनी शोधून काढले होते की सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते परंतु त्यावेळेला असं विधान करणे खूप धाडसाचे काम होते त्यावेळचे धर्मपंडित अशा विधानांना मान्यता देणे शक्य नव्हते कारण पृथ्वी म्हणजे आपला अहंम् हा कसा फिरू शकेल? सूर्य उगवतो आणि सूर्यच मावळतो अशी आमची भूमिका होती. त्यामुळे आम्हांला निश्चळत्व म्हणजे काय हे आमच्या अहंकारामुळे कळू शकत नाही आमच्या दृष्टीने आम्ही स्थिर आणि सर्व दृश्यजग हे आमच्याभोवती जणूकाही प्रदक्षिणा करते आहे असा आमच्या अहंकाराचा भाग आहे. खरंतर निश्चळ जर काही या जगामध्ये असेल तर ते केवळ ब्रह्म आहे जे कधीच ढळू शकत नाही, जे कधीच कोणालाही प्रदक्षिणा घालू शकत नाही जे, जे जिथं आहे ते तिथं आहे केवळ त्याचे अस्तित्व हेच त्याचे निश्चळत्व आहे असे हे निश्चळत्व देखील मानवी बुद्धीच्या तर्काला पडू शकत नाही. आणि जे आहे ते विकारहिन कसं असू शकेल? कुठल्याही गोष्टीत चांगला किंवा वाईट विचार हा विकार असणारच. अगदी एखादं फूल उमललेले आहे आणि जे केवळ आहे या भूमिकेमध्ये जरी राहिले तरी त्यामध्ये गंध आहे, रूप आहे त्या फुलाला नाम आहे त्यामध्ये कुठला ना कुठलातरी उपाधीचा विकार आहे. हे जर दृश्यजगातल्या प्रत्येक गोष्टीला लागू पडते तर ब्रह्म हे असं काय आहे की ज्याला कुठलाच विकार लागू शकत नाही. हे मानवी मनामध्ये कळणं हे अत्यंत अवघड होऊन जाते. त्यामुळे समर्थ आपल्याला ब्रह्मस्वरूपाला विश्वउभारणीच्या दृष्टीने जे खरंतर या विश्वाला व्यापून उरलंय, खरंतर एकच एक ते आहे परंतु मनुष्याचे चर्मचक्षू या दृश्याला वेगळं बघण्यामुळे त्याच्यावरती असलेल्या नाम रूपाच्या उपाधींमुळे जाणू शकत नाही. या ब्रह्मस्वरूपाला समजून घेण्यासाठी आपल्याला या संपूर्ण दृश्यजगाचा हा जनक कसा आहे या भूमिकेकडे समर्थ घेऊन जाऊ लागतात. *ऐसेंचि आसतां कित्येक काळ ! तेथें आरंभला भूगोळ !* *तया भूगोळाचें मूळ ! सावध ऐका !!१३.३.२.!!* समर्थ म्हणतात हे एकच एक परब्रह्म जे निश्चळ निर्विकार आहे त्याला काळ ही गोष्ट आपण कशा पद्धतीने सांगू शकणार. ब्रह्मस्वरूपाला काळाचे स्थान, उत्पत्तीच नाही जे केवळ आहे अशा वर्तमान स्थितीमध्ये आहे, आणि याला किती काळ मागे-पुढे याची मोजदाद करता येवू शकत नाही म्हणून त्याला सनातन हा शब्द आहे. सनातन या एका शब्दाच्या आधारे ब्रह्मस्वरूपाची कालगणना आपल्याला सांगता येऊ शकते. जे काळाच्या उद्गमबिंदूच्या आधी आहे आणि काळ संपल्यानंतरही जे राहणार आहे असं हे सनातन परब्रह्म. या सनातन परब्रह्मामध्ये काळाची किती घटिका, किती पळे, अनंत तप, कल्प गेले असतील कोणास माहिती जिथं मोजदाद करायला ते परिमाणच उपलब्ध नाही असा बराच काळ आणि या परब्रह्मामध्ये एकोऽहम् बहुस्याम् या भगवंताच्या संकल्पनेमुळे या परब्रह्माचा हा भूगोल निर्माण झाला. आपल्याला या परब्रह्माची निर्मिती झाली असं म्हणता क्षणी संपूर्ण तर्कवादाला एकप्रकारे आव्हान मिळतं की हे परब्रह्म ज्यामध्ये कुठलाही विकार नाही, ज्याला कुठलाही कर्तुम् भाव नाही, ज्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीने निश्चळ बघण्याची शक्यता नाही अशा परब्रह्मामध्ये हा भूगोल, हे ब्रह्मांड कशा पद्धतीने निर्माण झालं इथं मनुष्याचा तर्कवाद भांबावून जातो त्याला कळत नाही. इथं संतांच्या अंतरंगातले आत्मज्ञानच आपल्याला या भूगोलाची रचना कशा पद्धतीने झाली ते समजावून सांगते. त्याचे अत्यंत सुरेख वर्णन समर्थांनी या समासात सांगितले आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम लक्ष्मीकांत खडके 🙏

+2 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 2 शेयर

*श्रीराम समर्थ* *समर्थ रामदासस्वामी रचित दासबोधावरील श्री रविंद्र पाठक यांची निरूपणें.दशक १३-नामरुप समास २- सारासारनिरूपण, निरूपण क्रमांक ४८८ – भाग ४ मधील सार.* दासबोधातील तेराव्या दशकातील दुसऱ्या समासाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये या शून्यत्वाला भेदून पलिकडे कसे जायचे आणि ज्यांनी त्या तत्वाला भेदलं आहे त्यांची अवस्था कशी असते, जे परब्रह्मस्वरूपाशी तदाकार झाले त्यांना जर परब्रह्म कुठे आहे? कसे आहे? त्या परब्रह्माला कशा पद्धतीने बांधायचे या अवस्थेचे वर्णन करताना समर्थ म्हणतात........ *जें सन्मुख चि चहुंकडे ! जेथें दृश्य भास उडे !* *धन्य साधु तो पवाडे ! निर्विकारीं !!१३.२.२५.!!* अशा या परब्रह्मस्वरूपाशी तदाकार झालेला जो सत्पुरुष आहे जो खऱ्या अर्थाने जीवन धन्य होऊन जगलेला आहे अशा साधुला एकच कळतं की हे परब्रह्मस्वरूप सर्वत्र सन्मुख आहे. आणि अशा सन्मुखतेमध्ये सर्व दृश्यजग जणूकाही विलीन होऊन गेलं आणि एकच एक राम या सर्व चराचरांमध्ये भरून उरला आहे. अशी ही साधुची प्रवृत्ती त्यामुळे तो साधु सतत निर्भय अवस्थेत जगू लागतो, त्याची आनंद ही एकच अवस्था टिकते कारण या परब्रह्मापासून वियोगच नाही अशा धन्य झालेल्या साधुने या परब्रह्मस्वरूपाशी तदाकारता प्राप्त केली. जे साधनेच्या अंतिम टप्प्यात पोहचलेले आहेत अशा दिव्य साधकाची अवस्था अशी की या मूळमायेच्या थोडंस अलिकडे या शून्याभोवती घुटमळताना या मांगल्यरेषेला भेदून जाण्यासाठी या अहंम् चे विसर्जन काही केल्या होत नाही आणि तो अहंम् सुटल्याशिवाय साधू ही जी अवस्था जगले त्या अवस्थेची प्राप्ती करता येत नाही. मग इथं प्रश्न येतो की काय करावं? कशा पद्धतीने आपण जीवनामध्ये या सारासार विवेकाचा आधार घेत य परब्रह्माशी तद्रूपता प्राप्त करावी? समर्थ म्हणतात....... *खोटें सांडून खरें घ्यावें ! तरीचं परीक्षावंत म्हणावें !* *असार सांडून सार घ्यावें ! परब्रह्म तें !!१३.२.२७.!!* परमार्थाच्या प्रांतात तुम्हांला जर या परब्रह्मस्वरूपाशी तद्रूप होण्याची मनोमन इच्छा असेल तर जीवनामध्ये हे असार सांडून सार घ्या, हे सार म्हणजेच परब्रह्म आहे. माझ्या जीवनातला माझा सद्गुरू हाच परमात्मा आहे आणि तोच चालता बोलता परब्रह्माचा अवतार आहे. त्यामुळे हे परब्रह्म जे भौतिक गोष्टींनी आम्हांला आज कळू शकत नाही, आज आम्ही त्याची केवळ कल्पनाच करू शकतो, परंतू कल्पना हे शस्त्र जर आम्हांला अहंम् च्या आधारे प्राप्त झाले तर ती कल्पना आपण साधुच्या आपल्या गुरुच्या दिशेने वळवावी. आपल्या गुरूला आपल्या जीवनामध्ये सर्वार्थाने भरून टाकावे. तोच माझ्या जीवानाचा सर्वोसर्वा आहे हा त्याच्यामध्ये असलेला निर्वाळा आपल्या जीवनात स्विकारावा. जर सद्गुरू हे चालतं, बोलतं परब्रह्म आहे तर जीवनामध्ये याच्यापेक्षा आणखी सार ते कोणते? आपण त्या साराला अखंडपणे दृढ ठेवावे त्याच्यापसून कधी आपला वियोगच करू नये. समर्थ म्हणतात..... *जाणतां जाणतां जाणीव जाते ! आपली वृत्ती तद्रूप होते !* *आत्मनिवेदन भक्ती ते ! ऐसी आहे !!१३.२.२८.!!* जीवनात सद्गुरूभोवती मनाचा एकदा का असा पिंगा पडू लागला,जिवनाच्या सर्व अवस्थांना सद्गुरू असा व्यापून उरला, माझ्या जीवनाचा कर्ता, भोक्ता, द्रष्टा आणि निश्चळ तत्व हे सर्व तोच आहे हा दृढ विश्वास जीवनात एकदा का भरून राहिला की मनाची वेगळी धाव शिल्लक राहत नाही. जागृती, स्वप्न, सुषुप्ती या अवस्था अत्यंत गुह्यपणे सद्गुरूंच्या स्मृती, त्यांचे साधन व्यापून उरतात. तेव्हा तुर्येसारखी अवस्थाही जीवाला प्राप्त होते आणि तो आपले भान हरवून बसतो. अशा साधकाची ही तुर्येची सीमारेषा सद्गुरूराया त्यांच्या कृपार्शिवादाने ओलांडून या परब्रह्मस्वरूपाच्या प्रांतामध्ये आपल्याला घेऊन जातो. इथं ते जाणणारं मन शिल्लक राहात नाही. इथं त्याला स्वतःचे वेगळे अस्तित्वच शिल्लक राहत नाही इथं घडते ते खऱ्या अर्थाने आत्मनिवेदन आणि अशा आत्मनिवेदनाच्या पलिकडे सांगायला ते शब्द देखील उरत नाही. म्हणून समर्थ म्हणतात...... *वाच्यांशें भक्ति मुक्ति बोलावी ! लक्ष्यांशें तद्रूपता विवरावी !* *विवरतां हेतु नुरावी ! ते तद्रूपता !!१३.२.२९.!!* सद्गुरूंचे भजन, साधन सद्गुरूंच्या स्मृती या सगळ्या भक्तीच्या अवस्था एकप्रकारे मुक्तीचेच रूप आहे, आपण लक्षांशाच्या आधारे त्याचे जर विवरण केलं तर बुद्धी आपल्याला योग्य पद्धतीने सांगेल की या तिन्ही अवस्थांना पार करून नेणारी ही भक्ती तुर्येच्या मुक्तीपर्यंत, त्याच्या दालनापर्यंत आपल्याला घेऊन जाते आणि त्यानंतर जे चिंतन करणारे जे मीपणाचे मन आहे, जे अनंत साधनांनी तोडायचा प्रयत्न केला तरी तुटत नाही पण या भक्तीच्या रसायनामध्ये मात्र सहज विरघळते.असे हे सद्गुरू भजनाचे मर्म जीवाला या परब्रह्मस्वरूपाशी तद्रूप करून टाकतं. जे परब्रह्मस्वरूप आजपर्यंत नेती नेती करत ज्या वेदांनी आम्हांला सांगितलं जे सद्रूप आहे,जे चिद्रूप आहे त्याच परब्रह्मस्वरूपाशी तद्रूप होण्याचे भाग्य प्राप्त झालं पण ते केवळ या माझ्या गुरूरायाच्या आशीर्वादाने, त्यांच्या अनुसंधानाने आणि त्यांच्या या जाणीवेने मी भरून स्वतःला समर्पित केले असा हा प्रेमयोग म्हणजे जीवनातला सारासार विचार आहे. आणि ते दालन आज सद्गुरूंच्या रूपाने प्राप्त झालंय गरज आहे मीपण त्याच्या चरणी समर्पित करण्याची. जानकी जीवन स्मरण जय जय राम लक्ष्मीकांत खडके 🙏

+1 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 0 शेयर

भारत का एकमात्र धार्मिक सोशल नेटवर्क

Rate mymandir on the Play Store
5000 से भी ज़्यादा 5 स्टार रेटिंग
डेली-दर्शन, भजन, धार्मिक फ़ोटो और वीडियो * अपने त्योहारों और मंदिरों की फ़ोटो शेयर करें * पसंद के पोस्ट ऑफ़्लाइन सेव करें
सिर्फ़ 4.5MB